छत्रपतींचा आशीर्वाद , चला देवू मोदींना साथ या भाजपच्या जाहिरातीची खिल्ली आज उद्धव ठाकरे यांनी उडविली
… अरे दिली होती तुम्हाला साथ , पण तुम्ही लाथ दिली , छत्रपतींचा आशीर्वाद मागता आहात त्याच छत्रपतींची शिकवण आहे आम्हाला दिल्ली पुढे झुकायचे नाही म्हणून अशी पुन्हा एकदा भाजपवर टीका करीत आणि त्याबरोबर पृथ्वीराज चव्हाणांवर हि आसूड ओढीत शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र एल बी टी मुक्त करू आणि टोल मुक्त हि करू त्याबरोबर जकातीची आकारणी प्रणाली हि सुसह्य अशी करू अशी घोषणा आज बोरीवली येथे झालेल्या सभेतूनकेली
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कावर दरवर्षी जल्लोषात व उत्साहात साजरा होतो. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून येणारे लाखो शिवसैनिक विचारांचे सोने लुटतात. शिवसेनेची ही वैभवशाली परंपरा शिवसेनेच्या स्थापनेपासूनच चालत आली आहे. मात्र या वर्षी विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे यंदा दसरा मेळाव्याऐवजी शिवाजी पार्कावर शिवसेनेने केवळ शस्त्रपूजन करून दसर्याचा उत्सव साजरा केला. आणि बोरीवली येथे सभा घेतली
यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करताना ठाकरे म्हणाले , मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यावर पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत , पृथ्वीराज चव्हाण म्हणत आहेत सिंचन घोटाळा बाहेर येईल म्हणून आघाडी तोडली ,आणि अजित पवार म्हणत आहेत सहा महिन्यातील पृथ्वीराज चव्हाण यांच्या कामाची चौकशी झाली पाहिजे . आता आम्हीच सत्तेवर आल्यावर यांचा भ्रष्टाचार बाहेर काढू . जर सिंचन घोटाळ्याची फाईल चव्हाणांकडे होती तर का नाही अजित पवारांची त्यांनी ‘जयललिता ‘ केली?का पांघरून घातले या घोटाळ्यावर ? काय दोघे घोटाळ्याची रक्कम आर्धी- आर्धी वाटून घेणार होते? श्वेत पत्रिका वगैरे सारी नाटके केली यांनी … आणि चव्हाण यांनी हि सहा महिन्यात कुठे कुठे सह्या केल्या काय कामे केली ती सारी आम्ही बाहेर काढू , काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्राला लुटलंयअसेही ते म्हणाले
भाजपने २५ वर्षांची असलेली युती तोडली हे देशभरातील हिंदुत्ववादी लोकांना आवडलेले नाही . अच्छे दिन आल्यावर यांनी २५ वर्षांची साथ सोडली ते आता कोणाकोणाला घेतले बरोबर त्यांचे काय करणार ते त्यांनीच पाहावे असे ते म्हणाले
एलबीटी मुक्त आणि टोलमुक्त महाराष्ट्राची उद्धव ठाकरे यांची घोषणा
पुण्यात दहशतवादरुपी रावणाचे प्रतीकात्मक दहन
पुणे लोकमान्य फेस्टिव्हल तर्फे दुष्काळ व दहशतवाद रूपी रावणाचे दहन पुण्यातील नदीपात्रात करण्यात आले झेड ब्रीज येथिल नदिपात्र येथे हे दहन करण्यात आले फटाक्यांची आतिशबाजीत हा दिमाखदार पद्धतीत सोहळा पुण्यात रंगला पुणे जिल्ह्यात हा एकमेव ‘रावणदहणाचा हा कार्यक्रम होतो.सर्व वयोगटातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती २५ फुटी ‘रावण’ व ‘फायर शो’ हा कार्यक्रम यावेळी येथे पार पडलाया वेळी लोकमान्य फेस्टिव्हचे संस्थापक अध्यक्ष अँड़. गणेश सातपुते, उत्सव अध्यक्ष नरेश मित्तल निमंत्रक शुभांगी सातपुते संयोजक महेश महाले प्रितेश प्रभुने आदित्य सातपुते इ हजर होते
सर्वांत श्रीमंत उमेदवार भाजपचा … जो आहे भोजपुरी क्रिकेट लीगचा मालक
यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांत श्रीमंत उमेदवार म्हणून मुंबईतील भाजपचे दिंडोशीचे उमेदवार मोहित कंबोज यांचे नाव काही माध्यमांनी आज पुढे आणले आहे आहे .उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मोहित कंबोज यांनी आपली संपत्ती३५३,५३ कोटी रूपये असल्याचे म्हटले आहे हा अब्जाधिश उद्योगपती राजकारणातही सक्रिय आहे. ते भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चा विभागाचे अध्यक्ष आहेत. आता नुकतेच त्यांना भाजप मुंबईचे उपाध्यक्षपद दिले गेले आहे. बॉम्बे बुलियन असोसिएशन या मुंबईतील सराफी संघटनेचे ते अध्यक्ष आहेत आणि भोजपुरी क्रिकेट लीगचे ते मालक आहेत ते अब्जाधिश असले तरी पदवीधर मात्र नाहीत. सन२००२मध्ये ते वाराणसीहून मुंबईत आले. २००५मध्ये त्यांनी आपली ज्वेलरी कंपनी सुरू केली व आज ते अब्जाधिशांपैकी एक बनले आहेत.
