मुंबई, दिनांक 6 डिसेंबर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त आज शुक्रवार, दिनांक 06 डिसेंबर, 2024 रोजी विधानभवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मा.श्री.राहुल नार्वेकर आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती मा.डॉ. (श्रीमती) नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
त्यानंतर, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना आपल्याला दिली. या घटनेने सर्वांना समान अधिकार आणि देशाला एकता, समता, बंधुतेचा विचार दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा आदर ठेवून त्यांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल,” अशा शब्दात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राजभवनात बाबासाहेबांच्या प्रतिमेला श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) श्री.जितेंद्र भोळे, सचिव (2) (कार्यभार) डॉ.विलास आठवले, अवर सचिव श्री. विजय कोमटवार, मा. उपसभापती यांचे खाजगी सचिव श्री. रविंद्र खेबुडकर, संचालक वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी श्री.निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. राजभवनात प्रोटेम विधानसभा अध्यक्षांच्या शपथ प्रसंगी नीलमताई गोर्हे गेल्या होत्या त्याआधी त्यांनी गुलाबपुष्प अर्पण करुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी संविधान ग्रुप च्या वतीने डॉ. आंबेडकरांचे विचार असलेली ५ हजार पुस्तके वाटून प्रसार करण्यात आला.
६८ व्या महापरिनिर्वाणदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावे अशी संकल्पना संविधान ग्रुपने हाती घेतली. आज पाच हजार पुस्तके वाटून आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज व सुशिक्षित समाज घडवण्यासाठी पुढाकार घेतला. या वाटपावेळी संविधान ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन गजरमल,संविधान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राकेश सोनवणे,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष स्वाती गायकवाड,महाराष्ट्र उपाध्यक्ष आरती केदारी, संविधान ग्रुपचे शहराध्यक्ष गणेश लांडगे,उपाध्यक्ष राजवर्धन कांबळे,महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख प्रवीण सोनवणे असे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.तसेच डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल लागला असून महायुतीने या निवडणुकीत बहुमत मिळवलेलं आहे. काल भाजपच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली. त्याचवेळी आज ५ डिसेंबर २०२४ रोजी आझाद मैदानात संध्याकाळी ५:३० वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. याबाबत शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर विरोधकांवर थेट हल्लबोल केला आहे.
“महायुतीचा सरकारी येत आहेत आणि आमचे मुख्यमंत्री होत आहेत याचा मला अतिशय आनंद आहे. देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी असं म्हणता येईल इतकं घवघवीत यश आम्हाला जनतेने दिलंय. मा. माजी मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते यांनी आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि शेकडो हजार कार्यकर्त्यांनी जे काम केलं त्याचं आम्हाला यश मिळालं. मी तर याचं पहिलं श्रेय देवाला देते. कारण आमची प्रार्थना होती की महाराष्ट्रामध्ये जो विकासाचा रथ चाललेला आहे त्याला आडकाठी येईल अशा कुठल्याही घटना घडू नये यादृष्टीने लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही भरपूर काम केलं.
विशेष म्हणजे शिवसेनेला पूर्वी 63 जागा मिळाल्या होत्या पण त्याच्यातही मूळच्या शिवसेनेच्या 56 जागा होत्या आणि आता आमच्या मूळच्या शिवसेनेच्या 57 जागा विधानसभेला निवडून आलेल्या आहेत. त्याच्याबद्दल मनामध्ये समाधान आहे पण यामध्ये महायुतीचे अतिशय चांगले आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळे काम चांगलं होऊ शकेल आणि कुठल्याही प्रकारे अडसर येण्यापेक्षा सकारात्मक भूमिका राहील”, असं डॉ. नीलम गोऱ्हे स्पष्ट शब्दात म्हणाल्या.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विरोधकांवर हल्लाबोल! नेमकं काय म्हणाल्या?
विरोधकांकडून प्रचारादरम्यान वारंवार एक टीका केली जात होती की, आमचे सरकार आल्यावर महायुतीच्या नेत्यांना तुरुंगात टाकू पण आता विरोधकांची ही इच्छा अपूर्ण राहिली असा प्रश्न विचारला असता यावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “एक शब्द आहे, कर नाही त्याला डर कशाला त्यामुळे आम्ही काही कर चुकवलेला नाहीये आणि काही केलेलंही नाहीये परंतु समोरच्याचा अपराध म्हणजे मतभेद असणं, अशीच भूमिका काँग्रेसची पण आहे कारण त्यांनी आणीबाणी लादली होती. आज त्यांनी कसे योग्य ते नॉर्म्स टाकले याच्यावर काही वृत्तपत्रात लोक बोलतात पण मुळामध्ये त्यांची संपूर्ण कारकीर्द पाहिली, त्यांच्या राज्यपालांची, त्यांच्या भूमिकांची तर महिला आरक्षण विधेयकसुद्धा त्यांनी लोंबकळत ठेवलं. तलाक पीडित महिलांना न्यायसुद्धा दिला नाही.
दुसरीकडे आज आम्ही पाहतो की अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे काम करतात त्यांच्यापैकी अनेकांची भूमिका होती की, आमचं सरकार आल्यावर आम्ही तुरुंगात टाकू, पण तुरूंगात कशाबद्दल टाकणार आहात? तुमच्याशी मतभेद म्हणजे हे तुरूंगात टाकण्याचं कारण होऊ शकत नाही. देशद्रोह, शांतता सुव्यवस्था बिघडवणं असं काय केलं होतं आम्ही की, ज्याबद्दल सारखं असं बोललं जातं होतं आणि यामुळेच मला वाटतं ज्याची पाठी त्याच्या काठी”, अशा शब्दात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
पुणे, 06 डिसेंबर 2024 – महिला कबड्डी लीग (WKL) 2025 ने आज पुणे येथे आयोजित केलेल्या दुसऱ्या प्रादेशिक निवड चाचणीसह एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले. ही फेरी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशसह भारताच्या पश्चिम भागातील प्रतिभा शोधण्यावर केंद्रित आहे. या चाचण्यांमध्ये महिलांच्या कबड्डीला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा म्हणून संपूर्ण प्रदेशातील खेळाडूंचा उत्साही सहभाग दिसून आला.
पश्चिम प्रदेशात जवळपास 8000-10,000 महिला कबड्डीपटू आहेत, ज्यापैकी अनेकांना त्यांचा खेळ पुढील स्तरावर नेण्यासाठी महिला कबड्डी लीग उपक्रमातून प्रेरणा मिळेल. यापैकी अंदाजे 600-800 खेळाडूंनी आधीच राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा केली आहे, ज्यांनी चाचण्यांसाठी लक्ष्यित कोर गट तयार केला आहे. पुण्यात, WKL ला सुमारे 500 नोंदणी प्राप्त झाल्या, ज्यामध्ये 350 खेळाडू सक्रियपणे चाचण्यांना उपस्थित होते. या प्रतिभावान पूलमधून, लीगच्या निवड प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात जाण्यासाठी 100-150 खेळाडू निवडले जातील.
WKL चे लीग सल्लागार डॉ. भूपेंद्र सिंग यांनी लीगच्या परिवर्तनात्मक दृष्टीवर प्रकाश टाकला:
“महिला कबड्डी लीग ही केवळ स्पर्धा निर्माण करण्यापुरती नाही; ती एक वारसा निर्माण करण्याबद्दल आहे. या चाचण्या भारताच्या तळागाळातील प्रतिभेतील अतुलनीय क्षमता प्रतिबिंबित करतात आणि आम्हाला असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आनंद होत आहे जिथे या खेळाडूंना चमक दाखवता येईल आणि असंख्य इतरांना ते स्वीकारण्यासाठी प्रेरणा मिळेल.”
मीडियाला संबोधित करताना, WKL चे मीडिया प्रवक्ते डॉ. जितेंद्र कुमार यांनी त्यांचा उत्साह शेअर केला:
“येथे पुण्यात दाखवण्यात आलेली ऊर्जा आणि कौशल्य विलक्षण आहे. WKL चे उद्दिष्ट भारताच्या कानाकोपऱ्यातून उत्कृष्ट प्रतिभा ओळखणे आणि त्यांचे संगोपन करणे हे आहे आणि आज आम्ही पाहिलेला प्रतिसाद महिलांच्या कबड्डीमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या आमच्या ध्येयाला पुष्टी देतो.”
“महाराष्ट्र हा नेहमीच कबड्डीचा गड राहिला आहे आणि महिला कबड्डी लीग ही आमच्या खेळाडूंसाठी एक खेळ बदलणारी आहे. महिला खेळाडूंना मोठ्या मंचावर त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी देणारा असा सुव्यवस्थित उपक्रम पाहणे आनंददायी आहे.”
पुण्यात झालेल्या चाचण्यांनी तळागाळातील प्रतिभेला चालना देण्यासाठी आणि महिला खेळाडूंचे सक्षमीकरण करण्यासाठी WKL ची वचनबद्धता अधोरेखित केली. प्रत्येक प्रादेशिक चाचणीसह, लीग भारतातील महिला खेळांच्या लँडस्केपची पुन्हा व्याख्या करण्याच्या एक पाऊल पुढे आहे.
महिला कबड्डी लीग (WKL) बद्दल: महिला कबड्डी लीग ही भारतातील प्रमुख व्यावसायिक कबड्डी लीग आहे जी महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे. तळागाळात आणि व्यावसायिक स्तरावर संधी उपलब्ध करून देऊन, WKL या खेळाला उन्नत करण्यासाठी आणि महिला कबड्डीपटूंसाठी जागतिक दर्जाचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे.
