· सीबी वंशातील दुसरी, मध्यम आकाराची ‘मेड इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ मोटरसायकल
· अमर्याद स्टाइल – भव्य टँक, फोर्क बुट्स गोलाकार एलईडी हेडलॅम्प अनोख्या रिंग डिझाइनसह, डोळ्यांच्या आकाराचे एलईडी विंकर्स, सीटच्या खाली स्लीक एलईटी टेल लॅम्प आणि स्पोर्टी ग्रॅब रेल
· आरामदायी आणि सोयीस्कर – रूंद टायर्स, ‘टक अँड रोल’ सीट डिझाइन, खालच्या बाजूला स्किड प्लेट
· अमर्याद कामगिरी – ताकदवान 350सीसी इंजिन, पीजीएम- एफआय तंत्रज्ञानासह 4 स्ट्रोक ओएचसी सिंगल- सिलेंडर
· आधुनिक तंत्रज्ञान – होंडाच्या सर्वात आधुनिक तंत्रज्ञानामुळे मिरवण्यासाठी आणखी कारणे –
Segment First असिस्ट अँड स्लिपर क्लच
Segment First अडव्हान्स्ड डिजिटल- अनालॉग मीटर
Segment First होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (एचएसटीसी)
· होंडाच्या सव बिगविंग वितरकांकडे आणि अधिकृत संकेतस्थळावर (www.hondabigwing.in) नोंदणी सुरू
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2021 – 350- 500 सीसी मोटरसायकल क्षेत्राचे पुनरूज्जीवन करण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. कंपनीने आज नव्या CB350RS चे जागतिक प्रीमियर करत असल्याचे जाहीर केले. आधुनिक स्टाइल आणि उच्च दर्जा यांसह CB350RS सीबी वंशातील नवा सदस्य ठरला असून ती ‘मेड इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ आहे. CB350RS ची किंमत आकर्षक असून ती रू 1,96,000 (एक्स शोरूम पॅन इंडिया) पासून सुरू होते.
सीबी ब्रँडच्या समृद्ध वारशाविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘सीबी ब्रँड खऱ्या मोटरसायकल प्रेमींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. 1959 मधे लाँच झाल्यापासून सीबी 92 ने कायमच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे. ही गाडी उत्तम कामगिरी, आरामदायीपणा, स्टाइल, तंत्रज्ञान आणि विश्वासार्हता यांचा मिलाफ घालणारी आहे. गेल्या वर्षी भारतीय चालकांना ‘मेड इन इंडिया’ ‘सीबी ब्रँड’चा अनुभव घेण्याची आणि आनंददायी रायडिंगची मजा घेण्याची संधी मिळाली. आज आम्हाला सीबी मालिकेत आणखी एक अध्याय जोडताना आनंद होत आहे. सीबी ब्रँडचा वारसा ठळकपणे दाखवणारी CB350RS आपली आधुनिक स्टाइल, उच्च दर्जा आणि बायकिंगचा आनंद देत भारतीय ग्राहकांना खरे मूल्य प्रदान करेल.’
CB350RS विषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘सीबी ब्रँडचा वारसा पुढे नेणारी CB350RS ‘रोड सेलिंग कॉन्सेप्ट – आरएस’वर आधारित आहे. ही संकल्पना गाडीच्या रस्त्यावरच्या सफाईदार कामगिरीची आणि चालकाला मिळणाऱ्या आरामाची साक्ष देणारी आहे. CB350RS ही गाडी चालकाच्या अभिजात शहरी जीवनशैलीला शोभणारी आणि सामर्थ्यवान 350 सीसी इंजिन असलेली आहे. ही गाडी सर्व चालकांना सज्ज होऊन ‘त्यांची कहाणी जगण्यासाठी’ साद घालणारी आहे.’
