Home Blog Page 655

एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘टॅलेंट फ्यूजन’ उत्साहात 

पुणे: एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या स्कुल ऑफ काॅर्पोरेट इनोवेशन आणि लिडरशिप (एससीआयएल) यांच्या विद्यमाने आयोजित ‘टॅलेंट फ्यूजन २k२४’ या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा उत्साहात पार पडला. या स्पर्धेचे उद्दिष्ट विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या रोजगार कौशल्यांचा विकास करणे होते.

विद्यार्थ्यांमधील क्षमता आणि व्यावसायिक कौशल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन होते. या वर्षीच्या पहिल्या फेरीत संपूर्ण विद्यापीठातून १९०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ३ फेऱ्यांमधून अंतिम “एलेवेटर पीच” साठी १० स्पर्धकांची निवड करण्यात आली आणि त्यातून ३ विजेते घोषित करण्यात आले. ज्यामध्ये मधुर पाटील, प्रसाद बोकारे आणि अभिषेक सहा यांनी अणुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. 

या स्पर्धेसाठी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांचे मार्गदर्शन लाभले. प्रमुख पाहुणे म्हणून प्र.कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी उपस्थित होते. स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पंच म्हणून प्रा. डॉ. रेणू व्यास, प्रा. श्रीकांत गुंजाळ, प्रा. सिद्धार्थ साळवे, प्रा. दिल किरत सरना यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. शिखा काबरा आणि प्रा. सारा रोज यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. जयदीप शिरोटे यांनी केले.

हिट्स गीतांनी रंगली सायंकाळ

३०वा पुणे नवरात्रौ महोत्स

पुणे-गुलाबी आँखे…, ओ मेरे दिल के चैन…, प्यार दिवाना होता है.., क्या हुवा तेरा वादा, कहना ही क्या... या गीतांसह ए. आर. रहमान, आर. डी. बर्मन व अजय-अतुल यांचे हिट्स गीते गायकांनी सादर करून श्रोत्यांची  वन्समोरची दाद मिळवली.३०व्या पुणे नवरात्रौ महोत्सवातील आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे  महोत्सवात गायक मुकेश देढीया, गणेश मोरे, तेजस्विनी पाहूजा, मकरंद पाटणकर, चारूलता पाटणकर, धनंजय पवार यांनी आपल्या सुरेल गायनातून श्रोत्यांची मने जिंकली.

     मुकेश देढीया प्रस्तुत भव्य वाद्य वृंदासहित ‘ए. आर. रहमान, आर. डी. बर्मन व अजय-अतुल ‘ यांच्या हिट्स गीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. गायकांनी सादर केलेल्या गीतांच्या सुरात सूर मिसळून तर वादकांच्या ठेक्यावर नृत्य करण्याचा मोह श्रोत्यांना आवरला नाही.

    कार्यक्रमाची सुरुवात अंबे मातेला नमन करणाऱ्या ‘घे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार’, ‘आलो दुरून रांगून डोंगर येंगून’, ‘उघड देवी दार…’ या गाण्यांनी झाली. जी’व गुंगला दंगला असा’ यासह प्रेम गीते सादर करण्यात आली.

    अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेली प्रसिद्ध गीते गायकांनी सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली. ‘सामने ये कौन’, ‘तन्हाईया’, ‘रंग रंगीला’, ‘दिल है छोटासा’, ‘ये हसीन वादिया’, ‘ये शाम मस्तानी’, ‘प्यार दीवाना होता है’, ‘ओ मेरे दिल के चैन’, ‘दम मारो दम’, ‘छय्या छय्या’, ‘बचना हैं हसीनो’, ‘दुनिया मे लोगो को’, ‘मुकाबला’ ही गाणी सादर करून श्रोत्यांच्या टाळ्यांची दाद मिळवली.

    कार्यक्रमाला भव्य वाद्य वृंदाची साथ लाभली.  रोहित साने -तबला, केदार मोरे – ढोलकी, सोमनाथ हटके- तुंबा, अभिजित भदे – रिदम मशीन, आनंद घोगरे- ड्रम, सचिन वाघमारे- फ्लूट, विजय मूर्ती – गिटार, असिफ खान – ट्रंपेट व अमन सय्यद यांनी कीबोर्ड वर साथसंगत केली.

 नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी गायक व कलाकारांचा व मान्यवरांचा सत्कार केला.  यावेळी  महोत्सवाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त पुण्यात विविध उपक्रमांचे आयोजन

पुणे, 9 ऑक्टोबर 2024

भारतीय डाक विभागामार्फत राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त पुण्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत दिनांक 07 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2024 दरम्यान  डाक विभागाच्या वतीने मेल व पार्सल दिवस, फिलॅटेली दिवस, जागतिक टपाल दिवस, अंत्योदय दिवस तसेच वित्तीय सशक्तीकरण दिवस साजरे करण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे डाक विभागाचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी दिली. 

1874 साली स्थापन झालेल्या युनिव्हर्सल पोस्टल युनियन (यूपीयू)च्या वर्धापन दिनानिमित्त 9 ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. जागतिक टपाल दिनाचा उद्देश हा जनसामान्य आणि व्यवसायांच्या दैनंदिन जीवनात डाक विभागाची भूमिका तसेच जागतिक, सामाजिक आणि आर्थिक विकासात त्याचे योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. या वर्षीच्या जागतिक पोस्ट दिनाची थिम ‘150 Years of Enabling Communication and Empowering Peoples Across Nations’ ही आहे.

या वर्षी, राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करण्याची रूपरेखा भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात भारतीय डाक विभागच्या उदयोन्मुख भूमिकेच्या अनुषंगाने करण्यात आली आहे. मुलींच्या सक्षमीकरणावर भर देऊन वित्तीय सशक्तिकरण, DNK सारख्या मेल आणि पार्सल सेवा, दुर्गम, डोंगराळ, सेवा नसलेल्या आणि बँक नसलेल्या भागात ऑन-द-स्पॉट बँकिंग सेवा यावर भर दिला जाणार आहे.

दहा पोस्टल डिव्हिजन, एक रेल्वे मेल सर्व्हिस डिव्हिजन, एक मेल मोटार डिव्हिजन,एक सिव्हील डिव्हिजन आणि 31 पोस्टल सब डिव्हिजन यांनी तयार झालेल्या पुणे टपाल क्षेत्राच्या कार्यकक्षेमध्ये पुणे, अहमदनगर, सातारा आणि सोलापूर असे चार जिल्हे समाविष्ट आहेत. या सर्व विभागांचे कार्य सुचारू पद्धतीने चालविण्यासाठी सुमारे सात हजार कर्मचारी दहा हेड पोस्ट ऑफिसेस 486 सब पोस्ट ऑफिसेस, 2183 ब्रांच पोस्ट ऑफिसेस, 18 मेल ऑफिसेस च्या माध्यमातून आपली सेवा देतात.

राष्ट्रीय टपाल सप्ताहादरम्यान साजऱ्या केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा सारांश खालीलप्रमाणे आहे:

7 ऑक्टोबर – मेल आणि पार्सल दिवस:

  • मेल आणि पार्सल च्या अंतर्गत घेतलेल्या नवीन ग्राहक उपयोगी योजनांची ग्राहकांना माहिती देण्यासाठी आणि प्रदान केल्या जात असलेल्या सेवांबद्दल ग्राहकांचा अभिप्राय मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक मेळाव्याचे आयोजन प्रादेशिक आणि विभागीय स्तरावर पुणे, सोलापूर, श्रीरामपूर, सातारा, अहमदनगर येथे आयोजित केले गेले.
  • डाक घर निर्यात केंद्रावर जागरूकता कार्यक्रम: निर्यातदारांसाठी विविध स्तरावर कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या आहेत आणि डाक घर निर्यात केंद्राकडून दिले जाणारे फायदे आणि सुविधा निर्यादारापर्यंत पोहोचवल्या गेल्या आहेत.

8 ऑक्टोबर- फिलॅटेली  दिवस:

  • “पत्रलेखनाचा आनंद: डिजिटल युगात पत्रांचे महत्त्व” या विषयावर शाळांमध्ये संवादात्मक सत्र संगमनेर, पाचगणी, पंढरपूर येथे आयोजित केले गेले.
  • प्रश्नमंजुषा आणि इतर उपक्रम पुणे सिटी वेस्ट विभागांतर्गत येणाऱ्या निवडक ठिकाणी आयोजित केले गेले.
  • फिलॅटेलीला  प्रोत्साहन देण्यासाठी आणि व सदर छंदाला प्रसिद्धी प्रदान करण्यासाठी सेमिनार आयोजित केले गेले.

