Home Blog Page 420

१७६८ बुलेट मॉडिफाय सायलेन्सरवर फिरवला बुलडोझर

सायलेन्सर विक्री करणाऱ्या व बसविणाऱ्या गॅरेज मालकांवरही कारवाई करणार

पुणे शहर वाहतूक शाखेकडुन बुलेट मॉडिफाय सायलेन्सर च्या कर्कष आवाजाच्या बाईक सायलेन्सर वर सर्जिकल स्ट्राईक करून “बुलेट सायलेन्सर विशेष मोहिमे” अंतर्गत सुमारे १७६८ बुलेट मॉडिफाय सायलेन्सरवर बुलडोझर फिरवला आहे.
पोलीस आयुक्त, श्री अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशाने व सह पोलीस आयुक्तरंजनकुमार शर्मा व अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटिल यांचे मार्गदर्शनाखाली पुणे शहर वाहतूक शाखेकडुन बुलेट मॉडिफाय सायलेन्सर च्या कर्कष आवाजावर सर्जिकल स्ट्राईक करून “बुलेट सायलेन्सर विशेष मोहिमे” अंतर्गत कारवाई केलेल्या १७६८ मॉडिफाय सायलेन्सर जप्त करून त्यावर रोड रोलर फिरविण्यात आला आहे.
पुणे शहरातील बेशिस्त नागरिकांकडुन वाहतूकीचे नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकारांमध्ये बुलेट, दुचाकी वाहनास असलेल्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून अथवा नवीन मॉडीफाय केलेला सायलेन्सर बसवुन सार्वजनिक रस्त्यावर, रहिवाशी भागात दिवसा / रात्री कर्कश आवाज करत भरधाव वेगाने बुलेट चालवून लोकांचे लक्ष वेधुन घेण्याचे प्रकार तरूणांमध्ये वाढत असल्याने त्यामुळे या कर्कश आवाजाने जेष्ठ नागरिक, महिला, शांतताप्रिय नागरिकांना त्रास होत होता. याबाबतच्या अनेक तक्रारी नागरिंकाकडुन प्राप्त झाल्याने अशा बेकायदेशीर सायलेन्सर बसविलेल्या दुचाकी वाहनांवर कठोर कारवाई करण्याबाबत सुचना मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दिल्या होत्या त्यानुसार वाहतूक शाखेकडील सर्व विभागांकडुन मोहिम राबविण्यात आली होती. तसेच बुलेट सायलेन्सर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असुन सायलेन्सर विक्री करणाऱ्या व बसविणाऱ्या गॅरेज मालिकांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

विधिमंडळात लक्षवेधी लावण्याची धमकी देऊन उकळली जाते खंडणी :आमदार परिणय फुकेंच्या आरोपाने खळबळ; ऑडिओ क्लिप देखील सादर

या ऑडिओ क्लिपची फॉरेनसिक लॅबचा रिपोर्ट हातात येत नाही, तोपर्यंत सभागृहात कोणाचेही नाव न घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार फुके यांना केल्या आहेत. या आधी देखील लक्षवेधी लावण्याच्या संदर्भात पैशाची देवाण-घेवाण झाली असल्याचा आरोप झाले आहेत. मात्र आता या ऑडिओ क्लिप मुळे पुन्हा एकदा या विषयाची जोरदार चर्चा रंगली आहे. विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांचे एजंट आर्थिक व्यवहार करत असल्याचा खळबळजनक आरोप या माध्यमातून भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केला आहे.

मुंबई-गडचिरोली जिल्ह्यातील काही राईस मिल धारकरांवर राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या चुकांबाबत कारवाई झाली होती. तशाच कारवाया परत करण्याची धमकी देऊन सभागृहात लक्षवेधी लावून आम्ही तुमच्यावर कारवाई करू, आम्ही तुमची राईस मिल बंद करू, तुम्हाला जेलमध्ये टाकू, अशा प्रकारच्या धमक्या राईस मिल धारकांना दिल्या जात असल्याचा आरोप विधान परिषदेतील भाजप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. इतकेच नाही तर आमदार फुके यांनी याबाबत एजंट सोबत झालेल्या कॉलची ऑडिओ क्लिप देखील विधिमंडळात सादर केली. आता परिणय फुके यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.भाजप आमदार परिणय फुके यांनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिप मध्ये प्रश्न का लावायचा नाही? लावल्यानंतर काय होणार? अशा धमक्या या ऑडिओ क्लिप मध्ये देण्यात आल्या आहेत. विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंट कडून पैशांचा व्यवहार होत असल्याचा आरोप या माध्यमातून करण्यात आला आहे. विरोधी पक्षातील आमदार आणि त्यांचे सात ते आठ जवळचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र यात या संपूर्ण प्रकाराची चौकशी व्हावी, यासाठी या ऑडिओ क्लिप मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आल्या असल्याचे आमदार फुके यांनी सांगितले. या ऑडिओ क्लिपची फॉरेनची चौकशी झाल्यानंतरच पोलिस कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले आहे, अशी माहिती फुके यांनी दिली.

सरकारची जागा,सरकारचेच अब्जावधी रुपये अन शिवसृष्टी पाहायला ६०० रुपयांचे तिकीट: अबब किती लुटमार ?

