नवी मुंबई: यूटीआई इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी आणि सर्व्हिसेस लिमिटेड (यूटीआई आईटीएसएल) ने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात आपल्या दुसर्या आधार सेवा केंद्राचे उद्घाटन केले. आधार सेवा केंद्राचे उद्घाटन कंपनीच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यूटीआई आईटीएसएलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विजय कुमार जैन यांच्या हस्ते झाले. या केंद्रात आधार नोंदणी आणि आधारसंबंधित माहिती अद्ययावत करण्याची सेवा उपलब्ध असेल.
आधार सेवा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी श्री विजय कुमार जैन म्हणाले की,“यूटीआई आईटीएसएल मार्च २०२० पासून युआयडीएआयशी संलग्न झाले आहे आणि दिल्ली येथे पहिले आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आले. यूटीआई आईटीएसएलच्या संपूर्ण भारतामध्ये एकूण ४७ शाखा आहेत आणि आम्ही या सर्व शाखेतून व भारतातील इतर ठिकाणांद्वारे आधार सेवांचा विस्तार करू. ”
ते पुढे म्हणाले की, “नवी दिल्ली नंतर हे दुसरे आधार सेवा केंद्र आहे. भारतीय नागरिकांना ह्या आधार सेवा प्रदान करण्यासाठी यूआयडीएआयशी संलग्न होण्याचा बहुमान आम्हाला मिळाला आहे. हे आधार सेवा केंद्र मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि नवी मुंबई मध्ये सर्व आवश्यक सोयीसुविधा असलेले, अर्जदाराला त्रास-मुक्त अनुभव देणारे असे एकमेव आधुनिक केंद्र आहे. ह्या वातानुकूलित केंद्रामध्ये अर्जदारांसाठी पुरेशी क्षमता आणि अर्जदारांना नावनोंदणी / अद्ययावत प्रक्रियेच्या संबंधित टप्प्यांबाबत मार्गदर्शन देणारी एक सक्षम यंत्रणा आहे.”
यूटीआई आईटीएसएलच्या संदर्भात
यूटीआई इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी आणि सर्व्हिसेस लिमिटेड ही वित्त मंत्रालयाच्या (एमओएफ) अंतर्गत स्पेसिफाईड अंडरटेकिंग युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (एसयूयूटीआई) च्या माध्यमातून भारत सरकारची एक कंपनी आहे, ज्यांचे नवी मुंबई येथे नोंदणीकृत कार्यालय असून नवी मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि नवी दिल्ली येथे चार प्रादेशिक कार्यालये आहेत आणि भारतभर ४७ शाखा आहेत. यूटीआई आईटीएसएल २६ वर्षांपासून कार्यरत आहे आणि गेल्या १७ वर्षांपासून सीबीडीटीच्या वतीने पॅनकार्ड जारी करणारी ही एक आघाडीची संस्था आहे. यूटीआई आईटीएसएल भारतातील विविध वित्तीय आणि सरकारी विभागांना पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि आउटसोर्सिंग सेवा देखील प्रदान करते.