अन्वी जामखंडे, निकिता शेजवळ, दिव्या ढाकणे, अपूर्वा भूमकर यांसह मुलींची बाजी ; संस्थेतर्फे विद्यार्थ्यांचे अभिनंदन
पुणे : न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्च्या शार्दुल सुधाकरराव जाधवर कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज, जाधवर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज, पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या १२ वी चा निकाल १०० टक्के लागला आहे. अन्वी जामखंडे, निकिता शेजवळ, दिव्या ढाकणे, अपूर्वा भूमकर, पूर्वा कदम या प्रथम आल्या असून यंदा मुलींनी मोठया प्रमाणात बाजी मारली आहे. तर मुलांमध्ये श्रीकांत सुर्वे, वेदांत कुलकर्णी व प्रतिक चामे यांनी अव्वल क्रमांक पटकाविला आहे.
जाधवर ग्रुपचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह सर्व प्राचार्य, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
शार्दुल सुधाकरराव जाधवर कॉमर्स अँड सायनस ज्युनियर कॉलेजच्या विज्ञान शाखेत अन्वी जामखंडे (९७.५० टक्के), वाणिज्य इंग्रजी माध्यमात श्रीकांत सुर्वे (८७.३३ टक्के) आणि वाणिज्य मराठी माध्यमात निकिता शेजवळ (८३.०० टक्के) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
जाधवर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमधील विज्ञान शाखेत दिव्या ढाकणे ही ९२.१६ टक्के व वाणिज्य इंग्रजी माध्यमात अपूर्वा भूमकर ही ८९.६६ टक्के मिळवित अव्वल आली आहे. तर, पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विज्ञान शाखेचा वेदांत कुलकर्णी (९७.५० टक्के), कला शाखेत पूर्वा कदम (८२.६६ टक्के) व वाणिज्य शाखेत प्रतिक चामे (८१.१६ टक्के) यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.