पुणे-चँग इंटरनॅशनल सर्किट (थायलंड), १७ नोव्हेंबर २०२२ – आशियातील सर्वात अवघड रोड रेसिंग चॅम्पियनशीप या वीकेंडला अंतिम टप्प्यावर पोहोचणार आहे. होंडा रेसिंग इंडियाची प्रमुख जोडी राजीव सेतु आणि सेंथिल कुमार थायलंडमधील चँग इंटरनॅशनल सर्किटवर आशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या (एआरआरसी) अखेरच्या संघर्षासाठी पोहोचले आहेत.
होंडा रेसिंग इंडिया टीम एशिया प्रॉडक्शन २५० सीसी (एपी२५०) क्लासच्या एकूण १४ टीम्सपैकी आघाडीच्या ९ टीम्समध्ये पोहचली आहे. २०१८ मध्ये पर्दापण केल्यापासून सातत्याने सुधारणा दाखवत टीमने मौल्यवान पॉइंट्स मिळवले असून उद्घाटनाच्या सीझनमध्ये ६ पॉइंट्सवरून टीम २०१९ च्या अंतिम सीझनमध्ये ३५ पॉइंट्सपर्यंत पोहोचली आहे. सातत्याने आपला मार्ग उंचावत टीम एकूण ४२ पॉइंट्ससह आता २०२२ च्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे.
आगामी फेरीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या ब्रँड आणि कम्युनिकेशन विभागाचे ऑपरेटिंग अधिकारी श्री. प्रभू नागराज म्हणाले, ‘एआरआरसीचा २०२२ सीझन आमच्या रायडर्सना खूप काही शिकवणारा ठरला. चँग इंटरनॅशनल सर्किटवर आम्ही या चॅम्पियनशीपची सुरुवात केली आणि आमच्या रायडर्सनी चांगले पॉइंट्स मिळवले. रेसिंगच्या ४ अवघड फेऱ्यांनंतर सर्किटवर परत येताना मला खात्री वाटते, की आमचे रायडर्स आधीच्या फेऱ्यांमधे मिळवलेल्या ज्ञानाचा वापर करून टीम तसेच देशासाठी जास्त चांगली कामगिरी करतील. होंडा रेसिंग इंडिया थाई आव्हानाचा सामना करत या वीकेंडला सरस कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे.’
होंडा रेसिंग इंडियाचे अनुभवी रायडर राजीव सेतु ३१ पॉइंट्ससह एपी २५० क्लासच्या शेवटच्या फेरीत सहभागी झाले आहेत. राजीव यांनी कायमच चँग इंटरनॅशलल सर्किटवर चांगली कामगिरी केली आहे. २०१८ मध्य त्यांनी आपला पहिला आंतरराष्ट्रीय पॉइंट्स इथेच मिळवला होता. २०१९ मध्ये एआरआरसीच्या तिसऱ्या फेरीत इथेच त्यांनी टॉप ७ क्वालिफाइंग फिनिश – पहिल्यांदाच भारतीय रायडरद्वारे मिळवले होते. २०२२ सीझनमच्या पहिल्या फेरीत त्यांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्यांना फिनिशसाठी ११ वे स्थान मिळाले. एपी२५० क्लासमध्ये ते २४ रायडर्सपैकी टॉप १५ रायडर्समद्ये असून या वीकेंडला आणखी वरचे स्थान मिळवण्यासाठी सज्ज आहेत.
दरम्यान राजीव यांच सहकारी सेंथिल कुमार यांच्यासाठी हा ट्रॅक परिचित आहे. इथेच त्यांनी थायलंड टॅलेंट कपमध्ये आपले आंतरराष्ट्रीय पर्दापण केले होते आणि २०१९ एआरआरसीच्या तिसऱ्या फेरीत त्यांनी टॉप २० मध्ये फिनिश केले होते. या सीझनच्या पहिल्या फेरीत त्यांनी इतर आंतरराष्ट्रीय रायडर्सना मागे टाकत १३ व्या स्थानावर रेस संपवत आतापर्यंतचे सर्वोत्तम फिनिश मिळवले होते. चौथ्या फेरीनंतर सेंथिल यांच्याकडे ११ पॉइंट्स असून ते टॉप १९ रायडर्समध्ये समाविष्ट आहेत. २०१९ मधील एकंदरीत ३० व्या स्थानापासून ही चांगली सुधारणा आहे.
चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीसाठी उत्सुक राजीव सेतु म्हणाले, ‘आम्ही चॅम्पियनशीपच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचलो आहोत आणि चँग इंटरनॅशनल सर्किटवर होत असलेल्या या शेवटच्या फेरीत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या सर्किटवर पूर्वीही रेसिंग केले असून मला चांगल्या कामगिरीची खात्री आहे. वैयक्तिक पातळीवरही मी जास्तीत जास्त पॉइंट्स मिळवत लीडर बोर्डवर आघाडीचे स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेन.’
आपले विचार व्यक्त सेथिंल कुमार म्हणाले, ‘या सीझनने माझ्या ज्ञानात मोलाची भर टाकली आहे. आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल मी आनंदी असून गेल्या वर्षाच्या तुलनेत मी जास्त पॉइंट्स मिळवून अधिक चांगले स्थान संपादन केले आहे. यावर्षी चँगवर मी टॉप १३ मध्ये फिनिश केले होते. शेवटच्या फेरीसाठी परत एकदा चँगवर रेसिंग करण्यासाठी मी उत्सुक आहे आणि देश व टीमसाठी मी अधिक चांगल्या स्थानावर सांगता करेन अशी आशा आहे.’
चँग इंटरनॅशनल सर्किटवर २०२२ थायलंड टॅलेंट कपची अंतिम फेरी (एशियन रायडर्ससाठी होंडाचा डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) पार पडणार आहे. चेन्नईचे कविन क्विंतल (तमिळ नाडू) आणि मलप्पुरमचे (केरळ) मोहसिन पी. होंडा भारतीय तरुण रेसर्सच्या पुढच्या पिढीचे जागतिक पातळीवर प्रतिनिधीत्व करतील.
२०२२ एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपविषयी (एआरआरसी)
एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपची २५ वी आवृत्ती ही १९९६ पासून भरवली जात असलेली आशियातील सर्वात स्पर्धात्मक रोड रेसिंग चॅम्पियनशीप आहे. २०२२ सीझनच्या एकूण फेऱ्यांची संख्या सहावरून पाचवर आली आहे. २२ मार्च २०२२ रोजी चँग इंटरनॅशनल सर्किट (थायलंड) येथे अधिकृत चाचणी आणि सीझन ओपनर नंतर तसेच सेपांग इंटरनॅशनल सर्किट (मलेशिया) येथे दुसऱ्या व तिसऱ्या फेरीनंतर स्पर्धा सेपांग इंटरनॅशनल सर्किटवर (मलेशिया) येथे परतेल. या वीकेंडला चँग इंटनरॅशनल सर्किटवर सीझनची सांगता होईल.