पुणे -फेस्टिव्हल अंतर्गत ‘आकृती’ गृप तर्फे महिला चित्रकारांची चित्रकला-प्रदर्शन व स्पर्धा नुकतीच बालगंधर्व कलादालन येथे१ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर दरम्यान संपन्न झाली. या वर्षी स्पर्धेचा विषय होता २०२२ मधे निधन झालेल्या कलाकारांना म्हणजेच भारतरत्न लता मंगेशकर, पं बिरजू महाराज, शिवकुमार शर्मा, बाबासाहेब पुरंदरे, दिलीप कुमार व राहूल बजाज यांना चित्रांतून मानवंदना. त्यासाठी २ गृप केले होते, पोर्टेट व कंमोजिशन. सदरील स्पर्धेसाठी एकूण १०० चित्रे आली होती.पोर्टेट’ मधे वैशाली दमकोंडवार हिला पहिले, अनुजा वकिल यांस दुसरे बक्षिस व ठाणेच्या उर्मिला दुरगुडे व औरंगाबादच्या अथर्वा रानडे यांना ३ रे बक्षिस विभागून देण्यात आले.
तसेच ‘कंपोझिशन’ मधे कराडच्या चैत्राली भिसे यांना पहिले, देविका खाडिलकर यांना दुसरे बक्षिस व अनिता देशपांडे व अपुर्वा जैन यांना विभागून तिसरे बक्षिस देण्यात आले. छोट्या गटात रुचिता डलवाले पहीले, पुर्वा गवळी दुसरे व शुभांगी मिथे हिला तिसरे बक्षीस मिळाली. ‘सरस्वती कला महाविद्यालय लातूर’ व सुनिल देसाई यांच्या तर्फे रोख किंमतीचे बक्षिसेदेण्यात आली व २ बक्षिसे निवेदिता प्रतिष्ठान तर्फे देण्यात आली. याव्यतीरिक्त व्हिनस ट्रेडर्स, यांचे गिफ्ट व्हाउचरस म्हणून १० उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.
यावर्षी विशेष आकर्षण होते २ नावाजलेल्या चित्रकारांचे प्रात्यक्षिके.चित्रकार गोपाळ नंदूरकर यांनी ड्राय पेस्टल्स या वेगळ्या माध्यमातून पोर्टेटचे प्रात्यक्षिकं दाखविली. व सुप्रसिद्ध चित्र कार घन:शाम देशमुख यांनी त्यांच्या बोलक्यारेषांमधून बालचित्रे, वेगवेगळे चेहरे व ललना यांची प्रात्यक्षिक दाखवली.” प्रसिद्ध चित्रकार गोपाळ नांदुरकर, प्रा. डॉ.राजेत्री कुलकर्णी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. सातारा, कराड, कोल्हापूर, ठाणे औरंगाबाद अशा महाराष्ट्तील विविध ठिकांणांहून महिला सहभागी झाल्या होत्या.