Home Blog Page 656

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता आणि सुरक्षिततेसाठी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची तांबडी जोगेश्वरी देवीला प्रार्थना

पुणे दि.९: दिवसेंदिवस पुणे शहराची लोकसंख्या वाढत असून त्याचा वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत आहे, यामुळे पुणेकरांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यातून पुणेकरांची मुक्तता होऊन पुणे सुरक्षित होऊ देत अशी प्रार्थना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील ग्रामदैवत श्री तांबडी जोगेश्वरी देवीकडे केली.

नवरात्रीच्या निमित्ताने डॉ. गोऱ्हे यांनी श्री तांबडी जोगेश्वरी देवी दर्शन घेऊन देवीची विधिवत पूजा करत देवीला महावस्त्र, गुळाचा नैवेद्य, पुष्पहार अर्पण केला.

यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीचे राजू कुंभार, ज्ञानेश्वर बेंद्रे, पल्लवी बेंद्रे, आनंद गोयल, शिवसेना महिला आघाडीच्या सुदर्शना त्रिगुणाईत यांसह मोठ्या संख्येने महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.

कोथरूडमध्ये महा कन्यापूजन कार्यक्रमाचे आयोजन

पाच हजार पेक्षा जास्त मुलींचे होणार पूजन

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

पुणे-नवरात्रोत्सव काळात कन्यापूजनाचे वेगळे महत्त्व असून, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुड मध्ये महा कन्या पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या अद्भूत सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात नामदार पाटील यांनी केले आहे.

धार्मिक श्रद्धांनुसार,नवरात्रोत्सव काळातील नवमी तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दुर्गा देवीच्या नऊ रूपांची मुलींच्या रूपात पूजा केली जाते. या उपासनेने दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि भक्तांच्या जीवनात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. यासोबतच कन्यापूजना शिवाय नवरात्रीची उपासना यशस्वी होऊ शकत नाही, अशी देखील धारणा आहे.

त्यामुळे नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आणि उत्सवाच्या निमित्ताने उपासनेचे फळ सर्वांना लाभावे यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुड मध्ये महा कन्यापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील हे देखील सात मुलींचे पूजन करणार आहेत. मंत्रोच्चाराच्या घोषात, आध्यात्मिक वातावरणात दिनांक ११ ऑक्टोबर रोजी कोथरुड मधील शुभारंभ लॉन्स येथे सायंकाळी ४.३० ते ७ वेळेत हा नयनरम्य सोहळा संपन्न होणार आहे.

शक्ती, बुद्धी आणि धनधान्य देणार्‍या मातांची रूपे वेगवेगळी आहेत. लहान मुलींमध्ये ही रूपे दिसतात. कन्या हे देवीचे स्वरूप असते. तिच्या जन्माने प्रत्येक कुटुंबात सुख, समृद्धी आणि भरभराट होते. नवरात्रोत्सव काळात तिची पूजा म्हणजे साक्षात, आदिमायेची पूजा करणे आहे. मागील पाच वर्षांत कोथरुड मधील मुलींचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून हजारो मुलींचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यासोबतच मानसी सारख्या उपक्रमातून वस्ती भागातील मुलींच्या व्यक्तीमत्व विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कोथरूड मध्ये आयोजित महा कन्यापूजन सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले.

पुण्यात क्लिनिक चालविणारा तोतया डॉक्टर महापालिकेने पकडला..आरोग्य खाते जागे होत आहे.. ?

पुणे-धनसिंग चौधरी नामक तोतया डॉक्टरला पकडल्यानंतर कोर्टातून त्याची सहीसलामत सुटका व्हावी यासाठी प्रयत्न करणारे अधिकारी असलेल्या महापालिकेतील आरोग्य खात्याला जणू आता जाग येत असावी असे वाटेल अशी घटना घडली आहे.महापालिकेच्या आरोग्य खात्याने बऱ्याच वर्षानंतर चांगली कारवाई केली आहे.आणि एका तोतया डॉक्टरला पकडून पोलिसांच्या हवाली केला आहे. मात्र अजून त्याला पोलिसांनी अटक केलेली नाही.

कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी जवळ नसताना क्लिनिक उघडून बेकायदा उपचार केंद्र चालविणाऱ्या तोतया डाॅक्टरविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.बिभुती विमल बागची (वय ४३, रा. गोकुळनगर, वारजे,पुणे ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी डाॅ. अरुणा तरडे (वय ४५) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी बागचीविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बागचीने वारजे भागातील

आनंद हाॅस्पिटल परिसरात बेकायदेशीर मूळव्याध उपचार केंद्र सुरु केले होते. वैद्यकीय पदवी, तसेच व्यवसायास परवानगी नसताना त्याने बेकायदा उपचार केंद्र सुरु केले हाेते. याबाबतची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाल्यानंतर त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली. बागचीविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. पोलीस हवालदार एस भिंगारदिवे पुढील तपास करत आहेत.

