महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा -खा. बापट (व्हिडीओ)

Date:

नवी दिल्ली- महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेले आहेत. त्यामुळे तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी. अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी सोमवारी लोकसभेत केली. कामकाजाच्या शून्य प्रहरात महाराष्ट्रातील काही खासदारांनी राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. त्यामध्ये सहभागी होताना बापट म्हणाले की या महाराष्ट्रामध्ये आज पर्यंत गुन्हेगार खंडणी मागत होते .परंतु आता सरकार खंडणी मागायला लागले आहे. म्हणजे आता कुंपणच शेत खायला लागले आहे. पाण्याला तहान लागली आहे आणि सरकार भ्रष्ट होत चालले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करा आणि या गुन्हेगारांना आतमध्ये टाका ही आमची सभागृहात मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाहीह कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेले आहेत. कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बुडाली आहे .पोलीस खंडणी मागायला लागले आहेत. त्या पोलिसांना मंत्र्यांचा आशीर्वाद आहे. मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे. म्हणून आम्ही राष्ट्रपती राजवटीची मागणी करीत आहोत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हडपसरमध्ये लहान मुलांसाठी क्रीडा नर्सरी प्रकल्प- ११.६१ कोटीच्या प्रस्तावाला मान्यता

पुणे : हडपसर येथील मगरपट्टा रस्त्यालगत आरक्षित क्रीडांगणाच्या जागेवर...

विविधांगी रंगावलीतून पुण्यात अवतरली खंडेरायाची जेजुरी

'जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारले खंडोबा चरित्र ;...

गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी

पुणे, दि. ३० : महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत गोसंवर्धनासाठी...

महाराष्ट्रदिनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश व रोहित वेमुला विचार अभियान

प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’ पुणे: महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने...