Home Blog Page 555

कबुतरांचा उच्छाद थांबवा

दशक्रिया विधी च्या “काक स्पर्शात” ही “कबुतरांचे” अतिक्रमण…
वनविभाग व पक्षी तज्ञाशी बोलून कबुतरांच्या “कलिंग” बाबत निर्णय घ्यावा

पुणे-महापालिकेने पुढाकार घेऊन कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई चे आदेश दिलेत पण पुण्यात वाढलेला कबुतरांचा उच्छाद मात्र थांबविण्यासाठी नजीकच्या काळात गांभीर्याने विचार करावा असे भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी म्हटले आहे

खर्डेकर म्हणाले कि,’वैकुंठ स्मशानभूमीत परिचितांच्या दशक्रिया विधी साठी गेलो असता एक अत्यंत अस्वस्थ करणारे दृश्य बघावयास मिळाले.
दहाव्या च्या वेळी मयत व्यक्ती चे नातेवाईक विधी केल्यानंतर पिंडदान करतात व त्या व्यक्तीस प्रिय असे खाद्य पदार्थ तेथे ठेवले जातात. येथे पिंडीला काकस्पर्श झाल्यास मयत व्यक्ती ने अथवा पितृपक्षात पूर्वजांनी अन्नाचे ग्रहण केले असे मानले जाते.कावळा हा पूर्वजांचे प्रतीक मानला जातो.
मात्र मानवी जीवनात सर्वत्र अतिक्रमण केलेल्या कबुतरांच्या झुंडी या ठिकाणी दिसून आल्या व ज्याप्रमाणे विविध सोसायटीत किंवा सार्वजनिक ठिकाणी कबुतरांनी उच्छाद मांडलाय व त्यांनी चिमणी सारखे पक्षी हुसकावून लावलेत त्याचप्रमाणे येथे ही त्यांनी झुंडीने आक्रमण केले असून कावळ्याच्या हक्कावर अतिक्रमण केल्याचे दिसून येते.येथे कावळ्यांना हुसकावून कबुतर पिंडासह खाद्य पदार्थावर ताव मारताना दिसून आले.
ज्याप्रमाणे पुणे मनपाने पुढाकार घेऊन कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई चे आदेश दिलेत त्याच धर्तीवर आता वनविभाग व पक्षी तज्ञ यांच्याशी चर्चा करून कबुतरांच्या कलिंग बाबत निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी करत आहे.
“कलिंग” म्हणजे जनावरांच्या एखाद्या कळपातील तो कळप फार मोठा होऊ नये म्हणून काही जनावरे मारणे.कबुतर हा संरक्षित पक्षी / प्राणी नसल्याने याबाबत गांभीर्याने विचार करावा अन्यथा नजिकच्या काळात सर्वत्र कबुतरांचा उच्छाद दिसून येईल.

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रारंभ कोथरूड विधानसभेतून…

पुणे-‘खासदार जनसंपर्क सेवा अभियाना’च्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ आज कोथरूड विधानसभा मतदारसंघातून करण्यात आला. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या या अभियानाच्या प्रारंभी पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. एरंडवणे येथील पंडित दीनदयाल उपाध्याय विद्या मंदिर येथे झालेल्या या अभियानाला कोथरूडकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या उपक्रमात पूर्णवेळ उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवला.

वैयक्तिक प्रश्न, नागरी समस्या, सोसायट्यांचे विषय, अपेक्षित विकासकामे आणि विविध प्रलंबित विषय या संदर्भात नागरिकांनी भेटी घेतल्या. नागरिकांकडून आलेले प्रश्न सोडवण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित करत तातडीने कामे मार्गी लावण्याच्या निर्देशही दिले.

‘आपले काम होईल’, या भावनेने येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने निश्चितच या उपक्रमाचे समाधानही मोठे आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून थेट सामान्य नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न मार्गी लावल्यानंतर नागरिकांचा येणारा प्रतिसादही निश्चितच तितकाच आनंद देतो असे मत केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकार आपल्या समस्यांचे नक्की निराकरण करेल या विश्वासातूनच मोठ्या प्रमाणावर नागरिक अशा अभियानात सहभागी होत आहेत आणि त्यांच्या अडचणींचे निराकरण करून घेत आहेत असे मत उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त के

यावेळी विविध शासकीय योजनांचे तसेच कागदपत्रे-दाखल्यांसंदर्भातील स्टॉलची उभारण्यात आले होते. महसूल, पोलीस प्रशासन, महापालिका, महावितरण यांसह शासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यात सहभागी झाले होते.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्यासह शहर पदाधिकारी, कोथरुड विधानसभा मतदारसंघातील तिन्ही मंडलांचे पदाधिकारी, माजीनगरसेवक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांच्या छोट्या छोट्या समस्या असतात परंतु त्या सोडवायच्या कशा हा त्यांच्यासमोर प्रश्न असतो.
या वेळी कोथरूड भागातील १५०० नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. सदर समस्यांचे निराकरण त्वरित करण्यात येणार असून त्यासाठी सर्व प्रकारच्या सरकारी यंत्रणांचे सहकार्य घेण्यात आले.जे प्रश्न तातडीने सोडवणे शक्य होते ते या अभियानात लगेच सोडवले जाऊन तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या.इतर प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करून लवकरात लवकर त्यांचे निराकरण करावे यासाठी देखील संबंधित सर्व विभागांना व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या

पुणे रेल्वे स्टेशन आणि खडकी परिसरातून 64 किलो गांजा जप्त; पाच जणांना अटक

पुणे-गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विराेधी पथकाचे पाेलिस निरीक्षक सुर्दशन गायकवाड, सहाय्यक पाेलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक व पथक हे शहरात गस्त घालत असताना, पुणे रेल्वे स्टेशन गेटसमाेर त्यांना दाेन संशयित व्यक्ती मिळून आल्या. त्यांना ताब्यात घेऊन सखाेल चाैकशी करत त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ सहा लाख २४ हजार रुपये किंमतीचा ३० किलाे गांजा हा अंमली पदार्थ मिळून अाला अाहे.

याप्रकरणी पप्पु चक्रधर देवरी (वय- ३२,रा. कलंड, ता.रसलपुर, जि.जसपुर, अाेरिसा) व चंदन सुभाष कुंवर (१९,रा. जगतपुर, जि.कटक, अाेरिसा) यांना अटक करण्यात अाली अाहे. त्यांच्या विराेधात बंडगार्डन पालीस ठाण्यात एनडीपीसी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. चाैकशीत त्यांचा तिसरा साथीदाराचे नाव निष्पन्न झाल्याने दिपक बहिरा ऊर्फ बलिया (रा. भुवनेश्वर, अाेडिसा) याचे विराेधात देखील गुन्हा दाखल करण्यात अाला असून त्याच्याकडून अाराेपींनी गांजा विक्रीस अाणला अाहे. ते नेमके पुण्यात काेणास अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी अाले हाेते. त्यांचे अन्य साथीदार काेण अाहे याबाबत पाेलीस पुढील चाैकशी करत अाहे.

दुसऱ्या घटनेत अंमली पदार्थ पथक दाेनचे पथक खडकी पाेलीस स्टेशनचे हद्दीत पेट्राेलिंग करत असताना, त्यांना नॅशनल टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स वाकडवेडी , एसटी स्टॅण्ड जवळ खडकी याठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर एक संशयित व्यक्ती अल्पवयीन मुलासाेबत मिळून अाला. त्याच्या जवळील सामानाची चाैकशी करुन तपासणी केली ैसता त्यात सात लाख चार हजार रुपये किंमतीचे ३४ किलाे गांजा मिळून अाला अाहे. याप्रकरणी राकेश रुपसिंग पावरा (वय- २५,रा. शिरपुर, दापचेपाडा, धुळे ) याला अटक करण्यात अाली असून त्याच्या साेबतचा १७ वर्षीय धुळे येथील विधीसंघर्षिीत मुलास ताब्यात घेण्यात अाले. त्यांच्या विराेधात खडकी पाेलीस ठाण्यात अंमली पदार्थ विराेधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

वाकड परिसरातील कावेरीनगर भाजी मंडई जवळ वाकड पाेलीसांनी एक संशयित तरुणाला ताब्यात घेतले अाहे. त्याच्या ताब्यातून एक लाख ५५ हजार रुपये किंमतीचा ११०० ग्रॅम गांंजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात अाला अाहे. सदर अंमली पदार्थ हा अनाधिकाराने, बेकायदेशीररित्या विक्री करिता कब्जात बाळगल्याने अाराेपी अभिषेक सिध्दराम माैसलगी (वय- २१,रा. लक्ष्मणनगर, थेरगाव,पुणे, मु.रा. तिरुमालनिवास, गुलबर्गा, कर्नाटक) याला अटक करण्यात अाली अाहे. त्याच्या विराेधात पाेलीस शिपाई समाधान तुकाराम कांबळे (वय- २९) यांनी वाकड पाेलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला अाहे.