रा.स्व. संघ – माणूस घडवणारी संघटना दिवाळी अंकासाठी ब्रीद वाक्य घेऊन केली रचना – मिलिंद शेटे

पुणे-“सांस्कृतिक वार्तापत्र दिवाळी अंक म्हणजे संघ शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिलेली मानवंदना होय” असे उदगार सांस्कृतिक वार्तापत्र चे संपादक मिलिंद शेटे यांनी काढले.”सांस्कृतिक वार्तापत्र “च्या कार्यालयात दिवाळी अंकाच्या प्रकाशन प्रसंगी मिलिंद शेटे बोलत होते.ह्या अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे रा.स्व.संघ माणूस घडवणारी संघटना हे ब्रीदवाक्य घेऊन अंकाची रचना तीन भागामध्ये केली गेली.राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सरसंघचालक हे सर्वोच्च पद आहे.संघाच्या पाच सरसंघचालकांच्या जीवनाचा मागोवा ह्या अंकातील पहिल्या भागात घेतला आहे.त्यांचा व्यवहार सर्वसामान्यांशी किती आत्मियतेचा होता.तसेच ते आपल्या साध्या राहणीतून आणि निर्मळ वागण्यातून कसे जगायचे याचे शिक्षण अतिशय सहजपणे देत असत.हे यातून वाचायला मिळते.दुसऱ्या भागात नव्वद ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या संघकार्याच्या आठवणीचे संकलन प्रकाशित केले आहे.शेवटच्या भागात प्रचारक ही कॉन्सेप्ट कशी असते, चालता बोलता संघ म्हणजे संघ प्रचारक तसेच संघात गायिली जाणारे पद्य,संघ – गीते,संघकार्य वाढीमध्ये वहिनींचे योगदान,आणीबाणीत संघाचे योगदान ह्या विषयावर प्रकाश टाकलाआहे.सेवा कार्य, धर्म जागरण,सामजिक समरसता इ विषयावर तज्ञ व अनुभवी अभ्यासकांचे महत्त्वपूर्ण लेख आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय आहे हे सांगण्यासाठी समाजामध्ये चालतांना,बोलतांना ह्या अंकाचा सर्वांना उपयोग व्हावा, ह्यासाठी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रकाशनप्रसंगी ज्येष्ठ प्रचारक व सांस्कृतिक वार्तापत्र चे सल्लागार शशिकांत उर्फ भाऊराव क्षीरसागर,संपादक मिलिंद शेटे,ज्येष्ठ स्वयंसेवक सतीश आठवले,बापूराव कुलकर्णी,व्यवस्थापिका सुनिता पेंढारकर,सहसंपादिका मेघना घांग्रेकर यांची मुख्य उपस्थिती होती.
यावेळी उल्हास सावळेकर,प्रकाश देशपांडे,कुलदीप धुमाळे,विवेक बाकरे,अरुण तुळजापूरकर,सुरेश गोरे उपस्थित होते.
“महाराष्ट्र व गोव्यातील सर्व खेद्यापड्यापर्यंत जाणारे हे एकमेव पाक्षिक असून दरवर्षी २० नियमित अंक व दोन विशेषांक प्रसिद्ध करणाऱ्या सांस्कृतिक वार्तापत्राचे २६ हजार वर्गणीदार,२२ हजार ग्रामपंचायती,दोन हजार वाचनालये,तीन हजार नियतकालिके,सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी मिळून असे ५३ हजार अंकाचे नियमित वितरण होते.चार लक्ष वाचक सांस्कृतिक वार्तापत्र नियमित वाचतात” अशी माहिती व्यवस्थापिका सूनिता पेंढारकर यांनी यावेळी दिली.

