पुणे, 9 ऑक्टोबर 2024
भारतीय डाक विभागामार्फत राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त पुण्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत दिनांक 07 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2024 दरम्यान डाक विभागाच्या वतीने मेल व पार्सल दिवस, फिलॅटेली दिवस, जागतिक टपाल दिवस, अंत्योदय दिवस तसेच वित्तीय सशक्तीकरण दिवस साजरे करण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे डाक विभागाचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी दिली.
1874 साली स्थापन झालेल्या युनिव्हर्सल पोस्टल युनियन (यूपीयू)च्या वर्धापन दिनानिमित्त 9 ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. जागतिक टपाल दिनाचा उद्देश हा जनसामान्य आणि व्यवसायांच्या दैनंदिन जीवनात डाक विभागाची भूमिका तसेच जागतिक, सामाजिक आणि आर्थिक विकासात त्याचे योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. या वर्षीच्या जागतिक पोस्ट दिनाची थिम ‘150 Years of Enabling Communication and Empowering Peoples Across Nations’ ही आहे.
या वर्षी, राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करण्याची रूपरेखा भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात भारतीय डाक विभागच्या उदयोन्मुख भूमिकेच्या अनुषंगाने करण्यात आली आहे. मुलींच्या सक्षमीकरणावर भर देऊन वित्तीय सशक्तिकरण, DNK सारख्या मेल आणि पार्सल सेवा, दुर्गम, डोंगराळ, सेवा नसलेल्या आणि बँक नसलेल्या भागात ऑन-द-स्पॉट बँकिंग सेवा यावर भर दिला जाणार आहे.
दहा पोस्टल डिव्हिजन, एक रेल्वे मेल सर्व्हिस डिव्हिजन, एक मेल मोटार डिव्हिजन,एक सिव्हील डिव्हिजन आणि 31 पोस्टल सब डिव्हिजन यांनी तयार झालेल्या पुणे टपाल क्षेत्राच्या कार्यकक्षेमध्ये पुणे, अहमदनगर, सातारा आणि सोलापूर असे चार जिल्हे समाविष्ट आहेत. या सर्व विभागांचे कार्य सुचारू पद्धतीने चालविण्यासाठी सुमारे सात हजार कर्मचारी दहा हेड पोस्ट ऑफिसेस 486 सब पोस्ट ऑफिसेस, 2183 ब्रांच पोस्ट ऑफिसेस, 18 मेल ऑफिसेस च्या माध्यमातून आपली सेवा देतात.
राष्ट्रीय टपाल सप्ताहादरम्यान साजऱ्या केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा सारांश खालीलप्रमाणे आहे:
7 ऑक्टोबर – मेल आणि पार्सल दिवस:
- मेल आणि पार्सल च्या अंतर्गत घेतलेल्या नवीन ग्राहक उपयोगी योजनांची ग्राहकांना माहिती देण्यासाठी आणि प्रदान केल्या जात असलेल्या सेवांबद्दल ग्राहकांचा अभिप्राय मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक मेळाव्याचे आयोजन प्रादेशिक आणि विभागीय स्तरावर पुणे, सोलापूर, श्रीरामपूर, सातारा, अहमदनगर येथे आयोजित केले गेले.
- डाक घर निर्यात केंद्रावर जागरूकता कार्यक्रम: निर्यातदारांसाठी विविध स्तरावर कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या आहेत आणि डाक घर निर्यात केंद्राकडून दिले जाणारे फायदे आणि सुविधा निर्यादारापर्यंत पोहोचवल्या गेल्या आहेत.
8 ऑक्टोबर- फिलॅटेली दिवस:
- “पत्रलेखनाचा आनंद: डिजिटल युगात पत्रांचे महत्त्व” या विषयावर शाळांमध्ये संवादात्मक सत्र संगमनेर, पाचगणी, पंढरपूर येथे आयोजित केले गेले.
- प्रश्नमंजुषा आणि इतर उपक्रम पुणे सिटी वेस्ट विभागांतर्गत येणाऱ्या निवडक ठिकाणी आयोजित केले गेले.
- फिलॅटेलीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि व सदर छंदाला प्रसिद्धी प्रदान करण्यासाठी सेमिनार आयोजित केले गेले.
9 ऑक्टोबर – जागतिक टपाल दिवस:
- पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असलेल्या डिजिटल डिस्प्लेमध्ये UPU वर्ल्ड पोस्ट डे पोस्टर आणि राष्ट्रीय पोस्टल सप्ताह 2024 चे बॅनर प्रदर्शित केले गेले आहेत.
- यावर्षीची राष्ट्रीय डाक दिनाची थीम: ‘150 Years of Enabling Communication and Empowering Peoples Across Nations’
- पोस्टाथॉन वॉक रिले: “फिट पोस्ट, फिट इंडिया” या संदेशाचा प्रचार करणारा राष्ट्रव्यापी चालण्याचा कार्यक्रम पुणे शहर व सोलापूर शहर येथे आयोजित केले आहेत.
- “एक पेड माँ के नाम” साठी वृक्षारोपण समारंभासह, पोस्टाथॉन कार्यक्रम आयोजित केला गेला.
10 ऑक्टोबर – अंत्योदय दिवस :
- आदिवासी,डोंगराळ आणि ग्रामीण/दुर्गम भागात आणि शहरी झोपडपट्ट्यांमध्ये जनजागृती सह आधार नोंदणी आणि आधार अद्ययावतन शिबिरे आयोजित केली जातील.