9 ऑक्टोबर – जागतिक टपाल दिवस:

  • पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असलेल्या डिजिटल डिस्प्लेमध्ये UPU वर्ल्ड पोस्ट डे पोस्टर आणि राष्ट्रीय पोस्टल सप्ताह 2024 चे बॅनर प्रदर्शित केले गेले आहेत.
  • यावर्षीची राष्ट्रीय डाक दिनाची थीम: ‘150 Years of Enabling Communication and Empowering Peoples Across Nations’
  • पोस्टाथॉन वॉक रिले: “फिट पोस्ट, फिट इंडिया” या संदेशाचा प्रचार करणारा राष्ट्रव्यापी चालण्याचा कार्यक्रम पुणे शहर व सोलापूर शहर येथे आयोजित केले आहेत.
  • “एक पेड माँ के नाम” साठी वृक्षारोपण समारंभासह, पोस्टाथॉन कार्यक्रम आयोजित केला गेला.

10 ऑक्टोबर – अंत्योदय दिवस :

  • आदिवासी,डोंगराळ आणि ग्रामीण/दुर्गम भागात आणि शहरी झोपडपट्ट्यांमध्ये जनजागृती सह आधार नोंदणी आणि आधार अद्ययावतन शिबिरे आयोजित केली जातील.

11 ऑक्टोबर – मुलींच्या सक्षमीकरणावर भर देणारा वित्तीय सशक्तिकरण दिवस:

  • मूलींचे सबलीकरण व सशक्तीकरण: आर्थिक साक्षरता आणि आर्थिक समावेशन कार्यक्रमांद्वारे मुलींच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिला जाईल.
  • डाक चौपाल: प्रत्येक उपविभागात तीन (३) डाक चौपाल आयोजित केले जातील डाक चौपालच्या कक्षेत विशेष डाक विमा पॉलिसी वितरण/ मार्केटिंग मोहिमेचे आयोजन केले जाईल.
  • आर्थिक साक्षरता सत्र आयोजित करणे.

पुणे डाक क्षेत्रामध्ये आंबेगाव बुद्रुक, पिंपळे सौदागर, कोंढवा, चऱ्होली, शिवणे येथे नवीन पोस्ट ऑफिस त्याचप्रमाणे हडपसर, पर्वती, बावधन या भागामध्ये नवीन नोडल डिलिव्हरी सेंटर चालू करण्याचे प्रस्ताव विचाराधीन आहेत. खडकी येथे ट्रान्सशिपमेंट सेंटर चालू करून एकाच छताखाली पोस्ट ऑफिस,पार्सल हब , स्पीड पोस्ट व रजिस्टर हब इत्यादी ऑफिस येतील.

टपाल विभागामार्फत मेल, बँकिंग, इन्शुरन्स अशा विविध क्षेत्रामध्ये सेवा प्रदान केल्या जातात. त्याकरिता कोअर बँकिंग सोल्युशन, डिजिटल एडव्हान्समेंट ऑफ रुरल पोस्ट ऑफिसेस फॉर न्यू इंडिया, डायनामिक क्यू आर कोड अशा तंत्रज्ञानांचा उपयोग करून सेवा अधिक समाजाभिमुख केल्या आहेत. भारतातील शेवटच्या खेड्यापर्यंत टपाल वितरण तर टपाल विभाग करतच असतो. त्याचबरोबर पुणे क्षेत्रातील 9 पार्सल पॅकिंग युनिट आणि डाक निर्यात केंद्रांमुळे परदेशात पत्र आणि पार्सल (रजिस्टर तसेच स्पीड पोस्ट) पाठविण्याच्या सेवेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  तसेच कंपन्या आणि संस्था मोठ्या प्रमाणावर (बल्क) टपाल पाठविण्यासाठी टपाल विभागालाच पसंती देत आहेत. पार्सल हब मुळे पार्सल हंड्लिंग अधिक सोपे आणि जलद होते.

तळागाळापर्यंत कोणत्याही बँकेतील पैसे घरपोच देण्याची AePS सुविधा केवळ भारतीय टपाल खात्यामार्फत राबविली जाते. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने गेल्या सहा वर्षात सुमारे 32 लाख बँक खाती, लाखो सामान्य विमा विविध नामांकित विमा कंपन्या (बजाज, टाटा, निवा बुपा, स्टार हेल्थ) यांचे सोबत टाय अप करून उघडल्या आहेत , हजारो गृहकर्ज आणि वाहन कर्ज ,लाखो बालकांचे आधार कार्ड तयार करणे तसेच आधार कार्डमध्ये मोबाईल किंवा पत्याचे बदल करणे इत्यादी विविध सेवा प्रदान करत जनमानसावर आपली छाप उमटविली आहे.पुणे क्षेत्राने 74.38 लाख पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक खाती सुरु ठेवत महाराष्ट्र सर्कल मध्ये समाविष्ट असलेल्या सहा क्षेत्रामध्ये (गोवा, औरंगाबाद, नागपूर, नवी मुंबई, मुंबई आणि पुणे) आघाडी घेतली आहे. 

भारत सरकारने टपाल विभागाच्या संदर्भात झालेल्या ब्रिटीशकालीन कायद्यामध्ये योग्य ते बदल घडवून ते अधिकाधिक समाजोपयोगी आणि सुलभ करण्यास मदत केली आहे. तसेच भौतिक स्थाने आणि त्यांचे डिजिटल प्रतिनिधित्व यांच्यातील अंतर भरून काढण्यासाठी डिजिटल स्वरूपातील नवे पिन कोड (डिजिटल पोस्टल इंडेक्स नंबर (DIGIPIN) ) विकसित करण्यात येत आहेत. 

NPS वात्सल्य ही Savings cum Pension योजना अठरा वर्षाखालील मुलांसाठी www.indiapost.gov.in/Financial/pages/Content/NPS.aspx या URL वर सुरू करण्यात आली आहे.

डाक चौपाल, डाक समुदाय विकास कार्यक्रम (DCDP) हाती घेऊन टपाल विभागाने अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. एक पेड मां के नाम, भित्तीचित्र अशा नाविन्यपूर्ण योजना आखून सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी देखील टपाल विभागाने पुढाकार घेतला आहे.  जनतेच्या जीवनात आणि विविध व्यवसायांमध्ये योगदान देणे आणि आपल्या भूमिकेसंदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे यासाठी टपाल विभाग कटिबद्ध आहे. तरी या उपक्रमांचा सर्वसामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागामार्फत करण्यात आले आहे. 

लाडक्या बहिणींची बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली,सुदैवाने जीवीतहानी नाही

माणगाव -रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याचा तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला जाणाऱ्या महिलांच्या बसचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. महिलांना घेऊन जाणारी ही एसटी बस 20 फूट खोल दरीत कोसळली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन तालुक्यातील काही महिलांना घेऊन येत असताना या बसचा मांजरोने घाटात अपघात झाला. म्हसळा येथून माणगावकडे जाताना बस बाजूच्या दरीत घसरल्याने हा अपघात झाला. या अपघातात काही महिला जखमी झाल्या आहेत. जखमी झालेल्या महिलांवर तातडीने रुग्णालयात दाखल करत उपचार सुरू करण्यात येत आहेत. दरम्यान, एसटी बस चालक नवीन असल्याने मुख्य वळणावरील अंदाज चुकल्याने हा अपघात झाला असल्याचे समजते.

माणगाव येथील माणगाव दिघी राष्ट्रीय महामार्गावरील धनसे मैदानावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. जवळपास ५० हजार नागरिकांची बसण्याची व्यवस्था या मैदानात करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना दिवाळीच्या आधीच या कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बहिणींना भाऊबीज भेट देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी सुमारे 500 पोलिस देखील तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये पाठवण्यात आले होते. या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांनाही 1500 रुपये देण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात काही महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये आले होते. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये महिलांना एकूण 3000 रुपये मिळाले आहेत. पात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 7500 रुपये मिळाले आहेत.

बॉम्बची धमकी मिळूनही 3.30 तास उडत राहिले विमान:लंडनहून दिल्लीला येत होती विस्तारा फ्लाइट

लंडनहून दिल्लीला येणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या यूके 18 या फ्लाइटमध्ये बॉम्बचा इशारा मिळाल्यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, ही बातमी खोटी निघाल्याने शोध घेईपर्यंत प्रवासी घाबरले. प्रवासी म्हणाला- संपूर्ण प्रवास दहशतीखाली पार पडला.बुधवारी विमान दिल्लीला पोहोचण्याच्या 3.30 तास आधी बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. कोणीतरी टिश्यू पेपरवर लिहून टॉयलेटमध्ये चिकटवले की फ्लाइटमध्ये बॉम्ब आहे. विमान दिल्लीत उतरल्यानंतर संपूर्ण विमान आणि प्रवाशांची तपासणी करण्यात आली.

