मुंबई – दिल्ली ज्याचे ऐकेल आणि दिल्लीचे ऐकेल असे सरकार दिले तरच महाराष्ट्राचा विकास येईल महाराष्ट्राच्या विकासासाठी दिल्लीत ज्यांचे सरकार आहे, त्या भाजपचेच राज्यातही सरकार निवडून देणे आवश्यक आहे. स्पष्ट बहुमत जनतेने द्यावे. यावेळी थोडेसे चुकलात तर `त्यांना’ जी नशा चढेल त्यात संपूर्ण देश बरबाद होईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीमुंबईतील सभेतून महाराष्ट्राला दिला.
ज बरदस्तीने घर रिकामे करणे, प्लॉट खाली करणे, गरीबांच्या झोपड्यांवर कब्जा करणे अशा प्रवृत्तींपासून मुंबईकरांना मुक्तता देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. काँग्रेसचे मित्र केवळ आपल्यावर टीका करण्यात धन्यता मानतात. कदाचित पाच महिन्यांपूर्वीचा अनुभव ते विसरले असावेत. माझ्यावर जेवढी टीका कराल तेवढे सणसणीत उत्तर जनता तुम्हाला देईल, असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी टीकाकारांना दिला.
या राज्यात दरवर्षी ३ हजार ७०० शेतकरी आत्महत्या करीत असताना, गेल्या सरकारमधील कृषी मंत्री काय करीत होते, अशी टीका त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली. महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जातीय दंगे होणारे राज्य असल्याची टीकाही त्यांनी केली. १५ वर्षांत सर्वात जास्त दहशतवादी घटना या राज्यात घडल्या. सर्वात अधिक जीवितहानी येथे झाली. मात्र किती गुन्हेगारांना शिक्षा मिळाली. कधी मुख्यमंत्री तर कधी गृहमंत्री बदलून जनतेला न्याय कसा मिळणार, असा सवाल त्यांनी केला.
६० वर्षे राज्य करणारे आपल्याकडे ६० दिवसांचा हिशेब मागत आहेत. मी छोटा माणूस आहे. मी छोट्या माणसांसाठी छोटी-छोटी कामे करीन, असे सांगून देशातील प्रत्येक गरीब नागरिकांसाठी बँकेत खाते उघडण्याच्या कामाचा त्यांनी उल्लेख केला. शून्य पैशात खाते उघडता येणार असून, माझ्या इमानदार पाच कोटी गरीब कुटुंबांनी तीन हजार कोटी रुपये जमा केल्याचे मोदी यांनी सांगितले. कैलास मानसरोवर यात्रेसाठी अत्यंत अवघड मार्गाने जावे लागत असे. चीनच्या राष्ट्रपतींशी बोलून सर्व वयोगटातील यात्रेकरूंना मोटारीने जाता येईल असा मार्ग उपलब्ध करून घेतल्याचे मोदी म्हणाले. देशाला मलेरिया, डेंग्यू आणि टीबीपासून मुक्त करण्यासाठी अमेरिकेबरोबर औैषध संशोधनाचा करार केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
झोपडीधारकांच्या आयुष्याचे कायापालट करण्याचे आपले स्वप्न आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात १५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रत्येक झोपडीधारकाला हक्काचे, राहण्यायोग्य व सर्व नागरी सुविधा असलेले निवास देण्याचा संकल्प मोदी यांनी सोडला. मुंबईत चांगल्या दर्जाची मेट्रो आमचे सरकार आणेल, नवी मुंबईतील एअरपोर्टचे काम मार्गी लावून त्याचे उद्घाटन आमच्या कार्यकाळात होईल. सागरी सेतू पूर्ण करू. खासगीकरणाद्वारे मुंबईतील उपनगरी लोकल सेवा उच्च दर्जाची करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची भाषणे झाली. व्यासपीठावर मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार होते.