गाव, शेत पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र शासन कटिबद्ध – केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील

0

गावातील पाणी गावातच आडवा

शिर्डी, दि.२ :- पुढील चार वर्षांत देशातील कोणतेही गाव, शेत पाण्यापासून वंचित राहू नये व देश दुष्काळमुक्त व्हावा, असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून यासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी केले. शासन तर आपले काम करणारच आहे, मात्र एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे, गावातील पाणी गावातच अडवून साठवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राहाता तालुक्यातील अस्तगाव येथे महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम टप्पा १ अंतर्गत गोदावरी उजवा तट कालव्यावरील मातीकाम, बांधकाम व अस्तरीकरण कामाचे भूमिपूजन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक, आमदार आशुतोष काळे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दिपक कपूर, माजी मंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आदी उपस्थित होते.

केंद्रीय जलशक्ती मंत्री पाटील म्हणाले की, संपूर्ण जगाच्या १८ टक्के लोकसंख्या आणि १८ टक्के पशुधन भारतात आहे. मात्र संपूर्ण जगाच्या केवळ चार टक्के पाणी भारतात आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करण्याची नितांत गरज आहे.
देशात दरवर्षी सुमारे ४ हजार बीसीएम पावसाचे पाणी मिळते, मात्र आपल्याला त्यापैकी केवळ १ हजार १२० बीसीएम पाण्याची गरज असते. आपण ७५० बीसीएम जलसंचय करतो आणि धरणांमध्ये २५० बीसीएम पाणी साठवतो. तरीही पाण्याची कमतरता आहे. एक धरण उभारण्यासाठी २५ वर्षे लागतात. मात्र तेवढा वेळ आपल्या हातात नाही, म्हणून पाण्याच्या बचतीची अत्यंत गरज आहे.

यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या गावात व शेतात चार बाय चारचा सहा फूट खोल खड्डा खोदून त्यात दगड-धोंडे टाकून नैसर्गिकरित्या जलसंचय करण्याची गरज आहे. अशा एका शोषखड्ड्याच्या माध्यमातून सुमारे पाच लाख लिटर पाणी जमिनीत मुरवता येते.

देशात तेरा लाख स्ट्रक्चर खड्यांच्या माध्यमातून पाणी संचय करण्याची चळवळ राबविण्यात आली. यातून लाखो लीटर पाण्याची बचत झाली, असेही त्यांनी सांगितले.

तुमच्या भागात जर एक हजार शेतकरी तयार झाल्यास केंद्राच्या एजन्सीमार्फत याभागात पाणी संचय करणारे शोषखड्डे खोदून देण्यात येतील. या शोषखड्ड्यांद्वारे पाणी संचय झाल्यास पुढील वर्षी शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही चळवळ राबवावी, अशी अपेक्षा श्री. पाटील यांनी व्यक्त केली.

नदी-नाल्यांतील पुराच्या पाण्यापासून कॅनमध्ये पाणी आणण्याची वेळ येऊ नये, यासाठी आजच आपण पाणी बचतीची चळवळ गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना असलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण देश दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आहे. उपलब्ध पाण्यात शेतीला सिंचन झाले पाहिजे यासाठी जलसंपदा विभागाचा प्रयत्न आहे. नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्याचे स्वप्न पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांचे होते, ते स्वप्न माझ्या हातून होत आहे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. गोदावरी उजवा व डावा अशा दोन्ही कालव्यांचे काम पूर्ण करण्यात येईल. आज भूमिपूजन करण्यात आलेल्या कालव्याचे डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्यात येईल.

राज्यशासन सुमारे एक लाख कोटींच्या खर्चातून चार नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात ८३ टीएमसी पाणी आणणार असून यातून गोदावरी खोरे कायमचे दुष्काळमुक्त होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

आमदार आशुतोष काळे, आण्णासाहेब म्हस्के पाटील यांचेही भाषण झाले.

शासनाने मागील काही वर्षांत राज्यातील १८२ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून यातून २५ लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले, असे प्रास्ताविकात दिपक कपूर यांनी सांगितले.

आताचा काळ द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांसाठी परवडणारे चित्रपट तयार करण्याचा : शाहरुख खान

0

मुंबई, 1 मे 2025

वेव्हज या शिखर परिषदेची संकल्पना मांडल्याबद्दल आणि ती प्रत्यक्षात आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे  अभिनेता आणि चित्रपट निर्माते शाहरुख खान यांनी चित्रपट उद्योगाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली आहे.  या परिषदेमध्ये मनोरंजन उद्योगाला अधिक मजबूत करण्याची क्षमता आहे, असे त्यांनी सांगितले. हे व्यासपीठ उद्योगासाठी किती समर्पक आहे आणि ते विविध आघाड्यांवर सरकारकडून अत्यंत आवश्यक समन्वय आणि पाठबळ उपलब्ध करून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी भारत हे एक  अमर्याद  शक्यता असलेले स्थान असल्याचे सांगून,  शाहरुख खान यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांसाठी भारत ‘शूट इन इंडिया’  कसे बनू शकते,  याकडे लक्ष वेधले. याशिवाय, आंतरराष्ट्रीय चित्रपट संस्था आणि उद्योगांशी विविध प्रकारचे करार भारताच्या मनोरंजन उद्योगाला आकार देण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी किती महत्त्वाचे ठरू शकतात यावर त्यांनी भर दिला.

शाहरूख खान यांनी द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांतील प्रेक्षकांसाठी भारतीय सिनेमा अधिक परवडणारा बनवण्यावरही भर दिला. या शहरांमध्ये एकल पडदा असलेल्या  चित्रपटगृहांमध्‍ये  सिनेमा पाहण्‍याचा  अनुभव निर्माण करण्याची संकल्पना त्यांनी मांडली, ज्यामुळे चित्रपट मोठ्या संख्येने प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनीही वेव्हजचे महत्त्व आपल्या शब्दात मांडले. माध्‍यम आणि मनोरंजन उद्योगातील विविध माध्यमांना एकत्र आणण्याची ही अचूक वेळ असल्याचे त्या म्हणाल्या. दीपिका पदुकोण यांनी सांगितले, की या क्षेत्रातील विविध विभागांमध्ये आतापर्यंत माहितीचे आदान- प्रदान किंवा सहकार्य मर्यादित स्वरूपात केले जात होते, पण वेव्हजचे स्वरूप व्यापक आहे आणि त्यात चित्रपट, ओटीटी, ॲनिमेशन, कृत्रिम प्रज्ञा आणि इतर भासमान तंत्रज्ञाने एकत्र आणण्याची क्षमता आहे.

वेव्हज शिखर परिषदेच्या पहिल्या दिवसानिमित्त आयोजित ‘द जर्नी: फ्रॉम आउटसाइडर टू रुलर’ या सत्रात अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी चित्रपट निर्माते करण जोहर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांनी चित्रपट उद्योगातील त्यांच्या प्रवासावर आणि स्वतःचे वेगळे स्थान कसे निर्माण केले यावर चर्चा केली. शाहरुख खान यांनी ‘आउटसाइडर-इनसाइडर’ टॅग्जबद्दल आपले विचार मांडले आणि तरुणांनी इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच चित्रपट उद्योगाकडे पाहण्याचे आवाहन केले. इथेही कठोर परिश्रम आणि चिकाटीला पर्याय नाही असे त्यांनी सांगितले.

समाज माध्‍यमे  आणि प्रतिमा व्यवस्थापनाच्या आजच्या काळात मनोरंजन उद्योगाच्या बदलत्या परिमाणांबद्दल बोलताना, खान यांनी नवीन कलाकारांना केवळ त्यांच्या विशिष्‍ट प्रतिमा निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्यातील  कौशल्यांकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला. त्यांनी त्यांच्यातील अद्वितीय गूण आणि क्षमतांद्वारे स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे,  असे दीपिका पदुकोण यांनी पुढे नमूद केले.

आपल्या समारोपाच्या भाषणात, चित्रपट निर्माते करण जोहर यांनी भारताला ‘सॉफ्ट पॉवर’ असे संबोधित केले. आपला देश येत्या काळात ‘वेव्हज’सह उत्तुंग झेप घेण्यास सर्व सामर्थ्‍यानिशी सज्ज आहे असे जोहर यांनी अभिमानाने सांगितले.

“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्यावतीने १ मे महाराष्ट्र क्रांती दिनानिमित्त पक्ष कार्यालयात ध्वजारोहण संपन्न”

पुणे- १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्यावतीने पक्ष कार्यालय, गुप्ते मंगल कार्यालय येथे माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर हे अध्यक्षस्थानी होते.

