पुणे -केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे कि,’ शहराच्या मेट्रो विस्तारीकरणासाठी सुरू असलेल्या आपल्या पाठपुराव्याला यश आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समस्त पुणेकरांच्या वतीनं मनःपूर्वक धन्यवाद !यामध्ये वनाज–चांदणी चौक (कॉरिडॉर 2A) आणि रामवाडी–वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2B) हे दोन उन्नत मार्ग समाविष्ट आहेत. या नवीन मेट्रो मार्गांच्या माध्यमातून वनाज–रामवाडी मार्गाचे विस्तारीकरण केले जाणार असून, पुणे शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला गतिमान करण्यासाठी हे निर्णायक पाऊल ठरणार आहे. या मंजुरीसाठी नुकतीच केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली होती. मंजुरी मिळालेल्या या १२.७५ किमी लांबीच्या मेट्रो मार्गावर १३ स्थानकं असतील, जी बावधन, कोथरूड, खराडी, वाघोलीसारख्या महत्त्वाच्या भागांना मेट्रोशी जोडतील. हा प्रकल्प IT हब्स, शैक्षणिक संस्था, निवासी व व्यावसायिक क्षेत्रांतील लाखो लोकांच्या दैनंदिन प्रवासाला सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक पर्याय देईल. एकंदरीतच पुण्याची वाहतूक व्यवस्था सशक्त करणारा हा ऐतिहासिक निर्णय आहे. हे नवीन मार्ग जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्थानकावरून Line-1 (निगडी–कात्रज) आणि Line-3 (हिंजवडी–जिल्हा न्यायालय) यांच्याशी जोडले जाणार आहे. तसेच, चांदणी चौक व वाघोली येथे आंतरशहर बससेवा मेट्रोशी जोडली जाणार आहे, जेणेकरून मुंबई, बेंगळुरू, छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांना थेट मेट्रोची जोड मिळेल. यामुळे पुण्यातील स्मार्ट आणि मल्टीमोडल ट्रान्सपोर्टचा पाया घातला जाणार आहे. ₹३,६२६.२४ कोटींचा हा प्रकल्प महा-मेट्रोमार्फत पुढील ४ वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुणे शहराच्या भविष्यासाठी, वाहतुकीच्या सुसंगत आणि शाश्वत विकासासाठी ही एक मोठी झेप आहे.
पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू: हर्षवर्धन सपकाळ
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर मराठी अभ्यास केंद्र व काँग्रेसची भूमिका एकच.
मुंबई, दि. २५ जून
पहिलीपासून हिंदी भाषा लादण्याचा राज्य सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. अशा प्रकारे लादले जाणारे अन्यायकारक भाषा धोरण खपवून घेतले जाणार नाही असे ठणकावत हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
ज्येष्ठ मराठी अभ्यासक डॉ. दीपक पवार आणि मराठी अभ्यास केंद्रातील चिन्मयी सुमित, राज असोंडकर, गिरीश सामंत, साधना गोरे व सुशील शेजुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची आज टिळक भवन येथे भेट घेऊन मराठी भाषा आणि शिक्षण धोरणासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, डॉ. दीपक पवार व त्यांच्या सहकाऱ्यांची भूमिका आणि काँग्रेसची भूमिका एकच आहे. १६ एप्रिलच्या शासन निर्णयानंतर काँग्रेसने सर्वात आधी हिंदी सक्तीला विरोध केला होता. मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांनी हा निर्णय रद्द करू असे सांगितले होते पण त्यांनी शब्दछल करून पुन्हा त्याच आशयाचा शासन आदेश काढला. काँग्रेस पक्ष हा निर्णय मागे घेण्यास सरकारला भाग पाडेल. सरकार मधील दोन्ही घटक पक्षांनी नरोवा कुंजरोवा ची भूमिका घेतली असून त्यांची ही भूमिका मराठी माणसाच्या व मराठी भाषेच्या छातीत सुरा खुपसण्यासारखी आहे.
हा लढा मराठी संस्कृती, मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आहे. हिंदी भाषेला आमचा विरोध नाही. मात्र रा. स्वं. संघाचा अजेंडा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात चालवत आहेत त्याला कडाडून विरोध आहे. शिवसेना ही मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थापन केल्याचे सांगतात पण एकनाथ शिंदे यांच्या सेनेतील दादा भुसे हे शिक्षण मंत्री आहेत तेच मराठीचा घात करत असतील तर त्याचे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले पाहि
आंबेडकरांनी कोर्टाचा दिवस वाया घातल्याचा ठपका ठेवून त्यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली
विधानसभेच्या 76 लाख मतांचे गौडबंगाल
मुंबई-वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यावर 76 लाख लोकांनी मतदान केल्याचा आरोप करत याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.मुंबईचे रहिवासी असलेले याचिकाकर्ते चेतन चंद्रकांत अहिरे यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर विचार करण्यास न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने नकार दिला. खंडपीठाने म्हटले आहे की याचिकेने न्यायालयाचा वेळ वाया घालवला, परंतु शुल्क आकारले नाही.
न्यायालयाने म्हटले, वरील तथ्यांच्या प्रकाशात, आम्हाला शंका नाही की ही याचिका फेटाळली पाहिजे. त्यानुसार ती फेटाळली जात आहे. याचिकेवर सुनावणी करण्यात या न्यायालयाचा एक संपूर्ण दिवस वाया गेला. असे असले तरी आम्ही कुठलेही शुल्क लावणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याने राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांमधील जाहीर झालेले निकाल रद्द करावेत अशी मागणी याचिकाकर्त्याने न्यायालयात केली. अहिरे यांनी दाखल केलेल्या याचिकेत सायंकाळी 6 वाजताच्या अधिकृत मतदान वेळेनंतर जास्तीचे मतदान झाल्याचे अधोरेखित करण्यात आले होते, विशेषतः अंतिम मुदतीनंतर 75 लाखांहून अधिक मते नोंदविण्यात आली, असा दावा करण्यात आला होता. याव्यतिरिक्त, त्यांनी 90 हून अधिक मतदारसंघांमध्ये मतदान झालेल्या आणि मोजलेल्या मतांमधील तफावतीकडे लक्ष वेधले.
