Home Blog Page 762

काँग्रेसकडून EC च्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह:रात्रीतून 76 लाख मते कशी वाढली? उत्तर द्या -नाना पटोले

मुंबई-मतदान प्रक्रिया झाल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या टक्केवारी विषयी जनतेला देत असते, अशी प्रक्रिया आतापर्यंत सुरू होती. मात्र महाराष्ट्र निवडणूक आयोगाने कोणताही पत्रकार परिषद घेतली नाही. रात्रीतून 76 लाख मतांची वाढ झाली. ही वाढ कशी झाली? असा सवाल नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.

रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झाल्याचे निवडणूक आयोग सांगते. मतदान जास्त झाले असेल, तर त्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या असतील. निवडणूक आयोगाने त्या लागलेल्या लाईनचे आम्हाला व्हिडिओ द्यावेत, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. तसेच आयोगाने जी पारदर्शता पाळली पाहिजे ती पाळली नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदानाची नोंद निवडणूक आयोगाने केली. तर रात्री 65. 2 टक्के मतदानाची नोंद आयोगाने केली. दुसऱ्या दिवशी 66 टक्के मतदाना झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. 76 लाख मतांची वाढ कशी झाली असा सवालही त्यांनी केला. मतदानाचे प्रमाण 7.50 टक्क्यांनी वाढले, याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणीही पटोले यांनी यावेळी केली. मतदानाच्या टक्केवारीत तफावत असून आम्ही यासंदर्भात कोर्टात जाणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.

आम्ही ईव्हीएममशीनवर आरोप लावत असून आम्हाला लोकाशाही वाचवायची आहे. निवडणूक प्रक्रियेवर आमचा आक्षेप आहे. आम्ही जर जिंकलो असतो तर त्यांनी आमच्यावर प्रश्न उपस्थित केले असते, असेही नाना पटोले म्हणाले. निवडणूक आयोगाने सर्व प्रश्नांची उत्तर द्यावीत. त्यांनी उत्तरे नाही दिल्यास आम्ही न्यायायलीन लढाई लढू तसेच प्रसंगी रस्त्यावर देखील उतरणार असल्याचा इशारा नाना पटोले यांनी दिला.

दरम्यान, विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

‘मिशन अयोध्या’: राम मंदिर स्थापनेनंतर राम जन्मभूमीत चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट!

मुंबई : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर प्रथमच मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर भव्य दृश्यांमधून रामलल्लाच्या मूर्तीचे दर्शन चित्रपट रसिक – भक्तांना घडणार आहे. चांदण्याच्या तेजाने झळाळणारी मूर्ती, भक्तांच्या हृदयात विश्वास जागवणारे रामलल्लाचे मोहक हास्य आणि त्यांचे करुणामय डोळे – हे सगळं प्रेक्षकांना त्यांच्या श्रद्धेच्या गाभाऱ्यात घेऊन जाणार आहे. रामलल्लाचे अनोखे दर्शन घडवणारा ‘मिशन अयोध्या’ हा भारतातला पहिला चित्रपट आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराची स्थापना झाल्यानंतर कोणत्याही चित्रपटाचे अयोध्येत चित्रीकरण झाले नाही. ही संधी दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे आणि निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता कृष्णा शिंदे यांच्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाद्वारे उपलब्ध झाली आहे. नव्या वर्षात २३ जानेवारी २०२५ रोजी राममंदिर स्थापनेच्या प्रथम वर्षपूर्तीचे औचित्य साधून ‘मिशन अयोध्या’ महाराष्ट्रातील चित्रपटगृहांतून प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे हे ‘मिशन अयोध्या’च्या अयोध्येतील चित्रीकरणाचा अनुभव वर्णन करताना म्हणाले, “अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या पवित्र परिसरात चित्रीकरण करणे हे केवळ माझ्यासाठी नव्हे, तर संपूर्ण युनिटसाठी एक अभूतपूर्व अनुभव ठरला. विषम तापमानाच्या आव्हानांवर मात करीत असताना लाखो रामभक्तांच्या गर्दीत, त्या पवित्र भूमीत चित्रीकरण करताना प्रत्येक क्षण प्रेरणादायी होता. मंदिराच्या भव्य वास्तुशिल्पाचा प्रत्येक कोपरा, वातावरणातील अलौकिक शांतता, आणि लाखो रामभक्तांद्वारे होणारा रामनामाचा गजर आमच्या हृदयाला स्पर्शून गेला. ‘मिशन अयोध्या’ हा केवळ एक चित्रपट नसून, अयोध्या, श्रीराम मंदिर व श्रीरामांचे आदर्श विचार जगभर पोहचविण्याचे एक मिशन आहे. हा चित्रपट प्रभू श्रीरामांच्या अनंत भक्तीसाठी समर्पित एक अद्भुत प्रवास आहे. मला विश्वास आहे की मिशन अयोध्या’ प्रेक्षकांना प्रभू श्रीरामांच्या चरणांशी आत्मीयतेने जोडेल आणि त्यांच्या जीवनात सकारात्मकता निर्माण करेल.”

निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि सौ. योगिता कृष्णा शिंदे त्यांचे मनोगत व्यक्त करताना म्हणाले ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटातून अत्यंत ज्वलंत विषयावर प्रकाश टाकण्यात आला असून प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच रामभक्ती, श्रद्धा आणि सामाजिक मूल्यांचा अनोखा संगम पहायला मिळणार आहे. अयोध्येच्या पवित्र भूमीत चित्रीकरण करताना तिथल्या सकारात्मक ऊर्जेने आम्हाला प्रेरणा दिली. आम्हाला विश्वास आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात रामभक्तीची ज्योत निरंतर तेवत ठेवून प्रभू श्रीरामांबद्दलची आस्था अधिक दृढ करेल.”

अत्यंत जिव्हाळ्याचा विषय मांडणाऱ्या ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाचे अयोध्येसह  उत्तर प्रदेशातील जौनपूर तसेच महाराष्ट्रात, मुंबई आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर अश्या विविध ठिकाणी चित्रीकरण झाले आहे. या चित्रपटाच्या शीर्षकामुळे या चित्रपटाविषयी रसिकांच्या मनात विशेष कुतूहल निर्माण झाले असून त्यांची चित्रपट पहाण्याची उत्सुकता वाढल्याची पोचपावती मिळत आहे. येत्या २३ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये मिशन अयोध्या रसिकांना पहायला मिळणार आहे. 

देशाचे तुकडे होऊ नये म्हणून लढलेल्या आजीच्या हत्येने वयाच्या 12 व्या वर्षी धक्का अन 19 व्या वर्षी वडिलांचे मद्रासहून वडिलांचे तुकडे आणले;तरीही संसदेपर्यंत पोहोचायला वयाचे ५२ वे वर्ष उजाडले

0

नवी दिल्ली- 28 नोव्हेंबर रोजी वयाच्या 52 व्या वर्षी प्रियंका गांधी यांनी लोकसभेत खासदार म्हणून शपथ घेतली. यासोबतच सध्याच्या संसदेच्या कामकाजात गांधी-नेहरू कुटुंबातील तीन सदस्य सहभागी होणार आहेत. केरळमधील वायनाड मतदारसंघातून 4 लाख 10 हजार मतांनी विजय मिळवून प्रियंका संसदेत पोहोचल्या आहेत. त्यांनी त्यांचे भाऊ राहुल यांनाही विजयाच्या फरकात मागे सोडले.