अमर्यादित स्टाइल
नव्या CB350RS मधे शहरी जीवनशैलीला शोभणारे आणि प्रत्येक रस्त्यावर वर्चस्व गाजवणारे ठळक, आक्रमक डिझाइन देण्यात आले आहे.
गाडीच्या इंधन टाकीवर असलेला चमकदार आणि ठळक होंडा बॅज सहजपणे नजरेत भरणारा आणि वारसा दर्शवणारा आहे.
7- Y आकाराचे अलॉय व्हील्स हाताळणी तसेच वाट काढणे अधिक चांगले, सोपे, हलके होतेच, शिवाय त्यामुळे आधुनिक- आकर्षक लूकही मिळतो.
कुठऊनही उठून दिसेल अशा प्रकारे CB350RS ची रचना करण्यात आली आहे. अनोखे रिंग डिझाइन असलेले गोलाकार आकाराचे एलईडी हेडलॅम्प्स गाडीचा रेट्रो- आधुनिक लूक आणखी उंचावतात. डोळ्याच्या आकाराचे एलईडी विंकर्स आणि सीटखालचे स्लीक एलईडी टेल लॅम्प तिचा आकर्षक आकार दर्शवणारे आहेत. फिकट ब्लॅक स्मोक्ड आणि रियर फेंडरमुळे CB350RS चे एकंदर वजन कमी करून स्पोर्टीयर इमेज देणे शक्य झाले. बाजूला असलेल्या मफलर्सचे स्मोकी- ब्लॅक फिनिश क्रोमच्या वापराने उठावदार करण्यात आले आहे. पुढील बाजूच्या सस्पेन्शनवरील फोर्क बूट्समुळे गाडीचे रूप दणकट झाले आहे, तर स्पोर्टी ग्रॅब टेलमुळे
CB350RS च्या एकंदर डिझाइनला पूर्णत्व आले आहे.
अमर्याद कामगिरी
CB350RS ला 350सीसी, एयर- कुल्ड 4 स्ट्रोक ओएचसी सिंगल सिलेंडर इंजिनची जोड देण्यात आली असून त्यामुळे सर्वाधिक उर्जा 15.5 kW@5500 आरपीएमची निर्मिती होते. आधुनिक पीजीएम- एफआय सिस्टीम वापरणारे ऑन- बोर्ड सेन्सर्स इंजिनला गाडी चालवण्याच्या परिस्थितीनुसार सातत्याने योग्य प्रमाणात इंधन मिळत राहील व पर्यायाने परिणामकारक ज्वलन आणि कमी उत्सर्जन होईल याची काळजी घेतली जाते. गाडीद्वारे या क्षमतेच्या गाड्यांच्या विभागातील सर्वाधिक म्हणजे 30 Nm@3000 rpm चा सर्वाधिक टॉर्क दिला जातो. त्यामुळे ही गाडी शहरी प्रवासासाठी सहजसोपी, वैविध्यपूर्ण बनली आहे. इंजिन ऑफसेट सिलेंडर पोझिशन वापरते व त्यामुळे स्लायडिंग फ्रिक्शन कमी होते आणि असिमेट्रिकल कनेक्टिंग रॉडमुळे ज्वलनाच्या वेळेस कमीत कमी उर्जेचा ऱ्हास होतो. यामधे क्लोज्ड क्रँक आणि क्रँककेस आणि ट्रान्समिशनमधे भिंतीसह वापरण्यात आल्याने अंतर्गत घर्षण कमी होऊन उर्जेचा कमी ऱ्हास होतो.
एयर कुलिंग यंत्रणा सातत्याने मोठ्या प्रमाणात हवा घेत असल्यामुळे कार्यक्षमता वाढते आणि सर्व आरपीएम श्रेणींमधे योग्य ज्वलन होते व पर्यायाने इंजिनचे तापमान योग्य प्रमाणात राहाते. पिस्टन कुलिंग जेट इंजिनची थर्मल कार्यक्षमता वाढवते आणि त्यामुळे इंधनाची कार्यक्षमताही वाढते.
