जैन धर्म ही एक आचारणप्रणाली-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Date:

  • सातवा आगमग्रंथ ‘उवासगदसाओ’ चे मराठी भाषांतर ‘उपासकदशा’ आवृत्तीचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन.

पुणे, दि.६:- जैन धर्म ही एक आचारणप्रणाली असून नागरिकांना जीवन जगतांना आदर्श आचरण करण्याची शिकवण देतो, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासनाच्या प्रमुख प्रा.डॉ. विमल बाफना लिखित सातवा आगमग्रंथ ‘उवासगदसाओ’ चे मराठी भाषांतर ‘उपासकदशा’

आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्र. कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव प्रफुल्ल पवार, जैन स्टडीजचे अध्यक्ष डॉ. शैलेश गुजर, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, अखिल भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, लेखकांनी जैन धर्मातील तत्वे या पुस्तकाच्या माध्यमातून मराठी भाषेत समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. प्राचीन भाषेतील साहित्याचे सर्वसामान्य नागरिकांना कळेल अशा स्वरुपात लेखन केल्यास देशाचा प्राचीन इतिहास आणि संस्कृती नागरिकांना समजण्यास मदत होईल.

भगवान महावीर यांनी अहिंसा, सत्य, अस्तेय, स्वादरसंतोष, इच्छापरिमाण ही तत्वे सांगितली. आजच्या युगात त्याचे अनुकरण करुन जीवन जगणे काळाची गरज आहे. या तत्वांचे अनुसरण करीत जैनधर्म नेहमीच संकटाच्यावेळी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो असेही ते म्हणाले.

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. करमळकर म्हणाले, विद्यापीठात एकूण १७ अध्यासने आहेत. अध्यासनाच्यावतीने अतिशय सूत्रबुद्धपद्धतीने संशोधनात्मक कामकाज होत आहे.

डॉ. बाफना यांनी ग्रंथाच्या मराठी आवृत्तीविषयी माहिती दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...