पुणे-महापालिकेने अतिक्रमण कारवाई करताना रस्त्यावर टेम्पो लाऊन कुल्फी आईस्क्रीम विक्री करणाराला १५ हजाराचा दंड करून पुन्हा व्यवसाय न करण्याचा आदेश दिला आहे . याबाबतची माहिती आशिकी,’ उपायुक्त डॉक्टर रमेश शेलार यांनी नगर रोड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत विमान नगर परिसरात पाहणी करताना अनाधिकृत टेम्पो व्यवसायिकावर कारवाई करून रक्कम रुपये १५०००/- दंड करण्यात आला.सदर वाहन वॉर्ड ऑफिस मध्ये जमा करण्यात आले आहे. तसेच पुणे शहरामध्ये आठवडे बाजारामध्ये रस्त्यांवर उभे करून अश्या वाहनांचा वापर केला जातो अश्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व विभागीय अतिक्रमण निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक यांना देण्यात आले आहेत.
पुणे-आज अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी विश्रांतवाडी चौक,आळंदी रस्ता येथे माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांचे समवेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्या बाबतची जागा पाहणी केली.या जागा पाहणीत त्यांनी अधिकारी यांना सूचना केल्या. या प्रसंगी माधीक्षक अभियंता गव्हाणे , कार्यकारी अभियंता धारव, राजेश गुर्रम महापालिका सहाय्यक आयुक्त येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय, संदीप पाटील, इतर अधिकारी वर्ग तसेच वॉर्ड ऑफिस मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पुणे महानगरपालिकेत हरित इंधनाच्या वापरासाठी बेकरी असोसिएशनची बैठक संपन्न
पुणे- महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत उपआयुक्त (पर्यावरण) रवी पवार यांच्या अध्यक्षतेखाली बेकरी असोसिएशनची बैठक पार पडली. या बैठकीत स्वच्छ इंधनाचा वापर करून पुणे शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शहरी भागांमध्ये हवा प्रदूषणाचे वाढते गंभीर परिणाम लक्षात घेता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत हवा प्रदूषण कमी करणे करिता याबाबतची मार्गदर्शक तत्वे यापूर्वी जारी करण्यात आलेले असून स्थानिक स्वराज्य संस्थांना याबाबत त्यांच्या हद्दीतील बेकऱ्या, रेस्टॉरंट, ढाबा इत्यादीमध्ये हरित इंधनाचा वापर सुरू करण्यात यावा असे आदेश दिलेले आहेत
या बैठकीत बेकरी असोसिएशनतर्फे माहिती देण्यात आली की, पुणे शहरात जवळपास 750 बेकऱ्या कार्यरत असून उपनगरात जवळपास 200 ते 250 बेकऱ्या आहेत, त्यांपैकी बहुतेक बेकऱ्यांनी स्वच्छ इंधनाचा वापर सुरू केला आहे. तथापि, काही बेकऱ्या अद्याप रूपांतरणाच्या प्रक्रियेत आहेत. बैठकीदरम्यान बेकरी असोसिएशने स्वच्छ इंधनाचा वापर करण्यासाठी येणाऱ्या अडचणी उप आयुक्तांसमोर मांडल्या तसेच यासाठी पुणे महापालिकेमार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली. हवा (प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९८१ च्या कलम ३१(अ) अंतर्गत हवा प्रदूषण कमी करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) बेकरी/हॉटेल्स/रेस्टोरंट/खाद्यपदार्थ स्टॉल/ ढाबा यांमध्ये लाकूड, कोळसा आणि तंदूर इत्यादीच्या वापराऐवजी एलपीजी, पीएनजी, वीज आणि हरित उर्जेच्या इतर स्रोतांचा अवलंब करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. ज्या बेकरी/हॉटेल/रेस्टोरंट/ खाद्यपदार्थ स्टॉल/ ढाबा यांनी अद्याप एलपीजी, पीएनजी, वीज आणि हरित उर्जेच्या इतर आधारित प्रणाली स्वीकारली नाही, त्यांनी तात्काळ रूपांतरण करणे आवश्यक आहे. अन्यथा या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे बैठकीत सांगण्यात आले.
भारतीय जनता पक्षाच्या मूक मोर्चात निवडणूक आयोगही सहभागी झाला आहे की काय ?
निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा
मुंबई, दि. १ नोव्हेंबर.
सत्याचा मोर्चा हा मोर्चा एकट्या निवडणूक आयोगाच्याच विरोधात नाही तर जे लोक आयोग चालवतात त्यांच्या विरोधातही आहे. विधानसभेसाठी वापरण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत, या याद्या दुरुस्त करा व त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात भव्य सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य नसीम खान, माजी मंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष ॲड. अभय छाजेड, आमदार भाई जगताप, वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, भाकपचे प्रकाश रेड्डी, माकपचे डॉ. अजित नवले यांच्यासह सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मोर्चाला संबोधित करताना काँग्रेसचे ज्य़ेष्ठ नेते बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, देशातील निवडणुकीत मतचोरी झालेली आहे हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गाधी यांनी पुराव्यासह उघड करून दाखवले पण केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यावर थातूर मातूर उत्तर दिले. निवडणूक आयोगाचे उत्तर हे इतिहासातील सर्वात बोगस उत्तर आहे. कोणतीही चौकशी न करता त्यांनी उत्तर दिले. विधानसभा निवडणुकीत बोगस मतदारयाद्या वापरण्यात आल्या, त्यासंदर्भात काँग्रेस पक्ष व मविआतील सर्व घटक पक्षांनी निवडणूक आयोगाला विचारणा केली व या बोगस मतदार याद्या वापरू नका असे सांगितले पण विधान सभेच्या बोगस याद्यांवर व त्यांवर घेतलेल्या हरकरतीवर कोणताही निर्णय घेतला नाही आणि आता तीच बोगस यादी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी वापरली जात आहे. आम्ही सर्व विरोधी पक्ष त्या बोगस मतदार याद्यांच्या विरोधात आहोत आणि लोकशाही माननाऱ्यांनी त्याला विरोध करून मतदारयाद्या दुरुस्त करण्याचा आग्रह धरला आहे पण राज्य निवडणूक आयोग समाधान कारक उत्तर देऊ शकले नाही.
