Home Blog Page 476

महिंद्रा लाइफस्पेसेसतर्फे महिंद्रा सिटाडेलचा नवीन प्रीमियम निवासी टॉवर सादर

पुणे, – महिंद्रा समूहाची रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा विकास शाखा महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड (MLDL) ने महिंद्रा सिटाडेलच्या दुसऱ्या टप्प्यात एक नवीन प्रीमियम निवासी टॉवर सुरू करण्याची घोषणा केली आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे येथे सुमारे 9.66 एकर क्षेत्रात हा निवासी प्रकल्प विस्तारलेला आहे. या टप्प्यात सुमारे 135 प्रीमियम 3 आणि 4 बीएचके निवासस्थाने सादर केली जात असून आधुनिक जीवनशैली उंचावण्यासाठी डिझाइन केलेली आहेत.

महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडचे मुख्य व्यवसाय अधिकारी (निवासी प्रकल्प) विमलेंद्र सिंग म्हणाले, “पुण्याच्या झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे आणि सांस्कृतिक समृद्धीमुळे प्रशस्त 3 आणि 4 बीएचके घरांची मागणी वाढली आहे. गेल्या दशकात, पिंपरीमधील स्थिर रिअल इस्टेट वाढ, आधुनिक परिसर, हरित क्षेत्रे आणि उद्योग तसेच आयटी पार्क्सच्या जवळील स्थान यामुळे हा भाग विस्तारासाठी एक उत्कृष्ट केंद्र बनला आहे. आमच्या मागील लाँचिंगला मिळालेल्या उत्तम प्रतिसादाच्या आधारावर, या नवीन प्रीमियम निवासी टॉवरचे उद्घाटन करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. या टॉवरद्वारे आम्ही एक समृद्ध समुदाय निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महिंद्रा सिटाडेलला पुण्याच्या शहरी क्षेत्रात एक महत्त्वाचा लँडमार्क म्हणून प्रस्थापित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

नवीन प्रीमियम निवासी टॉवर ऊर्जा कार्यक्षम वैशिष्ट्ये आणि कचरा व्यवस्थापन प्रणालीने सुसज्ज IGBC Gold पूर्व-प्रमाणित घरे सादर करून महिंद्रा लाइफस्पेसेसच्या शाश्वततेप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतिबिंब दर्शवतो. या प्रकल्पात विविध प्रकारच्या विचारपूर्वक तयार करण्यात आलेल्या  सुविधा आहेत. त्यात एकापेक्षा जास्त बॅडमिंटन कोर्ट, जॉगिंग ट्रॅक आणि अर्ध-ऑलिंपिक पूल या गोष्टी आहेत. त्या रहिवाशांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य सुधारण्यात मदत करतात आणि त्यांना संतुलित आणि उत्साही जीवनशैली प्रदान करतात.

मुंबई-पुणे महामार्गाच्या जवळील मुख्य निवासी स्थानामध्ये वसलेला हा प्रकल्प आपल्या उत्तम स्थानामुळे अधिक फायदेशीर ठरतो. रहिवाशांना संत तुकाराम मेट्रो स्टेशन जवळच असून जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि पुणे-धुळे-नाशिक महामार्गासह प्रमुख वाहतूक मार्गांपर्यंत सहज जाता येते. तसेच कासारवाडी आणि पिंपरी रेल्वे स्थानक, तसेच पिंपरी चौक बस थांबा यांसारखी मुख्य वाहतूक केंद्रेही येथून अगदी जवळ आहेत.

निलंबनानंतर शिवराज राक्षे म्हणाला – पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे खेळाडूवर अन्याय होत असेल तर त्यांच्यावरही आक्षेप घ्यायला हवा

अहिल्यानगरमध्ये रविवारी 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. उपांत्य फेरीत पैलवान पृथ्वीराज मोहोळने शिवराज राक्षेला चितपट केले. या सामन्यात 40 सेकंदात पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले. त्यानंतर चुकीच्या पद्धतीने निकाल दिल्याचा आरोप करत शिवराज राक्षेने पंचांशी वाद घातला. तसेच एका पंचाला लाथ देखील मारली. त्यानंतर कुस्तीगीर परिषदेने त्याला तीन वर्षांसाठी निलंबित केले. या निलंबनानंतर शिवराज राक्षेने प्रतिक्रिया दिली. पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे खेळाडूवर अन्याय होत असेल तर त्यांच्यावरही आक्षेप घ्यायला हवा, असे तो म्हणाला.

सर्वकाही चुकीचे झाले असून सर्वांनी ते पाहिले आहे. कुस्तीचा व्हिडिओ तपासण्याची आम्ही विनंती केली होती. व्हिडिओ पाहूनच कुस्तीचा निर्णय घ्या, असे म्हणालो होतो. थर्ड अम्पायरला असा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयोजकांकडे आम्ही व्हिडिओची मागणी केली. दोन्ही खांदे टेकले असतील तर आम्ही हार मानायला तयार आहोत. कुस्तीत हार जीत होत असते. पण पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे एखाद्या खेळाडूचे नुकसान होत असेल तर महाराष्ट्रात किती खेळाडू आहेत, प्रत्येक खेळाडूवर अन्याय होत राहिला तर पंचांवर आक्षेप घेतला पाहिजे, असे शिवराज राक्षे म्हणाला.

शिवराज पुढे बोलताना म्हणाला की, मी वारंवार हेच सांगतो होतो की, रिव्ह्यु दाखवा. त्यानंतर निर्णय घ्या. त्यानंतर घेतलेला निर्णय मान्य आहे. पण ते व्हिडिओही दाखवत नव्हते. विनंती करूनही त्यांनी मान्य केले नाही. मला शिविगाळ केली. म्हणून मला टोकाचे पाऊल उचलावे लागले.