प्रमुख सिलेंडरवरील मेन शाफ्ट कोअक्सिल बॅलन्सर प्राथमिक आणि दुहेरी व्हायब्रेशन्स काढून टाकत CB350RS ला प्रवासाची सर्वोत्तम साथीदार बनवते.
CB350RS ला 45 एमएम आकाराची मोठी टेलपाइप देण्यात आली असून ती मफलर क्षमतेसह जास्तीत जास्त समतोल साधून ठळक, पण कमी आवाजाची निर्मिती करते. एक्सपान्शन चेंबरमधील एक चेंबरच्या आराखड्यामुळे थ्रॉटलला वेग दिल्यानंतर भरदार थम्पिंग एक्झॉस्ट नोट मिळते. एक्झॉस्ट पाइप्सना दुहेरी स्तर असल्यामुळे उष्णतेने रंग उडण्याचा प्रकार होत नाही आणि रूप दीर्घकाळ टिकून राहाते.
अत्याधुनिक तंत्रज्ञान
होंडाच्या आधुनिक तंत्रज्ञानयुक्त वैशिष्ट्यामुळे CB350RS चालकाला मिरवण्याची संधी देते.
Segment First असिस्ट आणि स्लिपर कोचमुळे क्लच लिव्हर कमी करताना गियर बदलणे सफाईदार होते आणि पर्यायाने वारंवार गियर बदलण्याची क्रिया कराव्या लागणाऱ्या प्रवासात कमी थकवा जाणवतो व जास्त आराम मिळतो.
व्हिंटेज रूप असलेल्या Segment First आधुनिक डिजिटल- अनॉलॉग मीटरमधे टॉर्क कंट्रोल, एबीएस, साइड स्टँड इंडिकेटर, इंजिन इनिहिबिटर, गियर पोझिशन इंडिकेटर आणि बॅटरी व्होल्टेज देण्यात आले आहेत. गाडी चालवण्याचा हा अनुभव तीन प्रकारांत देण्यात आलेल्या फ्युएल एफिशियन्सी डिटेल्समुळे आणखी मजेदार होतो.
1. रियल टाइम मायलेज: लाइव्ह फ्युएल इफिशियन्सी दर्शवतो.
2. सरासरी मायलेज – रायडिंगची पद्धत आणि परिस्थितीच्या इतिहासानुसार सरासरी मायलेज दर्शवते.
3. डिस्टन्स टु एम्प्टी – टाकीमधे किती इंधन उरले आहे, त्यानुसार CB350RS किती प्रवास करू शकते हे दर्शवते.
Segment First होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (एचएसटीसी) ही स्मार्ट टॉर्क कंट्रोल यंत्रणा पुढील व मागील चाकाच्या वेगातील फरक लक्षात घेऊन, स्लिपचे गुणोत्तर मोजून रियर व्हील ट्रॅक्शन कायम राखण्यास मदत करते तसेच फ्युएल इंजेक्शनद्वारे इंजिन टॉर्क नियंत्रित करते. एचएसटीसी स्विचच्या मदतीने मीटरच्या डाव्या बाजूला ऑन/ऑफ करता येते. डिजिटल डिस्प्लेमधील ‘टी’ इंडिकेटर सिस्टीम कार्यरत असताना चमकतो.
आरामदायी आणि सोयीस्कर
ड्युएल चॅनेल एबीएस मुळे आपत्कालीन परिस्थितीत ब्रेक लावल्यास किंवा निसरड्या रस्त्यावर ब्रेक लावल्यास चाकं लॉक होण्यास प्रतिबंध करते आणि त्युळे चालकालाही दिलासा मिळतो. या मोटरसायकलला पुढच्या बाजूस 310 एमएम डिस्क ब्रेक आणि 240 एमएम रियर डिस्क असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ब्रेकिंगची कामगिरी पुरेशी होते.