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, माझ्या संगमनेर मतदारसंघातील ग्रामीण भागात साडे नऊ हजार बोगस मतदार आहेत, आम्ही त्यावर हरकत घेऊन त्या दुरुस्त करण्यास सांगितले पण तहसीलदार म्हणतात, दुरुस्ती करण्याचा आम्हाला काहाही अधिकारी नाही म्हणजे तीच बोगस मतदार यादी आता महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीला वापणार, म्हणून ती यादी दुरुस्त झाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे पण निवडणूक आयोग ऐकूणच घेत नाही.
सत्ताधारी भाजपाने काढलेल्या मूक मोर्चावर टीका करत बाळासाहेब थोरात म्हणाले की, आपला सत्याचा मोर्चा निघत असताना सत्ताधाऱ्यांनी मूक मोर्चा काढला आहे. या मूक मोर्चात निवडणूक आयोगही सहभागी झाला आहे का ? अशी शंका येते.. ज्येठ नेते शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनीही मोर्चाला संबोधित करून भाजपा महायुती सरकार व निवडणूक आयोगावर सडकून टीका केली.
मुंबई- ‘सत्याच्या मोर्चा’त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर घणाघाती प्रहार केला. ॲनाकोंडाला आता कोंडावंच लागेल, नाहीतर हे लोक सुधारणार नाहीत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट हल्ला चढवला. मतदार याद्यांमधील गोंधळ आणि दुबार नोंदींचा मुद्दा उचलत त्यांनी राज्यकर्त्यांवर आणि निवडणूक आयोगावर निष्क्रियतेचा आरोप केला. रोज कुठून तरी पुरावे समोर येत आहेत, तरीही सरकार आणि आयोग गप्प आहेत, अशी टीका त्यांनी केली.
आपला पक्ष, नाव आणि निशाणी चोरली गेली, आता मतचोरी सुरू आहे, असं सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, माझे वडीलही चोरायचा प्रयत्न झाला, पण ते पुरलं नाही म्हणून आता मतचोरीकडे वळले आहेत.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणतात की विरोधकांचा पर्दाफाश करू. मी देवेंद्र फडणवीस यांना खुलेआम आव्हान देतो की, करा ना पर्दाफाश! आम्ही कसे फायद्यात आहोत, ते दाखवा.
मुख्यमंत्री जेव्हा असं बोलतात, त्याचा अर्थ स्पष्ट आहे की, त्यांनी मतचोरी मान्य केली आहे, असा दावा करत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होत असल्याचंही सांगितलं.
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचं आवाहन केलं. ही केवळ निवडणुकीची लढाई नाही, तर लोकशाही वाचवण्याची लढाई आहे, असं सांगत त्यांनी मोर्चाच्या माध्यमातून सरकारला तीव्र इशारा दिला.
मुंबई- आज मतदार याद्यांमधील घोळ, मतचोरी आणि दुबार नावे या गंभीर मुद्द्यांवरून उसळलेल्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर सत्याचा मोर्चा निघाला. महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात हे आंदोलन छेडले. हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी फॅशन स्ट्रीटपासून मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत रॅली काढली. मतदार नोंदणी प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आणि पारदर्शक निवडणुकीच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या ऐतिहासिक मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि मनसेचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा संदेश गेला आहे.
मोर्चातील मार्गदर्शनपर भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकशाहीच्या रक्षणाचा मुद्दा पुढे करत कार्यकर्त्यांना एकजुटीचा संदेश दिला. देशाची लोकशाही टिकवण्यासाठी कष्ट करायला तयार असलेले तुम्ही सर्व बंधू-भगिनी, तुमचा हा संघर्ष मला इतिहासाची आठवण करून देतो, असं सांगत त्यांनी या आंदोलनाला ऐतिहासिक संदर्भ जोडला. पवार म्हणाले की, आजचा मोर्चा मला 1978-89 च्या काळात घेऊन जातो. त्या काळात मी महाविद्यालयात शिकत होतो. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळी काळा घोडा परिसरात असेच मोर्चे निघाले होते. त्या काळातील एकजूट आणि विचारांचा समन्वय आज तुमच्यात दिसत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आजचा मोर्चा हा कोणत्याही पक्षासाठी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न नसून लोकशाही रचनेच्या रक्षणासाठीचा सामूहिक आवाज आहे. आपण स्वतःसाठी काही मागत नाही, सत्ता किंवा पदासाठीही नाही. आपण फक्त एवढंच म्हणतोय की संविधानाने दिलेले मतदानाचे अधिकार सुरक्षित राहिले पाहिजेत, असं ते म्हणाले. निवडणूक आयोगावर अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, संविधानात सांगितलेले नियम सत्ताधाऱ्यांच्या मनाप्रमाणे वाकवले गेले तर लोकशाहीचं भविष्य धोक्यात येईल. त्यामुळे, जनतेने सावध राहून निवडणुकीच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी दबाव निर्माण करण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं.
