Home Blog Page 554

मानवी भावना, सुंदर अभिनय अन चांगले कथानक, असलेले चित्रपट प्रेक्षकांना भावतात

मुंबई, दि.२: देशात विविध भाषा, जाती, धर्माचे नागरिक राहतात. भाषा कुठलीही असो, चित्रपटात जर मानवी भाव-भावना, सहज सुंदर अभिनय आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले तर तो प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो. भाषा, प्रेक्षक कोणतेही असले तरी तो भारतीय सिनेमा असतो हे महत्वाचे असल्याचे मत दाक्षिणात्य अभिनेते, अभिनेत्री यांनी व्यक्त केले.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये आयोजित ‘पॅन इंडियन सिनेमा माइथ ऑर मोमेंटम’ या विषयावर चर्चासत्र झाले. चर्चासत्रात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन, कारथी, अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी सहभाग घेतला तर त्यांना नमन रामचंद्रन यांनी बोलते केले.

काही वेळा फक्त हिंदी कलाकार घेऊन किंवा सिनेमा डब करून तो पॅन-इंडिया ठरत नाही. कथेला सर्व भारतीय प्रेक्षकांनी समजून घ्यायला हवे, असाही सूर चर्चासत्रात उमटला.

श्रीमती खुशबू म्हणाल्या, आजच्या काळात प्रेक्षकांना भावणारी कथा वेगळी नसते तर तिची मांडणी वेगळी असते, साऊथ आणि हिंदी सिनेमात जास्त फरक नाही. विविध कलाकार साऊथमधून आले आणि हिंदी सिनेमात स्थिरच नाहीतर नावही कमावले. प्रादेशिक भाषेतील सिनेमाला वेगळे समजू नये, तोही भारतीय सिनेमा आहे.

नागार्जुन म्हणाले की, चित्रपटाची भाषा महत्वाची नसते, तर त्यामध्ये भारतीय संस्कृती आणि मानवी भावना यांचा स्पर्श असेल तर तो सिनेमा अधिक लोकप्रिय होतो. तो सिनेमा बॉलिवूड असो की टॉलिवूड फरक पडत नाही. विविध प्रादेशिक भाषेतील सिनेमांचे हिंदीमध्ये डबिंग झाले आहे, होत आहेत.

कारथी म्हणाले की, प्रामाणिकपणा हा कोणताही सिनेमा असो थोडा रंगवलेला असला तरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. म्हणूनच प्रत्येक दिग्दर्शक यशस्वी होतोच असं नाही. पहिला चित्रपट प्रामाणिक असतो, त्यातला अभिनय स्वतःच्या अनुभवांवर आधारित असतो. त्यानंतर कलाकार त्याच भावनेची नक्कल करत राहतो आणि तेव्हा ते खोटं वाटायला लागतं.

अनुपम खेर म्हणाले की, आता कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ विविध भाषांमध्ये सहज काम करत आहेत. यामुळे प्रादेशिक भिंती कमी होत आहेत. मी तेलगू, तमिळमध्ये काम केले, मात्र हिंदीवर जास्त प्रेम आहे. दाक्षिणात्य सिनेमामध्ये कोविडनंतर खूप बदल पाहायला मिळतात, मात्र तो कोणत्याही भाषेतील असला तरी तो भारतीय सिनेमा म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. चित्रपट केवळ भारतापुरता मर्यादित न ठेवता जगभर पोहोचवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

हडपसर (पुणे) ते जोधपूर 3 मे, 2025 पासून नवीन एक्‍सप्रेस गाडी

पुणे, 2 मे 2025
पुणे विभाग, मध्य रेल्वेच्यातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि जोडणी वाढवण्यासाठी हडपसर (पुणे) – जोधपूर दरम्यान नवीन एक्सप्रेस गाडी सुरु करण्यात येत आहे. या मार्गावर गाडी क्रमांक 01401 हडपसर (पुणे) – जोधपूर ही नवीन एक्सप्रेस गाडी पहिल्यांदाच दिनांक 03.05.2025 (शनिवार) ला धावेल. ही गाडी हडपसर (पुणे) येथून 17:30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी 14:00 वाजता जोधपूर येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक 01402 जोधपूर – हडपसर (पुणे) एकमार्ग टीओडी विशेष दिनांक 04.05.2025 (रविवार) ला धावेल. ही गाडी जोधपूर येथून 20:30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी 17:00 वाजता पुणे येथे पोहोचेल.

हडपसर (पुणे) येथून निघणा-या गाडीचे थांबे पुढील प्रमाणे असतील : चिंचवड, लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, सूरत, वडोदरा, अहमदाबाद, मेहसाणा, पालनपूर, आबू रोड, पिंडवाडा, जवाई बांध, फालना, राणी, मारवाड, पाली मारवाड, लूणी.

या एक्सप्रेस गाडीला 1 एसी 2-टियर, 4 एसी 3-टियर इकॉनॉमी, 5 स्लीपर क्लास, 4 सामान्य द्वितीय श्रेणी, 1 जनरेटर कार, 1 सामान आणि गार्ड यासाठी ब्रेक व्हॅन असणार आहे.

आरक्षणाची सुविधा: गाडी क्रमांक 01401 साठी आरक्षण 02.05.2025 रोजी संध्याकाळी 16:00 वाजता सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरु होईल.

अनारक्षित कोचचे तिकीट ‘UTS App’ वरून सुपरफास्ट मेल/एक्सप्रेससाठी लागू असलेल्या दरामध्‍ये काढता येईल.

मुकेश अंबानी यांनी मांडली भारताच्या नेतृत्वातील जागतिक मनोरंजन विश्वाच्या क्रांतीची कल्पना

मुंबई,: दि.२ : भारत केवळ एक देश नाही ती कथांची एक अशी समाजव्यवस्था आहे, जिथे कथात्मक मांडणी ही एक जीवनशैलीच आहे,” असे प्रतिपादन रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी नुकतेच जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेतील भाषणात केले.

