Home Blog Page 569

जा मोदींना जाऊन सांग,शिवमोग्गाच्या मंजुनाथ यांना मारल्यावर त्यांच्या पत्नीला आतंकवादी म्हणाला…

काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनी सांगितले कि,’, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.

नवी दिल्ली- मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यातील एका ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मंजुनाथ राव असे या पीडितेचे नाव आहे. ते त्यांची पत्नी पल्लवी आणि त्यांचा मुलगा अभिजेय यांच्यासोबत कुटुंबासह सुट्टीवर गेले होते. मंजूनाथ यांची पत्नी पल्लवी यांनी या दहशतवादी हल्ल्याचा थरकाप उडवणारा प्रसंग कथन केला. आम्ही तिघे म्हणजे मी, पती आणि आमचा मुलगा तिघेही काश्मीर फिरायला गेलो होतो. साधारण दुपारचे दीड वाजले असतील. आम्ही त्यावेळी पहलगाममध्ये होतो. अचानक एका गटानं गोळ्या झाडायला सुरुवात केली. माझ्या नवरा माझ्या डोळ्यांसमोर मरण पावला. हे सगळं माझ्यासाठी दुस्वप्न आहे, असं पल्लवी यांनी सांगितलं.….पल्लवी यांनी सांगितलं.
हल्ल्यानंतर काही स्थानिक माझ्या मदतीसाठी धावले. तीन जणांनी मला वाचवलं, असंही पल्लवी यांनी सांगितलं. पल्लवी यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोर हे हिंदूंना टार्गेट करत असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसत होते. तीन ते चार जणांनी आमच्यावर हल्ला केला. माझ्या पतीची गोळ्या झाडून हत्या केली. माझ्या डोळ्यांदेखत त्यांनी जीव सोडला. तुम्ही माझ्या नवऱ्याला आधीच मारलं आहे. मलाही मारून टाका, असं मी त्यांना सांगितलं. त्यावर आम्ही तुला मारू शकत नाही. जा, जाऊन मोदींना सांग, असं त्यातील एक हल्लेखोर म्हणाला.


अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन व्हॅली परिसरात हा हल्ला झाला, जिथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये अनेक जण जखमी झाले आणि अनेक जणांचा मृत्यू झाला.कर्नाटक पोलिस जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या संपर्कात आहेत
दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पहलगाममधील बैसरन व्हॅलीतील डोंगरावरून दहशतवादी खाली आले आणि त्यांनी पर्यटकांवर गोळीबार सुरू केला, जे या ठिकाणी वारंवार येतात, कारण हिरव्यागार कुरणांमुळे ते ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखले जाते.या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय लष्कराच्या व्हिक्टर फोर्ससह सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.


अमित शाह श्रीनगरला आहेत,दरम्यान, पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह श्रीनगरला रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी बोलून केंद्रशासित प्रदेशाला भेट देण्यास सांगितल्यानंतर लगेचच शाह खोऱ्यात रवाना झाले.
शाह यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आणि ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की त्यांनी पंतप्रधानांना या घटनेची माहिती दिली आहे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेतली आहे.मृतांचा आकडा अद्याप निश्चित केला जात आहे, असे जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले, तर दहशतवादी हल्ला “अलिकडच्या वर्षांत नागरिकांवर केलेल्या कोणत्याही हल्ल्यापेक्षा खूप मोठा” असल्याचे वर्णन केले.अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स भारत दौऱ्यावर असताना हा हल्ला दुपारी ३ वाजताच्या सुमारास झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ४७ सीआरपीएफ जवान शहीद झाल्यानंतर काश्मीरमधील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असू शकतो.


पत्नी मुलांसमोरच दहशत वाद्यांनी घातल्या IB अधिकाऱ्याला गोळ्या

नवी दिल्ली-

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर कर्नाटकमधील जोडप्यातील पतीला त्याच्या पत्नीसमोरच गोळ्या घालण्यात आल्या.मात्र आता या हल्ल्या संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये केंद्रीय गुप्तचर संघटना म्हणजे IB मध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यालाही गोळ्या घालण्यात आल्या आहेत. हा अधिकारी मूळचा हैदराबादचा असून कुटुंबासमोरच त्याची हत्या करण्यात आली आहे.

गुप्तचर संघटनेत काम करणारा हैदराबादचा हा अधिकारी कुटुंबासोबत काश्मीरमध्ये गेला होता. त्यावेळी तो एक रील शूट करत होता. त्या दरम्यान त्याला गोळ्या घालण्यात आल्या. त्याच्या कुटुंबासमोरच दहशतवाद्यांनी त्याला गोळ्या घातल्या. यावेळी त्या अधिकाऱ्याची पत्नी आणि मुले समोर होती अशी माहिती आहे.

गेल्या काही दिवसात ते काश्मीरमध्ये कार्यरत होते. या दरम्यान ते पहेलगाममध्ये कुटुंबासोबत फिरायला गेले. त्याचवेळी त्याची हत्या करण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत 28 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. कलम 370 हटवल्यानंतर हा एक मोठा हल्ला आहे. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ संघटनेने जबाबदारी स्वीकारली आहे.

देश विदेशातून हल्ल्याची गंभीर दखल,मेहबूबा मुफ्तींकडून काश्मीर बंदचे आवाहन.

अनुपम खेर म्हणाले,’ दहशतवाद्यांना असा धडा शिकवायला हवा की पुढच्या सात जन्मात असे कृत्य करण्याचे त्यांचे धाडस होणार नाही

मुंबई- पहलगाम येथी पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याची देशातूनच नव्हे तर विदेशातूनही गंभीर दखल घेतली जात असून अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आहे.
भारताच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले- उषा (पत्नी) आणि मी भारतातील पहलगाम येथे झालेल्या विनाशकारी दहशतवादी हल्ल्यातील बळींबद्दल शोक व्यक्त करतो. गेल्या काही दिवसांपासून, या देशाचे आणि त्याच्या लोकांच्या सौंदर्याने आपण भारावून गेलो आहोत. या भयानक हल्ल्यात आमच्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत.

काश्मीरच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी उद्या काश्मीर बंदचे आवाहन केले आहे. मात्र यावेळी येथे असलेल्या पर्यटकांची गैरसोय होता कामा नये असेही त्यांनी म्हटले आहे. पर्यटकांवरील भयानक दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जम्मूच्या चेंबर अँड बार असोसिएशनने उद्या संपूर्ण बंदचे आवाहन केले आहे. पहलगाममधील क्रूर हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप जीवांच्या सन्मानार्थ या बंदला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व काश्मिरींना एकजुटीने एकत्र येण्याचे आवाहन करतो.हा केवळ काही निवडक लोकांवर हल्ला नाही तर तो आपल्या सर्वांवर हल्ला आहे.आम्ही दुःख आणि संतापाच्या भावना व्यक्त करतो आणि निष्पापांच्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी या बंदला जोरदार पाठिंबा देतो.

