पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे अनोख्या व नाविन्यपूर्ण अशा पीवायसी रिबाऊंड स्पोर्टस् 309रॅकेट लीग स्पर्धेत 8 संघात 211 हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर दि.10जूनपासून सुरू होणार आहे.
>
> पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव विजय कुमार ताम्हाणे यांनी सांगितलेकी, पीवायसी रिबाऊंड स्पोर्टस् 309 रॅकेट लीग ही अनोखी व नाविन्यपूर्ण अशी लीग स्पर्धा मिश्र गटांत होणार असून यामध्ये प्रौढ, पुरूष, महिला आणि कुमार यांचा संघात समावेश असणार आहे. तसेच,या सर्व प्रकारांचे मिळून 309गुण होतील. स्पर्धेचे हे सलग दुसरे वर्ष आहे.
तसेच, या लीगची संकल्पना गिरीश करंबळेकर, शशांक हळबे, हिमांशु गोसावी, हेमंत बेंद्रे, सुंदर अय्यर, अभिषेक ताम्हाणे, रणजीत पांडे, आलोक तेलंग आणि सारंग लागू यांनी अस्तित्वात आणली आहे. क्लबच्या सभासदांसाठीक्रिकेट, बॅडमिंटन,
ते पुढे म्हणाले की, क्लबच्या सभासदांकरिता क्रिकेट, बॅडमिं
पहिल्या आणि पाचव्या लढतीमध्ये दुहेरीच्या सामन्यांचा समावेश आहे. त्यातील प्रत्येक खेळाचा 31गुणांचा सामना असणार आहे.तिसऱ्या लढतीमध्ये मुलांचा दुहेरी सामन्याचा समावेश आहे. त्यातील प्रत्येक खेळाचा 11गुणांचा सामना असणार असून यामध्ये तीनही क्रीडा प्रकार असणार आहे. चौथ्या लढतीमध्ये मिश्र दुहेरी गटाचा सामन्याचासमावेश असून प्रत्येक खेळाचा 15गुणांचा सामना असणार आहे. 2महिला खेळाडूंना 3 रॅकेट क्रीडा प्रकारांपैकी 2 क्रीडा प्रकारात सहभागी होता येणार आहे
रिबाऊंड स्पोर्टस्चे संचालक आलोक तेलंग यांनी सांगितले की, या अनोख्या लीग स्पर्धेमुळे सदस्यांना एकचक्रीडा प्रकारापेक्षा विविध क्रीडा प्रकारात आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. तसेच, या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या सदस्यांनी खेळणे बंद केले आहे अथवा ज्यांना पुन्हा खेळण्यास सुरूवात करायची आहे, त्यांच्यासाठी ही लीग स्पर्धा महत्वपूर्ण ठरेल. आम्ही आमच्या क्लबच्या सदस्यांना व त्यांच्या कुटूंबियांना पीवायसी हिंदू जिमखाना तर्फे सर्वोत्तमक्रीडासुविधा उपलब्ध करून देण्यास इच्छुक आहे.
>
> स्पर्धेसाठी 211 खेळाडूंची निवड लिलाव पध्दतीने करण्यात आली असून हे खेळाडू आठ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.यामध्ये रणजीत पांडे सर्वात महागडा खेळाडू ठरला असून त्यानंतर आदित्य कानिटकर, राहुल पाठक, राधिका कानिटकर,पराग चोपडा, अमित नाटेकर, मिहिर केळकर, केदार देशपांडे यांचा समावेश आहे.
स्पर्धेतील सहभागी संघ व संघमालक यामध्ये एक्स्कॅलिबर्स्-अभिषेक ताम्हाणे व मधुर इंगहाळीकर, जांभीयाज्-अजय जाधव व भुषण रानडे, किर्रपन्स्-अभिजीत खानविलकर व अमोल काणे, निखिल डोंगरे, कुकरीज्-पराग चोपडा, केदार नंदगोंडे, लॅन्सर्स्-आलोक तेलंग, अमित नाटेकर, मस्कीटर्स-सारंग लागू व मिहिर केळकर, साब्रेज -नौश जाधव व सुधांशु मेडशीकर, समुराईज्-आशिष देसाई, राधिका कानिटकर व अतुल बिनिवाले यांचा समावेश आहे.