कथात्मक मांडणी ही भारतीय जीवनशैलीशी घट्टपणे विणलेली वीण असून, इथल्या महाकाव्यांपासून पौराणिक कथांपर्यंत, कथात्मक मांडणी हा भारताचा वारसा राहिला. आशय हा महत्वपूर्ण असून, चांगल्या कथांना कायमच बाजारपेठेत मोल मिळते. हे कालातीत तत्त्व असून, हेच जागतिक मनोरंजनाचा आधार आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी अंबानी यांनी भारत हा जगाच्या मनोरंजन उद्योग क्षेत्राचे मुख्य केंद्र बनणार असल्याची कल्पना उपस्थितांसमोर मांडली. आपल्या संबोधनातून त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनाची प्रेरणा देणार्‍या दृष्टिकोनाबाबत प्रशंसा केली तसेच वेव्हज शिखर परिषद ही याच भविष्याच्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे गौरवोद्गारही काढले.

आपल्या भाषणातून अंबानी यांनी जागतिक संस्कृती आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रात भारताचा वाढत्या प्रभावावावरही शिक्कामोर्तब केले. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र ही भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ अर्थात राजकीय क्षेत्रापलीकडची सांस्कृतिक ताकद असल्याचे लोक म्हणतात, मात्र ही भारताची खरी ताकद असल्याचे आपण मानतो असे त्यांनी सांगितले.

श्री.अंबानी म्हणाले की, आकर्षक आशय मांडणी, गतिमान लोकसंख्याशास्त्र आणि तंत्रज्ञानात्मक नेतृत्व या तीन स्तंभांनी बळकट असलेल्या मनोरंजन क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी देश सज्ज आहे. भारताची डिजिटल क्रांती ही केवळ व्यापकतेची कथा नाही तर ती आकांक्षा, महत्त्वाकांक्षा आणि परिवर्तनाची कहाणी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
00000

बंदिश निर्गुण निराकार रागाची सगुण साकार मूर्ती : डॉ. माधुरी डोंगरे

गांधर्व महाविद्यालय, पुणे तर्फे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर स्मृती गुरू गौरव पुरस्काराने सन्मान

पुणे : संगीत साधनेतून रागसंगीताचा ओढा वाढला त्यातून अध्यात्माशी जोडले गेले, त्या ध्यासातून स्वरांशी अनुसंधान साधत नवनिर्मितीचा आनंद घेतला. निर्गुण निराकार रागांची उपासना करणे अवघड आहे. बंदिशींच्या माध्यमातून या निर्गुण निराकार रागांची सगुण साकार मूर्ती तयार होते. नाद देवतेची भक्ती करताना भक्त वेगवेगळ्या भावातून, भूमिकेतून रचना साकारत असतो, असे प्रतिपादन शास्त्रीय गायिका, गुरू आणि प्रसिद्ध बंदिशरचनाकार डॉ. माधुरी डोंगरे यांनी केले.

भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर स्मृती गुरू गौरव पुरस्काराने डॉ. माधुरी डोंगरे यांचा गौरव करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. पुरस्काराचे वितरण जीएसटी आयुक्त दिनेश भोयर यांच्या हस्ते झाले. गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, उपप्राचार्या परिणिता मराठे यांची उपस्थिती होती. पुरस्काराचे स्वरूप भेटवस्तू आणि 21 हजार रुपये असे होते. डॉ. डोंगरे यांच्याशी मंजिरी जोशी यांनी संवाद साधला.

गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी महाविद्यालयाला दोन लाख रुपयांची देणगी जाहीर केली. तसेच गुरुकुलातील विद्यार्थी मयुरेश गाडगीळ, सविता हेगडे, विजय तुळसकर, आर्यन देशपांडे यांना संवादिनी भेट दिली.

डॉ. डोंगरे म्हणाल्या, पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी दर्शविलेल्या वाटेवर चालण्याचा मी प्रयत्न केला आहे. गुरू पंडित विनायकबुवा पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या गांधर्व महाविद्यालयात सत्कार होत या विषयी कृतज्ञ आणि कृतार्थ आहे. माझ्यावर नाददेवतेचा कृपाआशीर्वाद कायम रहावा.

त्या पुढे म्हणाल्या, सहज मिळालेली संगीत कला सुलभ नाही, त्यासाठी रियाज करणे आवश्यक आहे. गुरू होणे सोपे नाही. मी स्वत:ला गुरू नव्हे तर शिक्षकाच्या भूमिकेत पाहते. शिक्षकाने विद्यार्थ्याला शास्त्रीय संगीताची गोडी लावणे हे अवघड काम आहे. गुरू म्हणजे तळमळ, त्याला विद्यार्थ्याच्या प्रगतीची तळमळ असणे आवश्यक आहे.

संगीत क्षेत्रात महाविद्यालयीन शिक्षण आवश्यक असून त्याने विद्यार्थ्याचा पाया पक्का होती. त्याची गाणे शिकण्याची तयारी होते. फ्युजन, ऑन लाईन शिक्षण, यू-ट्यूब ही काळाची गरज आहे. फ्युजनच्या क्षेत्रात सर्जनशीलतेने काम करताना अभिजाततेचा गाभा सुटता कामा नये. विद्यार्थ्याने शरणागत भावाने नाद देवतेची प्रार्थना करत राहणे आवश्यक आहे, असे डॉ. डोंगरे म्हणाल्या.

दिनेश भोयर म्हणाले, कलाकाराने अभिजात शास्त्रीय संगीतातील शुद्ध भाव जपावेत.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ. डोंगरे यांनी रचलेल्या बंदिशी त्यांच्या शिष्या पौरवी साठे, रमा कुलकर्णी, गायत्री गोखले, कस्तुरी जोशी यांनी सादर केल्या. त्यांना पुष्कर महाजन (तबला), मीनल नांदेडकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेधा ढाके यांनी केले.