क्रू मेंबरने टिश्यू पेपर काढला आणि नंतर प्रत्येक प्रवाशाचे सामान तपासले. मात्र, सामानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. या फ्लाइटमध्ये 300 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते.

त्याच फ्लाइटमधील प्रवाशाने सांगितले की, ‘बॉम्बच्या बातमीनंतर संपूर्ण प्रवास भीतीच्या छायेत पार पडला. सकाळी 11.20 वाजता विमान वेळेवर दिल्लीला पोहोचले, पण ते एका कोपऱ्यात उभे होते. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संपूर्ण विमानाला वेढा घातला.ते म्हणाले, ‘मग एकेक करून सर्व प्रवासी खाली उतरले. प्रथम बिझनेस क्लासचे प्रवासी उतरले, नंतर प्रीमियम इकॉनॉमी आणि शेवटी इकॉनॉमी प्रवासी. प्रत्येकाच्या हातातील सामान तपासण्यासाठी स्कॅनिंग व्हॅन बोलावण्यात आली. सर्व सामान तपासल्यानंतर प्रवाशांना डिपार्चर गेटजवळील गेट क्रमांक 4 वर बसायला लावले. याठिकाणी विमान कंपनीतर्फे सर्व प्रवाशांना नाश्ता आणि पाणी देण्यात आले. जोपर्यंत संपूर्ण तपास होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रवाशाला किंवा कनेक्टिंग फ्लाइटच्या लोकांनाही बाहेर जाण्याची परवानगी नव्हती.सकाळी 11.20च्या सुमारास विमान लँड झाल्यापासून चौकशी सुरू होती. दुपारी अडीच वाजेपर्यंत सर्व प्रवाशांना तिथेच बसवून ठेवण्यात आले. कनेक्टिंग फ्लाइटने प्रवास करणाऱ्यांसाठी कोणती व्यवस्था केली जाईल याची माहिती कोणालाही देण्यात आली नाही.

मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी रुपये व ५ लाख रोजगार गुजरातने पळवले.

मुंबई, दि. ९ ऑक्टोबर २०२४
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेत काँग्रेस पक्षाने भाजपा युती सरकारच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारा चित्ररथ बनवला आहे. महाभ्रष्ट युती सरकारने मोदी शाह यांच्या आदेशानुसार गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवले आहेत. राज्यातील ७.५ लाख कोटी रुपये व ५ लाख रोजगार गुजरातने पळवले आहेत. नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी महाराष्ट्राला ATM बनवून कसे लुटले या लुटीची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम काँग्रेसचा ‘प्रचाररथ’ करणार असल्याचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते व विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या चित्ररथाचे (प्रचाररथ) उद्घाटन मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, विधी विभागाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अॅड. रविप्रकाश जाधव, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष युती सरकारने राज्याला लुटले आहे. महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक गुजरातला पळवली व राज्यातील गुतंवणूक व लाखो तरुणांचे रोजगार हिरावले. मोदी शाह यांच्या आदेशाचे पालन करत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी महाराष्ट्राला गुजरातकडे गहाण ठेवले ही माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी अशा प्रकारचे अनेक प्रचार रथ राज्यभर जाऊन जनतेला माहिती देण्याचे काम करतील. गुजरातच्या लाडक्या महाभ्रष्ट युतीच्या गुजरात कनेक्शनचा पर्दाफाश हा प्रचाररथ करेल.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, हरियाणाची व महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे. काँग्रेस पक्ष आपल्या मित्र पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवतो हे लोकसभा निवडणुकीत सर्वांनी पाहिले आहे, त्यामुळे काँग्रेसवर काहीही आरोप केलेले सहन केले जाणार नाहीत असा इशारा नाना पटोले यांनी दिला.
हरियाणा विधानसभेच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर केलेल्या आरोपाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पिडीपी सोबत भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन करुन ३.५ वर्षे सत्ता भोगली, त्या मेहबुबा मुफ्ती पाकिस्तानचे समर्थन करतात, नरेंद्र मोदी यांना ती युती चालली ना? भाजपाने सत्तेसाठी कोणा कोणा सोबत युती केली हे त्यांनी आधी पहावे. नरेंद्र मोदी जे बोलतात ते गांभिर्याने घेऊ नका, असेही नाना पटोले म्हणाले.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि इतर कल्याणकारी योजना अंतर्गत पोषणमूल्ययुक्त तांदळाचा मोफत पुरवठा जुलै, 2024 ते डिसेंबर 2028 या कालावधीत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

75 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाला अनुरूप, पोषणमूल्ययुक्त तांदळाचा उपक्रम सुरू ठेवणे केंद्र सरकारच्या ॲनिमिया मुक्त भारत धोरणांतर्गत हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांना पूरक ठरेल.

पंतप्रधानांच्या कल्पनेतील पोषण सुरक्षेच्या दिशेने मोठे पाऊल

नवी दिल्‍ली, 9 ऑक्‍टोबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि इतर कल्याणकारी योजनासह सरकारच्या सर्व योजनांअंतर्गत  पोषणमूल्ययुक्त   तांदळाचा सार्वत्रिक पुरवठा सध्याच्या स्वरूपात जुलै 2024 ते  डिसेंबर 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी  दिली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (अन्न अनुदान) चा भाग म्हणून पोषणमूल्ययुक्त तांदळाचा उपक्रम केंद्र सरकारच्या 100% अर्थसहाय्यासह केंद्रीय क्षेत्रातील उपक्रम म्हणून सुरू राहील आणि यामुळे अंमलबजावणीसाठी एक एकीकृत संस्थात्मक यंत्रणा उपलब्ध होईल.

त्यानुसार, देशातील पोषण सुरक्षेच्या आवश्यकतेबाबत 75 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाच्या अनुषंगाने,  देशातील ॲनिमिया आणि सूक्ष्म पोषक घटकांची  कमतरता दूर करण्यासाठी “सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणाली, इतर कल्याणकारी योजना, एकात्मिक बाल विकास सेवा, पीएम पोषण  (पूर्वीचे माध्यान्ह भोजन)च्या माध्यमातून पोषणमूल्ययुक्त तांदळाचा पुरवठा” उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

एप्रिल 2022 मध्ये आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने  मार्च 2024 पर्यंत देशभरात टप्प्याटप्प्याने पोषणतत्वयुक्त तांदळाचा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला होता.  सर्व तीन टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत आणि सरकारच्या सर्व योजनांमध्ये पोषणमूल्ययुक्त तांदळाचा पुरवठा करण्याच्या सार्वत्रिक व्याप्तीचे लक्ष्य  मार्च 2024 पर्यंत साध्य झाले आहे.

2019 ते  2021 दरम्यान आयोजित राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-5) नुसार, ॲनिमिया ही भारतातील एक व्यापक समस्या आहे, ज्याचा परिणाम विविध वयोगटातील तसेच उत्पन्नाच्या स्तरांमधील मुले, महिला  आणि पुरुष यांच्यावर होतो. लोहाच्या कमतरतेव्यतिरिक्त, व्हिटॅमिन बी 12 आणि फॉलिक ऍसिड सारख्या इतर जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता देखील असते आणि त्याचा लोकांच्या एकूण आरोग्यावर आणि उत्पादकतेवर परिणाम होतो.

असुरक्षित लोकसंख्येतील ऍनिमिया आणि सूक्ष्म पोषक घटकांचे  कुपोषण दूर करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी उपाय म्हणून जागतिक स्तरावर पोषणमूल्ये-युक्त अन्नाचा  वापर केला जातो. भारताच्या बाबतीत तांदूळ हे  सूक्ष्म पोषणद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी एक योग्य धान्य आहे कारण भारतातील 65% लोकसंख्येचे  तांदूळ हे मुख्य अन्न आहे. पोषणमूल्ययुक्त

तांदळामध्ये  भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण द्वारे निर्धारित मानकांनुसार नियमित तांदळामध्ये  (कस्टम मिल्ड राइस) सूक्ष्म पोषक घटकांनी (लोह,  फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन बी 12) समृद्ध असलेल्या  फोर्टिफाइड राइस कर्नलचा समावेश केला जातो.  

नामदार चंद्रकांतदादा पाटील चतृ:शृंगीच्या दर्शनाला

माता-भगिनींकडून लाडकी बहिण आणि फी माफीच्या निर्णयाप्रती आनंद

पुणे- नवरात्रोत्सवानिमित्त राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुणेकरांचं श्रद्धास्थान असलेल्या चतु: शृंगी देवीचे दर्शन घेतले. यावेळी दर्शनासाठी आलेल्या माता भगिनींनी शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण आणि उच्च शिक्षणासाठी मुलींच्या फी माफीच्या निर्णयाप्रती आनंद व्यक्त केला.

नवरात्रोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र देवीचा जागर सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्वच शक्तीपीठ आणि तीर्थस्थांनावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पुण्यातील चतु:शृंगी देवी हे पुणेकरांचे श्रद्धास्थान असून; वणीच्या सप्तशृंगीचे प्रतिरुप म्हणून चतु:शृंगी देवीवर सर्वांची श्रद्धा आहे. त्यामुळे नवरात्रोत्सव काळात चतु: शृंगीच्या दर्शनासाठी पुणे आणि आसपासच्या परिसरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुणेकरांचे श्रद्धास्थान चतु:शृंगी देवीचे दर्शन घेतले. यावेळी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या माता भगिनींनी शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणि उच्च शिक्षणासाठी मुलींच्या फी माफीच्या निर्णयाप्रती आनंद व्यक्त केला.

महायुती सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन नेहमीच कटिबद्ध आहे अशी ग्वाही यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील 7600 कोटी रुपयांहून जास्त मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांची केलीपायाभरणी


महाराष्ट्रातील 10 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे केले उद्घाटन

नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नूतनीकरण प्रकल्पाची केली पायाभरणी

शिर्डी विमानतळाच्या नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीसाठी केली पायाभरणी

इंडियन इन्स्टीट्युट ऑफ स्किल्स मुंबई आणि विद्या समीक्षा केंद्र, महाराष्ट्र चे केले उद्घाटन

महाराष्ट्रात सुरू केलेल्या प्रकल्पांमुळे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होईल, संपर्कव्यवस्थेला चालना मिळेल आणि युवा वर्गाचे सक्षमीकरण होईल-पंतप्रधान

नवी दिल्‍ली, 9 ऑक्‍टोबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात सुमारे 7600 कोटी रुपयांहून जास्त मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नूतनीकरण प्रकल्पाची पायाभरणी आणि शिर्डी विमानतळावरील नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी यांचा समावेश होता. महाराष्ट्रातील 10 सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि इंडियन इन्स्टीट्युट ऑफ स्कील्स(IIS), मुंबई आणि विद्या समीक्षा केंद्र, महाराष्ट्र (VSK) यांचे  उद्घाटनही त्यांनी यावेळी  केले.

या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की महाराष्ट्राला 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि नागपूर विमानतळाचे आधुनिकीकरण आणि विस्तार तसेच शिर्डी विमानतळावरील नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीची उभारणी या प्रकल्पांसह महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची भेट दिली जात आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आजच्या विकास प्रकल्पांसाठी अभिनंदन केले.

30.000 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी मुंबई आणि ठाण्याला दिलेल्या भेटीचे स्मरण करत पंतप्रधानांनी मेट्रो जाळ्याचा विस्तार, विमानतळांचे नूतनीकरण, महामार्ग प्रकल्प, पायाभूत सुविधा, सौर ऊर्जा आणि टेक्सटाईल पार्क यांसारखे हजारो कोटींचे विकास प्रकल्प यापूर्वीच विविध जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आले असल्याचे सांगितले. शेतकरी, मच्छिमार आणि पशुपालकांसाठी नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत तर वाढवण बंदर या भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर बंदराची पायाभरणीही महाराष्ट्रात झाली आहे, असे ते म्हणाले. “ महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधीही इतक्या वेगाने, इतक्या मोठ्या प्रमाणावर विविध क्षेत्रांमध्ये विकास झालेला नाही”, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली.

मराठीला अभिजात भाषा म्हणून नुकत्याच मिळालेल्या दर्जाची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा एखाद्या भाषेला योग्य तो सन्मान मिळतो तेव्हा केवळ शब्दांनाच नव्हे तर संपूर्ण पिढीला आवाज मिळतो. यामुळे कोट्यवधी मराठी बांधवांचे स्वप्न साकार झाले आहे, असे त्यांनी नमूद केले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा आऩंद महाराष्ट्राच्या जनतेने साजरा केला, असे त्यांनी सांगितले. आपल्याला महाराष्ट्रातील विविध गावांमधील लोकांकडून आनंदाचे आणि कृतज्ञतेचे संदेश मिळत होते, अशी माहिती त्यांनी दिली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे श्रेय आपले नसून महाराष्ट्राच्या जनतेचे हे आशीर्वाद आहेत, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील प्रगतीची कामे छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या महान विभूतींच्या आशीर्वादामुळेच सुरू आहेत, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. 

हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांचे काल प्रसिद्ध झालेले  निकाल आणि हरियाणाच्या मतदारांनी देशातील जनतेच्या मनाचा कल  स्पष्टपणे दाखवून दिला  आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. दोन कार्यकाळ  यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर सलग तिसऱ्यांदा हरियाणात मिळालेला विजय ऐतिहासिक होता असे ते म्हणाले.

वैयक्तिक लाभासाठी विभाजनवादी  राजकारण करणाऱ्या आणि मतदारांची दिशाभूल करणाऱ्यांपासून पंतप्रधान मोदी यांनी  सावध राहण्यास सांगितले. भारतातील मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करून त्यांना मतपेढीमध्ये  रूपांतरित करण्याच्या प्रयत्नांकडे त्यांनी लक्ष वेधले आणि हिंदू धर्मातील  जातिवादावर स्वतःच्या  फायद्यासाठी भाष्य करणाऱ्यांप्रती  तिरस्कार व्यक्त केला. राजकीय फायद्यासाठी भारतातील हिंदू समाज तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात मोदींनी इशारा दिला. समाज तोडण्याच्या प्रयत्नांना महाराष्ट्रातील जनता नाकारेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

गेल्या 10 वर्षांत सरकारने देशाच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा ‘महायज्ञ’ सुरू आहे असे  पंतप्रधान म्हणाले. “आज आपण केवळ इमारती बांधत नाही तर निरोगी आणि समृद्ध महाराष्ट्राचा पाया रचत आहोत”, असे सांगत त्यांनी लाखो लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्यात 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे  उद्घाटन करण्यात आल्याचे नमूद केले.   ठाणे, अंबरनाथ, मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशीम, अमरावती, भांकदरा आणि गडचिरोली हे जिल्हे लाखो लोकांसाठी सेवेची केंद्रे बनतील असे ते म्हणाले. 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमुळे महाराष्ट्रात आणखी 900 वैद्यकीय जागा तयार होतील आणि राज्यातील एकूण वैद्यकीय जागांची संख्या सुमारे 6,000 होईल असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. लाल किल्ल्यावरून देशात 75,000 नवीन वैद्यकीय जागा निर्माण करण्याच्या आपल्या संकल्पाची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की  आजचा कार्यक्रम या दिशेने उचललेले एक मोठे पाऊल आहे.

सरकारने वैद्यकीय शिक्षण सुलभ केले आहे असे सांगून पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील तरुणांसाठी नवीन संधींची दारे खुली झाल्याचे नमूद केले.  गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील जास्तीत जास्त मुले डॉक्टर व्हावीत आणि त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.  मोदी म्हणाले की, एकेकाळी अशा प्रकारच्या विशेष अभ्यासासाठी मातृभाषेतील पुस्तके उपलब्ध नसण्याचे मोठे आव्हान होते. सरकारने हा भेदभाव संपवला आणि महाराष्ट्रातील युवकांना  मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण घेता येईल असे पंतप्रधानानी  सांगितले . युवक मातृभाषेतून शिक्षण घेऊन  डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करतील असेही ते म्हणाले.

जीवन सुखकर करण्याचे  सरकारचे प्रयत्न हे गरिबीविरुद्ध लढण्याचे हे एक मोठे माध्यम आहे असे  पंतप्रधान म्हणाले. गरिबीला आपल्या  राजकारणाचे इंधन बनवल्याबद्दल मागील सरकारांवर टीका करत ते म्हणाले की त्यांच्या सरकारने एका दशकात 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. देशातील आरोग्य सेवेतील परिवर्तनाबाबत  मोदी म्हणाले, “आज प्रत्येक गरीब व्यक्तीकडे मोफत वैद्यकीय उपचारांसाठी आयुष्मान कार्ड आहे”. ते पुढे म्हणाले की, 70 वर्षांवरील वृद्धांनाही आता मोफत वैद्यकीय उपचार मिळत आहेत.

जनौषधी केंद्रांमध्ये अत्यावश्यक औषधे अत्यंत कमी दरात उपलब्ध आहेत तसेच हृदयविकाराच्या रुग्णांना हव्या असलेल्या स्टेंट्सच्या किंमती देखील 80 ते 85 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत याची दखल घेत पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की सरकारने कर्करोगावरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांच्या किंमतीदेखील आता कमी केल्या आहेत.सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे आता वैद्यकीय उपचार स्वस्त झाले आहेत हे सांगून पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “आज मोदी सरकारने देशातील अत्यंत गरीब व्यक्तीला देखील सामाजिक सुरक्षिततेचे कवच प्रदान केले आहे.”