१० फुटी अजगर आढळल्याने खळबळ

घरा जवळ आढळला १० फुटी अजगर, वन्यजीव रक्षक मावळ संस्थे कडून जीवदान

शिरगाव: दिनांक ०८/१०/२०२४-
शिरगाव येथील वस्ती मध्ये १० फुटी अजगर काल रात्री आढळला आणि येथे एकच खळबळ उडाली . कोणता ही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास जवळ पास च्या प्राणीमित्र ला किंवा वनविभागला संपर्क (१९२६) करावा या सुचनेसह साप दिसल्यास सूरज भोसले यांनी माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे सभासद संतोष गोपाळे यांननी दिली होती . अजगर लोक वस्ती च्या जवळ असल्या मुळे संतोष गोपाळे तिथे तातडीने गेले . तिथे त्यांनी तातडीने अजगराला सुरक्षित रेस्क्यु केले. जिगर सोलंकी, निनाद काकडे, सर्जश पाटील यांनी अजगराची तपासणी केली आणि अजगर स्वस्थ असल्याची माहिती वनविभाग वडगाव वनपाल एम . हिरेमठ यांना दिली. अजगरा बद्द्ल माहिती तिथे स्थानीक लोकांना दिली, आणि स्थानिकांनी सांगितले की ते कोणते ही साप मारणार नाही आणि घरा जवळ साप किंवा कोणता वन्यप्राणी आढळल्यास वनविभाग किंवा वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांना ऋषिकेश मुऱ्हे, प्रज्वल गोपाळे, आदित्य मुऱ्हे, रोहन मुऱ्हे,विराज गराडे सगळे ग्रामस्थनी मिळून आश्वासन दिले आणि रेस्क्यु कार्याला मदत केली म्हणून आभार ही मानले.

इंडियन रॉक पायथन (भारतीय अजगर) हा एक बिनविषारी जाती चा साप आहे. हा साप १५-१७ फुटा पर्यंत वाढू शकतो. मावळात आता पर्यंत १५ फुटचा अजगर आढळून आला आहे. वनविभाग आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थे च्या मदतीने या सापांना सुरक्षित रीतीत जंगलात सोडण्यात आले आहेत. अजगर सापचे खाद्य छोटे भेकर, ससे, घुस व इतर प्राणी खातो.
कोणता ही वन्य प्राणी जखमी आढळल्यास त्वरित वनविभाग किंवा जवळच्या प्राणीमित्र ल कळवा.

  • रौनक खरे, प्राणी अभ्यासक, वन्यजीव रक्षक मावळ संस्था

मी शरद पवारांना विचारून राजकीय भूमिका घेतली:सुप्रिया सुळेंच्याविरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूकच – अजित पवार

बारामती-मला राजकीय भूमिका घ्यावी लागली ती साहेबांना विचारून घेतली. ते सुरुवातीला हो म्हणाले परत म्हणाले की ही, भूमिका मला घेता येणार नाही. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, मला कोणालाही दुखवायचं नव्हते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, सुप्रिया सुळे यांच्याविरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक मी आधी मान्य केली होती आणि आताही मान्य करतो. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत आम्ही राजकारणात पुढे आलो, हे सगळे होत असताना परिवार म्हणून एक असल्याने त्रास झाला नाही पण आता दोन वेगळे पक्ष झाले. बारामतीमधील भाषणात त्यांनी हे विधान केले आहे.

अजित पवार म्हणाले की, मी मधल्या काळात पक्क ठरवले होते की बास झाले आता… पण कधी ना कधी थांबावे लागते, पण लोकांच्या रेट्यापुढं काही गोष्टी कराव्या लागतात. आजपर्यंतचा तुम्हाला अनुभव त्यासंदर्भात मी पुन्हा विचार करायला लागलो आहे.

दुसरे कुणी नको. तुम्हीच बारामतीतून विधानसभा लढा, असा आग्रह करत अजित पवारांच्या समर्थकांनी मंगळवारी त्यांचाच ताफा बारामतीमध्ये रोखला. जोरदार घोषणाबाजीही केली. त्यानंतर तुमच्या मनातला उमेदवार देतो, असे म्हणत दादांनी स्वत:ची सुटका करून घेतली. लोकसभेतील दारुण पराभवानंतर अजित पवारांनी बारामती विधानसभेमधूनही काढता पाय घेण्याचे संकेत वारंवार दिले आहेत. कारण शरद पवारांनी येथून अजितदादांचा पुतण्या युगेंेद्र पवारला मैदानात उतरवण्याचे निश्चित केले आहे. त्याच्याकडून पराभवाची भीती दादांना वाटत आहे. म्हणूनच त्यांनी ‘मी बारामतीतून तीन वेळा आमदार होतो, खासदारही होतो, अशा वेळेला दुसऱ्याला संधी द्यायला हवी. मी जो उमेदवार देईन त्याला तुम्ही निवडून द्यायचं’, असे दोन आठवड्यांपूर्वी म्हटले होते.