पुणे : सनस्टोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटने भारतातील उच्च शिक्षणात क्रांती घडवून आणत, विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्लेसमेंट संधी प्रदान करून शिक्षणाच्या क्षेत्रात नवीन मानके प्रस्थापित केली आहेत. जिथे आघाडीच्या IIM मधील विद्यार्थ्यांना सरासरी एका ऑफरवर समाधान मानावे लागते, तिथे सनस्टोनच्या विद्यार्थ्यांना सरासरी 1.4 ऑफर्स मिळाल्या आहेत, असे IIM चे ऑडिटर बी2के ॲनालिटिक्सने उघड केले आहे.सनस्टोन टियर २ आणि टियर ३ महाविद्यालयांपेक्षा 119% जास्त ROI (रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट) देतो आणि प्रमुख IIM आणि बी-स्कूल्सपेक्षा 53% जास्त शिक्षण गुंतवणूक परतावा प्रदान करतो.प्रमुख IIM आणि बी -स्कूल्सपेक्षा 53% जास्त शिक्षण गुंतवणूक परतावा प्रदान करतो. सनस्टोनच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या 1,353 ऑफर्स या त्यांच्या करिअर यशाची गुरुकिल्ली आहे, ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त ऑफर लेटर मिळाले. हा आकडा भारतातील आघाडीच्या बी-स्कूल्सच्या तुलनेत 36% अधिक आहे, आणि प्रत्येकी 1.4 पट जास्त ऑफर्स देण्यात आल्या. यामध्ये सर्वाधिक पॅकेज ₹23 LPA होते, तर 1,192 ऑफर्स नामांकित कंपन्या, युनिकॉर्न स्टार्टअप्स आणि नवउद्यमांकडून मिळाल्या.सनस्टोनने भारतीय प्लेसमेंट रिपोर्टिंग स्टँडर्ड्स (IPRS) नुसार एमबीए 2021-23 बॅचसाठी प्लेसमेंट रिपोर्ट तयार केला होता, जो बी2के ॲनालिटिक्सकडून सत्यापित करण्यात आला. हा अहवाल अचूकता आणि पारदर्शकतेच्या उच्चतम मानकांचे पालन करतो.सनस्टोनचे सह-संस्थापक आणि सीईओ आशिष मुनजल यांनी सांगितले, “B2K ॲनालिटिक्स ऑडिट हे उद्योगाच्या मागण्या आणि विद्यार्थ्यांच्या आकांक्षां यांचा संगम घालून एक उत्तम परिणाम देते. आमच्या विद्यार्थ्यांना मिळणारे ऑफर रेट आणि गुंतवणुकीवरील परताव्यात असणारी लक्षणीय वाढ, आमच्या पदवीधरांसाठी एक उत्तम सूचक आहे.”सनस्टोनने 578+ अनोख्या कंपन्यांना कॅम्पस प्लेसमेंटसाठी आकर्षित केले, जे आघाडीच्या IIM च्या तुलनेत चार पट अधिक आहे. प्रमुख MNCs, बीएसई-सूचीबद्ध कंपन्या, युनिकॉर्न स्टार्टअप्स आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सनस्टोनच्या प्रतिभावान विद्यार्थ्यांची निवड केली.या वर्षी प्लेस करण्यायोग्य बॅचमध्ये 44 प्रदेशांमधून 70+ पिनकोडचे 990 विद्यार्थी होते, ज्यामध्ये बरेच जण टियर 2 आणि टियर 3 शहरांतून आले आहेत. हे विद्यार्थी त्यांच्या समुदायांचे स्वप्न आणि आशा बरोबर घेऊन येतात, आणि सनस्टोन त्यांना त्यांच्या मुळांशी जोडलेले ठेवत देशभरातील प्लेसमेंट संधी उपलब्ध करून देतो.सनस्टोनच्या प्लेसमेंट अकाउंटिबिलिटी प्रोग्राम (PAP) –”गेट प्लेस्ड किंवा 100% फी परत” – या प्रोग्राम ने विद्यार्थ्यांना आधुनिक उद्योगाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सक्षम केले आहे. विविध क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी, व्यावहारिक प्रशिक्षण, नवीन तंत्रज्ञान प्रशिक्षणक्रम, आणि “Ace Academy” सारख्या प्रगत प्लॅटफॉर्मद्वारे विद्यार्थ्यांना तयार केले जाते.सनस्टोन 15+ शहरांमध्ये विस्तार करत असून, विशेषतः दुर्लक्षित भागांमधील विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी क्रांतिकारक बदल घडवत आहे आणि भारताच्या कार्यबलाच्या वाढीस हातभार लावत आहे.सनस्टोनबद्दल: सन २०१९ मध्ये स्थापना झालेली सनस्टोन ही भारतातील आघाडीची उच्च शिक्षण संस्था आहे, जी देशभरातील प्रमुख महाविद्यालये आणि भरवशाची नोकरी देणाऱ्या कंपन्यांसोबत कार्य करते. उद्योग-आधारित अभ्यासक्रम आणि हाताळणी-आधारित शिक्षणावर भर देणारी सनस्टोन, 35+ संस्थांमधील 10,000 हून अधिक विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवते. 1,200+ कंपन्यांच्या नेटवर्कमुळे, 5,000 हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्श नोकऱ्या मिळवण्यात मदत केली आहे.