एखाद्या पैलवानावर अन्याय होत असेल तर तो गप्प बसणार नाही. तुम्ही नंतर मान्य करता की पंचांकडून चुकी झाली आहे. मग त्या पोझिशनचे पॉइंट देऊन पुढे खेळ सुरू ठेवला पाहिजे होता. पंचांनी स्वतः मान्य केलंय की चुकी झाली आहे. त्यामुळे पंचांवरही आक्षेप घेतला पाहिजे, जेणेकरून ते पुढच्यावेळी काळजी घेतील, असेही शिवराज एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला.

दरम्यान, पंचांनी माझ्या मुलाला आदल्या दिवशी शिवीगाळ केली होती. माझ्या मुलावर जर निलंबनाची कारवाई केली, तर मग पंचांवर कारवाई का नाही? पंचांना शिक्षा का केली जात नाही? असा सवालही त्याच्या आईने केला. आमचा मुलगा गरीब घरातला आहे. पंचांनी रिप्ले का दाखवला नाही? चूकही मान्य केली पण ती नंतर मान्य केली. माझ्या मुलाचे इतकेच म्हणणे होते की रिप्ले दाखवा. तो दाखवला नाही. पंचांनी शिवीगाळ करणे किती बरोबर आहे? तीन वर्षे जर त्याचे निलंबन केले आहे, तर मग पंचावर कारवाई केली पाहिजे, त्यांचीही चूक आहेच. मागच्या वर्षीही शिवराज राक्षेवर अन्यायच करण्यात आला. हे नेहमी घडत आले आहे, असे शिवराजच्या आई म्हणाल्या.

उपांत्य फेरीनंतर अंतिम सामन्यातही गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना चांगलाच रंगला होता. पृथ्वीराज मोहोळने महेंद्र गायकवाडवर मात करत महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. यावेळी महेंद्र गायकवाडने देखील पंचांबरोबर वाद घातला. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेने त्यालाही तीन वर्षांसाठी निलंबित केले.

“कायदा व्यवसाय: एक श्रेष्ठ आणि प्रतिष्ठित क्षेत्र” एमआयटी-एडीटी विद्यापीठात कार्यशाळा संपन्न

पुणे: येथील एमआयटी आर्ट, डिजाईन, टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणे आणि आंतरराष्ट्रीय कौन्सिल ऑफ ज्युरिस्ट्स (लंडन) यांच्या संयुक्त विद्यमाने “व्यावसायिक नैतिकता आणि मानवी मूल्ये” या विषयावर कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेचा उद्देश कायदा व्यवसायातील नैतिकतेचे महत्त्व अधोरेखित करणे आणि विद्यार्थ्यांना न्याय व मूल्यांसाठी प्रेरित करणे होता.
कार्यक्रमाची सुरुवात एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांच्यासोबत कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू प्रा. डॉ. रामचंद्र पुजेरी विद्यापीठातील अधिष्ठाता आणि संचालक उपस्थित होते. प्रा. डॉ. कराड यांनी कायदा व्यवसायाचे महत्त्व सांगताना म्हटले की, “कायदा व्यवसाय हा केवळ एक करिअर नसून, तो न्याय व सत्यासाठी लढणारे श्रेष्ठ क्षेत्र आहे, जे व्यक्तीला समाजात मान व प्रतिष्ठा देते.”
कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आदिश अग्रवाल, अध्यक्ष, इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ ज्युरिस्ट्स (लंडन), यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले की, “कायदा व्यवसाय समाज घडविण्याचे व न्यायासाठी लढण्याचे शक्तिशाली साधन आहे. हा व्यवसाय नैतिकता व समर्पणाची मागणी करतो आणि व्यक्तीला समाजात नेतृत्व करण्यासाठी प्रेरित करतो.”
कार्यक्रमानंतर डॉ. आदिश अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधला. त्यांनी त्यांच्या अनुभवांचे शेअरिंग करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. ही कार्यशाळा डॉ. सपना सुकृत देव, अधिष्ठाता, स्कूल ऑफ लॉ, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.आदित्य केदारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

दि. ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान बारामती येथे महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा; ११०० खेळाडूंचा सहभाग

बारामती, दि. ३ फेब्रुवारी २०२५ :- महावितरण कंपनीच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन बारामती येथील विद्या प्रतिष्ठाणच्या विद्यानगरी संकुलात दि ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत १६ परिमंडलातील सुमारे अकराशे खेळाडू सहभागी होणार आहेत.

वीज कर्मचाऱ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी महावितरणमध्ये दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. २०२४-२५ च्या स्पर्धेचे यजमानपद बारामती परिमंडलाकडे आहे. या स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (दि. ५) सकाळी ९ वाजता महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक (संचालन/मानव संसाधन) श्री. अरविंद भादीकर राहतील तर प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. राहुल गुप्ता, कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे, संचालक (वित्त) श्री. अनुदीप दिघे, संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे, संचालक (वाणिज्य) श्री. योगेश गडकरी, नागपूर प्रादेशिक संचालक श्री. परेश भागवत, पुणे प्रादेशिक संचालक व आयोजन समितीचे अध्यक्ष श्री. भुजंग खंदारे, स्पर्धेचे मुख्य समन्वयक तथा मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके उपस्थित राहणार आहेत.

क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम शनिवारी (दि. ८) दुपारी ३.३० वाजता विद्या प्रतिष्ठाणच्या गदिमा सभागृहात संचालक (संचालन/मानव संसाधन) श्री. अरविंद भादीकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे राहणार आहेत.

या स्पर्धेत क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिक्वाईट, कॅरम, कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, ॲथलेटिक्स, कॅरम आणि ब्रिज आदी २२ क्रीडा प्रकारांचा समावेश असून वैयक्तिक, सांघिक आणि सर्वसाधारण या तिन्ही प्रकारात विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेच्या आयोजनासाठी मुख्य अभियंता व आयोजन समितीचे कार्याध्यक्ष श्री. धर्मराज पेठकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी व आयोजन समितीचे सचिव श्री. श्रीकृष्ण वायदंडे तसेच विविध समित्या पुढाकार घेत आहेत.