जास्त शिक्षण झाले नसल्याने मोहित यांनी पहिल्यापासून व्यवसायात लक्ष घातले. मोहित यांचा मुख्य व्यवसाय रियल इस्टेट आणिर ज्वेलरी हा आहे. याशिवाय मोहित यांनी बॉलिवूड, क्रिकेट लीग, ज्वेलरी, इन्फ्रास्ट्रक्चर, हॉटेल आणि रिसोर्ट आदि क्षेत्रांत गुंतवणूक केली आहे. बॉम्बे बुलियन असोसिएशन हि सोने आणि ज्वेलरीचा व्यापार करणा-या व्यापा-यांची संघटना आहे. ही संघटना सन १९४८ मध्ये सोन्याचा व्यापार करणा-या सर्व व्यावसायिकांनी मिळून स्थापन केली होती. सध्या त्या संघटनेचे अध्यक्षपद मोहित यांच्याकडे आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर दरीत एसटी बस कोसळली -2 ठार
पुणे – मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पांगोळीजवळ साता-याहून मुंबईकडे जाणारी एसटी बस पलटून झालेल्या अपघातात 2जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये सुमारे ३० ते ४० प्रवासी असल्याचे अपघातातील जखमींनी सांगितले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
चालू बस रस्त्याच्या खाली उतरल्याने अचनाक पलटी झाली आणि ५० फूट खोल दरीत कोसळली अशी माहिती बसमधील एका जखमी प्रवाशाने दिली आहे. दरम्यान, पोलिस, डॉक्टर, ५ रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. स्थानिक लोकांनी याठिकाणी मदतकार्य करण्यासही सुरुवात केली आहे. बस दरीत कोसळल्यामुळे मदतकार्यासाठी २ क्रेनही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघात झालेल्या बसचा क्रमांक MH-07 9830 असा असल्याचे समजते खंडाला पोलिस प्रशिक्षण केंद्रानजीक हि घटना घडल्याचे वृत्त आहे
धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित बुध्द विहारात जाऊन पूजन
पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, आर. पी. आय (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांची आज घोरपडी परिसरात पदयात्रा काढण्यात आली होती . घोरपडी बाजारातील आयप्पा मंदिरापासून या पदयात्रेस सुरुवात झाली . आजच्या पदयात्रेत रमेश बागवे यांनी धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित घोरपडी भागातील विकास नगर बुध्द विहारात जाऊन तथागत भगवान गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले . तसेच घोरपडी भागातील मतदारांना विजयादशमीनिमित शुभेछा दिल्या. घोरपडी बाजारातील अय्यप्पा मंदिर , घोरपडी गावमधील श्रीनाथ मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले . तर जामा मस्जिद मधील मुस्लिम बांधवांच्या नमाज पठनानंतर त्यांच्या भेटी घेतल्या . त्यानंतर घोरपडी बाजार , फैलवाली चाळ , रेल्वे गेट साईबाबा मंदिर , फिलिप्स चाळ , विकास नगर बुध्द विहार , श्रीनाथ महाराज मंदिर , मरिमाता नगर , भाजी मार्केट , जामा मस्जिद आदी भागात काढण्यात आली होती .
या पदयात्रेत पुणे कॅंटोन्मेंट ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष असिफ शेख , माजी नगरसेविका मंगला मंत्री , प्रदीप परदेशी , तुषार मंत्री , अरविंद अंगिरवाल , महेश मिश्रा , संजय वाघमारे , महावीर परदेशी , भुजंगराव मसलखांब , अक्षय राजोरे , फ्रेंकी हिरेकेरूर , सिल्वेस्टार आनंदराज , प्रविण जाधव , राजेश गायकवाड , मुकेश टिकारे , शेखर कवडे , योगेश घोडके , रुपेश गायकवाड , विजय परदेशी , अखबर बशीर खान , निलेश घोडके , प्रेम परदेशी , आरोग्यम सेल्वम हिरालाल परदेशी , बंटी पिल्ले , विजय घिया आदी कार्यकर्ते उपस्थित होते
निवडणुकीत ‘आता होऊ द्या खर्च’ चा सूर ..