सेवाकार्यातून लाभते मनःशांती आणि समाधान – संदीप खर्डेकर
पुणे : संपर्क संस्था बालग्राम च्या माध्यमातून अनाथ मुला मुलींचा सांभाळ करणे, त्यांचे शिक्षण पूर्ण करणे व पुढे लग्न ही लावून देणे हे कार्य कौतुकास्पद असून मी ह्या संस्थेच्या पुणे जिल्ह्यातील सहा व राज्यातील बारा शाखांना सर्वतोपरी मदत करेन असे वचन आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. आज आमदार झाल्यानंतर मुंबई येथून पुण्याकडे येताना मळवली येथे क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने संपर्क बालग्राम संस्थेस उपयोगी साहित्य भेट देण्याचा तसेच विद्यार्थ्यांतर्फे चंद्रकांतदादांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते
याप्रसंगी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,फाउंडेशन च्या विश्वस्त व माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,विश्वस्त सतीश कोंडाळकर, बालग्राम चे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, सामाजिक कार्यकर्ते सचिन निंबाळकर, चेतन जोशी, संस्थेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. मा. ना. चंद्रकांतदादा पाटील प्रचंड मताधिक्याने निवडून आल्यावर त्यांना काय भेट द्यावी याचा विचार करत होतो – मग त्यांनी ज्या पद्धतीने तळागाळातील नागरिकांना काय हवं नको याकडे लक्ष दिले व त्यांना ते पुरविण्याचा ध्यास घेतला – त्याच धर्तीवर विविध सामाजिक संस्थांना मदत करावी असे ठरविले आणि त्यास अनुसरून आज मळवली येथील संपर्क बालग्राम मधील 130 विद्यार्थ्यांसाठी दादांच्या हस्ते सोलापूरी चादरी तसेच स्पीकर सेट भेट देण्याचा उपक्रम पार पडला असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.सेवाकार्यातून मनःशांती व समाधान लाभते असे सांगतानाच राजकीय कार्यकर्त्यांनी सामाजिक क्षेत्रात अधिकाधिक योगदान द्यावे व जेथे गरज आहे तेथे मदत पोहोचवावी असेही संदीप खर्डेकर म्हणाले. क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर हे चांगलं काम करणाऱ्या योग्य संस्थेची निवड करतात आणि त्यांना ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते पुरवितात असे आवर्जून नमूद करतानाच मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले “बालग्राम संस्था खूप चांगलं काम करत असून एवढ्या अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचे महत्वपूर्ण काम करत आहेत, त्यामुळेच मी देखील शासनाच्या स्तरावर आणि वैयक्तिक सी एस आर निधीतून संस्थेसाठी काय करता येईल याची यादी करून त्यासाठी प्रयत्न करेन” असेही चंद्रकांतदादांनी स्पष्ट केले. संस्थेच्या वतीने आ.चंद्रकांतदादा पाटील, संदीप खर्डेकर, मंजुश्री खर्डेकर यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला.संस्थेतील विद्यार्थिनींनी सलामी देऊन मान्यवरांना अभिवादन केले. संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक तर अमितकुमार बॅनर्जी यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजन क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर यांनी केले.
खेड:खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्या सातरकस्थळ येथील देव्हरकर कॉलनीतील ज्ञानदीप पंतस्मृती या बंद बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील रोख रक्कम, सोने आणि महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.याबाबत न्यायालयातील कर्मचारी रोहिदास पंडित चव्हाण यांनी खेड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. मंगळवारी (दि.३) रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान जिल्हा न्यायाधीश सय्यद राहत असलेला सातरकस्थळ येथील ज्ञानदीप बंगला बंद असल्याचे निदर्शनास आल्यावर चोरट्यांनी याचा बंगल्यात चोरी केली. यापूर्वी दोन-तीन दिवस परिसरातील जागरूक नागरिकांमुळे चोरीचे दोन-तीन प्रकार फसले होते.
