विक्रम फडणीसच्या लवकरच रिलीज होणा-या हृदयांतर सिनेमामधून करीना कपूरचा हेअर स्टाइलिश पॉम्पी अभिनय क्षेत्रात पदार्पण करतोय.
विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि यंग बेरी एन्टरटेन्मेट (प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पुर्वेश सरनाईक) निर्मित, आणि विक्रम फडणीस दिग्दर्शित हृदयांतर चित्रपटामध्ये सोनाली खरे, मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत.
जवळ-जवळ एका दशकापासून करीनासोबत काम करणा-या पॉम्पीने, हृदयांतर चित्रपटातल्या मुख्य कलाकारांचा लूक डिजाइन केलाय. आणि त्यासोबतच ह्या चित्रपटात अभिनयही केलाय.
सूत्रांच्या अनुसार, “पॉम्पी आणि विक्रम खूप जुने मित्र आहेत. त्यामुळेच तर विक्रमने पॉम्पीला जेव्हा मुख्य कलाकारांचा लूक डिजाइन करायला सांगितला, तेव्हा पॉम्पी लगेच तयार झाला. पॉम्पीची चित्रपटात कॉमेडी भूमिका आहे. आणि ही भूमिका त्यानेच करावी असा विक्रमचा आग्रह होता. खरं तर जेव्हा पॉम्पीचं चित्रपटासाठी शुटिंग होतं. तेव्हाचं पॉम्पी दूस-या एका चित्रपटासाठी रात्रपाळी करत होता. पण विक्रमसाठी त्याने डबल शिफ्टमध्ये काम कलंय. आणि त्याचं काम खूप छान झालंय.”
विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि यंग बेरी एन्टरटेन्मेट (प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पुर्वेश सरनाईक) निर्मित, आणि विक्रम फडणीस दिग्दर्शित हृदयांतर लवकरच प्रदर्शित होणार आहे.