मुंबई, ८ जुलै २०२१ – डीबीएस बँक इंडिया लिमिटेड (डीबीआयएल) या डीबीएस बँकेच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले आहेत. २७ नोव्हेंबर २०२० रोजी लक्ष्मी विलास बँकेचे डीबीएस बँक इंडिया लिमिटेडमध्ये (डीबीआयएल)
एकत्रीकरण करण्यात आले होते आणि एकत्रीकरणाच्या योजनेनुसार निकालांमध्ये एलव्हीबीच्या तेव्हापासूनच्या कामगिरीचा समावेशही करण्यात आला आहे.
कामगिरीची वैशिष्ट्ये
- डीबीआयएलच्या निव्वळ उत्पन्नात ८५ टक्क्यांची वाढ होऊन ते आर्थिक वर्ष २०२१ मध्ये २६७३ कोटी रुपयांवर (एलव्हीबीच्या १३४ कोटी रुपयांचा समावेश) पोहोचले आहे. आर्थिक वर्ष २०२० मध्ये ही आकडेवारी १४४४ कोटी रुपये होती.
- करपूर्व नफा (पीबीटी) आर्थिक वर्ष २०२० मधील १७० कोटी रुपयांवरून ६७९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान एलव्हीबीचे ३४१ कोटी रुपयांचे करपूर्व नुकसान समाविष्ट केल्यानंतरही ही वाढ झाली आहे. निव्वळ नफा आर्थिक वर्ष २०२० मधील १११ कोटी रुपयांवरून ३१२ की रुपयांवर गेला आहे.
- एकूण ठेवी ४४ टक्क्यांनी वाढून ५१,५०१ कोटी रुपयांवर (एलव्हीबीच्या १८,८२३ कोटी रुपयांसह) गेले आहे. बचत खात्याची बाकी ~२०७ टक्क्यांनी वाढली आहे, तर करंट खात्याची बाकी वार्षिक पातळीवर ~९८ टक्क्यांनी वाढली असून त्यात एकत्रीकरणामुळे झालेल्या वाढीचाही समावेश आहे. एकूण कासा गुणोत्तर १९ टक्क्यांवरून ३१ टक्क्यांपर्यंत सुधारले आहे.
- निव्वळ कर्ज रू. ३६,९७३ कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे (एलव्हीबीच्या १०,६८५ कोटी रुपयांचा समावेश)
- एलव्हीबी पोर्टफोलिओ वगळता डीबीआयएलसाठी एकूण एनपीए १.८३ टक्के राहिला. एलव्हीबीबरोबर एकत्रीकरण झाल्यानंतर एकूण एनपी १२.९३ टक्क्यांपर्यंत घसरला असला, तरी बँकेचा निव्वळ एनपीए एकत्रितपणे २.८३ टक्के असून ८४ टक्के तरतुदसाठी आहे.
- कॅपिटल अडिक्वेसी रेशिओ १५.१३ टक्के, तर सीईटी१ बरोबर १२.३४ टक्के आहे. वर्षादरम्यान डीबीएस बँकेने एकत्रीकरणाला आधार देण्यासाठी २५०० कोटी रुपये डीबीआयएलमध्ये घातले.
- बँकेने सवलतीची कररचना अवलंबली असून त्यामुळे एकाच वेळेस अडजस्टमेंट करण्याचे अतिरिक्त १८४ कोटी रुपये शुल्क द्यावे लागले.
एकत्रीकरणानंतर बँकेने एलव्हीबी कर्मचारी व ग्राहकांचे डीबीएस कुटुंबात स्वागत केले असून एलव्हीबी व डीबीएस कर्मचारी एकत्र करून एलव्हीबी व्यवसायाची पुनर्रचना केली जात आहे. ऑपरेटिंग प्लॅटफॉर्म्स आणि शाखांच्या एकत्रीकरणाचे कामकाज सुरू आहे. एलव्हीबी करंट आणि बचत खात्यांची स्थिर वाढ तसेच २०२१ मध्ये सुवर्ण कर्ज पोर्टफओलिओमध्ये झालेली वाढ हे सध्याच्या धोरण यशस्वी ठरत असल्याचा प्राथमिक निर्देश आहे.
बँकेच्या कामगिरीविषयी डीबीएस बँक इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरोजित शोम म्हणाले, ‘नोव्हेंबर २०२० मध्ये लक्ष्मी विकास बँकेचे (एलव्हीबी) एकत्रीकरण झाल्यापासून आणि महामारीची दुसरी लाट असतानाही आम्ही लक्षणीय प्रगती केली आहे. अपेक्षेप्रमाणे एलव्हीबीचे उच्च निव्वळ एनपीए आणि ऑपरेटिंग नुकसानीमुळे आमच्या आर्थिक निकालांवर तत्काळ परिणाम झाला असला, तरी या एकत्रित फ्रँचाईझीच्या दीर्घकालीन भविष्याविषयी आम्हाला विश्वास वाटतो. पूर्वीच् एलव्हीबीच्या कामकाजापैकी आम्ही सुवर्ण कर्ज व्यवसायाचे पुनरूज्जीवन केले असून ठेवींमध्ये वाढ झाली आहे. ऑपरेटिंग यंत्रणा व प्रक्रिया एकत्रित करण्यास आमचे प्रथम प्राधान्य असून त्यामुळे विस्तृत ग्राहक फ्रँचाईझीला सर्वोत्तम सेवा मिळतील.’
जून २०२१ मध्ये डीबीएसीचा सलग दुसऱ्यांदा फोर्ब्जच्या जगातील सर्वोत्कृष्ट बँकांच्या यादीत समावेश झाला होता. ४०,००० बँकिंग ग्राहकांच्य जागतिक सर्वेक्षणावर आधारित डीबीएसला भारतात कार्यरत असलेल्या ३० देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बँकांमध्ये पहिला क्रमांक देण्यात आला होता. त्यापूर्वीच्या वर्षात एशियामनीने डीबीएस बँक इंडियाला बेस्ट इंटरनॅशनल बँक इन इंडियाचा दर्जा दिला होता. बँकेला ग्रे प्लेस टु वर्क इन्स्टिट्यूटतर्फे इंडियाज बेस्ट एम्प्लॉयर्सपैक एक असल्याचा मानही मिळाला होता. बँकेचे देशभरातील १९ राज्यांत ६०० शाखांचे नेटवर्क असून तिची कर्मचारी संख्या ५५०० आहे