जिल्हा न्यायाधीशांचा बंगला बंद असल्याचे लक्षात आल्यावर चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडला व घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील १५ हजार रुपये रोख, सव्वादोन लाखांचे तीन तोळे सोने व काही महत्त्वाची कागदपत्रे चोरली. या प्रकरणात खेड पोलिस स्टेशनच्या वतीने अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातरकस्थळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनामध्ये वाढ होताना दिसत आहे. दोन चार दिवसांपासून चोरटे चोरी करण्याचे प्रयत्न करत होते. मात्र, सजग नागरिकांमुळे चोरट्यांचा चोरीचा डाव दोन वेळा फसला. यामध्ये एक वेळ तर एका पोलिस कर्मचाऱ्यांच्याच घरी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता. याबाबत खेड पोलिसस्टेशनमध्ये तक्रारदेखील दाखल करण्यात आली होती
पुणे-पवनाधरण परिसरातील दुधिवरे गावाच्या हद्दीमध्ये बुधवार (दि.४ ) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पवनाधरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या दोन पर्यटकांचा बोट उलटल्याने मृत्यू झाला आहे.पवनाधरण जलाशयात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बोटी फिरत असून त्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना आणि नोंदणी क्रमांक देखील नाहीत. मयूर रविंद्र भारसाके (वय २५) तर तुषार रविंद्र अहिरे (वय.२६ दोघेही सध्या रा.पुणे, मुळ,रा.लालजैन मंदिराच्या पाठिमागे, पद्मावती नगर,वरणगांव,भुसावळ)असे बुडून मृत्यू झालेल्यांची नावे असून ते बालेवाडी येथे एका खाजगी कंपनी मध्ये नोकरी करत होते.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी पुणे येथील स्केन रियालिटी प्राव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनी मध्ये काम करणारे सुमारे ८ मित्र पवना धरण लगत असलेल्या दुधिवरे येथील एका हाँटेल वर फिरण्यासाठी आले होते. यामधील काहीजण पवनाधरणाच्या पाण्यात दुपारी ०४:०० वाजण्याच्या सुमारास बोट घेऊन पाण्यामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले. ती उलट्यामुळे दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांना वाचविण्यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू टिम व मावळ वन्य जीव रक्षक यांच्या वतीने धरणात बुडालेल्या दोन पर्यटकांचा शोध सुरु केल्यानंतर बुधवार ( दि.४ रोजी ) संध्याकाळी आठ च्या सुमारास एकाचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर रात्री अंधार झाल्यामुळे शोधकार्य बंद करण्यात आले व गुरुवार दि.५ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शोधकार्य सुरु केले व दुपारी ०२:३० वाजण्याच्या सुमारास दुसरा मृतदेह मिळून आला. यानंतर श्ववच्छदेनेसाठी खंडळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे, युवराज बनसोडे, सिताराम बोकड, नवनाथ चपटे, नितीन कदम हे करत आहे.
पुणे-पाषाण सुस रोड ला एका वाहनाने काही वाहनांना धडक दिल्याचे वृत्त आहे .
सुमारे 6 वाहनांना धडक दिल्या प्रकरणी बाणेर पोलिसांनी संबधित मोटारचालकास ताब्यात घेतले आहे. ऋत्विक श्याम बनसोडे (वय १९) असे ताब्यात घेतलेल्या मोटारचालकाचे नाव आहे. ऋत्विक हा एमजी ग्लॉस्टर मोटार (एमएच-१२ डब्लूएच-९११२) चालवत असताना हा अपघात झाला. त्याच्याविरुद्ध बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अविनाश कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारचालक ऋत्विक हा एका व्यक्तीकडे ‘केअरटेकर’ म्हणून कामास आहे.
तो दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दूध आणण्यासाठी मोटारीतून निघाला होता. त्याने निष्काळजीपणे मोटार चालवून एका वाहनाला धडक दिली. त्यानंतर घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याने दुसऱ्या वाहनाला धडक दिली.
तेव्हा जमावाने त्याला मोटारीतून बाहेर येण्यास सांगितले. परंतु तो बाहेर न आल्याने जमावातील काही तरुणांनी मोटारीवर दगडफेक केली. त्यात मोटारीचे काच फुटल्याने नुकसान झाले. बचावासाठी चालकाने ननावरे चौकातून सूसच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मोटार भरधाव नेली. त्याने पुन्हा एका मोटारीला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यात मोटारीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
क्रिसिलने वेदांताच्या दीर्घकालीन बँक सुविधा आणि डेट इन्स्ट्रुमेंट्सचे रेटिंग ‘AA-’ वरून ‘AA’ केले असून लघुकालीन रेटिंग A1+ ला दुजोरा दिला आहे.
रेटिंग अपग्रेडमधे एकूण ऑपरेटिंग नफ्यात (व्याज, कर, घट आणि कर्जमाफीपूर्व (ईबीआयटीडीए) मिळकत) वेदांताची अपेक्षित सुधारणा तसेच डेटमध्ये घट आणि सुधारित भांडवल आराखडा झाल्याचे क्रिसिलने आपल्या रेटिंग अहवालात म्हटले आहे.
क्रिसिलने असेही नमूद केले आहे की वेदांताचा एकूण ऑपेरिंटग नफा (ईबीआयटीडीए,ब्रँड आणि व्हीआरएलप्रती व्यवस्थापन शुल्क वगळता)आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ४५,००० करोड रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता असून त्याला प्रामुख्याने अल्युमिनियम,झिंक इंटरनॅशनल आणि लोखंडमध्ये वोल्युम ग्रोथ तसेच झिंक व अल्युमिनियमची सुधारित किंमत क्षमता व धातूंच्या सर्वसाधारण किंमती यांचाही लाभ होईल.आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ईबीआयटीडीए(EBITDA) आणखी सुधारण्याची अपेक्षा असून त्याला सध्या क्षमता वाढवण्यासाठी आणि विशेषतः अल्युमिनियमधील कार्यकारी क्षमतेसाठी सुरू असलेल्या भांडवली खर्चाच्या पूर्णत्वाची जोड मिळेल.
गेल्या तीन महिन्यांत प्रमुख क्रेडिट एजन्सीने अपग्रेड देण्याची वेदांताची ही दुसरी वेळ आहे. सप्टेंबर महिन्यात आयसीआरएने वेदांता लिमिटेडचे दीर्घकालीन क्रेडिट रेटिंग AA- वरून AA वर नेले आणि त्यातून कंपनीची सशक्त क्रेडिट प्रोफाइल दिसून येत आहे.
