पुणे -३४व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र मंडळ येथे २ दिवस चाललेल्या पुणे जिल्हा मल्लखांब स्पर्धेचे उद्घाटनशनिवार दि. ३ सप्टे. रोजी झाले होते व याची अंतिम फेरी रविवार दि. ४ सप्टे. रोजी सायं. ५.०० वाजे पर्यंत पूर्ण झाली.
या स्पर्धेत ८ वर्षे ते २० वर्षे वयोगटातील ३०० पेक्षा जास्त मुले व मुलींनी सहभाग घेतला होता. १२
गटांमधील या स्पर्धा पार पडल्या. त्याची बक्षीस वितरण समारंभ आज सायं. ५.०० वाजता पुणे फेस्टिव्हलचे क्रीडा समिती समन्वयक प्रसन्न गोखले व पुणे जिल्हा मल्लखांब असोसिएशन चे अध्यक्ष सचिन पुरोहित यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी महाराष्ट्र जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे सचिव अभिजित भोसले आणि महाराष्ट्र मंडळाचे फिजिकल डायरेक्टर सचिन परदेशी या वेळी उपस्थित होते.