जेव्हा एखाद्या देशातील युवावर्ग आत्मविश्वासाने भरलेला असतो तेव्हा अशाच देशावर जग विश्वास ठेवते असे त्यांनी ठामपणे सांगितले. आजच्या तरुण भारताचा आत्मविश्वास देशासाठी नव्या भविष्याची कथा लिहित आहे असे नमूद करत पंतप्रधान मोदी यांनी जगभरात शिक्षण, आरोग्यसुविधा तसेच सॉफ्टवेअर विकासाच्या प्रचंड संधी निर्माण होत असताना मनुष्यबळाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून जागतिक समुदाय भारताकडे पाहतो आहे ही बाब ठळकपणे मांडली.  भारतातील तरुणांनी या संधींसाठी सज्ज करण्याच्या इराद्याने सरकार त्यांची कौशल्ये जागतिक मापदंडांना अनुसरून असतील याकडे लक्ष पुरवत आहे. शैक्षणिक आराखडा प्रगत करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या विद्या समीक्षा केंद्रासह विविध प्रकल्पांची सुरुवात तसेच युवा वर्गाची प्रतिभा बाजारपेठेतील मागणीला अनुसरून असण्यासाठी भविष्यवेधी प्रशिक्षण देणाऱ्या मुंबई येथील भारतीय कौशल्य संस्थेचे उद्घाटन इत्यादी बाबींचा  उल्लेख केला. तसेच मोदी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना अंतर्वासितेच्या काळात 5000रुपयांचे विद्यावेतन देणाऱ्या भारताच्या इतिहासातील अशा पहिल्याच मोबादल्यासह अंतर्वासिता या सरकारच्या उपक्रमाची माहिती ठळकपणे मांडली. हजारो कंपन्या आज या उपक्रमाचा भाग होण्यासाठी नोंदणी करत आहेत आणि त्यायोगे तरुणांना मौल्यवान अनुभव मिळवण्यात मदत होणार असून त्यांच्यासाठी नव्या संधी खुल्या होत असल्याबद्दल  याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला.

भारतातील तरुणांसाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे उत्तम परिणाम दिसून येत आहेत असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.भारतातील शैक्षणिक संस्था आज जगभरातील प्रमुख शिक्षण संस्थांसोबत समान स्तरावर उभ्या आहेत असे ते म्हणाले.जागतिक विद्यापीठ मानांकनाने कालच जाहीर केल्यानुसार भारतातील उच्च शिक्षण आणि संशोधन यांची गुणवत्ता सतत वाढते आहे असे त्यांनी आवर्जून नमूद केले.  

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आजघडीला जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्यामुळे आज संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. आर्थिक प्रगतीमुळे अनेक क्षेत्रांत, विशेषतः कित्येक दशके दुर्लक्षित राहिलेल्या क्षेत्रांमध्ये नव्या संधी निर्माण वोट आहेत याची नोंद घेत पंतप्रधान म्हणाले, “जागतिक अर्थव्यवस्थेचे भविष्य भारतामध्ये आहे.” अधिक स्पष्टीकरणासाठी त्यांनी पर्यटन क्षेत्राचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, महाराष्ट्राचा अनमोल वारसा, सुंदर नैसर्गिक स्थळे आणि धार्मिक केंद्रे यांचा वापर करून या राज्याला एक अब्ज-डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या भूतकाळात वाया गेलेल्या संधींकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

सध्याच्या सरकारला विकास आणि वारसा अशा दोन्ही बाबी महत्त्वाच्या वाटतात यावर पंतप्रधानांनी भर दिला. भारताच्या समृद्ध भूतकाळाकडून प्रेरणा घेऊन उज्ज्वल भविष्य घडवण्याचा मानस व्यक्त करत पंतप्रधानांनी शिर्डी विमानतळ परिसरात नवीन टर्मिनल, नागपूर विमानतळाचे आधुनिकीकरण यांसह महाराष्ट्रात सुरु असलेल्या इतर महत्त्वाच्या प्रकल्पांचा उल्लेख केला.

साई बाबांच्या भक्तांना शिर्डी विमानतळ परिसरातील नव्या टर्मिनलचा खूप फायदा होणार असून देश परदेशातून अधिक अभ्यागतांना शिर्डीला येणे सुलभ होईल. आधुनिक सुधारणांनी सुसज्जित केलेल्या सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनाबद्दल देखील पंतप्रधानांनी त्यांचे विचार मांडले. या उद्घाटनामुळे, सोलापूर परिसरातील शनी शिंगणापूर, तुळजा भवानी तसेच कैलास मंदिर यांसारख्या धार्मिक स्थळांना भेट देणे अधिक सुलभ होणार  असून त्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनविषयक अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळून रोजगाराच्या नवनव्या संधी देखील निर्माण होणार आहेत.

“आमच्या सरकारचा प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक धोरण हे केवळ एकाच ध्येयाप्रति समर्पित आहे, ते म्हणजे विकसित भारत!”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यासाठी गरीब, शेतकरी, युवा आणि महिलांचे कल्याण हाच सरकारचा दृष्टीकोन असल्याचे ते पुढे म्हणाले.म्हणूनच प्रत्येक विकास प्रकल्प हा गरीब ग्रामीण जनता, मजूर आणि शेतकरी यांना समर्पित असल्याचे ते म्हणाले. शिर्डी विमानतळावर बांधले जात असलेले स्वतंत्र कार्गो कॉम्प्लेक्स (मालवाहू विमान सेवा संकुल) शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार असून, इथून त्यांना विविध प्रकारची कृषी उत्पादने देशभरात आणि परदेशात निर्यात करता येतील, यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. ते पुढे म्हणाले की, शिर्डी, लासलगाव, अहिल्यानगर आणि नाशिक येथील शेतकऱ्यांना कांदा, द्राक्ष, पेरू आणि डाळिंब यांसारखी उत्पादने मोठ्या बाजारपेठेत सहज पोहोचवता येतील, त्यामुळे कार्गो कॉम्प्लेक्स त्यांच्यासाठी विशेष लाभदायक ठरेल.

शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार सातत्याने आवश्यक ती पावले उचलत असून, सरकारने बासमती तांदळाचा किमान निर्यात दर रद्द करणे, बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीवरील बंदी हटवणे, उकड्या तांदळावरील निर्यात शुल्क निम्म्याने कमी करणे, यासारखे निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्कही निम्म्याने कमी केले . सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवर 20 टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला असून, भारतातील शेतकऱ्यांना मोहरी, सोयाबीन आणि सूर्यफूल यांसारख्या पिकांच्या वाढलेल्या किमतीचा फायदा मिळावा, यासाठी रिफाइन्ड सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलावरील सीमा शुल्कात लक्षणीय वाढ केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. कापड उद्योगाला सरकार ज्या प्रकारे मदत करत आहे त्याचा महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असेही ते म्हणाले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की, महाराष्ट्राला बळकट करणे, हा विद्यमान सरकारचा संकल्प आहे. त्यांनी राज्याच्या प्रगतीच्या गतीबद्दल आनंद व्यक्त केला आणि आजच्या सर्व विकास प्रकल्पांसाठी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले.

महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुमारे 7000 कोटी रुपये खर्चाच्या आधुनिकीकरण प्रकल्पाची पायाभरणी केली. हा प्रकल्प उत्पादन, विमान वाहतूक, पर्यटन, लॉजिस्टिक आणि आरोग्यसेवा यासह अनेक क्षेत्रांच्या विकासाला चालना देईल, आणि नागपूर शहर आणि विदर्भाच्या विस्तृत प्रदेशाला त्याचा लाभ मिळेल.

पंतप्रधानांनी शिर्डी विमानतळावर 645 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी केली. या प्रकल्पामुळे शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांना जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील. प्रस्तावित टर्मिनलच्या बांधकामाची  संकल्पना साई बाबा यांच्या अध्यात्मिक कडुनिंबाच्या झाडावर आधारित आहे.

सर्वांसाठी परवडणारी आणि सहज उपलब्ध आरोग्यसेवा सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरून, पंतप्रधानांनी महाराष्ट्रात मुंबई, नाशिक, जालना, अमरावती, गडचिरोली, बुलढाणा, वाशीम, भंडारा, हिंगोली आणि अंबरनाथ (ठाणे), या 10 ठिकाणच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे कार्यान्वयन सुरू केले. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या वाढीव जागांसह,  ही महाविद्यालये रुग्णांना प्रगत तृतीयक  आरोग्य सेवा देखील पुरवतील.