पुणे- महापालिकेची शिवसृष्टी चांदणी चौकात होऊ दिली नाही त्या ऐवजी सुरुवातीलाच करोडो रुपये देऊन आणि २१ एकराचा मोठा भूखंड शिवसृष्टीला मोठ्या मानाने सरकरने दिला , त्यानंतरही येथील कामकाजासाठी सरकारने कोरोडो रुपयांची माया खळखळतीच ठेवली, अजिबात नाही तर मुक्त हस्ताने उधळण केली आणि आता हि शिवसृष्टी पाहायला तब्बल ६०० रुपयांचे तिकीट लावले जात आहे काय आहे हे ? किती लुटमार ? आणि एवढे तिकीट ठेवले तर पाहायला जाणारा वर्ग कुठला असेल ? असे सवाल करत स्वराज्य पक्षाचे आशिष भोसले यांनी राज्य सरकार, महापालिका यांच्या सहित शिवसृष्टी चालविणाऱ्या मंडळावर टीकेचा भडीमार केला आहे.

आशिष भोसले म्हणाले कि,’1995 साली महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचे युती सरकार आले. या सरकारने प्रतिष्ठानला नर्‍हे आंबेगाव (बु.) येथे 21 एकर जमीन दिली. शिवसृष्टीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्यासाठी सुमारे 50 कोटी रुपये खर्च झाले आहेत असे सांगण्यात येते .शिवसृष्टीतून खूप मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपाचा रोजगार उपलब्ध होणार,.जेव्हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे ‘मेगा टूरिझम प्रोजेक्ट’ सादर केला, तेव्हा किमान 300 लोकांना रोजगार उपलब्ध होईल हा एक निकष होता. तो पूर्ण होईल. त्याचप्रमाणे आसपासच्या परिसरात हॉटेल्स, लॉज, रिक्षा, टॅक्सी इत्यादींनाही व्यवसाय उपलब्ध होईल. शिवसृष्टी पूर्णपणे आकाराला येईल, तेव्हा प्रत्येक दालनाला स्वतंत्र व्यवस्थापन, तंत्रज्ञ असेल. ती गरज लक्षात घेऊन पुढील काळात आम्ही प्रशिक्षित व्यक्तींचा शोध घेऊ असे व्यवस्थापनाने सरकार ला सांगितले. 2006च्या विजयादशमीला या शिवसृष्टीचे भूमिपूजन झाले आणि 2007च्या वर्षप्रतिपदेला प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली.  मागे सरकारनं या प्रकल्पाला मेगा प्रोजेक्ट म्हणून मान्यता देत ३०० कोटींची गुंतवणूक करायची घोषणा केलीय. दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी अर्थसंकल्पात सुद्धा 50 कोटींची तरतूद केली आहे अनेक उद्योजक,राजकीय नेते देणगी देतात तरीही नागरिकांना शिवसृष्टी पाहण्यासाठी 600/- रुपये प्रति व्यक्ती असा दर लावला जातोय ही एक प्रकारे लूट आहे दरवेळी आंबेगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या नागरिकांना शिवसृष्टीत येणाऱ्या राजकीय नेत्यांच्या स्वागतावेळी पोलीस कर्मचारी वेठीस धरून दुकाने बंद ठेवायला भाग पाडतात, वाहने थांबवून ठेवतात, रस्त्यांवरील खड्डे बुजवून तात्पुरत्या स्वरूपात डांबरीकरण करतात म्हणजे याचा अर्थ असा का शिवसृष्टी मंडळाच्या लोकांवर सरकार आणि महानगरपालिका कार्यरत आहे.

 पुढील ५ वर्षांत ६ हजार नोकऱ्या निर्माण करण्याचे लक्ष्य

‘यूएसटी’ने पुण्यात सुरू केले एक हजार आसन क्षमतेचे नवीन कार्यालय

नवे कार्यालय ८०,००० चौरस फूट क्षेत्रफळात विस्तारलेले, १००० आसन क्षमतेचे.

· डेटा सायन्स, डेटा अभियांत्रिकी, डिझाइन, उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल अनुप्रयोगांसाठी नाविन्यपूर्ण कार्यास पुणे कार्यालयातून मिळणार चालना.

पुणे : यूएसटी या तंत्रज्ञान आणि डिजिटल परिवर्तन उपाय क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने पुण्यात नवीन कार्यालय सुरू करीत असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे कंपनीचे भारतातील जाळे अधिक मजबूत होणार आहे. या कार्यालयीन विस्तारातून पुढील ३ ते ५ वर्षांत पुण्यात सुमारे ३५०० ते ६००० नोकऱ्या निर्माण करण्याची योजना यूएसटी कंपनी आखत आहे. बालेवाडी येथे ईक्यू स्मार्टवर्क्स संकुलात स्थित असलेले हे नवीन कार्यालय ८०,००० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले असून, तेथे १०००पेक्षा जास्त आसनक्षमता आहे. हे कार्यालय पुण्यातील साई राधे कॉम्प्लेक्स येथील विद्यमान कार्यालयास पूरक ठरणार आहे.

पुण्यातील नवीन कार्यालयाचे उद्घाटन ‘यूएसटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा सुधींद्र यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्य कार्यान्वयीन अधिकारी अलेक्झांडर वर्गीस, मुख्य मूल्य अधिकारी सुनील बालाकृष्णन, यूएसटी उत्पादन अभियांत्रिकीचे प्रमुख व पुण्यातील कार्यालयाचे प्रमुख रामप्रसाद संथानगोपालन, कंपनीचे उपाध्यक्ष व टॅलेंट अॅक्विझिशन विभागाचे जागतिक प्रमुख किशोर कृष्णा, डिझाइन व एक्सपेरियन्स प्रॅक्टिस विभागाच्या उपप्रमुख स्मिता सूर्यप्रकाश, महाव्यवस्थापक शेफी अन्वर, ‘यूएसटी’चे कार्यस्थळ व्यवस्थापन व कार्यसंचालन या विभागाचे वरिष्ठ संचालक हरी कृष्णन मोहनकुमार, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि इतर सहकारी उपस्थित होते.