निवडणूक आयोगाचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांनी असा युक्तिवाद केला की अहिरे यांच्याकडे रिट याचिकेत राज्यव्यापी निकालांना आव्हान देण्याचा अधिकार नव्हता. पुढे, त्यांनी असा युक्तिवाद केला की अहिरे यांनी विजयी उमेदवारांना पक्षकार म्हणून समाविष्ट करण्यात अपयशी ठरले.
त्याचप्रमाणे, यूनियन ऑफ इंडियाचे प्रतिनिधित्व करणारे अधिवक्ता उदय वारुंजीकर यांनी न्यायालयाला सांगितले की निकाल जाहीर झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत याचिकाकर्त्याने लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत निवडणूक याचिका दाखल करायला हवी होती. त्याऐवजी, अहिरे यांनी या परवानगी दिलेल्या वेळेच्या बाहेर आणि व्यापक सार्वजनिक परिणाम असूनही, जनहित याचिका म्हणून नियुक्त न करता रिट याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला.
चेतन चंद्रकांत अहिरे बनाम भारत संघ एवं अन्य मामले में फैसला आ गया है। डिवीजन बेंच ने याचिका खारिज कर दी है।
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 25, 2025
एक बार फैसला अपलोड हो जाए और मैं पढ़ लूं कि किस आधार पर इसे खारिज किया गया है, मैं अपनी प्रतिक्रिया दूंगा।
मैं कल सुबह 11:30 बजे मुंबई में वंचित बहुजन अघाड़ी के मुख्य… https://t.co/HNbgrLZmrb
न्यायालयाच्या निकालावर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? चेतन चंद्रकांत अहिरे विरुद्ध युनियन ऑफ इंडिया अँड ऑरस या खटल्याचा निकाल आला आहे. खंडपीठाने याचिका फेटाळली आहे. निकाल अपलोड झाल्यानंतर आणि तो कोणत्या कारणांवर फेटाळण्यात आला आहे हे वाचल्यानंतर, मी माझी प्रतिक्रिया देईन. मी उद्या सकाळी 11.30 वाजता व्हीबीएच्या मुंबईतील मुख्य कार्यालयात पत्रकार परिषद घेईन.दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी म्हटले होते की, निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याची नियमावली तयार केलेली आहे. त्यानुसार जर निवडणुका झाल्या नसतील तर निवडणुकीत गडबड केलेली आहे. आम्ही कोर्टात निवडणूक कशा पद्धतीने झाली आहे, याला आम्ही याचिकेत आव्हान केले. निवडणूक आयोग जर टोकन देऊ शकत नसेल तर 76 लाख मतदान कोणी केले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच निवडणूक मतदान संदर्भात आम्हाला रेकॉर्ड दिले जात नसतील तर, निवडणुकीत गडबड केली आहे की नाही हे आता कोर्टाने तपासावे.
वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली-विठ्ठलवाडी मेट्रोला मंजुरी
अजित पवार यांनी मानले प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे आभार
मुंबई, दि. 25 :- पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा दोन अंतर्गत, 1) वनाज ते चांदणी चौक (मार्गिका 2 अ) आणि 2) रामवाडी ते वाघोली-विठ्ठलवाडी (मार्गिका 2 ब) या दोन कामांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मान्यता दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांचे आभार मानले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा निर्णय पुण्याची वाहतूककोंडी सोडवण्यात, सार्वजनिक वाहतुकव्यवस्था सुधारण्यात, पुणे व परिसराच्या आर्थिक, औद्योगिक, व्यापारी, शैक्षणिक विकासात महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या कार्यालयातील ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग युनीट’च्या (पीएमयु) माध्यमातून पुण्यातील विकासप्रकल्पांसंदर्भात सातत्याने बैठका, आढावा घेऊन पुणे मेट्रोच्या विस्तारीत कामांना मंजूरी मिळावी म्हणून प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना आज यश आले आहे. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वणाज ते रामवाडी मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले. आज मंजूरी मिळालेल्या दुसऱ्या टप्प्यात 1) वनाज ते चांदणी चौक (मार्गिका 2 अ) आणि 2) रामवाडी ते वाघोली-विठ्ठलवाडी (मार्गिका 2 ब) ही दोन कामे मार्गी पूर्ण करण्यात येणार आहेत. या दोन्ही मार्गिका उन्नत आणि 12.75 किलोमीटर लांबीच्या आहेत. या मार्गिकांवर 13 स्थानके असणार आहेत. या सेवेचा उपयोग प्रामुख्याने चांदणी चौक, बावधन, कोथरुड, खराडी, वाघोली उपनगरातील प्रवाशांना होणार आहे. पुण्यातील आयटी, व्यापारी, औद्योगिक विकासासाठीही हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. यासाठी 3 हजार 626 कोटी 24 लाख रुपये (रु.3626.74) खर्च येणार असून येत्या चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल, असे नियोजन आहे.
उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांच्या कार्यालयातील प्रोजेक्ट मॉनिटरींग युनीट’च्या (पीएमयु) माध्यमातून ते संबंधित अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घेऊन प्रकल्पातील अडथळे दूर करण्याचा आणि कामांना गती देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. आजही (ता.25) त्यांनी ‘पीएमयु’ची बैठक घेऊन पुण्यासह राज्यातील महत्वाच्या विकासकामांचा आढावा घेतला. पुण्यासह मंत्रालयातील सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेला 50 वर्षपूर्ण झाल्याबद्दलआयोजित प्रदर्शनाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन
‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ घोषणांनी दुमदुमला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर
पुणे, दि. 25: देशात 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती, या घटनेला आज 50 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय तळमजला येथे आयोजित विशेष प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, तहसीलदार श्वेता पवार, माहिती अधिकारी सचिन गाढवे आदी उपस्थित होते.
यावेळी आणीबाणी कालावधीत बंदिवास सोसलेल्या व्यक्तींना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. या ज्येष्ठ व्यक्तींनी दिलेल्या ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमला.
या प्रदर्शनास भारताच्या प्राचीन कालखंडापासून टप्प्या- टप्प्याने विकसित झालेली लोकशाही परंपरा, स्वतंत्र्योत्तर भारत आणि संसदीय प्रणाली, आणीबाणीपूर्व आणि आणीबाणी कालावधीत घडलेल्या घडामोडी आदी माहितीचे प्रदर्शनात सादरीकरण करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे संयोजन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. हे प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालय तळ मजला, ए विंग येथे 25 जुलै 2025 पर्यंत पाहण्यासाठी उपलब्ध आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
आणीबाणीला RSS सरसंघचालक बाळासाहेब देवरसांचे समर्थन, देवरसांची भूमिका भाजपाला मान्य नाही का?: हर्षवर्धन सपकाळ.
इंदिराजींचा आणीबाणीचा निर्णय संविधानिक, पण ११ वर्षापासून सुरु असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?
सरकारी जाहिरातीत राजमुद्रेच्या जागी सेंगोल छापणे हा संविधान बदलण्याच्या कटाचा भाग!
मतचोरीप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी व चौकशी होईपर्यंत फडणवीसांनी पदावरून दूर रहावे.
मुंबई, दि. २५ जून २०२५-
देशातील तत्कालीन परिस्थितीमुळे इंदिराजी गांधी यांना आणीबाणीचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यावेळी झालेल्या काही घटनांवर इंदिराजी, सोनियाजी व राहुलजी गांधी यांनी प्रशासनाकडून काही चूका झाल्याचे मान्य केले आहे पण भाजपा मात्र आणीबाणीवर फक्त कांगावा करत आहे. रा. स्व. संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीचे समर्थन केले होते. तसेच जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाशी आरएसएसचा संबंध नाही असेही जाहिर केले होते. भाजपाला बाळासाहेब देवरसांची भूमिका मान्य नाही का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी १९७५ साली आणीबाणी लागू करण्याचा जो निर्णय घेतला होता तो संविधानिक होता. देशात काही शक्ती अराजक निर्माण करू पहात होत्या. नंतर आणीबाणी उठवून निवडणुका घेतल्या आणि लोकशाही प्रक्रिया पार पाडली. इंदिराजी गांधी यांनी आणीबाणीवेळी देशाची संपत्ती विकली नाही, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या उद्योगपतींच्या घशात घातल्या नाहीत. पण देशात मागील ११ वर्षांपासून अघोषीत आणीबाणी सुरु आहे, विमानतळ, बंदरे, खाणी, बँका, सरकारी जमिनी लाडक्या उद्योगपतीला विकल्या जात आहेत. धारावीची जमीन विकली आहे. देशात आज हुकूमशाही असून भाजपाचा भस्मासूर लोकशाही गिळू पहात आहे.
सरकारी जाहिरातीत राजमुद्रा गायब करून सेंगोल कसा?.
भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आज आणीबाणी संदर्भात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत जाहिरातबाजी केली आहे. सरकारी जाहिरातीतून राजमुद्रा गायब असून सेंगोल दाखवला आहे. सेंगोल कशाचे प्रतिक आहे, हे वेगळे सांगायला नको. भाजपाला लोकशाही व संविधान संपवून गोलवलकर यांचे ‘बंच ऑफ थॉट’ लागू करायचे आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..
काँग्रेस मुख्यपत्र शिदोरीचा आणीबाणी विशेष अंक.
काँग्रेस पक्षाचे मुख्यपत्र जनमानसाची शिदोरी या मासिकाचा आणीबाणी विशेष अंक काढला आहे. या अंकात इंदिराजी गांधी, पुपुल जयकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, दैनिक सामनाचे संपादक व खा. संजय राऊत यांच्यासह अनेक ज्येष्ठ लेखकांनी लेख लिहिले आहेत. या अंकातून आणीबाणी संदर्भातील सत्य लोकांसमोर आणले जाणार असून भाजपच्या खोट्या प्रचाराला चोख उत्तर मिळेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा..
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी विधानसभा निवडणुकीतील मतचोरीसंदर्भात ट्वीट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात ८ टक्के मतदार वाढले हे आरटीआयमधून उघड झाले आहे. फडणवीसांविरोधात निवडणूक लढलेले काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडदे पाटील यांनी ही माहिती मागविली आहे. विशिष्ट मोबाईल नंबरवरून अनेक मतदारांची नोंद केल्याचेही स्पष्ट झालेले आहे. याची शहानिशा करावी असे निवडणूक आयोगाने सांगितले पण शहानिशा केलेली नाही. गुडदे पाटील यांनी न्यायालयात दोन याचिकाही दाखल केलेल्या आहेत. फडणवीस यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेला नाहीत. या मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करावी व चौकशी होईपर्यंत त्यांनी पदावरून दूर रहावे असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
चांदीच्या ताटात पाहुणचार..
संसद व विधिमंडळ अंदाज समितीतील लोकांनी पाच हजार रुपयांचे शाही भोजन, ५५० रुपये भाड्याच्या चांदीच्या ताटात पाहुणचार झोडला तो धुळे विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये सापडलेल्या अंदाज समितीच्या पैशातून होता का, असा प्रश्न विचारून अंदाज समितीच्या तमाशाचा हा दुसरा वग आहे. शाही पाहुणचार झोडून काटकसर कशी करायची, हे समितीने सांगितले असावे. शेतक-यांना कर्जमाफी द्यायला, लाडक्या बहिणीला २१०० रुपये देण्यास पैसे नाहीत आणि मेजवाणी झोडण्यासाठी मात्र पैसे आहेत, असेही सपकाळ म्हणाले.
१२ किलो गांजासह लोहगावच्या तरुणाला पकडले
पुणे-१२ किलो गांजासह लोहगावच्या तरुणाला पुणे पोलिसांनी पकडले आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ दि.२२/०६/२०२५ रोजी विमानतळ पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप-निरीक्षक, नितीन राठोड यांना गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, लोहगाव कर्मभुमीनगर येथे एक इसम गांजा हा अंमली पदार्थ घेवुन थांबलेला आहे.
सदर गोपनीय बातमीच्या अनुषंगाने पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड व तपास पथकातील स्टाफने सापळा रचुन सदर इसमास शिताफीने ताब्यात घेतले. सदर इसमास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अखिलेश गरीब मंडल वय ३४ वर्षे रा. लेन नं ०१, कर्मभुमीनगर, काळभोर वस्ती, लोहगाव पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडील कापडी पिशवीची झडती घेतली असता त्या पिशवीमध्ये ३,००,०००/-रु. किं.चा १२ किलो गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आला आहे. सदर इसमा विरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. २९२/२०२५ एन. डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (II) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्हयामध्ये नमुद इसमास अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मनोज पाटील पोलीस उप-आयुक्त परि ०४ पुणे शहर, हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती आशालता खापरे, पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, हरीप्रसाद पुंडे, लालु कन्हे, शंकर वाघुले यांचे पथकाने केली आहे.
१४ किलो गांजा पुण्यात विकायला आलेला सोनईचा तरुण गजाआड
पुणे- १४ किलो गांजा पुण्यात विकायला आलेला सोनईचा तरुण पुणे पोलिसांनी गजाआड केला आहे . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक २४/०६/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार हे हद्दीत पेट्रोलींग करत असताना आगानगर सोसायटी गेट समोर, पुणे-नगर रोड, सार्वजनिक रोडवर इसम नामे योगेश रामभाऊ साळवे वय २५ वर्षे, रा. मु/पो सोनई गणेशपेठ, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर हा त्याचे जवळील स्विफ्ट डिझायर गाडी मध्ये संशयस्पदरित्या बसलेला मिळुन आला. सदर गाडीची झडती घेतली असता त्याचे गाडीच्या डिक्की मध्ये २,८१,७२०/- रु. किं. चा जांभळया रंगाच्या ट्रॅव्हल बॅग व पिवळया रंगाच्या नायलॉनच्या पोत्यामध्ये भरलेले १५ पॅकेट असा एकुण १४ किलो ०८६ ग्रॅम वजनाचा गांजा मिळुन आला. सदर मालासह स्विफ्ट डिझायर गाडी, मोबाईल व इतर असा एकुण ६,९१,८२०/- रु. किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर इसमाविरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.२९७/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (II) प्रमाणे अन्वये गुन्हा दाखल करुन इसम नामे योगेश रामभाऊ साळवे वय २५ वर्षे, रा. मु/पो सोनाई गणेशपेठ, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर याला अटक करण्यात आली आहे.
वरील नमुद कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १ गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोलीस अंमलदार विशाल दळवी, सचिन माळवे, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, रेहाना शेख, स्वप्नील मिसाळ यांनी केली आहे.
जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वेपुलाची उभारणी हे भारतीयांच्या प्रतिभेचे प्रतीक: प्रा. डॉ. के. एस. राव
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स व इंडियन जिओटेक्निकल सोसायटी यांच्या वतीने ‘चिनाब रेल्वेपूल उभारणीतील तांत्रिक व सामाजिक आव्हाने’वर व्याख्यानाचे आयोजन
पुणे : “जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वेपुलाची उभारणी हा केवळ एक अभियांत्रिकी पराक्रम नसून, भारतीयांच्या प्रतिभेचे, स्थापत्य कौशल्य व क्षमतेचे आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे प्रतीक आहे. भारतीय शास्त्रज्ञ, अभियंते, तंत्रज्ञ, कामगार यांच्या सखोल अभ्यासाची, कठोर परिश्रमाची ही फलश्रुती आहे,” असे प्रतिपादन आयआयटी दिल्लीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे एमिरेट्स प्राध्यापक डॉ. के. एस. राव यांनी केले. चिनाब नदीवरील रेल्वेपुलाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या डॉ. के. एस. राव यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटर, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स पुणे लोकल सेंटर व इंडियन जिओटेक्निकल सोसायटी (आयजीएस) पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वेपूल उभारणीतील तांत्रिक व सामाजिक आव्हाने’ यावर आयोजित व्याख्यानात डॉ. राव बोलत होते. शिवाजीनगर येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात संयोजक व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरचे अध्यक्ष अजय गुजर, राज्य अध्यक्ष जगन्नाथ जाधव, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सचे मानद सचिव डॉ. उत्तम आवारी, ‘आयजीएस’चे रमेश कुलकर्णी, चेअरमन सुमन जैन आदी उपस्थित होते.
या व्याख्यानात डॉ. के. एस. राव यांनी पुलाच्या उभारणीत आलेल्या भूगर्भशास्त्रीय अडचणी, हवामानातील बदल, कडेकपारीत काम करण्यातील जोखीम, वाहतूक व दळणवळणातील अडथळे अशा अनेक पैलूंचा सविस्तर वेध घेतला. पुलाच्या तांत्रिक बाबींप्रमाणेच स्थानिक समाजावर झालेल्या परिणामांचाही त्यांनी अभ्यासपूर्वक मागोवा घेतला. चिनाब नदीवर उभारण्यात आलेला हा पूल ३५९ मीटर उंचीवर असून, पॅरिसमधील ‘आयफेल टॉवर’पेक्षा याची उंची अधिक आहे. भारतीय रेल्वेच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुला मार्गाचा हा भाग असून जम्मू-काश्मीरच्या दळणवळणाच्या दृष्टीने हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे, असे डॉ. राव यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांसह अभियंते, बांधकाम व्यावसायिक, तांत्रिक अधिकारी, संशोधक आणि नागरी अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ‘बीएआय’च्या यूट्यूब चॅनेलवर करण्यात आले. प्रास्ताविकात अजय गुजर यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच ‘बीएआय’च्या उपक्रमांची माहिती दिली. सुमन जैन व डॉ. उत्तम आवारी यांनीही मनोगत व्यक्त केले. संजय आपटे यांनी सूत्रसंचालन केले. सी. एच. रतलानी यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाने तांत्रिक ज्ञानाच्या देवाण-घेवाणीसोबतच राष्ट्रीय प्रकल्पांची सामाजिक जाणीव समृद्ध करण्याचा हेतू साध्य केला.
‘वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन २०२५’
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने २९ व्या ‘वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन २०२५’ची माहिती अजय गुजर यांनी दिली. विविध १६ प्रकारांमध्ये ही स्पर्धा होत असून, स्पर्धेसाठी नामांकने मागविण्यास सुरुवात झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत या स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज पाठवता येणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ‘बीएआय’च्या पुणे सेंटर कार्यालयात भेट द्यावी किंवा ९८५०५३८३४६ यावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपालांची घेतली सदिच्छा भेट…
“The Conscience Network” पुस्तक भेट देत लोकशाहीच्या संघर्षावर संवाद
मुंबई, २५ जून २०२५ : महाराष्ट्र शासनातर्फ़े ‘संविधान हत्या दिवस’ निमित्त आज राजभवन, मलबार हिल, मुंबई येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आणीबाणी काळामध्ये संविधान रक्षणासाठी जनतेने दिलेल्या लढ्याला स्मरून संविधान हत्या दिन पाळण्यात आला.लोकशाही चिरायू होवो ही त्यामागील भुमिका होती.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा.ना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, मंत्री अशोक उईके यांची प्रमुख उपस्थित होती.
या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महामहिम राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना “The Conscience Network – A Chronicle of Resistance to a Dictatorship” हे सुगाता श्रीनिवासराजू लिखित पुस्तक भेट दिली. या भेटीत डॉ. गोऱ्हे यांनी आणीबाणी काळातील अनुभव, त्या काळात उभ्या राहिलेल्या जनआंदोलनांचे संदर्भ व लोकशाही टिकवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांविषयी मोलाचा संवाद साधला.
राज्यपाल महोदयांनी डॉ. गोऱ्हे यांना आणीबाणी काळातील त्यांच्या आठवणी सांगीतल्या. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतदेखील चर्चा करत त्या काळातील आंदोलनांच्या आठवणींना उजाळा दिला.
चिनॉय सेठ, जिनके खुदके घर शीशे के होते हैं..:फडणवीसांवर टीका; आणीबाणीवर बोलण्याचा हक्क नसल्याचा आरोप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्रात लेख लिहून आणीबाणीच्या मुद्यावरून काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी या प्रकरणी त्यांच्यावर पलटवार करत त्यांना स्वतः काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नये असा टोला हाणला आहे. आज निवडणूक आयोग स्वतंत्र आहे? माध्यमं स्वतंत्र आहेत? देशातील स्वायत्त संस्थांची स्वायत्तता शाबूत आहे? नाही ना? मग भाजपच्या मंडळींना पन्नास वर्षांपूर्वी लादलेल्या आणीबाणीवर बोलण्याचा काय अधिकार? असा कटू सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी घोषित केली होती. त्यांच्या या निर्णयाला आज बरोबर 50 वर्षे पूर्ण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एका मराठी वृत्तपत्रात लेख लिहून काँग्रेसवर टीका केली. देशातील एका काळ्याकुट्ट अध्यायाला आज ५० वर्षे झाली. त्याला सुवर्ण महोत्सव म्हणायचे तरी कसे? महोत्सव हा चांगल्याचा करायचा असतो. त्यामुळे संविधान आणि सांविधानिक व्यवस्था आणि लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेस पक्षाने लिहिलेल्या या अध्यायाला ५० वर्षं झाली, एवढेच म्हणावे लागेल. जुने दिवस कधी विसरायचे नसतात, ते सतत आपल्याला लढण्याचे बळ देत असतात, असे फडणवीस आपल्या लेखात म्हणालेत.
आज २५ जून, पन्नास वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आजच्या दिवशी देशावर आणीबाणी लादली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्ट शिल्लक राहिली नव्हती. पण आज तरी काय वेगळी परिस्थिती आहे ?
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 25, 2025
आज निवडणूक आयोग स्वतंत्र आहे ? माध्यमं स्वतंत्र आहेत ? देशातील स्वायत्त… pic.twitter.com/uanNJ2u7Gr
अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्ट शिल्लक आहे का?
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी त्यांच्या या लेखावरून भाजपवर तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. आज 25 जून, पन्नास वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आजच्या दिवशी देशावर आणीबाणी लादली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्ट शिल्लक राहिली नव्हती. पण आज तरी काय वेगळी परिस्थिती आहे?
आज निवडणूक आयोग स्वतंत्र आहे? माध्यमं स्वतंत्र आहेत? देशातील स्वायत्त संस्थांची स्वायत्तता शाबूत आहे? नाही ना? मग भाजपच्या मंडळींना पन्नास वर्षांपूर्वी लादलेल्या आणीबाणीवर बोलण्याचा काय अधिकार? आज काहींनी वर्तमानपत्रांमध्ये पन्नास वर्षांपूर्वी लादलेल्या आणीबाणीवर रकाणे भरून काढले आहेत. पण चिनॉय सेठ, जिनके खुदके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरपर पत्थर नहीं फेंकते, असे रोहिणी खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणीबाणीवर काय म्हणाले फडणवीस?
…देवेंद्र फडणवीस आपल्या लेखात म्हणतात, आणीबाणीने अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त केले. अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले. घरातील कमावती व्यक्ती कारागृहात असताना अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले. अनेकांची संपत्ती जप्त झाली, उद्योग-रोजगार कायमचे संपुष्टात आले. मानसिक आणि आर्थिक अशा दोन्ही पातळ्यांवर मोठे शोषण झाले. माझा वैयक्तिक अनुभव विचाराल, तर मी केवळ पाच वर्षांचा होतो. माझे वडील दि. गंगाधरराव फडणवीस यांनाही अटक झाली होती. त्यांना कारागृहात डबा द्यायला जाताना किंवा त्यांना वैद्याकीय तपासणीसाठी नेताना फक्त भेट होत असे. लहान वयात वडिलांपासून बराच काळ दूर राहावे लागले. त्यामुळे मनातून चीड होती.
आणीबाणीनंतर विधिपालिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका या व्यवस्थांचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले होते. लोकशाहीचे महत्त्व काय, हे अधिक प्रकर्षाने लोकांना समजले. संविधानावरील श्रद्धा अधिक दृढ झाली. त्या नेत्यांनी संघर्ष केला नसता, तर कदाचित आपल्या देशातसुद्धा हुकूमशाही प्रस्थापित झाली असती. आज जी अवस्था पाकिस्तानची आहे, तीच भारताचीही झाली असती. आज जी लोकशाही जिवंत आहे, ती 50 वर्षांपूर्वी संघर्ष केलेल्या त्या नेत्यांमुळे. आज आणीबाणीपेक्षाही त्या नेत्यांचे स्मरण अधिक आवश्यक आहे.
गांधी घराणे आणि काँग्रेसने केलेल्या शोषणाच्या कथा जितक्या प्रकर्षाने पुढे येतील, त्यातून लोकशाही अधिक भक्कम होत जाईल. आज आम्ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणीबाणीच्या या विदारक कथा चित्ररूपाने प्रदर्शनातून मांडत आहोत. प्रत्येकाने त्याला अवश्य भेट द्यावी. आणीबाणीत संघर्ष करणाऱ्या कुटुंबांनी, लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी जो लढा दिला, त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरवसुद्धा करणार आहोत. त्या कुटुंबांना मानधन देण्याचा निर्णयसुद्धा राज्य सरकारने घेतला आहे. हे आम्ही लोकशाही रक्षणाच्या मंदिरात वाहिलेले पवित्र पुष्प आहे. येणाऱ्या पिढ्यांनी मात्र हा इतिहास आवर्जून समजून घेतला पाहिजे, असे फडणवीस यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.
50 वर्षांपूर्वी लोकशाही संपवण्याचा प्रयत्न झाला:पण आम्ही भारतीय लोकशाही वाचवली हे पुढच्या पिढीला सांगावे लागेल -देवेंद्र फडणवीस
मुंबई-या देशात पन्नास वर्षांपूर्वी लोकशाहीला संपवण्याचा प्रयत्न झाला होता. स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी केवळ आणीबाणी लागू करून विरोधातील सर्व नेत्यांना तुरुंगात टाकले नव्हते तर तर भारतीय संविधानात देखील बदल केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातील मुलभूत अधिकार माझ्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले होते. मात्र तेच अधिकार इंदिरा गांधी यांनी संपवले होते. त्या जागेवर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलला जागा देण्यात आली होती. पंतप्रधान याच्या पदाला कोणत्याही न्यायालयाच्या कक्षेतून बाहेर काढण्यात आले होते, असा दावा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ‘संविधान हत्या दिवस’ निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी फडणवीस यांनी इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या या निर्णयावर टीका केली. ते म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदाला अमर्याद अधिकार दिले होते. इतकेच नाही तर सर्वोच्च न्यायालयाला देखील संसदेच्या अंतर्गत आणण्याचा प्रयत्न संविधानाला बदलून करण्यात आला होता. भारतीय लोकशाहीला संपवण्याचे काम 50 वर्षांपूर्वी स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी केले होते, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.भारताच्या लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाही संग्राम सेनानी लढले. यामध्ये अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस, मोरारजी देसाई, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी मिळून अशी लढाई लढली की, ज्यामुळे भारताचे संविधान आणि भारताची लोकशाही वाचली. त्यामुळे हा दिवस देशासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. आपल्या पुढच्या पिढीला भारताची लोकशाही आम्ही वाचवली, हे सांगावे लागणार आहे, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आणीबाणी : लोकशाहीच्या हत्येचा काळा अध्याय – फडणवीसांचा विशेष लेख–जेव्हा काँग्रेस सरकारने आपल्या विरोधात चिघळणार्या राजकीय वातावरणावर आणीबाणीची शाल पांघरण्याचा प्रयत्न केला, अचानक एके रात्री देश झोपेत असताना लोकशाहीची हत्या केली. लोकशाही मूल्यांचा आणि सांविधानिक संस्थांच्या त्या भीषण संहाराचा आढावा घेणारा, लोकशाहीच्या रक्षणार्थ आणीबाणीविरोधात झुंजणाऱ्या सेनानींच्या गौरवाचे महत्व अधोरेखित करणारा माझा विशेष लेख… नक्की वाचा, असे आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. एका पोस्टच्या माध्यमातून त्यांनी लिहिलेला लेख वाचण्याचे आवाहन केले आहे.