भारताला ‘जगाची कौशल्याची राजधानी’ म्हणून प्रस्थापित करण्याच्या आपल्या दृष्टीकोनाला अनुसरून, पंतप्रधानांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (IIS) मुंबई, अर्थात भारतीय कौशल्य संस्थेचे उद्घाटनही केले. उद्योग क्षेत्रासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अद्ययावत प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी तयार करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत, टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि भारत सरकार यांच्या सहयोगाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

मेकॅट्रॉनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा ॲनालिटिक्स, इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि रोबोटिक्स यांसारख्या अती प्रगत क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देण्याची संस्थेची योजना आहे.

पंतप्रधानांनी यावेळी महाराष्ट्राच्या विद्या समीक्षा केंद्राचे (VSK) उद्घाटन केले. विद्या समीक्षा केंद्र, विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासकांना स्मार्ट उपस्थिती, स्वाध्याय यांसारख्या थेट चॅटबॉट्सद्वारे महत्वाचा शैक्षणिक आणि प्रशासकीय डेटा सहज उपलब्ध करेल. हे केंद्र शाळांना साधन संपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन, पालक आणि देश यांच्यातील संबंध दृढ करणे, आणि प्रतिसादात्मक पाठबळ देण्यासाठी उच्च-गुणवत्तेचा दृष्टीकोन प्रदान करेल. हे केंद्र शिकवण्याच्या पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अनुभवात सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शनपर क्युरेटेड (तयार) साधन सामुग्री देखील पुरवेल.

पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. ९: पिंपरी चिंचवड शहर राज्याचे ग्रोथ इंजिन असून येथील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

चिंचवड महानगर पालिका अंतर्गत विविध विकास कामांचे ई- लोकार्पण, ई- भूमीपूजन निमित्त नटसम्राट निळू फुले रंगमंदिर पिंपळे गुरव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, महेश लांडगे, श्रीमती अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनय चौबे आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत जवळपास १ हजार ७०० कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण, भूमीपूजन घेण्यात आली असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, ही औद्योगिक नगरी, कष्टकऱ्यांची, कामगारांची नगरी असून हे शहर चहुबाजूंनी वाढले आहे. पिंपरी चिंचवडकडे राज्याचे ग्रोथ इंजिन म्हणून पाहिले जाते. मुंबईप्रमाणेच हे शहर कोणाला उपाशी ठेवत नाही, निराश करत नाही. त्यामुळे मुंबई प्रमाणेच हे शहर म्हणजे ‘सिटी ऑफ होप’ आहे.

या शहरात सांस्कृतिकदृष्ट्याही विकास करण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो. शंभरावे अखिल भारतीय नाट्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे येथे आयोजन करण्यात आले. आपली मातृभाषा मराठीचा अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर अखेर प्रधानमंत्री यांनी अभिजात भाषेत समावेश केल्याबद्दल प्रधानमंत्री यांचे आभार मानत असल्याचेही श्री. पवार यावेळी म्हणाले.

लोकसंख्या जास्त असल्याने या शहरात पायाभूत सुविधा देण्यासह शहर नियोजनबद्ध वाढले पाहिजे या दृष्टीकोनातून रस्ते, भुयारी मार्ग, उड्डाणपूल आदी अनेक सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. शहराला योग्य दाबाने पुरेसे पाणी देण्यासाठी अनेक ठिकाणी पाण्याच्या मोठ्या टाक्या बांधण्यात येत आहेत. वाहतूक कोंडी सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांनीही वाहतूक शिस्त राखून सहकार्य करावे. जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाला मोठ्या प्रमाणात वाहने तसेच अन्य आवश्यक बाबी देण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना सर्व समाजघटकांना लाभ देण्याच्या दृष्टीने लाडकी बहिण योजना, मोफत ३ गॅस सिलेंडर, गरीब मुलींना महाविद्यालयीन शिक्षण मोफत देण्याची योजना आणली. तसेच शेतकऱ्यांसाठी वीजमाफीची योजना, दुधाला अनुदान देण्याची योजना, जन्माला आलेल्या मुलीला १ लाख १ हजार रुपये टप्प्या टप्प्याने देण्याची योजना, केंद्र शासनाच्या लखपती दीदी योजनेंतर्गत देशात करावयाच्या ३ कोटी पैकी महाराष्ट्रातील ५० लाख महिलांना लखपती दीदी करण्यात येणार आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्याची योजना राबविण्यात येत आहे.

लाभार्थ्यांना लाभ देणाऱ्या सर्व योजना सुरूच राहतील
महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली आहे, असे सांगून श्री. पवार पुढे म्हणाले, देशात सर्वाधिक वस्तू व सेवा कर (जीएसटी) जमा होत असल्याने राज्याचा सर्वाधिक हिस्सा महाराष्ट्राला मिळतो. राज्याला आर्थिक शिस्त कशी लागली पाहिजे, अनावश्यक खर्च थांबविणे, उत्पन्नाचे स्रोत वाढविणे, वस्तू व सेवा कर (जीएसटी), उत्पादन शुल्क आदी कराची रक्कम शासनाच्याच तिजोरीत यावी, नोंदणी शुल्काचे उत्पन्न मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना लाभ देणाऱ्या कोणत्याही योजना थांबणार नाहीत, सर्व योजना चालूच राहतील.

चुकीचे प्रकार, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाला सूचना दिल्या आहेत. या शहरात माय माता, मुली, बहिनी सुरक्षित रहाव्यात, चोऱ्या माऱ्या होऊ नयेत यासाठी शहरात सीसीटिव्हीची नजर आहे. कोणतेही चुकीचे प्रकार, दहशत, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. मुली, स्त्रियांनी देखील काळजी घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी माता भगिनींची सन्मान करण्याची शिकवण दिली आहे. त्यानुसार काम व्हावे, असेही ते म्हणाले.

माता रमाईंचा पुतळा उभारण्याच्या दृष्टीने कार्यवाही
पिंपरी चिंचवड येथे असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागे असलेल्या पीएमपीएमएलच्या जागेत माता रमाईंचा पुतळा उभा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

विविध समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर आदीवासी समाजाकरिता टार्टी संस्था, मातंग समाजाकरिता आर्टी, मराठा समाजाकरिता सारथी, इतर मागासवर्गीय समाजाकरिता महाज्योती, आर्थिक मागास समाजाकरिता अमृत संस्था, बंजारा समाजाकरिता वनार्टी, अल्पसंख्य समाजाकरिता मार्टी या संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्या माध्यमातून या समाजातील मुला-मुलींना शिक्षण, प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

याशिवाय अनेक समाजांकरिता वेगवेगळी महामंडळे काढलेली आहेत. अजून काही घटक समज राहिलेले असतील त्यांचाही यासाठी विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

मुळा नदीकाठ सुधार प्रकल्पाचा टप्पा 1 चा शुभारंभ होत असताना नदीच्या एका बाजूला पिंपरी चिंचवड आणि दुसऱ्या बाजूला पुणे महानगरपालिका असल्याने पुणे महानगरपालिकेलाही त्याचवेळी निविदा करण्यास सांगितले असल्याने दोन्ही कामे एकाच वेळी होऊन चांगले काम होईल, असेही ते म्हणाले.

यावेळी प्रास्ताविकात आयुक्त श्री. सिंह यांनी पालिकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजना, पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती दिली. पूल, रस्ते, भुयारी मार्ग, इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी), प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे आदींबाबत माहिती दिली.

त्यापूर्वी श्री. पवार यांच्याहस्ते कळ दाबून विविध विकास कामांचे ई- लोकार्पण, ई- भूमीपूजन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रकल्पांची माहिती असलेली आणि आयसीसीसी प्रकल्पाच्या माहितींच्या चित्रफीती दाखविण्यात आल्या.

झोपडपट्टीधारकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या निवासी सदनिकांची चावी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आली. महानगरपालिका आणि सिम्बायोसिस स्किल युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी व १२ वीच्या मुलींसाठी सुरू केलेल्या कौशल्य विकासाच्या विविध अभ्यासक्रमांतर्गत मुलींना प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र देण्यात आले.

अजित पवारांना आणखी एक धक्का! मित्र पक्षाने देखील सोडला हाथ…

पुणे- कागल येथून समरजितसिंह घाटगे यांनी तुतारी हाती घेतली, त्यानंतर इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांनी देखील शरद पवार गटात प्रवेश केला. आता रामराजे निंबाळकर सुद्धा शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे शरद पवार गटात इनकमिंग सुरू असून अजित पवारांच्या पक्षातून मात्र आउटगोइंग सुरू असल्याचे दिसत आहे. याच सोबत आता अजित पवारांच्या पक्षाला साथ देणाऱ्या मित्र पक्षाने देखील साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच अजित पवारांना चांगलेच धक्के बसत असताना दिसत आहेत.