कमॉडिटी व्यवसायात चक्रीयता सहन करण्याची वेदांताची क्षमता तसेच उत्पादनाचा कमी खर्च हे घटकही रेटिंग एजन्सीने अधोरेखित केले आहेत. ‘वेदांता समूह विविध व्यवसायांमध्ये कार्यरत असून त्यात झिंक, शिसे, चांदी, अल्युमिनियम, तेल आणि वायू, लोखंड, उर्जा व स्टील यांचा समावेश आहे. हा समूह या सर्व क्षेत्रांतील सर्वात आघाडीचा उत्पादक असून देशांतर्गत बाजारपेठेत समूहाने मजबूत स्थान मिळवले आहे. वैविध्यपूर्ण व्यावसायिक जोखीम समूहाला कमॉडिटीशी संबंधित जोखीम आणि चक्रीयतेपासून सुरक्षित ठेवते,’ असे क्रिसिलने नमूद केले आहे.
क्रिसिलने रेटिंगमध्ये वेदांता व्यवसायाचे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलवर (एनसीएलटी) स्वतंत्र नोंदणीकृत कंपन्यांमध्ये विभाजन करण्याच्या प्रस्तावाचीही नोंद घेत विभाजनच्या यशस्वी पूर्णत्वाची शक्यता वाढली आहे, असे म्हटले आहे.
वेदांताच्या युकेस्थित पेरेंट कंपनी – वेदांता रिसोर्सेस लिमिटेडलाही (व्हीआरएल)नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रेडिट एजन्सीकडून अपग्रेड मिळाले आहे.अमेरिकास्थित मूडीजने व्हीआरएलचे कॉर्पोरेट फॅमिली रेटिंग B3 वरून B2 केले आहे आणि कंपनीच्या सीनियर अनसिक्युअर्ड बाँड्सचे रेटिंग Caa1 वरून B3 केले आहे. त्याशिवाय गेल्या महिन्यात फिचने व्हीआरएलचे पहिल्यांदाच B- रेटिंग सकारात्मक दृष्टीकोनासह प्रकाशित केले आहे.
नव्या सरकारने शेतकरी कर्जमाफी, सोयाबीनला ६ हजार रु. भाव, लाडक्या बहिणींचे २१०० रुपये व २.५ लाख पदांची नोकरभरती तात्काळ सुरु करावी.
काँग्रेसची विधानसभेतील संख्या कमी झाली असली तरी हिम्मत व ताकद कायम, जनतेच्या हितासाठी सरकारला जाब विचारु.
मुंबई, दि. ५ डिसेंबर २०२४ निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजणीत घोटाळे करुन महाराष्ट्रात जनतेच्या मतांची चोरी करणारे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. चोरीचे बहुमत असतानाही नव्या सरकारची स्थापनाच वादाने झाली असून या तीन पक्षातील अंतर्गत वादामुळे महाराष्ट्राची प्रतिमा देशात मलीन झाली आहे. महाराष्ट्राच्या माथी पुन्हा गुजरातधार्जिणे सरकार बसले असले तरी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावू नये, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
नव्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महायुतीकडे बहुमत असतानाही सरकार स्थापन्यासाठी कसरत करावी लागली. एकनाथ शिंदे व अजित पवार यांना या सरकारमध्ये फारसे महत्व दिले जाईल असे वाटत नाही. दिल्लीत वाऱ्या करुन मंत्रीपदांची भिक मागण्याची वेळ या दोघांवर आली. मोदी शाह यांच्या मेहरबानीवर शिंदे, अजित पवार सरकारमध्ये असतील. एकनाथ शिंदे यांची तर भाजपाला आता काहीच गरज नाही त्यामुळे बहुमत मिळाल्यापासूनच शिंदे व अजित पवारांना भाजपा व मोदी शाह यांनी जागा दाखवून दिली आहे. भाजपाने पुन्हा एकदा दोन प्रादेशिक पक्षांना संपवले आहे.
भाजपाचे सरकार स्थापन झाले असून निवडणूक त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावी लागतील. शेतकरी कर्जमाफी, कृषी पंपाची विज बिल माफ, लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये, २.५ रिक्त सरकारी पदांची भरती याची तातडीने अंमलबजावणी करावी. काँग्रेस पक्षाची विधानसभेतील संख्या कमी झाली आहे परंतु हिम्मत व ताकद कायम असून जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असेही नाना पटोले म्हणाले.
मुंबई-महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर 13 दिवसांनी आज नवीन सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री होणारे शिंदे हे दुसरे नेते आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक भाजप नेते या कार्यक्रमात सहभागी झाले. याशिवाय भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येथे पोहोचले होते. याशिवाय देशभरातील 400 संत-मुनी सहभागी झाले.शाहरुख खान, सलमान खान, रणवीर सिंह, रणबीर कपूर, जान्हवी कपूर, शिखर पहारिया, अर्जुन कपूर, शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी, सचिन तेंडुलकर, विद्या बालन, सिद्धार्थ कपूर, वरुण धवन, अनिल अंबानी, माधुरी दीक्षित, श्रीराम नेने, विकी कौशल, खुशी कपूर, रुपाली गांगुली, सुधाकर शेट्टी, धवल मेहता, बोनी कपूर, श्रद्धा कपूर या सगळ्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागला. महायुती म्हणजेच भाजप-शिवसेना शिंदे-राष्ट्रवादी पवार यांना 230 जागांचे प्रचंड बहुमत मिळाले आहे.शपथविधीसाठी उभे राहताच एकनाथ शिंदे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासह भाजपनेते अमित शहा यांचेही नाव घेतले. शिंदे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
राष्ट्रगीताने आणि राज्यगीताने शपथविधी सोहळ्यालासुरुवात – महत्वाचे म्हणजे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रगीताने आणि राज्यगीताने सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रगीतासाठी आणि राज्यगीतासाठी संपूर्ण मैदानावर लोक उभे राहिले होते.
एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ – महत्वाचे म्हणजे, या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तत्पूर्वी, ते फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार की नाही? यासंदर्भात राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चाही सुरू होत्या. मात्र अखेर, शिवसेना आमदारांची मागणी मान्य करत त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वी ते राज्याचे मुख्यमंत्री होते.
अजित दादा सहाव्यांदा उपमुख्यमंत्री – अजित पवार यांनी यावेळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी 2010 मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले होते. 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कालावधीत ते तीन राज्य सरकारांमध्ये तीन वेळा उपमुख्यमंत्री झाले. महत्वाचे म्हणजे, यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये दुसऱ्यांदा शपथ घेत ते महाराष्ट्राचे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, अजित आशाताई अनंतराव पवार यांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्याचे संचलन केले.
आजच्या शपथविधी कार्यक्रमास मंचावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषि मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर, केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंदर यादव, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय सूक्ष्म मध्यम लघू उद्योगमंत्री जितनराम मांझी, केंद्रीय दळणवळण मंत्री जोतिरादित्य सिंधिया, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा, छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक साहा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगस्वामी, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन मांझी, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह, नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यु रिओ, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग, केंद्रीय राज्यमंत्री सर्वश्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, विविध राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वश्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, पवन कल्याण, राजेंद्र शुक्ला, अरुण सावो, विजय शर्मा, प्रेमचंद बैरवा, विजयकुमार सिन्हा, सम्राट चौधरी, कनक बर्धन सिंह देव, प्रवती परिदा, चौना मेन, प्रेसतोन त्यांसोंग, यांथुंगो पटॉन, टी. आर. झेलियांग, एस धार, श्रीमती दिया कुमारी यांच्यासह साधू, संत, महंत, विविध धर्मांचे गुरु, राज्यातील खासदार, आमदार, विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते, उद्योग, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवर, विशेष निमंत्रित अतिथी उपस्थित होते.
राज ठाकरेंनी दिला पाठींबा –
शपथविधीनंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं असून, पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल, असे आश्वासनही राज ठाकरे यांनी दिले आहे.
आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन.
२०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस…
देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करताना राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं की, आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन. २०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.
पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की, असा इशाराही त्यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा, असेही राज ठाकरे यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
पुणे, दि. 5: मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या १० वाहनांचा जाहीर ई-लिलाव २६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथे ठेवण्यात आला आहे; ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी उपलब्ध असून वाहन मालक, चालक व वित्तदात्यांनी याची नोंद घ्यावी, अशी माहिती कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड यांनी कळविले आहे.
ई-लिलाव सहभागी होण्याकरीता १६ ते १९ डिसेंबर या कालावधीत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करावी. लिलावाचे अटी व नियम ९ डिसेंबर रोजी पासुन कार्यालयीन कामकाजाच्यादिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथील नोटीस बोर्डावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध राहील. तसेच सदरची वाहने पाहण्याकरीता ९ ते २४ डिसेंबर या कालावधीत प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड येथे उपलब्ध असणार आहेत. ‘वाहने जशी आहे तशी’ या तत्वावर जाहिर ई-लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे.
