या वर्षात भारतात सर्वाधिक 81.72 अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक

Date:

(केंद्रीय वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय यांच्याकडून प्राप्त माहिती )

◆ 2020-21 या वर्षात भारतामध्ये आतापर्यंतची सर्वात जास्त म्हणजे 81.72 अब्ज अमेरिकन डॉलर्स थेट परदेशी गुंतवणूक (FDI) करण्यात आली असून हा आकडा गेल्या वर्षीपेक्षा म्हणजे आर्थिक वर्ष 2019-20 मधील 74.39 अब्ज अमेरिकन डॉलर्स गुंतवणूकीपेक्षा 10 टक्क्यांनी जास्त आहे.

◆ कंपनी भागभांडवलात आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये झालेली थेट परदेशी गुंतवणूक (FDI) (59.64 अब्ज अमेरिकन डॉलर्स) ही गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 19 टक्क्यांनी वाढली आहे.(49.98 अब्ज अमेरिकन डॉलर्स)

◆ आर्थिक वर्ष 2020-21 साठी या परदेशी गुंतवणूकदारांमध्ये प्रथम क्रमांकावर सिंगापूर (29%), दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका (23%), आणि तिसऱ्या क्रमांकावर मॉरिशस (9%) आहे.

◆ आर्थिक वर्ष 2020-21मध्ये कॉम्प्युटर हार्डवेअर व सॉफ्टवेअर च्या क्षेत्रात सर्वात जास्त गुंतवणूक झाली असून भागभांडवलातील एकूण थेट परदेशी गुंतवणुकीपैकी 44% गुंतवणूक या क्षेत्रात झाली आहे. त्याखालोखाल बांधकाम (पायाभूत सुविधा) क्षेत्रात 13 % व त्यानंतर सेवाक्षेत्रात 8% इतकी गुंतवणूक  झाली आहे.

◆ आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात झालेल्या गुंतवणुकीत गुजरातचा 78%, कर्नाटकचा 9% आणि दिल्लीचा 5% वाटा आहे.

◆ 2020-21 या आर्थिक वर्षात भागभांडवलात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी गुजरात ला सर्वात जास्त म्हणजे 37%, त्याखालोखाल महाराष्ट्राला 27%  व कर्नाटकला 13% गुंतवणूक प्राप्त झाली.

◆ आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये गुजरातला प्राप्त झालेल्या भागभांडवलात सर्वाधिक वाटा (94%) कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात असून बांधकाम (पायाभूत सुविधा) क्षेत्रात 2% इतका वाटा होता.

◆ गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2020-21 या आर्थिक वर्षात बांधकाम (पायाभूत सुविधा) क्षेत्र, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्र, रबरी वस्तू, किरकोळ बाजारपेठ, औषधे व विद्युत उपकरणे या क्षेत्रातील गुंतवणूक 100 टक्क्यांनी वाढली आहे.

◆ सर्वात मोठ्या 10 परदेशी गुंतवणूकदारांमध्ये सौदी अरेबिया पहिल्या स्थानावर आहे. गेल्या आर्थिक वर्षातील 89.93 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स च्या तुलनेत या 2020-21 च्या आर्थिक वर्षामध्ये सौदी अरेबियाने 2816.08 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स ची गुंतवणूक केली आहे.

◆ आर्थिक वर्ष 2019-20 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये अमेरिकेने केलेल्या गुंतवणुकीत 227 टक्क्यांची तर इंग्लंड ने केलेल्या गुंतवणुकीत 44 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यात

‘मास्मा रिन्यूएबल एनर्जी एक्स्पो’ १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान पुणे, ...

केंद्र सरकारच्या कामगार कायद्याविरोधातील उद्याच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा पाठिंबा.

मुंबई, दि. ११ फेब्रुवारी २०२६ केंद्रातील भाजपा सरकारने कामगार कायद्यात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जनतेची फसवणूक, वीज स्वस्त नाही तर १६% ने महाग होणार: अतुल लोंढे

महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक, तेलंगणा, गुजरातमधील वीज दर स्वस्त कसे, अदानीच्या...