याप्रसंगी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी विचार मांडताना म्हणाले, आज गौरवशाली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला ६५ परंपरेला वर्षे पूर्ण झाली. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र निर्माण झालेला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला मंगल कलश रथयात्रेद्वारे एक वेगळे स्थान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या रथयात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील महापुरुषांच्या वास्तव्याने समृद्ध झालेल्या, त्यांच्या महान कार्यांनी प्रेरित अशा भागांतील पवित्र माती, विशेष नद्या आणि संगमस्थळांहून आणलेले तीर्थ या मंगल कलशांमध्ये आणलेले आहे. ही माती म्हणजे रक्तरंजित क्रांती असलेली माती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या जीवनक्रमात स्वराज्याची निर्मितीसाठी लाखो मावळ्यांनी दिलेल्या बलिदानाची ही माती आहे. यालाच उजाळा देण्याचे कार्य राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी केलेलं आहे.

या वेळी शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, दत्ता सागरे, सेवादल अध्यक्ष शशिकला कुंभार, युवती अध्यक्ष पूजा झोळे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे, सोशल मिडिया अध्यक्ष शितल मेदने, आयटी सेल अध्यक्ष मोहन मोरे, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष श्री. चंद्रहास शेट्टी, योगेश वराडे, विधानसभा अध्यक्ष कसबा अजय दराडे, पुणे कॅन्टोन्मेंट अध्यक्ष नरेश जाधव, पुणे कॅन्टोन्मेंट महिला अध्यक्ष नीता गायकवाड, शहर सरचिटणीस धनंजय पायगुडे, राम पालखे, शितल जौंजाळ, शहर महिला कार्याध्यक्ष गौरी जाधव, उपाध्यक्ष मिलिंद वालवडकर, डिंपल इंगळे, मुश्ताक पटेल, अरुण गवळे , प्रशांत निम्हण, विशाल गद्रे, चिटणीस शाम शेळके, संघटक सचिव ओंकार निम्हण, भारत पंजाबी, महिला विधानसभा कार्याध्यक्ष राहुल पायगुडे, रामदास गाडे, बाळासाहेब आहेर, संजय पाटील, राहुल गुंड, महिला उपाध्यक्ष मनिषा किराड, उषा नेटके, पद्मिनी ओसवाल, रोशन कुरेशी, संघटक सचिव प्रीती डोंगरे, चिटणीस सुनिता बडेकर, युवक कार्याध्यक्ष सत्यम पासलकर, उपाध्यक्ष गिरीश मानकर, युवती कार्याध्यक्ष लावण्या शिंदे, शिवानी पोतदार, सांस्कृतिक कार्याध्यक्ष अशोक जाधव, सेवादल कार्याध्यक्ष विजय जाधव,युवक अध्यक्ष कसबा गजानन लोंढे, नवनाथ खिलारे, श्रद्धा गायकवाड,प्रतिक नलावडे, सुमित्रा बहादूर, राहुल गुंड, विजय चव्हाण, दिनकर रोडे,आशा दीक्षित, विजय चव्हाण, उमेश वेदपाठक, रोहिदास सायकर, विवेक मुळे, संजय पवार, समीर करपे, संतोष गायकवाड, भास्कर नेटके, विधानसभा उपाध्यक्ष संतोष हत्ते यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेची निश्चित कालमर्यादा जाहीर करावी – नसीम खान

प्रदेश काँग्रेस मुख्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा.

मुंबई, दि. १ मे २०२५
केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला त्याचे काँग्रेस पक्ष स्वागत करतो. काँग्रेस पक्ष व लोकसभेतील विरोध पक्षनेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना करावी ही मागणी सातत्याने लावून धरली होती. काँग्रेसशासित राज्यात जातनिहाय जनगणना करण्यात आली आहे पण भाजपाला याला विरोध होता. आता केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे पण जातनिहाय जनगणनेची निश्चित कालमर्यादा जाहीर करावी तसेच आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व CWC सदस्य नसीम खान यांनी केली आहे.

काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, कोषाध्यक्ष डॉ. अमरजितसिंह मनहास, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, मुनाफ हकीम, राजेश शर्मा, रमेश शेट्टी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व सेवादलाचे पथक उपस्थित होते.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान म्हणाले की, काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काम केले व स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाने विकासाची पायाभरणी करून देशाला जगात एक मजबूत राष्ट्र म्हणून उभे केले तसेच महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व काँग्रेस सरकार यांनी महाराष्ट्राला एक नंबरचे राज्य करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे असे नसीम खान म्हणाले.

काँग्रेसनेते केशवराव जेधे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते..!फुलेंच्या संस्कारांचा वारसा पुढे नेणारे..!सरदार कान्होजींच्या स्वराज्याचा वारसा चालवणारे वंशज…!

  • काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांचे उदगार
    पुणे दि १ मे –
    ‘महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या’ औचित्याने अखिल भारतीय मराठा महासंघ, पुणे’ च्या वतीने देशभक्त केशवराव जेधे यांचे प्रतिमेस – पुतळ्यास काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचे हस्ते पुष्पहार व अभिवादन करण्यात आले.
    या प्रसंगी बोलताना गोपाळदादा तिवारी म्हणाले की,
    १८ पगड जातींना सोबत घेऊन, रयतेच्या राज्याची स्थापना शिव छत्रपतींनी केली. त्यात ज्या सरदार कान्हाोजी जेधेंचे योगदान लाभले, त्यांचेच वंशज केशवरावजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे संस्थापक अध्यक्ष झाले. स्वातंत्र्यसेनानी, देशभक्त व तत्कालीन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष केशवरावजी जेधे यांनी समाजात स्त्री शिक्षणा बाबत देखील महात्मा फुलेंच्या संस्कारांचा वारसा देखील पुढे नेला.
    लोकमान्य टिळकांचे नंतर पुणे शहरातील काँग्रेसचे नेतृत्व त्यांनीच केले. मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या तोंडावर ते अनंतात विलीन झाल्याची खंत व उणीव स्व. यशवंतरावजीं सह राज्यातील समस्त काँग्रेस जनांना वाटली.
    ‘रयतेच्या राज्याची संकल्पनाच् ‘भारतीय संविधानात’ दडलेली असून त्याची पुरेपूर अंमलबजावणी हीच खरे देशभक्त केशवराव जेधें सह संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या हुतात्म्यांना आदरांजली ठरेल असे उद्गार ही या प्रसंगी गोपाळदादा तिवारी यांनी काढले.
    स्वागत प्रास्ताविक अ भा मराठा महासंघ, पुणे शहराचे अध्यक्ष श्री युवराज दिसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन तानाजी शिरोळे यांनी केले.. या प्रसंगी सचिन वडघुले, राकेश गायकवाड, गणेश मापारी, अनिकेत भगत, अतिश शेडगे, ज्ञानेश्वर कापसे, सुभाष जेधे,संजय अभंग, गणेश शिंदे, गणेश मोरे .. इ पदाधिकारी व कार्यकर्ते ऊपस्थित होते..।

2018 ते 2022 कालावधीत उन्हाळा आणि उष्माघातामुळे 3,798 मृत्यू

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी केलेल्या उपायांचा अहवाल सादर करण्याची सूचना

नवी दिल्‍ली, 1 मे 2025

उन्हाळ्यात, विशेषत: देशाच्या उत्तर, मध्य आणि पश्चिम भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेता, निवाऱ्याच्या अपुऱ्या सुविधा, संसाधनांच्या कमतरतेमुळे ज्या लोकांना त्याचा अधिक धोका आहे अशा विशेषत: आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील, घराबाहेर काम करणारे कामगार, वृद्ध, लहान मुले आणि बेघर लोकांच्या संरक्षणासाठी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) 11 राज्यांना दिले आहेत. 2018 ते 2022 या कालावधीत कडक ऊन आणि उष्माघातामुळे 3,798 लोकांच्या मृत्यू झाल्याचे NCRB च्या डेटातून आढळल्याचे अधोरेखित करत आयोगाने त्यावर तातडीच्या एकात्मिक आणि सर्वसमावेशक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.

आयोगाने यासंदर्भात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि राजस्थानच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून निवारा, मदत साहित्याचा पुरवठा, कामाच्या वेळांमध्ये बदल आणि उष्म्यामुळे होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे.

राज्यांना पाठवलेल्या पत्रात आयोगाने उष्णतेच्या लाटेमुळे होणारा परिणाम कमी करण्यासाठी NDMA मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जावे, याचा पुनरुच्चार केला आहे, त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • उष्म्याशी-संबंधित आजारावर उपचारांसाठी मानक प्रक्रियांची आखणी आणि अंमलबजावणी करावी;
  • शाळा, अंगणवाडी केंद्र आणि कम्युनिटी हॉल अशांसारख्या सार्वजनिक जागी हवा खेळती राहण्याच्या, पंखे, पिण्याचे पाणी आणि मूलभूत वैद्यकीय पुरवठा अशा सोयींची तरतूद करावी
  • अनौपचारिक वसाहती आणि कामगार वसाहतींमधील कुटुंबांना पंखे, छत थंड राहील असे साहित्य आणि ORS चे पाकीटे उपलब्ध करून द्याव्यात; आणि
  • कामांच्या वेळांमध्ये बदल, सावलीत विश्रांती घेण्याजोगी जागा, पिण्याच्या पाण्यची सोय करावी तसेच उन्हापासून संरक्षण होईल, असे कपडे वापरण्यास प्रोत्साहन द्यावे.

विद्यमान मानक कार्यप्रणाली (SOPs) किंवा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) उष्णतेच्या लाटांचा प्रभाव कमी करण्यासाठी राज्यांना जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उष्णतेच्या लाटेचा धोका असलेल्या लोकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली 

सामाजिक न्याय क्रांतीचे नवे जननायक राहुल गांधी यांनाच जातीनिहाय जनगणनेचे श्रेय-माजी आमदार मोहन जोशी

राहुलजींच्या मागणीचा विजय
पेढे वाटून जल्लोषात साजरा

पुणे – जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्राने घेतला असला तरी त्याचे श्रेय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनाच आहे, असे प्रतिपादन माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज (गुरुवारी) केले.

जातीनिहाय जनगणनेचा निर्णय हा आदरणीय राहुलजींचा विजय आहे. महात्मा फुले वाडा येथे मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी तो विजय जल्लोषात साजरा केला. पेढे वाटण्यात आले, महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. ‘झुकता है मोदी, झुकानेवाला राहुल गांधी चाहिये’, ‘सामाजिक न्यायक्रांतीचे नवे जननायक राहुल गांधी’ अशा घोषणांचे फलक हाती घेऊन ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी या घोषणा दिल्या.

जातीनिहाय जनगणना व्हावी, याकरिता गेली १० वर्षे राहुल संसदेत तसेच वेगवेगळ्या व्यासपीठांवर मागणी करत होते. भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी या मागणीची अवहेलना केली. खालच्या पातळीवर जाऊन राहुल यांच्यावर टीका केली. पण, अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला राहुल गांधी यांच्यापुढे झुकावे लागले. सर्वसामान्य जनतेची बाजू राहुल यांनी नेहमीच घेतली आहे आणि ते पुढेही घेतील, असे मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या वेळी अविनाश बागवे, सुनिल मलके, ॲड.शाबीर खान, चेतन आगरवाल, रामदास मारणे, सुरेश कांबळे, प्रथमेश आबनावे,प्रशांत सुरसे, आयुब पठाण, स्वाती शिंदे, अनिता मकवाना, भावना बोराटे, पल्लवी सुरसे, हसीना आपा सय्यद, सादिक लुकडे, रवी पाटोळे, चंद्रकांत चव्हाण, प्रशांत वेलणकर, बाळासाहेब तथा नानासाहेब मारणे,अनिल आहिर,ओंकार मोरे, ॲड.विजय तिकोणे, विनायक तामकर, रफीक आलमेल, अक्षय नवगिरे, साहिल राऊत, प्रसन्न मोरे, राजेश पवार,गणेश साळुंखे,विजय साबळे, संदीप कुदळे, बाळासाहेब बहुले, अशपाक शेख,शकील ताजमत, सोनू शेख, हुसेन शेख, सुभाष जाधव, विकास माने,राजेश पवार,योगेश मंगळेकर,अभिजीत लडकत आदी सहभागी झाले होते.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सावध राहावे:अजगर कधी गिळणार हे त्यांना कळणारही नाही- प्रकाश आंबेडकर

मुंबई -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महायुती सरकारचे प्रगती पुस्तक सर्वांसमोर मांडले. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यकलीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देत टीका केली आहे. तसेच यावेळी पत्रकारांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या युतीच्या चर्चेवरही प्रतिक्रिया दिली आहे.

पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, कोणाचा परफॉर्मन्स चांगला झालाय हे मुख्यमंत्री यांनी सांगावे, काय नेमके बदल केले आहेत याच्या पलीकडे काय आहे, नवीन बदल काय आणि त्याने काय बदल घडवले आहेत? महिला बालविकासचे जर काही क्रेडिट असेल तर ते एकनाथ शिंदे यांना जाईल. कारण त्यांनी 1500 दिले त्यामुळे कंज्यूम पॉवर वाढली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सावध राहावे, नाहीतर अजगर कधी गिळणार हे त्यांना कळणार नाही, असे म्हणत फडणवीसांवर टीका केली आहे.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, कामगारांच्या अधिकारांबाबत त्यांनी जागृत राहिले पाहिजे, हे अधिकार कमी होणार नाहीत याबाबत खबरदारी घेतली पाहिजे. कामगारांना योग्य मोबदला मिळणे गरजेचे आहे. अलीकडे कामगार चळवळी लुप्त झाल्या आहेत. आता कामगार चळवळ नव्याने उभी राहील, किंवा स्वतः कोणीतरी उभे राहील असे वाटत नाही.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती होणार, अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील असे मला वाटते. ही अस्तित्वाची लाढई आहे. तसेच पवार कुटुंब देखील एकत्र येणार असे बोलले जात आहे. यावर आंबेडकर म्हणाले, दोन्ही पवार वेगळे नव्हते तेव्हाच सांगितले होते.

भारत चित्रपट निर्मिती, डिजिटल सामग्री, गेमिंग, फॅशन, संगीत आणि लाइव्ह कॉन्सर्टसाठी जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे: पंतप्रधान

भारतीय तरुणांनो, तुमच्या अब्जावधी अनभिज्ञ कहाण्या जगासमोर आणा : पंतप्रधान

मुंबई-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे भारतातील पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी आज साजरा होत असलेल्या महाराष्ट्र दिन आणि गुजरात राज्य स्थापना दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. सर्व आंतरराष्ट्रीय मान्यवर, राजदूत आणि सर्जनशील उद्योगातील अग्रणींच्या उपस्थितीचे कौतुक करत, पंतप्रधानांनी या मेळाव्याचे महत्त्व अधोरेखित केले. 100 हून अधिक देशांचे कलाकार, नवोन्मेषक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते, प्रतिभा आणि सर्जनशीलतेच्या जागतिक परिसंस्थेचा पाया रचण्यासाठी एकत्र आले आहेत यावर त्यांनी भर दिला. “वेव्हज ही केवळ एक संक्षिप्त संज्ञा नव्हे तर संस्कृती, सर्जनशीलता आणि सार्वत्रिक कनेक्टिव्हिटीचे प्रतिनिधित्व करणारी एक लाट आहे”, असे त्यांनी नमूद केले. ही शिखर परिषद चित्रपट, संगीत, गेमिंग, अॅनिमेशन आणि कथाकथनाच्या विस्तृत जगाचे प्रदर्शन करते, तसेच कलाकार आणि सर्जकांचा संवाद साधून त्यांच्या सहयोगासाठी एक जागतिक मंच प्रदान करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. पंतप्रधानांनी या ऐतिहासिक प्रसंगी सर्व सहभागींचे अभिनंदन केले आणि देश-विदेशातील मान्यवर अतिथींचे हार्दिक स्वागत केले.

वेव्हज (WAVES) या शिखर परिषदेत भारतीय चित्रपटसृष्टीचा समृद्ध इतिहास विशद करताना मोदी यांनी चित्रपट सृष्टीतील अध्वर्यू दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला ‘राजा हरिश्चंद्र’, हा पहिला भारतीय चित्रपट 3 मे 1913 रोजी प्रदर्शित झाला होता, याचा उल्लेख केला. दादासाहेब फाळके यांची जयंती आदल्याच दिवशी साजरी झाली, असल्याची त्यांनी आठवण करून दिली. भारतीय चित्रपटांनी देशाचे सांस्कृतिक मर्म यशस्वीरीत्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले असल्याचे सांगत त्यांनी गेल्या शतकभराहून अधिक काळात भारतीय चित्रपटांनी आपला प्रभाव निर्माण केला असल्याचे स्पष्ट केले. भारतीय चित्रपटनिर्माते जागतिक कथनाला कसा आकार देत आहेत, हे स्पष्ट करताना पंतप्रधानांनी राज कपूर यांची रशियातील लोकप्रियता, कान येथे सत्यजित रे यांची जागतिक स्तरावरून झालेली प्रशंसा, आणि ‘आरआरआर’ चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासह मिळालेले यश, या गोष्टी अधोरेखित केल्या. गुरुदत्त यांच्या चित्रपटांमधील काव्य, ऋत्विक घटक यांच्या चित्रपटात उमटणारे सामाजिक चित्र, ए. आर. रहमान यांची सांगितिक प्रतिभा, आणि एस. एस. राजामौली यांची कथा मांडण्याची विलक्षण धाटणी, यांचा उल्लेख करत या कलाकारांनी भारतीय संस्कृती जगभरातील लक्षावधी लोकांच्या आयुष्यात नेल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या सन्मानार्थ टपाल तिकिटे प्रकाशित करून त्याद्वारे चित्रपट उद्योगातील त्यांच्या योगदानाला मानवंदना दिली गेली असल्याचेही मोदींनी सांगितले.  

भारताच्या सर्जनशील क्षमता आणि जागतिक सहकार्याचे महत्त्वावर स्पष्ट करताना, गेल्या काही वर्षांमध्ये आपण गेमिंग, संगीत, चित्रपट निर्मिती आणि अभिनय क्षेत्रातील व्यावसायिकांशी संवाद साधून त्यांच्या क्षेत्रांशी संबंधित कल्पना आणि अंतर्दृष्टीबद्दल चर्चा केल्याने सर्जनशील उद्योगांबद्दल आणखी खोलवर माहिती झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. महात्मा गांधींच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला होता, याचा विशेष उल्लेख केला. या उपक्रमात 150 देशांमधील गायक, ‘वैष्णव जन तो’ हे नरसी मेहता यांनी जवळपास 500-600 वर्षांपूर्वी रचलेले भजन गाण्यासाठी एकत्र आले होते. जागतिक कलाकारांच्या या प्रयत्नाने लक्षणीय प्रभाव निर्माण केला आणि जगाला एकदिलाने एकत्र आणले गेले. शिखर परिषदेला उपस्थित असलेल्या अनेक व्यक्तींनी गांधींच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार करणारे छोटे व्हिडिओ संदेश तयार करून ‘गांधी वन-फिफ्टी’ उपक्रमात योगदान दिले होते, असेही त्यांनी पुढे नमूद केले. भारताच्या सर्जनशील विश्वाच्या सामूहिक शक्तीने, आंतरराष्ट्रीय सहकार्यासह, त्याची क्षमता अगोदरच दाखवून दिली असून ती दृष्टी आता वेव्हजच्या रूपात प्रत्यक्षात साकार झाली आहे, असेही ते म्हणाले.

पहिल्याच वेव्हज् शिखर परिषदेला मिळालेल्या घवघवीत यशाचे स्वागत करताना मोदी म्हणाले की, या कार्यक्रमाने पहिल्या क्षणापासूनच जगाचे लक्ष वेधून घेतले होते आणि त्याचा उद्देश गर्जत होता. सर्जनशील उद्योगक्षेत्रात WAVES ही महत्त्वाची घटना बनवण्यात वरिष्ठ सल्लागार मंडळाने बजावलेली भूमिका अधोरेखित करत त्यांनी समर्पितपणे केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. मोठ्या प्रमाणातील घेण्यात आलेली क्रिएटर्स चॅलेंज स्पर्धा तसेच क्रिएटोस्फीअर उपक्रमावर त्यांनी प्रकाश टाकला, त्यामध्ये 60 देशांमधील सुमारे 100,000 सर्जनशील व्यावसायिकांचा सहभाग होता. या स्पर्धेच्या 32 आव्हानात्मक फेऱ्यांमधून, 800 अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली हे सांगताना त्यांनी त्यांच्या प्रतिभेचे कौतुक केले तसेच त्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आता त्यांना जागतिक सर्जनशील मंचावर आपला ठसा उमटवण्याची संधी असल्याचे म्हणत अंतिम फेरीतील स्पर्धकांना त्यांनी प्रोत्साहन दिले,
  
वेव्हज शिखर परिषदेदरम्यान भारत पॅव्हीलियन येथे प्रदर्शित करण्यात आलेल्या सर्जनशील घडामोडींबाबत पंतप्रधान मोदी यांनी उत्सुकता व्यक्त केली. आता लक्षणीय प्रमाणात अभिनव संशोधन साध्य झाले असून या कलाकृती अनुभवण्याच्या बाबतीत उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. वेव्हज बाजार या  उपक्रमाला अधोरेखित करताना ते म्हणाले की  नव्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यात आणि उदयोन्मुख बाजारपेठांशी जोडून घेण्याच्या संदर्भात वेव्हज बाजारची  क्षमता अधिक असल्याचे ते म्हणाले . कला उद्योगातील खरेदीदार आणि विक्रेते यांना परस्परांशी जोडण्याच्या कल्पनेचे पंतप्रधानांनी कौतुक केले. ते म्हणाले की असे उपक्रम सर्जनशील अर्थव्यवस्थेला मजबूत करतात आणि कलाकारांना नव्या संधी उपलब्ध करून देतात.


सर्जनशीलता आणि मानवी अनुभव यांच्यातील खोलवर रुजलेल्या संबंधांबाबत विचार व्यक्त करताना, मुलाच्या जीवनप्रवासाची सुरुवात आईच्या ज्या अंगाईने होते तो ध्वनी आणि संगीताशी झालेला त्यांचा  पहिला परिचय असतो असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की ज्याप्रमाणे आई मुलांसाठी स्वप्नांचे धागे विणते तशाच पद्धतीने सर्जनशील व्यावसायिक एका नव्या युगाच्या स्वप्नांना आकार देतात. स्वतःच्या कलेच्या माध्यमातून येणाऱ्या पिढ्यांना प्रेरित आणि प्रभावित करणाऱ्या अशाचा दूरदर्शी व्यक्तींना एकत्र आणणे यातच वेव्हज कार्यक्रमाची अर्थपूर्णता आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली.   

सामुहिक प्रयत्नांवर असलेल्या विश्वासाला दुजोरा देत कलाकार, सर्जक तसेच या उद्योगातील प्रमुख नेते यांची समर्पितता येत्या काही वर्षांत वेव्हज कार्यक्रमाला नव्या उंचीवर घेऊन जाईल  असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. या शिखर परिषदेच्या पहिल्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील भागीदारांनी ज्या पातळीचा पाठींबा आणि हातभार देऊ केला तसाच ते यापुढे देखील देत राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या क्षेत्रात अशा आणखी उपक्रमांचा रोमांचक लाटा येऊ घातल्या आहेत अशी टिप्पणी करून आगामी काळात सुरु करण्यात येणारी वेव्हज पारितोषिके कला आणि सर्जनशीलतेच्या विश्वात सर्वात प्रतिष्ठीत सन्मान म्हणून स्वतःला स्थापित करतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. सर्जनशीलतेच्या माध्यमातून  संपूर्ण जगभरातील लोकांची मने जिंकणे आणि आगामी पिढ्यांना प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा उद्देश असून त्यासाठी निरंतर बांधिलकी जपण्याची गरज आहे यावर पंतप्रधान मोदी यांनी अधिक भर दिला.

भारताची वेगवान आर्थिक प्रगती अधोरेखित करून आणि आपला देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थ्यव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे असे सांगून पंतप्रधान म्हणाले की भारत सध्या जागतिक अर्थविषयक तंत्रज्ञान स्वीकाराच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश आहे आणि जगभरातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्ट अप परिसंस्था असणारा देश आहे. विकसित देश बनण्याच्या दिशेने भारताचा प्रवास नुकताच सुरु झाला असून अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. “भारत हा केवळ अब्जाहून अधिक लोकसंख्येचा देश नव्हे तर तो अब्जाहून अधिक कहाण्यांचा देखील देश आहे,”ते पुढे म्हणाले. देशाच्या समृद्ध कलात्मक इतिहासाचा संदर्भ देऊन, दोन हजार वर्षांपूर्वी भरत मुनींच्या नाट्य शास्त्रात भावना तसेच मानवी अनुभव यांच्या जडणघडणीत कलेच्या सामर्थ्यावर अधिक भर देण्यात आला आहे याची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली. कित्येक शतकांपूर्वी कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलम या कलाकृतीने अभिजात नाट्यप्रकाराला नवी दिशा दिली असे ते म्हणाले. भारताच्या प्रत्येक मार्गाशी संबंधित कहाणी आहे, प्रत्येक पर्वताचे एक गीत आहे आणि प्रत्येक नदी एक धून गुणगुणते आहे असे सांगून मोदी यांनी भारताच्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक मुळांना अधोरेखित केले.भारतातील सहा लाख गावांपैकी प्रत्येकाची स्वतःची अशी लोक परंपरा आणि अनोखी कथाकथन शैली आहे आणि येथील समुदाय लोककथांच्या माध्यमातून त्यांच्या इतिहासाची जपणूक करत आहेत असे त्यांनी सांगितले.

त्यांनी भारतीय संगीताचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले. ते भजन असो, गझल असो, शास्त्रीय रचना असो किंवा समकालीन सूर असो, प्रत्येक गीतामध्ये एक कथा असते आणि प्रत्येक लयीत एक आत्मा असतो, असे त्यांनी नमूद केले.