मोर्चाच्या अखेरीस शरद पवारांनी सर्व कार्यकर्त्यांना शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देण्याचं आवाहन केलं. ही लढाई कुणा एका पक्षाची नाही, ही लढाई संविधान आणि लोकशाही वाचवण्याची आहे, असा ठाम संदेश त्यांनी दिला. सत्याचा मोर्चा हा फक्त विरोधाचा नव्हे, तर जागृतीचा आणि जबाबदारीचा आवाज असल्याचं ते म्हणाले. या मोर्चातून राज्यभरात लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला असून, निवडणूक आयोगावर दबाव वाढवण्यात महाविकास आघाडी आणि मनसेला यश मिळाल्याचं म्हटलं जात आहे.
खोटेपणा सिद्ध करणाऱ्यांवरच गुन्हे दाखल शरद पवार म्हणाले की, काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या. काही ठिकाणी सांगण्यात आलं की इथे बनावट आधार कार्ड मिळते. सिद्ध करून द्या हे आव्हान आले. डेमो दाखवला आणि हा आरोप ज्याने केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला. खोटारडे आहेत हे सांगण्याचा, सिद्ध करण्याचा जर प्रयत्न कोणी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. याचा अर्थ हे शासन सगळ्याला संरक्षण देते. त्यामुळे तुमची आणि माझी जबाबदारी आहे, काही करा पण मतदानाची चोरी आम्ही थांबवणार. आपण स्वत:साठी काही मागत नाही. आपण ऐवढंच म्हणतो की लोकशाहीमध्ये सविधानानं जो अधिकार तुम्हा आम्हाला दिला त्याचे जतन करा. त्याची आज वेळ आली आहे. आपण बघितलं निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये विशेषत: विधानसभेच्या निवडणुकीत जे प्रकार झाले. त्यामध्ये सामान्य माणसाचा संसदीय लोकशाही यावरचा विश्वासाला धक्का बसला. आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत. लोकशाही टिकवण्यासाठी काय पडेल ती किंमत मोजू पण… याठिकाणी उत्तमराव जानकर सोलापूरचे आमदार आहेत. त्यांनी त्यांचा अनुभव तुमच्यासमोर सांगितला. त्यातून स्पष्ट होतं की सत्तेचा गैरवापर सातत्याने केला जातो. यांना तोंड द्यावे लागेल. राजकीय मतभेद असू शकतात. निवडणुकीत संघर्ष असू शकतो. पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल. आणि या देशाचा मतांचा अधिकार लोकशाहीचा हा अधिकार हा जतन करणं हेच आमचं कर्तव्य आहे. हा दृष्टिकोन ठेवून आपण या ठिकाणी निर्धार केला पाहिजे. देशाची लोकशाही टिकवायची असेल. मताचा अधिकार टिकवायचा असेल तर तुम्हाला आम्हाला एक व्हावं लागेल. मी तुम्हाला खात्री देतो. आज व्यासपीठावर असलेले सर्व नेते, सहकारी सगळ्यांच्या वतीने निर्णय घेतला काय पडेल ती किंमत मोजू पण ही चोरी थांबवू आणि या देशाची लोकशाही टिकेल कशी याची खबरदारी घेऊ.
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी राज्यातील दुबार मतदारांच्या नावांचा ढिग दाखवून बोगस मतदार याद्यांचे पुरावे दिले. महाराष्ट्रात निवडणुकीच्या नावाखाली प्रचंड गोंधळ सुरू आहे. कोर्टाच्या आदेशाच्या नावाखाली जानेवारीत निवडणूक घेण्याचा हट्ट सुरू आहे. या लोकांनी मागील 5 वर्षांत निवडणुका घेतल्या नाही. पण आत्ता घाई करत आहेत. अजून 1 वर्षे घेतली नाही, तर काय फरक पडतो? या लोकांचा जुन्याच मतदार यादीवर निवडणूक घेऊन यश पदरात पाडून घेण्याचा डाव आहे, असे राज ठाकरे म्हणालेत. यावेळी त्यांनी दुबार मतदारांना ठोकून काढण्याचाही इशारा दिला.
महाविकास आघाडी व मनसेने आज मुंबईत मतदार याद्यांतील घोळ व मतचोरीच्या मुद्यावरून ‘सत्याचा मोर्चा’ काढला. त्यानंतर आयोजित सभेत बोलताना राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह महायुती सरकारवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, आजचा मोर्चा हा राग व ताकद दाखवण्याचा, दिल्लीपर्यंत समजण्याचा व समजावून सांगण्याचा मोर्चा आहे. या प्रकरणी माझ्यासकट सर्वांनीच भाष्य केले आहे. खरे तर मतदार यादीत दुबार मतदार आहेत हा फार छोटा विषय आहे. या प्रकरणी आम्ही सर्वजण बोलत आहोत. उद्धव ठाकरे बोलत आहेत. शरद पवार बोलत आहेत. शेकाप, डावे व काँग्रेसही बोलत आहे. एवढेच नाही तर सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदेंचे लोकही दुबार मतदार असल्याचे बोलत आहेत.
अरे मग अडवलंय कुणी? हे लोक निवडणूक घेण्याची घाई का करत आहेत? साधी गोष्ट आहे. मतदार याद्या साफ करा. त्या पूर्ण पारदर्शक केल्यानंतर निवडणूक घ्या. त्यानंतर यश – अपयश कुणाचे ही गोष्ट मान्य. पण सध्या जे लपून – छपून चालू आहे ते कशासाठी?
राज ठाकरे यावेळी मतदार यादी दाखवत म्हणाले, मी दोन-तीन गोष्टी दाखवण्यासाठी येथे आणल्या आहेत. कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड व भिवंडी येथील 4,500 मतदारांनी मलबार हिल मतदारसंघात मतदान केले आहे. असे लाखो लोक महाराष्ट्रभर आहेत. या लोकांचा बोगस मतदानासाठी वापर करण्यात आला. पण त्यानंतरही सत्ताधारी लोक या प्रकरणी पुरावे दाखवण्याची मागणी करत आहेत.