अभिनेता आणि PM नरेंद्र मोदी यांचे स्नेही अनुपम खेर

दहशतवाद्यांना असा धडा शिकवायला हवा की पुढच्या सात जन्मात असे कृत्य करण्याचे त्यांचे धाडस होणार नाही

आरएसएसने म्हटले— हा देशाच्या एकता आणि अखंडतेवर हल्ला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) पहलगाम हिंसाचारावर शोक व्यक्त केला आहे. संघाने पोस्टमध्ये म्हटले आहे- जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला क्रूर दहशतवादी हल्ला अत्यंत निंदनीय आणि वेदनादायक आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. हा हल्ला देशाच्या एकता आणि अखंडतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी सर्व मतभेदांच्या पलीकडे जाऊन याचा निषेध केला पाहिजे. सरकारने सर्व पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. आणि या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा करण्यासाठी सरकारने लवकरच योग्य ती पावले उचलावीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी-जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना न्याय मिळवून दिला जाईल… त्यांना सोडले जाणार नाही! त्यांचा दुष्ट अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल.

राहुल गांधी -जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत निंदनीय आणि हृदयद्रावक आहे.
मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीची आशा करतो.संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एकजूट आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी, सरकारने आता जबाबदारी घेतली पाहिजे आणि भविष्यात अशा क्रूर घटना घडू नयेत आणि निष्पाप भारतीयांना अशा प्रकारे आपले प्राण गमवावे लागू नयेत यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.

नावे विचारून घातल्या गोळ्या,महाराष्ट्र आणि पुण्यातील पर्यटकांवर देखील हल्ला

पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली. महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहेदेवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

पहलगाम : जम्मू-काश्मीरच्या अति-पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. द रेसिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात किमान २७ पेक्षा अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि पुण्यातील पर्यटकांवर देखील हल्ला झाला असून पुण्यातील कर्वेनगरमधील दोन कुटुंबातील पुरुषांना गोळ्या चाटून गेल्या आहेत, त्यामुळे ते जखमी झाल्याचे वृत्त आहे . गनबोटे आणि जगदाळे कुटुंबाची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पुणे आणि महाराष्ट्रातील पर्यटकांचे नातेवाईक प्रचंड काळजीत पडले असून आपापल्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू होते.

आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे, संगीता गनबोटे यांच्यावर हा हल्ला झाला आहे. ही कुटुंब मुळची बारामती तालुक्यातील असून सध्या पुण्यात कर्वेनगरमध्ये वेदान्त नगरीजवळ राहात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यातील संतोष आणि कौस्तुभ यातील एकाच्या अंगाला गोळ्या लागल्या आहेत. हल्ला दुपारी १२ वाजेच्या सुमारास ‘बैसारन’ नावाच्या हिरव्यागार कुरणाजवळ झाला. येथे देशाच्या विविध भागांतील पर्यटक फिरण्यासाठी आले होते. अचानक अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पर्यटकांवर बेधुंद गोळीबार सुरू केला. आधी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारण्यात आले. त्यानंतर त्यांना गोळ्या घालण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. गोळ्यांच्या आवाजाने परिसरात एकच गोंधळ उडाला आणि लोकांनी पळापळ सुरू केली. जखमींना तात्काळ अनंतनाग व श्रीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरक्षा दलांनी परिसर सील करून शोधमोहीम सुरू केली आहे.मृतांमध्ये महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईमधील पर्यटक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून काही पर्यटक गुजरातमधील सूरतमधील आहेत. तर, उर्वरित पर्यटक हरियाणा आणि दिल्ली येथून आले होते, असे यंत्रणांकडून सांगण्यात आले. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे आणि जखमींना शक्य तेवढी वैद्यकीय मदत देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने जम्मू काश्मीरला रवाना झाले आहेत. सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शाह यांच्याशी फोनवर चर्चा करून तात्काळ पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करीत ओमर अब्दुल्ला यांना याविषयी आवश्यक असलेली सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले. तसेच, जगदाळे आणि गणबोटे कुटुंबावर हल्ला झाल्याची माहिती दिली.

टीआरएफ ही लष्कर-ए-तोयबाची संलग्न दहशतवादी संघटना असून गेल्या काही वर्षांत या संघटनेने अनेक नागरिकांवर आणि बाहेरून आलेल्या कामगारांवर हल्ले केले आहेत. धर्माच्या आधारे पर्यटकांवर थेट हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे आणि यामुळे पर्यटन व्यवसायाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. जगदाळे आणि गनबोटे कुटुंबाच्या मी संपर्कात आहे. यासोबतच महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षेच्या आणि मदतीच्या अनुषंगाने आमचे प्रयत्न सुरू आहेत. कौस्तुभ यांच्या मुलीशी माझा संपर्क झाला आहे. त्यांना आवश्यक असलेली वैद्यकीय व अन्य मदत, उपचार दिले जात आहेत. या मुलीसमोरच तिच्या वडिलांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कडक शब्दांत याची निंदा केली आहे. आवश्यक ती सर्व कडक कारवाई केली जाणार आहे. गृहमंत्री अमित शाह तातडीने काश्मीरमध्ये रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी आम्ही काळजीने सर्व गोष्टी करीत आहोत.

  • मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला-पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याबद्दल मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तीव्र दुःख आणि दुःख व्यक्त केले आहे.
या हल्ल्याला “घृणास्पद” असे वर्णन करून, मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करणे हे क्रूरता आणि अमानुषतेचे कृत्य आहे.”आमच्या पर्यटकांवर झालेला हा हल्ला घृणास्पद आहे. या हल्ल्याचे गुन्हेगार प्राणी आहेत – अमानवी आणि तिरस्कारास पात्र आहेत. निषेधाचे कोणतेही शब्द पुरेसे नाहीत,” असे मुख्यमंत्री यांनी एका कडक शब्दात म्हटले आहे.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सहानुभूती व्यक्त केली आणि जखमींच्या जलद पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना केली.मुख्यमंत्री वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत आणि आरोग्यमंत्री सकिना इटू यांच्याशी बोलले आहेत, ज्या जखमींवर उपचार आणि व्यवस्थेचे निरीक्षण करण्यासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.
त्यांनी पुढे जाहीर केले की ते परिस्थितीचे वैयक्तिकरित्या निरीक्षण करण्यासाठी आणि पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्व शक्य ती मदत मिळावी यासाठी तात्काळ श्रीनगरला परतणार आहेत.”मी माझ्या सहकाऱ्याशी बोललो आहे
@sakinaitooआणि ती जखमींच्या व्यवस्थेची देखरेख करण्यासाठी रुग्णालयात गेली आहे. मी ताबडतोब श्रीनगरला परत जाईन,” असे ते म्हणाले.तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाम पर्यटन रिसॉर्टमधील दुःखद घटनेबद्दल मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी फोनवर बोलले.