नामदेव शास्त्रींनी माफी मागावी; अन्यथा राज्यभर आंदोलन करणार

ऐसे कैसे झाले भोंदू |कर्म करोनी म्हणती साधू ||
अंगा लावूनिया राख |डोळे झाकोनी करती पाप ||
दावी वैराग्याचा कळा |भोगी विषयाचा सोहळा ||
तुका म्हणे सांगो |जळो तयाची संगती ||

राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीची मागणी; धनंजय मुंडेंची पाठराखण केल्याने वारकरी संप्रदाय आक्रमक

पुणे: संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी, वाल्मिक कराड गँगशी संबंध आदी मुद्यांवरून अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणे दुर्दैवी आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गुन्हेगारीचे समर्थन करणारी भूमिका मांडली असून, याचा आम्ही निषेध करतो. याप्रकरणी नामदेव शास्त्री यांनी त्वरित वारकरी संप्रदायाची माफी मागावी; अन्यथा शास्त्री यांच्याविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीने सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हभप विठ्ठल आबा मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शास्त्री यांच्या भूमिकेचा निषेध करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. पुणे जिल्हा अध्यक्ष हभप समाधान महाराज देशमुख, राज्य उपाध्यक्ष मुबारकभाई शेख, राज्य युवासंपर्कप्रमुख हभप सुरज महाराज लवटे, आळंदी शहर अध्यक्ष हभप दत्तात्रेय महाराज साबळे, मुस्लिम संत विभागाचे संपर्कप्रमुख राजूभाई इनामदार, जिल्हा संघटक हभप आकाश महाराज जगताप, पुरंदर तालुका अध्यक्ष हभप तुकाराम पवार, सुपा प्रांत अध्यक्ष हनुमंत चांदगुडे, उपाध्यक्ष ऋषिकेश गाडेकर, बारामती तालुका अध्यक्ष रामचंद्र चांदगुडे, इंदापूर तालुका अध्यक्ष हभप दत्ता अर्जुन आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे नामदेव शास्त्रींना सवाल…

नामदेव शास्त्री बुवा उत्तर देणार का?

  • ज्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली त्यांची मानसिकता तशी का बनली हे देखील पाहिले पाहिजे.. म्हणजे शास्त्री बुवा तुम्ही हत्येचे समर्थन करता का?
  • शास्त्री बुवांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचे उघड समर्थन केले, मग आरोपी फरार असताना शास्त्री बुवांनी त्यांना छुपा आश्रय होता का याची चौकशी का होऊ नये?
  • दोन तास धनंजय मुंडेंशी चर्चा करून त्यांची मानसिकता समजून घेतली आणि दुःख झाले, तर संतोष देशमुख यांच्या परिवाराची मानसिकता काय असेल याचे उत्तर बुवा देणार का?
  • धनंजय मुंडे गुन्हेगार नाही म्हणता, तर हार्वेस्टर घोटाळा, कृषी साहित्य घोटाळा, राख घोटाळा, वीमा घोटाळा, वाळूमाफिया, खंडणी वसुलने, जमिनी बळकावणे, गुन्हेगारी टोळी बनवणे, व्यभिचार करणे हे सदगृहस्थाचे लक्षण आहे?
  • धनंजय मुंडेंमध्ये संत दिसत असेल तर भगवानगडाचे महंतपद त्यांना देणार का?
  • शास्त्री बुवा खुनी, भ्रष्टाचारी, खंडणीखोरांसाठी धावून आले, याचा अर्थ खंडणीतील वाट त्यांना मिळाला असे का समजू नये.
  • दोन समाजाला समोरासमोर लढा असे सांगणे भगवानगडाच्या महंताला शोभते का?
  • धनंजय मुंडेंची पार्श्ववभूमी गुन्हेगारीची नाही तर बीडमध्ये गुन्हेगारांची टोळी करून त्यांना बळ कोणी दिले?
  • गावातील दलित बांधवांची बाजू घेऊन सरपंचांनी मध्यस्ती केली म्हणून हत्या केली. या न्यायाने हत्या झाल्यावर कोणते पाऊल उचलणे शास्त्री बुवांना अपेक्षित आहे?
  • शास्त्री बुवा, पीडितांना न्याय देणे संस्कृती आणि गुन्हेगारांची पाठराखण करणे विकृती आहे. या न्यायाने तुमची मानसिकता विकृत नाही का?
  • धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन आकाची पाठराखण केली. राज्यातील गरजवंत मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून लढा देत आहे. त्यावर मत व्यक्त करावे असे वाटले नाही का?
  • संतोष देशमुख यांची हत्या करणारे धनंजय मुंडेचे निकटवर्तीय आहेत. धनंजय मुंडेचा इतिहास पाहता मंत्रीपदावर असताना त्यांचा तपासामध्ये हस्तक्षेप होऊ शकतो. त्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा या मागणीत काय गैर आहे?
  • धनंजय मुंडे सलाईन लावल्या हाताने भेटायला आले म्हणून हळहळ वाटली. मनोज जरांगे पाटील प्राणांतिक उपोषण करतात, संतोष देशमुख यांना हालहाल करून मारले तेव्हा तुमच्या पाषाण काळजाला वेदना का झाल्या नाहीत?

विधानसभा निवडणुकीत शिर्डीत बोगस मतदान:एकाच इमारतीत 7 हजार मतदार, राहुल गांधींनी लोकसभेत केला दावा

नवी दिल्ली- कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेत बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील शिर्डी येथील नवीन मतदारांचा प्रश्न उपस्थित केला आहे.

राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जितके 5 वर्षात मतदार जोडले गेले नाहीत तितके शेवटच्या 5 महिन्यात जोडले गेले, असे म्हणत राहुल गांधी यांनी शिर्डी येथील नवीन मतदारांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, शिर्डीच्या एका इमारतीमध्ये 7 हजार नवमतदार वाढले. मी कुठला आरोप करत नाही परंतु काही ना काही संशयास्पद आहे हे दिसत आहे. हिमाचल प्रदेशातील लोकसंख्येइतके मतदार नव्याने समाविष्ट होतात. आम्ही निवडणूक आयोगाकडे लोकसभा मतदार यादी, नाव आणि पत्ते मागितले आहेत. नवे मतदार बहुतांश अशा मतदारसंघात वाढले आहेत जिथे भाजप पराभूत झाली होती. हा डेटा आमच्याकडे आहे. तसेच निवडणूक आयुक्तांची निवड पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांच्या कमिटीने करायची होती. सरन्यायाधीशांना कमिटीमधून का हटवण्यात आले?, असा सवाल देखील राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिर्डीमधील मुद्दा जो उपस्थित केला आहे, हा प्रकार शिर्डी मतदारसंघातील लोणी येथील मतदार केंद्रावरील आहे. शिर्डी मंतदारसंघाच्या कॉंग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे या त्यांच्या सहकाऱ्यांसह लोणीतील मतदार केंद्रावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी तिथे एका तरुणीची विचारपूस केली. तुम्ही कुठल्या आहात असे विचारले असता तरुणीने पीएमसी असे उत्तर दिले. तिच्या उत्तरावर पीएमसी गावाचे नाही, असे घोगरे म्हटल्यानंतर तरुणीने लोणी असे उत्तर दिले. लोणी खुर्द की ब्रुदूक? असे प्रश्न घोगरेंच्या सहकाऱ्याने विचारल्याने तरुणी भांबावून गेली. त्यानंतर तुम्ही नेमक्या कुठच्या? असे घोगरेंनी विचारल्यानंतर, त्यावर धुळे असे उत्तर तरुणीने दिले. तुम्ही धुळ्याच्या आहात, तर मग इकडे मतदान कसे? इथे कॉलेजला आहे का? कोणत्या कॉलेजला? असे अनेक प्रश्न विचारल्याने तरुणी आणखीच गोंधळून गेली.

असेच अनेक तरुण तरुणींनी या मतदान केंद्रावर बोगस मतदान केल्याचे उघडकीस आले होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटूळ यांच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असल्याचे या तरुणीने माहिती दिली होती. मात्र, जेव्हा या तरुणीला ओळखपत्रासह इतर कागदपात्रांबद्दल विचारणा केली असता या तरुणीने मतदान केंद्रावरून काढता पाय घेतला होता.

6 वाजेनंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ द्या:हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

मुंबई-विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 6 वाजेनंतर झालेल्या मतदानाच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला नोटीस दिली. सायंकाळी 6 वाजेनंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ देण्याचे आदेश या नोटीसमध्ये दिले आहे. तसेच या नोटीसीला 2 आठवड्यात उत्तर द्यावे, असेही मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे.

मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर संध्याकाळी सहा वाजल्यानंतर 76 लाख मतदान झाल्याचे दिसत आहे. जर एवढे मतदान झाले असेल तर संध्याकाळनंतर प्रत्येक बुथवर किती मतदारांना टोकन वाटले याची आकडेवारी आणि व्हिडीओ क्लीप द्या, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांच्यासह विरोधी पक्षाने केली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्याला नोटीस बजावण्यात आली.

छत्रपती पुरस्कार आणि खेळाडूंच्या 5% आरक्षण यादीत रोलबॉल च्या समावेशासाठी प्रयत्न करणार – ना. चंद्रकांतदादा पाटील

पुणे:रोल बॉल या खेळाला महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे परंतु हा खेळ छत्रपती पुरस्कार यादी मध्ये नाही तसेच ५% आरक्षण यादीमध्ये देखील या खेळाचा समावेश नाही, ह्या दोन्ही गोष्टी घडाव्यात या साठी मी प्रयत्न करणार आहे असे ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले.तसेच बाणेर येथील रोल बॉल स्टेडीयमला कवर/शेड करून देण्यासाठी देखील मी प्रयत्न करेन म्हणजे खेळाडूंना उन्हाळ्यात आणि पावसाळा दरम्यान सरावासाठी काही अडचण येणार नाही आणि ते चांगली पदकं जिंकू शकतील असेही ना. चंद्रकांतदादा म्हणाले.
आज रोलबॉल ह्या खेळाच्या बावीसाव्या वर्धापनदिना निमित्त मा.ना.चंद्रकांत दादा पाटील,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते अंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते. यावेळी ह्या खेळाचे जनक राजू दाभाडे सर, रोलबॉल असोसिएशन चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप खर्डेकर, पुणे जिल्हा अध्यक्ष गजानन थरकुडे, जिल्हा रोल बॉल संघटना उत्कर्ष तरटे- मेजर भारतीय सैन्यदल, जनक टेकाळे माजी क्रीडा सहसंचालक, श्रीमती चैत्राली दहिवाल मुख्य कार्यकारी संचालक,इंफ्राटेक कंपनी यांची प्रमुख उपस्थिती होती व मोठ्या प्रमाणावर खेळाडू व प्रशिक्षक उपस्थित होते.
पुण्यातील तरुण स्केटिंग प्रशिक्षक राजू दाभाडे यांनी ह्या खेळाची निर्मिती केली आणि आज हा खेळ जागतिक स्तरावर पोहोचला आहे याचा अभिमान वाटतो असे संदीप खर्डेकर म्हणाले. हा खेळ सातासमुद्रापार पोहोचला असून लवकरच याचा समावेश ऑलम्पिक मध्ये होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही संदीप खर्डेकर म्हणाले.यावेळी राजू दाभाडे सर यांचा ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ह्या खेळाच्या प्रगतीमुळे मी भारावून गेलो असून ना. चंद्रकांतदादा पाटील हे आमचे पालक असून ते जी मदत करत आहेत त्याबद्दल आम्ही सर्वजण कृतज्ञ असल्याचे राजू दाभाडे म्हणाले.
दोन फेब्रुवारी हा रोल बॉल ह्या खेळाचा वर्धापन दिन !! हा दिवस संपूर्ण जगा मध्ये रोल बॉल दिन म्हणून साजरा करण्यात येतो.आपल्या पुण्यामध्ये २१ व्या शतकामध्ये तयार झालेला रोल बॉल हा खेळ गेल्या बावीस वर्षामध्ये जागतिक स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय प्रगती करीत आहे.ह्या खेळाच्या आज पर्यंत ६ जागतिक स्पर्धा झाल्या आहेत त्यातील चार स्पर्धा भारताने जिकल्या आहेत तर चार एशियन स्पर्धा झाल्या आहेत. यातील चारही स्पर्धा भारताने जिंकल्या आहेत. रोल बॉल च्या ८० खेळाडूंना केंद्र शासनाच्या मध्यमातून नोकरी मिळाली आहे. स्पोर्ट्स कोटा मधून मेडिकल, इंजिनिअरिंग, इ. माध्यमामध्ये खेळाडूना प्रवेश देखील मिळत आहे.
या मध्ये प्रामुख्याने एशियन रोल बॉल स्पर्धा भारताने जिकली त्यातील पुण्यातील खेळाडूंचा मोठा वाटा होता या पुण्यातील मधुसूदन रत्नपारखी, वेदांत घुगे, रोहन दाभाडे, महेश उभे, सुहानी सिंग, श्रुती बघट, प्राची फराटे. कोरिया, इंडोनेशिया येथील आईस स्केटिंग सी ट्रॉफी विजेते खेळाडू आरव पटवर्धन, अद्वय कोठारी, श्सिद्धांत मांडेगे, येश जामदार. खेलो इंडिया विंटर गेम्स २०२५ लेह इथे झालेल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या पुरुषांमध्ये सुमित तापकीर, व्योम सावंत, इशान दारव्हेकर, अथर्व परदेशी, पृथ्वीराज विनोद, महिलांमध्ये स्वरूपा कड-देशमुख, अन्वयी देशपांडे, यशस्वी पाटील, कुहू विद्वांस, रिया गायकवाड, निरजा लुबल या खेळाडूंचा तसेच इतर राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