माळेगाव कारखाना:अजित पवार यांचाच दबदबा
पुणे/बारामती
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘नीलकंठेश्वर’ पॅनेलने पहिल्या फेरीअखेर निर्णायक आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत ‘ब’ वर्ग मतदारसंघ प्रवर्गातून स्वतः रिंगणात असलेले अजित पवार ९१ मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाले
त्यांचे प्रतिस्पर्धी भालचंद्र बापूराव देवकाते यांना केवळ १० मते मिळाली. विधानसभेच्या निवडणुकीनंतर बारामतीतील ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून त्यांनी माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात स्वतः जातीने प्रचार करत, गाठीभेटी घेतल्या होत्या आणि विरोधकांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. त्यांच्या या सक्रिय सहभावाचा आणि रणनीतीचा प्रभाव मतदानाच्या आकडेवारीमध्ये स्पष्टपणे दिसून आला आहे. रात्री उशिरापर्यंत झालेल्या मतमोजणीत अजित पवारांचे स्वतःचे उमेदवार बहुसंख्य जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते.
रंजनकुमार तावरे यांना धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले आहे. ‘अजित पवार यांनी करुन दाखविले…’ या शब्दात कार्यकर्त्यांनी भावना बोलून दाखवली.
दुपारी दोन वाजेपर्यंत जाहीर झालेल्या सर्व जागांवर अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार विजयी झाले होते. पॅनेलच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्यानंतर प्रशासकीय भवन समोर जमलेल्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत व फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. एकच वादा अजितदादाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
दरम्यान या निवडणूकीसाठी भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास मतदारसंघातून नीलकंठेश्वर पॅनेलचे विलास ऋषीकांत देवकाते २१९४ मतांनी विजयी झाले. विलास देवकाते यांना ८९७२ तर विरोधी सहकार बचाव पॅनेलचे सूर्याजी देवकाते यांना ६५९८ मते मिळाली.
इतर मागासप्रवर्गातून नीलकंठेश्वरचे नितीन वामनराव शेंडे ११५३ मतांनी विजयी झाले. त्यांना ८४९४ तर सहकार बचाव पॅनेलचे रामचंद्र नाळे यांना ७३४१ मते मिळाली. महिला राखीव प्रवर्गात नीलकंठेश्वर पॅनेलच्या संगीता कोकरे व ज्योती मुलमुले यांनी सहकार बचाव पॅनेलच्या राजश्री कोकरे व सुमन गावडे यांचा पराभव केला.
संगीता कोकरे यांना ८४४० तर ज्योती मुलमुले यांना ७५७६ तर राजश्री कोकरे यांना ७४८५ व सुमन गावडे यांना ६०९९ मते मिळाली. दुपारी दोन वाजेपर्यंत एक दोन जागांचा अपवाद वगळता नीलकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार आघाडीवर होते.
अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातील नीलकंठेश्वर पॅनेलचे रतनकुमार भोसले हे १४८७ मतांनी विजयी झाले. त्यांनी सहकार बचाव पॅनेलच्या बापूराव गायकवाड यांचा पराभव केला. भोसले यांना ८६७० तर गायकवाड यांना ७१८३ मते मिळाली.
निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी माझ्याकडे बघून तुम्ही मतदान करा, पाच वर्षे तुम्हाला राज्यातील पहिल्या पाच क्रमांकामधील भाव देतो असा शब्द दिला होता, मीच कारखान्याचा अध्यक्ष असेन असेही त्यांनी जाहीर केले होते. त्यांच्या या आवाहनाला सभासदांनी साथ देत त्यांच्या पॅनेलला निर्विवाद बहुमत मिळवून दिले. यामुळे आता अजित पवार हेच माळेगावचे नवीन अध्यक्ष असतील हे देखील स्पष्ट झाले आहे.
मी जे बोलतो ते करुन दाखवतो, असे वारंवार भाषणात त्यांनी नमूद केले होते. त्या नुसार एक हाती निवडणूक लढवून दिग्गज समजल्या जाणाऱ्या चंद्रराव तावरे व रंजन तावरे जोडीला त्यांनी पराभवाची धूळ चारली.
आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आहोत हे बाजूला ठेवत तब्बल आठवडाभर बारामतीत थांबून एक उमेदवार व पॅनेलप्रमुख या नात्याने वाडीवस्तीवर जात प्रचार करत नाराजी दूर करुन माळेगावची सत्ता त्यांनी अक्षरशः खेचून आणली.
निवडणूक जिंकण्यासाठी जे काही करावे लागते ते सर्व करत आपण मुत्सद्दी आहोत, सभासद देखील पाठीशी आहेत, हेच अजित पवार यांनी सिध्द करुन दाखविले. बारामतीत आजही त्यांचाच शब्द प्रमाण आहे, मतदारसंघातील संस्थावर त्यांची मजबूत पकड आहे हे या निमित्ताने पुढे आले.
नीलकंठेश्वर पॅनलचे विजयी उमेदवार
ब वर्ग
1) अजित पवार
भटक्या विमुक्त राखीव
2) श्री विलास देवकाते
अनुसूचित जाती राखीव
3) रतन कुमार भोसले
इतर मागासवर्ग राखीव
4) नितीन कुमार शेंडे
महिला राखीव
5) सौ संगीता कोक
6) सौ ज्योती मुलमुले
माळेगाव गट : 01
7) शिवराज जाधवराव
8) राजेंद्र बुरुंगले
9) बाळासाहेब तावरे
पणदारे गट : 2
10) योगेश जगताप
11) तानाजी कोकरे
12) स्वप्नील जगताप
सांगवी गट : 01
13) चंद्रराव तावरे
पुण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग
अधिक माहिती घेतली असता
महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा विनयभंग करणाऱ्या भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरेला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर
खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.1) खडक पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 285/2015 IPC 385,506,507
2) विश्रामबाग पोलीस स्टेशन 336/2010 IPC 452, 143, 147, 149, 427, 506
3) विश्रामबाग पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 3140/2011 IPC 188, 34
4) डेक्कन पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 57/2022 IPC 354, 504, 506, 43
पुणे- संस्कृती, शिक्षण आणि सांस्कृतिक तेची गौरवशाली परंपरा लाभलेल्या पुणे शहरात भाजप च्या काही कार्यकर्त्यांनी बाल गंधर्व रंगमंदिरातील एका कार्यक्रमात महिलांशी केलेले गैर वर्तन अजूनही विस्मरणात गेलेले नसेल तोच आता पुन्हा पुण्यात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडून महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे (भाजप) एक पदाधिकारी प्रमोद कोंढरे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीदरम्यान ही घटना घडली, जिथे ही अधिकारी सुरक्षा व्यवस्थेचा भाग होती.