अजित पवारांच्या पक्षाला साथ देणारा रिपब्लिकन पक्षाच्या खरात गटाने साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून ते लवकरच आता शरद पवारांच्या सोबत जाणार आहेत. महायुतीमध्ये दलित आणि मुस्लिमांच्या हिताचे रक्षण होत नसल्याने आपण अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सचिन खरात यांनी म्हणले आहे. तसेच शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केली असून पुढील निर्णय लवकरच घेणार असल्याचे सचिन खरात यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, यापूर्वी अजित पवारांच्या पक्षातून नेते राजेंद्र शिंगणे यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली असून ते देखील आता शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा विधानसभेचे आमदार आहेत. तसेच फलटणमध्ये देखील अजित पवारांना धक्का बसणार आहे. फलटणचे रामराजे निंबाळकर हे देखील शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.

महाराष्ट्रात हरियाणाहून मोठा विजय मिळवणार:पंतप्रधान नरेंद्र मोदी

हरियाणा विधानसभा निवडणुकीतील यशामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकही जिंकण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. त्यांनी बुधवारी महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांचे ऑनलाईन उद्घाटन करताना काँग्रेसवर हिंदू समाजात फूट पाडण्याचा आरोप केला. तसेच हरियाणा जिंकला, आता महाराष्ट्रही जिंकणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला. मोदींच्या या निर्धारामुळे महाराष्ट्राचे राजकारण अधिकच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हरियाणा व जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी आला. त्यात भाजपने हरियाणातील अशक्यप्राय वाटणारा विजय अत्यंत सहजपणे मिळवला. त्यानंतर बुधवारी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, हरियाणाच्या निकालामुळे देशाचा मूड कळला आहे. दोनवेळा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणे ऐतिहासिक आहे. काँग्रेसची पूर्ण इकोसिस्टीम शहरी नक्षलवादी गँगने मतदारांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न केला.

पण त्यांचे सर्वच कट कारस्थान उद्ध्वस्त झाले. काँग्रेसने दलितांमध्ये खोटे पसरवण्याचा प्रयत्न केला. पण दलितांनीही त्यांच्या वाईट विचारांना दूर लोटले. काँग्रेस त्यांचे आरक्षण काढणार असल्याची जाणिव त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे हरियाणातील दलित समाजाने भाजपला विक्रमी मतदान केले आहे. एवढेच नाही तर तेथील ओबीसीही समुदायही भाजपच्या बाजूने आहे.

महाराष्ट्रात हरियाणाहून मोठा विजय मिळवणार

नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसच्या या कटकारस्थानांचा महाराष्ट्रातील जनतेने पराभव केला पाहिजे. महाराष्ट्रातील जनतेला आता भाजप महायुतीसाठी मतदान करायचे आहे. भाजपने हरियाणा तर जिंकला, पण आता महाराष्ट्रात यापेक्षा मोठा विजय मिळवायचा आहे. कारण, मागील 10 वर्षांत आमच्या सरकारने देशाच्या विकासासाठी मोठा यज्ञ सुरू केला आहे.

काँग्रेस समाजात द्वेष पसरवणारी मोठी फॅक्ट्री बनणार असल्याची जाणिव तेव्हाच अनेक नेत्यांना झाली होती. त्यामुळेच काँग्रेसचा गाशा गुंडाळला पाहिजे, असे स्वतः महात्मा गांधी म्हणाले होते. काँग्रेस स्वतः संपली नाही. पण आता ती देशाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी बोलताना म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्न केला. पण शेतमालाला एमएसपी कुणी दिली? हे शेतकऱ्यांना माहिती आहे. काँग्रेसने तरुणांना टार्गेट केले. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. पण तरुणांनीही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपवरच विश्वास ठेवला. काँग्रेसने ना-ना प्रकारचे प्रकारचे प्रयत्न केले. फूट पाडा व सत्ता मिळवा हेच त्यांचे धोरण झाले आहे. त्यामुळे आता काँग्रेस एक बेजबाबदार पक्ष बनल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस देशात फूट पाडण्यासाठी नवनवी कारस्थाने आखत आहे. त्यांचा समाजात फूट पाडण्याचाही प्रयत्न आहे. मुस्लिमांना भीती घाला व त्यांचे मतपेटीत रुपांतर करा हा त्यांचा स्वच्छ फॉर्म्युला आहे. काँग्रेसच्या एकाही नेत्याने मुस्लिमांमध्ये किती जाती असतात याचा उल्लेख केला नाही. मुस्लीम जातींचा मुद्दा येताच त्यांच्या तोंडाला कुलूप लागते. पण हिंदूंचा मुद्दा येतो तेव्हा त्यांची चर्चा जातीवरूनच सुरू होते. कारण, हिंदूंमध्ये जेवढी फूट पडेल तेवढा आपल्याला फायदा होईल हे काँग्रेसला चांगले ठावूक आहे. त्यामुळेच काँग्रेसकडून हिंदू समाजात आग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

‘जावा येझदी मोटरसायकल’तर्फे पुण्यात ‘३५० जावा ४२ एफजे’चे अनावरण

ठळक मुद्दे :

·         ‘जावा’ने पुन्हा एकदा रु. १.९९ लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतींसह (एक्स-शोरूम दिल्ली) श्रेणी केली खंडित; डिझाईन, कामगिरी आणि किंमत या त्रिमूर्तीचे वितरण.

·         ‘४२ लाइफ’ मालिकेचा विस्तार – ४२, ४२ बॉबर आणि आता ४२ एफजे

·         रस्त्यावर ठळक उपस्थिती : मोठा व्हीलबेस, मोठा ग्राउंड क्लीयरन्स

·         या सेगमेंटमध्ये प्रथमच ब्रश्ड ॲल्युमिनियम टॅंक पॅनेल

·         वर्धित एर्गोनॉमिक्ससह सर्वथा नवीन मस्क्युलर निओ-क्लासिक डिझाइन

·         वेगळ्या साउंडट्रॅकसह नवीन अपस्वेप्ट एक्झॉस्ट; ऑल-एलईडी प्रकाशयोजना

·         या वर्गात अग्रणी कामगिरी करण्याससाठी नवीन ३५० अल्फा-२ इंजिन

·         व्यवस्थित हाताळणीसाठी मानके प्रस्थापित करणारी, या वर्गात अग्रणी ठरणारी ब्रेकिंग यंत्रणा

·         पाच आकर्षक रंगांमध्ये, अनेकविध क्लॅडिंगच्या पर्यायांसह उपलब्ध

·         जावा ४२ एफजेच्या वितरणाचा पहिला टप्पा सुरू.

पुणे ऑक्टोबर २०२४ : भारतातील ‘नियो-क्लासिक’ मोटारसायकल विभागातील प्रणेती कंपनी असलेल्या ‘जावा येझदी मोटरसायकल’ने आज जावा “42 लाइफ” लाइनअपमध्ये नवीनतम भर घालण्याच्या दृष्टीने सर्वथा नवीन असे ‘३५० जावा ४२ एफजे’ हे मॉडेल सादर केले आहे. या ब्रँडचे संस्थापक, फ्रँटिसेक जेनेसेक यांना श्रद्धांजली अर्पण करणारे हे सादरीकरण असून हा ‘जावा ४२’ या मालिकेतील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या मालिकेतील ‘४२’ आणि ‘४२ बॉबर’ यांसारख्या मॉडेल्सनी आतापर्यंत अनेक रायडर्सना मोहित केले आहे.

या व्यतिरिक्त, ‘जावा येझदी मोटरसायकल’ने पुण्यात दोन ‘जावा येझदी कॅफे’ उभे केले आहेत. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस पुण्यात १० टचपॉइंट्स उभे करून नेटवर्क विस्तारण्याची कंपनीची योजना आहे. सध्याच्या नवीन कॅफे फॉरमॅटसह, या ब्रँडची शहरात आठ विक्री व सेवा टचपॉइंट्स आहेत. आपल्या या नेटवर्कचा झपाट्याने विस्तार करून त्याद्वारे पुण्याच्या मोटरसायकल संस्कृतीला बळकटी देण्याचा या ब्रँडचा उद्देश आहे.

याशिवाय, ग्राहकांचा खरेदीचा प्रवास पूर्णपणे डिजिटल आणि अखंड बनविण्यासाठी या ब्रँडने फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी केली आहे. भारतातील प्रिमियम मोटरसायकल मार्केटमध्ये हे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ओळखले जाते.