निवडणुकीचे वारे जोरदार वाह्तायेत. जिंकण्याच्या इर्षेने प्रत्येक जण आश्वासनांची बरसात करताहेत. याच पाश्वभूमीवर नविन सिंग आणि राकेश आर. भोसले निर्मित ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ हा धमाकेदार मराठी चित्रपट येतोय. सर्वसामान्यांना आवडेल त्यासोबतच विचारवंतांनाही रुचेल अशा वास्तवदर्शी कथानकावर हा चित्रपट बेतला असून बाळकृष्ण शिंदे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलंय. चित्रपटाचा विषय निवडणुक आणि राजकारणावर बेतलेला असल्याने याच्या संगीतात देखील याची खास झलक पहायला मिळणार आहे. पंकज छ्ल्लानी प्रस्तुत ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ हा राजकीय व्यंगपट येत्या १० ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय; तत्पूर्वी या चित्रपटाचा शानदार संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे आणि आशिष विद्यार्थी यांच्या हस्ते ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ ची गीत ध्वनीफित प्रकाशित करण्यात आली असून यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ चित्रपटात दोन गीते असून दोन्ही गीते श्रवणीय आणि रंगतदार झाली आहेत. यातील निवडणुकीच्या पाश्वभूमीवर ‘आता होऊ दया खर्च’ ही रेश्मा सोनावणे त्यांच्या आवाजातील ठसकेदार लावणी गीत प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या वर्मावर बोट ठेवणाऱ्या या गीताचे शब्द अरविंद जगताप यांचे असून शशांक पोवार यांनी या गाण्याला अप्रतिम संगीत दिलं आहे. मराठीत प्रथमच निऑन कलर्सचा वापर करून या गीताचे सादरीकरण करण्यात आले असून प्रेक्षकांना ते पडद्यावर पाहताना त्यातील वेगळेपण जाणवेल. या सोबत ‘नटरंगी नार’ हे उर्मिला धनगर यांच्या आवाजातील गीत देखील प्रेक्षकांना ठेका धरायला लावणार आहे.
‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वल असलेल्या ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ चित्रपटात प्रेक्षकांना नारायण वाघ आणि विश्वासराव टोपे यांच्या पारंपारिक शत्रुत्वाची कथा अधिक मनोरंजकतेने पहायला मिळणार आहे. ‘सिद्धिविनायक इंटरनॅशनल फिल्म्स’ च्या या चित्रपटाचे लेखन अरविंद जगताप यांनी केले आहे. सिनेमाचे छायांकन सुरेश सुवर्णा यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन अमित बाईंग, कला दिग्दर्शन संदीप इनामके यांनी केले आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते बाबासाहेब पाटील असून वितरणाची जबाबदारी ‘पिकल एन्टरटेनमेंट’ सांभाळीत आहेत.
मकरंद अनासपुरे व सयाजी शिंदे यांच्या लक्षवेधी भूमिका असलेल्या या चित्रपटात हिंदी ज्येष्ठ अभिनेते अलोकनाथ आणि आशिष विद्यार्थी देखील विशेष भूमिकेत दिसणार आहे. ‘एस. एम. एस. इंटरटेनमेंट’ प्रस्तुत, या चित्रपटात मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे यांच्यासह डॉ. विलास उजवणे, स्वप्नील राजशेखर, सिद्धेश्वर झाडबुके, विनीत भोंडे, मेडेलीना अलेक्झांड्रा, पूर्णिमा अहिरे, रसिका वझे, ज्योती जोशी, शरद शेलार, विनोद खेडकर, उज्वला गोड या कलाकारांच्या भूमिका आहेत. १० ऑक्टोबरला ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ चित्रपटगृहात दाखल होतोय; त्यापूर्वी यातील सुरेल गीते निवडणुकीच्या रणधुमाळीत निश्चितच धमाल उडवून देणार आहेत.
उद्यापासून पंतप्रधान मोदींची तोफ धडाडणार महाराष्ट्रात
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी किमान 5 दिवस प्रचार करण्यासठी येत आहेत रोज तीन जाहीर सभा यानुसार ते राज्यात 15 सभा घेतील अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली आहे. येत्या 4 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या मोदी बीड, औरंगाबाद आणि मुंबईत जाहीर सभा घेणार आहेत. तर, 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर, गोंदिया, नाशिक येथे मोदी जाहीर सभा घेतील.
पंतप्रधान कार्यालयाने मोदी यांचे 10 दिवस प्रचारसभेसाठी दिले आहेत. त्यानुसार मोदी 5 दिवस महाराष्ट्रात व 5 दिवस हरयाणात प्रचारसभा घेतील. प्रत्येक दिवशी 3 सभा या न्यायाने मोदी महाराष्ट्र व हरयाणात प्रत्येकी 15-15 सभा घेणार आहेत. याचबरोबर गरज पडली तर आणखी सभा घेणे शक्य आहे का याबाबत चाचपणी करण्यात येणार आहे, असे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. मात्र प्रचारासाठी आजपासून केवळ 10 दिवसच उरल्याने मोदींच्या 15-15 सभाच होणार हे जवळपास निश्चित आहे. सभा वाढवायच्या झाल्यास रोज चार-चार सभा घेण्याचे नियोजन केले जाऊ शकते का ? याची हि चाचपणी होण्याची शक्यता आहे .