अमानोरा येस फाऊंडेशनचा रोटरीतर्फे गौरव

सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रातील कार्याची दखल
पुणे : पाणी बचतीसह आरोग्य, पर्यावरणीय उपक्रम तसेच कौशल्य विकासातून सामाजिक वृद्धी, महिला सशक्तीकरण आणि आदिवासी आश्रमशाळा अशा सामाजिक उपक्रमांसाठी भरीव योगदान देणाऱ्या अमानोरा येस फाऊंडेशनचा रोटरी इंटरनॅशलन डिस्ट्रिक्ट 3131च्या वतीने सीएसआर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
सामाजिक क्षेत्रात सकारात्मक आणि भरीव कार्यातून योगदान देत मूलभूत बदल घडविण्यासाठी नामांकित उद्योग समूहांचा गौरव करण्यात येतो. हयात रिजन्सी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक अर्थव्यवस्थेतील उल्लेखनीय सेवेबद्दल अमानोरा येस फाऊंडेशनचा गौरव करण्यात आला. फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी पुरस्कार स्वीकारला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शितल शहा यांच्यासह व्हाईस ॲडमिरल कमांडट (एनडीए) गुरुचरण सिंह, राकेश भार्गव, रवी कपूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्यसेवा, पर्यावरण संवर्धन तसेच ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रातील सामाजिक उपक्रमांसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 52 आस्थापनांच्या प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला.
अमानोरा टाऊनशिप येथे पाणी बचतीचा संदेश देत पाण्याचा अतिरिक्त वापर टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. निरोगी समाजाचे ध्येय मनात ठेऊन समाजातील सर्व घटकातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी म्हणून येस फाऊंडेशनच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जातात. कौशल्य विकास साधल्यास सामाजिक वृद्धी होते या भावनेतून कौशल्य शिक्षणासोबतच सामुदायिक जाणीव निर्माण केली जाते. समाजातील विविध घटक आजही शिक्षणापासून वंचित राहिले आहेत या पैकी पारधी समाजातील विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे या करीता यस फाऊंडेशनतर्फे खामगाव येथे सूर्येादय पारधी आश्रमशाळा दत्तक घेतली आहे. तसेच महिला सशक्तीकरण, क्षुधा-शांती योजना आणि सूर्योदय बालगृह देखील चालविले जाते. या कार्याची दखल घेऊन रोटरी इंटरनॅशलन डिस्ट्रिक्ट 3131तर्फे गौरव करण्यात आला आहे.
गुरुचरण सिंह म्हणाले, रोटरीच्या माध्यमातून विविध सामाजिक, लोकोपयोगी कार्ये निस्पृह भावनेने घडत आहेत. प्रास्ताविक मंजू फडके यांनी केले तर मोहन चौबेल यांनी आभार मानले.

‘यशोगाथा संघर्षाची‌’ : डॉ. टी. टी. पाटील यांच्या आयुष्याची शिदोरी : डॉ. सुहास दिवसे

पुणे : ‌‘यशोगाथा संघर्षाची‌’ हे डॉ. टी. टी. पाटील यांचे आत्मकथनपर पुस्तक म्हणजे त्यांच्या आयुष्याची शिदोरी असून सफलतेची यशोगाथा आहे. पुस्तक वाचनातून उर्मी मिळते. ‌‘माणसात गुंतवणूक करा‌’, ‌‘जे कराल त्यावर नितांत प्रेम करा‌’ आणि ‌‘तुम्ही स्वत:च एक ब्रँड आहात‌’ हे त्यांचे विचार आयुष्यातील वाटचालीत प्रत्येकाला उपयोगी ठरणार आहेत, असे प्रतिपादन जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख (नि.) डॉ. सुहास दिवसे यांनी केले.
खान्देश सुपुत्र डॉ. टी. टी. पाटील लिखित ‌‘यशोगाथा संघर्षाची‌’ या आत्मकथनपर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा साफा बँक्वेट हॉल, बालेवाडी हायस्ट्रीट येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी डॉ. दिवसे अध्यक्षपदावरून बोलत होते. पुस्तकाचे प्रकाशन लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, बीव्हीजी उद्योग समूहाचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, जे. एल. आर. उद्योग समूहाचे संचालक गोविंद पाटील, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त प्राचार्य (नि.) डॉ. सुरेश सावंत, रिचफिल्ड फर्टीलायझर्स प्रा. लि.चे अध्यक्ष व कार्यकारी संचालक डॉ. स्वप्नील बच्छाव, प्रकाशिका सिंधूबाई टी. पाटील, डॉ. पद्मश्री पाटील यांच्या उपस्थितीत झाले.
डॉ. दिवसे पुढे म्हणाले, आदिवासी भागातील एक हुशार विद्यार्थी ते यशस्वी व्यावसायिक हा डॉ. टी. टी. पाटील यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. ज्या ज्या व्यक्ती हे पुस्तक वाचतील त्यांचे आयुष्य निश्चित बदलेल.
विजय बाविस्कर म्हणाले, माणसे उगीचच मोठी होत नाहीत. प्रत्येकाचे आयुष्य संघर्षमय असते; पण आयुष्य सुंदरही असते हे डॉ. टी. टी. पाटील यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. सिंधूताई पाटील आणि कुटुंबियांनी डॉ. टी. टी. पाटील यांचे स्वप्न पूर्ण केल्याचे आवर्जून नमूद करून बाविस्कर पुढे म्हणाले, ‌‘यशोगाथा संघर्षाची‌’ हे पुस्तक वाचून शेकडो उद्योजक तयार झाले तर ती डॉ. पाटील यांना खरी भावांजली असणार आहे.
डॉ. टी. टी. पाटील यांच्या पत्नी सिंधूताई पाटील प्रकाशक या नात्याने बोलताना म्हणाल्या डॉ. पाटील यांनी आयुष्यभर कष्ट केले. त्यांच्या हयातीत पुस्तकाचे प्रकाशन करायचे होते, पण तसे काही झाले नाही. त्यांची पुस्तक प्रकाशन करण्याची इच्छा मात्र पूर्ण केली आहे.
हणमंतराव गायकवाड म्हणाले, पुस्तक वाचताना असे वाटते की, पुस्तक आपल्याशी बोलतेच आहे. वेगळ्या वाटेने जाऊन दीपस्तंभासारखी कामे करणाऱ्या काही व्यक्ती असतात. डॉ. पाटील यांची आत्मकथा वाचल्यास दीपस्तंभासारख्या अनेक व्यक्ती निर्माण होतील.
सचिन ईटकर म्हणाले, डॉ. पाटील यांचा संघर्ष प्रेरणादायी असून त्यांनी उद्यमशीलता विकसित केली आहे. ग्रामीण भागात उद्योजकांची संख्या वाढेल तेव्हाच विकसित भारताचे स्वप्न साकार होऊ शकणार आहे.
ग्रामीण भागातही गुणवत्ता असते हा मुद्दा अधोरेखित करून योगेंद्र नेरकर म्हणाले, डॉ. पाटील यांनी विद्यार्थीदशेपासून लढा दिला असून जिंकलाही आहे. उद्योग क्षेत्रात येऊ पाहण्याऱ्यांसाठी हे पुस्तक गुरुकिल्ली आहे.
सुरेश सावंत म्हणाले, डॉ. टी. टी. पाटील यांची आत्मकथा एकलव्याची आठवण करून देणारी आहे. ही एका व्यक्तीची आत्मकथा नाही तर खान्देशी लोकजीवनाचे दर्शन यातून घडत आहे. त्यांना चाकोरीबद्ध जगणे मान्य नव्हते. त्यांच्या कार्यातून समृद्ध, बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचे दर्शन घडते. डॉ. पाटील यांची जीवनगाथा अभ्यासक्रमामध्ये असावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. संदीप बच्छाव यांनी डॉ. टी. टी. पाटील यांचा जीवनप्रवास कथन केला तर डॉ. पद्मश्री पाटील यांनी पुस्तकाचा प्रवास उलगडला.
मान्यवरांचे स्वागत डॉ. संदीप बच्छाव, पंकज पाटील, प्रतिभा बच्छाव, संदीप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

