पुणे-महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या दि.१४ सायंकाळी झालेल्या प्रभाग क्र.१६ मधील पदयात्रेस कार्यकर्ते व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी 4:३० वाजता सुरु झालेल्या या पदयात्रेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते. तिन्ही पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते, धंगेकर यांची पोस्टर्स, त्यांनी केलेल्या विकास कामांचे फलक, आदींसह ही पदयात्रा फटाक्यांच्या आतषबाजीत दारूवाला पूल येथून सुरु झाली.
उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासमवेत कॉंग्रेसचे सुजाता शेट्टी, भगवान धुमाळ, बुवा नलावडे, सुनील दैठणकर, अरुण कोरळकर, वाल्मिकी जगताप, दिलीप पवार, संगीता तिवारी, मुक्तार शेख, मयूर भोकरे, परवेझ तांबोळी, गीता तारू, संदीप लचके, राहुल सुपेकर, नितीन परतानी, नरेश नलावडे, गोपाळ पायगुडे, योगेश भोकरे, शैलेश भोकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदानंद शेट्टी, गणेश नलावडे, प्रवीण तरवडे, वनिता जगताप, सुप्रिया कांबळे, सारिका पारीख, अभिजित घाडगे, अलोख सरोदे, सरिता काळे, शिवसेनेचे विशाल धनवडे, जावेद खान, युवराज पारिख, राजेंद्र शिंदे, संतोष भुतकर, मुकुंद चव्हाण, योगेश खेंगरे, भाऊ शिंदे, पल्लवी जावळे, योगेश येनपुरे, उमेश बोर्डे आदी प्रमुख नेते व कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.
दारूवाला पूल येथून सुरु झालेली पदयात्रा नागेश्वर मंदिर येथून कामाला नेहरू मार्गे कागदीपुरा येथे पोहचली. तेथे माजी नगरसेवक मुख्तार शेख व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. तेथे महिलांची संख्याही लक्षणीय होती. धंगेकर यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतला व मोठा जयघोष केला व सत्कार केला. कसबा पेठेतील छोट्या रस्त्यांमधून पदयात्रा जाताना दुतर्फा उभ्या असणाऱ्या नागरिकांना धंगेकर आवर्जून भेटत होते. अनेक ठिकाणी पदयात्रेतील कार्यकर्ते व नागरिकांना चहा व सरबत दिले जात होते.
कसबा पेठमध्ये अनेक सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. मार्गांवर गणेश मंडळांतर्फे धंगेकारांचा सत्कार केला गेला. धंगेकरांनी सर्व मंडळांमधील गणेशाची आरती केली. साततोटी चौक, भोई आळी, कुंभार वाडा, त्वष्ठा कासार अशा असंख्य ठिकाणी धंगेकरांचे सत्कार होत राहिले. नागरिकांची प्रत्येक ठिकाणी अलौट गर्दी उसळत होती. मार्गावरील अनेक मंदिरांमध्ये धंगेकरांनी दर्शन घेतले. सुमारे चार तास चाललेली ही पदयात्रा रात्री आठच्या सुमारास गावकोस मारुती परिसर येथे समाप्त झाली.