क्वीन ऑफ द वर्ल्ड इंडिया २०२२ या सौंदर्य स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच मुंबईत पार पडली. उर्मिमाला बोरुआ आणि पारस वालिया यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा भारतातील सर्व वयोगटातील स्त्रियांसाठी आयोजित केली होती. या स्पर्धेला हिंदी मनोरंजन सृष्टीतील अनेकांनी हजेरी लावली तर प्रमुख अतिथी म्हणून ग्लॅमर्स अभिनेत्री करिष्मा कपूर या सोहळ्यात सहभागी झाली. तिच्या या सोहळ्यात सहभागी होण्याने सर्व स्पर्धकांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला तर तिने सुद्धा सगळ्यांना प्रोत्साहित केलं.
प्रतिष्ठित मिस क्वीन ऑफ द वर्ल्ड इंडिया या किताबाची मानकरी ठरली ती म्हणजे नैनिशा ओझा तर पारुल खन्ना हिने एमएस क्वीन ऑफ द वर्ल्ड इंडियाचा किताब आणि प्रियंका बजाज सिब्बलने मिसेस क्वीन ऑफ द वर्ल्ड किताबावर आपलं नाव कोरल तसेच ज्योतिका बब्बर कपूरने ही २०२२ची एलिट मिसेस इंडिया ठरली. या सगळ्या विजेत्यांना करिश्मा कपूरच्या हस्ते मुकुट प्रधान करण्यात आला तर आता या सगळ्या विजेत्या सौंदर्यवती अमेरिकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्वीन ऑफ द वर्ल्ड या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या सोहळ्यासाठी मनोरंजनसृष्टीतील साजिद खान (साजिद-वाजिद संगीतकार जोडीचे) हे उल्लेखनीय नाव या उपस्थित होते तर अॅलिस ली – न्यूयॉर्कमधील मिसेस वर्ल्ड या सुद्धा सोहळ्याला उपस्थित होत्या; तर या स्पर्धेला परीक्षक म्हणून शीना बजाज, डॉ. सिद्धार्थ भार्गव, डॉ. मिकी मेहता आणि डॉ. पायल दलाल यांचा समावेश होता. अंतिम फेरीसाठी स्पर्धकांना प्रशिक्षण देणारे आणि तयार करणारे मार्गदर्शक म्हणजे साक्षी लालवाणी, शगुन मेहंदीरत्ता, अलेसिया राऊत आणि अंजली राऊत आणि अभिनव माथूर, कॉउचर पार्टनर म्हणून प्रेस्टो कौचर तसेच डिझायनर आणि स्टाइलिंग पार्टनर म्हणून डिंपल कपूर यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केल.
क्वीन ऑफ द वर्ल्ड इंडिया २०२२ हे सौंदर्य स्पर्धेच्या विश्वाला नवीन वळण देण्याकरीता सुरु केले गेलेले एक व्यासपीठ आहे. आजच्या आधुनिक महिलांसाठी, तिचे वय, वैवाहिक स्थिती आणि पार्श्वभूमी विचारात न घेता सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण अशी हि सौंदर्य स्पर्धा असून हे. स्पर्धेच्या या नवीन आवृत्ती ने ग्लॅमर, आत्मविश्वास आणि सौंदर्य साजरे करत प्रत्येक स्पर्धकाला वैयक्तिक वाढीसाठी उत्कृष्ट अनुभव प्रदान केला. या वर्षी स्पर्धेत 18 ते 50 पेक्षा जास्त वयाच्या महिला ग्लॅमरच्या अद्भूत जगात सहभागी झाल्या तर त्यांना आपल्या भारतीय संस्कृतीचे आंतरराष्ट्रीय मंचावर प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी सुद्धा मिळत आहे. संपूर्ण भारतातून या स्पर्धेत सर्व वयोगटाच्या ६० स्त्रियांनी सहभाग घेतला होता.
उर्मिमाला बोरुआ – क्वीन ऑफ द वर्ल्ड इंडियाच्या सीईओ आणि नॅशनल डायरेक्टर म्हणतात, “या वर्षीची सौंदर्य स्पर्धा प्रचंड यशस्वी झाली. आम्ही जे ठरवले होते ते साध्य केल्याचा आम्हाला आनंद आहे. सर्व प्रकारातील सौंदर्य साजरे करणारी आणि स्त्रियांना अमर्याद असण्याची आणि आपल्या प्रत्येकामध्ये असलेली राणी शोधण्याची प्रेरणा देणारी महिलांची जमात तयार करणे हे एक स्वप्न होते. मार्च २०२३ मध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे QOTW स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही आता आमच्या चार भव्य विजेत्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत. आम्ही आमच्या चार राण्यांसोबत आमचे प्रशिक्षण लवकरच सुरू करू आणि या सुंदर प्रवासाला सुरुवात करू. अंतिम फेरी.”
क्वीन ऑफ द वर्ल्ड स्पर्धा 12-18 मार्च, 2023 दरम्यान न्यू जर्सी येथे नियोजित आहे जिथे जगभरातील स्पर्धक सहभागी होतील आणि प्रतिष्ठित मुकुटसाठी स्पर्धा करतील.