जो दिल्लीचे ऐकेल आणि दिल्ली ज्याचे ऐकेल असे सरकार द्या – मोदी
नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या बाबतीत सुडाचे राजकारण करीत आहे–नारायण राणे
पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघात कॉंग्रेस, आर. पी. आय (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचारानिमित सोमवार पेठमधील नरपतगीर चौकाजवळ कोपरा सभा संपन्न झाली . या सभेस कॉंग्रेस पक्षाचे प्रचारप्रमुख नारायण राणे , अखिल भारतीय कार्यकारीणीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी शोराज वाल्मिकी , प्रसिद्ध सिनेअभिनेत्री नगमा , महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कमल व्यवहारे , पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय बालगुडे , उमेदवार रमेश बागवे , आमदार अनंतराव गाडगीळ , विरोधी पक्षनेते व स्थानिक नगरसेवक अरविंद शिंदे , नगरसेविका लक्ष्मी घोडके , नगरसेवक सुधीर जानजोत , नगरसेविका लता राजगुरू , नगरसेवक अविनाश बागवे , माजी महापौर रजनी त्रिभुवन , स्थायी समिती माजी अध्यक्ष अनिस सुंडके , सदानंद शेट्टी , रशीद शेख , हाजी नदाफ , भगवान धुमाळ , शुक्ला महाराज , पुणे कॅंटोन्मेंट कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष असिफ शेख , पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे सर्व माजी उपाध्यक्ष व नगरसेवक , कॉंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी कॉंग्रेस पक्षाचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी सांगितले कि , नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या बाबतीत सुडाचे राजकारण करीत आहे , त्यांनी मुंबई मधील भारतीय रिसर्व्ह बँकेचे मुख्यालय गुजरात मध्ये हलविण्याचा प्रयत्न असून देशाची आर्थिक राजधानी म्हणून असणारी मुंबईचे महत्व कमी करण्याचे काम होत आहे . मुंबई मध्ये समुद्रकिनारी असणारी गोदी मधून मालवाहतुकीचे काम चालते , हि गोदी स्थलांतर करून या गोदीतील असंख्य कामगारांना बेरोजगार होणार आहेत . त्यातून त्यांनी महाराष्ट्राला तोडण्याचा प्रयत्न तसेच वेगळा विदर्भ करण्याचा प्रयत्न करण्याचा डाव त्यांनी रचला आहे . भारतीय जनता पार्टीच्या जाहिरातीमध्ये शिवछत्रपतीचा आशीर्वाद मागता परंतु महाराज उत्तम प्रशिक्षक होते , त्यांनी जनतेला फसविण्याचे काम केले नाही . नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात बारा मंत्र्यांवर गुन्हे आहेत . त्यामुळे भाजपला सत्ता मिळवायची आहे त्यामुळे त्यांच्या बोलण्याला बळी पडू नका उद्धव ठाकरे कधी आमदार झाले नाही त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे , कॉंग्रेसने नेहमीच विकासकामांच्या जोरावर प्रचार केला , जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना कॉंग्रेसने राबविल्या . या विकासकामांवरच महाराष्ट्राला नंबर वनचे राज्य आहे . अजित पवार यांनी देखील सत्तेमध्ये असताना मुख्यमंत्रीबरोबर काम केले , तेव्हा अजित पवारांनी का विरोध केला नाही असा सवाल त्यांनी व्यक्त केला , पुण्याचे विकास पुरुष म्हणजे रमेश बागवे , त्यासाठी जनतेने रमेश बागवे यांना साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले .
यावेळी पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघात कॉंग्रेस, आर. पी. आय (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांनी सांगितले कि , कॉंग्रेसने विकासकामांच्या जोरावरच जनतेला मते मागत आहे त्यामुळे विकासकामे केल्यामुळेच मागील वेळी मतदारांनी मला भरघोस मतांनी निवडून दिले . पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघ झोपडपट्टी मुक्त करून मतदार संघाचा विकास करण्यसाठी आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले .
यावेळी संगीता तिवारी , विठ्ठल थोरात , रशीद खिजर , भगवान धुमाळ , शुक्ला महाराज , करण मकवानी , नगरसेवक अविनाश बागवे आदींनी मनोगते व्यक्त केली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाल्मिक जगताप यांनी केले .
संघप्रमुखांचे भाषण थेट प्रक्षेपित; धम्मप्रवर्तनाचे प्रक्षेपण का नाही-शरद पवार
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुखांचे भाषण थेट प्रक्षेपित करून या सरकारने खरा चेहरा दाखविण्यास सुरवात केली आहे. संघप्रमुखांचा कार्यक्रम ज्या दिवशी नागपुरात झाला. त्याच दिवशी नागपूरमध्ये धम्मप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर लाखो आंबेडकरी जनता एकत्र आली होती. संघप्रमुखांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या केंद्र सरकारला धम्मप्रवर्तन दिनाचे प्रक्षेपण करता आले नाही, यावरून हे सरकार कोणत्या दिशेने आणि विचाराने पुढे जाणार हे वेगळे सांगायला नको. या परिस्थितीत आता अधिक जागृत राहण्याची गरज आहे. समतेच्या विचाराला बांधील राहून महिला व दलितांना शक्ती देणारा पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस बांधील आहे.‘‘ असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले
पुणे शहर, पिंपरी व जिल्ह्यातील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ आज पवार यांच्या हस्ते झाला. या वेळी पवार बोलत होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण, महापौर दत्ता धनकवडे, पिंपरीच्या महापौर शकुंतला धराडे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. पवार यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी व भाजपच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आहे. शेतमालाच्या निर्यातीला बंदी घालून या सरकारने शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे. याच कारणाने उत्तर प्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीत तेथील ग्रामीण जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवून दिली, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केली.