11 ऑक्टोबर – मुलींच्या सक्षमीकरणावर भर देणारा वित्तीय सशक्तिकरण दिवस:
- मूलींचे सबलीकरण व सशक्तीकरण: आर्थिक साक्षरता आणि आर्थिक समावेशन कार्यक्रमांद्वारे मुलींच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिला जाईल.
- डाक चौपाल: प्रत्येक उपविभागात तीन (३) डाक चौपाल आयोजित केले जातील डाक चौपालच्या कक्षेत विशेष डाक विमा पॉलिसी वितरण/ मार्केटिंग मोहिमेचे आयोजन केले जाईल.
- आर्थिक साक्षरता सत्र आयोजित करणे.
पुणे डाक क्षेत्रामध्ये आंबेगाव बुद्रुक, पिंपळे सौदागर, कोंढवा, चऱ्होली, शिवणे येथे नवीन पोस्ट ऑफिस त्याचप्रमाणे हडपसर, पर्वती, बावधन या भागामध्ये नवीन नोडल डिलिव्हरी सेंटर चालू करण्याचे प्रस्ताव विचाराधीन आहेत. खडकी येथे ट्रान्सशिपमेंट सेंटर चालू करून एकाच छताखाली पोस्ट ऑफिस,पार्सल हब , स्पीड पोस्ट व रजिस्टर हब इत्यादी ऑफिस येतील.
टपाल विभागामार्फत मेल, बँकिंग, इन्शुरन्स अशा विविध क्षेत्रामध्ये सेवा प्रदान केल्या जातात. त्याकरिता कोअर बँकिंग सोल्युशन, डिजिटल एडव्हान्समेंट ऑफ रुरल पोस्ट ऑफिसेस फॉर न्यू इंडिया, डायनामिक क्यू आर कोड अशा तंत्रज्ञानांचा उपयोग करून सेवा अधिक समाजाभिमुख केल्या आहेत. भारतातील शेवटच्या खेड्यापर्यंत टपाल वितरण तर टपाल विभाग करतच असतो. त्याचबरोबर पुणे क्षेत्रातील 9 पार्सल पॅकिंग युनिट आणि डाक निर्यात केंद्रांमुळे परदेशात पत्र आणि पार्सल (रजिस्टर तसेच स्पीड पोस्ट) पाठविण्याच्या सेवेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कंपन्या आणि संस्था मोठ्या प्रमाणावर (बल्क) टपाल पाठविण्यासाठी टपाल विभागालाच पसंती देत आहेत. पार्सल हब मुळे पार्सल हंड्लिंग अधिक सोपे आणि जलद होते.
तळागाळापर्यंत कोणत्याही बँकेतील पैसे घरपोच देण्याची AePS सुविधा केवळ भारतीय टपाल खात्यामार्फत राबविली जाते. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने गेल्या सहा वर्षात सुमारे 32 लाख बँक खाती, लाखो सामान्य विमा विविध नामांकित विमा कंपन्या (बजाज, टाटा, निवा बुपा, स्टार हेल्थ) यांचे सोबत टाय अप करून उघडल्या आहेत , हजारो गृहकर्ज आणि वाहन कर्ज ,लाखो बालकांचे आधार कार्ड तयार करणे तसेच आधार कार्डमध्ये मोबाईल किंवा पत्याचे बदल करणे इत्यादी विविध सेवा प्रदान करत जनमानसावर आपली छाप उमटविली आहे.पुणे क्षेत्राने 74.38 लाख पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक खाती सुरु ठेवत महाराष्ट्र सर्कल मध्ये समाविष्ट असलेल्या सहा क्षेत्रामध्ये (गोवा, औरंगाबाद, नागपूर, नवी मुंबई, मुंबई आणि पुणे) आघाडी घेतली आहे.
भारत सरकारने टपाल विभागाच्या संदर्भात झालेल्या ब्रिटीशकालीन कायद्यामध्ये योग्य ते बदल घडवून ते अधिकाधिक समाजोपयोगी आणि सुलभ करण्यास मदत केली आहे. तसेच भौतिक स्थाने आणि त्यांचे डिजिटल प्रतिनिधित्व यांच्यातील अंतर भरून काढण्यासाठी डिजिटल स्वरूपातील नवे पिन कोड (डिजिटल पोस्टल इंडेक्स नंबर (DIGIPIN) ) विकसित करण्यात येत आहेत.
NPS वात्सल्य ही Savings cum Pension योजना अठरा वर्षाखालील मुलांसाठी www.indiapost.gov.in/Financial/pages/Content/NPS.aspx या URL वर सुरू करण्यात आली आहे.
डाक चौपाल, डाक समुदाय विकास कार्यक्रम (DCDP) हाती घेऊन टपाल विभागाने अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. एक पेड मां के नाम, भित्तीचित्र अशा नाविन्यपूर्ण योजना आखून सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी देखील टपाल विभागाने पुढाकार घेतला आहे. जनतेच्या जीवनात आणि विविध व्यवसायांमध्ये योगदान देणे आणि आपल्या भूमिकेसंदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे यासाठी टपाल विभाग कटिबद्ध आहे. तरी या उपक्रमांचा सर्वसामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागामार्फत करण्यात आले आहे.