‘यूएसटी’च्या ‘पुणे सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये सध्या २०००हून अधिक कर्मचारी कार्यरत असून, ते डेटा सायन्स, डेटा अभियांत्रिकी, डिझाइन, उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल अनुप्रयोग यातील सखोल तज्ज्ञतेचा उपयोग करून नाविन्याला चालना देत आहेत, तसेच व्यवसायवृद्धी गतीमान करीत आहेत. फिनटेक, हेल्थकेअर व लाइफ सायन्स, रिटेल व ई-कॉमर्स, उत्पादन व ऑटोमोटिव्ह यांसारख्या उद्योगांतील आघाडीच्या जागतिक कंपन्यांना सेवा देणारे हे पुणे केंद्र यूएसटीच्या जागतिक ग्राहकांसाठी डिजिटल परिवर्तन घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

यूएसटीचे मुख्य कार्यान्वयीन अधिकारी अलेक्झांडर वर्गी म्हणाले, “पुण्यात नवीन कार्यालयाच्या उद्घाटन होणे हा भारतातील आमच्या सातत्यपूर्ण वाढीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या धोरणात्मक विस्ताराद्वारे आम्ही डिजिटल परिवर्तन क्षेत्रातील व्यवसायाच्या गरजांसह बाजारातील संधींशी जुळवून घेत आहोत आणि आमची कार्यपद्धती मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचे नियोजन करीत आहोत. एआय, डिझाइन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील आमच्या वाढत्या संघांना सहाय्य करण्यासाठी सक्षम प्रतिभावंत कर्मचाऱ्यांचा समूह उभारणे, व्यवसाय सल्लागारांची साखळी निर्माण करणे, धोरणात्मक भागीदारी करणे आणि पायाभूत सुविधांचा विस्तार यांवर आमचा भर आहे.”

यूएसटी उत्पादन अभियांत्रिकीचे अध्यक्ष आणि पुणे केंद्रप्रमुख रामप्रसाद संथानगोपालन म्हणाले, “पुणे हे भारतातील एक महत्त्वाचे आणि वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान केंद्र आहे. येथे नवीन कार्यालय उभारून यूएसटीने या भागातील वाढीतील मोठी गुंतवणूक केल्याचे दाखवून दिले आहे. एआय, अत्याधुनिक डिझाइन आणि अत्याधुनिक अभियांत्रिकी या क्षेत्रांत गुंतवणूक केल्याने आमच्या क्षमता अधिक बळकट होतील आणि पुणे केंद्र हे नाविन्यता आणि डिजिटल उत्कृष्टता यांसाठीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून समोर येईल. आमच्या तज्ज्ञ संघाच्या सखोल डोमेन ज्ञानामुळे आम्ही जागतिक आस्थापन ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणावर डिजिटल परिवर्तन प्रकल्प यशस्वीपणे राबवू आणि नाविन्याच्या अग्रस्थानी राहू, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”

पुढील तीन वर्षांत यूएसटी भारतातील आपल्या कार्यालयांमध्ये आसनक्षमता आणि कर्मचारी संख्या यामध्ये सातत्यपूर्ण वाढ साध्य करणार आहे. आगामी तीन ते पाच वर्षांत आपल्या व्यवसायाच्या गरजा आणि डिजिटल परिवर्तन, एआय यांमधील बाजारातील संधी ध्यानात घेऊन कंपनी आपली कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढविणार आहे. व्यवसाय सल्लागार क्षेत्रातील भक्कम संधी निर्माण करण्यावर, मोठा प्रतिभा समूह विकसित करण्यावर आणि धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करण्यावर यूएसटी लक्ष केंद्रित करीत आहे.

‘यूएसटी’ने भारतभर आपली उपस्थिती सातत्याने वाढवत जागतिक डिजिटल परिवर्तन आणि तंत्रज्ञान सेवांमध्ये आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. मागील वर्षी कंपनीने बंगळुरूमध्ये दुसरे कार्यालय आणि एक डिझाइन एक्सपीरियन्स सेंटर सुरू केले. तसेच, केरळमधील कोची येथे आपल्या दुसऱ्या स्वतंत्र कॅम्पसची पायाभरणी केली. त्या ठिकाणी पुढील पाच वर्षांत ३,००० नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट कंपनीने बाळगले आहे. या भागातील वाढ आणि गुंतवणूक यांविषयीची कंपनीची बांधिलकी यावरून दिसून येते. ‘यूएसटी’ने हैदराबादमधील इंटरनॅशनल टेक पार्क येथे अत्याधुनिक कार्यालयाचे उद्घाटन २०२३ मध्ये केले. उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधन आणि विकास हे काम या कार्यालयात होते.

कॅलिफोर्नियामध्ये मुख्यालय असलेली यूएसटी ही १९९९ मध्ये स्थापन झालेली कंपनी असून, भारतातील तिचे मुख्यालय तिरुअनंतपुरम येथे आहे. बंगळुरू, तिरुअनंतपुरम, हैदराबाद, कोची, पुणे, मुंबई, चेन्नई, कोयंबतूर, दिल्ली एनसीआर, अहमदाबाद आणि होसूर यांसारख्या प्रमुख ठिकाणी तिची कार्यालये आहेत. सध्या भारतात २०,००० हून अधिक कर्मचारी ‘यूएसटी’सोबत कार्यरत आहेत.

२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर अभिनेते सचिन खेडेकर

चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटकात दिसणार मुख्य भूमिकेत

एखादा कलाकार कितीही मोठा झाला, कितीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले, मसालापटांपासून चरित्रपटांपर्यंत आभाळाएवढ्या उंचीच्या व्यक्तिरेखा साकारल्या तरी रंगभूमीची ओढ कधीच संपत नाही. कोणताही हाडाचा कलाकार ठराविक वेळेनंतर पुन्हा तो रंगभूमीकडे वळतो, इथे होणाऱ्या तिसऱ्या घंटेसोबत व्यक्तिरेखेत शिरतो, प्रयोगांमागून प्रयोग करत त्यातच रमतो आणि  जिवंत कला पाहण्याचा अनुभव रसिकांना देताना स्वत:लाही धन्य मानू लागतो. चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकरही याला अपवाद नाहीत. मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे सचिन खेडेकर तब्बल २१ वर्षांनी पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीकडे वळले आहेत.

‘गेट वेल SOON!’, ‘हॅम्लेट’, ‘हसवा फसवी’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगान्त’, ‘संज्या छाया’, ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’, ‘चारचौघी’, ‘आज्जी बाई जोरात’ आदी मराठी व्यावसायिक रंगभूमी गाजवणाऱ्या दर्जेदार नाटकांची परंपरा जपणाऱ्या जिगिषा आणि अष्टविनायक या निर्मिती संस्थांनी पुन्हा एकदा नवीन नाट्यकृतीचे शिवधनुष्य उचलले आहे. आयुष्यात प्रत्येकाच्याच वाट्याला एक ‘भूमिका’ येते. भूमिका जगण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी कलावंतच असण्याची गरज नसते… असे म्हणत जिगिषा अष्टविनायक एक नवीन नाटक घेऊन येत आहेत. चंद्रकांत कुलकर्णी सादरकर्ते असलेल्या ‘भूमिका’ या नाटकाद्वारे सचिन खेडेकर रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत. अभिनेते  सचिन खेडेकर  यांनी आजवर दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर मराठीत चित्रपट, मालिका, नाटक या  तीनही माध्यमांत आपला ठसा उमटवला असून, सोबत हिंदी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम चित्रपट तसेच वेब सीरिजमध्येही त्यांच्या अनेक भूमिका  लक्षवेधी  ठरल्या आहेत. 

आता आगामी ‘भूमिका‘ या नाटकात ते कोणत्या रूपात रसिकांच्या भेटीला येतात याची उत्सुकता आहे. या नाटकातील सचिन खेडेकर यांच्या व्यक्तिरेखेबाबतची माहिती सध्या तरी गुलदस्त्यातच आहे. त्याचप्रमाणे नाटकातील इतर कलाकार आणि तंत्रज्ञ कोण असणार ? याची माहितीसुद्धा लवकरच उलगडली जाणार आहे. क्षितीज पटवर्धन यांनी या नाटकाचे लेखन केले असून, चंद्रकांत कुलकर्णी या नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत. सध्या नाटकाची जोरदार तालीम सुरू असून, याच महिन्यात हे नाटक रंगभूमीवर येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

२८ किलो गांजा मुंढव्यात पकडला

पुणे -पुणे पोलिसांनी एकूण १६लाख ८० हजार रुपये किंमतीचा २८ किलो गांजा मुंढवा पोलीस ठाणे हद्दीत पकडला . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’
दि.११/०३/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व स्टाफ असे मुंढवा पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना मिळालेले बातमीवरुन मुंढवा कोरेगांव पार्क रोडने शहा यांचा मोकळा प्लॉट, मुंढवा पुणे येथे इसम नामे १) प्रमोद सुधाकर कांबळे, वय ४४ वर्षे रा किल्ला वेस, करमाळा सोलापुर पुणे २) विशाल दत्ता पारखे वय ४१ वर्षे रा प्लॅट नं ६, मोहन नगर, आदित्य सोसा. विश्रांतवाडी पुणे यांच्या ताब्यात एकुण १६,८०,०००/- रु.कि. चा गांजा हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द मुंढवा पोस्टें गु.र.नं. ७७/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही पोलीस आयुक्तअमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २, राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार आझाद पाटील, मयुर सुर्यवंशी, संदिप जाधव, संदिप शेळके, योगेश मांढरे, युवराज कांबळे, चेतन गायकवाड, रविंद्र रोकडे, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर यांनी केली.

जातीयवादाच्या आणि गुन्हेगारी प्रवृत्ती विरोधात होळी

पुणे-वंदे मातरम संघटनेच्या वतीने गेल्या १५ वर्षांपासून जात, धर्म, पंथ भेदभाव न करता भारतीय एकात्मतेची होळी साजरी केली जाते.स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमधील अमानुष घटनेच्या निषेधार्थ आणि दत्ता गाडेला फाशी व संतोष देशमुख यांना न्याय मिळावा तसेच त्यांच्या हत्येतील वाल्मीक कराड व सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी. या मागण्यांसाठी होळी दहन करण्यात आले.

या आंदोलनात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, वंदे मातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जामगे, पुणे शहर अध्यक्ष अमोल जगताप, कार्याध्यक्ष मोहित काकडे, समन्वयक महेश बाटले, आयटी सेल अध्यक्ष विशाल शिंदे तसेच राज घाटे, प्रसाद कुलकर्णी, ऋषभ देशपांडे, हेमंत कुंभार, किरण केकाने, आदित्य मुंगळे, आकाश जामगे, तुषार गिरी यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ही होळी महिलांच्या व शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते दहन करून समाजात सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला.

अनुप सोनी क्राइम पेट्रोलमध्ये परतला: 26 हत्यांचे प्रकरण खिळवून ठेवणार

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन वरील सर्वात लोकप्रिय क्राइम शो पैकी एक क्राइम पेट्रोल पुन्हा सुरु होणार आहे. या नव्या सीझनमध्ये 26 अत्यंत गुंतागुंतीच्या आणि चित्तथरारक हत्या प्रकरण प्रेक्षकांना
खिळवून ठेवतील. ज्यांचे प्रभावी सूत्रसंचलन या कार्यक्रमाशी एकरुप झाले आहे, ते या कार्यक्रमाचे
निवेदक म्हणून पुन्हा पपरतले आहेत. ते त्यांच्या विशेष शैलीद्वारे प्रेक्षकांना गंभीर प्रकरणाबद्दल माहिती देतील, ज्यामुळे विश्वासार्हता व गांभीर्य दिसून येईल.

प्रत्येक प्रकरण जसजसे हळू हळू पुढे जाईल, तसतसा क्राइम पेट्रोलचा नवीन सिझन प्रत्येक वळणावर एक प्रश्न विचारतो- ‘आखीर खून किसने किया?’ वास्तविक जीवनातील घटनांवर आधारीत या घटना अत्यंत गुंतागुंतीच्या तपासात प्रेक्षकांना खोलवर घेऊन जातात. यातून भयंकर गुन्ह्यांचे धक्कादायक सत्य आणि त्यामागील गुन्हेदारांचा पर्दाफाश होईल.
कार्यक्रमात पुन्हा येण्याबद्दल अनुप सोनी यांनी उत्सुकता व्यक्त केली. ते म्हणाले, “क्राइम पेट्रोल ही मालिका त्याच्या आकर्षक कथनामुळे प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम बनला आहे. कार्यक्रमातील खूनांचे रहस्य अधिक गूढ आहे, त्यामुळे नवीन सीझन प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे वचन देतो, खऱ्या आयुष्यातील घटनांवर आधारीत असा यातील प्रत्येक भाग अत्यंत गुंतागुंतीच्या हत्या प्रकरणांची उकल करून खऱ्या गुन्हेगाराचा पर्दाफाश करतो. या गुंतागुंतीच्या तपासांत प्रेक्षकांना घेऊन जाणारा सूत्रसंचालक म्हणून मी परत आलो आहे, याचा माला खूप आनंद झाला आहे. नव्या प्रोमोने आधीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि प्रेक्षकांना हा कार्यक्रम आवडेल, अशी मला खात्री आहे. ”

100 हून अधिक CCTV तपासून दोन चोरट्यांनी चोरलेल्या 53 मोटारसायकली जप्त

पुणे-पिंपरी पाेलीस ठाण्याचे हद्दीत मेट्राे स्टेशन व इतर ठिकाणी वारंवार हाेणारे माेटार सायकल चाेरीच्या गुन्हया संर्दभात पाेलीसांनी अज्ञात माेटार सायकल चाेरटयांचा शाेध घेऊन माेटारसायकल चाेरांचा शाेध सुरु केला हाेता. त्यानुसार पिंपरी चिंचवड व पुणे शहर हद्दीतील १०० ते १५० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत तांत्रिक विश्लेषण आधारे आराेपींचा माग काडून दाेन आराेपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून २६ लाख १० हजार रुपये किंमतीच्या ५३ माेटारसायकल जप्ती करण्यात आल्या आहे. पिंपरी चिंचवड पाेलीस आयुक्तालय व आयुक्तालयाबाहेरील एकूण ३५ वाहनचाेरीचे गुन्हे उघडकीस आल्याची माहिती परिमंडळ एकच्या पाेलीस उपायुक्त स्वप्ना गाेरे यांनी दिली आहे.
धीरज प्रदीप सावंत (वय-२३,रा. नऱ्हेगाव,पुणे), बालाजी ऊर्फ तात्यासाहेब भाेसले (२४,रा. शाहुपुरी, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. पिंपरी पाेलीस ठांण्याचे वपाेनि अशाेक कडलग यांचे मार्गदर्शनाखाली सपाेनि दिंगबर अतिग्रे यांचे पथक माेटारसायकल चाेरीच्या गुन्हयाचे घटनास्थळापासून माेटारसायकल चाेरी करुन घेऊन आराेपी गेलेल्या मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सुरुवात केली. पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील विविध सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत तपासणी करत असताना, पाेलीस अंमलदार एस जानराव यांना त्यांचे खबऱ्याकडून माहिती मिळाली की, माेरवाडी मेट्राेस्टेशन पिंपरी येथील माेटारसायकल पार्क केलेल्या ठिकाणी एक संशयित व्यक्ती फिरत अाहे. त्याप्रमाणे पिंपरी पाेलीसांचे पथक तातडीने सदर ठिकाणी जाऊन त्यांनी आराेपीचा शाेध घेऊन त्यास सापळा रचून ताब्यात घेत चाैकशी केली.
त्यावेळी आराेपीने वाहनचाेरीचे गुन्हे साथीदार साेबत केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्या ताब्यातून एकूण ५३ माेटारसायकल पाेलीसांना मिळून आल्या आहे. आराेपींनी पिंपरी चिंचवड शहरात वाहनचाेरीचे २५ गुन्हे, पुणे शहरात चार गुन्हे, काेल्हापूर मध्ये दाेन गुन्हे तर सातारा मध्ये चार गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

औरंगजेबाची कबर नष्ट करा:एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची संसदेत मागणी

नवी दिल्ली- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी छत्रपती संभाजीनगर लगतच्या खुलताबाद येथील मोगल बादशहा औरंगजेब यांची कबर नष्ट करण्याची मागणी केली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात एएसआने संरक्षित केलेल्या देशातील 3,691 स्मारक व कबरींपैकी 25 टक्के कबरी व स्मारके ही देशाच्या संस्कृतीविरोधात काम करणाऱ्या मोगल व ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या असल्याचे ते म्हणालेत.खासदार नरेश म्हस्के लोकसभेत बोलताना खुलताबाद येथील मोगल बादशहा औरंगजेब यांची कबर नष्ट करण्याची मागणी केली. सभागृहाच्या शून्य प्रहरात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. शिवसेना खासदार नरेश म्हस्के सभागृहात म्हणाले की, “औरंगजेबासारख्या क्रूर व्यक्तीची कबर संरक्षित करण्याची काहीच गरज नाही. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) द्वारा संरक्षित 3,691 स्मारके आणि कबरींपैकी 25 टक्के मुघल आणि ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या आहेत, ज्यांनी देशाच्या संस्कृती आणि परंपरांच्या विरोधात काम केले.”

नरेश म्हस्के पुढे म्हणाले की, औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली व लुटली. औरंगजेबाने शिखांच्या नवव्या आणि दहाव्या गुरूंचीही हत्याकेली. त्याची कबर खुलताबादमध्ये आहे. ती ASI ने संरक्षित केली आहे. औरंगजेबासारख्या क्रूर व्यक्तीची कबर जतन करण्याची काय गरज आहे? औरंगजेबासह भारताविरोधात काम करणाऱ्या सर्वांची स्मारके नष्ट करावीत.

अमली पदार्थाची माहिती देणाऱ्यास बक्षिसाची ना. चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा-ड्रग्ज मुक्त युवा पिढीसाठी कोथरुडकरांचा शंखनाद

अमली पदार्थ विक्रेत्यांना पुण्यात थारा नाही- ना. पाटील

झिरो टॉलरन्स हेच पुणे पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी धोरण- उपायुक्त निखील पिंगळे

पुणे-ड्रग्जमुक्त युवा पिढीसाठी मंगळवारी शिवाजी रायगड स्मारक मंडळ, अंकुर प्रतिष्ठान, शिवश्री प्रतिष्ठान, अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषद, अग्रेसर भारत आदी संघटनांच्या वतीने कोथरुड मधील हुतात्मा राजगुरू चौक येथे निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये कोथरुडकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन अमली पदार्थ विरोधात शंखनाद केला. यामध्ये दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी अमली पदार्थ विरोधी लढा तीव्र करण्यासाठी अमली पदार्थ विक्रीची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस देण्याची घोषणा केली. तसेच, व्यसनाधीन व्यक्तींना यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरु करण्याची घोषणा केली. तसेच, झिरो टॉलरन्स हेच पुणे पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी धोरण असल्याची भूमिका पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी यावेळी मांडली.

यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोथरुड मधील नागरिकांनी एकत्रित येऊन सुरू केलेल्या अमली पदार्थ विरोधी चळवळीत सामान्य नागरिक म्हणून सहभागी झालो आहे. सांगली सारख्या जिल्ह्यातही अमली पदार्थांचे साठे जप्त होत आहेत. त्यामुळे सांगलीचा पालकमंत्री नात्याने विविध उपाययोजना केल्या आहेत. पोलीस विभागास अंमली पदार्थांबाबत खात्रीशीर, ठोस आणि अचूक माहिती पुरविल्यास त्यास वैयक्तिकरीत्या रक्कम रूपये १० हजारांचे बक्षीस दिले जात आहे. कोथरुड मध्येही अमली पदार्थांची माहिती पोलीस प्रशासनास देऊन सहकार्य करणाऱ्यास बक्षीस देऊ, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

अमली पदार्थ विक्रेत्यांना पुण्यात थारा मिळू देणार नाही, असा स्पष्ट इशारा देऊन ते पुढे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना, डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी मला प्रचंड रोषाचा सामना करावा लागला होता. पण मी कुठेही मागे हटलो नाही, अशी आठवण त्यांनी करुन दिली. तसेच, व्यसनाधीन व्यक्तींना त्यातून बाहेर काढण्यासाठी लोकसहभागातून कोथरुड मध्ये समुपदेशन केंद्र सुरू करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

यावेळी पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी अमली पदार्थ ही आपल्या तरुण पिढीला उद्ध्वस्त करत आहे. त्यामुळे झिरो टॉलरन्स हेच पुणे पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी धोरण असल्याचे स्पष्ट केले. यावेळी उपस्थित सर्वांनी अमली पदार्थ विरोधासाठी शपथ देखील घेतली.

स्व.यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण केले,याच विचारांची सध्या महाराष्ट्राला गरज

-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र समृद्ध करतानाच सुसंस्कृत राजकारण केले, त्याच विचाराने आणि मार्गाने जाण्याची सद्यस्थितीत गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज (बुधवारी) स्व.चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात बोलताना केले.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सोशल मिडिया विभाग यांच्या वतीने स्व.यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त मंडईतील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी जलसिंचन, शेती, उद्योग, पायाभूत सुविधा याची चांगली पायाभरणी महाराष्ट्रात केली आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी विविध समाजाच्या आणि विचारांच्या कार्यकर्त्यांना एकत्र केले. काँग्रेस पक्ष मजबूत केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनीही पक्ष वाढीसाठी स्व.चव्हाण साहेबांच्या मार्गाने जाऊन मजबुतीने उभे राहिले पाहिजे. प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याची ती जबाबदारी आहे, असे आवाहन माजी आमदार मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना केले.

या प्रसंगी बाळासाहेब अमराळे, प्रविण करपे, भोला वांजळे, चेतन अगरवाल, गौरव बालंदे, धनंजय भिलारे, साहिल राऊत, गोविंद वांजळे आदी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडियाचे सरचिटणीस सुरेश कांबळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

४०० केव्ही वाहिन्यांना अंडर व्होल्टेजचा धोका;ग्रामीण भागात विजेचे अर्धा तास भारनियमन

पुणेदि. १२ मार्च २०२५: विजेची मागणी वाढल्यामुळे महाराष्ट्र व गुजरात राज्यातील ४०० केव्ही पारेषण वीजवाहिन्यांचे व्होल्टेज बुधवारी (दि. १२) दुपारी २.४७ वाजता कमी (अंडर व्होल्टेज) झाले. त्यामुळे इतर ४०० केव्ही ग्रीडचा वीजपुरवठा बंद पडण्याचा धोका टाळण्यासाठी एलटीएस (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाली. यात २५६ मेगावॅटची तूट निर्माण झाल्यामुळे प्रामुख्याने मंचर, राजगुरुनगर, मुळशी तसेच रास्तापेठ विभागातील सुमारे २ लाख १२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा २५ ते ३० मिनिटांपर्यंत बंद ठेवावा लागला.

४०० केव्ही वीजवाहिन्यांचे व्होल्टेज ३७५ ते ३६५ केव्हीपर्यंत आल्याने विजेची आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अंडर व्होल्टेजमुळे भार व्यवस्थापनासाठी एलटीएस (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाली. यात महापारेषण कंपनीच्या काठापूरथेऊरफुरसुंगीमरकळसणसवाडीपिंपळगाव व कुरुळी या २२० केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला.

मात्र महावितरणमहापारेषण व महानिर्मिती कंपन्यांनी युद्धपातळीवर केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे पुणे परिमंडलामध्ये अर्धा तासात विजेची आपत्कालिन परिस्थिती नियंत्रणात आली. यासाठी महानिर्मितीने कोयना जलविद्युत प्रकल्पाद्वारे विजेची जादा निर्मिती केली. तर महावितरण व महापारेषणने संयुक्तपणे विजेचे भारव्यवस्थापन केले. 

पारेषणमधील २५६ मेगावॅट विजेची तूट भरून काढण्यासाठी नाईलाजाने वीजपुरवठा २५ ते ३० मिनिटांपर्यंत बंद ठेवण्यात आला. यात मंचर विभागातील मंचर शहरपिंपरखेडनिरगुडसरकाठापूरलोणीपेठराजगुरुनगर विभाग अंतर्गत आळंदी शहरगोळेगावपिंपळगावमरकळधानोरेसोलूकेळगावशेलपिंपळगावकळूसभोसेबहूलवडगाव आणि मुळशी विभाग अंतर्गत वाघोलीकेसनंदआव्हाळवाडीपेरणेथेऊरवडतीकुंजीरवाडीलोणी काळभोरसोरतापवाडीफुरसुंगीउरुळी देवाची तसेच रास्तापेठ विभागातील कोंढवा व एनआयबीएम परिसर येथील सुमारे २ लाख १२ हजार ग्राहकांचा समावेश होता.  

सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये हिना खान आणि रॉकीच्या लग्नाच्या केटरिंगसाठी एक चविष्ट लढाई

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये हिना खान आणि रॉकी जयस्वाल
किचनमध्ये आल्याने एक आनंददायी वळण मिळण्यासाठी येथील स्टेज सज्ज झाले आहे. ही
जोडी त्यांच्या लग्नासाठी एक परिपूर्ण केटरिंग सेवा निवडण्याच्या विशेष मिशनसाठी या मालिकेत
सहभागी झाले आहे. जज रणवीर ब्रार म्हणतात, “मेनू तयार करण्याची ही खूप मोठी संधी आहे.”
मात्र अर्थातच लग्नाप्रमाणे लडकीवाले आणि लडकेवाले यांच्यात मजेदार स्पर्धा रंगणार आहे.
कारण ते त्यांच्या पाककलेच्या कौशल्याने जोडप्याला प्रभावित करण्यासाठी स्पर्धा लावतील.
 टीम लडकीवाले यांच्यात फैसल शेख, तेजस्वी प्रकाश, अर्चना गौतम, गौरव खन्ना यांचा
समावेश असून ते सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी तयार आहेत. तर राजीव अदतिया, उषा नाडकर्णी,
निक्की तांबोळी आणि दीपिका कक्कर यांचा समावेश असलेली लडकेवाली टीम स्वयंपाकघरात
मसालेदार पदार्थ करण्यासाठी सज्ज आहे. प्रेम, हास्य आणि भरपूर मसालेदार पदार्थांनी युक्त
अशा एका रुचकर मनोरंजक एपिसोडसाठी तयार व्हा- कोण जिंकणार, लडकीवाले की लडकेवाले?
हा प्रश्न गंभीर आहे.
या चॅलेंजदरम्यान हिना आणि रॉकीने त्यांच्या हृदयस्पर्शी प्रेमकथेबद्दल सांगितले. हिना
म्हणाली, “खूप वर्षांपूर्वी माझ्या पहिल्या शोच्या सेटवर मी त्याला भेटले होते. तो दुसऱ्या
कुणाच्या जागी सुपरवायझिंग प्रोड्युसर म्हणून आला होता. मी त्याला भेटलेही नव्हते, पण मला
ते आवडलं नव्हतं. मी खूप पूर्वग्रहदूषित होते. पण तो खूप चार्मिंग आहे, त्याच्या कामाच्या
पद्धतीने मी प्रभावित झाले. कामातूनच आमचं नातं वाढत गेलं. खूप काळ आम्ही चांगले मितर्
होतो.” रॉकी हसत म्हणाला, “मला वाटतं आमच्यात प्रेमाआधी आदर आला. हीना ही खूप
समर्पित आणि प्रतिभावान आहे. पण मला तिचे गुण आवडले. आम्ही दररोज एकमेकांना
भेटायचो, अनेक दिवस मित्र होतो. पण एके दिवशी आम्ही एकमेकांना मिठी मारून भेटलो, तेव्हा
हे काहीतरी वेगळं असल्याची जाणीव झाली. ” हिना पुढे म्हणाली, “तेव्हा आम्हाला समजलं की
ती आता मैत्री राहिली नाही.” परस्परांबद्दल आदर आणि गहिऱ्या नातेसंबंधातून अनपेक्षितपणे