‘भाजपच्या विजयात उत्तर प्रदेशचा वाटा मोठा होता. मात्र, लगेचच झालेल्या पोटनिवडणुकीत उत्तर प्रदेशातील नऊपैकी आठ ठिकाणी भाजपला पराभव पत्करावा लागला. एक राजकीय अभ्यासक म्हणून उत्तर प्रदेशचा दौरा केला. या दौऱ्यात तेथील शेतकऱ्यांत या सरकारच्या विरोधातील चीड दिसली. शेतमाल निर्यातीला बंदी घालून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. त्यातून हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले.‘‘
शिवसेनेविषयी बोलताना ते म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेसारखी स्वाभिमानी संघटना उभी केली. त्यामुळे शिवसेना भाजपपासून वेगळे झाल्याचे समाधान आहे. बाळासाहेब ठाकरे यांचाही भाजपवर कधीही विश्वास नव्हता. “कमळाबाई‘ या नावानेच ते भाजपचा नेहमी उल्लेख करीत होते. युती एका बरोबर नजर दुसऱ्या पक्षावर अशी भाजपची कायमची नीती आहे. केंद्रात सत्ता आल्यानंतर या पक्षाकडून लोकांच्या खूप अपेक्षा होत्या. मात्र अल्पावधीतच त्यास ओहोटी लागली आहे.‘‘ कोणताही पक्ष मोठा होण्यासाठी वेळोवेळी पक्षात नव्या पिढीला संधी दिली पाहिजे. 47 वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण यांनी माझ्यासारख्या नवख्या तरुणाला संधी दिली. त्याचप्रमाणे या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे, असे पवार यांनी सांगितले.
जान्हवी रसिकलाल धारीवाल यांनी केले दीपक मानकारांचे औक्षण

पुणे : ऐतिहासिक पार्श्वभूमी असणार्या व बारा बलुतेदारांच्या कसबा मतदार संघावर कायमच अन्याय झाला असून, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी कसब्याचा विकास खुंटला आहे, अशी कडवी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दीपक मानकर यांनी केली. प्रचार फेरीदरम्यान स्थानिक व्यापारी वर्गाकडून दीपक मानकर यांना चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी प्रसिद्ध उद्योगपती रसिक धारीवाल यांची कन्या जान्हवी धारीवाल यांनी मानकर यांचे औक्षण करून त्यांना निवडणुकीकरीता शुभेच्छा दिल्या.
गेले अनेक वर्षे प्रस्थापितांनी कसब्याचा विकास केला नसून, जुन्या वाड्यांना एफएसआय देणे असो वा वाहतुकीचा प्रश्न असो ते अद्याप कायम आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेले सीसीटीव्ही कॅमेरे अजुनही बसविण्यात आलेले नाहीत. शनिवारवाडा, महात्मा फुले वाड्याच्या आजुबाजूचा परिसराचा विकास अजुनही झालेला नाही. १९८७ च्या विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न अजुनही कायम आहे. मंडईतील अनेक व्यापार्यांचा, पुलावरील बुरुड समाजाचे पुनर्वसन किंवा गंज पेठेतील भोई समाज, चांभार गल्लीतील चटई कामगारांच्या स्टॉलचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. घोरपडी पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, गंज पेठ येथील भांडी व्यापार्यांचे स्थलांतराच्या प्रश्नांना आश्वासनापलीकडे काहीच पदरात पडले नसून, त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. मतदार संघातील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांच्या बाबतीतही अत्यंत दुर्लक्षीत दृष्टीकोन दिसून येत आहेत. यामुळेच कसबा मतदारसंघ हा म्हणावा तसा विकसित झालेला नाही.
पुण्यातील या सर्वांत जुन्या व ऐतिहासिक मतदार संघात नियोजनपूर्वक काम केल्यास पुण्याचा ऐतिहासिक वारसा जपत त्याला आधुनिकतेची झळाळी आणता येणे सहज शक्य आहे. मात्र, गरज आहे ती बदलाची. मतदार संघाच्या फेर रचनेत मुस्लिम समाज मोठय़ा प्रमाणावर या मतदार संघात आले आहेत.
मात्र, त्यांचा विकास अजुनही योग्य पद्धतीने झालेला नाही. जो प्रश्न येथील नागरिकांचा तोच प्रश्न येथील झोपडपट्टय़ांचा. मतदार संघातील असलेल्या पाचही झोपडपट्टय़ांच्यापुनर्वसनाच्या प्रश्नांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. झोपडपट्टय़ांचे पुनर्वसन या मतदार संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून, माझा प्रय▪प्राधान्याने या दृष्टीने असणार आहे.