त्यावर गेले काही दिवस समर्थकांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र, मंगळवारी दुपारी या समर्थकांनी अजित पवारांचा ताफा रोखला. ‘एकच वादा, अजितदादा’ अशी घोषणाबाजी केली. आजच्या आज बारामतीचा उमेदवार जाहीर करा, असे म्हणत समर्थक हट्टाला पेटले होते. बारामतीमधून तुम्हीच लढा. बारामतीमधील आमच्या मनातील उमेदवार तुम्हीच आहात, अशा विनवण्या करत त्यांनी रस्त्यातच ठिय्या मांडला होता. मग अजितदादा गाडीतून बाहेर आले आणि तुमच्या मनातला उमेदवार मी देईन, असे आश्वासन देऊन ते निघून गेले.

कसब्यातून धीरज घाटे यांना उमेदवारी द्या

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे
पुणे शहर भाजपा पदाधिकाऱ्यांची मागणी

मुंबई – भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील शहराध्यक्ष श्री. धीरज घाटे यांना येत्या विधानसभा निवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी पुणे शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. पुणे शहरातील पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मुंबईत श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे ही मागणी करण्यात आली. धीरज घाटे यांना कसब्यातून उमेदवारी दिल्यास गेल्या पोटनिवडणुकीत हातातून निसटलेला आपला पारंपरिक मतदारसंघ भाजपा पुन्हा एकदा खेचून आणू शकतो. त्यामुळे पक्ष नेतृत्त्वाने याचा विचार करावा, असे साकडे यावेळी घालण्यात आले.
गेल्या ३० वर्षांपासून कसबा विधानसभा मतदारसंघात पक्षाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार तळागाळात नेण्यासाठी निष्ठेने काम करणारा पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता ही श्री. धीरज घाटे यांची ओळख आहे. पुण्याच्या राजकीय वर्तुळात हिंदुत्त्ववादाला वाहून घेतलेले आणि हिंदूच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. पुण्यातील गणेशोत्सवात कसबा मतदारसंघातील गणेश मंडळे हेच प्रमुख आकर्षण असते. याच भागामध्ये गणेशोत्सवातून घडलेले आणि गणेश मंडळांना कायम मदत करणारे नेतृत्व म्हणून धीरज घाटे यांची ओळख आहे. साने गुरुजी तरूण मंडळ आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या ३० वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम त्यांच्याकडून राबविले जातात. लोकांची कामे करणारा आणि अडचणीच्या वेळी त्यांच्यासाठी धावून जाणारा ही सुद्धा धीरज घाटे यांची प्रतिमा जनमानसात लोकप्रिय आहे. त्यामुळेच पक्षाने तिकीट वाटपावेळी या सर्व मुद्द्यांचा विचार करून श्री. धीरज घाटे यांना संधी द्यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी शांतपणे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि लवकरच याबाबत पक्षाच्या संसदीय मंडळाकडून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

जीएसबी संयुक्त कोंकणी सभा आयोजित शारदोत्सवाला प्रारंभ

पुणे : जीएसबी संयुक्त कोंकणी सभेतर्फे पुण्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या शारदोत्सवाला मंगळवारी (दि. 8) सायंकाळी मंगलमय आणि भक्तीपूर्ण वातावरण सुरुवात झाली. पुरोहितांनी केलेली दुर्गास्तुती, शंखनाद, मंगलवाद्यांचा गजर अन्‌‍ समईच्या तेजाळलेल्या ज्योतींच्या साक्षीने भाविकांनी वीणाधारिणी श्री शारदा मातेचे दर्शन घेतले.
शारादोत्सव मजेंटा लॉन्स, डी. पी. रोड, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर येथे दि. 8 ते दि. 12 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. पारंपरिक पोषाख परिधान करून आलेल्या असंख्य बंधू-भगिनींनी शारदा मातेच्या तेज:पुंज रूपाचे भक्तीभावाने दर्शन घेतले.
सुरुवातीस पुण्यातील केशव शंखनाथ पथकाने शंखनाद केला. शंखध्वनीतून गणेशस्तुती, श्रीरामस्तुती सादर केली. के. राघवेंद्र भट, दयानंद भट, गजेंद्र भट आणि विघ्नेश भट यांच्या मंगलाचरणानंतर भाविकांना श्री शारदा मातेचे दिव्य दर्शन घडले. दिव्य दर्शन सोहळ्यानंतर शक्तीने भारित वातावरणात शिवगर्जना ढोल-ताशा पथकाचे दमदार सादरीकरण झाले. भगवे ध्वज फडकावित ‌‘भीमरूपी महारुद्रा‌’, ‌‘जय हनुमान‌’, ‌‘जय श्रीराम‌’ आदींचा घोष ढोल-ताशाच्या वादनातून साकारला. भाविकांनी त्याला उत्स्फूर्त दाद देत ताला-सुरांचा आनंद लुटला.
कर्नाटकातील उत्सवाप्रमाणेच पुण्यात प्रथमच आयोजित शारदोत्सवासाठी वीणाधारिणी देवी सरस्वतीची सुमारे साडेचार फूट उंचीची राजस मूर्ती शाडू मातीपासून साकारण्यात आली आहे. मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शाडू माती कर्नाटकातूनच पुण्यात आणण्यात आली आहे. तसेच कर्नाटकातील कलाकारांनी ही मूर्ती घडविली आहे. श्री शारदा देवीची मूर्ती नेत्रदीपक अलंकारांनी सजविण्यात आली आहे.
जीएसबी संयुक्त कोंकणी सभेचे अध्यक्ष अरुण किणी, उपाध्यक्ष जनार्दन भट, सचिव मंजुनाथ नायक, खजिनदार बिपिन पंडित महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत.

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक:मंत्रालयात संरक्षण जाळीवर तिघांनी घेतल्या उड्या

मुंबई-आदिवासी नेते आमदार नरहरी झिरवळ यांनी आदिवासी आरक्षणाच्या बचावासाठी दोन दिवसांपूर्वी मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या घेत आंदोलन केले होते. आदिवासी आरक्षणाच्या मुद्द्यानंतर आज आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला. आरक्षणासंदर्भात जीआर काढावा तसेच आमचे निवदेन स्वीकारावे, या मागणीसाठी 3 धनगर समाजबांधवांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या घेतल्या.

धनगर आरक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणी उपोषणाला बसलेले आंदोलक आज मंत्रालयात दाखल झाले. धनगर समाजाला आदिवासी समाजाचा दर्जा द्या, या मागणीसाठी हे आंदोलन केले जात आहे. मागणीच्या निवेदनाची कागदपत्रे हातात घेवून या आंदोलकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळ्यांवर उड्या घेतल्या. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढून त्यांना बाहेर काढले.

पोलिसांनी जाळीतून बाहेर काढल्यानंतर आंदोलकांनी मंत्रालयात दुसऱ्या मजल्यावर ठिय्या दिला आहे. यावेळी समाजबांधवांकडून आक्रमकपणे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धनगर आरक्षणाच्या संदर्भात शासन निर्णय काढा, अशी मागणी आंदोलकांनी केली. उपमुख्यमंत्री यांनी आपला शब्द पाळावा, धनगर समाजाला आरक्षण देण्याचा जीआर काढण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र वेळ निघून गेली असून आज आमची बैठक रद्द केली, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट पाहायला मिळाली.

शिंदे सरकारने धनगर आरक्षणाबाबत आम्हाला शब्द दिला होता. त्यासाठी आम्हाला 15 दिवसांचा वेळ दिला होता. ही वेळ निघुन गेली असून सरकारने आपला शब्द पाळला नाही. आज त्यांच्यासोबत आमची शेवटची मीटिंग होती, मात्र त्यांनी ती देखील रद्द केली, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

जे मागून मिळत नाही, ते हिसकावून घेणार. आम्ही कुणाच्याही नेतृत्वात हे आंदोलन करत नाही. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, ही मागणी मागील साठ वर्षांपासूनची आहे. हे आरक्षण तात्काळ लागू झाले पाहिजे. आम्ही आदिवासीतून आरक्षण मागत नाहीत. तर आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत, असेही आंदोलकांनी सांगितले.धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शुक्रवारी यासंबंधी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली होती. त्यांच्यासोबत आमदार हिरामण खोसकर यांनीही उडी मारली होती. या घटनेत झिरवळ यांच्या मानेला दुखापत झाली होती. अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये. याशिवाय आदिवासींची पेसा कायद्यांतर्गत भरती करावी, अशी मागणी झिरवळ यांनी केली होती.

स्वारगेट: प्रवाशांना जबरदस्तीने लुटणारी रिक्षाचालकांची टोळी जेरबंद

पुणे : स्वारगेट येथून प्रवाशांना रिक्षामध्ये घेऊन त्यांना वाटेत लुटणार्‍या रिक्षाचालकांच्या टोळीला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी १०० ते १५० सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यांच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा शोध घेतला.

रोहित सुभाष चव्हाण (वय २३, रा. गंगानगर, भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर) हा रिक्षाचालक व त्याचे साथीदार मयुर ऊर्फ संकेत प्रकाश चव्हाण (वय १९, रा. मंतरवाडी, देवाची ऊरुळी) आणि सुदर्शन शिवाजी कांबळे (वय २२, रा. म्हाडा कॉलनी, वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.

