श्री क्षेत्र लेण्याद्रि येथे २५० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी
जुन्नर /आनंद कांबळे
श्री क्षेत्र लेण्याद्रि येथे मोफत सर्व रोग निदान तसेच नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात परिसरातील २५० रुग्णांची तपासणी करण्यात आली अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर यांनी दिली.
श्री लेण्याद्रि गणपती देवस्थान ट्रस्ट, गोळेगाव यांच्या प्रयत्नातुन तसेच डोके हॉस्पिटल नारायणगाव, डॉ.मनोहर डोळे मेडिकल फाऊंडेशन नारायणगाव व डॉ.किरण शेटे स्पाइनालॉजी क्लिनीक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. स्पाइनालॉजी क्लिनीक संस्थापक व संचालक डॉ. किरण शेटे यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले तसेच जुन्नर नगरपालिकेचे नगर सेवक समीर भगत हे शिबीराचे अध्यक्ष होते. यावेळी जुन्नरच्या नगर सेवीका सुवर्णा बनकर, गोळेगावच्या सरपंच शारदा लोखंडे, डॉ.अमेय डोके, डॉ.मनोहर डोळे मेडिकल फाऊंडेशन नारायणगाव डॉक्टर टीम, देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार सदाशिव ताम्हाणे, विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे, भगवान हांडे, कार्यलयीन सचिव रोहिदास बिडवई तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. डोके हॉस्पिटल नारायणगाव यांच्या मार्फत २०० रुग्णांची ह्र्दयरोग तपासणी, पोटाचे विकार, स्त्रीयांच्या आजारांवर तपासणी करुन ओषधे वाटप केले. तसेच डॉ.मनोहर डोळे मेडिकल फाऊंडेशन नारायणगाव यांच्या मार्फत १५० रुग्णांची नेत्र तपासणी केली. त्यातील २१ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. डॉ. किरण शेटे यांनी आरोग्यदायी जीवनशैलीचे रहस्य या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. देवस्थानचे सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. विश्वस्त संजय ढेकणे यांनी सुत्रसंचालन केले व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.