प्रचारफेरी दरम्यान दीपक मानकर यांना मतदार संघात लक्षणीय प्रतिसाद लाभला. दीपक मानकर यांच्या प्रचार फेरीचे आयोजन त्रिशुंड्या गणपतीपासून ते नानापेठ येथील बारेनिवासपर्यंत करण्यात आले होते. या पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये राजेश सोनवणे, राजेंद्र जाधव, प्रकाश लांडगे, रवी कावणेकर, सोहम हंबीर, प्रशांत सोनवणे, जीवन मोकाशी, हिमांशु कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवदर्शन भागात अभय छाजेड यांची पदयात्रा

पर्वती विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस-पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे) उमेदवार अँड़ अभय छाजेड यांच्या पदयात्रेला शिवदर्शन भागात मतदारांचा भरपावसात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंजाला मत म्हणजे विकासाला मत, एकच मत पर्वती मतदारसंघाच्या विकासा साठी असे आवाहन करत निघालेल्या या पदयात्रेला महिलांसह अबालवृद्धांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
शिवदर्शन भागातील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलपासून या पदयात्रेला प्रारंभ झाला. या पदयात्रेत अँड़ अभय छाजेड यांच्या समवेत उपमहापौर आबा बागुल, अमित बागुल, महेश वाबळे, हरीश जाधव, गणेश लगट, स्वप्निल नाईक, विजय बिबवे, अनिकेत निकाळजे, राजाभाऊ पोळ, दिलीप गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या होत्या.
राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलपासून सुरु झालेली पदयात्रा पुढे शिवदर्शन वसाहत, निर्मल बाग सोसायटी, चौगुले शोरूम, तुरे निवास, तावरे कॉलनी, तावरे बेकरी, अरण्येश्वर मंदिर, शिंदे हायस्कूल रस्ता, संजयनगर, गवळी वाडा, सारंग सोसायटी असा मार्गक्रमण करीत रूपा हॉटेल येथे समाप्त झाली.
पदयात्रा अरण्येश्वर भागात असताना वरुनराजाने हजेरी लावली. मात्र, भरपावसातही हातात पंजाचे चित्र असलेले झेंडे घेवून नाचणारे कार्यकर्ते, ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजी करीत व औक्षणाने छाजेड यांचे स्वागत केले जात होते. या भागातील सर्व व्यापार्यांचा तसेच रहिवाशांच्या घराघरात जावून छाजेड यांनी त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले
मुंबई कोणाची ? भाजपाची कि शिवसेनेची… कि …. ?
आमची मुंबई – शिवसेनेची मुंबई अशा ब्रीदावल्या शिवसेनेचे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीतील ;पण ज्या आजतागायत संस्मरणीय मानल्या जात आहेत अशी मुंबई आता कोणाची ? शिवसेनेची कि भाजपाची ? कि अन्य सर्वपक्षीयांची ? असे प्रश्न राजकीय समीक्षकांच्या मनात घोंगावू लागले आहेत .
मुंबईतील 36 पैकी 13 विधानसभा मतदारसंघात गुजराती मतदारांचे वर्चस्व आहे, मुंबईतील सुमारे ३५ लाख गुजराती समाजाच्या लोकसंख्येत १५ लाख मतदार आहेत . भाजप पक्ष आता गुजरातचे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या हाती गेल्याचे मानले जाते . आणि भाजप आता शिवसेनेसोबत राहिलेला नाही या पार्श्वभूमीवर या मतदारांना आता भाजप – सेना – मनसे – काँग्रेस – राष्ट्रवादी असे पर्याय खुले आहेत हे सारे एकगठ्ठा मतदान असेल कि यातही विभागणी असेल याकडे आता राजकीय समीक्षकांचे लक्ष लागून राहणार आहे त्यामुळे मुंबई आता बहुमताने कोणी एकटाच राजकीय पक्ष जिंकणार कि मुंबईच विविध पक्षांना सामावून घेणार ?हे आता निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे . अर्थात कोणत्याही एका किंवा अनेक पक्षाच्या नेतृत्वाखाली मुंबई त विधानसभेचे चित्र झळकले तरी ते संपूर्ण महाराष्ट्राचे प्रतिबिंब असेल असे मानले जात आहे .
मुंबईत एकून विधानसभेचे 36 मतदारसंघ आहेत. 36 जागांवर एकून 520 उमेदवार उभे राहिले आहेत. यात मुंबई शहरात मोडणा-या 10 विधानसभा मतदारसंघात एकून 139 उमेदवार उभे आहेत. तर, मुंबई पश्चिम व पूर्व उपनगरातील 26 जागांवर 381 उमेदवार रिंगणात आहेत. दहिसर, बोरीवली, कांदिवली, चारकोप, मालाड-पश्चिम, गोरेगाव, विलेपार्ले, मुलुंड, घाटकोपर-पूर्व, घाटकोपर-पश्चिम, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या 13 मतदारसंघात गुजराती मतदार निर्णायंक भूमिका बजावतील
बोरीवलीतून विनोद तावडे (भाजपा), अशोक सूत्राले (काँग्रेस), बलबीर सिंह (राष्ट्रवादी), उत्तमप्रकाश अग्रवाल (शिवसेना) आणि नयन कदम (मनसे) उभे आहेत.
विलेपार्लेमधून काँग्रेसचे आमदार कृष्णा हेगडे, माजी नगरसेवक पराग आळवणी (भाजपा), शशिकांत पाटकर (शिवसेना) आणि सुहास शिंदे (मनसे) हे नशिब अजमावत आहेत.