१९ जून १९७० रोजी सोनिया गांधींनी मुलाला जन्म दिला नाव ठेवले राहुल आणि २ वर्षानंतर १२ जानेवारी १९७२ रोजी प्रियांकाचा जन्म झाला .१९७८ मध्ये चरणसिंग चौधरी यांनी इंदिरा गांधींना तुरुंगात ठेवले तेव्हा ६ वर्षाच्या प्रियांका त्यांना भेटायला तुरुंगात गेल्या होत्या .तुरुंगात नैराश्याने ग्रासलेल्या इंदिराजींना प्रियांकाला पाहून उत्साहाने भरून गेल्याचे बोलले जाते.
अमेरिकन लेखिका आणि चरित्रकार कॅथरिन फ्रैंक आपल्या ‘इंदिराः द लाइफ ऑफ इंदिरा नेहरू गांधी’ या पुस्तकात लिहितात की, ऑपरेशन ब्लू स्टारनंतर इंदिराजींना धोक्याची जाणीव होती.
30 ऑक्टोबर 1984 रोजी त्या ओडिशाच्या दौऱ्यावर होत्या. शाळेतून घरी परतत असताना प्रियांका आणि राहुलच्या कारला अपघात झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. इंदिराजींनी आपला दौरा आटोपला आणि मुलांना भेटण्यासाठी लगेचच दिल्लीला परतल्या.31 ऑक्टोबर 1984 रोजी प्रियांका आणि राहुल शाळेत जाण्यापूर्वी आजीला भेटायला आले. दोघांनीही इंदिराजींना निरोप दिला. आजीने प्रियांकाला मिठी मारली.
जेवियर मोरो लिहितात – इंदिराजींनी पुन्हा एकदा दोघांना मिठी मारली आणि म्हणाल्या की, मला काहीही झाले तरी तुम्ही अजिबात रडू नका.
अडीच तासानंतर इंदिरा गांधींची त्यांच्याच सुरक्षा रक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली.

19 वर्षांच्या प्रियांका गांधीने वडिलांचे तुकडे गोळा करून आणले
स्पॅनिश लेखक जेवियर मोरो यांनी सोनिया गांधींची बायोग्राफी ‘द रेड सारी’ मध्ये लिहिले आहे…
21 मे 1991 रोजी रात्री 11.45 वाजता माखनलाल फोतेदार आणि सतीश शर्मा 10 जनपथवर पोहोचले. हे सोनिया आणि राजीव यांचे अधिकृत निवासस्थान होते.
त्यावेळी राहुल गांधी अमेरिकेत होते. प्रियांका कुटुंबातील पहिल्या व्यक्ती होत्या, ज्यांना कळले की त्यांचे वडील राजीव गांधी हयात नाहीत. सोनिया बेशुद्ध पडल्या.
त्या वेळी प्रियांका निर्णय घेत होत्या. राष्ट्रपती वेंकटरामन यांनी फोन केला तेव्हा प्रियंका बोलल्या.
प्रियांका आईसोबत मद्रासला पोहोचल्या. तेथून त्या वडिलांचे पार्थिव घेऊन दिल्लीला परतल्या. स्फोटामुळे मृतदेहाचे तुकडे झाले होते. प्रियांका यांनी अंत्यसंस्काराची व्यवस्था सांभाळली. तोपर्यंत राहुल गांधी अमेरिकेहून आले होते आणि त्यांनी वडिलांना मुखाग्नि दिला.
काही दिवसांनंतर ठरत नव्हते की, राहुल हार्वर्डमध्ये शिकण्यासाठी परतणार की नाही. प्रियांका म्हणाल्या- भाऊ, तू जा, मी आईची काळजी घेईन.

‘सायबर सुरक्षा व एथिकल हॅकिंग’वर’एआयटी’तर्फे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम

पुणे: सायबर सुरक्षा आणि एथिकल हॅकिंग या विषयावर दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे (एआयटी) फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन केले आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे  ‘एआयसीटीई अटल’ योजनेचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले आहे. दि. २ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०२४ या कालावधीत एआयटी, दिघी कॅम्पस पुणे येथे हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे उद्घाटन एआयटी संस्थेचे चेअरमन यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाचे संचालन ब्रिगेडियर अभय भट करतील. डॉ. सुनील ढोरे संयोजक, तर डॉ. सागर राणे व प्रा. सीता यादव हे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

सायबर सुरक्षा आणि एथिकल हॅकिंग क्षेत्रातील आघाडीचे उद्योगतज्ज्ञ, नामांकित शैक्षणिक संस्थांमधील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सहभागी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील अत्याधुनिक माहिती आणि कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळेल. तसेच पुण्यातील क्विकहील कंपनीला भेट देऊन प्राध्यापकांना वास्तविक सायबर सुरक्षा पद्धतींचा अनुभव घेता येणार आहे. 

महाराष्ट्र व इतर राज्यांमधील अभियांत्रिकी प्राध्यापक, पीएचडी संशोधक आणि पदव्युत्तर विद्यार्थी, सरकारी कर्मचारी यांच्यासाठी हा कार्यक्रम खुला आहे. ज्ञानवाढीला प्रोत्साहन देण्यासह सायबर सुरक्षा क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व्यावसायिक आणि शैक्षणिक संस्थांतील अंतर कमी करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे. अधिक माहितीसाठी ९९७५४३६४०५ वर संपर्क साधावा, असे आवाहन ‘एआयटी’च्या वतीने करण्यात आले आहे.

महिंद्रातर्फे BE 6e 18.90 लाख रु. पासून आणि XEV 9e 21.90 लाख रु. पासून पुढे सादर

चेन्नई: महिंद्रा कंपनीने आपल्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्ही BE 6e आणि XEV 9e च्या सादरीकरणासह इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या नियमांना नव्याने परिभाषित केले आहे. ही वाहने अत्याधुनिक इलेक्ट्रिक ओरिजिन आर्किटेक्चर INGLO वर आधारित असून जगातील सर्वात वेगवान ऑटोमोटिव्ह माईंड MAIA ने सुसज्ज आहेत. या वाहनांमध्ये महिंद्राच्या “Unlimit India” या दृष्टिकोनाचा समावेश आहे. याठिकाणी भारतीय नवनिर्मिती आणि डिझाइन जागतिक मापदंडाना केवळ आव्हान देत नाही तर ते नवीन मानके निर्माणही करतात. BE 6e आणि XEV 9e यांची प्रारंभिक किंमत* आज जागतिक प्रीमियरमध्ये घोषित करण्यात आली.

जीवनशैली विषयक ब्रँडची निर्मिती करताना

महिंद्राचे ब्रँड धोरण ग्राहकांच्या आकांक्षांशी सुसंगत अनुभव प्रदान करणाऱ्या आणि त्यांच्या अमर्याद क्षमतेला नवा आयाम देणाऱ्या वाहनांच्या निर्मितीवर आधारित आहे. BE 6e हे स्पोर्टी, परफॉर्मन्स-ड्रिव्हन वाहन असून साहस, रोमांच आणि अचूकतेची अनुभूती देणाऱ्या साहसी व्यक्तिमत्त्वासाठी तयार करण्यात आले आहे. दुसरीकडे, XEV 9e ने अप्रतिम डिझाईन, आलिशानपणा यांची पुर्नव्याख्या केली असून त्यामध्ये अत्याधुनिक डिझाइन आणि आरामशीरपणा यांचा संगम आहे.

प्रगत श्रेणी, इंटेलीजंट राईड डायनॅमिक्स, अत्याधुनिक सुरक्षाविषयक वैशिष्ट्ये आणि सिनेमॅटीक इन-केबिन अनुभव देणारी ही इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्ही केवळ वाहने नसून ठळक आणि प्रामाणिक, विश्वासार्ह जीवनशैलीचे प्रतीक आहेत.

भावनिक बंध निर्माण करणारे हार्टकोर डिझाइन

महिंद्राच्या इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्हीज या हार्टकोर डिझाइन तत्वज्ञानाचे प्रतिक आहेत. दमदार नाविन्यपूर्णता आणि आधुनिक लक्झरी यांच्या माध्यमातून या गाड्या आपल्या मालकांशी भावनिक संबंध प्रस्थापित करतात. आकर्षक बाह्य रूप आणि विचारपूर्वक तयार करण्यात आलेले अंतर्गत डिझाईन यासह BE 6e आणि XEV 9e एसयूव्ही सुंदर डिझाइन आणि कार्यक्षमतेचे नवे मापदंड प्रस्थापित करतात. BE 6e चे एजी, अॅथलेटिक सिल्हूट आणि रेस-प्रेरित लवचिकता हे ठळक वैशिष्ट्य  आहे तर XEV 9e हे SUV कूप डिझाइनमध्ये अत्याधुनिक लक्झरी आणि चांगली कामगिरी यांचे अनोखे मिश्रण सादर करते.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष आणि महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक विजय नाकरा म्हणाले, “आमच्या ब्रँड कल्पनेमागील विचाराची प्रेरणा ही प्रेम या सर्वात शक्तिशाली मानवी भावनेवर आधारित आहे. प्रेम हे शाश्वत असते, आपल्या खोलवरच्या निवडींना प्रेरित करते आणि आपण कोण आहोत हे परिभाषित करते. आमच्या इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्ही BE 6e आणि XEV 9e या अमर्याद प्रेमाविषयी आहेत. त्या आमच्या ग्राहकांना जीवनरसाने, चैतन्यपूर्ण अनुभवांनी भरलेले, मर्यादाविरहित जीवन जगण्याची प्रेरणा देतील. अद्वितीय स्थान, अतुलनीय तंत्रज्ञान आणि उत्तम कामगिरीसह तयार केलेल्या या  एसयूव्हीज जागतिक मापदंड प्रस्थापित करतील. कामगिरी आणि ज्यांना वेग, रोमांच आणि साहसाची अनुभूती घेण्याची आवड आहे अशा लोकांसाठी एजी, अॅथलेटिक सिल्हूट आणि रेस-प्रेरित लवचिकता असलेली BE 6e डिझाइन करण्यात आली आहे तर XEV 9e हे SUV कूप डिझाइनमधील अत्याधुनिक लक्झरी आणि चांगली कामगिरी यांचे अनोखे मिश्रण सादर करते.”

महिंद्रा & महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आणि महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक आर. वेलुसामी म्हणाले, “BE 6e आणि XEV 9e ही अत्याधुनिक भारतीय आयकॉनिक उत्पादने असून ती जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवतील. मेड-इलेक्ट्रिक वाहन आणि ही दोन बॉर्न इलेक्ट्रिकSUV यामधील फरक असा आहे की एक आपण यापूर्वी पाहिले आहे आणि दुसरे याआधी कधीच पाहिलेले नाही. कामगिरीच्या बाबतीत एक जेमतेम उद्योगक्षेत्रातील मानकांशी जुळणारे आहे तर दुसऱ्या प्रकाराने उद्योगक्षेत्रात  नवे मापदंड निर्माण केले आहेत. एक तंत्रज्ञानाने भरलेले आहे जे लवकरच इतिहासजमा होईल, तर दुसऱ्यामध्ये असे तंत्रज्ञान देते जे इतर सर्व गोष्टींना इतिहासजमा बनवेल. INGLO इलेक्ट्रिक ओरिजिन आर्किटेक्चर वर आधारित आणि जगातील सर्वात वेगवान ऑटोमोटिव्ह माईंड MAIA द्वारा सुसज्ज ही उत्पादने महिंद्राच्या Unlimit India या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करतात आणि  नवीन जागतिक मापदंडे स्थापित करतात.”

INGLO इलेक्ट्रिक ओरिजिन आर्किटेक्चर

·         BE 6e साठी 682 किमी (MIDC P1+P2) आणि XEV 9e साठी 656 किमी (MIDC P1+P2) प्रमाणित रेंज, 79 kWh प्रगत LFP बॅटरी पॅकसह.

·         79 kWh आणि 59 kWh बॅटरी पॅकसाठी आजीवन बॅटरी वॉरंटी. ही वॉरंटी फक्त पहिल्या नोंदणीकृत मालकांसाठी लागू आहे आणि फक्त खाजगी नोंदणीवरच वैध आहे. मालकी बदलल्यास, हाय व्होल्टेज बॅटरीची वॉरंटी वाहनाच्या पहिल्या वितरणाच्या तारखेपासून 10 वर्षे किंवा 2,00,000 किमी, जे आधी असेल त्यापर्यंत मर्यादित असेल. पूर्ण तपशील बुकिंगच्या वेळी उपलब्ध असतील.

·         210 kW पर्यंत पॉवर वितरीत करणारे 3-इन-1 इंटीग्रेटेड पॉवरट्रेन

·         BE 6e साठी 0-100 किमी/तास साठीचे अॅक्सीलरेशन 6.7 सेकंद, तर XEV 9e साठी 6.8 सेकंद.

·         फास्ट चार्जिंग: 175 kW फास्ट चार्जरसह 20%-80% फक्त 20 मिनिटांत.

·         i-Link फ्रंट सस्पेन्शन आणि 5 लिंक रिअर इंडिपेंडंट सस्पेन्शनसह इंटेलिजेंट सेमी-अॅक्टिव्ह डॅम्पर्स.

·         इंटीग्रेटेड इलेक्ट्रॉनिक बूस्टर (IEB) सह ब्रेक-बाय-वायर तंत्रज्ञान

·         हाय पॉवर स्टिअरिंग आणि वेरिएबल गियर रेशो (VGR). त्यामुळे 10 मीटरचा टर्निंग सर्कल डायमीटर (TCD) मिळतो.

MAIA: महिंद्रा आर्टिफिशियल इंटेलिजेंस आर्किटेक्चर जगातील सर्वात शक्तिशाली ऑटोमोटिव्ह माईंड

·         सॉफ्टवेअर डिफाइन्ड व्हेईकल: इथरनेट बॅकबोनसह अत्याधुनिक डोमेन आर्किटेक्चरवर आधारित

·         220 k DMIPS, 80 अब्जांहून अधिक ट्रान्झिस्टर्स आणि 130 दशलक्षहून अधिक कोड लाईन्ससह 51 TOPS

·         क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8295: ऑटोमोटिव्ह ग्रेडमधील सर्वात वेगवान चिपसेट.

·         24 GB RAM, 128 GB स्टोरेज आणि कॉकपीट डोमेन साठी अल्ट्रा-फास्ट 6th जनरेशन Adreno GPU.

·         Wi-Fi 6.0, Bluetooth 5.2, आणि Quectel 5G कनेक्टिव्हिटी आणि रिअल-टाइम अपडेट्स

·         ADAS L2+: 2 GB RAM आणि 8 MP कॅमेरासह Mobileye EyeQTM6चिप

·         संगीत, मनोरंजन, ओटीटी चित्रपट, पॉडकास्ट, खरेदी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी 60 हून अधिक अॅप्स

·         ओव्हर-द-एअर अपडेट्स BE 6e आणि XEV 9e यांना सतत अपग्रेड करण्यात मदत करतात.

हीरो फीचर्स

·         XEV 9e मध्ये वाइड सिनेमास्कोप:110.08 सेमी रुंद आकर्षक दृश्य निर्माण करणारे तीन 31.24 सेमी स्क्रीन

·         BE 6e मध्ये रेस-रेडी डिजिटल कॉकपिट.

·         VisionX: ऑगमेंटेड रिअॅलिटी हेड्स-अप डिस्प्ले (HUD).

·         Infinity Roof आणि LightUpMe.

·         Sonic Studio by Experience Mahindra: Dolby Atmos सह 16 स्पीकर Harman Kardon साउंड सिस्टम.

·         LiveYourMood: प्री-सेट थीम (Calm, Cozy आणि Club) प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या सिग्नेचर धून, कस्टम ड्रायव्हर सीट, भरपूर प्रकाश आणि क्लायमेट कंट्रोल अॅडजस्टमेंट.

·         मल्टी-ड्राईव्ह मोड्स: रेंज, एव्हरी डे आणि रेस

·         ADAS Level 2+: प्राणी, पादचारी, अडथळे आणि विविध प्रकारची वाहने ओळखण्याची क्षमता असलेला 5 रडार्स आणि 1 व्हिजन कॅमेराने सुसज्ज

·         EyeDentity: ड्रायव्हरचा थकवा तपासणारी ड्रायव्हर आणि ऑक्युपंट मॉनिटरिंग सिस्टीम (DOMS). हे सेल्फी कॅमेरा आणि व्हिडिओ कॉलसाठी देखील वापरले जाऊ शकते.

·         Secure360: 360-डिग्री कॅमेरा आणि इन-कॅबिन कॅमेरा वापरून आजूबाजूचे निरीक्षण करते आणि नोंदी वाहनात साठवते. मोबाईल अॅपद्वारे थेट दृश्य उपलब्ध करते.

·         Autopark: 12 अल्ट्रासॉनिक सेन्सर्ससह 90 अंशात, अँग्युलर आणि पॅरलल पार्किंग सक्षम करते. यामध्ये रिव्हर्स असिस्ट आणि रिमोट-कंट्रोल पर्याय देखील आहेत.

आर्थिक वर्ष 22 ते आर्थिक वर्ष 27 या चक्रामधील (आधीच जाहीर केलेल्या) 16,000 कोटी रु. च्या एकूण गुंतवणुकीमधील 4500 कोटी रु. च्या निर्धारित गुंतवणुकीत पॉवरट्रेन डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानासह दोन उत्पादन टॉप हॅट्स आणि उत्पादन क्षमता यांचा समावेश आहे.

महिंद्राच्या इलेक्ट्रिक ओरिजिन SUV साठी गो-टू-मार्केट धोरण जानेवारी 2025 च्या उत्तरार्धात टप्प्याटप्प्याने सुरू होईल. वितरणाची सुरुवात फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्च 2025 च्या सुरुवातीस अपेक्षित आहे.

मालकी अनुभवाची पुर्नव्याख्या:

·         खरेदीपूर्व ड्राईव्ह अनुभव मिळण्यासाठी लक्झरी आणि प्रीमियम ब्रँडमधील 500 तज्ञ

·         महिंद्रा रिसर्च व्हॅली (MRV) मधून समर्पित पाठबळासह ग्राहकांच्या अखंड अनुभवासाठी सुमारे 400 टेक एक्स्पर्ट्स

·         ओव्हर-द-एअर (OTA) अपडेट्सद्वारे अखंड उत्पादन आणि मालकीचा अनुभव.

·         CHARGE.IN: चार्जिंग अनुभव सुलभ करण्यासाठी 350 हून अधिक तज्ञ आणि उद्योगक्षेत्रातील पहिला रिलेशनशिप मॅनेजर यासह समर्पित चार्जिंग व्हर्टिकल

सांस्कृतिक सादरीकरणाद्वारे संविधान दिन साजरा

पुणे: आम्ही भारताचे लोक म्हणून एक नागरिक म्हणून आपल्याला संविधानने दिलेल्या जबाबदारीबाबत तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता मूल्यांबाबत अभंग, पोवाडा, कविता, गाणी अशा विविध सांस्कृतिक कलांचं सादरीकरण तरुणाईने केलं. निमित्त होत संविधान दिनाचं;  संविधान प्रेमी आयोजित जश्न-ए-संविधान या ओपन माईक उपक्रमाचे. हा उपक्रम 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वा. कलाकार कट्टा, गुडलक चौक, डेक्कन, पुणे येथे झाला.
संविधानाची मूल्ये जर प्रत्येक व्यक्तीला समजली आणि जर प्रत्येकाने आपले जीवन त्या मूल्यांप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्या देशात लोकशाही चिरंतन राहील या उद्देशाने हा उपक्रम राबविला, असे कार्यक्रमाच्या समन्वयक ॲड. मोनाली अपर्णा यांनी सांगितले.
मातंग एकता आंदोलन अविनाश बागवे, ऑल मेडिको पॅथि फेडरेशनचे डॉ. सुनील जगताप, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मुक्ता कदम, सेवासदन संस्थेचे डॉ. फादर डिक्रूज, पर्यावरणावर काम करणारे डॉ. सोनाली तळावलीकर आणि प्रदीप घुमरे व मुव्हमेन्ट फॉर पीस अँड जस्टीसचे साजिद शेख यांनी संविधानानी दिलेली कर्तव्ये याबाबत मनोगत व्यक्त केले.  
संविधानात असलेल्या मूल्यांचे बुकमार्क यावेळी उपस्थित सर्वांना देण्यात आले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिकपणे वाचन करून उपक्रमाचा समारोप झाला. सूत्रसंचालन विशाल बागुल यांनी केले. 