२ हजार कोटीची गुंतवणूक: गोदरेजसिटी,पनवेल येथे चित्रपट, दूरदर्शन आणि मीडिया कॅम्पस उभारणार

गोदरेज फंड मॅनेजमेंट आणि शासनातर्फे WAVES मध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी

2,000 कोटी रु. च्या प्रस्तावित गुंतवणुकीसह अंदाजे 2500 रोजगारनिर्मितीची क्षमता
 साधारण 10 एकर भूखंडावर सुमारे 500 कोटी रु. ची फेज 1 गुंतवणूक
मुंबई, 02 मे 2025:
गोदरेज फंड मॅनेजमेंटने WAVES समिट 2025, मुंबई येथे महाराष्ट्र
शासनासोबत एक सामंजस्य करार (MoU) केला. या धोरणात्मक भागीदारीचा उद्देश
जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि शाश्वततेच्या मानकांनुसार अत्याधुनिक चित्रपट
आणि मीडिया कॅम्पस विकसीत करून महाराष्ट्रात कला, माध्यम आणि दूरचित्रवाणी क्षेत्राच्या
वाढीस चालना देणे हा आहे.
या सामंजस्य कराराअंतर्गत, महाराष्ट्र शासन गोदरेज फंड मॅनेजमेंट अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेंट
अ‍ॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेडला कॅम्पस विकासासाठी राज्य शासनाच्या विद्यमान धोरणे,
नियम आणि कायद्यांनुसार संबंधित राज्य विभागांकडून आवश्यक परवानग्या, नोंदणी,
मान्यता आणि वित्तीय सवलती मिळवण्यासाठी सहाय्य करेल.
गोदरेज सिटी, पनवेल या एकात्मिक गोल्फ टाउनशिपमध्ये असलेल्या या कॅम्पसमध्ये AA
स्टुडिओज असतील. अत्याधुनिक सोयीसुविधा व जागतिक दर्जाच्या निर्मिती सुविधा पुरवत हे
कलाकार, संगीतकार आणि चित्रपट निर्मात्यांसाठी महत्वाचे केंद्र ठरेल. या केंद्राच्या
डिझाइनसाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली असून ते नवीनतम तंत्रज्ञान, AI
यांसारख्या प्रणालींनी सुसज्ज आहे. कुशल मनुष्यबळासह जगातील सर्वात मोठा आशय
निर्मिती देश म्हणून भारताला या स्टुडिओद्वारे स्थानिक प्रतिभेचा उपयोग करून
कथाकथनातील उत्कृष्टतेकडे वाटचाल करता येईल. या सुविधेमुळे आशय निर्मिती,
हॉस्पिटॅलिटी आणि तांत्रिक सेवा क्षेत्रांमध्ये रोजगारनिर्मिती होऊन लक्षणीय आर्थिक प्रभाव
निर्माण होण्याची अपेक्षा आहे. तसेच पर्यटन आणि परकीय चलन यांना चालना मिळेल.
यामुळे भारत सरकारच्या परदेशी चित्रपट निर्मितीसाठीच्या प्रागतिक प्रोत्साहन धोरणाचा लाभ
घेता येईल.या विकासामुळे पूरक उद्योगांनाही चालना मिळेल आणि पनवेल हे सर्जनशील उद्योजकता
आणि नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी एक सक्षम केंद्र म्हणून उदयास येईल. हे विकासकार्य मुंबई
3.0 या पुढारलेल्या नागरीकरण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनाशी पूर्णपणे सुसंगत आहे
आणि राज्यभर आर्थिक विकासाला गती देण्याच्या दिशेने आहे.
गोदरेज फंड मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी करण
बोलारिया म्हणाले, “हा उपक्रम म्हणजे नवकल्पना, सर्जनशीलता आणि रोजगारास चालना
देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबतची एक अर्थपूर्ण भागीदारी आहे. मुंबई 3.0 च्या दृष्टीकोनाशी
सुसंगत जागतिक प्रतिभेला आकर्षित करणारी, स्थानिक सर्जनशील लोकांना सक्षम करणारी
आणि पनवेलला सांस्कृतिक आणि व्यावसायिक केंद्र बनवणारी एक गतिशील परिसंस्था
उभारण्याचा आमचा उद्देश आहे.”
गोदरेज सिटी, पनवेल ही 145 एकरमध्ये पसरलेली एक स्वयंपुरक गोल्फ टाउनशिप असून
तिथे 30 एकरच्या 9-होल गोल्फ कोर्सचा समावेश आहे. या विकास प्रकल्पात नामांकित
शाळा, आरोग्य सेवा, व्यावसायिक क्षेत्र आणि लोकप्रिय खाद्यपदार्थांच्या आउटलेट्सचा
समावेश आहे. ही जागा दळणवळणाच्या सोई सुविधा यांच्या अनुषंगाने अत्यंत अनुकूल असून
आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेपासून केवळ काही
मिनिटांच्या अंतरावर आहे. अटल सेतू (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) यामुळे दक्षिण मुंबईपर्यंतचा
प्रवासाचा कालावधी आणखी कमी होतो. निसर्गसौंदर्य आणि शहरी पायाभूत सुविधांचा परिपूर्ण
संगम असल्याने ही जागा चित्रपट, संगीत व्हिडिओ आणि विविध व्यावसायिक निर्मितींसाठी
आदर्श स्थळ आहे.