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात 17 लाख 29 हजार 456 मतदार आहेत. त्यापैकी 62 हजार 370 मतदार दुबार आहेत. मुंबई नॉर्थ वेस्ट मतदारसंघात 16 लाख 74 हजार 861 मतदार आहेत. त्यापैकी 60 हजार 231 मतदार दुबार आहेत. मुंबई नॉर्थ ईस्ट मतदारसंघात 15 लाख 90 हजार 710 मतदार आहेत. त्यापैकी 92,983 मतदार दुबार आहेत. मुंबई नॉर्थ सेंट्रल मतदारसंघात 16 लाख 81 हजार 48 मतदार आहेत. त्यापैकी 63 हजार 740 दुबार मतदार आहेत, असे राज ठाकरे यावेळी मुंबईसह महाराष्ट्रातील विविध लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदारांची आकडेवारी सादर करताना म्हणाले.
यावेळी त्यांनी या बोगस मतदारांचा पुरावा देण्यासाठी मतदार याद्यांच्या ढिगाचा पुरावाही दाखवला. ते ‘अरे काढ रे ते कापड’ म्हणताच, तिथे दुबार मतदारांच्या नावांच्या कागदपत्रांचा ढिगारा दिसला. हे सर्व दुबार मतदार आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. ते बोगस मतदार याद्यांच्या ढिगाऱ्याकडे बोट दाखवत म्हणाले, हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत. हे फक्त मी सांगितलेल्या मतदार संघातील दुबार मतदार आहेत. यावरून महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा गोंधळ सुरू आहे दिसून येईल.
एवढे पुरावे देऊनही कोर्टाने सांगितले म्हणून जानेवारीत निवडणूक घेण्याचा हट्ट सुरू आहे. कशा घ्या? का घ्या? कुणाला आहे घाई? या लोकांनी मागील 5 वर्षांत निवडणुका घेतल्या नाहीत. अजून 1 वर्ष गेले तर काय फरक पडतो? पण जी माणसे आतमध्ये भरली आहेत त्याचे काय करायचे? मग जुन्याच मतदार यादीवर निवडणुका घ्यायच्या आणि यश पदरात पाडून घ्यायचे असा यांचा डाव आहे. याला काय निवडणुका म्हणतात? याने लोकशाही टिकेल का? पैठणच्या आमदाराचा मुलगा सांगतो की, मी 20 हजार मतदार बाहेरून आणली. यांची हिंमत बघा. सत्तेचा माज बघा, असे राज ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, नवी मुंबईच्या आयुक्तांच्या बंगल्यावर मतदार नोंदवले गेलेत. कुणीतरी सुलभ शौचालयात नोंदवला गेला. कुठेही बसलेला दिसला की नोंदवायचा का? ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट देशभर सुरू आहे. मी 2017 पासून ओरडून सांगतो की यात (ईव्हीएम) गडबड आहे. गोंधळ आहे. अहो, 232 आमदार निवडून आल्यानंतर महाराष्ट्रात ‘मातम’ असेल, सन्नाटा असेल, काहीच नसेल, मतदार गोंधळलेले असतील, सर्वांना आश्चर्य वाटत असेल तर हा गोंधळच आहे. निवडून आलेले लोक स्वतःचा चिमटा काढून पाहत होते. मी निवडून आलो, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता.
कारण, निवडून येण्याची सोय अगोदरच झाली होती. त्यामुळे त्याला मी निवडून येणार हे माहिती नव्हते. ही सगळी कारस्थाने, या सर्व गोष्टी निवडणूक आयोगाच्या मार्फत सुरू आहेत. कशा निवडणुका लढवायच्या? मला जरा सांगा. मतदार उन्हातान्हात रांगेत उभा राहून मतदान करणाऱ्या मतदारांच्या मतांचा हा अपमान नाही का? मतदारांनी मतदान करायचे, पण मॅच अगोदरच फिक्स आहे. मग त्याच्या मताला काय किंमत आहे?
