गोवा/मुंबई, 19 नोव्हेंबर 2022
गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर 2022 या काळात आयोजित केल्या जाणाऱ्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या प्रमुख पैलूंपैकी एक असेल, सुगम्यता अर्थात सहज प्रवेश. महोत्सवाचे आयोजन स्थळ अडथळ्यांपासून मुक्त करण्यासाठीच्या विविध सोयी सुविधांसह इफ्फी मध्ये दिव्यांगजनांसाठी विशेष विभाग असेल, या ठिकाणी महोत्सव आणखी सर्वसमावेशक व्हावा, यासाठी दिव्यांगजन चित्रपट रसिकांसाठी विशेष शैक्षणिक सत्र आयोजित केली जाणार आहेत.
यंदाच्या इफ्फी मधील दिव्यांगजन विशेष विभाग हा सिनेमा माध्यम सर्वसमावेशक आणि सहज उपलब्ध होणारे बनवण्याच्या दिशेने पुढले पाउल ठरेल. या विभागात, दिव्यांगजनांच्या चित्रपट प्रदर्शनाचे स्वरूप आणि प्रदर्शन स्थळाच्या पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापनाबाबतच्या विशेष गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी समर्पित चित्रपटांचे प्रदर्शन आयोजित केले जाईल.
या विभागातील चित्रपटांना सबटायटल्स आणि त्याबरोबर ऑडियो वर्णन आहे. हे विशेष तयार करण्यात आलेले ऑडिओ ट्रॅक आहेत जे चित्रपटातील दृश्य माहितीचे वर्णन करतात. प्रेक्षक ते ऐकू शकतात आणि चित्रपटाचा आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातो, जो अन्यथा प्रवेशयोग्य (सहज समजण्याजोगा) नाही.
त्याशिवाय, रिचर्ड अॅटनबरो यांचा ऑस्कर पुरस्कार विजेता गांधी चित्रपट आणि अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित द स्टोरी टेलर यासारखे चित्रपट, इफ्फी मध्ये ‘दिव्यांगजन’ विभागात प्रदर्शित केले जातील,आणि ते सबटायटल्स आणि ऑडियो वर्णन यासह दृकश्राव्य माध्यमात उपलब्ध असतील. यामुळे हे चित्रपट दिव्यांगजन चित्रपट प्रेमींसाठी देखील सुगम्य (सहज उपलब्ध) असतील, आणि त्यांच्यामध्ये सर्वसमावेशकतेची भावना वाढवतील.
Richard Attenborough’s Oscar winning Gandhi
The Storyteller directed by Ananth Narayan Mahadevan
रिचर्ड अॅटनबरो यांचा ऑस्कर पुरस्कार विजेता गांधी चित्रपट अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित द स्टोरी टेलर कलाकृती निर्माण करण्याची प्रक्रिया सर्वांसाठी सहज-उपलब्ध व्हावी या उद्देशाने, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय), 21 ते 28 नोव्हेंबर 2022 दरम्यान इफ्फी 53 चा भाग म्हणून – ऑटिझम असलेल्या व्यक्तींसाठी स्मार्टफोन फिल्म बनवण्याचा प्राथमिक अभ्यासक्रम आणि व्हीलचेअरवरील व्यक्तींसाठी पडद्यावरील अभिनयाचा प्राथमिक अभ्यासक्रम, असे दिव्यांग व्यक्तींसाठी दोन विनामूल्य अभ्यासक्रम आयोजित करणार आहे.
महोत्सवामधील कार्यक्रमांशिवाय, दिव्यांगजनांच्या विशेष गरजांसाठी आयोजन स्थळाच्या पायाभूत सुविधा देखील सुधारण्यात आल्या आहेत. रॅम्प, रेलिंग, दिव्यांगजन-स्नेही स्पर्शा द्वारे मार्गदर्शन करणारे रस्ते, पार्किंगच्या जागा, रेट्रोफिटेड प्रसाधनगृह, ब्रेलमधील साइनबोर्ड इत्यादी सुविधांसह, ईएसजीचा परिसर आणि चित्रपट प्रदर्शनाची इतर ठिकाणे अडथळामुक्त करण्यात आली आहेत
ब्रेल लिपीसह साइनबोर्ड
सहज ओळखता येण्याजोग्या साइनबोर्डसह दिव्यांगजन अनुकूल पार्किंगची जागा
Tactile walkways for easy accessibility to Divyangjan.