मोदी म्हणजे मार्केटिंग आणि प्रोजेक्शन -शरद पवार
मार्केटिंग आणि प्रोजेक्शन चे आधुनिक तंत्र नरेंद्र मोदी अवलंबत आहेत हेच तंत्र त्यांनी केंद्रात सत्ता मिळविण्यासाठी वापरले होते आणि सत्ता मिळविल्यानंतरही वापरत आहेत बाकी नवीन काही नाही ,परदेश दौऱ्यांमध्ये मनमोहनसिंग यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळत होता ते हि चांगली कामगिरी करीत परंतु त्यांनी कधी त्याचे मार्केटिंग आणि प्रोजेक्शन केले नाही . मनमोहन सिंग आणि मी असे आम्ही दोघे हि एकाच जमान्यातील राजकारणी आहोत फक्त सभा करायच्या आणि व्यासपीठावरून निघून जायचे एवढेच करीत असत . इंटरनेट सोशल मिडिया , वेब मिडिया व्हाटस अप कडे आम्ही लक्ष दिले नाही आता अन्य सर्वच पक्षातील तरुणाई हे पाहू लागली आहे असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले , आताच्या सरकारला बहुमत आहे पण . पूर्वीच्या सरकारनेच घेतलेल्या निर्णयांचा अंमल सध्या दिसतो आहे भारत सरकार कडे २ वर्षे पुरेल एवढा धान्यसाठा असल्याचे वक्तव्य केले जाते पण यांचे सरकार आले मे महिन्यात मग धान्य पेरले कधी/ आणि उगवले कधी ? असा सवाल त्यांनी केला . आजकाल मार्केटिंग आणि प्रोजेक्शन आणि संवाद याकडे लक्ष दिले पाहिजे अशाच आशयाची गरज श्री पवार यांनी प्रतिपादित केली मोदी यांनी पंतप्रधान पदी असताना महाराष्ट्रात एवढ्या जास्त संख्येने सभा घेणे यावरूनच त्यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीला दिलेले महत्व लक्षात येते असे हि ते म्हणाले.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते , यावेळी अजित पवार यांनी चालविलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरील टिके संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले , मी कधी कोणाचे नाव घेत नाही , आणि व्यक्तिगत टीका हि करीत नाही आमच्या पक्षातील सहकाऱ्यांना असाच सल्ला देईल त्यांनी व्यक्तिगत टीका टाळून विकास कार्यक्रम मांडावेत आघाडी का कशी तुटली यावरील प्रश्नावर बोलताना ते म्हणाले , ‘ सोनिया गांधी ची आघाडी व्हावी अशीच पूर्णतः सकारात्मक भूमिका होती मात्र राज्यातील त्यांच्या पक्षाच्या फळी तून प्रतिसाद मिळाला नाही आणि आयत्यावेळी जिथे १३०/ १४० जागा लढायची तयारी करीत होतो तिथे राज्याची निवडणूक स्वबळावर लढायचा निर्णय घेण्याची वेळ आली एकाच दिवस उरला होता आणि राज्यातील काँग्रेस ने ११० उमेदवारांची यादी जाहीर केली होती आणि त्यात काही मतदारसंघ आमच्या वाटेचे होते अशा परिस्थितीत आमच्यापुढे पर्याय नव्हता आम्हाला २८५ जागा लढविण्याचे आव्हान स्वीकारावे लागले सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर जनतेपुढे जात आहेत हि चांगली संधी असली तरी परिस्थिती अवघड आहे आणि आव्हानात्मक आहे असे हि ते म्हणाले आमची जी तयारी होती त्याहून दुप्पट जबाबदारी आता येवून पडली आहे पण दिवसेंदिवस
आत्मविश्वास हि वाढतो आहे आम्हाला नक्कीच बहुमत मिळेल असा विश्वास आहे
सिंचन घोटाळा हा राष्ट्रवादी विरोधात प्रचारासाठीच तयार केलेला विषय आहे ते म्हणाले १० वर्षात जिथे ३० हजार कोटी खर्च झाला त्यात ७० हजार कोटीचा घोटाळा होईलच कसा ?यासंदर्भात राज्याच्या प्रमुखांनी ‘ केवळ १ ते २ टक्के पाणी वाढले असे केलेले वक्तव्यही वस्तुस्थितीला धरून केलेले नव्हते असे ते म्हणाले .
वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले ,महाराष्ट्राच्या निर्मिती साठी शेकडोंनी प्राण दिले हे राज्य एकसंघ राहावे अशीच इच्छा राहील , पण तरीही मला वाटते हा निर्णय राजकारण्यांनी घेवू नये तो जनतेवर सोपवावा जनमत घेवून त्यावर निर्णय व्हावा , स्वतंत्र विदर्भाच्या नावाने ज्यांनी निवडणुका लढविल्या त्यांना नाही हे हि त्यांनी नमूद केले , मुंबई हे सर्वधर्मियांचे शहर आहे सर्वांचे मुंबईच्या विकासात योगदान आहे मराठी – गुजराती हा वाद वाढवून असे अंतर वाढविणे आपल्याला मान्य नाही . आमचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत एखाद्या नेत्याचा चेहरा घेवून आम्ही निवडणूक लढवू शकत नाही असे सांगून ते म्हणाले निवडून आलेल्या विधिमंडळ सदस्यांचा कल पाहून निवड करण्याची पद्धत आमच्या पक्षात आहे भुजबळ – आर आर -क्षीरसागर अनिल देशमुख – अजित पवार अशी ८ ते १० मंडळी राज्याचे नेतृत्व उत्तम प्रकारे करू शकतील अशा ताकदीचे आहेत , सुप्रिया सुळे यांचे नाव घेतले नाही कारण त्यांना केंद्रात रस आहे राज्यात नाही असेही ते म्हणाले
नारायण राणे शनिवारी पुण्यात तोफ डागणार
माजी उद्योगमंत्री आणि काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे हे शनिवारी पुणे कॅन्टोन्मेंट आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. सिंहगड रोडवर सायंकाळी सहा वाजता, तर कॅन्टोन्मेंटमध्ये सायंकाळी सात वाजता या सभा होणार आहेत.केंद्रात भाजपची सत्ता असली तरी सध्या वातावरण बदललेले आहे. मोदी लाट ओसरली असल्याने त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होणार आहे. शहरातील मतदारांची मानसिकता बदलल्याने काँग्रेसला निश्चित फायदा होणार असल्याचा दावा पुणे शहर काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष संजय बालगुडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांतील काँग्रेस आय पक्षाच्या उमेदवारांनी आज काँग्रेसभवनात संयुक्तरीत्या पत्रकार परिषद घेतली. यावेळी उमेदवारांनी सर्वच विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती वेगळी असल्याने आणि मानसिकता बदलत असल्याने आमचा विजय निश्चित असल्याचे यावेळी नमूद केले. या पत्रकार परिषदेत शहर काँग्रेस निवडणुकीच्या दृष्टीने सक्रिय झाली असून, शहरात सगळ्या मतदारसंघांत परिस्थिती वेगळी असल्याने काँग्रेसचे उमेदवार हे सर्व ठिकाणी विजयी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी नगरसेवक संजय बालगुडे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शहरातील सर्व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यात आला असून, प्रचारसाहित्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यात आले असल्याचे नमूद केले. तसेच, आगामी काळात प्रचाराची मदार आता पक्षाचे राज्य आणि देशपातळीवरील नेतेमंडळी सांभाळणार असून, प्रचारसभांचे आयोजन करण्यात येऊन काँग्रेस प्रचाराची राळ उडवून देणार असल्याचे बालगुडे यांनी नमूद केले.
महाराष्ट्राचे लचके तोडू पाहणार्या दिल्लीतील मोगलशाही सरकारला धडा शिकवा — आदित्य ठाकरे
राजगुरूनगर : स्वतंत्र विदर्भाच्या नावाखाली आणि मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे अखंड महाराष्ट्राचे लचके तोडण्याची स्वप्ने पाहणार्या दिल्लीतील मोगलशाही सरकारचे प्रयत्न हाणून पाडले जातील, असा इशारा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राजगुरुनगर येथे दिला.खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील सेनेचे अधिकृत उमेदवार सुरेश गोरे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, शिवसेनेने मित्र म्हणून ज्यांना २५ वर्षे सांभाळले, प्रसंगी सर्व सुख दु:खात साथ दिली, त्याच मित्राने केवळ स्वार्थासाठी सहकारी मित्राच्या पाठीत खंजीर खुपसला असून महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही. ही निवडणूक म्हणजे राज्याच्या स्वाभिमानाची लढाई असून भगव्याची ताकद काय आहे, ती या निवडणुकीत राज्यातील जनता दिल्लीत बसलेल्यांना दाखवून देईल. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आदित्य ठाकरे म्हणाले, युतीची बोलणी करण्यासाठी मी सेनेच्या इतर नेत्यांसमवेत भाजपच्या नेत्यांकडे गेलो होतो. परंतु चोवीस वर्षांचा हा मुलगा आमच्याशी काय बोलणी करणार? अशी भाजपच्या लोकांनी माझी संभावना केली. परंतु या निवडणुकीत युवा सेनेची ताकद काय आहे. ती तुम्हाला तरुणांच्या मतदानाच्या माध्यमातून दाखवून देतो, असे आव्हानही ठाकरे यांनी भाजपला दिले आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, या आघाडी सरकारने तीन वेळा महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केलेली आहे. परंतु या विधानसभेच्या निवडणुकीत जनता काँग्रेस व राष्ट्रवादीला गाडल्याशिवाय राहणार नाही. खासदार आढळराव म्हणाले, गेल्या दहा वर्षाच्या काळात आ. दिलीप मोहितेंच्या गुंडगिरी व दहशतीला तालुक्यातील जनता कंटाळलेली आहे. यावेळी विजया शिंदे, दत्ता कंद यांची भाषणे झाले.
याप्रसंगी संपर्कनेते मनोहर गायखे, पुणे जिल्हा प्रमुख राम गावडे, शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरे, राजू जवळेकर, खेड बाजार समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर, अतुल देशमुख, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, तालुका अध्यक्ष गणेश सांडभोर, महिला आघाडीच्या विजया शिंदे, प्रकाश वाडेकर, युवा सेना जिल्हाध्यक्ष अमृता गुरव, तालुका अधिकारी दत्ता कंद, नाना टाकळकर सह शिवसैनिक उपस्थित होते.