स्वारगेट येथील पीएमपी बसस्टँडपासून फिर्यादी तरुण २७ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता रिक्षात बसला होता. रिक्षा काही अंतरावर गेल्यावर रिक्षाचालकाने फोन करायचा म्हणून त्याच्याकडून मोबाईल घेतला. पर्वती इंडस्ट्रीज जवळील बसस्टॉपजवळून त्याने रिक्षा फिरवून लुल्लानगर परिसरात नेली. फिर्यादीकडील रोख ५०० रुपये तसेच गळ्यातील चांदीची चैन व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला होता. तसेच ४ हजार रुपये ऑनलाईन मागवून घेऊन मोबाईलचा पासवर्ड विचारुन घेऊन जबरदस्तीने त्यांना उतरवुन ते पळून गेले होते.

या गुन्ह्याचा तपास करताना गुन्ह्यात १०० ते १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गुन्हा रात्रीच्या वेळी घडला असल्याने काही एक उपयुक्त माहिती मिळाली नाही. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा शोध घेतला असता आरोपी रोहित चव्हाण हा त्याचे राहते घराचे परिसरात मिळाला. त्याने गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षासह ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने इतर साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांना पोलिसांनी अटक केली. चोरी केलेला माल व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरूध्द १) सिंहगड रोड पोलीस स्टेशन २) बंडगार्डन पोलीस स्टेशन ३) बिबवेवाडी पोलीस स्टेशन ४) भारतीविद्यापीठपो.स्टे. २) स्वारगेट पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनला गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.
सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, श्रीमती नंदिनी वग्यानी यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, यांचे आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, पोलीस अंमलदार मोराळे, तनपुरे, शिंदे, टोणपे, खेदाड, शेख, पवार, घुले, चव्हाण व दुधे यांनी केली.

माजी मंत्री मधुकर पिचडांविरोधात केस दाखल:बोगस आदिवासी दाखले तयार करून सुनेचे 5 कोटी रुपये हडपल्याचा आरोप

पुणे-महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री मधुकरराव पिचड यांनी त्यांच्या द्वितीय पत्नी कमळ मधुकर पिचड या आदिवासी नसताना त्यांचा खोटा व बनावट आदिवासी जातीचा दाखला बनून त्याआधारे आमच्या पक्षकार सून सरोज जितेंद्र पिचड यांची संपत्ती हडप करून फसवणूक केली आहे. त्यांची दुसरी पत्नी कमळ पिचड या हिंदू मराठा असताना मधुकर पिचड यांनी बनावट कागदपत्रे तयार करून घेतली, त्याचवेळी सून सरोज जितेंद्र पिचड यांच्या जबरीने अनेक कागदपत्रांवर सह्या आणि स्वतःच्या ओळखींचा फायदा घेऊन सरकारी रेकॉर्डमध्ये फेरफार करून घेतले. बोगस आदिवासी दाखले तयार करून सुनेचे 5 कोटी रुपये त्यांनी हडप केले, असा आरोप अॅड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत केला.

सरोदे म्हणाले, बनावट आदिवासी दाखल्याच्या आधारे कमळ पिचड यांच्या नावाने जमिनी फेरफर करून घेतल्या. त्या सर्व जमीन मिळकती समृद्धी महामार्गात विक्री करून त्या‌द्वारे शासनाकडून साधारणत: पाच कोटी रुपये घेतले आहेत, हे पाच कोटी रुपये त्यांची सून सरोज पिचड हिला मिळणे आवश्यक होते. तसेच त्याव्यतिरिक्त अन्य शेतकऱ्यांचे देखील मिळकती अशाच प्रकारे बेकायदेशीर बळकावून त्यातून देखील कोट्यवधी रुपये मिळविले आहे. त्याबाबत सहआयुक्त अनुसूचित जाती जमाती तपासणी समितीकडे 2018 सालापासून तक्रारी आहेत. पण सरकारी अधिकारी मधुकर पिचड यांच्या दबवाखाली वागतात.

