Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळा: देशभरातील ३० लाख अनुयायी अभिवादनासाठी दाखल होणार : राहुल डंबाळे

Date:

पुणे : जानेवारी रोजी होणारा भिमाकोरेगाव विजयस्तंभ अभिवादन सोहळ्या निमित्त भाभवादन करण्यासाठी महाराष्ट्र सह उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात सह संपूर्ण भारतभरातून तब्बल ३० लाख भिम अनुयायी अभिवादनासाठी दाखल होणार उमा सह अनुयायांची ही संख्या लक्षात घेवून जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सर्व पायाभूत सुविधा मोठया प्रमाणात उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. भिमाकोरेगांव शौर्यदिनाच्या अनुषंगाने तसेच राज्यात अन्य कोणत्याही स्वरुपाचा तणाव नसल्याने अभिवादन सोहळा शांतते पार पडणार आहे अशी माहितील भिमाकोरेगांव विजयस्तंभ शौर्यदिन समितीचे अध्यक्ष

राहुल डंबाळे यांनी दिली.

अनुयायीची वाढती संख्या लक्षात घेता यंदाच्या वर्षी शौर्यदिन अभिवादन सोहळा दि. ३१ डिसेंबर व ०१ जानेवारी या दोन दिवसाच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेला आहे. दोन दिवसाच्या सोहळयाचे राज्यात सर्वत्र स्वागत होत असून ३१ डिसेंबर रोजी अंदाजे ५ लाख अनुयायी अभिवादन करतील. ज्यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरीक, महिला, लहान मुले यांच्यासह कुटुंबासह अभिवादनला येणाऱ्यांचा सहभाग राहणार आहे.

३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून विजयस्तंभ अभिवादनासाठी सर्व सजावटीसह संपूर्णपणे खुला राहणार असून भिमाकोरेगांव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीसह अन्य आंबेडकरी पक्ष संघटनांचे विविध कार्यक्रम सुरु होणार आहेत. विविध शासकीयविभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी कार्यक्रमांचे उद्घाटन याच दिवशी होणार असून ३१ डिसेंबरला मध्यरात्री १२ वाजता फटक्यांची भव्य आताशबाजी करण्यात येणार आहे.

१ जानेवारी रोजी पहाटे ६ वाजता राज्य शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा पवार हे विजयस्तंभास मानवंदन देणार आहेत. यावेळी भिमाकोरेगाव शायदिनासाठी कार्यरत राहिलेले पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा स्मृती चिन्ह व मानपत्र देऊन अजित पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहेत. त्यानंतर
वंचित बहुजन आघाडीचे नेते मा. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर. भिमआर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद, भारतीय बौध्द महासभेचे भिमराव आंबेडकर, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम, भारतीय दलित कोब्राचे अॅड. भाई विवेक चव्हाण यांचेसह माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी इत्यादी मान्यवर अभिवादन करणार आहेत.

सकाळी ८ : ३० वाजता समता सैनिक दलाची मानवंदना परेड अत्यंत दिमागदार पध्दतीने बँन्डपथकासह संचलन करणार असून यात सुमारे ८०० पेक्षा अधिक समता सैनिक सहभागी होणार आहेत.

सकाळी ९:३० वाजता १ जानेवारी रोजीच भारतीय सैन्य दलातील महार रेजिरमेंटमधील निवृत्त १५०० सैनिकांची मानवंदना परेड आयोजित करण्यात आली असून त्यांचे वतीने पुष्पचक्र अर्पण करुन लष्करी इतमातील महार गान गायले जाणार आहे. यासाठी देशभरातील विविध भागातून निवृत्त सैनिक यात सहभाग होणार आहेत.

सकाळी १०:३० नंतर आंबेडकरी कार्यकत्यांनी निर्माण केलेली ढोल पथक तसेच ढोल लेझिम पथक हे देखील या सोहळयात सहभागी होणार आहेत.

अभिवादन सोहळयानिमित्त भारतीय दलित कोन्नाचे भाई विवेक चव्हाण, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांचेसह पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे

यांच्या अभिवादन सभा परिसरात होणार आहेत.

जिल्हा प्रशासनाने गेल्या ३ महिन्यांपासून भिमाकोरेगांव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समिती यांच्या समवेत अनेकदा संयुक्त बैठका घेवून त्यातील सूचनांच्या आधारेच यंदाच्या वर्षी सर्वोत्तम नियोजन केले असून या नियोजनावद्दल समन्वय समिती समाधानी आहे. व संपूर्णपणे ठरलेल्या नियोजनाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात प्रयत्नशिल आहेत.