मी एकच गोष्ट सांगेन की, जेव्हा केव्हा निवडणुका होतील, तेव्हा तुम्ही घरोघरी जा. मतदार याद्यांवर जोरदार काम करा. प्रत्येक मतदाराची ओळख पटवा. त्यानंतर मतदानाच्या ठिकाणी बसून मतदान करणारा तोच मतदार आहे का यावर लक्ष द्या. त्यात हे दुबार, तिबारवाले तिकडे आले तर त्यांना तिथेच फोडून काढा. बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या ताब्यात द्यायचे. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत. त्याशिवाय या महाराष्ट्रात सुरू असलेला कारभार वठणीवर येणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी भाजपाचे आंदोलन
गिरगाव चौपाटी-आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पराभवाच्या भीतीपोटी लोकसभेसारखाच पुन्हा फेक नरिटिव्ह पसरवण्याचा कट आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केला. हा कट उधळून लावण्यासाठी भाजपाच्या बूथ स्तरापासूनच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने पेटून उठायला हवे असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा खोटा प्रचार आणि भ्रम निर्माण करण्याचे डाव हाणून पाडण्यासाठी,मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी शनिवारी गिरगाव चौपाटी येथे करण्यात आलेल्या मूक आंदोलनावेळी श्री. चव्हाण बोलत होते. भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम, कौशल्य विकास आणि उद्योजकता व पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ, आ. योगेश सागर, आ. विद्या ठाकूर, आ. संजय उपाध्याय यांच्यासह अनेक आमदार, युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी या मूक आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी महायुती सरकार झोकून काम करत असताना महाविकास आघाडी राज्यात अराजक माजवून पिछाडीवर नेण्याचा प्रयत्न करत आहे. परदेशी शक्ती आणि फंडिंगच्या मदतीने पोसणा-या सामाजिक संस्थांना हाताशी घेऊन विकास रोखण्याचे आणि दिशाभूल करून अस्थिरता निर्माण करण्याचे काम ही मंडळी करत आहेत. या आंदोलन करणा-यांमध्ये एखादा सचिन वाझे देखील असू शकतो, असा सावधानतेचा इशारा देत जनतेने डोळसपणे यांचा कुटिल उद्देश, डाव समजावा असे आवाहन त्यांनी केले. ठाकरे बंधूंवर निशाणा साधत श्री. चव्हाण म्हणाले की हे बंधू वक्त्तृत्वशैलीच्या बळावर जनतेला महाराष्ट्राच्या अस्मितेवरून भावनिक आवाहनांमध्ये अडकवून त्यांची दिशाभूल करत आले आहेत. महाराष्ट्राला सर्वात वाईट दिवस ठाकरे बंधूंनी दाखवले. राज्यात महायुती सरकारच्या काळात राज्याला पुढे नेण्यासाठी होत असलेले प्रकल्प, योजना याकडे डोळे उघडे ठेवून पहा असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले. प्रत्येक गरीबाला हक्काचे घर मिळायला हवे हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून साकार होत आहे. श्री. फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महाराष्ट्राची वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल होत आहे असेही श्री. चव्हाण म्हणाले . मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम यावेळी म्हणाले की मतदार आपल्याला का नाकारत आहेत याचे आत्मपरिक्षण करण्याऐवजी मविआ नेत्यांनी मोर्चाच्या माध्यमातून असत्याचा तमाशा लावला आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील मतदारांनी मविआला घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया काय द्यायची याची पूर्वतयारी म्हणजे हा मोर्चा आहे अशी खिल्ली श्री. साटम यांनी उडवली. समाजात तेढ निर्माण करण्याचे गलिच्छ राजकारण आघाडीकडून खेळले जात आहे. मतदारांचा अवमान करत मविआ रडीचा डाव खेळत आहे, असेही ते म्हणाले. कौशल्य विकास, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी हे मूक आंदोलन आहे. विरोधक निवडणूक जिंकले की लोकशाही शाबूत असते मात्र ते हरले की ईव्हीएमवर आरोप करत रान उठवतात. यापुढे विरोधकांची नौटंकी चालणार नाही. लोकांना सत्य सांगण्यासाठी, त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी हे आंदोलन आहे. ‘मविआ’ चा हा मोर्चा म्हणजे अस्तित्व दाखवण्याचा शेवटचा प्रयत्न आहे. सत्तेपासून दूर झालेल्या पक्षांचा राजकीय अंत नजिक आला आहे. जनता महायुती सरकारसोबत ठामपणे उभी आहे, असेही श्री. लोढा म्हणाले.
मुंबई, दि. ०१ नोव्हेंबर २०२५: महावितरणमध्ये विद्युत सहायक पदासाठी नियमानुसार ५० टक्के मर्यादेत १८४७ उमेदवारांची प्रतीक्षा यादी www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवारी (दि. ३१) जाहीर करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व प्रमाणपत्रांची पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या परिमंडल कार्यालयांमध्ये दि. ६ व ७ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे.
महावितरणने जाहिरात क्र. ०६/२०२३ अन्वये ५ हजार ३८१ विद्युत सहायक पदासाठी दि. २० ते २२ मे दरम्यान ऑनलाइन क्षमता चाचणी घेतली होती. त्यानंतर उमेदवारांची निवड यादी व त्यांना वर्ग केलेल्या परिमंडलांची यादी जाहीर करण्यात आली. या सर्व उमेदवारांच्या ऑनलाइन अर्जामधील नोंदी, अर्हता, कागदपत्रे व प्रमाणपत्रांची छाननी व पडताळणी संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये दि. २० ते २२ ऑगस्ट व दि. ९ व १० सप्टेंबर दरम्यान पाच दिवसांत करण्यात आली.
निवड यादीतील उमेदवारांच्या प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणनिहाय अपात्रता, गैरहजर व इतर कारणांचा विचार करून कंपनी नियमानुसार जाहिरात केलेल्या पदाच्या ५० टक्के मर्यादेपर्यंत दि. ३१ ऑक्टोबरला प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. तथापि दिव्यांग प्रवर्गाची निवड प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत ‘परिस्थिती जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दि. १०/९/२०२५ ला दिव्यांग कल्याण आयुक्त यांनी दिला आहे. त्यानुसार या प्रतीक्षा यादीमध्ये दिव्यांग प्रवर्ग वगळण्यात आला आहे.
विद्युत सहायक पदाच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या ऑनलाइन अर्जामधील नोंदी, अर्हता, कागदपत्रे व प्रमाणपत्रांची छाननी व पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये येत्या दि. ६ व ७ नोव्हेंबरला होणार आहे. या दोन्ही दिवशी संबंधित परिमंडलांमध्ये सकाळी १० वाजता मूळ कागदपत्रांची पडताळणी सुरू होईल. नमूद दिवशी काही कारणास्तव पडताळणी पूर्ण झाली नाहीतर दुसऱ्या दिवशी करण्यात येईल. तथापि, सर्व मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांसह संबंधित उमेदवारांनी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे.
जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहणार नाही त्यांची निवड रद्द समजली जाईल व भविष्यात त्यांच्याशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रांच्या छाननी व पडताळणीमध्ये जे उमेदवार पात्र होतील त्यांच्या नियुक्तीबाबत संबंधित परिमंडलांमध्ये पुढील कार्यवाही करण्यात येईल. याबाबतची संपूर्ण माहिती व प्रतीक्षा यादी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील कासीबुग्गा व्यंकटेश्वर मंदिरात शनिवारी एकादशीनिमित्त झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. सुरुवातीच्या अहवालानुसार गर्दीमुळे रेलिंग कोसळल्याचे दिसून आले आहे. जखमी भाविकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांना आहे.आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री अनिता म्हणाल्या की, दर आठवड्याला अंदाजे १,५०० ते २,००० भाविक मंदिरात येतात. आज एकादशी ही भाविकांच्या मोठ्या संख्येचे एक महत्त्वाचे कारण होती. त्यांनी स्पष्ट केले की मंदिर पहिल्या मजल्यावर आहे आणि त्यावर जाण्यासाठी २० पायऱ्या आहेत. यादरम्यान धक्का-बुक्की झाली आणि रेलिंग तुटली, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली.
VIDEO | Andhra Pradesh: Stampede reported at Venkateswara Temple in Kashibugga in Srikakulam district; several devotees injured, rushed to hospital. More details are awaited.
मुंबई-आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केलेला महाराष्ट्र केसरी ,कोल्हापूरचा प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेखला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्रातील क्रीडाक्षेत्र आणि कुस्तीप्रेमींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पंजाब पोलिसांच्या सीआयए पथकाने चालवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान शस्त्र पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, या टोळीतील चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यापैकी एक म्हणून सिकंदर शेखचं नाव समोर आलं आहे.या घटनेवर सिकंदरचे वडील, ज्येष्ठ पैलवान रशीद शेख यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. माझ्या मुलाने स्वतःच्या कष्टाने नाव कमावलं आहे. कोणी तरी फसवून त्याला या प्रकरणात ओढलं आहे. मी आयुष्यभर हमाली करून कमावतो आहोत, माझ्या कुटुंबाने कधीही हरामच्या पैशाला हात लावला नाही. मग माझा मुलगा तसा मार्ग का धरावा? असा सवाल त्यांनी केला. रशीद शेख पुढे म्हणाले की, सिकंदरला देशभरातून मान-सन्मान मिळाला, त्याला गाड्या, घरं, सैन्यातील नोकरीसारख्या अनेक ऑफर्स आल्या. त्याला अवैध कृत्य करण्याची गरजच नव्हती. तो हिंद केसरी स्पर्धेसाठी तयारी करत होता. कदाचित त्याला स्पर्धेतून दूर ठेवण्यासाठी हा काही डाव असावा का, हेच आता कळत नाही.
सिकंदरच्या अटकेनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये आणि गंगावेश तालीममधील सहकारी कुस्तीपटूंमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. अनेकांना विश्वास बसत नाही की मेहनती आणि शिस्तप्रिय पैलवान असा आरोपी ठरू शकतो. तालीममधील प्रशिक्षक आणि माजी खेळाडूंनी पोलिसांकडे सखोल आणि निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे. सिकंदर शेख हा कुस्तीच्या माध्यमातून गावागावातून तरुणांना प्रेरणा देणारा खेळाडू आहे. त्याने कधीच चुकीचा मार्ग धरला नाही. जर त्याच्यावर अन्याय होत असेल, तर सत्य लवकरात लवकर बाहेर आलं पाहिजे, अशी मागणी स्थानिक क्रीडा संघटनांकडून करण्यात आली आहे.
पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पपला गुर्जर गँगला अवैध शस्त्रं पुरवणाऱ्या रॅकेटचा तपास करत असताना सिकंदर शेखच्या संपर्कात काही आरोपी आले होते. प्राथमिक चौकशीत पोलिसांना त्याच्याविरोधात काही ठोस पुरावे मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी आरोपींकडून 5 पिस्तुलं, काही काडतुसे, 1 लाख 99 हजार रुपये रोख रक्कम आणि स्कॉर्पिओ-एन तसेच एक्सयूव्ही या दोन गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी खरड पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांनी कोल्हापूरला जाऊन गंगावेश तालीम येथून सिकंदर शेखला अटक केली. एकेकाळी राष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल करणाऱ्या या पैलवानावर अचानक आलेल्या या आरोपांमुळे क्रीडा क्षेत्रात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई-खासदार संजय राऊत यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त समोर आले आहे. संजय राऊत यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. संजय राऊत यांच्या तब्येतीत गंभीर बिघाड झाल्याने 2 महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत याची माहिती दिल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी एका पोस्टद्वारे कामना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी कामना केली आहे. यावर संजय राऊत यांनी देखील उत्तर देत म्हटले, आदरणीय प्रधानमंत्री जी धन्यवाद! माझे कुटुंब आपले आभारी आहे. जय हिंद! जय महाराष्ट्र! असे राऊतांनी ट्विट केले आहे.
मुलूखमैदानी तोफ खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाला आहे. त्यामुळे त्यांनी 2 महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. पण ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत यांची प्रकृती बिघडल्यामुळे ठाकरे गटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
संजय राऊत दररोज सकाळी पत्रकारांशी संवाद साधतात. पण आज त्यांची पत्रकार परिषद झाली नाही. 15 दिवसांपूर्वीच त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आज त्यांची पत्रकार परिषद झाली नसल्याचे पाहून अनेकांनी त्यांच्या प्रकृतीविषयी शंका उपस्थित केली होती. झालेही तसेच. संजय राऊत यांनी शुक्रवारी दुपारी एका पत्राद्वारे आपल्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याचे स्पष्ट केले. तसेच पुढील किमान 2 महिने आपण सार्वजनीक जीवनापासून दूर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे ठाकरे गट चिंतेत सापडला आहे.