महात्मा फुले स्मारकाला ऐतिहासिक पर्यटन केंद्र बनविणार
गंज पेठेतील महत्मा फुले स्मारकाला ऐतिहासिक पर्यटन केंद्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी फुले स्मारकाचे अत्याधुनुकीकरण येथी २०० रहिवाश्याच्या सहभागाने करू अशी ग्वाही आज येथे कसबा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार दीपक मानकर यांनी दिली तसेच येथून जवळच असलेल्या मासे आळीतील व्यापाऱ्यांसाठी आधुनिक शीतगृह उभारण्याचा मनोदय हि आज येथे त्यांनी बोलून दाखविला या परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि हा परिसर स्वच्छ -सुंदर -आणि संपन्न अशी पुण्याची वसाहत बनविण्यासाठी आपण कसोशीने राज्यसरकार आणि महापालिका यांच्याकडून या योजना राबवून घेवू असे ते म्हणाले , या परिसराच्या पूर्वेस असलेल्या टिंबर मार्केट परिसरातील नाला बंदिस्त करून – सुशोभीकरण करून त्यावर वाहनतळ उभारण्याची योजनाही अमलात आणण्यासाठी आपण प्रयत्न करू असे यावेळी त्यांनी सांगितले . जागतिक स्वच्छता दिनाचे ओचित्य साधून पंचहौद येथून अभियानाची सुरुवात त्यांनी येथून सफाई मोहीम राबवून केली आणि या परिसरातील नागरिकांशी संवाद साधला राष्ट्रवादी काँग्रेस चे अजय दराडे , मुनाफ शेख , जे व्ही पटेल , आयुब भाई , हनीफ कुरेशी , बाबा कुरेशी आदी मान्यवर कार्यकर्ते यावेळी त्यांच्या समवेत या अभियानात सहभागी झाले होते
अजित पवार – पृथ्वीराज चव्हाण यांच्यात जुंपली
अजित पवार – पृथ्वीराज चव्हाण यांच्यात निवडणूक रिंगणात चांगलीच जुंपली आहे , पहा अजित पवार काय म्हणतात आणि पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतात …
राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या रडारवर सध्या पृथ्वीराज चव्हाण असल्याचे स्पष्ट झाले आहे . काँग्रेसच्या जाहीरातींबाबत प्रश्न उपस्थित करून अजित पवार म्हणाले, ‘नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जेवढी जाहीरातबाजी केली नाही, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने विधानसभा निवडणुकीत केली जात आहे. मराठीतील कोणतेही टीव्ही चॅनल सुरु केले तर, फक्त पृथ्वीराज चव्हाण सही करताना दिसतात. तीन वर्षात त्यांनी कधी फायलींवर सह्या केल्या नाही आणि जाहीरातीत मात्र त्यांनी स्वतःला कामाचा निपटारा करताना दाखवले आहे. गेल्या सहा महिन्यात त्यांनी मंजूरी दिलेल्या फायलींची चौकशी केली पाहिजे, त्यातून ते किती क्लिन आहेत हे उघड होईल.’ असा आरोप अजित पवारांनी केला.
‘काँग्रेसकडे एवढी जाहीरातबाजी करण्यासाठी फंड कुठून आला,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाताजाता त्यांचे दहा दिवसांपूर्वीचे सहकारी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित संचिन घोटाळ्याच्या चौकशीला मंजूरी दिली. त्यानंतर आता विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस चव्हाणांना टार्गेट करत आहे. आघाडी सरकारच्या शेवटच्या सहा महिन्यात झालेल्या फायलींची चौकशी झाली पाहिजे, असे अजित पवारांनी म्हटले आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. तर, औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणुकीनंतर भाजप सोबतच्या युतीच्या बातम्या निराधार असल्याचे म्हटले आहे.
निव्वळ भाषणबाजी नको – थेट माझी चौकशीच करा – पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन
आघाडीचे सरकार चालवत असताना माझ्याकडून नियमबाह्य अथवा चुकीचे निर्णय झालेले नाहीत. ते झाले असतील तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे दाखवून द्यावे, माहितीच्या अधिकारात माहिती घ्यावी अन् त्याची बिनधास्तपणे चौकशी करावी, असे जाहीर आव्हान देताना चुकीच्या विरोध करीत आक्षेप घेत सत्यतेचे धोरण घेतल्याने हितसंबंध दुखावलेले लोक राजकीय स्वार्थापोटी माझ्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत असा आरोप हि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.