अयोध्या राम मंदिरात पुणेकरांची १३ लक्ष रामरक्षा स्तोत्र पठण संकल्प पूर्ती

पुण्यातील विविध शाळांतील बालचमूंचे गीत रामायण सादरीकरण ग्रंथ पारायण दिंडी आणि चौफेर प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजन 
पुणे : श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः असे म्हणत तब्बल ४०० पुणेकरांसह बालचमूंनी देखील आपल्या भावपूर्ण आवाजात अयोध्या राम मंदिरात रामरक्षा पठण केले. विश्वकल्याणासाठी प्रार्थना करीत  रामलल्लाचे डोळ्याचे पारणे फेडणारे रुप पुणेकरांनी डोळ्यात साठवले. रामजन्मभूमीचा इतिहास जाणून घेत प्रभू रामचंद्रांच्या पावन अयोध्येत १३ लक्ष रामरक्षा स्तोत्र पठण संकल्प पूर्ती एका आगळ्यावेगळ्या सोहळ्यात यावेळी झाली
ग्रंथ पारायण दिंडी आणि चौफेर प्रतिष्ठान यांच्यावतीने अयोध्या राम मंदिरात भव्य रामरक्षा पठण आणि गीत रामायण सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.  स्वामी गोविंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे चंपतरायजी, गाेपाळजी, डाॅ.अनिल मिश्रा, तसेच विनीत गाडगीळ, वृंदा जोशी,  ग्रंथ पारायण दिंडीचे प्रमुख वीरेंद्र कुंटे, नंदकुमार देव,अलका विंझे, ऊर्मिला आपटे व भक्ती सुधा फाऊंडेशनचे आशिष केसकर उपस्थित होते.
वीरेंद्र कुंटे म्हणाले, अयोध्या राम मंदिरात विश्वकल्याण्यासाठी विविध ५ संकल्प करीत विविध शाळांमधील मुलांनी आणि पुणेकरांनी रामरक्षा पठण आणि गीतरामायण सादर केले. राष्ट्र मंदिर पुनर्निर्माणासाठी, असुर,अधर्म प्रवृत्ती नाश करून धर्म संस्थापनेसाठी, संघटित शक्तीच्या हुंकारासाठी, दिव्य सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन करण्यासाठी, वसुंधरा व सर्व प्राणीमात्रांसह विश्व कल्याण असे संकल्प उपस्थितांनी केले. गुरु व गायिका भाग्यश्री केसकर व गायिका पल्लवी पोटे यांच्या नेतृत्वात मुलांनी गीतरामायण सादर केले.. प्रथमच हिंदी व मराठी भाषेतून गीत रामायण सादरीकरण झाले. हिंदीतून गीत रामायण सादरीकरण करण्यासाठी गोव्यातील दत्तप्रसाद जोग आणि सहकलाकार आले होते.
गोजिरी चित्राव, मिहीर चित्रा, लास्यवी कोंडो (गोळवलकर गुरुजी विद्यालय), अरीयाना नातू (विखे पाटील मेमोरियल स्कूल), अयान पत्की,निखिल दामले, आरुष खानझोडे (डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल प्रायमरी), मुक्ता विधाते (ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल), राधा धर्माधिकारी, ओम धर्माधिकारी, अरिया संघवी (अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम प्राइमरी स्कूल), दिव्या केळकर, वेद अकोलकर (बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल), कौमुदी देशपांडे (द स्कूल केएफआय, तामिळनाडू), जिया लोढा (सेंट मेरीज स्कूल), स्पृहा जोशी (वापी पब्लिक स्कूल), देवश्री करमरकर (अहिल्यादेवी हायस्कूल) यांनी गायन केले. सिद्धार्थ कुंभोजकर, मनोहर अत्रे, अदिती केसकर, आशिष केसकर यांनी वादन केले.याचे सुत्र संचालन डॉ प्रचीती सुरू कुलकर्णी यांनी केले.
चितळे बंधू मिठाईवाले, एम. व्ही. टिळे, शालगर होजिअरी, महालक्ष्मी सिल्क, डॉ. प्रशांत सुरु यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहाय्य केले.

विधानसभा निवडणूक निकालाबद्दल चिंता व आश्चर्य-तीन स्तरावर देणार लढा

पुणे-आज पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडी पराभूत उमेदवार सभा पुण्यात राष्ट्रवादी भवन येथे पार पडली.या बैठकीत विधानसभा निवडणूक निकलाबद्दल चिंता व आश्चर्य व्यक्त केले.
या बैठकीत ज्येष्ठविधीज्ञ असीम सरोदे, ई. व्ही.एम. मशीन तज्ञ माधव देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. या निकालाबाबत तीन स्तरावर लढा देण्याचे निश्चित केले.
1) वी.वी. पैट मोजणीसाठी तत्काळ अर्ज देण्यात यावा. 2) निवडणुकीच्या निकालासंदर्भात निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार करण्यात यावी.3) या निकाला विरोधामध्ये न्यायालयात याचीका दाखल करण्यात यावी.
यावेळी श्री प्रशांत जगताप, श्री रमेश बागवे, श्री अशोक पवार श्री दत्ता बहीरट, रमेश थोरात अंकुश काकडे, अभय छाजेड संजय मोरे त्याचप्रमाणे हर्षवर्धन पाटील, अजित गव्हाणे, संग्राम थोपटे, संजय जगताप,सौ. अश्विनी कदम यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसची राज्यव्यापी सह्यांची मोहिम: नाना पटोले

0

लोकशाही वाचवण्यासाठी जनभावनेचा आवाज उठवत रस्त्यावर उतरण्याचा काँग्रेसचा निर्णय.

‘मतपत्रिकेवर निवडणुका’ घेण्यासाठी भारत जोडो यात्रेप्रमाणे राहुल गांधी यांची लवकरच देशव्यापी यात्रा.

युतीकडे पाशवी बहुमत असतानाही सरकार स्थापण्यास उशीर, ‘मित्राचा’ निर्णय झाल्यावरच मुख्यमंत्री ठरेल व सरकार बनेल.

काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेता, गटनेता व प्रतोद ठरवण्याचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना देण्याचा प्रस्ताव बैठकीत एकमताने मंजूर

मुंबई, दि. २७ नोव्हेंबर २०२४
महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर कोणाचाही विश्वास बसत नाही. या निकालात काहीतरी गडबड असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. संविधानाने सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे पण आपण एकाला दिलेले मत दुसऱ्यालाच जात असल्याची भावना जनतेत आहे. जनतेच्या भावनांचा आदर करत मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्ष राज्यभर सह्यांची मोहिम सुरु करणार आहे. महामहीम राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश व निवडणूक आयोग यांच्याकडे हे अर्ज पाठवण्यात येतील, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष व CWC सदस्य नसीम खान, मुजफ्फर हुसेन, कुणाल पाटील, डॉ. नितीन राऊत, अमित देशमुख, अस्लम शेख, अमिन पटेल, नांदेडचे नवनिर्वाचीत खासदार रविंद्र चव्हाण,कुमार केतकर, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांच्यासह आमदार उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी जनआंदोलन उभे करण्याची घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी संविधानदिनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात केली आहे. महाराष्ट्रात लवकरच या मागणीसाठी सह्यांची मोहीम सुरु केली जाणार आहे. जनतेच्या सह्यांचे लाखो अर्ज राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, व निवडणूक आयोगाला पाठवले जाणार आहेत. भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात ऐतिहासीक प्रतिसाद मिळाला होता आता पुन्हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी यात्रा काढली जाणार आहे, या यात्रेलाही महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळेल. लोकशाही वाचवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्याची लढाई लढलेली आहे, जनभावना तीव्र झाल्यानंतर १५० वर्षांची ब्रिटिश सत्ता संपुष्टात आली हा इतिहास आहे. लोकशाही व्यवस्थेत जनताच सर्वोच्च असून जनभावनेचा आवाज काँग्रेस उठवत आहे, असे नाना पटोले म्हणाले.
भारतीय जनता पक्ष युतीला पाशवी बहुमत मिळाले असूनही चार दिवस झाले तरी मुख्यमंत्री निश्चित होत नाही आणि सरकारही स्थापन होत नाही. राज्यात शेतकऱ्यांचा समस्या आहेत, बेरोजगारी, महागाई, कायदा व सुव्यवस्था असे प्रश्न आहेत पण भाजपा युतीला जनतेची चिंता नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचा निर्णय जोपर्यंत ‘मित्र’ घेत नाही तोपर्यंत सरकार व मुख्यमंत्री होणार नाही. अडीच वर्षात निम्मी मुंबई व महाराष्ट्र मित्राला विकला आहे, यापुढेही महाराष्ट्र विकण्याचे काम हे सरकार करेल, त्यामुळे ‘मित्राचा’ आदेश येताच मुख्यमंत्री व सरकार बनेल असे पटोले म्हणाले.
काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेता, गट नेता व प्रतोद ठरवण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना देण्याचा ठराव एकमताने या बैठकीत करण्यात आल्याची माहितीही नाना पटोले यांनी दिली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला विजय वडेट्टीवार यांनी अनुमोदन दिले. डॉ. नितीन राऊत व अमित देशमुख यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले. सर्व आमदारांनी एकमताने हा ठराव मंजूर केला.
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, ईव्हीएम संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना केलेले विधान राजकीय आहे, असे मत मांडता येते का हा प्रश्न आहे. निकाल देताना कायद्यात काय तरतूद आहे. त्यावर स्पष्टता असायला हवी होती. परंतु न्यायाधीश व न्यायालयाच्या निकालावर जास्त काही बोलणे उचित नाही असेही पटोले म्हणाले.
उद्या गुरुवार दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता टिळक भवन, दादर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या विधानसभा उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

हा जनमताचा कौल नाही,EVM मध्ये फेरफार करून मिळविलेला विजय -हायकोर्टात दाखल करणार याचिका

पिडीत आणि अन्यायग्रस्तच कोर्टाकडे न्याय मागायला जातात -अन्याय करणारे,गफला करणारे कोर्टात कशाला जातील

पुणे-महाविकास आघाडीचे पुणे शहरातील पराभूत उमेदवार ईव्हीएममधील कथित गैरव्यवहाराविषयी पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या पुणे शहराध्यक्षांनी बुधवारी दिली.
विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये झालेल्या कथित गडबडीबाबत पुणे शहरातील महाविकास आघाडीच्या सर्व पराभूत उमेदवारांनी बुधवारी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. असीम सरोदे यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी शिरूरचे माजी आमदार अशोक पवार,माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, प्रशांत जगताप,सचिन दोडके, दत्ता बहिरट, प्रवक्ते अंकुश काकडे, अभय छाजेड, संजय मोरे उपस्थित होते. यावेळी ईव्हीएम हॅकिंग कशा प्रकारे झाली, याविषयी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सादरीकरण केले. यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीनमधील कथित गैरव्यवहाराविषयी पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले.
प्रशांत जगताप म्हणाले, निवडणूक काळातील आमचा अनुभव पाहता यावेळी जो निकाल आहे तो जनतेचा कौल नाही. हा पडद्यामागे ईव्हीएम मशीनमध्ये झालेला घोळ आहे. मतदान यंत्रे १५ ते २० टक्के आधीच सेट करण्यात आली होती. ईव्हीएम मशीनमध्ये तीन युनिट असतात. ईव्हीएम मशीन मतदान केंद्रात येईपर्यंत एकदा इंटरनेटशी जोडून चिन्ह जोडले जाते. पूर्वी बॅलेट पेपरमध्ये सर्व पारदर्शकता होती. पण ईव्हीएम मशीन २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार पर्यंतचा एका दिवसाचा प्रोग्राम आधीच सेट केला होता.
त्यामुळे आम्ही व्हीव्हीपॅटमधील मते आम्ही मोजणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष फोडण्याची जबाबदारी ज्या पडद्या मागील एका नेत्याला दिली. त्याच नेत्याच्या मदतीने आता इस्त्रायलच्या तंत्रज्ञानाने ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड करून गैरप्रकार करण्यात आला. मतदान सुरू असताना ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड करण्यासाठी काही यंत्रणा पडद्यामागे कार्यरत होत्या.
महायुतीने जयंत पाटील व रोहित पवार यांच्यासारखे आमचे नेते पाडण्यासाठी रडीचा डाव केला. आमची विनंती ईव्हीएम मशीन अधिक चांगले करा आणि जर ते हॅक होत असेल तर पुन्हा बॅलेट पेपरकडे वळावे अशी आहे. निवडणूक आयोगाने आम्ही उपस्थित करत असलेल्या प्रश्नावर खुलासा करावा, अन्यथा देशात लोकशाही अस्तित्वात राहणार नाही. देशातील आघाडीच्या नेत्यांनीही बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे, असे जगताप यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेचा (ICA) रोशडेल पायोनियर्स पुरस्कार इफ्कोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यू.एस. अवस्थी यांना प्रदान

0

डॉ. वर्गीस कुरियन यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारे डॉ. यू.एस. अवस्थी हे दुसरे भारतीय आहेत.

नवी दिल्ली,२७ नोव्हेंबर,२०२४:इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को)चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यू.एस. अवस्थी यांना २०२४ साठीचा रोशडेल पायोनियर्स पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. वर्गीस कुरियन यांच्या नंतर हा पुरस्कार मिळवणारे ते दुसरे भारतीय ठरले आहेत. डॉ. कुरियन यांना २००१ साली हा सन्मान देण्यात आला होता. हा पुरस्कार २००० साली सुरू करण्यात आला असून, तो आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेचा सर्वोच्च सन्मान मानला जातो. सहकारी चळवळीत नावीन्यपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत उपक्रम राबवून सदस्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्तीला किंवा विशेष परिस्थिती, संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो.

डॉ. अवस्थी हे केमिकल इंजिनीअर असून ते १९७६ मध्ये इफ्कोमध्ये रुजू झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली या सहकारी संस्थेची उत्पादनक्षमता २९२% वाढली आणि निव्वळ मालमत्तेत ६८८% वाढ झाली त्यांच्या दूरदृष्टीने इफ्कोने विविध व्यवसाय क्षेत्रांमध्ये प्रवेश केला आणि व्यवसायाचे यशस्वी विविधीकरण केले. तसेच, भारतीय शेतकऱ्यांसाठी नॅनो खतांचे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले.

आयसीएचे अध्यक्ष एरियल ग्वार्को यांनी २५ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली, भारत येथे आयोजित आयसीए ग्लोबल कॉन्फरन्समध्ये एका विशेष समारंभादरम्यान डॉ. अवस्थी यांना हा पुरस्कार प्रदान केला. इफ्को लिमिटेड आंतरराष्ट्रीय सहकारी संघटना आणि केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयसीए महासभा आणि जागतिक सहकार परिषद २०२४चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिल्लीतल्या भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला असून, ३० नोव्हेंबर २०२४ रोजी संपन्न होणार आहे.

डॉ. अवस्थी म्हणाले, “आयसीएचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारणे हा माझा बहुमान आहे. हा पुरस्कार म्हणजे सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकारातून समृद्धी’ या व्हिजनचे द्योतक आहे आणि यातून सन्माननीय सहकार मंत्री श्री. अमित शाह यांच्या मार्गदर्शनालाखाली आणि अष्टपैलू नेतृत्वाखाली इफ्कोने केलेले असामान्य प्रयत्न अधोरेखित होतात. जागतिक पातळीवर भारतातील सहकारी चळवळ वाढविण्याच्या त्यांच्या व्हिजनसाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. हा पुरस्कार दिल्याबद्दल मी इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स आणि जागतिक पातळीवरील सहकार क्षेत्राचे मी आभार मानतो. या पुरस्कारामुळे आपल्याला सहकाराची वृत्ती जागतिक पातळीवर जपण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळते.”

डॉ. अवस्थी पुढे म्हणाले, “नॅनो डॅप व नॅनो युरिया लिक्विडसारख्या नॅनो खतांच्या माध्यमातून इफ्कोने शाश्वत शेतीला प्रोत्साहन दिले आहे, शेती करण्याच्या पद्धतीत परिवर्तन घडवेल आहे आणि पर्यावरणस्नेही मागण्यांची पूर्तता केली आहे. स्थानिक पातळीवर नॅनो खतनिर्मिती होत असल्याने लॉजिस्टिकसंदर्भातील समस्या हाताळल्या गेल्या आहेत, आयातीवरचे अवलंबित्व कमी झाले आहे आणि अवजड पॅकेजिंगऐवजी कॉम्पॅक्ट बाटल्यांचा वापर होऊ लागला आहे. या नवकल्पनांमुळे मातीचा कस सुधारला आहे, शेतकऱ्यांचा नफा वाढला आहे आणि पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन मिळाले आहे.” इफ्कोने स्थानिक पातळीवर विकसित केलेली नॅनो युरिया व नॅनो डॅप यांचा वापर भारतभरातील शेतकरी करत आहेत आणि भारतातील कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांनी तसेच परदेशात, विशेषतः भारताच्या शेजारी राष्ट्रांनीही ही उत्पादने स्वीकारली आहेत आणि नॅनो खतांचा पुरवठा करण्यासाठी इतर राष्ट्रांनीही इफ्कोशी संपर्क साधला आहे. नजीकच्या भविष्यकाळात नॅनो खते 25 देशांमध्ये निर्यात करण्याची आमची योजना आहे.

भारतीय ज्ञान मानव कल्याणाचे-प्रो.सुखदेव द्विवेदी

२९वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे प्रथम सत्र

पुणे, दि.२७ नोव्हेंबर: “भारत देशातील कल्याणात्मक व मानव सुखकर ज्ञान कसे निर्माण झाले याचा सखोल अभ्यास होणे महत्वपूर्ण आहे. १४ विद्या आणि चार वेदांचा अभ्यासातूून असे आढळते की यातील ज्ञान हे मानवाला सुख, शांती आणि आध्यात्मिक दृष्या उन्नत करण्यासाठी आहे. जेव्हा मानवाचे मन शांत होईल तेव्हाच संपूर्ण विश्वात शांती नांदेल.” असे विचार बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे महामहोपाध्याय प्रो. सुखदेव द्विवेदी यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित २९वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या प्रथम दिवसाच्या सत्रात ‘भारतीय ज्ञान परंपरा आणि वर्ल्ड पीस’ या विषयावर ते बोलत होते.
सत्राच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. तसेच डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम.चिटणीस, प्रा.डॉ. प्रियंकर उपाध्याय व २९ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे समन्वयक व प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
प्रो.सुखदेव द्विवेदी म्हणाले,” संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी संजीवनी समाधी घेऊन शरीराचा त्याग केला, परंतू जातांना त्यांनी जे ज्ञान दिले ते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचे आहे. वेदांचे ज्ञान, वैदीक ब्राम्हण, मीमांसा शास्त्र, न्याय शास्त्र, ब्रह्म शास्त्राचे ज्ञान वेळेनुसार आकलन करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ऋषि मुनींच्या ज्ञानानुसार समाजात शांती स्थापन करण्याचे कार्य केले. नंतर चार वेदांचे ज्ञान समोर आले. चाणक्य निती मधील १७ अध्यक्ष आणि ५७२ सूत्र हे मानवाच्या सुखाचे आहेत. तसेच महाभारत आणि रामायणाचा मुख्य उद्देश्य शांतीचाच आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली व जगदगुरू तुकाराम महाराज यांचा संदेश मानवजातीपर्यंत पोहचविण्याच्या मुख्य उद्देश्याने ही व्याख्यानमाल सुरू केली आहे. मन आणि आत्मा या गोष्टींचे अधिक चिंतन व्हावे. जीवनाचा हेतू व कर्तव्य काय आहे याची जाणिव यातून होते.”
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात डॉ. मुकेश शर्मा यांनी ‘मिडिया आणि विश्वशांती’ या विषयावर बोलतांना म्हणाले की, आजच्या युगात मोबाईल, फोन, टिव्हीची वाढती संख्या, सोशल मिडिया वाढत आहे. या माध्यमांना नियंत्रित करणे अतिशय अवघड झाले आहे. पुर्वीच्या काळात बदल घडून आता कार्यक्रम नंतर आणि मार्केट प्रथम आले आहे. अशावेळेस समाजाला काय दाखवायचे हे माध्यमांच्या हातात राहिले नाही. त्यामुळे मानसिक शांती आवश्यक आहे.
त्यानंतर हभप डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांनी ‘योग आणि अध्यात्म’ या विषयावर भाष्य केले. स्वतःला शोधणे म्हणजे योग असतो. ज्ञान आणि विज्ञान हे प्रात्यक्षित आहे आणि आत्मज्ञान हे अनुभूतीचे आहे. प्रामाणिकपणे जगणे म्हणजे अध्यात्म होय.
सूत्रसंचालन पराग खानविलकर आणि डॉ. अंजली साने यांनी आभार मानले.

