पुणे-: भारतातील सर्वात मोठी एकात्मिक सोलार कंपनी आणि टाटा पॉवरची संपूर्ण मालकीची उपकंपनी टाटा पॉवर सोलारला २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या उलट लिलाव (रिव्हर्स ऑक्शन) प्रक्रियेनंतर एनटीपीसीसाठी १७३०.१६ कोटी रुपये सर्वसमावेश किमतीला ३०० मेगावॅट क्षमतेच्या सीपीएसयू–II प्रकल्पाच्या उभारणीसाठी ‘लेटर ऑफ अवॉर्ड‘ अर्थात काम सोपवले जात असल्याचे अधिकृत निर्णय पत्र दिले गेले आहे. या ग्रीड-कनेक्टेड सोलार फोटोव्होल्टाइक प्रकल्पाचे कमर्शियल ऑपरेशन सुरु होण्यासाठी सप्टेंबर २०२१ (१८ महिने) हा महिना निश्चित करण्यात आला आहे. हे काम मिळाल्यामुळे बाहेरील व अंतर्गत कामे मिळून टाटा पॉवर सोलारकडे आता एकूण ८५४१ कोटी रुपयांची कामे आली आहेत.
टाटा पॉवरचे सीईओ आणि एमडी श्री. प्रवीर सिन्हा यांनी सांगितले, “या प्रकारच्या प्रकल्पांमधून टाटा पॉवरच्या प्रकल्प व्यवस्थापन आणि कार्यान्वयन कौशल्यांवरील विश्वास दर्शवला जातो. या कामातून आम्हाला आमच्या ग्राहकांना त्यांच्या अपेक्षांप्रमाणे सर्वोत्तम सेवा देण्यावर लक्ष केंद्रीत करणे कायम ठेवण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.”
टाटा पॉवरचे (रिन्यूएबल्स) प्रेसिडेंट आणि टाटा पॉवर सोलारचे एमडी व सीईओ श्री. आशिष खन्ना यांनी सांगितले, “एनटीपीसीसारख्या आघाडीच्या सार्वजनिक उद्योगाकडून मोठे व आव्हानात्मक ग्रीड-बेस्ड सोलार ईपीसी काँट्रॅक्टस सातत्याने मिळत राहणे ही टाटा पॉवर सोलारसाठी अभिमानास्पद बाब आहे. हा डीसीआर प्रोजेक्ट असल्यामुळे आम्ही हा प्रकल्प आमच्या सेल्स व मॉड्युल्ससोबत उभारणार आहोत.”
सप्टेंबर २०१९ मध्ये उलट लिलाव झाल्यानंतर टाटा पॉवर सोलारला जवळपास ३४३ कोटी रुपये किमतीचा १०५ मेगावॅटपी फ्लोटिंग सोलार प्रोजेक्ट विकसित करण्यासाठी ‘लेटर ऑफ अवॉर्ड‘ देण्यात आले होते. यामध्ये तीन वर्षे प्रकल्पाचे संचालन व देखरेख करण्याच्या कामाचा देखील समावेश होता. हा प्रकल्प देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या फ्लोटिंग सोलार प्रकल्पांपैकी एक आहे. हे काम केरळमधील अलप्पुझामध्ये कायामकुळं जिल्ह्यातील एनटीपीसी जलाशयावर केले जात असून प्रकल्प २१ महिन्यात पूर्ण केला जाणार आहे.