घाटकोपर-पूर्व मतदारसंघात विद्यमान आमदार प्रकाश मेहता (भाजपा), प्रविण छेड़ा (काँग्रेस), राखी जाधव (राष्ट्रवादी), जगदीश चौधरी (शिवसेना) आणि सतिश नारकर (मनसे) आदी उमेदवार आहेत.
घाटकोपर-पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदार राम कदम (भाजपा), सुधीर मोरे (शिवसेना), दिलीप लांडे (मनसे), हारुन खान (राष्ट्रवादी) आणि रामगोविंद यादव (काँग्रेस) मैदानात आहेत.दहिसरमध्ये विद्यमान आमदार विनोद घोसाळकर (शिवसेना), नगरसेविका शीतल म्हात्रे (काँग्रेस), नगरसेविका मनीषा चौधरी (भाजपा), पूर्व महापौर डॉ. शुभा राऊळ (मनसे) आणि हरिश शेट्टी (राष्ट्रवादी) निवडणूक लढवित आहेत.
मुंबईतील मराठी मतदारांमध्ये सुरुवातीच्या काळात शिवसेनेबद्दल मोठ्या प्रमाणावर सहानुभूती तयार झाली होती. आजही ही सहानुभूती मोठ्या प्रमाणावर टिकून असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर काही प्रमाणात तरी मराठी मतदार भाजपकडे वळतील, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास मराठी मतदार किती मोठ्या संख्येने भाजपकडे वळतात, यावर बरेच गणित अवलंबून असेल. तसेच मराठी मतांमध्ये मनसेचा वाटा राहणारच असल्यामुळे शिवसेनेला एक गठ्ठा मराठी मते पडतील का, असा सवाल भाजपचे नेते करत आहेत. याउलट गुजराती मतदार मात्र एकसंधपणे भाजपच्या बाजूने उभा असल्याचा भाजप नेत्यांचा दावा आहे.
प्रत्येक मतदारसंघात ३० ते ४० टक्के मराठी मतांचा वाटा असल्याने मुंबईतील सर्वत्रच शिवसेना विरुद्ध इतर असाच सामना पाहण्यास मिळू शकतो, असे ज्येष्ठ सेना नेत्यांचे म्हणणे आहे. मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम मोदींचे उजवे हात समजल्या जाणाऱ्या अमित शहा यांनीच केल्यामुळे त्यांच्या आवाहनालाही मराठी मतदार भूलणार नाहीत, असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान युती तुटल्याने मराठी-अमराठी मतांचे विभाजन होईल, असे चित्र उभे केले जात आहे. पण मुंबईसह राज्यातील अमराठीही मोठ्या संख्येने शिवसेनेसोबत आहेत. . महाराष्ट्राचे सरकार दिल्लीतून नाही राज्यातून चालेल, असे शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी रत्नागिरी मध्ये म्हटले आहे . रत्नागिरीमध्ये झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते, भाजपने महाराष्ट्र तोडण्याचे स्वप्न बाळगून युती तोडली आहे. पण त्यांचे हे स्वप्न शिवसेना कधीही पूर्ण होऊ देणार नाही, असे राऊत यांनी सांगितले.
भाजपने युती का तोडली, कोणासाठी तोडली याची उत्तरे महाराष्ट्राला मिळायलाच हवीत. ती जो पर्यंत मिळणार नाहीत, तोपर्यंत पुन्हा युती होणार नाही. २५ वर्षाची जुनी युती तोडणा-यांना आम्ही भांडी घासायला लावू, अशा शब्दात शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपला धारेवर धरले.
दीपक मानकरांसमवेत फोटो काढण्याची हि लगबग
कसबा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी चे उमेदवार माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी आज काढलेल्या प्रचारफेरीत माजी महापौर मोहनसिंग राजपाल आणि अनेक मान्यवर नागरिक सहभागी झाले होते . अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत झाले तर महिलांसह अनेकांना यावेळी मानकर यांच्यासमवेत आपले छायाचित्र काढण्याचा मोह हि आवरला नाही त्या सर्वांना प्रतिसाद देत मानकर यांनी गाठी भेटींची अनोखी फेरी आज पार पडली
कायम सर्वसामान्यांच्या कामासाठी झटलो – तेव्हा कुठे होते विरोधक ? निम्हण यांचा सवाल
गेल्या पाच वर्षांत सर्वसामान्यांना काय हवे, हे पाहून राज्य शासन, केंद्र शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविल्या. लोकांनी हाक मारताच लगेच धावून जात शिवाजीनगर मतदारसंघातील लोकांची कामे केली. विरोधकांनी मात्र गेली पंचवार्षिक निवडणूक झाल्यापासून मतदारसंघातील लोकांकडे साधे ढुंकूनही बघितले नाही. त्यामुळे मतदार त्यांना घरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास शिवाजीनगर मतदारसंघातील काँगेस-आरपीआय (कवाडे गट) चे अधिकृत उमेदवार विनायक निम्हण यांनी बोलून दाखविला.
राष्ट्रवादी काँगेसच्या आमदारांनी आपला निधी कुठे खर्च केला, हे दाखवून द्यावे. फक्त नेत्यांच्या पुढे पुढे करण्याशिवाय त्यांनी गेल्या पाच वर्षांत दुसरे काम केलेले नाही. मतदारसंघाची सीमारेषाही त्यांना माहीत असू नये, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. पाच वर्षांत त्यांना जनता का दिसली नाही ? आताच का उफाळून आले जनतेवरचे प्रेम? असा खडा सवालही निम्हण यांनी राष्ट्रवादी काँगेसच्या उमेदवारांना केला.
भाजपवाल्यांचीही तीच गत आहे. कुठल्या तरी लाटेत आम्ही विजयी होऊ, हा फुगा याही निवडणुकीत मतदार फोडल्याशिवाय राहणार नाहीत. लाट ही क्षणिक असते. ती थोपवून ठेवता येत नसते, हे भाजपवाल्यांना कुणीतरी जाऊन सांगण्याची आवश्यकता आहे. शिवाजीनगर मतदारसंघासाठी त्यांना उमेदवार मिळू नये, यातच सर्वकाही आले. मनसेचा उमेदवार तर आपला प्रभाग सोडून बाहेर गेलेला दिसत नाही. त्यामुळे तो लोकांना माहीत असण्याचा काही संबंधच नाही. तसेच मतदारसंघातल्या समस्या माहीत असणेही दुरापास्तच आहे. गत निवडणुकीत राज्यात इतर ठिकाणी निवडून आलेल्या मनसे आमदारांनी काय दिवे लावले, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे ते निवडून आल्यावर काय करणार, हे मतदारांनाही ठाऊक आहे.
माझे पक्षांतर्गत विरोधक नाहीत. मात्र, सध्या ज्या अफवा उठवल्या जात आहेत, त्या केवळ गैरसमजातून येत आहेत. पक्षातील आम्ही सर्वजण एकजुटीने निवडणुकीला सामोरे जात आहोत, हे माझ्या विरोधकांनी लक्षात घ्यावे. घरातल्या लोकांचा राग हा क्षणिक असतो. तो राग केव्हाच निवळला आहे. त्यामुळे तेही पक्षाचे काम करीत आहेत.
बालकलाकार ‘मृण्मयी सुपाळ’ चे ‘सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण!!
छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप उमटवून अवघ्या महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली बालकलाकार ‘मृण्मयी सुपाळ’ आता रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाली आहे .ई टीव्ही मराठीवरील ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ मधील ‘ईश्वरी’ आणि ‘तु माझा सांगाती’ या सिरिअलमध्ये ‘आवली’ ची भूमिका साकारणाऱ्या मृण्मयीने अल्पावधीतच आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. ऋतुराज मोशन पिक्चर्सच्या संदीप राव यांची निर्मिती असलेल्या दिनेश देवळेकर दिग्दर्शित आगामी ‘ब्लॅकबोर्ड’ सिनेमातून मृण्मयी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे.
आजच्या या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण महत्वाचे आहे. शिक्षणामुळे माणसाची प्रगती होते आणि त्यातूनच त्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे ही साहजिकच प्रत्येक पालकाची इच्छा असते आणि यासाठीच समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्ती मग ती श्रीमंत असो वा गरीब आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिवस रात्र मेहनत करून मुलांना शिक्षण देते. परंतु सध्या या शिक्षण संस्थांचेही बाजारीकरण झाल्याचे चित्र आपल्याला सर्वत्र दिसत आहे. शिक्षण संस्था अँडमिशनसाठी स्वीकारत असलेले डोनेशन, अव्वाच्या सव्वा फीस या सर्वांची पूर्तता करता करता सामान्य वर्गातील माणूस हा पूर्णतः गुरफटून जात आहे.एकंदरीतच शिक्षण संस्थेविरुद्ध असलेला सामान्य माणसाच्या लढ्याची कथा या सिनेमात दाखविण्यात आली आहे.
सिनेमाची कथा-पटकथा दिनेश देवळेकर यांची असून संवाद दिनेश देवळेकर आणि तृप्ती देवळेकर यांनी लिहिले आहेत. मृण्मयी सोबत अभिनेते अरुण नलावडे आणि अभिनेत्री माधवी जुवेकर यांच्या प्रमुख भूमिका असून राजेश भोसले, सुनील होळकर, सायली देवधर, वृषाली हताळकर, चार्ल्स गोम्स, गौरी नवलकर, आदी कलाकारांच्या भूमिका ही आपल्याला या सिनेमात पहायला मिळणार आहेत. सिनेमातील गाणी संदीप पाटील यांनी लिहिली असून संगीतही त्यांचेच आहे. वैभव थोरवे, संदीप पाटील या गायकांच्या सुमधुर आवाजात ही गाणी रेकॉर्ड करण्यात आली असून जावेद अहतीशाम यांनी कॅमेरामन म्हणून काम पहिले आहे.
