आता ईस्त्रायलमध्ये शिकविले जाणार मराठी भाषेचे धडे

Date:

 

मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत तेल-अविव विद्यापीठाबरोबर पार पडला सामंजस्य करार.

मुंबई- मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हा विदेशात व्हावा या उद्दीष्टाने मराठी भाषा मंत्री श्री.विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून आज इस्त्रायलमधील तेल-अवीव या विद्यापीठाशी मराठी भाषा शिकविण्याचा अतिशय महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. विदेशात मराठी भाषेचा अभ्यासक्रम सुरु करण्याची ही बहुधा पहिलीच घटना असून नजीकच्या काळात अन्य देशांमध्येही मराठी भाषेसाठी सामंजस्य करार करण्यात येईल. जेणेकरून मराठी भाषेचा प्रसार जगभरात होईल असा विश्वास श्री.तावडे यांनी यावेळी व्यक्त केला.

      ईस्त्रायलमधील तेलअविव विद्यापीठात  मराठी भाषा शिकविण्यासाठी आज तेलअविव विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, आणि राज्य मराठी विकास संस्था यामध्ये सामंजस्य करार पार पडला. मराठी भाषा भारताबाहेर अन्य देशांच्‍या विद्यापीठात शिकविण्याचा बहुधा हा पहिलाच प्रसंग असावा. ईस्त्रालयमध्ये मराठी भाषीक लोकांची वस्ती अधिक आहे. त्यामुळे तेलअविव या विद्यापीठात सामंजस्य करारामुळे मराठी भाषा शिकता येणार आहे. देश विदेशात मराठी भाषेचा प्रसार करणे हे या करारामागील प्रमुख उदिृष्ट आहे. या सामंजस्य कराराप्रसंगी मराठी भाषा मंत्री श्री.विनोद तावडे, तेलअविव विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्रा.रानान रैन, ईस्त्रायलचे वाणिज्य दूत डेविड अकोव्ह, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय देशमुख आणि राज्य मराठी विकास संस्थेचे आनंद काटीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

तेल-अवीव विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्यामधील झालेल्या सामंजस्य कराराची प्रमुख वैशिष्टये सांगताना श्री.तावडे म्हणाले की, अनिवासी भारतीय तसेच भारताबाहेर स्थायिक झालेले भारतीय वंशाच्या लोकांशी सांस्कृतिक वीण घट्ट करून त्यांचा उपयोग व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, कला इ. द्वारे परराष्ट्र संबंध मजबूत करण्याकडे केंद्रातील मोदी सरकारचा कल आहे. त्याला अनुसरूनच देशोदेशी स्थायिक झालेल्या मराठी भाषिक लोकांच्यात महाराष्ट्राची भाषा, कला, संस्कृती जिवंत रहावी यासाठी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक तसेच मराठी भाषा विभाग आग्रही आहे. भारताबाहेर मराठी भाषिक लोकांची जिथे अधिक वस्ती आहे अशा ठिकाणच्या विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकण्याची सोय उपलब्ध केल्यास तेथील मातीत जन्मलेल्या मराठी पिढीची महाराष्ट्राशी असलेली आपली सांस्कृतिक नाळ तुटणार नाही असेही श्री.तावडे यांनी स्पष्ट केले.

इस्त्रायलमध्ये नियतकालिक प्रसिद्ध होतात. दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो, तसेच गाजलेल्या मराठी नाटकांचे प्रयोग तेथे आयोजित केले जातात. १९९६ साली जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन इस्रायलमध्ये केले गेले होते. असे असले तरी, इस्रायलच्या मातीत जन्मलेल्या या लोकांच्या पुढच्या पिढ्या मातृभाषा म्हणून हिब्रू बोलतात. इस्रायली विद्यापीठांत संस्कृत, हिंदी तसेच मल्याळम भाषा शिकण्याची सोय असली तरी मराठी शिकण्याची सोय आजवर उपलब्ध नाही असेही त्यांनी सांगितले.

आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर यादृष्टीने आम्ही प्रयत्न सुरु केले. तेल-अवीव विद्यापीठाने  जे इस्रायलमधील सर्वात मोठे आणि जगातील आघाडीच्या १५० विद्यापीठांपैकी एक आहे. महाराष्ट्र शासनाच्या तसेच राज्यातील विद्यापीठांच्या मदतीने आपल्याकडे मराठीचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. देश-विदेशात मराठी भाषेचा प्रचार करणे हे राज्य मराठी विकास संस्थेच्या उद्दिष्टांपैकी एक असल्यामुळे संस्थेने मुंबई विद्यापीठ आणि तेल-अवीव विद्यापीठासह इस्रायलमध्ये प्रायोगिक तत्वावर १ महिन्याचा मराठी भाषेचा अभ्यास वर्ग उपलब्ध करून देण्याच्या प्रकल्पात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठी भाषेचा हा अभ्यासक्रम २०१६ पासून इस्त्रायलमध्ये सुरु करण्यात येईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य देशांतील ज्या शहरांमध्ये मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे, तेथे अशा प्रकारचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही श्री.तावडे यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....