काश्मीरात पुलवामानंतर सर्वात मोठा हल्ला, 26 मृत्यू:अतिरेक्यांनी पर्यटकांना नाव विचारून गोळी घातली;महाराष्ट्रासह इस्रायल- इटलीचे पर्यटक होते

पोलिसांच्या वेशात दहशतवादी.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशवाद्यांनी (Terrorist) पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात 27 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथे शस्त्रधारी दोन ते तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका ग्रुपवर भ्याड हल्ला केला. त्यामध्ये, अनेक पर्यटकांचा जीव गेला असून काही गंभीर जखमी देखील झाले आहेत. दहशतवाद्यांनी 40 राऊंड फायर केल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री यांच्याच फोनवरुन बोलणे झाले. त्यानंतर, गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) तातडीने श्रीनगरकडे रवाना झाले आहेत.२०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक इटालियन आणि एक इस्रायली पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. उर्वरित पर्यटक गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील आहेत.

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने आपण व्यथित झालो आहोत. मृतांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत. या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करू, असा इशाराच गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवरुन दिला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील त्यांनी या घटनेची माहिती दिली. त्यानंतर, संबंधित अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली असून श्रीनगरला गेल्यावर सर्व सुरक्षा एजन्सींसोबत तातडीची सुरक्षा आढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यासाठी, आपण श्रीनगरला रवाना होत असल्याचेही अमित शाह यांनी ट्विटरवरुन सांगितले. दरम्यान, अमित शाह दिल्लीतून श्रीनगरला रवाना झाले आहेत.

जखमींची नावे १. विनो भट्ट, गुजरात २. एस बालचंद्रू, महाराष्ट्र ३. अभिजवन राव, कर्नाटक ४. संतरू, तामिळनाडू ५. साहसी कुमारी, ओडिशा ६. डॉ. परमेश्वर ७. माणिक पाटील ८. रिनो पांडे

पहलगाममध्ये पोलिसांच्या वेषात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना आपला निशाणा बनवला. पर्यटकांची नावे विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या वेळी एक नवविवाहित जोडपेदखील दहशतवाद्यांच्या हल्लातून सुटले नाही. या जोडप्यातील पुरुषाला आधी त्याचा धर्म विचारला आणि मग त्याला गोळ्या घालण्यात आल्याचं त्याच्या पत्नीने सांगितलं. ही महिला आपल्या पतीला वाचवण्यासाठी लोकांना आवाहन करत होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी खिन्न मनाने ती मृत पतीच्या शेजारी बसली.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांवर देखील मोठं संकट ओढवलं आहे. एकूण जखमी पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा समावेश आहे. माणिक पाटील आणि एस भालचंद्र अशी दोघांची नाव समोर आली आहेत. दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे
पोलिसांकडून काश्मीरमधील पर्यटकांसाठी 24 तास मदत सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अनंतनाग येथील पोलीस कंट्रोल रुममधून ही सेवा पुरविण्यात आली असून व्हॉट्सअप आणि टेलिफोन नंबरही जारी करण्यात आले आहेत. पर्यटकांनी खालील नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मो – 9596777669
01932225870
व्हॉट्सअप – 9419051940

काश्मीर मधील नागरिकांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून हा भ्याड हल्ला असल्याचे म्हटले आहे. आम्ही प्रथम हिंदुस्थानी नंतर काश्मिरी असल्याचे त्यांनी म्हटले आहे आणि हल्लेखोरांना तातडीने पकडण्यात यावे असे सांगून कॅण्डल मार्च काढून हल्ल्यात बळी पद्लेलेया पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली , कोणताही काश्मिरी नागरिक या हाल्लेखोरांना मदत करणार नाही असेही म्हटले आहे.

काँग्रेस नेत्यांनी महापालिकेने जमीनदोस्त केलेल्या विलेपार्लेतील जैन मंदिर परिसराला दिली भेट.

विलेपार्लेतील दिगंबर जैन मंदिर पाडून भाजपा सरकारने जैन बांधवांच्या भावना पायदळी तुडवल्या: हर्षवर्धन सपकाळ.

मुंबई, दि. २२ एप्रिल २०२५
भाजपाच्या राज्यात मंदिर तोडले जात असताना सरकार मात्र मूग गिळून गप्प बसते ही लाजीरवाणे आहे. मंदिर पाडण्यास एकीकडे न्यायालय स्थगिती देत असताना दुसरीकडे महापालिकेचे अधिकारी मंदिर पाडतात, हे शासनाचे अपयश आहे. जैन मंदिर पाडून भाजपा सरकारने जैन बांधवांच्या भावना पायदळी तुडवल्या आहेत, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जमीनदोस्त केलेल्या विलेपार्लेतील जैन मंदिर परिसराला भेट देऊन जैन बांधवांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष व CWC सदस्य नसीम खान, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, ब्रिज दत्त, श्रीरंग बर्गे, विश्वजीत हाप्पे, आनंद सिंह, श्रीकृष्ण सांगळे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, जैन मंदिरात स्त्री पुरुष आराधना करत असताना तथाकथित महाराज आणून मंदिरातील मूर्ती काढून घेतल्या, यावेळी काही मूर्तींची तोडफोड झाली. राज्यात धार्मिक स्थळांवर कारवाईची शृंखला सुरु असताना जैन मंदिरही यात आले असून सरकार हे जाणीवपूर्वक करत आहे का? असा सवाल करत भाजपा सरकार संस्कृती बुडवायला निघाले आहे, पण मंदिर पाडणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देत काँग्रेस पक्ष या घटनेचा निषेध करत आहे असेही सपकाळ म्हणाले. मंदिर पाडले जात असताना जैन बांधवांनी शांतता पाळली. महात्मा गांधी यांच्या सत्य व अहिंसेच्या मार्गाने मंदिराचे सत्य घेऊन पुढे जाऊ असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