सन्मानित करण्यात आलेले इतर खेळाडू

14 मिनी राष्ट्रीय रोल बॉल चॅम्पियनशिप दिसपूर आसाम महाराष्ट्र संघातील विजयी खेळाडू ओवी सागर पवार, प्रज्ञा वडवेराव, सिमरन चुग, तनिषा ठोंबरे
16 वी ज्युनियर राष्ट्रीय रोल बॉल चॅम्पियनशिप रिज स्कूल कुर्नूल आंध्रप्रदेश विजयी खेळाडू प्रज्ञा मारणे, प्रांजल जाधव, अनन्या गायके
फेडरेशन कप, शिलाँग, मेघालय विजयी खेळाडू मधुसूदन रत्नपारखी, शौर्यराज माथवाड, सिद्धांत ढोबळे, वेदांत घुगे, आर्यन काजळेपाटील, निलेश शिंदे
पश्चिम विभाग राष्ट्रीय रोल बॉल चॅम्पियनशिप छत्रपती शाहू क्रीडा संकुल, सातारा विजयी खेळाडू अनया भिंगे, हृतिका व्यवहारे, दिव्या कापसे, सिमरन अझीझ, कृष्णा अग्रवाल, श्रेया भिरूड, श्रेया भंडारी.

राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ठेकेदारीचे कामे करू नयेत, अन्यथा हकालपट्टी-अजित पवार

शिरष्णे (ता.बारामती)-ठेकेदार राजकारणातून पदाधिकारी झाल्याने जनतेमध्ये चीड निर्माण होते, अर्थातच त्यामुळे पक्ष प्रमुख म्हणून आम्ही जनतेच्या त्या प्रचंड रोषाचे धनी होतो. याशिवाय अधिकाऱ्यांनाही सरकारी कामे दर्जेदार करण्यास अडथळा निर्माण होतो.हा दुहेरी तोटा आता मला सहन होत नाही.मी आठ वेळा आमदार झालो, यापुढे मी कसाही आमदार म्हणून सभागृहात जाईल, परंतु ठेकेदार लोकांना राजकारणाचे दरवाजे बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अशी नवीन राजकीय भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरष्णे (ता.बारामती) येथील शेतकरी मेळाव्यात जाहीर केली. यावेळी उपस्थितांनी मात्र एकच टाळ्यांचा कडकडाट करीत पवारांच्या भूमिकेला पाटींबा दिला.

शिरष्णे (ता.बारामती) येथे श्री स्वामी समर्थ सहकारी दूध उत्पादक संस्थेने नव्याने दूध बल्क कुलरची उभारणी केली आहे. त्या कामी संस्थेचे प्रमुख संतोष जाधव यांनी पुढाकार घेतला होता. या कुलरच्या उद्धाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते. बारामतीसह राज्यात ठेकेदार राजकारणातून पदाधिकारी होण्यासाठी इच्छुक असतात. ही संख्या मोठी होत चालली आहे. अर्थात हे लोकांना आवडत नसल्याचे लोकसभा आणि विधासभा निवडणूत प्रखरशाने जाणवले, असे सांगून पवार म्हणाले,“ ज्यांना राजकारण अथवा कार्यकर्ता व्यहाचे आहे, त्यांनी ठेकेदार क्षेत्रात यायचे नाही.तसे झाल्यास नवीन आणि गावपातळीवर चांगले पक्षाचे काम करणाऱ्या चेहर्‍यांना संधी मिळेल. परिणामी अधिकाऱ्यांनाही दर्जेदार काम करणे सोईचे होईल. जनतेमध्येही राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाची प्रतिमा उंचविण्यास मदत होईल.“ राष्ट्रवादीच्या बुथ कमीटीमध्ये ज्या सदस्यांनी चांगले काम केले, त्यांच्या मताचा अधिकाधिक विकास प्रक्रियेत विचार केला जाईल, असे पवार यांनी जाहिर केले.

