पुणे, 24 फेब्रुवारी 2021: व्हिजन क्रिकेट अकादमी यांच्या वतीने व संतोष मते परिवाराच्या सहकार्याने आयोजित पहिल्या व्हिजन करंडक तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत दुसऱ्या दिवशी व्हिजन क्रिकेट अकादमी संघाने आजदिवस अखेर 8गडी बाद 419धावा करून पहिल्या डावात 132 धावांची आघाडी घेतली.
व्हिजन स्पोर्ट्स सेंटर, सिंहगड रोड येथील मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या डावात सिद्धीविनायक क्रिकेट क्लब संघ प्रथम फलंदाजी करताना 78.3षटकात 287धावांवर आटोपला. याच्या उत्तरात व्हिजन क्रिकेट अकादमी संघाने दुसऱ्या दिवशी 83षटकात 8बाद 419धावा केल्या. यात ऋषिकेश मोटकर याने अफलातून फलंदाजी करत 176चेंडूत 38चौकार व 1 षटकारासह 189धावांची खेळी केली. ऋषिकेश मोटकरने मयूर खरात(24धावा)च्या साथीत पहिल्या गड्यासाठी 82चेंडूत 87धावांची भागीदारी केली. पण मयूर खरात सारीश देसाईच्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाला. त्यानंतर ऋषिकेश याने शौनक त्रिपाठी(73धावा)च्या साथीत 216चेंडूत 192 धावांची भागीदारी करून संघाची बाजू भक्कम करत आघाडी मिळवून दिली. ऋषिकेश रंगतदार खेळ करत असताना कुणाल तांजनेच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारताना संदीप शिंदेने त्याचा झेल पकडून बाद केले. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या प्रीतेश माधवन 33धावा व कुलदीप यादव 33धावा यांनी सहाव्या गड्यासाठी 52 चेंडूत 38 धावांची भागीदारी करून संघाला 132 धावांची आघाडी मिळवून दिली. या दोन्ही संघातील अजून एक दिवसाचा खेल बाकी आहे. श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लबकडून सारीश देसाई(116-4), व कुणाल तांजने(101-4)यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक:
दुसरा दिवस: पहिला डाव: श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब: 78.3षटकात सर्वबाद 287धावा वि.व्हिजन क्रिकेट अकादमी: 83षटकात 8बाद 419धावा(मयूर खरात 24(36), ऋषिकेश मोटकर 189(176,38×4,1×6), शौनक त्रिपाठी 73(113,6×4,3×6), प्रीतेश माधवन 33(35,7×4), कुलदीप यादव 33(44,7×4), कुणाल तांजने 23-101-4, सारीश देसाई 30-116-4); पहिल्या डावात व्हिजन क्रिकेट अकादमी संघाकडे 132 धावांची आघाडी;