डॉ. घैसास व मंगेशकर हॉस्पिटलवर महिलेच्या मृत्यूप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी कायदा आणि खुनाचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा दाखल करा – अ‍ॅड. तौसिफ शेख

पुणे | २२ एप्रिल २०२५

तनिशा ऊर्फ इश्वरी सुशांत भिसे या अनुसूचित जातीतील गर्भवती महिलेचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे येथे आपत्कालीन वैद्यकीय उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. तनिशा ही जुळ्या मुलींच्या गर्भवती अवस्थेत गंभीर स्थितीत असताना हॉस्पिटलने केवळ आगाऊ रक्कम भरली नाही म्हणून तिला दाखल करण्यास नकार दिला. एका बाळासाठी १० लाख रुपये, म्हणजे एकूण २० लाख रुपये भरल्याशिवाय उपचार केले जाणार नाहीत, अशी अट टाकण्यात आली होती. या अमानवीय आणि बेजबाबदार वागणुकीमुळे तनिशाचा मृत्यू झाला आणि दोन नवजात मुलींना आईविना जगावे लागणार आहे.

इतके गंभीर प्रकरण असताना देखील, अलंकार पोलीस स्टेशन, पुणे येथे या प्रकरणी एफआयआर क्रमांक ६५/२०२५ नोंदविण्यात आला असला, तरी तो केवळ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१) – निष्काळजीपणामुळे मृत्यू – अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.

अ‍ॅड. तौसिफ शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सदरील प्रकरण हे केवळ निष्काळजीपणाचे नसून, एक सामाजिक भेदभाव आणि गुन्हेगारी हेतूने झालेली दुर्लक्षाची घटना आहे. मुख्य आरोपी डॉ. सुश्रुत घैसास हे उच्चवर्णीय असून, पीडिता ही अनुसूचित जातीतील असल्यामुळे हे प्रकरण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ अंतर्गत सखोल चौकशीस पात्र आहे.

अ‍ॅड. तौसिफ शेख यांनी एफआयआरमध्ये पुढील कलमे त्वरित समाविष्ट करण्याची मागणी केली आहे: कलम १०५ – ठार मारण्याचा दोष except murder (culpable homicide not amounting to murder) कलम १०९ सह कलम ६२ – खुनाचा प्रयत्न कलम ९१ – बाळ जिवंत जन्माला येऊ नये याचा हेतू कलमे १२५, ४९, ६१ – जीवितास धोका, सहभाग व कटकारस्थान त्याचबरोबर, डॉ. घैसास यांचा वैद्यकीय परवाना तत्काळ रद्द करावा, तसेच संबंधित हॉस्पिटलमधील सर्व वैद्यकीय कर्मचारी व प्रशासनाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

त्यांनी पुढे म्हटले की, “वैद्यकीय क्षेत्र हे सेवा भावी क्षेत्र असताना, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने फक्त रुग्णांच्या मजबुरीचा गैरफायदा घेत, केवळ खंडणी व पैशाची लूटमार केली. पैसे भरले नाहीत म्हणून रुग्णाला मृत्यूकडे ढकलणे — हे मानवतेला काळीमा फासणारे आहे. तनिशा भिसे यांचा मृत्यू ही फक्त एक घटना नाही — ही सामाजिक न्याय, वैद्यकीय नीतिमत्ता, आणि सर्वांना, विशेषतः वंचित व दुर्बल घटकांना, आपत्कालीन आरोग्यसेवा मिळावी याचा गंभीर प्रश्न आहे.” तसेच डॉ. सुश्रुत घैसास यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.अ‍ॅड. तौसिफ शेख यांनी स्पष्ट केले आहे की, जर त्वरित कारवाई झाली नाही, तर सर्व जबाबदार व्यक्तींविरुद्ध कोर्टात कायदेशीर कार्यवाही केली जाईल.

आळंदीत महात्मा गांधीजीच्या रक्षा विसर्जन स्तंभास धोका-तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून सांडपाणी वाहिनीसाठी दगडी घाटाची तोडफोड

पुणे 22 एप्रिल : तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून आळंदीच्या इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या दगडी घाटाची जेसीबीच्या मदतीने सरळ बे्रकर लावून खोदकाम सुरू आहे. आळंदी शहरातील सांडपाणी बंदिस्त नाल्यातून नेण्यासाठी सुरू असलेल्या या कार्यामुळे पावसाळ्यात महापूराच्या स्थितीमध्ये संपूर्ण घाटास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच येथील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या रक्षा विसर्जन स्तंभास ही धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी प्रशासनाने हे कार्य थांबवून योग्य नियोजन करावे. अशी मागणी येथील ग्रामस्थ व वारकर्‍यांनी केली आहे.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे, श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती आणि विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावर करोडो रुपये खर्च केले. त्यामाध्यमातून सार्वजनिक हितासाठी पर्यावरण सुधार आणि प्रदूषण नियंत्रण या दृष्टीकोनातून नियोजन बद्ध दगडी घाट बांधण्यात आले आहे. या घाटाच्या खालून सांडपाणी वाहून जाण्याकरिता स्वतंत्र भूमिगत गटरचे नदीपात्राच्या कडेने बांधकाम करण्यात आले आहे. असे असतांना संस्था किंवा संस्थेचे अधिकारी यांच्याशी चर्चा न करता रात्रीच्या वेळी या घाटाचे बांधकाम जेसीबी मशीन ने तोडफोड व खोदकाम केले आहे.