या सर्वांबाबत सरोज जितेंद्र पिचड यांनी पोलीस निरीक्षक शहापूर यांच्याकडे रीतसर तक्रार देऊन देखील पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याने आम्ही जिल्हा व सत्र न्यायालय कल्याण येथे खासगी तक्रार दाखल केलेली आहे. सदर केस कोर्टाने दखल घेऊन मधुकर पिचड, कमळ पिचड व संबंधितांवर कारवाई का केली जाऊ नये, याबाबतची नोटीस बजावणीचा आदेश दिलेले आहे. सदर प्रकरणाची पुढील तारीख 25 ऑक्टोबर रोजी आहे.अशा प्रकारे कमळ पिचड यांनी आदिवासी नसताना आदिवासी जमिनी बेकायदेशीर बळकवून त्यातून कोट्यवधी रुपयांचा नफा मिळविला आहे त्यास मधुकर पिचड यांचे राजकीय पाठबळ असून ते सध्या सत्ताधारी भाजपमध्ये असल्याने त्यांच्यावर पोलिस कारवाई करत नाही.

मधुकर पिचड व इतरांविरोधात त्यांची सून सरोज पिचड यांनी कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार सुद्धा केस दाखल केलेली आहे, अशी माहिती अॅड. असीम सरोदे यांनी दिली आहे.

भारतीय जनता पार्टीकडून विजयाचा मोठा जल्लोष

पुणे, ८ ऑक्टोबर: हरियाणातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तिसऱ्यांदा सलग विजय मिळवत ऐतिहासिक हॅट्रिक साधली आहे. सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून भाजपने केलेल्या विकासाच्या योजनांमुळे जनतेने पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास ठेवत भाजपला विजय मिळवून दिला होता, आणि आता हरियाणा विधानसभा निवडणुकीतही जनतेचा तोच विश्वास अधोरेखित झाला आहे.

या विजयाचा उत्सव पुण्यातील कसबा मतदारसंघात मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. कसबा विधानसभा निवडणूक प्रमूख हेमंत रासने यांच्या नेतृत्वात मतदारसंघातील वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत विजयाचा जल्लोष केला. या जल्लोषात स्थानिक नागरिकांचा देखील मोठा सहभाग होता.

विजयाच्या आनंदात कार्यकर्त्यांनी नागरिकांना जिलेबी वाटली, आणि हेमंत रासने यांनी स्वतः उपस्थित नागरिकांना जिलेबी भरवून त्यांचे अभिनंदन केले. विजयाच्या या सोहळ्यात मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजयानंतर बोलताना हेमंत रासने म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या विकासाच्या धोरणांमुळे जनतेचा विश्वास कायम राहिला आहे. हरियाणात मिळालेल्या या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीत देखील भाजपच्या महायुतीला असाच मोठा विजय मिळेल, याची मला खात्री आहे.”

या जल्लोषात माजी नगरसेवक राजेश येनपुरे, सरचिटणीस राणी कांबळे,कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, वैशालीताई नाईक, उमेश चव्हाण, चंद्रकांत पोटे, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी, छगन बुलाखे, निलेश कदम, तेजेंद्र कोंढरे, संदीप लडकत, प्रमोद कोंढरे, संदीप इंगळे, अश्विनीताई पवार, भारत जाधव, सनी पवार, अभिजित रजपूत, दिपाली मारटकर, कल्याणी नाईक, रुपाली कदम, सागर शिंदे, गणेश पाचरकर, माधव साळुंखे, संकेत थोपटे, सतीश मोहोळ, आरती तांबे, तुषार रायकर, दिलीप पवार, सागर खरात , सुरेंद्र ठाकूर, मनीष साळुंखे, मनीष जाधव, साहिल राजपूत, किरण शिंदे, अमित गोखले, राजवीर आव्हाड, विजय मरळ, ऋषिकेश मळेकर, अतुल केंदूरकर यांसह भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते.

भिकाऱ्यापासूनही सावधान .. भिकारी निघाला चोर, ५२ तोळे सोने हस्तगत

पुणे- पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीची चर्चा आता अंतरराष्ट्रीय स्तरावर झाडते आहेच. त्यातच चंदन नगर पोलिसांनी चक्क एका भिकाऱ्याला पकडले आहे… होय हा भिकारी .. चोर निघाला .. आता पुणेकरांना भिकाऱ्यांपासूनही सावध राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

पोलिसांनी सांगितले कि,’

