अधिक माहिती घेतली असता
महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा विनयभंग करणाऱ्या भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरेला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर
खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.1) खडक पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 285/2015 IPC 385,506,507
2) विश्रामबाग पोलीस स्टेशन 336/2010 IPC 452, 143, 147, 149, 427, 506
3) विश्रामबाग पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 3140/2011 IPC 188, 34
4) डेक्कन पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 57/2022 IPC 354, 504, 506, 43
पुणे- संस्कृती, शिक्षण आणि सांस्कृतिक तेची गौरवशाली परंपरा लाभलेल्या पुणे शहरात भाजप च्या काही कार्यकर्त्यांनी बाल गंधर्व रंगमंदिरातील एका कार्यक्रमात महिलांशी केलेले गैर वर्तन अजूनही विस्मरणात गेलेले नसेल तोच आता पुन्हा पुण्यात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडून महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे (भाजप) एक पदाधिकारी प्रमोद कोंढरे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीदरम्यान ही घटना घडली, जिथे ही अधिकारी सुरक्षा व्यवस्थेचा भाग होती.
मिळालेल्या माहितीनुसार कोंढरे याने महिला अधिकाऱ्याशी कर्तव्यावर असताना अनुचित वर्तन केले. संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे, ज्यामध्ये गैरवर्तन स्पष्टपणे दिसून येते.
या घटनेनंतर, तक्रार दाखल करण्यात आली आणि भाजप पदाधिकाऱ्या विरुद्ध आता औपचारिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि पुराव्याचा भाग म्हणून या फुटेजची तपासणी केली जात आहे.
या घटनेवर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत, आरोपी नेत्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की हे प्रकरण पूर्ण पारदर्शकतेने आणि कायद्यानुसार हाताळले जाईल.
प्रमोद कोंढरे हे हेमंत रासने यांचे खंदे समर्थक आहे.नितीन गडकरी सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी हा संपूर्ण प्रकार घडला. नितीन गडकरी हे पुण्यातील शनिवार वाडा ते सारसबाग येथील भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी आले होते. . यावेळीच प्रमोद कोंढरे यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केले असा आरोप करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतरच हा गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल केला गेला. पोलीस अधिकारी असून देखील हा गुन्हा दाखल व्हायला संपूर्ण एक दिवसाचा कालावधी लागला. या घटनेची संपूर्ण पारदर्शक चौकशी होईल असेही पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात आले. परंतु पुणे शहरामध्ये पोलीस जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य महिलांचे काय असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जातो
दरम्यान आपल्याला पोलीस ठाण्यात बोलाविले होते आपण तिथे आपला जबाब दिला असून आपण कोणत्याही प्रकारे धक्का लागेल अथवा स्पर्श होईल असे वर्तन कोणत्याही महिला अधिकाऱ्याबाबत केलेले नाही असा दावा कोंढरे यांनी केला आहे
मात्र या घटनेचे CC Tv फुटेज बघितलेल्या महिला पत्रकाराने म्हटले आहे कि,’या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मी स्वतः. बघीतले. चीड आली बघून..त्यामुळे समर्थकांनी राजकीय गेम किंवा पालिका निवडणूका असे फालतू तर्क लावू नये..वर्दीवर असलेल्या वरिष्ठ महिला अधिकार्यासोबत असे घाणेरडे वर्तन करणाऱ्यावर भारतीय जनता पक्ष काय कारवाई करणार?