आळंदी शहरातील सांडपाणी पुंडलिक मंदिरालगत उघड्यावार वाहत होते. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून ते बंदिस्त करण्याचे कार्य सुरू आहे. ही सांडपाणी वाहिनी पुढे एसटीपी प्रकल्पास जोडली जाणार आहे. परिणाम सांडपाणी नदीत मिसळणार नाही. त्यामुळे सांडपाणी वाहिनीचे काम झाल्यावर घाटाचे काम पूर्ववत नगरपरिषदेकडून केले जाईल.
या संदर्भात माईर्स एमआयटीचे संचालक डॉ. महेश थोरवे यांनी असे सांगितले की, संस्थेने ज्या पद्धतीने दगडी घाट बांधकाम केले आहे. तसे न झाल्यास पावसाळ्यात महापूराच्या स्थितीमध्ये संपूर्ण घाटास धोका होऊ शकतो. यामुळे घाट खचून जीवितहानी होण्याची भिती आहे. तसेच या ठिकाणी राष्ट्रपिता म. गांधीजी यांचे रक्षा विर्सजन स्तंभास धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे हे खोदकाम थांबवून पर्यायी मार्ग काढावा.
श्रीक्षेत्र आळंदी परिसर विकास समितीच्या माध्यमातून साधारण ३५ ते ४० वर्षापासून आजपर्यंत संस्थेने अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने नदीच्या पूराचे पाणी व सांडपाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करून इंद्रायणी नदीच्या तीरावर कोटी रूपये खर्च करून न सार्वजनिक हितासाठी पर्यावरण सुधार आणि प्रदूषण नियंत्रण या दृष्टीकोनातून नियोजन बद्ध दगडी घाट बांधण्यात आले आहेत. या दगडी घाटाच्या खालून सांडपाणी वाहून जाण्याकरिता स्वतंत्र भूमिगत गटरचे नदीपात्राच्या कडेने बांधकाम करण्यात आले आहे. असे असतांनाा संस्था किंवा संस्थेचे अधिकारी यांचेशी चर्चा न करता रात्रीच्या वेळेसे जेसीबीच्या मदतीने दगडी घाटाचे बांधकाम फोडण्याचे काम चालू केले आहे.


या घाटावर संस्थेतर्फे असलेल्या सुरक्षारक्षक व सुपरवायझर यांनी नगरपरिषदेचे कर्मचारी यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी हे लक्षात आले की एका खाजगी बांधकाम कंपनीतर्फे हे कार्य सुरू आहे. गेल्या ३५ वर्षापासून या घाटाचे बांधकाम करीत असतांना याबाबत काहीही कल्पना न देता अंधारात रात्रीच्या वेळी घाटाचे दगडी बांधकाम फोडण्याचे काम चालू केले. संस्थेच्या सुरक्षा रक्षकांनी सदरचे काम रात्रीच्या वेळी त्वरीत बंद करणेबाबत त्यांना विनंती केली. तथापि दुसर्‍या दिवशीही पुन्हा रात्रीच्याच वेळी घाटाचे बांधकाम जेसीबी मशीनने तोडण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे.
आळंदी-देहू परिसर विकास समितीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी देणगी गोळा करून आळंदीत इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावर दगडी घाटाचे बांधकाम केले व आळंदीचे सौंदर्य उजळले. त्यातच तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून घाटावर शनि मंदिर ते पुंडलिक मंदिर परिसरात सांडपाणी वाहनू नेणार्‍या वाहिनीच्या कामासाठी खोदकाम सुरू केले आहे. येथे राजस्थान येथून आणलेला लाल दगड आणि संगरमवरी दगडाची तोडफोड करण्यात आली आहे.

भागिरथी नाल्याचे सांडपाणी वाहून नेणारी मोठी जमिनीखालची वाहिनी असताना शेजारीच अन्य सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी तयार केली जात आहे. यासाठी इंद्रायणी काठचा दगडी घाट तोडला आहे. यामुळे वारकर्‍यांमध्ये नाराजी आहे. एखाद्या स्वयंसेवी संस्थेने चांगला घाट बांधून दिला. त्याची निगा राखण्याऐवजी तो अधिकाधिक दुरावस्थेत कसा राहू शकतो. असा प्रयत्न नगरपरिषदेकडून चालला असल्याची चर्चा आळंदीत होत आहे.

वक्फ कायद्यामुळे गरीब, गरजू मुस्लिमांना न्याय मिळेल

केंद्रीय अल्पसंख्याक, संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू यांची ग्वाही

मुंबई- वक्फ (सुधारणा) कायदा 2025 चा मूळ उद्देशच पूर्वीच्या कायद्यातील त्रुटी दूर करून वक्फ बोर्डाची कार्यक्षमता वाढवणे हा आहे. ‘वक्फ मालमत्तां’च्या नियमन आणि व्यवस्थापनातील समस्या आणि आव्हाने दूर करण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. या कायद्यामुळे कोणाच्याही अधिकारांचे हनन होणार नाही. सर्व गरीब गरजू मुस्लिमांना न्याय मिळेल, अशी ग्वाही केंद्रीय अल्पसंख्याक, संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू यांनी मंगळवारी दिली. मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खा. मेधा कुलकर्णी, भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक आणि प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्य़े, भाजपा प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष इद्रीस मुलतानी आदी उपस्थित होते. नोंदणीकृत वक्फ मालमत्ता किंवा अधिसूचनेद्वारे घोषित वक्फ मालमत्ता यांना हात लावणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

वक्फ बोर्डातील गैर-मुस्लिम सदस्यांच्या समावेशाबद्दल टीका करणाऱ्यांच्या एक लक्षात आणून देऊ इच्छितो की प्रयागराज येथील कुंभमेळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आझम खान हे मुस्लीम होते. पण आम्ही कधीही असा विचारच केला नाही अशी खोचक टिप्पणी श्री. रिजीजू यांनी केली. या वक्फ (सुधारणा) कायदा 2025 मुळे आता वक्फ बोर्डांना मनमानीपणे कुठल्याही मालमत्ता वक्फ म्हणून घोषित करता येणार नाहीत. साहजिकच हा कायदा संपूर्ण गावेच्या गावे ‘वक्फ’ म्हणून घोषित करण्यासारख्या गैरवापरांना प्रतिबंध करणार आहे. या कायद्याचे अनेक गरीब मुस्लिम बांधव आणि गटांनी समर्थन केले आहे. हा कायदा मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे पसमंदा, बोहरा, अहमदिया यांसारख्या समाजांनी आभार मानले आहेत. या समुदायाच्या मुख्य मागण्या या कायद्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या कायद्यामुळे मुस्लिमांच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप केला जाईल या मतपेढीच्या राजकारणासाठी विरोधक पसरवत असलेल्या केवळ अफवा आहेत त्यामध्ये तथ्य नाही असेही त्यांनी नमूद केले.