चंदननगर पोलीस ठाण्यात गु.रजि, नं. २४६/२०२४, भादवि कलम ३८० प्रमाणे उघड्या दरवाजावाटे घरात घुसुन सोने व रोख रक्कम चोरी झालेबाबत दाखल असलेल्या गुन्हयामधील आरोपींचा व चोरीस गेले मालाचा तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर व तपास पथकातील अंमलदार यांवेसह चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेत होते. चोरीच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे लाल रंगाचे चारचाकी टेम्पो सारख्या गाडीचा व चोरी करणारे महिला व इसम यांची माहिती प्राप्त झाली होती.सहायक पोलीस निरीक्षक अर्थात सपोनि खांडेकर हे तपास पथकातील अंमलदार यांचेसह चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रालिंग करत होते त्याच दरम्यान पो. हवा नाणेकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकरवी बातमी मिळाली की, मागील दोन/तीन महिन्यापुर्वी पैसे व सोने चोरी करणारे फुटेजमधील वर्णना सारखी महिला व इसम हे आळंदी देवाची येथे एका लाल रंगाचे चार चाकी टेम्पो सारख्या गाडीसह उभे आहे. ही बातमी मिळाल्याने तपास पथकाकडील अंमलदार व महिला स्टाफ असे बातमीचे ठिकाणी रवाना होवुन त्यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) मिली दिपक पवार, वय २० वर्षे, रा. आडगाव नाका, झोपडपट्टी, पंचवटी, नाशिक व एक विधिसंघर्षित बालक असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे असलेल्या महिंद्रा गाडी बाबत विचारपूस करता त्यांनी दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना पुढील कार्यवाही करीता चंदननगर पोलीस स्टेशनला आणुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचेकडे सोने व पैसे मिळून आल्याने त्यांना सदर सोने व पैशांबाबत विश्वासात घेवून अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगितले कि, सदरचे सोने व पैसे हे आम्ही दि. १८/०८/२०२४ रोजी टिंबर मार्केट, पुणे येथे एका घरातून चोरी केले असलेबाबत सांगितल्याने सदरबाबत खडक पोलीस स्टेशन अभिलेखावर पाहणी केली असता, खडक पो. स्टे पुणे शहर गुन्हा रजि. नंबर २७६/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले. तसेच त्यांचेकडे चंदननगर पोलीस स्टेशन गु.र.नं.२४६/२०२४ भा.दं.वि कलम ३८० या गुन्हया बाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा मागील ३ महिन्यापुर्वी केल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन ३५,लाख रू किंमतीचे ५२ तोळे वजनाचे वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने तसेच २६,६००/- रू. रोख रक्कम, व ५,५०,०००/- रू किंमतीची महिंद्रा ईम्पेरिओ कंपनीची लाल रंगाची चारचाकी गाडी असा एकुण ४०,७६,६००/- (चाळीस लाख, शहात्तर हजार सहाशे) रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.हि कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त पुर्व विभाग पुणे शहर, मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परीमंडळ ४ पुणे शहर, हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे, यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पो.स्टे.पुणे शहर संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे), अनिल माने, यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर, पोलीस अंमलदार महेश नाणेकर, सचिन रणदिवे, शिवाजी धांडे, प्रफुल्ल मोरे, सचिन पाटील, विकास कदम, अमोल जाधव, शेखर शिंदे, नामदेव गडदरे, सुरज जाधव, श्रीकांत कोद्रे, ज्ञानोबा लहाने, शितल वानखेडे, पुजा डहाळे, मनिषा पवार, यांनी केली आहे.

गौरी सजावट स्पर्धेचा अभूतपूर्व प्रतिसाद आनंददायी!

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

गौरी सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

पुणे-कोथरूड मतदारसंघातील महिलांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून आनंद झाला, अशी भावना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहयोगातून कोथरूड मतदारसंघात आयोजित गौरी सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, आयोजिका कांचन कुंबरे, प्रा. डॉ. अनुराधा एडके, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, मयूरी कोकाटे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, गणेशोत्सव हा आनंदाचा सोहळा आहे. गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रथमच कोथरुड मतदारसंघात गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील सहभागी महिलांना गौरी सजावटीसाठी भरजरी साडी देखील दिली होती‌. त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड उत्साह होता‌.‌ या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. जवळपास दहा हजार पेक्षा जास्त महिलांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. महिलांचा स्पर्धेतील उत्साह पाहून अतिशय आनंद होतो, अशी भावना यावेळी व्यक्त केली.

या स्पर्धेत यांनी मंजिरी मारणे प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक विजेत्या सुमन शेलार यांनी, तृतीय क्रमांक विजेत्या सुवर्णा बालवडकर यांनी पटकाविला. तर ५० महिलांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

क्राईम का वाढलेय ? बोपदेव घाटाच्या पाहणीनंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या …

पुणे- शरद पवार यांच्या समवेत बोपदेव घाटाची पाहणी केल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि येथील अनेक कमतरतांकडे लक्ष वेधले त्याच सोबत क्राईम का वाढलेय ? असा सवाल करत त्याबत आपले मत मांडले पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटलेय ….