मृत्यू, टर्मिनल इलनेस व क्रिटिकल इलनेस यासाठी तुलनेने किफायतशीर दरात इन्शुरन्स कव्हर देणार –
मुंबई:- कॅनरा एचएसबीसी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स लाइफ इन्शुरन्सने मृत्यू, टर्मिनल इलनेस व क्रिटिकल इलनेस अशा प्रसंगांमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना इन्शुरन्स कव्हर देण्यासाठी व त्याद्वारे विविध प्रकारच्या जोखमींपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी ग्रुप टर्म एज प्लान दाखल केला आहे. दरवर्षी नूतनीकरण करता येणाऱ्या या ग्रुप टर्म प्लानबरोबर कव्हरेजचे तीन पर्याय उपलब्ध आहेत आणि योजनाधारकांना निरनिराळे फायदे दिले जाणार आहेत.
कॅनरा एचएसबीसी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स लाइफ इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज माथुर यांनी सांगितले, “कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या जवळच्या व्यक्तींच्या आर्थिक सुरक्षेवर उपाय करण्याच्या हेतूने कर्मचाऱ्यांना पुरेसे संरक्षण देण्यासाठी ग्रुप टर्म एज प्लान एम्प्लॉयर्ससाठी तयार करण्यात आला आहे. एम्प्लॉयरनी निवडलेल्या पर्यायानुसार, हा प्लान कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा व मृत्यू, टर्मिनल इलनेस व क्रिटिकल इलनेस यापासून संरक्षण देतो. योजनेतील फायद्यांव्यतिरिक्त, यामुळे कंपनीला कर्मचाऱ्यांचा विश्वास जिंकणे आणि त्यांना कंपनीमध्ये सुरक्षेची व आत्मविश्वासाची भावना देणे, यासाठीही मदत होणार आहे.”
प्लानची ठळक वैशिष्ट्ये:
कव्हरेजचे 3 पर्याय उपलब्ध आहेत:
Ø पर्याय 1 – केवळ मृत्यू
Ø पर्याय 2 – मृत्यू व टर्मिनल इलनेस (टीआय)
Ø पर्याय 3 – मृत्यू, टर्मिनल इलनेस (टीआय) व क्रिटिकल इलनेस (सीआय)
मास्टर पॉलिसीचे प्रशासन सुरळित व सुलभपणे केले जाते.