संजय राऊत आपल्या पत्रात म्हणाले की, सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यासाठी नम्र विनंती. आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीवाद असेच राहू द्या. उल्लेखनीय बाब म्हणजे 2020 मध्ये संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या हृदयात 2 स्टेन टाकण्यात आले होते. तत्पूर्वी, त्यांच्या हृदयात 2 ब्लॉकेज आढळले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनी अँजिओप्लास्टी केली होती. तेव्हापासून ते डॉक्टरांच्या सल्लानुसार सातत्याने तपासणी करत आहेत. या स्थितीतही ते आपल्या पक्षाची भूमिका ठामपणे जनतेपुढे मांडतात. या प्रकरणी मध्यंतरी त्यांच्यावर तुरुंगात जाण्याचीही वेळ आली. पण ते मागे हटले नाही. उलट त्यांच्या टीकेची धार अधिकच वाढली. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनामागेही संजय राऊतच असल्याची चर्चा आहे.
संजय राऊत हे शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून संजय राऊत ठाकरे गटाची बाजू अत्यंत दमदारपणे मांडत आहेत. ठाकरे गटाचा अजेंडा प्रभावीपणे मांडून सत्ताधाऱ्यांना पळताभूई थोडी करण्याचे काम ते नित्यनियमाने करत असतात.
आज सकाळीच पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज ठाकरे यांची काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा असल्याचे सांगून एक नवा बॉम्बगोळा फोडला. यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडतील हा मुद्दा निकाली निघाला आहे. त्यामुळे आगामी दिवसांत राज ठाकरे महाविकास आघाडीत आल्यास कुणालाही आश्चर्य वाटणार नाही.
पुणे-सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती अनुषंगाने पोलीस आयुक्त यांचे वतीने पोलीस मुख्यालय येथे काल सकाळी ०६/३० वा. राष्ट्रीय एकता दौड म्हणजे ५ कि.मी. पायी चालण्याचे (Walk) वॉक/रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले होते.यास उत्तुंग प्रतिसाद मिळाला . या कार्यक्रमा दरम्यान प्रथम पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व अधिकारी व अंमलदार तसेच महाविदयालयीन मुले/गुली व नागरिक यांनी देशाची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची तसेच देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चीत करण्याकरीता स्वतःचे योगदान देण्याचा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत असल्याची शपथ पोलीस आयुक्त यांचे समवेत घेतली.
कार्यक्रमाची सुरुवात पोलीस मुख्यालय शिवाजीनगर, परेड ग्राऊंड येथुन करुन मॉडर्न कॉलेज जंगली महाराज रोड बालगंधर्व चौक डेक्कन जिमखाना नंतर एफ.सी. रोड मुख्यालय मेन गेट मधुन पोलीस मुख्यालय परेड ग्राऊंड येथे पूर्ण करण्यात आली. या वेळी पोलीस बॅण्डच्या वतीने देशभक्तीपर गीतांचे व झुंबा डान्स सादरीकरण देखील करण्यात आले. तसेच पुणे शहरातील अलका टॉकीज चौक, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर, सारसबाग, संभाजी उदयान या ठिकाणी देखील पोलीस बॅण्डच्या वतीने देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले.. १५० पोलीस अधिकारी, ६१६ पोलीस अंमलदार, ५७० विदयार्थी, १५० नागरिक, ५० लहान मुले असे एकूण १५३६ जण सहभागी झाले होते. सहभागी होणा-यांचे १२ वर्षाखालील सर्व, १२ ते ६० वर्षापर्यंत पुरुष, १२ ते ६० वर्षापर्यत महिला व ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरीक असे चार गट तयार करण्यात आले होते. तसेच पुणे पोलीस आयुक्तालयातील झोन ०२ मध्ये एकुण २१४० व झोन ०३ मध्ये १३०० लोकांचा सहभाग होता. वॉक फॉर युनिटीचे आयोजनामध्ये फोटोग्राफर, व्हिडीओ शुटींग, वैद्यकीय अधिकारी, अॅम्ब्युलन्स व्यवस्था, निर्जलीकरण औषध साठा, सीपीआर तज्ञ इत्यादी व्यवस्था करण्यात आली होती. या रन/वॉक फॉर युनिटी कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले विदयार्थी, नागरिक व पोलीस यांचे हातामध्ये १) एकतेचा जयघोष, भारताचा नवा जोश २) हातात हात, मनात एकसात ३) एकतेचा रंग, देशात उमंग ४) चला मिळून चालू या, भारताला उभ करु या ५) भेद नको रे भावा, एकतेचा लाव दिवा ६) एकतेचा ध्यास, भारताचा विकास ७) सर्व धर्म सर्व जाती, एकतेतच खरी शक्ती ८) Walk together, stronger forever 9) One goal,one soul-Unity makes whole 10) Miles we go, for unity to grow 11) Together we stand, hand in hand 12) Join the race, for unite place असे घोषवाक्य असलेले फलक देण्यात येऊन ते प्रदर्शित करण्यात आले होते.