खासगी मालमत्तांना ‘वक्फ मालमत्ता’ म्हणून घोषित करण्यासाठी ‘वक्फ कायद्या’च्या ‘कलम 40’चा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात होता. आता ‘वक्फ’ मालमत्तेचे निष्पक्ष आणि पारदर्शक प्रशासन सुनिश्चित करण्यासाठी ‘वक्फ कायद्या’तील ‘कलम 40’ रद्द केले जात आहे असे श्री. रिजीजू यांनी स्पष्ट केले. श्री. रिजीजू यांनी सांगितले की, नियमानुसार आता मुतवल्लींना सहा महिन्यांच्या आत केंद्रीय पोर्टलवर मालमत्तेची माहिती नोंदवावी लागेल. पोर्टलद्वारे ‘वक्फ मालमत्ता’ व्यवस्थापन स्वयंचलित करेल, ज्यामध्ये नोंदणी, ऑडिट, खटले यांचा समावेश असेल, ज्यामुळे व्यवस्थेत पारदर्शकता येणार आहे. कोणत्याही स्वरुपांच्या वादांचे निराकरण जिल्हाधिकारी करतील, जे राज्याला अहवाल देणार आहेत.

नायगांव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक, १४२ कोटींची तरतूद

मुंबई-स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या आद्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी मौजे नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे भव्य स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मौजे नायगाव येथील या स्मारकासाठी 142 कोटी 60 लाख रुपये तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 67 लाख 17 हजार रुपयांच्या तरतूदीस मंजूरी देण्यात आली.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्मारकाची घोषणा केली होती. त्यानुसार आज मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचे हे स्मारक त्यांच्या कार्याला अभिवादन ठरणार आहे. तसेच सोबतच उभे राहणारे महिला प्रशिक्षण केंद्र या परिसरातील महिलांसाठी सबलीकरणासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
महिला प्रशिक्षण केंद्राचे दीर्घकालीन व्यवस्थापन, प्रशासन, तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी सातारा यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, यशदा, कौशल्य विकास विभाग तसेच ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे प्रतिनिधी यांचा समावेश राहणार आहे.

सोन्याची चढाई लाखावर….ज्वेलर्सपासून ग्राहक दूरवर

111 दिवसांत 23,838 रुपयांनी महाग
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमच्या किमतीत ३,३३० रुपयांची वाढ होऊन ती १ लाख रुपयांवर पोहोचली आहे. पूर्वी १० ग्रॅम सोन्याची किंमत ₹९६,६७० होती.त्यानंतर ती ९९१०० झाली आणि संध्याकाळी पुन्हा ८९४८४ वर आली . सोन्या भावातील या अस्थिरतेने मार्केट मधील व्यापाऱ्यांच्या कडील ग्राहक वर्ग दिसेनासा होत चालला आहे.

दिल्ली: २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९३,०५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत १,०१,५०० रुपये आहे.
मुंबई: २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९२,९०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत १,०१,३५० रुपये आहे.
कोलकाता: २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९२,९०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत १,०१,३५० रुपये आहे.
चेन्नई: २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९२,९०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत १,०१,३५० रुपये आहे.
भोपाळ: २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९०,२०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९८,४०० रुपये आहे.

त्याच वेळी, आज एक किलो चांदीची किंमत ₹३४२ ने घसरून ₹९५,९०० प्रति किलो झाली आहे. पूर्वी चांदीची किंमत प्रति किलो ₹ 96,242 होती. २८ मार्च रोजी चांदीने १,००,९३४ रुपयांचा उच्चांक गाठला होता.
१११ दिवसांत सोने २३,८३८ रुपयांनी महागले
या वर्षी, १ जानेवारीपासून आतापर्यंत, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ७६,१६२ रुपयांवरून १ लाख रुपयांपर्यंत २३,८३८ रुपयांनी वाढली आहे. त्याच वेळी, चांदीची किंमत देखील ९,८८३ रुपयांनी वाढून ८६,०१७ रुपये प्रति किलोवरून ९५,९०० रुपये झाली आहे. त्याच वेळी, गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये सोने १२,८१० रुपयांनी महाग झाले होते.

स्वातंत्र्याच्या वेळी सोने ८८.६२ रुपये ग्रॅम होते
१९४७ मध्ये जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सोन्याचा भाव ८८.६२ रुपये प्रति १० ग्रॅम होता, जो आता १ लाख रुपये आहे. म्हणजेच, तेव्हापासून आतापर्यंत सोने ११०४ पट (११०४८४%) महाग झाले आहे. १९४७ मध्ये चांदीची किंमत प्रति किलो सुमारे १०७ रुपये होती आणि आता ती ९५,९०० रुपये आहे.

वर्षसोन्याचा भाव
२००७१०,०००
२०११२०,०००
२०१२३०,०००
२०२०४०,०००
२०२२५०,०००
२०२३६०,०००
२०२४७०,०००
२०२५८० हजार, ९० हजार, १ लाख रुपये

हिंदी सक्तीच्या मुद्यावर अखेर सरकारची माघार:हिंदी अनिवार्य भाषा नाही, राज्य सरकारने दिली स्थगिती

‘अनिवार्य’ या शब्दाला स्थगिती

मुंबई- महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषेवरून वातावरण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदी सक्तीला विरोध केला आहे. राज्य शासनाच्या सुकाणू समितीत असलेल्या शिक्षण तज्ज्ञ रमेश पानसे यांनी देखील हिंदी भाषा पहिलीपासून सक्तीची करणे चुकीचा निर्णय असल्याचे म्हटले आहे. आता या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. हिंदी भाषेच्या वापरासाठी आम्ही अनिवार्य हा शब्द वापरला होता. आता या शब्दाला शासन स्थगिती देत आहे. हिंदी भाषा ही बंधनकारक असणार नाही, असे दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना दादा भुसे म्हणाले, मी स्पष्टपणे नमूद करतो की, हिंदी भाषेच्या संदर्भात केंद्राकडून थपवले जात आहे असे सांगितले जात आहे, असा कुठलाही भाग नाही. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये स्पष्टपणे भाषेच्या संदर्भात पॅराग्राफ आहे. तीन भाषा शिकवण्यासंदर्भात, तीन भाषेचा फॉर्म्युला तिथे दिला आहे. केंद्राने कोणतीही भाषा राज्यासाठी बंधनकारक केलेली नाही, असे दादा भुसे यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना दादा भुसे म्हणाले, 2020 चे शैक्षणिक धोरण आहे. त्यानुसार 9 सप्टेंबर 2024 ला तीन भाषांपैकी दोन भाषा आपल्या देशाच्या संबंधित असल्या पाहिजेत, असे सांगण्यात आले आहे. राज्य सुकणू समितीच्या बैठकीत तिसरी भाषा हिंदी म्हणून स्वीकारण्याचा निर्णय झाला होता. तसेच या संदर्भातील शासन निर्णयात हिंदी भाषा ‘अनिवार्य’ असा उल्लेख झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे अनिवार्य या शब्दाला स्थगिती देत आहोत आणि पुढील शासन निर्णय यथावकाश निर्गमित करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी विषय बंधनकारक आहेच. पण, इतर माध्यमाच्या शाळांमध्ये सुद्धा मराठी भाषा विषय बंधनकारक केला गेला आहे. त्या शाळेत मराठी शिकवणारे शिक्षक सुद्धा मराठी भाषेत पदवी मिळवलेले असले पाहिजे याचेही बंधन असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले आहे.