गुरूवारी कराडहून मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. चव्हाण म्हणाले, चुकीचे निर्णय आणि धोरण बदलल्यामुळे हितसंबंध दुखावलेले लोक माझ्यावर रोष व्यक्त करत आहेत. म्हणूनच अशा लोकांकडून माझ्यावर खोटे-नाटे आरोप केले जात आहेत. आपणाकडून निर्णय घेताना, घाई गडबड अथवा चुकीचे काम झालेले नाही. , असे ठणकावून सांगताना यापूर्वी निर्णय घेताना विलंब लागला म्हणून ओरड करत होते. आता लवकर कामे झाली म्हणूनही ओरड करायची, ही अजित पवारांची खेळी लोक चांगले जाणून आहेत त्यास जनता भुलणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये छुपी युती झाल्यामुळे दोन्ही पक्ष आपल्यावर खोटे आरोप करून आपल्या खात्याच्या कामकाजासंदर्भात संभ्रमावस्था निर्माण करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,. नगरविकास खाते हे माझ्या अख्त्यारित असणारे खाते असल्याने त्याबाबतचे निर्णय मीच घेतले आहेत. ते घेताना कोणताही निर्णय आपण घाई गडबडीत घेतला नाही.नगरविकास खात्याच्या ४0 हजार फाईल्स आपण क्लिअर केल्या असून न्याय व सार्वजनिक हिताचे निर्णय आपण कधीच थांबवले नसल्याचे सांगितले. केंद्रिय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या आरोपांबाबत बोलताना त्यांची पात्रता काय? त्यांच्या सर्टिफिकेटची आपणास गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीची भाजपशी हातमिळवणी झाल्यानेच
राष्ट्रपदी राजवट — पृथ्वीराज चव्हाण
राष्ट्रवादीची भाजपशी हातमिळवणी झाल्यानेच राष्ट्रपदी राजवट महाराष्ट्रात आणली गेली हे सांगताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले , राज्यपालांनी मला काळजीवाहू सरकार म्हणून काम करण्याचे पत्र दिले आणि काही तासातच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. मुख्यमंत्री म्हणून मला काही अधिकार मिळू नये म्हणूनच भाजपच्या मदतीने राष्ट्रवादीने राज्याला राष्ट्रपती राजवटीखाली ढकलले. याचा फायदा होईल, असे पवार यांना वाटले असावे. एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केला आहे सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या चितळे समितीने पवार व तटकरे यांना क्लीन चिट दिली. पण सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांच्या जनहित याचिकेवर न्यायालयाने दोघांच्या चौकशीचे आदेश दिले. ही फाइल अनेक दिवसांपासून पडली आहे. गृह विभागाने ती पाठवलीच नव्हती. आता निवडणूक काळात ती माझ्याकडे येईल व मंजूर होईल, अशी भीती दोघांना होती, असे चव्हाण म्हणाले. टोल धोरणावरही त्यांनी आक्षेप घेतला ते म्हणाले खारघरचा टोल मी दिला का? १५ किमीमध्ये दोन टोल करणे हे कुठले शहाणपण? इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी झाली तेव्हा मी नव्हतो. एकदा कंत्राट दिले की ते थांबवता येत नाही. प्रस्ताव आला तेव्हा त्यांना ठाऊक नव्हते का १५ किमीमध्ये दोन टोल लावता येत नाहीत. चुका करतात आणि मला दुरुस्त करायला सांगतात.
पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांनी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश
पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांनी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला . कॉंग्रेस भवनमध्ये अखिल भारतीय कार्यकारीणीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी शोराज वाल्मिकी यांनी त्याचे स्वागत केले . यावेळी पुणे शहर कॉंग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष संजय बालगुडे , पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, आर. पी. आय (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे,अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते व आमदार अनंत गाडगीळ , उपमहापौर आबा बागुल गोपाळ तिवारी , विरेंद्र किराड , संगीता तिवारी , नगरसेवक अविनाश बागवे , नगरसेवक सुधीर जानजोत , स्थायी समिती माजी अध्यक्ष रशीद शेख , नीता रजपूत , सर्व उमेदवार आणि कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
निम्हण यांनी राबविली स्वच्छता मोहीम
महात्मा गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधी यांच्या यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवाजीनगर
मतदारसंघातील काँग्रेस-आरपीआय (कवाडेगट) चेउमेदवार विनायक निम्हण यांनी आज दिवसभराच्या
प्रचाराची सुरुवात केली. बोपोडी गावठाण येथेस्वत: हातात झाडूघेऊन कार्यकर्त्यांसमवेत स्वच्छता मोहीम
राबवून महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली.
गुरुवारी सकाळी येरवडा येथील लक्ष्मीनगर, रामनगर, जयजवान नगर येथेकाढलेल्या पदयात्रेत हजारो
पुरुष व महिला कार्यकर्तेसहभागी झालेहोते. ‘काँग्रेस पक्षाचा विजय असो’, ‘येऊन येऊन येणार कोण, विनायक
निम्हण शिवाय आहेच कोण’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ढोल-ताशांच्या गजरात निघालेली ही
पदयात्रेत जागोजागी महिला औंक्षण करीत होत्या. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथून सुरुझालेली ही
पदयात्रा लक्ष्मीनगर, जयजवान नगर, अमृतेश्वर गणपती, निळा झेंडा चौक, जयशक्ती चौक मित्रमंडळ,
आदर्श सोसायटी, रामनगर, घलोत चौक मार्गेपुन्हा शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथेविसावली. नागरीकांचा
प्रतिसाद, हेच या पदयात्रेचेवैशिष्ट्य म्हणता येईल. नागरीक घराबाहेर येऊन निम्हण यांच्याशी हात मिळवत
होते. या पदयात्रेत ज्ञानेश्वर मोझे, हबीब मुल्ला, शंकर राठोड, रुपेश सोरटे, कैलास पवार, नंदा सरोदे, कांता
चव्हाण, सूर्यकांत घाडगे, आदिनाथ कळसाईत, बळीराम भोसले, राजपाल घलोत आदी सहभागी झालेहोते.
तत्पूर्वी, बुधवारी सायंकाळी भरपावसात पदयात्रा काढून खडकी बाजार येथील मतदारांशी संपर्क
साधला. खडकी नवा बाजार येथील काँग्रेस कार्यालयाचेउद्घाटन करून निम्हण यांनी आपल्या पदयात्रेला
प्रारंभ केला. पावसाच्या सरी कोसळत होत्याच. पावसामुळेसर्वत्र चिखलामुळेदलदल निर्माण झालेली होती.