आदित्य बिर्ला कॅपिटल डिजिटलने ABCD मोबाइलॲपवर सुरू केली डिजिटल गोल्ड एसआयपी

~ ग्राहक केवळ ₹50 पासून डिजिटल गोल्ड एसआयपीमध्ये गुंतवणूक करू शकतात ~

मुंबई, : भारतातील आघाडीची वित्तीय सेवा कंपनी आदित्य बिर्ला कॅपिटलची डिजिटल-प्रथम D2C शाखा असलेल्या आदित्य बिर्ला कॅपिटल डिजिटल लिमिटेड (“ABCDL”) ने आज डिजिटल गोल्ड एसआयपी सुरू करण्याची घोषणा केली. ही एक प्रणालीबद्ध गुंतवणूक योजना आहे, ज्याद्वारे वापरकर्ते केवळ ₹50 पासून साप्ताहिक एसआयपी आणि ₹100 पासून मासिक एसआयपीद्वारे डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकतात. ही सुविधा ABCD मोबाइल ॲपवर उपलब्ध आहे.

डिजिटल गोल्ड एसआयपी ही भारतात प्रचलित असलेल्या गुंतवणुकीच्या पद्धतीला पारंपरिक मूल्य असलेल्या संपत्तीच्या वर्गासोबत एकत्र आणते. नियमित आणि स्वयंचलित गुंतवणुकीची सुविधा देत, ही योजना गुंतवणूकदारांना वेळोवेळी बाजारातील चढ-उतारांवर मात करण्यासाठी कंपाउंडिंगच्या शक्तीचा आधार देते. ही योजना 24 कॅरेट भौतिक सोन्याने समर्थित आहे, जे सुरक्षित आणि विमा संरक्षित कोठारांमध्ये साठवलेले असते. या कोठारांचे व्यवस्थापन MMTC-PAMP (स्विस बुलियन ब्रँड PAMP आणि भारत सरकारच्या मालकीची मिनरल्स अँड मेटल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातील संयुक्त उपक्रम) द्वारे केले जाते.

ABCD ॲपमधील डिजिटल गोल्ड अंतर्गत गिफ्टिंग आणि एसआयपी या दोन्ही सुविधा एकत्रित करून ग्राहकांना सुव्यवस्थित गुंतवणूक मॉडेलद्वारे सोने नियोजनपूर्वक खरेदी, बचत व गिफ्ट करण्याची सुलभता मिळते, तीही साठवणूक, सुरक्षेचा किंवा मेकिंग चार्जेसचा त्रास न करता.

श्रीपंकज गाडगीळव्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीआदित्य बिर्ला हासिंग फायनान्स लिमिटेड, तसेच प्रमुख – डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि पेमेंट्स स्ट्रॅटेजीआदित्य बिर्ला कॅपिटल यांनी सांगितलेसंपत्ती विविधीकरणासाठी सोने हा एक महत्त्वाचा संपत्ती वर्ग आहेजो परंपरा आणि विश्वासाशी घट्टपणे जोडलेला आहेजरी भौतिक सोन्याची पारंपरिक मोहिनी आजही कायम आहेतरी नव्या पिढीतील गुंतवणूकदार अधिक परवडणाऱ्यासुलभ आणि विश्वासार्ह पर्यायांची मागणी करत आहेतआमचे डिजिटल गोल्ड एसआयपी हे सोन्यात गुंतवणुकीसाठी एक सहज आणि प्रणालीबद्ध उपाय आहेजो गुंतवणूकदारांना आत्मविश्वासाने आणि सोप्या पद्धतीने संपत्ती निर्माण करण्यास मदत करतोसोन्याची मागणी वाढत असताना आणि विविधीकरणाला प्राधान्य दिले जात असतानाडिजिटल गोल्ड एसआयपी हा एक स्मार्ट  झंझटमुक्त गुंतवणूक पर्याय म्हणून पुढे येईलअसा आम्हाला विश्वास आहे.”

डिजिटल गोल्ड व्यतिरिक्त, ABCD ॲपमध्ये डिजिटल सिल्वर देखील उपलब्ध आहे, जे 24 कॅरेट भौतिक चांदीने समर्थित असून, सुरक्षित कोठारांमध्ये साठवले जाते. वापरकर्त्यांना हवे तेव्हा खरेदी, साठवणूक किंवा रिडीम करण्यासाठी लवचिक पर्याय उपलब्ध आहेत. ईव्ही, सौरऊर्जा आणि तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये चांदीच्या वाढत्या वापरामुळे, डिजिटल सिल्वर हे एक स्मार्ट आणि भविष्यातील गुंतवणुकीसाठी तयार असलेले, विविधीकरणासाठी उपयुक्त असे आकर्षक पर्याय बनले आहे.

चीन येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेत ‘शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कार’ मिळाल्याबद्दल पुण्याचा स्केटिंगपटू जिनेश नानल याचा सत्कार

पुणे: महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कारांचे नुकतेच वितरण झाले. यामध्ये पुण्याच्या जिनेश शीतल सत्यन नानल याने महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. इनलाईन फ्रीस्टाईल स्केटिंग या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिनेशला ‘शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कार २०२३-२४’ प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा अतिशय मानाचा व प्रतिष्ठेचा क्रीडा पुरस्कार आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिनेशचे कुटुंबीय व स्नेहीजनांच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी जिनेशची आई डॉ. शीतल सत्यन नानल,  वडील डॉ. सत्यन नानल, डॉ. इकबाल सय्यद, मामा विशाल खटोड (जैन), केतन नानल, क्रिश खटोड, विजय बाजी आदी उपस्थित होते.

जिनेशने गेल्या दहा वर्षांपासून प्रशिक्षक अशुतोष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण सराव व कठोर परिश्रम करत भारतीय स्केटिंग विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकत्याच झालेल्या हॉंगकॉंगमधील वर्ल्ड गेम्स सिरीजमध्ये जिनेशने एक रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या अधिपत्याखाली होणाऱ्या या स्पर्धा जागतिक दर्जाच्या खेळाडूंसाठी गौरवाचे व्यासपीठ मानल्या जातात आणि जिनेशने त्यात आपले कौशल्य सिद्ध केले आहे. चीन येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी जिनेशची निवड झाली आहे.

चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये जिनेशने भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे. देशांतर्गत पातळीवर त्याने सलग पाचवेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकविले असून, स्केटिंगमध्ये जिनेश भारतात पहिल्या,  तर जगात सातव्या क्रमांकावर आहे. आई शीतल व वडील सत्यन नानल हे दोघेही व्यवसायाने डॉक्टर असून, गेल्या २० वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.