सीबीएसईच्या चांगल्या बाबीचा स्वीकार आपल्या अभ्यासक्रमात करणार आहोत. चांगले मुद्दे आपण सीबीएसईकडून घेणार आहोत. व्यापक स्वरूपात इतिहास भूगोल अभ्यासक्रमात दिसेल. तसेच, शिक्षक भरती सुद्धा आपण करत आहोत. 10,500 शिक्षकांची भरती आपण करत आहोत. पवित्र पोर्टलवरुन ही भरती होणार आहे.

शिक्षण विभागाचे 8 विभाग आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी आपण शाळा तयार करणार आहोत. जे खेळामध्ये प्रविण्य दाखवतात त्यांना निवासी सोयीसुविधा उपलब्ध करून देता येईल. राज्यव्यापी वेगवेगळ्या पद्धतीचे आनंद गुरुकुल निवासी शाळा सुरू होतील, ज्या स्पेशालिटी शिक्षण देतील अशा शाळा तयार करत आहोत, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली आहे.

पुढे बोलताना दादा भुसे म्हणाले, राज्यातील 65 शिक्षण संघटनाची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यातून मोठी चर्चा झाली. शिक्षकांची इतर अशैक्षणिक काम कशी कमी करता येतील? यासाठी जीआर काढून शैक्षणिक आणि अशैक्षणिक काम बाजूला करून कमीत कमी इतर काम शिक्षकांना दिली जातील. शासन निर्णयची कडक अंमलबाजवणी केली जाईल

राज्यातील बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीरहिंगणघाट बाजार समिती राज्यात प्रथम; बारामती तिसऱ्या स्थानी

पुणे, दि. २२: बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यातील ३०५ बाजार समित्यांची आणि ६८ खाजगी बाजारांची सन २०२३-२४ या वर्षाच्या कामगिरीवर आधारित वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीनुसार राज्यातील १० बाजार समित्यांमध्ये पुणे विभागातील बारामती बाजार समितीने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीनुसार राज्यात पहिल्या १० बाजार समित्यांमध्ये वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समिती १७८ गुण मिळवून पहिल्या क्रमांकावर, वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड बाजार समिती १७१.५ गुणांसह दुसऱ्या स्थानी, बारामती १६५ गुणांसह तिसऱ्या स्थानी, १५५.५ गुणासह पंढरपूर पाचव्या तर १४९ गुण मिळवून अकलूज आठव्या स्थानावर आहे. तसेच राज्यातील सहकार विभागाच्या रचनेनुसार विभागातील बारामती, पंढरपूर व अकलूज हे अनुक्रमे पहिल्या तीन स्थानावर आहेत.

बाजार समित्यांची तसेच खाजगी बाजारांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी पणन संचालनालयाकडून जागतिक बँकेच्या सुचनेनुसार शेतमालाच्या विक्री व्यवस्थेसाठी बाजार समितीत असलेल्या पायाभूत व इतर सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज, योजना, उपक्र म राबविण्यातील सहभाग यानुसार ३५ निकष तयार करण्यात आले होते. बाजार समित्यांच्या निकषासाठी २०० गुण व खाजगी बाजारांसाठी २५० गुण निश्चित करण्यात आले होते.

या क्रमवारीमुळे शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये तसेच खाजगी बाजारांमध्ये आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुविधा देण्याची निकोप स्पर्धा निर्माण होण्यास चालना मिळेल. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समित्यांनी अधिक जोमाने कामकाज करावे, असे आवाहन पणन संचालक विकास रसाळ यांनी केले आहे.

एक उत्कट प्रेमकहाणी ‘सैयारा’, १८ जुलैला जगभरातील चित्रपटगृहात होणार प्रदर्शित!

यश राज फिल्म्स (YRF) आता रोमँस शैलीतील एक दिग्गज दिग्दर्शक मोहित सुरी यांच्यासोबत रचनात्मक सहकार्य करत आहे एका इंटेंस प्रेमकथेवर आधारित चित्रपटासाठी, ज्याचे नाव आहे सैयारा! वायआरएफ चे सीइओ अक्षय विधानी यांची पहिली निर्मिती असेल.

सैयारा या बहुप्रतीक्षित चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत दोन नवीन चेहरे – हान पांडे आणि अनीत पड्डा – पदार्पण करत आहेत. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे.

सैयारा हाचित्रपट आदित्य चोप्रा यांच्या प्रस्तुतीखाली, मोहित सुरी यांच्या दिग्दर्शनाखाली आणि अक्षय विधानी यांच्या निर्मितीखाली साकारला गेला आहे. वायआरएफ आणि मोहित सुरी, दोघेही त्यांच्या रोमँटिक शैलीतील यशस्वी चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत, आणि सैयारा ही त्यांची पहिली एकत्रित कलाकृती आहे.

Yash Raj Films & Mohit Suri’s intense love story is titled Saiyaara, film releases on July 18, 2025 in theatres worldwide!

Yash Raj Films (Yrf) is creatively collaborating with a master of the romance genre, Mohit Suri, for a love story that has been titled Saiyaara! This is the first film being produced by the company’s CEO Akshaye Widhani.

The much-awaited romantic film, Saiyaara, which introduces Ahaan Panday in the Hindi film industry and also stars Aneet Padda as the female lead, is set to release on July 18, 2025 in theatres worldwide.

Presented by Aditya Chopra, Directed by Mohit Suri & Produced by Akshaye Widhani, Saiyaara is an intense love story that brings YRF and Mohit Suri, both known for their huge generation-defining successes in the romantic genre, together for the first time!