श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

:- पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून 9.12 कोटी रुपयांची फसवणूक
सोनीपत(हरियाणा)-बॉलीवूड अभिनेते श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांच्याविरोधात लखनौ, यूपीमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांशिवाय गोमती नगर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये आणखी 5 जणांची नावे आहेत. या सर्वांनी पत सहकारी संस्थेच्या 45 गुंतवणूकदारांची 9.12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या सर्वांनी पीडितांना 6 वर्षात दुप्पट पैसे देण्याची ऑफर दिल्याचा आरोप आहे. कलाकारांव्यतिरिक्त, पीडित अनीस अहमदने कंपनीच्या कोअर टीम सदस्य डॉ. उत्तम सिंग राजपूत, व्यवस्थापक समीर अग्रवाल यांच्यासह एकूण 7 जणांविरुद्ध बीएनएस कलम 409 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.ही सोसायटी गेल्या सहा वर्षांपासून लोकांकडून पैसे वसूल करत होती, मात्र लोकांनी पैसे परत मागितल्यावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पळ काढला. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांनी सोसायटीच्या गुंतवणूक योजनांची वकिली केली होती आणि अभिनेता सोनू सूदने त्याच्या एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती.याआधी हरियाणामध्येही गुन्हा दाखल झाला होता. या मल्टी लेव्हल मार्केटिंग घोटाळ्यात हरियाणातील सोनीपतमध्ये बॉलिवूड कलाकारांसह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एफआयआरमध्ये आरोप करण्यात आला आहे की, 16 सप्टेंबर 2016 रोजी हरियाणा आणि लखनौसह अनेक राज्यांमध्ये ह्युमन वेलफेअर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीने काम करण्यास सुरुवात केली. ही संस्था मल्टी-स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी कायद्यांतर्गत काम करत होती आणि इंदूर, मध्य प्रदेश येथे नोंदणीकृत होती. संस्थेने गुंतवणूकदारांना उत्कृष्ट व्याजदराचे आमिष दाखवले. गुंतवणूकदारांना आरडी आणि एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची ऑफर देण्यात आली.

‘कीर्तने अँड पंडित’ संस्थेतर्फे ‘रन फॉर द रिपब्लिक’ मॅरेथॉन

पुणे : ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कीर्तने अँड पंडित संस्थेच्या वतीने ‘रन फॉर द रिपब्लिक’ मॅरेथॉन २०२५ चे नुकतेच आयोजन केले होते. कर्वे रस्त्यावरील कीर्तने अँड पंडित संस्था, दशभुजा गणपती, करिष्मा सोसायटी चौक, कर्वे रोडने कर्वे पुतळा, शिवाजी महाराज चौक, कर्वे रोडने पुन्हा कीर्तने अँड पंडित या मार्गाने ही मॅरेथॉन झाली. तीन किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये संस्थेतील सर्व पदाधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

कीर्तने अँड पंडितचे सीए मिलिंद लिमये, सीए पराग पानसरे आदी उपस्थित होते. बाबू बावधने, यश दाते, श्रवण बिश्नोई व धैवत आपटे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाने, तर इतर सर्व सहभागींना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. स्नेहा पाटोळे व सहकाऱ्यांनी मॅरेथॉनचे यशस्वी संयोजन केले.

सीए मिलिंद लिमये म्हणाले, “लोकशाही उत्सव साजरा करण्यासाठी व सर्वांमधील एकात्मता जपण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘रन फॉर रिपब्लिक’ मॅरेथॉनचे आयोजन केले होते. संस्थेतर्फे दरवर्षी आजच्या दिवशी सामाजिक उपक्रम आयोजित केला जातो. यापूर्वीही ‘मेरा तिरंगा मेरा अभिमान’ ध्वज संकलन मोहीम, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम राबविण्यात येतात.”

विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समितीच्या अध्यक्षपदीप्रा. भारती जाधव, सचिवपदी प्रा. सायली गोसावी

पुणे: गौतम बुद्ध, भगवान महावीर आणि संत कबीर या महामानवांच्या मूल्यविचारांच्या अभ्यासक प्रा. भारती जाधव यांची विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समितीच्या अध्यक्षपदी, तर औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्रा. सायली गोसावी यांची सचिवपदी निवड करण्यात आल्याची माहिती विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.
स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांबरोबरच मानवता आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी समितीच्या वतीने विविध स्वरूपाचे कार्यक्रम आणि उपक्रम राबविले जातात, असे रोकडे यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. संजय गायकवाड आणि प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी प्रा. जाधव व प्रा. गोसावी यांचे अभिनंदन केले.

भगिनींच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’

पुणे: “देशभरात महिला अत्याचाराच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ होत आहे. राज्य व राष्ट्रीय महिला आयोग, कौटुंबिक न्यायालयात लाखो तक्रारी प्रलंबित आहेत. ५०-६० टक्के तक्रारी कौटुंबिक वादाच्या असून, या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने देशभर ‘महिला आयोग आपल्या दारी’ अभियान हाती घेतले आहे. विभागवार सुनावण्या घेऊन या तक्रारींचे निराकरण केले जात आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. दिव्यांगांप्रमाणे ‘अभया’लाही सन्मान देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन रहाटकर यांनी दिले. 