वाहनांची यादी www.eauction.gov.in या संकेतस्थळावर, प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय पुणे शहर, हवेली, जून्नर, मावळ, खेड, मुळशी, आंबेगाव या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येणार आहे. कोणतेही कारण न देता जाहीर लिलाव रद्द करण्याची अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी, पिंपरी-चिंचवड यांनी स्वत:कडे राखुन ठेवले आहेत.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे कृतज्ञता सन्मान व रमाई रत्न पुरस्काराने गौरव पुणे : आजच्या काळात एका जातीचा-धर्माचा झेंडा घेऊन राजकारण, समाजकारण होत असताना ॲड. प्रमोद आडकर यांनी सर्व धर्मांच्या चांगुलपणाचा झेंडा खांद्यावर घेऊन सत्याच्या बेरजेतून आयुष्य उभे केले आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले. ॲड. आडकर रमाई महोत्सवाच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून संविधानाच्या शिकवणुकीचा जागर करीत असल्याबद्दल त्यांचा रमाई रत्न पुरस्काराने करण्यात आलेला सन्मान अभिनंदनीय आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह, ज्येष्ठ संयोजक, लेखक, रंगत-संगत प्रतिष्ठान आणि रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांच्या एकसष्टीनिमित्त कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आज (5) आयोजन करण्यात आले होते. ॲड. आडकर यांचा सन्मान डॉ. सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. रमाई महोत्सवाचे सलग 12 वर्षे अध्यक्षपद भूषवित असल्याबद्दल त्यांचा या वेळी रमाई रत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संयोजक विठ्ठल गायकवाड, लता राजगुरू, मैथिली आडकर, ॲड. अविनाश साळवे मंचावर होते. संविधानाची प्रत, पंचशील शाल, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. समाजासाठी सर्वस्व वाहून घेणाऱ्या सर्व स्तरातील, जातीधर्मातील स्त्री-पुरुषांच्या कार्याचा ॲड. आडकर सन्मान करीत आले आहेत. त्यांची ही कृती संस्कृतीची पुण्याई पेरणारी आहे, असे सांगून डॉ. सबनीस म्हणाले, आज राजकारण, समाजकारण आणि धर्मकारणात विषाची पेरणी वाढलेली असताना संस्कृती जगणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत साहित्य, संस्कृती आणि समाजकारण क्षेत्रात संजीवनी देणारे, पुण्य पेरणारे कार्य त्यांच्या हातून होत आहे. ॲड. आडकर यांना समाजकार्यात सहकार्य करणाऱ्या मैथिली आडकर यांचेही त्यांनी कौतुक केले. सत्काराला उत्तर देताना ॲड. आडकर म्हणाले, विविध क्षेत्रात महान कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजासमोर आणण्याचा गेल्या 32 वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. या कार्याकरीता माता रमाईचा आशीर्वाद आणि पत्नीची खंबिर साथ मला लाभली आहे. त्यामुळे व्रतस्थपणे अखंडित हे कार्य मी सुरू ठेवेन. ॲड. अविनाश साळवे म्हणाले, सामाजिक जीवनात कार्यरत असताना स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवून कार्य करावे लागते. अशा वेळी ॲड. आडकर यांना पत्नीची खंबीर साथ लाभली असल्याने ते समाजाप्रबोधनाचे कार्य करत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले. आभार लता राजगुरू यांनी मानले.
पुणे -देशात कसोटीच्या क्षणी, कायद्याची बूज राखण्यासाठी जागरूक व संघर्षरत राहणे ही काळाची गरज असुन, ‘संविधान व लोकशाही’च्या अस्तित्वासाठी वकील वर्गा कडून अपेक्षा अधिक असल्याने, कायद्याचे संरक्षक म्हणून वकील वर्गावर जबाबदारी अधिक असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले. अध्यक्ष’स्थानी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे होते. “राष्ट्रीय वकील दिना”च्या व काँग्रेसच्या लीगल सेल’च्या पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसाचे औचित्याने सदर कार्यक्रमाचे संयोजन पुणे काँग्रेसच्या लीगल सेल’ने केले होते. महाराष्ट्र प्रदेश इंटक’चे पदाधिकारी तसेंच प्रदेश सचिव ऍड फैयाज शेख, तसेच पुणे शहर कॅांग्रेस लिगल सेल चे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत पाटील यांच्या जन्मदिन केक कापून व वकीलांचा सत्कार करून “राष्ट्रीय वकील दिन” साजरा करण्यात आला. ॲड फैयाज शेख व ॲड श्रीकांत पाटील हे हाडाचे कार्यकर्ते पेक्षा प्रामाणिक काँग्रेसजन असल्याचे व काँग्रेस पक्षाच्या लीगल सेल ने गरजू जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे यावे असे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी यावेळी बोलतांना सांगितले. सुत्र संचालन भोला वांजळे यांनी केले तर आभार प्रदर्शन काँग्रेस लीगलचे शहर उपाध्यक्ष ऍड. आरुडे यांनी केले. या प्रसंगी प्रदेश काँग्रेस लीगल सेल चे उपाध्यक्ष ऍड. शाहिद अख्तर शेख, ऍड. अनिल कांकरिया ऍड अयुब पठाण सि आय डी ॲड काळेबेरे, माजी नगरसेवक श्रीकांत पाटील, प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी मेहबूब नदाफ यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी ॲड विद्या पेळपकर, ॲड. रशिदा सय्यद, ॲड. डिसूझा, ॲड. अतुल गुंड पाटील, ॲड. राजाभाऊ चांदेरे, ॲड. चव्हाण, ॲड. सतीश कांबळे, ॲड. बलकवडे, ॲड भुंडे, ॲड सुरेश नांगरे, ॲड बाळासाहेब बावणे इ वकील मंडळी मोठ्या संख्येने ऊपस्थित होती.. तसेच राजीव गांधी स्मारक समितीचे सदस्य तसेच जेष्ठ काँग्रेसजन बाळासाहेब मारणे, रामचंद्र शेडगे, रमण पवार, सुभाष काळे, राजेश मंजरे, धनंजय भिलारे, सुनील तिखे, विकास दवे, गणेश शिंदे, नरेश आवटे इ उपस्थित होते.