वेव्हज शिखर परिषदेमध्ये मोदी यांनी नाद ब्रह्म या दैवी ध्वनीची संकल्पना अधोरेखित करत भारताच्या खोलवर रुजलेल्या कलात्मक आणि आध्यात्मिक वारशावर भर दिला. त्यांनी असे सांगितले की भारतीय पौराणिक कथा नेहमीच संगीत आणि नृत्याद्वारे दैवी भाव व्यक्त करतात, भगवान शिवाचे डमरू हा पहिला वैश्विक ध्वनी, देवी सरस्वतीची वीणा ही ज्ञानाची लय, भगवान कृष्णाची बासरी ही प्रेमाचा शाश्वत संदेश तर भगवान विष्णूचा शंख हे सकारात्मक उर्जेचे आवाहन आहे. त्यांनी यावर भर दिला की शिखर परिषदेतील मंत्रमुग्ध करणारे सांस्कृतिक सादरीकरण देखील या समृद्ध वारशाचे प्रतिबिंब आहे. “ही योग्य वेळ आहे” असे घोषित करून मोदी यांनी “भारतात निर्माण करा, जगासाठी निर्माण करा” या भारताच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला आणि देशाची कथाकथनाची परंपरा हजारो वर्षांचा अमूल्य खजिना देते असे प्रतिपादन केले. त्यांनी अधोरेखित केले की भारताच्या कथा कालातीत, विचारप्रवर्तक आणि खऱ्या अर्थाने जागतिक आहेत, ज्यांच्यामध्ये केवळ सांस्कृतिक विषयच नाहीत तर विज्ञान, क्रीडा, धैर्य आणि शौर्य यांचाही समावेश आहे. त्यांनी असे नमूद केले की भारताच्या कथाकथन क्षेत्रात विज्ञान आणि काल्पनिक कथा तसेच शौर्य यांचा समावेश आहे, ज्यामुळे एक विशाल आणि वैविध्यपूर्ण सर्जनशील परिसंस्था तयार होते. त्यांनी भारताच्या असाधारण कथा जगासोबत सामायिक करण्याची, नवीन तसेच आकर्षक रूपामध्ये भविष्यातील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन वेव्हज मंचाचा केले.

जनतेचे पद्म पुरस्कार आणि वेव्हज परिषदेमागील दृष्टिकोन यांच्यातील समांतर नाते दर्शवत, दोन्ही उपक्रमांचे उद्दिष्ट भारताच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभेला ओळखणे आणि त्यांना उन्नत करणे असे असल्याचे सांगून पंतप्रधानांनी टिप्पणी केली की पद्म पुरस्कार स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी सुरू झाले, परंतु जेव्हा भारताने जनतेच्या पद्म पुरस्कारांचा स्वीकार केला, देशाची सेवा करणाऱ्या दुर्गम भागातील व्यक्तींना मान्यता दिली तेव्हा त्यांच्यात‌ खरोखरच परिवर्तन घडून आले. या बदलामुळे पुरस्कार एका समारंभातून राष्ट्रीय उत्सवात परिवर्तित झाले. त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी सांगितले की वेव्हज हे चित्रपट, संगीत, अ‍ॅनिमेशन आणि गेमिंग या क्षेत्रातील भारताच्या प्रचंड सर्जनशील प्रतिभेसाठी जागतिक व्यासपीठ म्हणून काम करेल, ज्यामुळे देशाच्या प्रत्येक भागातील कलाकारांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ओळख मिळेल.

संस्कृत वाक्यांशांचा संदर्भ देत, विविध विचार आणि संस्कृती स्वीकारण्याच्या भारताच्या परंपरेला अधोरेखित करताना मोदी यांनी यावर भर दिला की भारताच्या सभ्यतेच्या खुलेपणाने पारशी आणि ज्यू सारख्या समुदायांचे स्वागत केले आहे, जे देशात भरभराटीला आले आहेत तसेच देशाच्या सांस्कृतिक रचनेचा अविभाज्य भाग बनले आहेत. प्रत्येक राष्ट्राचे स्वतःचे यश आणि योगदान आहे, हे लक्षात घेण्याची आवश्यकता व्यक्त करत त्यांनी विविध देशांतील मंत्री आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी असे सांगितले की जागतिक कलापूर्ण कामगिरीचा आदर करणे तसेच त्यांचा उत्सव साजरा करणे, सर्जनशील सहकार्यासाठी देशाची वचनबद्धता बळकट करणे यात भारताची ताकद दिसून येते. त्यांनी यावर भर दिला की विविध संस्कृती आणि राष्ट्रांची कामगिरी प्रतिबिंबित करणारी सामग्री तयार करून, जागतिक संवाद आणि कलात्मक देवाणघेवाणीचे स्वप्न वेव्हज बळकट करू शकते.

पंतप्रधानांनी जागतिक सर्जनशील समुदायाला निमंत्रण दिले आणि त्यांना आश्वस्त केले की भारताच्या कथांशी जोडले गेल्याने त्यांना अशा कथा मिळतील ज्या त्यांच्या स्वतःच्या संस्कृतीशी खोलवर जुळतील.  भारताच्या समृद्ध कथाकथन परंपरेत अशा कल्पना आणि भावना आहेत ज्या सीमा ओलांडतात, ज्यामुळे एक नैसर्गिक आणि अर्थपूर्ण संबंध निर्माण होतो यावर त्यांनी भर दिला.  जे आंतरराष्ट्रीय कलाकार आणि निर्माते भारताच्या कथांचा शोध घेतील, त्यांना देशाच्या वारशासोबत एक नैसर्गिक बंध अनुभवता येईल, असे त्यांनी सांगितले. या सांस्कृतिक समन्वयामुळे ‘क्रिएट इन इंडिया’चा भारताचा दृष्टीकोन जगासाठी अधिक आकर्षक आणि सुलभ होईल, असे त्यांनी नमूद केले.

भारतातील केशरी अर्थव्यवस्थेची  पहाट होत आहे. आशय, सर्जनशीलता आणि संस्कृती – हे केशरी अर्थव्यवस्थेचे तीन स्तंभ आहेत”, असे  मोदी यांनी सांगितले. भारतीय चित्रपट आता 100 हून अधिक देशांतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आहेत, जागतिक प्रेक्षक केवळ वरवरचे कौतुक करण्यापेक्षा भारतीय सिनेमा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी नमूद केले.  मोदी यांनी उपशीर्षकांसह भारतीय आशय पाहणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांचा वाढता कल अधोरेखित केला, जो भारताच्या कथांशी अधिक सखोल संबंध दर्शवतो. मोदी यांनी असेही नमूद केले की भारतातील ओटीटी उद्योगात अलीकडच्या वर्षांत दहापट वाढ झाली आहे, स्क्रीनचा आकार कमी होत असला तरी, आशय सामग्रीची व्याप्ती अनंत आहे, सूक्ष्म स्क्रीनद्वारे मोठे संदेश दिले जात आहेत. भारतीय खाद्यपदार्थ जागतिक पसंतीचे होत आहेत आणि भारतीय संगीत ही लवकरच जगभरात अशीच ओळख मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या प्रचंड क्षमतेवर भर देत, येत्या काही वर्षांत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात तिचा वाटा लक्षणीयरीत्या वाढणार असल्याचे सांगून, पंतप्रधान म्हणाले, “भारत चित्रपट निर्मिती, डिजिटल आशय, गेमिंग, फॅशन आणि संगीत यासाठी एक जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे”.  त्यांनी लाईव्ह कॉन्सर्ट उद्योगातील आशादायक वाढीच्या संधी आणि जागतिक ऍनिमेशन बाजारपेठेतील प्रचंड शक्यतांचा उल्लेख केला, ज्याची उलाढाल  सध्या 430 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे आणि पुढील दशकात दुप्पट होण्याची शक्यता आहे.  भारताच्या ऍनिमेशन आणि ग्राफिक्स उद्योगासाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे, असे त्यांनी सांगितले आणि हितधारकांना अधिक आंतरराष्ट्रीय पोहोच निर्माण करण्यासाठी या विस्ताराचा लाभ घेण्याचे आवाहन केले.  

भारताच्या केशरी अर्थव्यवस्थेला  पुढे नेण्यासाठी भारतातील तरुण निर्मात्यांना आवाहन करताना, त्यांची आवड आणि कठोर परिश्रम सर्जनशीलतेची एक नवीन लाट घडवत आहेत, याची दखल पंतप्रधानांनी घेतली. गुवाहाटीतील संगीतकार असोत, कोचीमधील पॉडकास्टर असोत, बंगळूरुमधील गेम डिझायनर असोत किंवा पंजाबमधील चित्रपट निर्माते असोत, त्यांचे योगदान भारताच्या वाढत्या सर्जनशील क्षेत्राला चालना देत आहे, यावर त्यांनी भर दिला. सरकार सर्जनशील व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, स्किल इंडिया, स्टार्टअप सपोर्ट, एव्हीजीसी उद्योगासाठी धोरणे आणि वेव्हज सारख्या जागतिक व्यासपीठांसारख्या उपक्रमांद्वारे त्यांना पाठिंबा देत आहे, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांनी असे नमूद केले की असे वातावरण तयार करण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केला जात आहे जिथे नवोन्मेष आणि कल्पनाशक्तीला महत्त्व दिले जाते, नवीन स्वप्नांची जोपासना केली जाते आणि व्यक्तींना ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी सक्षम केले जाते. जिथे सर्जनशीलतेची कोडिंगसोबत  भेट होते, सॉफ्टवेअर कथाकथनात मिसळून जाते आणि कला आगउमेमेंटेड रिअॅलिटीमध्ये विलीन होते अशा प्रकारचा एक प्रमुख मंच म्हणून वेव्हज काम करेल, असे त्यांनी अधोरेखित केले.  त्यांनी तरुण निर्मात्यांना या संधीचा पुरेपूर उपयोग करण्याचे, मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि त्यांची दृष्टी साकार करण्यासाठी त्यांचे प्रयत्न समर्पित करण्याचे आवाहन केले.