मिळालेल्या माहितीनुसार कोंढरे याने महिला अधिकाऱ्याशी कर्तव्यावर असताना अनुचित वर्तन केले. संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे, ज्यामध्ये गैरवर्तन स्पष्टपणे दिसून येते.
या घटनेनंतर, तक्रार दाखल करण्यात आली आणि भाजप पदाधिकाऱ्या विरुद्ध आता औपचारिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि पुराव्याचा भाग म्हणून या फुटेजची तपासणी केली जात आहे.
या घटनेवर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत, आरोपी नेत्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की हे प्रकरण पूर्ण पारदर्शकतेने आणि कायद्यानुसार हाताळले जाईल.
प्रमोद कोंढरे हे हेमंत रासने यांचे खंदे समर्थक आहे.नितीन गडकरी सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी हा संपूर्ण प्रकार घडला. नितीन गडकरी हे पुण्यातील शनिवार वाडा ते सारसबाग येथील भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी आले होते. . यावेळीच प्रमोद कोंढरे यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केले असा आरोप करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतरच हा गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल केला गेला. पोलीस अधिकारी असून देखील हा गुन्हा दाखल व्हायला संपूर्ण एक दिवसाचा कालावधी लागला. या घटनेची संपूर्ण पारदर्शक चौकशी होईल असेही पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात आले. परंतु पुणे शहरामध्ये पोलीस जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य महिलांचे काय असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जातो
दरम्यान आपल्याला पोलीस ठाण्यात बोलाविले होते आपण तिथे आपला जबाब दिला असून आपण कोणत्याही प्रकारे धक्का लागेल अथवा स्पर्श होईल असे वर्तन कोणत्याही महिला अधिकाऱ्याबाबत केलेले नाही असा दावा कोंढरे यांनी केला आहे
मात्र या घटनेचे CC Tv फुटेज बघितलेल्या महिला पत्रकाराने म्हटले आहे कि,’या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मी स्वतः. बघीतले. चीड आली बघून..त्यामुळे समर्थकांनी राजकीय गेम किंवा पालिका निवडणूका असे फालतू तर्क लावू नये..वर्दीवर असलेल्या वरिष्ठ महिला अधिकार्यासोबत असे घाणेरडे वर्तन करणाऱ्यावर भारतीय जनता पक्ष काय कारवाई करणार?
अकरावी प्रवेश: निवड यादी गुरुवारी
पुणे-इयत्ता अकरावीच्या प्रवेशाच्या प्रक्रियेतील पहिल्या नियमित ‘कॅप’ फेरीतील निवड यादी गुरुवारी (ता. २६) जाहीर होणार आहे. या दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालयांची निवड यादी आणि पहिल्या फेरीचा कट-ऑफ जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे.
संपूर्ण राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या अंतर्गत राज्यातील नऊ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमधील २१ लाख २३ हजार ७२० जागांसाठी आतापर्यंत १२ लाख ७१ हजार २०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रवेश प्रक्रियेत ‘कॅप’अंतर्गत १६ लाख ६० हजार ८४ जागा उपलब्ध आहेत, तर व्यवस्थापन कोट्याअंतर्गत चार लाख ६३ हजार ६३६ जागा उपलब्ध आहेत.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार, पहिल्या नियमित फेरीतील ॲलॉटमेंट प्रवेशाच्या पोर्टलवर गुरुवारी जाहीर होईल. याचदिवशी विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालय आणि महाविद्यालयांच्या लॉगिनमध्ये प्रवेशासाठी असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी दर्शविली जाईल. तसेच विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे देखील संदेश पाठविले जातील आणि पहिल्या नियमित फेरीचा कट-ऑफ जाहीर होईल.
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या नियमित फेरीचे वेळापत्रक :
तपशील : कालावधी
– नियमित फेरीसाठी ॲलॉटमेंट जाहीर करणे, विद्यार्थी आणि महाविद्यालय लॉगिंनमध्ये तपशील दर्शविणे, महाविद्यालयांचा कट-ऑफ जाहीर करणे : २६ जून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)
– विद्यार्थ्यांनी मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे, महाविद्यालयांनी प्रवेशासाठी ॲलॉट झालेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जातील तपशील आणि कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावेत. प्रवेश रद्द करणे, नवीन विद्यार्थी नोंदणी आणि प्रवेश अर्ज भाग एक भरणे : २७ जून ते ३ जुलै
– प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर अपडेट करण्यासाठी महाविद्यालयांना अतिरिक्त वेळ : ३ जुलै
– रिक्त जागा प्रदर्शित करणे, पुढील फेरीसाठी कॅप ऑप्शन्स, पसंतीक्रम ऑनलाइन नोंदविणे आणि भाग दोन लॉक करणे, विद्यमान नोंदणीकृत विद्यार्थ्यांना भाग एक एडिट करता येण्याच्या प्रक्रियेस सुरवात : ४ जुलै