वंचित विकास व उदयकाळ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अभया अभियानांतर्गत आयोजित दोन दिवसीय ‘अभया’ राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी विजया रहाटकर बोलत होत्या. लोहगाव येथील नीहार आनंदनिवासमध्ये आयोजित परिषदेत वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, कार्यवाह व संचालक मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, मीनाक्षी नवले, देवयानी गोंगले, रंजना चव्हाण, आणि उदयकाळ फाउंडेशनचे बाळकृष्ण बागुल, मयूर बागुल आदी उपस्थित होते. महाराष्ट्रातील एकल महिलांवर काम करणाऱ्या विविध जिल्ह्यातील ५० सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.
विजया रहाटकर म्हणाल्या, “भारतीय कुटुंबपद्धती समाजव्यवस्थेचा आदर्श होता. मात्र, अलीकडच्या काळात विभक्त कुटुंबपद्धतीने समाजात अस्थिरता वाढली आहे. महिला एकाकी पडत आहेत. महिला घरदार सांभाळून घेत असते. मात्र, तिच्यावर वेळ येते, तेव्हा परिस्थिती, जवळची माणसे कठोर होतात. असंख्य अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. मान, सन्मान व स्वतःच्या हक्कांसाठी झगडावे लागते. महिला सन्मान व संरक्षणासाठी कायदे आहेत. तरीही अत्याचाराच्या घटना थांबत नाहीत. समाज म्हणून आपण भान जपायला हवे. मनातून आणि डोक्यातून एकल महिला ही कल्पना काढून टाकली आणि त्यांना अभय संबोधले, त्यांना आपल्यात सामावून घेतले, तर त्यांचे एकाकीपण दूर होण्यास निश्चित मदत होईल.”
“अभया ही सक्षम असते, तिला आधाराची, सकारात्मक मानसिकता देण्याची गरज असते. प्रेम, स्नेह व आपलेपणा तिला या संघर्षात ऊर्जादायी ठरतात. त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांची भूमिका ही ‘कॅटॅलीस्ट’सारखी आहे. समाजाचा स्वीकार आणि सकारात्मक भावना विकसित करण्यात संस्थांनी पुढाकार घ्यावा. महिला आयोग म्हणून अभयाच्या समग्र विकासासाठी काही शिफारशींवर आमचे काम सुरु आहे. येत्या काळात या शिफारसी केंद्र सरकारकडे देऊ. तसेच ही चळवळ देशातील इतर राज्यांमध्ये घेऊन जाण्यात महिला आयोग पुढाकार घेईल,” असा शब्द विजया रहाटकर यांनी दिला.
प्रास्ताविकात मीना कुर्लेकर म्हणाल्या, “नरेंद्र मोदी सरकारचे धोरण स्त्रियांना सन्मान देणारे आहे. त्यांचे सक्षमीकरण करणारे आहे. एकल महिलांच्या प्रश्नाची गंभीरता महिला आयोगाच्या माध्यमातून केंद्र शासनापर्यंत पोहोचवावी. अभया ही चळवळ देशपातळीवर घेऊन जाण्यात विजयाताई पुढाकार घेतील, असा विश्वास वाटतो.”
एकल महिलांचे प्रश्न व सामाजिक संस्थेची जबाबदारी, तसेच कामात येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी परिषदेमध्ये विविध चर्चासत्रे आयोजिली होती. आर्थिक साक्षरतेवर स्वाती दुधाले, एकल महिलांचे भावनिक व मानसिक व्यवस्थापनावर डॉ. सागर पाठक यांनी मार्गदर्शन केले. शासकीय योजना व सामाजिक संस्थांना संधी याविषयीची माहिती शासकीय प्रतिनिधींनी दिली.

एक दुर्मिळ स्कल बेस ट्यूमर काढण्यासाठी शहरातील सर्जन्सनी केली आठ तासांची शस्त्रक्रिया

 63-वर्षीय रुग्णाला श्रवणशक्ती परत मिळवून दिली

·         ज्युपिटर हॉस्पिटल येथील अनुभवी ENT सर्जन्सनी केलेल्या या प्रक्रियेत चेहऱ्याच्या मज्जातंतूंसह महत्त्वाच्या संरचना जपण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक विच्छेदन करणे आवश्यक होते

पुणे,एका अत्यंत आव्हानात्मक ENT शस्त्रक्रियेच्या प्रकरणात शहरातील अत्यंत अनुभवी सर्जन्सनी 8 तासांची अत्यंत गुंतगुंतीची शस्त्रक्रिया करून एक दुर्मिळ स्कल बेस ट्यूमर काढला आणि एका 63 वर्षीय रुग्णाची श्रवणशक्ती त्याला परत मिळवून दिली. हा रुग्ण पल्सेटाइल टिनायटसने पीडित होता, ज्यामध्ये कानात निरंतर एक आवाज येतो, जो नाडीच्या ठोक्यांशी जुळणारा असतो; तसेच कानात जड-जड वाटते. कानात वाजणाऱ्या या ठोक्यांमुळे रुग्णाची स्थिती शस्त्रक्रियेपूर्वी अत्यंत क्लेशदायक होती.

अशी आरोग्य स्थिती असलेल्या रुग्णाला ज्युपिटर हॉस्पिटल, पुणे येथे दाखल करण्यात आले होते. MRI आणि CT स्कॅनमध्ये दिसून आले की, त्याच्या जग्युलर फोरामेनमध्ये 4.5 सेंमी आकाराचा एक दुर्मिळ ट्यूमर होता, जो कानाच्या मध्यापासून मानेच्या वरील भागापर्यंत पसरला होता. त्या ट्यूमरचे आकारमान आणि स्थान पाहता, हे प्रकरण ज्युपिटर हॉस्पिटलमधील अत्यंत कुशल ENT सर्जन्सकडे पाठवणियात आले. ही शस्त्रक्रिया डॉ. (क) इंदरदीप सिंह यांनी केली, तर डॉ. दुष्यंत खेडीकर यांनी त्यांना साहाय्य केले. या प्रक्रियेत चेहऱ्याच्या मज्जातंतूंसह महत्त्वाच्या संरचना जपण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक विच्छेदन करणे आवश्यक होते तसेच ट्यूमर संपूर्णपणे काढून टाकणे देखील तितकेच महत्त्वाचे होते. विस्तारित हायपोटिम्पेनम दृष्टिकोनासह चेहऱ्याच्या मज्जातंतूच्या वर आणि खालील बाह्य बोनी कॅनल हटविण्यात आली.

हे शस्त्रक्रियेचे प्रकरण आव्हानात्मक आणि तितकेच आगळेवेगळेही होते, मूलतः ट्यूमरच्या गुंतागुंतीच्या रचनेमुळे आणि त्याच्या नाजुक स्थानामुळे.