राष्ट्रीय एकता दौड निमित्त वॉक फॉर युनिटी कार्यक्रम हा पुणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात देखील स्थानिक पातळीवर आयोजित करण्यात आला होता. पोलीस स्टेशनच्या परिसरात पायी रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त मुख्यालय श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उप-आयुक्त, वाहतुक. हिंमत जाधव, पोलीस उप-आयुक्त, विशेष शाखा संदीप भाजीभाकरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे निखील पिंगळे, पोलीस उप-आयुक्त, आर्थिक गुन्हे, विवेक मासाळ, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ १, ऋषीकेश रावळे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २, मिलींद मोहिते, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, संभाजी कदम, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५राजकुमार शिदे तसेच सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उप-निरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि पोलीस नियंत्रण कक्ष, वायरलेस, एमटी सेक्शन, विशेष शाखा, गुन्हे शाखा, क्यूआरटी सायबर पो.स्टे. व मुख्यालयाकडील सर्व विभागांचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.
पुणे : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (एमओए) रविवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आमनेसामने येणार आहेत. मात्र, शुक्रवारी रात्री मोठी घडामोड घडली. दोन्ही गटातील उच्च पदस्थांची बैठक होऊन यात अजित पवार आणि मोहोळ प्रत्येकी दोन वर्षांसाठी हे पद वाटून घ्यावे असा प्रस्ताव सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिल्याचे वृत्त आहे.
राज्यातील युतीच्या सत्तेत भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे भागीदार आहेत. मात्र, कोणीही माघार घेतली नसल्याने या ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली आहे.यानंतर रात्रीतून घडामोडी घडल्या. आता अध्यक्षपदाबाबतचा निर्णय आज, शनिवारी होण्याची शक्यता आहे. मोहोळ याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यासाठी ते मुंबईला रवाना झाल्याचे कळले. कदाचित अजित पवार आणि मोहोळ प्रत्येकी दोन वर्षांसाठी हे पद वाटून घेतील असे सांगण्यात येते .दरम्यान, धर्मादाय आयुक्तांनी २०१७ ते २०२१ आणि २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी सादर करण्यात आलेला बदल अहवाल फेटाळला आहे. यानंतरही ही निवडणूक घेतली जात आहे. त्यानंतर नेमके काय होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.खरं तर, याआधी ‘भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या घटनेनुसार आणि नव्या स्पोर्ट्स कोडनुसार तीन टर्म अध्यक्षपद भूषवल्यानंतर चौथ्यांदा अध्यक्ष होता येत नाही, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या नियमानुसार हे कृत्य बेकायदा ठरण्याची शक्यता आहे, असं मत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आणि भारतीय जनता पक्ष क्रीडा आघाडीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी मांडलं होतं. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांचा मार्ग सुकर मानला जात होता.‘एमओए’चे विद्यमान सचिव नामदेव शिरगावकर यांच्यावर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आर्थिक अपहार केल्याचा आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना या प्रकरणात शुक्रवारी जामीन मंजूर झाला. शिरगावकर यांच्यामुळे प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप, त्यांच्याच गटातील काहींनी केला आहे.
पुणे :-शहरातील रस्ते खोदाई आणि खड्डे याबाबत येणाऱ्या तक्रारींची दखल घेत महापालिकेने ३ नोव्हेंबरपासून खड्डेमुक्त रस्ते विशेष अभियान राबविणाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचा पथ विभाग आणि १५ क्षेत्रिय कार्यालयांची मिळून १५ टीम्सद्वारे हे काम करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी येथे दिली.ते म्हणाले,’ सोमवार अर्थात ३ नोव्हेंबरपासून शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी पथ विभाग आणि पंधरा क्षेत्रिय कार्यालयांच्या मिळून १५ टीम्स तयार करण्यात येणार आहेत. खड्डेमुक्त रस्ते अभियानासाठी रस्त्यांचे काम करणार्या ठेकेदारांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. महिन्याभरात विशेष मोहीम राबवून सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी आमचे प्रयत्न राहातील.
शहरात मेट्रोचे काम, गृह विभाग आणि महापालिकेच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनासाठी सुरू असलेल्या फायबर केबल टाकण्यासाठीच्या खोदाईमुळे आणि पावसाळ्यामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले असून वाहतुकीचा वेग मंदावून कोंडीतही भर पडत आहे. पावसाळा संपत आल्याने तसेच शहरात जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा होणार असल्याने त्यापुर्वीच महापालिका प्रशासनाने शहरातील सर्वच रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पावले उचलली आहेत.
महापालिकेकडून शहरात विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी शासकीय, निमशासकीय व खासगी संस्थांना सशुल्क परवानगी दिली जाते. पथ विभागाकडून १ ऑक्टोबर ते ३१ एप्रिलपर्यंत खोदाईला परवानगी दिली जाते. त्यानंतर एक मे ला खोदाई बंद करून ३१ मे पर्यंत रस्ते दुरुस्त करणे बंधनकारक असते. तसेच पथ विभागाकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्ते दुरुस्ती केले जातात. मात्र, खोदाईनंतर दुरुस्तीची कामे योग्य प्रकारे केली जात नाहीत, त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. पावसाचे पाणी आणि खड्डे यामुळे वाहतुक मंदावते.
महापालिकेच्या विविध प्रकल्पांना, कामांना भेट देण्यासह आयुक्त नवल किशोर राम यांनी नागरी प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे. पाहणी दौऱ्याच्या दरम्यान त्यांना शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे व अशास्त्रीय दुरुस्तीमुळे मोठी समस्या निर्माण झाल्याचे लक्षात आले. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी शहरात खड्डे मुक्त रस्ते करण्यासाठी विशेष अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. हे अभियान ३ नोव्हेंबरपासून सुरू केले जाणार आहे. यासाठी १५ पथके तयार करण्यात येणार आहे. या पथकांना प्रत्येकी १० – १० किलो मीटरची जबाबदारी दिली जाणार आहे. यासाठी ७ ठेकेदारांना काम दिले जाणार आहे. या कामात ठेकेदारांना एक रुपये सुध्दा फायदा होणार नाही, असेही आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.