आई शीतल म्हणाल्या, ‘मैदानाबरोबरच जिनेशचा शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय सहभाग आहे. सध्या तो एमआयटी विश्वशांती विद्यापीठामध्ये संगणक अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. क्रीडा व अभ्यासात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याने शिष्यवृत्तीही मिळवली आहे. त्याच्यातील कौशल्याला चिकाटीची जोड, योग्य मार्गदर्शन मिळाले. आई-वडील म्हणून त्याच्या कामगिरीचे, यशाचे कौतुक आहे.”

प्रशिक्षक अशुतोष जगताप म्हणाले, “जिनेशच्या यशस्वी प्रवासामागे त्याची अनेक वर्षांची कठोर मेहनत, एकाग्रता, संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत. नेहमी स्वतःच्या मर्यादा ओलांडत यशाची नवी शिखरे पादाक्रांत करणारा जिनेश युवा स्केटर्ससाठी आदर्श ठरला आहे. हा पुरस्कार केवळ त्याचाच नव्हे, तर संपूर्ण भारतीय स्केटिंग क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण आहे.”

बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारणे आनंदाची बाब आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या या प्रवासात आई-वडील, प्रशिक्षक यांचे मोलाचे योगदान आहे. मला सातत्याने प्रोत्साहन दिल्यामुळेच यशस्वी कामगिरी करता आली. येणाऱ्या काळात ऑलिंपिकमध्ये भारतासाठी पदक जिंकायचे आहे.

– जिनेश शीतल सत्यन नानल, स्केटिंगपटू

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना दुसरा लकी ड्रॉ ७ मे रोजी

मुंबई, ०२ मे २०२५-

महावितरण लकी डिजिटल ग्राहकांच्या पुढील लकी ड्रॉ . ७ मे २०२५ रोजी काढण्यात येत आहे. यातून प्रत्येक उपविभाग स्तरावर एक प्रमाणे पहिल्या क्रमांकासाठी ६५१ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन बक्षीस म्हणून दिले जाते. तर प्रत्येक उपविभागात प्रत्येक दोन विजेत्या क्रमांकासाठी १३०२ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट व प्रत्येक दोन ग्राहकांना फोन नंबरसाठी १३०२ विजेत्या स्मार्ट वॉच बक्षीस म्हणून दिले जाते. लकी ड्रॉ. ७ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात आला असून विजेत्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले आहे. याढीली लकी ड्रॉ २०२५ या लढाईत जून आहेत.

महावितरण योजना वीज बिल भरणा ग्राहकांचा टक्का विकास करण्याच्या उद्देशाने लकी डिजिटल ग्राहक सुरू केली आहे. या सर्वांसाठी वीज बिल भरणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३, २०२५ या घटनात भाग मे तीन वा तीनपेक्षा अधिक वीजबिले भरणा ग्राहकांना या व्यक्तीचा फायदा होणार आहे.

ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू ( एल टी-लाईव्ह) वीजग्राहकांसाठी लागू असून , ज्यांनी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी एक वर्ष म्हणजे ०.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ या लढाईत एकदा वीज देवकाचा क्षमता भरणा किंवा शक्ती देयक भरणा वापरला नाही. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in भेट द्यावी.

ग्राहक रांगेत राहण्यापेक्षा वेळ , वीज बिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. ग्राहकांना डिजिटल पध्दतीने वीज बिलाचा भरणा करता यावा , यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ , महावितरण मोबाईल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना देय ग्राहकेवर ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. जनता सध्या ७० टक्के अधिक वीज ग्राहक पध्दतीने वीज बिल भरत आहेत. हे प्रमाण वाढवण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना राबत आहे.

या प्रत्येकाच्या प्रत्येक ग्राहकाने नेट बँकिंग , डेबिट कार्ड ,  क्रेडिट कार्ड , युरोपीय , वॉलेट , कॅश कार्ड , एनएसीएच , क्यूआर कोड , एनईएफटी , आरटीजीएस इ. विजेचा वीज बिल भरणे पर्याय वापरून लोकांच्या अगोदर दरमहा एकाप्रमाणे तीन किंवा तीनपेक्षा जास्त वीज बिल भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in भेट द्यावी.

एअर इंडियाचा दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मान

विमानप्रवासातील सेवा आणि मनोरंजनात्मक सोयींची दखल

गुरुग्राम, २ मे २०२५ – जागतिक विमानसेवा कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या एअर इंडियाला नुकतेच दोन नामांकित पुरस्काराने गौरविण्यात आले.ट्रॅव्हलप्लस एअरलाइन पुरस्कार  आणि पॅक्स रिडरशिप पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट आयएफईसी दक्षिण आशिया २०२५ या दोन प्रतिष्ठित पुरस्कारांसह एअर इंडियाचा सन्मान करण्यात आला. ट्रॅव्हलप्लस एअरलाइन पुरस्कारांमध्ये एअर इंडियाच्या विस्ता व्हर्व्हला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला. बिझनेस क्लासमध्ये ग्राहकांना जेवण देण्यासाठी वापरण्यात येणा-या भांड्यांसाठी हा सुवर्ण पुरस्कार दिला गेला. कंपनीच्या विस्ता या विमानप्रवासातील ग्राहकांच्या मनोरंजन प्रणालीला पॅक्स रिडरशिप पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आयएफईसी दक्षिण आशिया २०२५ हा पुरस्कार मिळाला.

द ट्रॅव्हलप्लस एअरलाइन पुरस्कार २०२५मध्ये बिझनेस क्लासमधील जेवण देण्यासाठी दिल्या जाणा-या भांड्यांसाठी सुवर्ण पुरस्कार प्राप्त

ट्रॅव्हलप्लस एअरलाइन पुरस्कारांमध्ये एअर इंडियाला बिझनेस क्लामधील ग्राहकांना जेवणासाठी दिल्या जाणा-या भांड्यांसाठी यंदाचा सुवर्ण पुरस्कार मिळाला. हॅम्बर्ग येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. एअर इंडिया आपल्या ग्राहकांसाठी खासकरुन विस्ता व्हॅव्ह भोजनची आखणी तयार केली आहे. या भोजनाच्या व्यवस्थापनाचा या पुरस्कारामुळे सन्मान झाल्याचे एअर इंडियाच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून सांगण्यात आले. या भोजनाच्या आयोजनात खालील गोष्टींचा समावेश होतो. –

  • भारतीय जेवणासाठी मंडल डिझाइनमधील खास चिनी मातीची भांडी.
  • स्लोव्हाकियामधील शिसे-मुक्त काचेची भांडी.
  • स्टनलेस स्टीलची कटलरी. यातील चाकू-चमचे पोकळ हॅण्डलचे आणि वजनाने हलके असतात.
  • जेवणात मीठ किंवा मिरपूड हवी असल्यास या भोजन साहित्यात सोनेरी रंगाचे भारतीय डिझाइन्सचे आकर्षक सेट उपलब्ध असतात.
  • संपूर्ण मांडणीला पूरक अशी विचारपूर्वक तयार केलेले टेबल क्लॉथ.