भारताच्या आशय सामुग्री निर्मात्यांवर  आपला पूर्ण  विश्वास असून, त्यांची मुक्त-प्रवाही सृजनशीलता जागतिक सृजनशीलतेच्या परिप्रेक्ष्याला नवा अर्थ मिळवून देत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारतातील निर्मात्यांच्या चैतन्यमय प्रेरणेला कोणतेही अडथळे, सीमा अथवा संकोच माहीत नसल्यामुळे नवोन्मेषाला बहर येण्यासाठी मोकळे अवकाश मिळते,  यावर त्यांनी भर दिला. तरुण निर्माते, गेमर्स आणि डिजिटल कलाकारांशी वैयक्तिक संवाद साधल्यावर आपल्याला भारताच्या सृजनशील परिसंस्थेतून आकाराला येणारी ऊर्जा आणि प्रतिभा प्रत्यक्ष अनुभवता आली,       असे पंतप्रधान म्हणाले.  रिल्स, पॉडकास्ट आणि गेम्सपासून ते अॅनिमेशन, स्टँड-अप आणि  एआर-व्हीआर प्रकारापर्यंत भारताची मोठी युवा लोकसंख्या नवीन सृजनशीलतेला नवे आयाम देत असल्याचे त्यांनी नमूद केले. वेव्ह्स हे या युवा पिढीसाठी खास डिझाइन केलेले व्यासपीठ आहे, जे तरुण  मनांना त्यांची ऊर्जा आणि कार्यक्षमतेच्या मदतीने  सृजनशील क्रांतीची पुर्नकल्पना करण्यासाठी आणि त्याचा नवा अर्थ शोधण्यासाठी सक्षम करते, असे ते म्हणाले.

तंत्रज्ञानाधारित एकविसाव्या शतकामध्‍ये  जबाबदार सृजनशीलतेचे महत्त्व अधोरेखित करताना, तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर अधिकाधिक प्रभाव पडत असल्यामुळे भावनिक संवेदनशीलता आणि सांस्कृतिक समृद्धी जपण्यासाठी अतिरिक्त प्रयत्नांची गरज आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सृजनशील जगात मानवी सहवेदना जपण्याची आणि सामाजिक जाणीव प्रगल्भ करण्याची शक्ती आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. रोबो तयार करणे हे आपले उद्दिष्ट नसून, अधिक संवेदनशीलता, भावनिक खोली 

आणि बौद्धिक समृद्धी   असलेल्या मानवाचे संगोपन करणे, हे आहे, जे गुण केवळ माहितीचा भडिमार अथवा तंत्रज्ञानाच्या वेगामधून जन्माला येऊ शकत नाहीत, असे त्यांनी सांगितले.

कला, संगीत, नृत्य आणि कथाकथन, या अभिव्यक्तीच्या प्रकारांनी हजारो वर्षांपासून मानवी संवेदना जिवंत ठेवल्या आहेत, त्यामुळे त्या महत्वाच्या असल्याचे मोदी यांनी सांगितले. सृजनशील व्यक्तींनी या परंपरेला बळकटी द्यावी आणि अधिक संवेदनशील भविष्य घडवावे असे आवाहन त्यांनी केले.  सांस्कृतिक अखंडता अबाधित राखण्यासाठी आणि सकारात्मक मूल्ये  रुजवण्यासाठी वेव्ह्स एक महत्वाचे व्यासपीठ ठरेल, असे सांगून त्यांनी युवा पिढीला    विभाजनकारी 

आणि हानिकारक विचारधारेपासून दूर ठेवण्याची गरज अधोरेखित केली. ही  जबाबदारी टाळली, तर  भावी पिढ्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. सृजनशील जगावरील तंत्रज्ञानाच्या परिवर्तनकारी प्रभावावर भर देताना, पंतप्रधानांनी  पूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी जागतिक समन्वय महत्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

वेव्ह्स हा भारतीय निर्मात्यांना जागतिक कथाकारांशी आणि अॅनिमेटर्सना जागतिक दूरदर्शी व्यक्तींशी  जोडणारा सेतू ठरेल आणि गेमर्सना ग्लोबल चॅम्पियनमध्ये परिवर्तित करेल असे त्यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आणि निर्मात्यांनी भारताला आपले आशय निर्मितीचे केंद्र म्हणून स्वीकारावे आणि देशाच्या विशाल सृजनशील परिसंस्थेचा वेध घ्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

जागतिक आशयकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधानांनी त्यांना मोठी स्वप्ने बघण्याचे आणि कथा सांगण्याचे आवाहन केले. गुंतवणुकदारांनी केवळ मंच, व्यासपीठ  किंवा माध्यमांमध्ये गुंतवणूक न करता लोकांमध्ये गुंतवणूक करावी, तसेच भारतीय युवकांनी त्यांच्याकडे असलेल्या एक दशलक्ष कथा जगासमोर आणाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. वेव्हज शिखर परिषदेच्या उदघाटन समारंभात सहभागी झालेल्या सर्वांना शुभेच्छा देऊन त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव,  डॉ. एल. मुरुगन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

“कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज” या घोषवाक्यासह चार दिवस चालणारी ही शिखर परिषद,  जगभरातील निर्माते, स्टार्टअप्स, उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि धोरणकर्ते यांना एकत्र आणून भारताला माध्‍यम , मनोरंजन आणि डिजिटल नवोपक्रमाचे जागतिक केंद्र म्हणून स्थापित करण्यासाठी सज्ज आहे. 

उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचा वापर करण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनानुसार, वेव्हज मध्ये  चित्रपट,  ओटीटी,  गेमिंग,  कॉमिक्स,  डिजिटल मीडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (एव्हीजीसी) – विस्तारित वास्तव (एक्सआर), ब्रॉडकास्टिंग आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान एका मंचावर आणण्यात येणार आहे, ज्या माध्यमातून भारताच्या मीडिया आणि मनोरंजन कौशल्याचे व्यापक प्रदर्शन होऊ शकेल. वर्ष 2029 पर्यंत 50 अब्ज डॉलर्सची बाजारपेठ गाठण्याचे वेव्हजचे उद्दिष्ट आहे,  ज्यामुळे जागतिक मनोरंजन अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान वाढेल.

वेव्हज 2025 मध्ये, भारत प्रथमच ग्लोबल मीडिया डायलॉग (जीएमडी) म्हणजेच जागतिक माध्‍यम संवादाचे आयोजन करत आहे,  ज्यामध्ये 25 देशांचे मंत्री सहभागी होत असून,  हा परिसंवाद  जागतिक माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात देशाच्या सहभागात एक मैलाचा दगड ठरेल. या शिखर परिषदेत वेव्हज बाजार देखील आहे. त्यामध्‍ये 6,100 हून अधिक खरेदीदार, 5,200 विक्रेते आणि 2,100 प्रकल्प असणार आहेत. ही एक जागतिक ‘ई-मार्केट प्लेस’ आहे. याचा उद्देश स्थानिक आणि जागतिक स्तरावर खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात एक दुवा निर्माण करणे असा आहे, ज्यामुळे नेटवर्किंग आणि व्यवसायाच्या व्यापक संधी निर्माण होतील.

पंतप्रधानांनी  ‘क्रिएटोस्फीअर’ ला भेट दिली आणि जवळजवळ एक वर्षापूर्वी सुरू झालेल्या 32 ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’ मधून निवडलेल्या निर्मात्यांशी/ क्रियेटर्स बरोबर संवाद साधला. या चॅलेंजला एक लाखाहून अधिक नोंदणी प्राप्त झाली होती. पंतप्रधानांनी भारत पॅव्हेलियनला देखील भेट दिली.