अशाही वातावरणात निम्हण यांची हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदयात्रा सुरुच होती. नवा खडकी बाजार
येथून सुरुझालेली ही पदयात्रा विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज मार्गेइदशाह चौक, धोबी गल्ली,
गवळीवाडा, दर्गा वसाहत, गाडी अड्डा, कर्मचारी वसाहत, कमेला चाळ, महादेववाडी इथेआली. इथे डॉ. बाबासाहेब
आंबे़डकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही पदयात्रा गंधकुटी बुद्ध विहार मार्गेराजीव गांधीनगर येथे
आली. त्यानंतर ती काँग्रेस कार्यालयाजवळ विसावली. या पदयात्रेत विनायक निम्हण यांनाच विजयी करा,
काँग्रेसला मत म्हणजेविकासाला मत, अशा घोषणा देत शेकडो पुरुष व महिला कार्यकर्तेसहभागी झालेहोते.
अभय छाजेड यांनी घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी
पुणे-पर्वती विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेस-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (कवाडेगट) उमेदवार अॅड.
अभय छाजेड यांनी आज सकाळी महात्मा गांधी व भारताचेदिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या
पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले.या महापुरुषांच्या कार्याचेस्मरण करून छाजेड यांनी दिवसभर घेतल्या.
आज महात्मा गांधी यांची जयंती तर भारताचेदिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी.
त्यानिमित्तानेअॅड. अभय छाजेड यांनी सकाळी दांडेकर पुलावरील लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळयाला
पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी त्यांच्यासमवेत सचिन आडेकर,रोहित खंडागळे,हनुमंत दहिभातेव इतर
कार्यकर्तेउपस्थित होते. त्यानंतर कॉंग्रेस भवन येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अॅड. अभय
छाजेड यांनी अर्पण केला.त्यावेळी त्यांच्या समवेत पुण्याचेउपमहापौर आबा बागुल, पुणेशहर कॉंग्रेसचे
अध्यक्ष संजय बालगुडे, पुणेमनपातील गटनेतेव विरोधीपक्षनेतेअरविंद शिंदे, कॉंग्रेसचेसरचिटणीस वीरेंद्र
किराड, लता राजगुरू, जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक लीलाताई मर्चंट, प्रभाकर गुप्ते,श्यौराज वाल्मिकी, काका
धर्मावत, मुकेश धीवार, हाजीभाई लदाफ, राजेंद्र भुतडा आदी पदाधिकारी व कार्यकर्तेउपस्थित होते.
महापुरुषांचेस्मरण केल्यानंतर छाजेड यांनी बिबवेवाडीतील श्री सप्तशृंगी व श्री महालक्ष्मी मातेच्या मंदिरात
जावून देवीचेआशीर्वाद घेतले. तेथील भक्तांना मतदानाचेआवाहन करीत व जेष्ठांचा आशीर्वाद घेवून बिबवेवाडी
भागात पद्यात्रेद्वारेदिवसभर मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. इ. एस.हॉस्पिटलपासून प्रारंभ झालेली ही
पदयात्रा पंचदीप कॉलनी,,पद्मजा सोसायटी, अनिकेत सोसायटी, लक्ष्मी अपार्टमेंट,वसंतबाग सोसायटी,
पारिजात-अनिकेत सोसायटी२, चंद्रिका सोसायटी, चंद्रलोक हॉस्पिटल, नाटेकर परतानी, गंगा, जमुना,सरस्वती
सोसायटी, कोठारी कॉलनी, शाहूसोसायटी, जे.यु. पार्क, असा मार्गक्रमण करीत महावीर पार्क येथेसमाप्त
झाली. हलगी आणि ढोलच्या निनाद व ‘येवून येवून येणार कोण, अभय छाजेड यांच्याशिवाय आहेच कोण’ चा गजर,
हातात पंजाचेचित्र असणारेझेंडेघेवून ‘आला रेआला पंजा आला’, इकडून आला, पंजा आला’, ‘सगळ्यांना सांगा,
पंजा आला’ अशा घोषणांच्या चैतन्यपूर्ण वातावरणात निघालेल्या या पदयात्रेला मतदारांचा चांगला प्रतिसाद
लाभला. छोटेफेरीवाले, व्यापारी, रहिवासी, महिला, आबालवृद्ध यासर्वांना मतदान करण्याचेआवाहन अॅड. अभय
छाजेड यांनी केले. त्यांच्या समवेत माजी नगरसेवक विजयराव मोहिते, पुणेशहर मागासवर्गीय सेल अध्यक्ष
मुकेश धीवार,मार्केट यार्ड कमिटी अध्यक्ष रवी ननावरे, ब्लॉक अध्यक्ष संतोष गरुड, सुरेश उकरंडे, विजूउत्तरे,
विनायक मुले, स्नेहलता पवार,तुकाराम वाघ, मिसाळ गुरुजी यांच्यासह शेकडो कार्यकर्तेव महिला पदयात्रेत
सहभागी झाल्या होत्या.