द पॅक्स रिडरशीप पुरस्कारांमध्ये विस्ता प्रणालीसाठी सर्वोत्कृष्ट आयएफईसी दक्षिण आशिया २०२५ पुरस्कार

विमानप्रवासात ग्राहकांचे मनोरंजन व्हावे म्हणून एअर इंडियाने मनोरंजन आणि कनेक्टिव्हिटी प्रणाली म्हणून विस्ता ही सेवा पुरवली आहे. या प्रणालीला द पॅक्स रिडरशिप पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट आयएफईसी दक्षिण आशिया पुरस्कार मिळाला आहे. विस्ता या प्रणालील ग्राहकांना खालील सोयींची उपल्बधता केली जाते.

  • १४ जागतिक भाषांमधील प्रसिद्ध सिनेमांचा खजाना. या सिनेमांतून प्रवाशांचे २ हजार २०० तास मनोरंजन होईल एवढा संग्रह उपलब्ध आहे.
  • ८ भारतीय भाषांमधील २५० सिनेमांचा संग्रह.
  • भारतीय, पाश्चिमात्य आणि आंतरराष्ट्रीय टीव्ही मालिकांचे ९०० हून अधिक भाग उपलब्ध.
  • सुमारे १ हजार तासांचे ऑडिओ मनोरंजन

ग्राहकांना या सर्व सोयीसुविधा एअर इंडियाच्या एअरबस ए३५०च्या विमानांमध्ये उपलब्ध आहेत. एअरलाइन्सच्या विस्तारीत ताफ्यातही या सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहेत. या सुविधांमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करणा-या ग्राहकांचा विमान प्रवास अधिक सोयीस्कर होईल, असा विश्वास एअर इंडियाने व्यक्त केला.

या व्यतिरिक्त एअर इंडियाचा विस्ता स्ट्रीम ही वायरलेस स्ट्रीमिंग सुविधा देशांतर्गत विमानसेवा देणा-या विमानांमध्ये उपलब्ध असते. या सुविधांमध्ये खालील सोयी उपलब्ध असतात. –

·         जागतिक सिनेमांचा संच. या संचाचा वापर करुन ग्राहकांचे ८९० तासांपेक्षा जास्त काळ मनोरंजन होते.

·         ८ भाषांमधील १७० हून अधिक भारतीय चित्रपट.

·         खास मुलांसाठी ३० तासांपेक्षाही जास्त काळाचे मनोरंजनात्मक कार्यक्रम

०  १ हजार तासांपेक्षा जास्त ऑडिओ मनोरंजनाचा खजिना

विस्ता आणि विस्ता स्ट्रीम या दोन्ही प्रणाली एअर इंडियाच्या ग्राहकांचा आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास सुखकर करते.

हे पुरस्कार एअर इंडियाच्या विहान एआय या उपक्रमांतर्गत सुधारित सुविधांची पोहोचपावती आहे. जागकिक मानांकनानुसार एअरलाइनचा ब्रॅण्ड सुधारणे, सेवांमध्ये सुधारणा घडवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

प्राधिकरणाची अवैध होर्डींगवर कारवाई

पुणे (दि.२) : पुणे महानगर प्रदेश‍ विकास प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत होर्डिंगवर पथकाच्या माध्‍यमातून कारवाई करण्यात येत आहे. हवेली तालुक्यात लोणी काळभोरमध्‍ये नुकतीच तीन ठिकाणी अनधिकृत होर्डिंग काढण्यात आले.

लोणी काळभोरमधील या कारवाईमुळे होर्डींगधारक, ॲडव्हरटायझिंग कंपनी यांनी धसका घेतला असून प्राधिकरणाच्या विकास परवानगीकडे अंतिम चलणे भरत आहे. यासह काही होर्डींग संबंध‍ितांनी स्वत:हून काढून घेतले. अवकाळी पाऊस, वादळी वारे आदीमुळे अशा होर्डींगपासून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंध‍ितांनी वर्दळीच्या व रहदारीच्या ठिकाणाचे धोकादायक, मर्यादेपेक्षा उंचीचे, दुबार संरचना होर्डिंग काढून घ्यावेत. तसेच होर्डींगधारकांनी अनधिकृत होर्डींगला परवानगी घेण्यात यावी, अन्यथा पीएमआरडीएच्या माध्‍यमातून एकतर्फी निष्कासन कारवाई करण्यात येईल. याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्राधिकरणाच्या सह आयुक्त डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील यांनी केले आहे.

संबंधित कारवाई महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दिपक सिंगला, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे, सह आयुक्त डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. कारवाईवेळी उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार रविंद्र रांजणे, तहसीलदार सच‍िन म्हस्के, पोलिस निरीक्षक महेशकुमार सरतापे, शाखा अभियंता विष्णू आवाड, शरद खोमणे, प्रणव डेंगळे, तेजस मदने यांच्यासह स्थानिक बंदोबस्त तैनात होता.

अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा
गेल्या काही द‍िवसापासून पीएमआरडीएच्या माध्‍यमातून अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु आहे. यात बुधवारी वाघोलीतील (ता.हवेली) चालू बांधकामावर तसेच बावधनमधील (ता. मुळशी) बकाजी कॉर्नर ते स्मशान भूमीपर्यंत रस्त्याच्या दुर्तफा अतिक्रमणे काढण्यात आली. यात ३९ पत्राशेड, आरसीसी कट्टा, कंपाऊंड वॉल व टपरी आदी स्ट्रक्चर्स जमीनदोस्त करण्यात आली. यामुळे रस्त्यावरील वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

अवघ्या तीनशे मीटरच्या रस्त्यासाठी आमदार बापू पठारे यांनी संतप्त होत सुरु केलं आमरण उपोषण

पुण्यातील लोहगाव-खराडी या दोन्ही परिसरांना जोडणाऱ्या अवघ्या तीनशे मीटरच्या रस्त्यासाठी आमदार बापू पठारे यांनी संतप्त होत आमरण उपोषण छेडलं आहे. रस्त्याचे काम जोपर्यंत होत नाही तोपर्यत आमरण उपोषण सुरु राहणार असे पठारे यांनी म्हटलं आहे.आज सकाळी दहा वाजल्यापासून बापू पठारे हे त्यांचे काही कार्यकर्ते आणि स्थानिकांसोबत या तीनशे मीटर रस्त्याजवळ आंदोलनाला बसले आहेत. या रस्त्याबाबत तक्रार करायला गेलं की या विभागाचे अधिकारी बघू, करू असं म्हणतात पण आता जोपर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण होत नाही, तोपर्यंत मी असाच बसून राहणार असा पावित्र्य पठारे यांनी घेतला आहे. उपोषणासंदर्भात पठारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

लोहगाव-वाघोली रस्त्याला जोडणाऱ्या फॉरेस्ट पार्क, गोठण ओढा मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील केवळ ३०० मीटर अंतराचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिकांना दररोज या रस्त्याच्या अपूर्णतेमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.वारंवार निवेदने, मागण्या आणि पाठपुरावा करूनही पुणे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे आता मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आज सकाळी ८.३० वाजता त्याच लोहगाव येथील ३०० मीटर रस्त्यावर आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. असं पठारे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

फौजदार विराज गावडेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल

पुणे-पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात पोलीस फौजदार विराज गावडेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची हकीकत मोठी रंजक आणि समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरू शकेल अशी असल्याचे सध्या तरी दिसते आहे पीडित तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात या फौजदारा विरोधात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार , पोलिस उपनिरीक्षक विराज गावडे (वय ३२, रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा), त्याचा भाऊ कुणाल गावडे तसेच वडील गजानन गावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहायक पोलिस आयुक्त अनुजा देशमाने पुढील तपास करत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोलिस उपनिरीक्षक विराज गावडे हा पुण्यात पूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. २०२० मध्ये त्याची पीडित तरुणी सोबत ओळख निर्माण होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह देखील केला.परंतु ही बाब त्याने कुटुंबीय, मित्रांपासून लपवली. पीडित तरुणीला पत्नीप्रमाणे दर्जा दिला नाही. तरुणीने याबाबत त्याच्याकडे विचारणा केली त्यावेळी कुटुंबीयांना विवाहाबद्दलची माहिती देतो, असे सांगून विराज याने तरुणीकडून वेळोवेळी विविध कारणे सांगत १० ते १२ लाख रुपये घेतले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

दरम्यान, विराज याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. पीडित तरुणीने त्यानंतर त्याच्याकडे लग्न झाल्याचे घरी सांग अशी विचारणा केली. कुटुंबीयांशी ओळख करुन दे, अशी विनंती तिने केली. त्यावेळी त्याने टाळाटाळ सुरू केली. ‘माझे कुटुंबीय माझ्याशी स्थळ पाहत आहेत. तू खालच्या जातीची आहे. आपला विवाह कुटुंबीय मान्य करणार नाही. माझा विचार सोडून दे’, असे त्याने तिला सांगितले. त्याने तरुणीला भेटण्यास टाळाटाळ सुरू केली. त्याचे वडील गजानन आणि भाऊ कुणाल यांनी देखील यासाठी त्याला साथ दिली. मला वडिलांच्या जागेवर चंद्रपूर येथे नोकरी मिळणार होती. विराजच्या सल्ल्यामुळे मी नोकरी नाकारली. आज मला नोकरीही नाही, तसेच विराजने माझी फसवणूक केली. मला धमकावून गर्भपात केला, असे पीडित तरुणीने तक्रारीत सांगितले आहे.

पुण्यात मास्टर्स कप 2025 क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रातील माजी क्रिकेटपटूंचा सहभाग

पुणे-द पिनॅकल ग्रुप व द नेचर मुकाईवाडी पुरस्कृत मास्टर्स कप 2025क्रिकेट स्पर्धेत 56 माजी अव्वल महाराष्ट्रातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर 3 व 4 मे 2025रोजी रंगणार आहे.

स्पर्धेत संजय कोंढाळकर इलेव्हन, रियाज बागवान इलेव्हन, श्रीकांत जाधव इलेव्हन, श्रीकांत कल्याणी इलेव्हन, शंतनू सुगवेकर इलेव्हन आणि विनायक द्रविड इलेव्हन हे सहा संघ आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

स्पर्धेतील सहभागी संघामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंमध्ये शंतनू सुगवेकर, प्रसाद प्रधान, श्रीकांत कल्याणी, संजय कोंढाळकर, नितीन फडतरे, रणजित खिरीड, कौस्तुभ कदम, मृगांक राठी, करण थापा, सत्येन लांडे, रियाज बागवान, इंद्रजीत कामतेकर, अजय चव्हाण, संजय झरेकर, सुधीर देवदास, जयदीप नरसे, चंदन गंगावणे, विजय संगम, श्रीकांत जाधव, प्रसाद कानडे, कौशिक आफळे, सुनंदन लेले, शाम ओक, अनिल वाल्हेकर, रूपक मुळ्ये, प्रभाकर मोरे, राहुल कानडे, अमेय श्रीखंडे, हेमंत आठले, गिरीश कुलकर्णी, अजय नलावडे, नितीन सामल, नितीन हार्डीकर, रोहित खडकीकर, मंगेश वैद्य, विशाल मेहता, पराग चितळे, सुभाष रांजणे, आनंद दळवी, विनायक द्रविड, निरंजन गोडबोले, प्रशांत खराडे, पराग शहाणे, अपूर्व साने, मंदार दळवी, गजानन राडकर, राजेंद्र मनोहर यांचा समावेश आहे.

स्पर्धेचे सामने साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील सामने प्रत्येकी 10 षटकाचे असणार असून सामन्यात विकेट पडल्यास संघाच्या धावसंख्येतून प्रत्येक विकेट मागे 5धावा वजा करण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 50 हजार रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक व 35 हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टिरक्षक, क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी 10 हजार रुपये व करंडक आणि मालिकावीर खेळाडूला करंडक व 15 हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. सामनावीर खेळाडूला करंडक व 5 हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये मनीष साबडे, आशुतोष सोमण, विनायक द्रविड व इंद्रजीत कामतेकर यांचा समावेश आहे.