येत्या दोन वर्षांत २०२७ पर्यंत मलेरियाचे देशातून समूळ उच्चाटन करण्यासाठी झाली हि  कंपनी सज्ज…

केंद्र सरकारच्या धोरणाशी सुसंगत कार्यप्रणाली स्थानिक स्वराज्य संस्था आणि संस्थांच्या सहकार्याने वेगवेगळ्या भागांतून मलेरिया, डेंग्यू हद्दपार करण्यासाठी कंपनीचे धोरण

मुंबई, २२ एप्रिल २०२५ – दरवर्षी २५ एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो. जागतिक मलेरिया दिन काही दिवसांवर येऊन ठेपला असताना युपीएल एसएएस कंपनीने मलेरिया आणि डेंग्यूच्या समूळ उच्चाटनासाठी सर्वतोपरि प्रयत्न करित असल्याचे आश्वासन दिले आहे. कंपनीने केंद्र सरकारच्या आरोग्याविषयक धोरणांतून तसेच उपाययोजनांतून डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजारावर आळा घालण्यासाठी तत्परता दर्शवली. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन आराखडा आणि राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन धोरणात्मक योजना यांसारख्या सर्वसमावेशक धोरणांना पाठिंबा देण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते. येत्या दोन वर्षांत २०२७ पर्यंत देशातून मलेरियाची एकही केस सापडता कामा नये, हे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे.

युपीएल एसएएस कंपनी देशभरातील महानगरपालिकांच्या सहकार्याने जनजागृतीपर कार्यक्रमांचे नियोजन करत आहे. मलेरियाच्या केसेसवर नियंत्रण यावे म्हणून कंपनीने शहर आणि ग्रामीण भागात वेगवेगळे प्रकल्प राबवण्यावर भर दिला आहे. गुजरात येथील उदवाडा गावात डासांमुळे होणारे आजार कमी करण्यासाठी क्लीन एण्ड ग्रीन चॅरिटेबल ट्रस्टसोबत कंपनीने डासांच्या उत्पत्तीची उगमस्थाने नष्ट करण्याचा प्रकल्प हाती घेतला. तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहरातील ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेसह विविध कार्यक्रमांचे नियोजन यशस्वीरित्या अंमलात आणले गेले.

गुजरात आणि तेलंगणा राज्यातील डासांमुळे होणारया आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी कंपनीने अथक परिश्रम घेतले. दोन्ही प्रकल्पांमध्ये डासांची उत्त्पत्ती आणि संबंधित आजार कमी होत असल्याचे निदर्शनास आले. या दोन यशस्वी प्रकल्पानंतर युपीएल एसएएस कंपनीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. गुजरात, तेलंगणा या राज्यांसह कंपनी आता महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारसबोत मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध कार्यक्रम आखण्याच्या तयारीत आहे. या दोन्ही राज्यांसोबत नव्या प्रकल्पाला सुरुवात झाल्यास कंपनीला शहरी आणि ग्रामीण भागांत राहणा-या लोकांचे जीवनमान सुधारण्यास अधिक प्रखरतेने योगदान देता येईल. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्याचे कंपनीचे मूळ उद्दिष्ट सफल होईल.

कंपनीच्या वाढत्या कार्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष डोभाल यांनी आढावा घेतला. ते म्हणाले, ‘‘ आम्ही सुरु केलेली सार्वजनिक आरोग्य मोहिम ही व्यापक क्षेत्रात सुरु आहे. ही मोहिम केवळ शेतीपुरतीच मर्यादित नसून, आम्ही विविध समूहांचा उद्धार आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासही कटिबद्ध आहोत. केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक धोऱणांना पाठिंबा देणे, सर्व भारतीयांसाठी निरोगी आणि सुरक्षित जीवनशैली निर्माण करणे हे आमचे उद्देश आहे. म्हणूनच आम्ही डास नियंत्रणासाठी विश्वासार्ह आणि प्रभावी उपाययोजना अंमलात आणली आहे. या उपाययोजनांमुळे कोट्यावधी भारतीयांचे जीवनमान सुधारेल. या बदलांसाठी स्थानिक प्रशासन आणि समुदायांचे सहकार्य गरजेचे आहे. तरच आपल्याला ख-या अर्थाने मलेरिया आणि डेंग्यूमुक्त भारताच्या दिशेने आपली यशस्वी वाटचाल करता येईल.’’

या नवनव्या उपक्रमांबद्दल तसेच कंपनीच्या विस्तारीत कार्याबद्दल कंपनीच्या सार्वजनिक आरोग्य व्यवसायाचे प्रमुख श्री. सुब्रतो पल यांनी माहिती दिली. ते म्हणाले,‘‘ डासांची उगमस्थाने आणि अळ्या नष्ट करणे आणि डासांच्या उत्त्पत्तीवर नियंत्रण ठेवणे हेच कंपनीचे मुख्य धोरण आहे. या धोरणाशी आमच्या भागदारकांनीही सहमती दर्शवली आहे. म्हणूनच आम्ही प्रकल्पाच्या सुरुवातीलाच डासांच्या उत्त्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यावर भर देतो. युपीएल एसएएस डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाटी हरित रसायनाचा वापर करणार आहे. हे रसायन देशात पहिल्यांदाच वापरले जाईल. डासांच्या उत्त्पत्तीला नष्ट करणारे हे अनोखे हरित रसायन जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यताप्राप्त असून, या रसायनाच्या वापराने मानवी आरोग्याला कोणताही धोका पोहोचत नाही. या रसायनाच्या वापराने पिण्याचे पाणीही सुरक्षित राहते. तलाव, विहिरी, वाहत्या पाण्याचा जलस्त्रोत, टाक्या, घर तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पाण्याच्या स्त्रोतात हे रसायन वापरता येईल. डासांची संख्या नियंत्रणात आल्यास डेंग्यू आणि मलेरियामुळे पसरणा-या आजारांची संख्याही आपोआप आटोक्यात येईल. या आजारांचा प्रसार रोखणे हेच कंपनीचे उद्दिष्ट आहे.’’

युपीएल एसएएसद्वारे डासांची उगमस्थाने असलेल्या जागांवर थंड धुरी देणारी यंत्रे वापरली जातात. धुरी देणारी यंत्रे वापरताना वायू प्रदूषण होणार नाही अशा रितीने डिझाईन केली आहेत. ही यंत्रे हाताळायला सोप्पी आहेत, शिवाय या यंत्रांसाठी ऊर्जाही कमी लागते. हे उपाय जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय रोगवाहक नियंत्रण कार्यक्रम या दोन्हींद्वारे मंजूर केलेल्या सूत्रीकरणावर आधारलेले आहेत. या उपाययोजनांमुळे जलपरिसंस्था, मनुष्य आणि प्राणीही सुरक्षित राहतात.

या सर्व उपाययोजना युपीएल एसएएसच्या पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या व्यापक धोरणाला अधोरेखित करतात. या योजनांच्या अंमलबजावणीमुळे आता मनुष्याला निरोगी आणि सुरक्षित परिसंस्थेत आरामदायी जीवन जगता येणे शक्य आहे.