पुणे, – महिंद्रा समूहाची रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा विकास शाखा महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड (MLDL) ने महिंद्रा सिटाडेलच्या दुसऱ्या टप्प्यात एक नवीन प्रीमियम निवासी टॉवर सुरू करण्याची घोषणा केली आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे येथे सुमारे 9.66 एकर क्षेत्रात हा निवासी प्रकल्प विस्तारलेला आहे. या टप्प्यात सुमारे 135 प्रीमियम 3 आणि 4 बीएचके निवासस्थाने सादर केली जात असून आधुनिक जीवनशैली उंचावण्यासाठी डिझाइन केलेली आहेत.
महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडचे मुख्य व्यवसाय अधिकारी (निवासी प्रकल्प) विमलेंद्र सिंग म्हणाले, “पुण्याच्या झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे आणि सांस्कृतिक समृद्धीमुळे प्रशस्त 3 आणि 4 बीएचके घरांची मागणी वाढली आहे. गेल्या दशकात, पिंपरीमधील स्थिर रिअल इस्टेट वाढ, आधुनिक परिसर, हरित क्षेत्रे आणि उद्योग तसेच आयटी पार्क्सच्या जवळील स्थान यामुळे हा भाग विस्तारासाठी एक उत्कृष्ट केंद्र बनला आहे. आमच्या मागील लाँचिंगला मिळालेल्या उत्तम प्रतिसादाच्या आधारावर, या नवीन प्रीमियम निवासी टॉवरचे उद्घाटन करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. या टॉवरद्वारे आम्ही एक समृद्ध समुदाय निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महिंद्रा सिटाडेलला पुण्याच्या शहरी क्षेत्रात एक महत्त्वाचा लँडमार्क म्हणून प्रस्थापित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
नवीन प्रीमियम निवासी टॉवर ऊर्जा कार्यक्षम वैशिष्ट्ये आणि कचरा व्यवस्थापन प्रणालीने सुसज्ज IGBC Gold पूर्व-प्रमाणित घरे सादर करून महिंद्रा लाइफस्पेसेसच्या शाश्वततेप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतिबिंब दर्शवतो. या प्रकल्पात विविध प्रकारच्या विचारपूर्वक तयार करण्यात आलेल्या सुविधा आहेत. त्यात एकापेक्षा जास्त बॅडमिंटन कोर्ट, जॉगिंग ट्रॅक आणि अर्ध-ऑलिंपिक पूल या गोष्टी आहेत. त्या रहिवाशांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य सुधारण्यात मदत करतात आणि त्यांना संतुलित आणि उत्साही जीवनशैली प्रदान करतात.
मुंबई-पुणे महामार्गाच्या जवळील मुख्य निवासी स्थानामध्ये वसलेला हा प्रकल्प आपल्या उत्तम स्थानामुळे अधिक फायदेशीर ठरतो. रहिवाशांना संत तुकाराम मेट्रो स्टेशन जवळच असून जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि पुणे-धुळे-नाशिक महामार्गासह प्रमुख वाहतूक मार्गांपर्यंत सहज जाता येते. तसेच कासारवाडी आणि पिंपरी रेल्वे स्थानक, तसेच पिंपरी चौक बस थांबा यांसारखी मुख्य वाहतूक केंद्रेही येथून अगदी जवळ आहेत.