रूंद पद्धतीचे टायर्स (पुढचे– 100/90, मागचे – 150/70) वेगवेगळ्या प्रदेशात- रस्त्यांवर गाडी चालवण्याची परिस्थिती सुधारतात आणि एकंदरीत रस्त्यावरची पकड घट्ट करतात. 19 इंची पुढच्या चाकामुळे आकर्ष व आधुनिक लूक मिळतो, तर त्याला मागे असलेल्या 17 इंची चाकासह लोअर रियर स्टान्सची जोड देण्यात आली आहे.
स्टिअरिंग सहजपणे व्हावे यासाठी स्टील पाइपमधे हाफ ड्युप्लेक्स- क्रॅडल फ्रेम देण्यात आले आहे. खालच्या बाजूस इंजिन माउंट करून पुढच्या बाजूस विभागण्यात आलेल्या लोडमुळे गुरुत्वाकर्षणाचा एकंदर केंद्रबिंदू कमी होतो व त्यामुळे गाडी चालवण्याचा एकंदर अनुभव, वाट काढणे सोपे होते.
स्विंग आर्मसाठी रिजिड बॉक्स- सेक्शन स्टील ट्यूब देण्यात आल्या असून त्यामुळे वाकडेपणा कमी होतो आणि ड्रायव्हिंगच्या ताकदीचा टॉर्क रस्त्यावर स्थलांतरित होत असल्यामुळे रायडिंगचा एकंदर अनुभव आरामदायी होतो. आतल्या बाजूस असलेल्या स्किड प्लेटमुळे इंजिनलाअतिरिक्त सुरक्षा मिळते आणि ती रस्त्यावर चालवणे जास्त सोपे होते.
सीट्सच्या ‘टक अँड रोल’ डिझाइनमुळे जास्त चांगले कुशनिंग मिळते आणि रोजचा प्रवास तसेच दूरवरची सफर निवांत होते. CB350RS मधे बसण्याची स्थिती पुढे झुकणारी असल्यामुळे स्पोर्टी रायडिंग स्टान्सला ती शोभून दिसते.
लार्ज सेक्शन फ्रंट सस्पेंशनमुळे गाडीची प्रतिमा उठावदार झाली आहे, शिवाय कठीण रस्त्यावरही त्यामुळे खूप आराम मिळतो. प्रेशराइज्ड नायट्रोजन चार्ज्ड रियर सस्पेंशनमुळे अतिशय प्रतिसादात्मक रियर डॅम्पिंग कामगिरी होते.
इको इंडिकेटरच्या मदतीनेस्मार्ट राइडला जाता येईल, कारण त्यामधे गाडी चालवण्याचा वेग आणि वापरण्यात आलेल्या इंधनाचे प्रमाण मोजून किफायतशीरपणे कशी गाडी चालवता येईल हे सांगितले जाते.
इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विचमुळे लहान थांब्यांवर सहजपणे इंजिन चालू- बंद करता येते. कमी दृश्यमानता असलेल्या ठिकाणी हझार्ट स्विचमुळे चालकाची सुरक्षितता जपली जाते. ठळक आणि दणकट 15 लीटर इंधन टाकी आणि टॉप ग्लास मायलेजमुळे न थांबता मोठ्या पल्ल्याचा प्रवास करता येतो.
रंग, उपलब्धता आणि किंमत
CB350RS ची किंमत रू. 1,96,000 (एक्स शोरूम पॅन भारत) आहे. रस्त्यावरच्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारी CB350RS दोन रंगांच्या पर्यायात उपलब्ध असून त्यात रेडिएंट रेड मेटॅलिक आणि ब्लॅक विथ पर्ल LiksVZ~l यलो यांचा समावेश आहे. आजपासून होंडाने देशभरातील आपल्या प्रीमियम डीलरशीप्समधे – बिगविंग टॉपलाइन आणि बिगविंगमधे CB350RS ची नोंदणी सुरू केली आहे.