वेव्हज 2025 मध्ये 90 हून अधिक देशांचे लोक सहभागी होत असून त्यात 10,000 हून अधिक प्रतिनिधी, 1,000 निर्माते, 300 पेक्षा अधिक  कंपन्या आणि 350 पेक्षा अधिक स्टार्टअप्स यांचा समावेश आहे. या शिखर परिषदेत 42 पूर्ण सत्रे,  39 ब्रेकआउट सत्रे आणि 32 मास्टर क्लासेस असतील.  यात  प्रसारण,  इन्फोटेनमेंट, AVGC-XR, चित्रपट आणि डिजिटल मीडिया यासारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

2030 पर्यंत भारत जगातील पाच अव्वल मनोरंजन ठिकाणांमध्ये स्थान मिळवण्यास सज्ज

लाइव्ह इव्हेंट्स हे भारताच्या माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेतील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक

मुंबई, 1 मे 2025

केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री एल. मुरुगन हे “भारताची लाइव्ह इव्हेंट्स अर्थव्यवस्था: एक अत्यावश्यक धोरणात्मक वाढ” यावरील श्वेतपत्रिकेचे अनावरण करतील.  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सुरू केलेली ही पहिलीच श्वेतपत्रिका आहे.

3, मे 2025 रोजी मुंबईत वेव्हज शिखर परिषद 2025 दरम्यान औपचारिकपणे श्वेतपत्रिकेचे अनावरण होईल. श्वेतपत्रिकेत भारताच्या वेगाने विस्तारणाऱ्या लाईव्ह मनोरंजन उद्योगाचे व्यापक विश्लेषण सादर केले आहे, जे उदयोन्मुख ट्रेंड, वाढीचे मार्ग आणि या क्षेत्राच्या निरंतर  उत्क्रांतीसाठी धोरणात्मक शिफारसी अधोरेखित केल्या आहेत.

भारताच्या लाइव्ह इव्हेंट्स अर्थात थेट, प्रत्यक्ष कार्यक्रम  परिसंस्थेत – एक विखंडित क्षेत्र ते देशाच्या सांस्कृतिक आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेचा रचनात्मक आणि प्रभावशाली स्तंभ असे परिवर्तन होत आहे. 2024 ते 2025 हा कालावधी एक निर्णायक वळण आहे, ज्यामध्ये ‘कोल्डप्ले’ सारखे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम अहमदाबाद आणि मुंबईत सादर होत आहेत आणि यातून जागतिक स्तरावरील कार्यक्रमांचे आयोजन करण्याची भारताची तयारी दिसून येते.

या क्षेत्रातील प्रमुख बदल म्हणजे इव्हेंट टुरिझमचा उदय , ज्यामध्ये जवळपास पाच लाख प्रेक्षक खास संगीताच्या लाइव्ह  कार्यक्रमासाठी  प्रवास करतात आणि यातून एका मजबूत संगीत-पर्यटन अर्थव्यवस्थेच्या उदयाचे संकेत मिळत आहेत.  व्हीआयपी एक्सपीरिअन्स , क्युरेटेड अॅक्सेस आणि लक्झरी हॉस्पिटॅलिटी असे प्रीमियम तिकीट विभाग आहेत ज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 100% अधिक वाढ झाली आहे जे खास अनुभव घेणाऱ्या प्रेक्षकांची संख्या सूचित करतात. विविध शहरांच्या टूर्स आणि प्रादेशिक उत्सवांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे  द्वितीय श्रेणीतील शहरांमधील सहभाग वाढला आहे .

2024 मध्ये, लाईव्ह इव्हेंट विभागाने 15% वाढ नोंदवली, ज्यामुळे अतिरिक्त 13  अब्ज रुपयांचा महसूल मिळाला. परिणामी भारतातील माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेतील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेपैकी एक बनला. सध्याच्या परिसंस्थेत भव्य कार्यक्रमांच्या आयोजनामुळे साधारणपणे प्रत्येकी 2,000 ते  5,000  तात्पुरते रोजगार निर्माण होतात, ज्यामुळे रोजगार आणि कौशल्य विकासात या क्षेत्राचे वाढते योगदान अधोरेखित होते.

केंद्रित गुंतवणूक, धोरणात्मक पाठबळ  आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणांसह, 2030 पर्यंत भारत जागतिक स्तरावरील अव्वल पाच लाईव्ह मनोरंजन स्थळांपैकी एक बनण्याच्या मार्गावर आहे, ज्यामुळे आर्थिक विकास , रोजगार निर्मिती, पर्यटन आणि वाढत्या जागतिक सांस्कृतिक अस्तित्वासाठी  नवीन संधी खुल्या होती

गहू खरेदीने ओलांडला 250 लाख मेट्रिक टनांचा टप्पा


रबी विपणन हंगाम 2025-26 मध्ये 21.03 लाख शेतकऱ्यांना एमएसपीपोटी 62155.96 कोटी रुपये प्राप्त झाले

नवी दिल्‍ली, 1 मे 2025

देशातील प्रमुख गहू खरेदी राज्यांमध्ये 2025-26 च्या आरएमएस म्हणजेच रबी विपणन हंगामातील गहू खरेदी सुरळीतपणे सुरु आहे. आरएमएस 2025-26 दरम्यान निश्चित करण्यात आलेल्या 312 लाख मेट्रिक टन (एलएमटी) गहू खरेदीचे अंदाजित उद्दिष्ट लक्षात घेतले तर केंद्रीय साठ्यात आतापर्यंत 256.31 एलएमटी गहू खरेदी करण्यात आला आहे. या वर्षी 30 एप्रिल पर्यंत पूर्ण झालेल्या गहू खरेदीने गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत  करण्यात आलेल्या 205.41 एलएमटी गहू खरेदीचा टप्पा आधीच पार केला असून गहू खरेदीत 24.78% वाढ दिसून येत आहे. पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या सर्व प्रमुख गहू खरेदीदार राज्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक गहू खरेदी केला आहे.

आरएमएस 2025-26 दरम्यान एकूण 21.03 लाख शेतकऱ्यांना एमएसपी म्हणजेच किमान आधारभूत मूल्याने खरेदी योजनेचा लाभ झाला असून त्यांना या योजनेतून 62155.96 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या पाच गहू खरेदीदार राज्यांनी अनुक्रमे 103.89 एलएमटी, 65.67 एलएमटी, 67.57 एलएमटी, 11.44 एलएमटी आणि 7.55 एलएमटी गहू खरेदी करून खरेदीत मोठे योगदान दिले आहे.

अजूनही आरएमएस 2025-26 चा गहू खरेदी कालावधी शिल्लक असतानाच, देश गेल्या वर्षीचा केंद्रीय साठ्यातील गहू खरेदीचा आकडा लक्षणीय फरकासह ओलांडण्याच्या मार्गावर आहे.

या वर्षी गहू खरेदीच्या प्रमाणाच्या बाबतीत दिसून आलेले सकारात्मक निष्कर्ष म्हणजे केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने केलेल्या एकत्रित प्रयत्नांचा परिपाक आहेत. विविध राज्यांच्या गेल्या वर्षीच्या बाबी लक्षात घेऊन त्या  आधारावर विभागाने राज्य विशिष्ट कृती योजना तयार करुन हंगामाच्या कितीतरी आधीच त्या राज्यांशी सामायिक करण्यासारखे प्रयत्न विभागातर्फे हाती घेण्यात आले. तसेच शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्मिती, शेतकऱ्यांची नोंदणी, खरेदी केंद्रांची तयारी, शेतकऱ्यांना योग्य वेळी एमएसपी चुकती होणे इत्यादींसारख्या कृतीयोग्य उपक्रमांबाबत नियमितपणे आयोजित आढावा बैठकांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला जेणेकरून खरेदीत उद्भवणाऱ्या समस्या वेळेवर सोडवता याव्या. बहुतांश बाबतीत, संबंधित शेतकऱ्यांना 24 ते 48 तासांच्या आत एमएसपीची रक्कम दिली गेली आहे.

केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने हाती घेतलेल्या अन्य उपाययोजनांमध्ये, गहू साठा पोर्टलच्या माध्यमातून साठवण मर्यादा अनिवार्य  करणे, एफएक्यूविषयक नियमांतून सूट मिळवण्यासाठी वेळेवर मंजुरी देणे, जेव्हा गरज भासेल तेव्हा वेळेवर कारवाई करणे सुलभ व्हावे म्हणून प्रत्यक्ष परिस्थितीची कल्पना येण्यासाठी विविक्षित जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांची क्षेत्रीय भेट यांचा समावेश आहे.

पहिल्या ‘वेव्हज परिषदे’चा मान महाराष्ट्राला दिल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे उपमख्यमंत्री अजित पवार यांनी मानले आभार

पुणे, दि. १: देशातील पहिली ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲन्ड एंटरटेन्मेंट समिट’ अर्थात ‘वेव्हज परिषद’ आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आभार मानले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर आपल्या मनोगतात त्यांनी ही भावना व्यक्त केली.

यावेळी आमदार बापुसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख डॉ. सुहास दिवसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुरज मांढरे, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, ‘पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, यंदाचा महाराष्ट्र दिन आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीत, देशाच्या आर्थिक राजधानीत, महानगरी मुंबई येथे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘वेव्हज परिषदे’चे उद्घाटन हस्ते होणार असून याचा समस्त महाराष्ट्रवासीयांना मनापासून आनंद आहे, असेही श्री. पवार म्हणाले.