प्रेम कसे फुलू शकते, हे यांच्या कथेवरून कळते. हीना खान आणि रॉकी जयस्वाल यांना परफेक्ट
केटरिंग सेवा मिळेल का? सेलिब्रिटी शेफ या आव्हानाला सामोरे जातील का? हे सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता,

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी टेलिव्हिजन वर…पाहता येणार आहे

हेमा मालिनी म्हणाल्या.. ‘अमिताभ, शत्रुघ्न यांसारख्याबरोबर ‘नसीब’ चित्रपट स्वीकारताना घाबरले होते..’

 
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 15 एक धमाकेदार होळी स्पेशल एपिसोड
घेऊन येत आहे. ज्यात दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी स्पेशल जज म्हणून उपस्थित राहतील.
या विशेष पाहुण्यांसह उत्सवात जज श्रेया घोषाल, विशाल दादलानी आणि बादशाह, सूत्रसंचालक
अभिजीत सावंत आणि मियांग चांग यांचाही समावेश आहे. संगीत, नॉस्टॅल्जिया आणि
अविस्मरणीय क्षणांचे आनंददायी मिश्रण या भागात असेल. या एपिसोडमध्ये आयडॉल की बसंती
उर्फ रितिका, मेरे नसीब मे या गाण्याचे हृदयद्रावक सादरीकरण करेल. हे गाणे एपिसोडचे प्रमुख
लक्षवेधी ठरेल. तिची नाट्यमय अभिव्यक्ती आणि गाण्याने प्रभावित होऊन श्रेया घोषाल प्रेमाने
म्हणते, ती गाण्यातले नाट्य खूप चांगल्या प्रकारे पकडते, त्यामुळे मी तिला ड्रामा क्वीन म्हणते, या सादरणीकरणाद्वारे एक नॉस्टॅल्जिक प्रवास सुरु होतो. कारण यानिमित्ताने बादशाह हेमा
मालिनी यांना स्टार-स्टड चित्रपट नसीबमध्ये भूमिका करण्याच्या अनुभवाविषयी प्रश्न विचारतो. 
हेमा मालिनी यांनी मल्टी स्टार कास्टिंग असलेल्या या चित्रपटात सहभागी होण्यासाठी सुरुवातीला
संकोचले होते हे मान्य केले. त्या म्हणाल्या, ‘त्यांनी माझ्यासाठी मल्टी स्टार कास्टचा चित्रपट
साइन केला तेव्हा मी घाबरले. हा सिनेमा एका वर्षात पूर्ण करण्याचे टार्टेट होते. पण सगळेच
कलाकार बिझी होते. अमित जी, ऋषी कपूर, रीना रॉय, अमजद अली खान जी, शत्रुघ्न सिन्हा,
अगदी सहकलाकारसुद्धा बिझी होते. सगळ्यांनी एकत्र येऊन चित्रीकरण करणे खूप कठीण होते.
ताकण आम्हाला त्याचवेळी इतर अनेक चित्रपटांचे शूटिंग सुरु होते. त्यासाठी आम्हाला खूप
प्रवासही करावा लागत होता. पण आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम केले. निर्माते आणि
त्यांच्या टीमचे खूप खूप आभार.. मला वाटतं एका वर्षात आम्ही चित्रपट पूर्णही केला.’

या इव्हिनिंग नॉस्टॅल्जियात भर टाकताना मियांग चांग याने फरदीन खानने हेमा जी आणि
फिरोज खान जी यांच्याबद्दल पूर्वी शेअर केलेली एक हृदयस्पर्शी गोष्ट शेअर केली. या
प्रसंगाबद्दल सांगण्यास उद्युक्त केले. त्या म्हणाल्या, हा प्रसंग क्या खूब लगती हो, बडी सुंदर
दिखती हो, या गाण्यादरम्यान घडले. फिरोज खान जी खूप भावनिक चित्रपट निर्माते होते.

गाण्याच्या शेवटच्या सीनच्या वेळी मागील बाजूला लोक हसत होते. त्यामुळे त्यांना राग आला
आणि रागाने काहीतरी लाथाडले. त्यांना नंतर कळले की तो माझा मेकअप बॉक्स होता. त्या गंमतीने पुढे म्हणाल्या, त्यानंतर दोन दिवस पिन-ड्रॉप सायलेन्स होता. कारण सगळेच घाबरले
होते. ते माझे आहे, हे समजल्यानंतर त्यांनी माफी मागितली. क्लासिक परफॉर्मन्स, नॉस्टॅल्जिक प्रसंग आणि होळीच्या रंगांची उधळण असलेला इंडियन
आयडॉल 15 एपिसोड ‘सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन’ आणि ‘सोनी लिव्ह’ वर शनिवारी
आणि रविवारी रात्री 8.30 वाजता प्रदर्शित होणार आहे