या प्रकरणाच्या जटिलतेची पुष्टी करत डॉ. (कर्नल) इंदरदीप सिंह म्हणाले, “जग्युलर फोरामेनमध्ये वाढलेला हा ट्यूमर कानाच्या मध्यापासून मानेच्या खालील भागापर्यंत पसरला होता. त्यामुळे त्याच्या शस्त्रक्रियेसाठी बारकाईने आयोजन आणि अंमलबजावणी दोन्ही आवश्यक होते. या भागात क्रॅनियल नसा आणि प्रमुख रक्तवाहिन्यांसहित महत्त्वाच्या रचना गच्च भरलेल्या असतात. हा ट्यूमर चेहऱ्याच्या मज्जातंतूच्या आणि 12 व्या क्रॅनियल नसेच्या अत्यंत जवळ असल्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान नसांना नुकसान होण्याचा मोठा धोका असतो. शिवाय, ट्यूमरमध्येही खूप रक्तवाहिन्या असल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान रक्तस्राव होण्याचा मोठा धोका होता त्यामुळे या समस्त प्रक्रियेदरम्यान रक्तस्राव व्यवस्थापन ही एक चिंतेची बाब होती.”

या प्रक्रियेसाठी विविध शाखांच्या तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. ENT सर्जन्सनी शस्त्रक्रियेचे नेतृत्व केले. काही अनपेक्षित गुंतागुंत उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी एक कार्डिओथोरॅसिस व्हास्क्युलर सर्जन होता. शस्त्रक्रिया करणाऱ्या टीमने दुहेरी दृष्टिकोन अंगिकारला. ट्यूमरपर्यंत पोहोचण्यासाठी आणि तो काढून टाकण्यासाठी एकाचवेळी कानाच्या मध्यातून आणि मास्टॉइडमधून विच्छेदन केले.

या शस्त्रक्रियेतील वेगळेपण त्यात करण्यात आलेल्या टेकनिक्सच्या नावीन्यपूर्ण वापरात होते, ज्याच्यामुळे रक्त देण्याची गरज न पडता ट्यूमर संपूर्णपणे काढून टाकता आला.

डॉ. सिंह म्हणाले, “रक्तस्राव नियंत्रित करण्यासाठी आम्ही ट्यूमर कॅप्सूलसह मायक्रो  बायपोलर कॉटरीचा उपयोग केला. शिवाय, प्रक्रियेदरम्यान आम्ही आंतरिक जग्युलर नस आणि सिग्मॉईड साइनस बंद केले, ज्यामुळे रक्तस्राव आणखीन कमी झाला.”

ते पुढे म्हणाले, “या शस्त्रक्रियेचा एक अत्यंत समाधानकारक परिणाम हा होता की कानात ठोक्यांचा आवाज येणे आणि कान जड वाटणे यांसारखी रुग्णाची लक्षणे तत्काळ अदृश्य झाली. ट्यूमर संपूर्णपणे काढून टाकताना आम्ही रुग्णाची श्रवणशक्ती वाचवू शकलो याचा आम्हाला विशेष अभिमान वाटतो.”

या प्रकरणातून नेमकेपणा आणि टीमवर्क यांचे महत्त्व अधोरेखित झाले. महत्त्वाच्या संरचनांना धक्का न लावता, गुंतागुंत टाळून सर्जन्सनी कोणतीही न्यूरोलॉजिकल हानी होऊ न देता उत्कृष्ट परिणाम साधले. रुग्णाला त्याची श्रवणशक्ती परत मिळाल्याबद्दल त्या रुग्णाच्या कुटुंबियांनी ENT सर्जन्स आणि ज्युपिटर हॉस्पिटल, पुण्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

मेट्रो स्थानकामध्ये मातृशक्ती स्तनपान कक्षाची सुविधा

0

जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकातील ‘मातृशक्ती नर्सिंग पॉड’ चे लोकार्पण....

राज्यमंत्री मेघना दिपक साकोरे – बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, प्रतिनिधी – सध्या पुणे मेट्रोने दैनंदिन प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये वाढ होत आहे. महिलांबरोबर त्यांची लहान मुले देखील प्रवास करीत असतात. बऱ्याच वेळेला स्तनपान देणाऱ्या मातांना प्रवासादरम्यान आपल्या बाळाला स्तनपान देण्यासाठी किंवा बाळाचे कपडे बदलण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही, अश्या वेळी महिलांना अनेक प्रकारच्या समस्या भेडसावत. अश्या मातांसाठी पुणे मेट्रोने आता ‘मातृशक्ती नर्सिंग पॉड’ म्हणजेच स्तनपान कक्ष सुरु केले आहेत. इवोलेंट हेल्थ इंटरनॅशनल प्रा. लि यांच्या विद्यमाने सीएसआर उपक्रमांतर्गत सोशल थम फाऊंडेशनच्या सहयोगाने पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक येथे ‘मातृशक्ती नर्सिंग पॉडचे’ लोकार्पण सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना दिपक साकोरे – बोर्डीकर यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी पुणे मेट्रोचे संचालक (कार्य) अतुल गाडगीळ, महाव्यवस्थापक कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर-पाटील, सोशल थंबच्या संस्थापिका अनुश्री जवंजाळ तसेच फाउंडेशनचे पवन पटेल, अमृता उबाळे, अमोल करंबे, ध्यानगुरू रघुनाथजी येमूल, इवोलेंट हेल्थ इंटरनॅशनल प्रा. लि आणि मेट्रोचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

“लहान बाळांसह प्रवास करणाऱ्या मातांसाठी मेट्रोसारखी सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक समावेशक बनविण्यासाठी हि एक सुरुवात आहे. पुणे मेट्रो स्थानकांवर मातृशक्ती आता उपलब्ध झाल्यामुळे अनेक महिलांचे आयुष्य अधिक सुलभ होईल, याचा मला अतिशय आनंद आहे,” असे सोशल थंबच्या संस्थापिका अनुश्री जवंजाळ यांनी सांगितले.