यंदाच्या वर्षी आंबेडकरी साहित्य तसेच पुस्तक विक्रेत्यांना विजयस्तंभालगतच जागा उपलब्ध करुन दिली असल्यामुळे पुस्तक विक्रेत्याबरोबरच अनुयायांमध्ये देखील आनंदाचे बातावरण आहे. चैत्यभूमीप्रमाणेच याठिकाणीदेखील करोडो रुपयांची साहित्यांची खरेदी केली जाणार आहे.

१५ हजार शासकीय निमशासकीय कर्मचारी या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र प्रयत्न करत असल्यमुळे हा उत्सव अत्यंत आनंदात पार पडणार आहे. तसेच एवढ्या मोठ्या संख्येने सर्व शासकीय कर्मचारी काम करीत असल्याने आता हा उत्सव सर्व समावेशक झाला असून हा देशाच्या मुख्य उत्सावामध्ये गणला जात आहे ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे असे मत रिपब्लिकन पक्षाचे परशूराम वाडेकर यांनी मांडले. दरम्यान विजयस्तंभावरसंविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने संविधाची प्रतिकृती लावण्यात यावी अशी मागणी समितीच्या वतीने आम्ही केली होती ती देखील मान्य केल्याचा आनंद वाटत असल्याचे वाडेकर यांनी सांगितले.

विजयस्तंभ शौर्यदिन अनुषंगाने देशभरातील अनुयायी दाखल होणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी पुणे शहर व जिल्हयातील सर्वच आंबेडकरी पक्ष संघटना एकत्रितपणे सज्ज झाल्या असून अनुयायांना सर्व त-हेची सुरक्षा व्यवस्था व अन्य पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी आम्ही समन्वय समितीच्या माध्यमातून ३ महिन्यांपासून प्रयत्नशिल आहोत या दरम्यान पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सी ओ, बार्टी महासंचालक, समाज कल्याण आयुक्त यांच्या समवेत सातत्याने बैठका घेत आहोत. अशी माहिती माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी दिली.

सध्या देशभरामध्ये कोविड १९ सबव्हायरंट जे. एन. १ ची शक्यता निर्माण झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर तसेच धूळीपासून संरक्षण व्हावे म्हणून अनुयायांनी शक्यतो मास्कचा बापर करावा असे आव्हान समिती व्दारे करण्यात येत आहे असेही धेंडे यांनी सांगितले.

यासंपूर्ण उत्सवात महिलांची वाढती संख्या लक्षात घेवून महिलांसाठीचे स्वतंत्र नियोजन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेले आहे. महिला सुरक्षितेसोबतच महिलांच्या दागिण्यांची चोरी होवू नये म्हणून पोलीसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. तसेच जिल्हा परिषदेकडून हिरकणी कक्ष व आरोग्य केंद्रांची उभारणी केली जात आहे यामुळे महिला वर्ग मोठया संख्येने या उत्सवात सहभागी होईल असे मत सुवर्णा डंबाळे यांनी मांडले.

तरी सदर पत्रकर परिषदेव्दारे राज्यातील व देशातील आंबेडकरी अनुयायांनी कोणत्याही अफवांना थारा न देता भिमाकोरेगांव शौर्यदिन अभिवादन सोहळयात सहभागी व्हावे.

सदर पत्रकार परिषदेत राहुल डंबाळे, डॉ. सिध्दार्थ धेंडे, परशूराम वाडेकर, सुवर्णा डंबाळे, स्नेहा माने आदिपदाधिकारी सहभागी होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर

छत्रपती  शिवाजी महाराजांच्या  स्वराज्य उभारणीत  त्यांच्या  तेजस्वी पराक्रमासोबत  त्यांचे ...

येरवडा कारागृहात कैद्यावर फरशीने हल्ला

पुणे-येरवडा कारागृहात एका कैद्यावर फरशीने जीवघेणा हल्ला करण्यात आला...

मनीष रायते ठरला मुळशी केसरी २०२५चा मानकरी

मुळशी केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ : मुळशीच्या आखाड्यात ऐतिहासिक...

Pcmc आयुक्त हेही युती सरकारच्या प्रचार मोहिमेचे प्यादे ? आप चा थेट प्रहार

आजचे लाभार्थी कंत्राटदार हे भाजपचे देणगीदार आहेत की सरकारच...