आस्था शुक्ला यांचे ठुमरी, दादरा, गझल गायन शुक्रवारी

गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे शोभा गुर्टू स्मृती मैफलीचे आयोजन

पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे सुप्रसिद्ध गायिका, ठुमरी सम्राज्ञी शोभा गुर्टू यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आले असून यात प्रसिद्ध गायिका आस्था शुक्ला यांचे ठुमरी, दादरा, गझल गायन होणार आहे.
कार्यक्रम शुक्रवार, दि. 29 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजता गांधर्व महाविद्यालय, पुणे येथील विष्णू विनायक स्वरमंदिरात होणार आहे, अशी माहिती गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. आस्था शुक्ला यांना पार्थ ताराबादकर (तबला) आणि शुभदा आठवले (संवादिनी) साथसंगत करणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
आस्था शुक्ला यांना त्यांच्या आई वीणा पाणी यांनी संगीत विश्वाची ओळख करून दिली. त्यानंतर आस्था यांनी कानपूर येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित काशिनाथ शंकर बोडस यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेतले. गुरुंच्या अकाली निधनानंतर त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांच्याकडे पुढील शिक्षणास सुरुवात केली. आस्था यांची उपशास्त्रीय संगीतातील रुची पाहून वीणा पाणी यांनी त्यांना ठुमरी गायनाची विशेष तालिम दिली.

सांगीतिक संस्कार प्रवाहित ठेवणारी यात्रा

अभिषेकी बुवांच्या पावलांचे ठसे शोधण्याचा प्रयत्न : पंडित हेमंत पेंडसे

पुणे : गायक-संगीतकार म्हणून पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे स्थान खूप उच्च आहे. त्यांच्या सांगीतिक संस्कारांचा-शिकवणुकीचा-स्वभावाचा प्रभाव माझ्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर पडला आहे. अभिषेकीबुवांकडून मिळालेले संस्कार प्रवाहित करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे, अशा भावना पंडित हेमंत पेंडसे यांनी व्यक्त केल्या. अभिषेकीबुवांनी संगीतबद्ध केलेल्या रचनांसह पंडित पेंडसे यांनी स्वत:ही स्वरबद्ध केलेल्या रचना सादर करून त्यांनी रसिकांसमोर गुरूकृपेचा सांगीतिक ठेवा खुला केला.
पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीत संस्कारात वाढलेल्या प्रसिद्ध गायक संगीतकार पंडित हेमंत पेंडसे यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत रचना आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेल्या रचनांवर आधारित ‌‘संस्कार यात्रा‌’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. पंडित हेमंत पेंडसे यांच्यासह राधिका ताम्हनकर, प्रज्ञा देशपांडे यांनी प्रभावीपणे रचना सादर केल्या. डॉ. मानसी अरकडी यांनी सुमधूर वाणीत आणि ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे निवेदन केले. तर यश कोल्हापूरे (सहगायन), अभिजित बारटक्के (तबला) उद्धव गोळे (पखवाज), ऋचा देशपांडे (संवादिनी), तुषार दीक्षित (की-बोर्ड), उद्धव कुंभार (तालवाद्य) यांनी समर्पक साथसंगत केली.
बुवांकडून मिळालेले संस्कार सांगीतिक क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते तर वैयक्तिक आयुष्यातही त्यांच्याकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. पंडित अभिषेकी हे अत्यंत प्रेमळ, सर्वांना सामावून घेणारे होते त्याचबरोबर कडक शिस्तीचे आणि वक्तशीरही होते. त्यांनी आपल्या शिष्यांना उत्तम कलाकारच नव्हे तर उत्तम माणूस म्हणून घडविले. माझ्या सांगीतिक रचनांवर बुवांच्या संस्कारांचा प्रभाव आहेच पण संगीतकार म्हणून अभिषेकी बुवांच्या पावलांचे ठसे शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे पंडित पेंडसे म्हणाले.
संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत मीरा बाई यांच्यासह कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, गिरीश, बालकवी, सुधीर मोघे, अशोक परांजपे, डॉ. राहुल देशपांडे आणि रमण रणदिवे यांच्या रचना या वेळी सादर करण्यात आल्या.
अविरत बरसत, गर्द सभोती रान साजणी, राम बरवा, अनंता तुला कोण पाहू शके, व्यथा सांगण्यास ज्ञाना, काळजाला कोण हाका देत आहे, मौनाच्या संध्याकाळी आकाश स्वरांचे झाले, नाही पुण्याची मोजणी, अंधाराचे धागे वारा विणतो आकाशी, अवघे गर्जे पंढरपूर, संत भार पंढरीत, मै गोविंद आदी गीतांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
मतिमंद व बहुविकलांग मुलांसाठी कार्यरत असलेल्या सावली ट्रस्टच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर निर्मिती पंडित हेमंत पेंडसे यांची होती.

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावते हीच इच्छा-धीरज घाटे

पुणे:- २७-“विधानसभा निवडणुकीत भाजपाला देदिप्यमान यश मिळवून देणारे देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी,हीच सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मनस्वी इच्छा आहे” असे प्रतिपादन पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केले
राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती ला मतदारांनी भरभरून प्रेम दिले या मध्ये सर्वात मोठी कामगिरी ही भारतीय जनता पार्टीने केली आहे ह्या विजयाचे खरे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणविस यांचे नाव अग्रस्थानी आहे मागील सरकारच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पद देऊन त्यांना मानाचे स्थान दिले तसाच मनाचा मोठेपणा या वेळी शिंदे दाखवतील अशी आशा आहे असे घाटे म्हणाले
देवेंद्र फडणवीस यांची राज्यच्या मुख्यमंत्री व्हावेत या करता आज पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सारसबागेतील सिद्धिविनायक मंदिरात होम हवन तसेच महारतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कोथरुडचे आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील, प्रदेशाचे प्रवक्ते संदिप खर्डेकर, युवा मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे,शहर सरचिटणीस पुनीत जोशी, वर्षा तापकीर, राहुल भंडारे, महेश पुंडे, सुशील मेंगडे, गणेश कळमकर, प्रमोद कोंढरे यांच्यासह माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.