पुणे: ऍडव्हेंचार,ऍडव्हेंचर ह्या लेखक फारूख शेख यांच्या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेत्री आणि प्रोड्यूसर किरण दुबे यांच्या हस्ते झाले. हे पुस्तक ख्यातनाम लेखक फारुख शेख यांच्याच ऍडव्हेंचार द ट्रेजरी इन द टनल (ए४टी४) ह्या आवृ्तीचा एक भाग आहे. हे पुस्तक ३,२०००० शब्दांमध्ये लिहले गेले आहे. आणि प्रथम आवृत्ती मध्ये १ लाख दहा हजार शब्द आहेत. यंगस्टर्सचे करामती कारणामे ह्या पुस्तकामध्ये प्रामुख्याने वाचावयास मिळतील. द ऍडव्हेंचार ( फोर ऍडव्हेंचर्स) ला पुण्याचे म्हणने वावगे ठरणार नाही. ऍडव्हेंचारची कल्पना २००५ मध्ये लेखकास सुचली,आणि तीला प्रत्यक्षात पुस्तकात उतरविण्यास जवळ-जवळ १२ वर्षाचा कालावधी गेला. ह्यात तरूणांची वैचारिक दिशा आणि क्षमतेचा परिचय मिळतो,याचबरोबर ह्याची पुढील आवृत्ती द सेकंड ऍडव्हेंचर, ऍडव्हेंचार अॉंंड द १६ प्यूअर अन्नास (ए४पीए१६) देखील लवकरच वाचकांच्या भेटीस येईल. ह्या पुढील आवृत्तीचे ४०,००० शब्द लिहून तयार आहेत.
हिट वेदा हे फारुख शेखचे उपनाव आहे. ५५ वर्षाच्या फारुख शेख यांचा जन्म पुण्यात झाला आणि आपल्या आयुष्यातील पहीली तीन दशके त्यांनी पुण्यात व्यतित केली.
पुण्यात असताना पूना ऑटोमोटिव रेसिंग असोसिएशनचे कार्यकारी सचिव म्हणून त्यांनी कार्य केले. टाइम्स ऑफ इंडिया (पुणे प्लस) साठी स्पोर्ट डेस्कवरदेखील ते कार्यरत होते. याचबरोबर कार अँड बाईक इंटरनॅशनल मासिकाचे ते सहयोगी संपादक देखील राहीले आहेत, ‘द गल्फ टुडे’ डेलीसाठी देखील त्यांनी कार्य केले आहे. द स्ट्रेट टाइम्स ब्रॉडशीट आणि मीडियाकॉर्प टुडे दैनिक टॅबलॉइडसाठी सिंगापूर मध्ये काम केले आहे.
ऍडव्हेंचार, ऍडव्हेंचर बद्दल थोडक्यात–
१९ व्या शतकात एक दक्षिण भारतीय राणी भव्य खजिण्याबरोबर पुण्याला येत होती. आणि लुटारूंपासुन खजिन्याचे रक्षण करण्यासाठी हा खजिना टनल मध्ये लपविण्याची जबाबदारी ती खजिना रक्षकास सोपावते. खजिना प्रकट करण्यासाठी असंख्य गुप्त संकेतांचे निराकरण विविध खलनायक, मारहाण, रहस्य आदि रोचक गोष्टींचे ह्या पुस्तकात वाचावयास मिळतील. अमानत शूर (वय १३ वर्षे), अमन शूर(१३वर्षे) हे दो जुळे , एलन जानझाद (१२ वर्षे, १० महिने) आणि ऑरा बाज (१२ वर्षे ८ महिने). ह्या मुख्य पात्रांभोवती ही कथा गुंफली गेलेली आहे. अमानत निर्विवाद, निर्णयक्षम अंतर्ज्ञानी आहे आणि ती रहस्यमय ज्ञानाचा पाठपुरावा करते. अमन ‘बलवान’, कुशल नेतृत्वी आणि लढा देण्यासाठी नेहमी तयार दिसतो. एलन संघामधील विद्वत्तापूर्ण आहे. त्याला पुस्तके आणि ज्ञान आवडते आणि तो एक शोधक देखील आहेत. तो हिंसा मोडतो परंतु शब्दांचा उपयोग करून आपल्या विरोधकांना निष्फळ ठरवतो.ऑरा ही एक अतिशय कुशल मार्शल आर्टिस्ट आणि रस्सी मल्लखांब मध्ये पारंगत आहे.
……………………………………………………………………………………………………