जावा येझदी मोटरसायकलचे सहसंस्थापक अनुपम थरेजा म्हणाले, “२०२४ जावा ४२ हे मॉडेल मोटरसायकल अभियांत्रिकीमधील डिझाइनला महत्त्व देण्याच्या आमच्या दृष्टीकोनाला प्रतिबिंबित करते. आम्ही कामगिरी, शैली आणि अचूकता यांचे परिपूर्ण मिश्रण तयार करण्यासाठी ‘किंमत व कामगिरी यांच्या गुणोत्तराची सीमा पार केली आहे. भारतात निओ-क्लासिक्स मोटरसायकलींचे आम्ही प्रणेते आहोत. त्या अनुषंगाने ‘४२ एफजे’ हे मॉडेल आमच्या आव्हानात्मक भावनांना आणि नाविन्यतेच्या दृष्टीकोनाला मूर्त रूप देते. सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या दिवसांत, मोकळ्या रस्त्यांविषयीचे प्रेम आणि साहसी भावना यांनी बांधलेल्या समुदायाला एकत्र आणण्याचे आमचे ध्येय आहे. परंपरेचे, सामायिक अनुभवांचे आणि नवीन सुरुवातीचे मिश्रण हेच ‘जावा ४२ लाइफ’ मालिकेचे खरे सार आहे.”

या मोटारसायकलचे नाव जावाचे दूरदर्शी संस्थापक फ्रँटिसेक जेनेसेक यांच्यापासून प्रेरित आहे. आजच्या मोटरसायकल रायडर्ससाठी एक धाडसी, आधुनिक राइडिंगचा अनुभव प्रदान करण्याचा यामागे उद्देश आहे. ‘जावा ४२ लाइफ’ मालिकेत हे नवीन मॉडेल सादर करून, ‘जावा’ने २०२४ या वर्षात नवीन मानके प्रस्थापित करण्यासाठी डिझाइन, शक्ती, बाजारातील उपस्थिती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा संयोग साधला आहे.

उत्पादनाची वैशिष्ट्ये :

जबरदस्त डिझाइन

‘३५० जावा ४२ एफजे’ हे नवे मॉडेल जुन्या क्लासिक जावाची आठवण करून देते आणि निओ-क्लासिक मोटरसायकल असे रूप धारण करते. अॅनोडाइज्ड, ब्रश्ड ॲल्युमिनियम फ्युएल टँक क्लॅडिंग हे या मोटरसायकलचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य आहे. या प्रकारच्या मोटरसायकलींमध्ये ते प्रथमच सादर झाले आहे. या फिनिशमुळे या बाइकविषयीचे आकर्षण वाढले आहे. विविध रंगांचे उपलब्ध पर्याय आणि जावा ब्रँडिंगचे पर्याय यांच्या माध्यमातून ग्राहकांना आपले वैयक्तिकरण करण्यास वाव मिळतो.

टँक क्लॅडिंगला पूरक असणारे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ॲल्युमिनियम हेडलॅम्प होल्डर, ग्रॅब हँडल्स आणि ॲल्युमिनियम फूट पेग्स! मोटरसायकलमधील हे घटक आधुनिक कारागिरी दर्शवितात, त्याचबरोबर ‘जावा’चा वारसाही प्रदर्शित करतात.

गोलाकार रचना आणि काळी आकृती ही ४२ एफजे मालिकेची वैशिष्ट्ये ‘जावा’चा समृद्ध वारसा जपतात. ‘ऑफ-सेट फ्युएल कॅप’मुळे पेट्रोलच्या टाकीच्या डिझाइनला एक अनोखा टच मिळतो. या मोटरसायकलचे रुंद, सपाट सीट रायडरला आराम देते. त्याच्या प्रीमियम स्टिचिंगसह ते विशिष्ट स्टाईलही राखते.

मूळ ‘जावा’ची आठवण करून देत असलेल्या या नवीन मॉडेलमध्ये काळानुरूप अनेक आधुनिक वैशिष्ट्यांचाबी समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ‘जावा’चा तो परिचित आवाज निर्माण करणारा, वरच्या बाजूस कललेला एक्झॉस्ट पाईप आहे. तसेच एलईडी लाइटिंगचे पॅकेजही यात देण्यात आले आहे. संपूर्ण डिजिटल असलेले इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, यूएसबी चार्जिंग पोर्ट यांमुळे रायडरला आवश्यक त्या सुविधा मिळतात. सध्याचे तंत्रज्ञान आणि पारंपारिक सौंदर्य यांचे हे अनोखे मिश्रण खूपच आकर्षक आहे.

‘३५० जावा ४२ एफजे’ हिचे डिझाईन ब्रँडची बांधिलकी दर्शवते. क्लासिक मोटरसायकलच्या चाहत्यांना आणि समकालीन वैशिष्ट्यांची प्रशंसा करणाऱ्यांना आकर्षित करणारा राइडिंग उत्कृष्ट अनुभव ही बाईक देते.

जबरदस्त इंजिन आणि कामगिरी

‘जावा ४२ एफजे’च्या केंद्रस्थानी नवीन अत्याधुनिक ‘३५० अल्फा-२’ हे इंजिन आहे. या पॉवरहाऊसमधून २९.२ पीएस आणि २९.६ एनएम इतकी शक्ती निर्माण होते. उत्कृष्ट अॅक्सरलेशन, स्मार्ट गियर-आधारित मॅपिंग, सिक्स-स्पीड गिअरबॉक्स आणि ‘ए अॅंड एस’ क्लच तंत्रज्ञान अशी या मोटरसायकलची दमदार वैशिष्ट्ये आहेत. मुळात ‘४२ एफज

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता आणि सुरक्षिततेसाठी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची तांबडी जोगेश्वरी देवीला प्रार्थना

पुणे दि.९: दिवसेंदिवस पुणे शहराची लोकसंख्या वाढत असून त्याचा वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत आहे, यामुळे पुणेकरांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यातून पुणेकरांची मुक्तता होऊन पुणे सुरक्षित होऊ देत अशी प्रार्थना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील ग्रामदैवत श्री तांबडी जोगेश्वरी देवीकडे केली.

नवरात्रीच्या निमित्ताने डॉ. गोऱ्हे यांनी श्री तांबडी जोगेश्वरी देवी दर्शन घेऊन देवीची विधिवत पूजा करत देवीला महावस्त्र, गुळाचा नैवेद्य, पुष्पहार अर्पण केला.

यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीचे राजू कुंभार, ज्ञानेश्वर बेंद्रे, पल्लवी बेंद्रे, आनंद गोयल, शिवसेना महिला आघाडीच्या सुदर्शना त्रिगुणाईत यांसह मोठ्या संख्येने महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.

कोथरूडमध्ये महा कन्यापूजन कार्यक्रमाचे आयोजन

पाच हजार पेक्षा जास्त मुलींचे होणार पूजन

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

पुणे-नवरात्रोत्सव काळात कन्यापूजनाचे वेगळे महत्त्व असून, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुड मध्ये महा कन्या पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या अद्भूत सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात नामदार पाटील यांनी केले आहे.

धार्मिक श्रद्धांनुसार,नवरात्रोत्सव काळातील नवमी तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दुर्गा देवीच्या नऊ रूपांची मुलींच्या रूपात पूजा केली जाते. या उपासनेने दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि भक्तांच्या जीवनात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. यासोबतच कन्यापूजना शिवाय नवरात्रीची उपासना यशस्वी होऊ शकत नाही, अशी देखील धारणा आहे.

त्यामुळे नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आणि उत्सवाच्या निमित्ताने उपासनेचे फळ सर्वांना लाभावे यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुड मध्ये महा कन्यापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील हे देखील सात मुलींचे पूजन करणार आहेत. मंत्रोच्चाराच्या घोषात, आध्यात्मिक वातावरणात दिनांक ११ ऑक्टोबर रोजी कोथरुड मधील शुभारंभ लॉन्स येथे सायंकाळी ४.३० ते ७ वेळेत हा नयनरम्य सोहळा संपन्न होणार आहे.

शक्ती, बुद्धी आणि धनधान्य देणार्‍या मातांची रूपे वेगवेगळी आहेत. लहान मुलींमध्ये ही रूपे दिसतात. कन्या हे देवीचे स्वरूप असते. तिच्या जन्माने प्रत्येक कुटुंबात सुख, समृद्धी आणि भरभराट होते. नवरात्रोत्सव काळात तिची पूजा म्हणजे साक्षात, आदिमायेची पूजा करणे आहे. मागील पाच वर्षांत कोथरुड मधील मुलींचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून हजारो मुलींचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यासोबतच मानसी सारख्या उपक्रमातून वस्ती भागातील मुलींच्या व्यक्तीमत्व विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कोथरूड मध्ये आयोजित महा कन्यापूजन सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले.