इस्लामाबाद-
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुरुवारी जीवघेणा हल्ला झाला. पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर लष्कराविरोधात भूमिका घेणाऱ्या इम्रान यांनी इस्लामाबादच्या दिशेने लाँगमार्च काढला आहे. हा लाँगमार्च गुरुवारी गुजरानवाला शहरात पोहोचला. कंटेनरच्या छतावरून इम्रान जनतेला अभिवादन करीत होते. त्याच वेळी एका व्यक्तीने इम्रानच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. या वेळी एक गोळी इम्रानच्या पायाला लागली. दोन गोळ्या अन्य एका नेत्याला लागल्या.यावेळी एकूण ९ जण जखमी झाले.एकाचा मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरास त्याच्या पाठीमागे उभ्या असलेल्या व्यक्तिने पकडून ठेवत पोलिसांच्या हवाली केले. ताब्यात घेतल्यानंतर हल्लेखोर म्हणाला, इम्रान दिशाभूल करीत आहेत.त्यांनी ईशनिंदा केली म्हणून त्यांची हत्या करण्याची इच्छा आहे. रुग्णालयात दाखल इम्रान यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.या हल्ल्यामागे पंतप्रधान शाहबाज शरीफसह तीन बड्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप इम्रानखान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरिक ए इन्साफने केला आहे.इम्रानचा मरियम नवाजवर आरोप : २४ सप्टेंबर रोजी इम्रानखान यांनी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता. मरियम माझ्यावर ईशनिंदक म्हणून आरोप करते आहे म्हणजे कुणी कट्टरपंथीय माझी हत्या करेल.
– ७ ऑक्टोबर रोजी इम्रान म्हणाले, नवाज यांचे ४ समर्थक नेते माझ्याविरोधात कटकारस्थान करीत आहेत. माझ्या जीवाचे बरेवाईट झाल्यास कारस्थान करणाऱ्यांची नावे समोर येतील.
बेनझीर यांची हत्याही अशाच वातावरणात झाली {पाकिस्तानात पहिली राजकीय हत्या 1951 मध्ये झाली. या रॅलीत पंतप्रधान लियाकत अली खान यांची हत्या झाली. लष्करावर आरोप करण्यात आले, परंतु ते सिद्ध होऊ शकले नाहीत. {१९७७ मध्ये लष्कराने बंड करून झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार ताब्यात घेतले. भुट्टो यांना अटक करण्यात आली. खुनाच्या आरोपाखाली त्यांना फाशी देण्यात आली. {२००७ मध्ये बेनझीर भुट्टो लष्कराच्या विरोधात होत्या. त्यांचीही हत्या झाली. लष्करावर आरोप ठेवले गेले. परंतु, आजपर्यंत सिद्ध झाले नाहीत.
तरुणाने हल्लेखोरास पकडले, निशाणा चुकल्याने बचावले इम्रान हल्लेखोरास पकडणारा इब्तिसाम हीरो बनला आहे. त्याने सांगितले,‘ गोळी मारताना हल्लेखोराच्या हाताला झटका दिला,अन्यथा इम्रान बचावले नसते. मी कंटेनरपासून १० फूट दूर होतो. त्याने ऑटोमॅटिक पिस्तुलात गोळ्या भरून फायर केले. त्याच वेळी मी ओढल्याने पिस्तूल त्याच्या हातून निसटले. मी त्याला पकडून ठेवले.
पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच सत्तेची सूत्रे आपल्या हाती ठेवणाऱ्या लष्करात घबराट इम्रान हे पाकिस्तानी लष्करावर निशाणा साधताहेत. यापूर्वी एखाद्या मोठ्या नेत्याने असे उघडपणे लष्कराविरुद्ध वक्तव्य केले नाही. {लष्करानेच नवाज शरीफना पीएम बनवले होते. २०१८ मध्ये लष्करप्रमुखाने त्यांना तुरुंगात पाठवले. नंतर देशातून हाकलले. {त्यानंतर इम्रान लष्कराचे आवडते झाले. लष्कराने इम्रान यांचे सरकार बनवले. {मग इम्रानही नवाजप्रमाणे स्वत:ला लष्कराचा बॉस समजू लागले. आयएसआयच्या नव्या प्रमुखाच्या नियुक्तीवरून वाद झाला, पण इथेही लष्कराचेच चालले. {याचदरम्यान इम्रान यांना हटवण्याचा पाया रचला. मात्र, प्रथमच लष्कराला राजकीय ताकद गमावण्याची भीती वाटत आहे. कारण, इम्रान लोकप्रिय झाले आहेत. अलीकडच्या पोटनिवडणुकीत इम्रानच्या पक्षाने विरोधी पक्षात राहून २५ पैकी २२ जागा जिंकल्या. असे यापूर्वी कधी झाले नव्हते. ऑगस्ट २०२३ मध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. इम्रान बाजी मारू शकतात.
इम्रान समर्थकांचे आंदोलन, लष्करी अधिकारी लक्ष्य , उग्र निदर्शने हल्ल्याच्या निषेधार्थ रात्री उशिरा इम्रान समर्थक रस्त्यावर उतरले. घोषणाबाजी करीत जाळपोळ करण्यात आली. विशेषत: लष्करी कार्यालये,अधिकारी यांना लक्ष्य करण्यात आले.