आता लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
विकास हवा असेल तर भाजपाला स्पष्ट बहुमत द्या – नरेंद्र मोदी

बीड – विकास हवा असेल तर भाजपाला स्पष्ट बहुमत द्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे महाराष्ट्रातील मतदारांना केल.
केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रासाठी मी काय केलं? हे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बीड मध्ये सांगितले कि, जपानबरोबर झालेल्या करारात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प आणला. एवढचं काय तर चीन महाराष्ट्रात उद्योगिक पार्क बनवणार आहे. तसंच गोपीनाथ मुंडेंच बीडमध्ये रेल्वे आणण्याचे स्वप्नही पूर्ण करणार असल्याचं आश्वासन मोदींनी दिलं.तसेच
यावेळी गेल्या १५ वर्षात महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने काय दिलं? या सरकारने एक पूर्ण पिढीच उद्धवस्त केली. मुख्यमंत्र्यांमागून मुख्यमंत्री बदले, जे मुख्यमंत्री झाले त्यांचं स्वप्न पूर्ण झालं पण जनतेचं स्वप्न अधुरच राहिलं. महाराष्ट्रात गेल्या १५ वर्षात होता कौन बनेगा अरबपती हा खेळ सुरू होता. हे राष्ट्रवादी नव्हे भ्रष्टाचार वादी आहेत, अशी सणसणीत टीकाही मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आपली पहिलीच सभा घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली. पण शिवसेना किंवा युतीबद्दल कोणताही उल्लेख न करता राज्यात विकास हवा असेल तर फक्त भाजपला स्पष्ट बहुमत द्या असे वारंवार सांगितले.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींची राज्यातील पहिली प्रचारसभा बीडमध्ये झाली. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा पालवे मुंडे आणि डॉ. प्रितम मुंडे यांच्यासाठी ही सभा झाली. गोपीनाथ मुंडे असते तर आपल्याला महाराष्ट्रात प्रचारसभा घेण्याची गरजच पडली नसती. सभेसाठी एवढ्या मोठ्या संख्येनं लोटलेला हा जनसागर गोपीनाथ मुंडेंच्या तपस्येचं फळ आहे, असं मोदी म्हणाले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभांमधून भाजपला लक्ष्य केले आहे. यापार्श्वभूमीवर मोदी प्रचारसभेत काय बोलतील याची उत्सुकता होती. पण मोदींनी शिवसेनेला प्रत्युत्तर देण्याचं टाळत युती तुटण्यावर चकार शब्दही काढला नाही. पण महाराष्ट्राला गुजरातपेक्षाही पुढे न्यायचं असेल तर दिल्लीप्रमाणे राज्यातही भाजपचं स्थिर सरकार द्या, असं आवाहन मोदींनी अनेकदा केलं.
सदानंद शेट्टी -अरविंद शिंदे यांच्यासमवेत रमेश बागवेंची मंगळवारात पदयात्रा
पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांची आज प्रभाग क्रंमांक ४० मधील रास्ता , मंगळवार पेठ परिसरात पदयात्रा काढण्यात आली होती . ताई लक्षात ठेवा पंजा , दादा लक्षात ठेवा पंजा, आले रे आले पंजावाले असे नारे देत पदयात्रेमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात कार्यकर्ते सहभागी झाले होते . फटाक्यांच्या आतिषबाजी करून जोरदार स्वागत करण्यात येत होते .
रास्ता पेठमधील संत कबीर चौकापासून या पदयात्रेस सुरुवात झाली . हि पदयात्रा संत कबीर चौक , क्वार्टर गेट , रास्ता पेठ , सोमवार पेठ पोलिस लाईन , ससून क्वार्टर्स , बरके आळी , लडकत पेट्रोल पंप , सदानंद नगर , कमला नेहरू हॉस्पिटल , भीमनगर , मंगळवार पेठ , श्रमिक नगर , कडबा कुट्टी , शिवाजी आखाडा , पी. एम. सी. कॉलनी , जुना बाजार येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला .
या पदयात्रेत विरोधी पक्षनेते व स्थानिक नगरसेवक अरविंद शिंदे , स्थायी समिती माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी , स्थानिक नगरसेविका लक्ष्मी घोडके , माजी नगरसेविक लक्ष्मण आरडे , वाल्मिक जगताप , बाळासाहेब घोडके , राजेश शिंदे , भगवान धुमाळ , लतेंद्र भिंगारे , साधना अंबिके , माधव बारणे , रवि आरडे , शाम पवार , दीपक निनारीया , प्रशांत भालेराव , नरेंद्र खंडेलवाल , पप्पू कराळे , शाकसन शेट्टी , सागर बारणे , अमर पवार , आयाज खान , रजनी खेडेकर , रविंदरसिंग बेदी , मेन्वेल शिवले , आकाश भिवरे , रियाझ शेख , विजय नाईक , पप्पू कांबळे , युसुफ शेख , रोहित परदेशी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते .
सत्ता हिसकावून घेण्याची घाई भाजपला ; फसव्या जाहिराती आणि मार्केटिंग पासून सावधान -शरद पवार

सातारा- महाराष्ट्राची सत्ता हिसकावून घेण्याची घाई भाजपला झाली असून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने खालची पातळी गाठली आहे. ज्या गोष्टी घडल्याच नाहीत अथवा वस्तूस्थितीपेक्षा काहीतरी वेगळेच सांगितले जात आहे. या निवडणुकीसाठी भाजपने तयार केलेल्या जाहिरातीद्वारे हा पक्ष महाराष्ट्राला बदनाम करीत आहे,अशा फसव्या , दिशाभूल करणाऱ्या जाहिराती अयोग्य आहेत अशी टीका राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केली
शरद पवार आज सातारामधील पाटण येथे प्रचार दौ-यावर आहेत. पक्षाचे उमेदवार सत्यजित पाटणकर यांच्या प्रचाराला पवार आले असता त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पवार म्हणाले, भाजपला कोणत्याही स्थितीत सत्ता हवी आहे. त्यासाठी ते वाट्टेल त्या थराला, प्रचाराला जात आहेत. आता भाजपची टीव्हीवर एक जाहीरात येत आहे. म्हणे मागील आमक्या आमक्या वर्षात एवढ्या एवढ्या शेतक-यांनी आत्महत्या केल्या. बरं त्या आत्महत्या नव्हे तर हत्या आहेत हत्या आहेत असे जाहिरातीत ठासून सांगितले जात आहे. मात्र, ते चुकीचे आहे.
राज्यात मागील काळात शेतक-यांनी जरूर आत्महत्या केल्या. त्याला अनेक वेगवेगळी कारणे आहेत. मात्र, भाजप ज्या पद्धतीने जाहिरातीतून जो चुकीचा प्रचार करीत आहे. त्यातून राज्याचा, महाराष्ट्राचा अवमान होत आहे. देशात आजही जी काही मोजकी प्रगतीशील राज्ये आहेत त्यात महाराष्ट्र खूप वरच्या स्थानावर आहे. मात्र, कोणत्याही स्थितीत सत्ता हिसकावून घेण्याची घाई जी भाजपला झाली आहे त्याला जनता चोख उत्तर देईल. राज्यातील जनता भाजपला स्वीकारणार नाही असेही पवारांनी सांगितले.
सी लिंक ची ‘ गुलाबी रात ‘
प्रेक्षणीय स्थळांपैकी एक असलेला मुंबईच्या वांद्रे-वरळी सागरी सेतू शुक्रवारी गुलाबी रंगाने उजळून निघाला होता. ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि ‘एस्टी लाऊडर’ या कंपनीतर्फे सागरी सेतूवर ही गुलाबी रोषणाई केली जात आहे. हा सेतू १0 ऑक्टोबरपर्यंत असाच गुलाबी रंगात न्हाऊन निघणार आहे.
खडकवासल्यातही लाट परिवर्तनाची
————————————-
कसबा विधानसभा मतदार संघानंतर खडकवासल्यातही परिवर्तनाची लाट असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात येतो आहे खडकवासला मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार , महापौर दत्ता धनकवडे, युवक अध्यक्ष अजित बाबर पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष काका चव्हाण, माजी आमदार कुमार गोसावी पंचायत समिती सदस्य नितीन दांगट यांनी एकत्रितपणे केला आहे
पुणे महापालिका हद्दीलगच्या ३४ गावांमध्ये झपाट्याने नागरिकरण वाढले आहे. या गावांचा महापालिकेत समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खडकवासला विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार दिलीप बराटे यांनी सांगितले.
पुणे महापालिकेत तीन वेळा नगरसेवक म्हणून मोठे काम केले आहे. उत्तमनगर, कोंढवे -धावडे, शिवणे, कोपरे या गावांसाठी जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजना पूर्ण करून येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. शिवगंगा खोर्यातील व रांजणे, खामगांव, मावळ, मोगरवाडी, व घेरासिंहगड येथील वाड्यावस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रय▪करणार असल्याचेही दिलीप बराटे यांन यावेळी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवण झालेल्या सिंहगड किल्यावर संपूर्ण महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान असणारे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या त्यागाची व शौर्याची आठवण करून देणारे ‘स्वराज्य निष्ठा शिल्प’ उभारण्यासाठी आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकवासला विधानसभा मतदारसंघात खानापूर, नर्हे, धायरी, वडगांव खुर्द, कोंढवे आदी गार्डन व काकडे सिटी (वारजे) या ठिकाणी सबस्टेशनची ऊर्जा विभागाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामे मार्गी लावण्यासाठी दिलीप बराटे यांनी पुढाकार घेतला आहे. पुणे महानगरपालिका हद्द व लगतच्या गावांमध्ये उड्डाणपूल, उद्याने, मोठे व प्रशस्त रस्ते, कचरा निर्मूलनासाठी बायोगॅस प्लॅंटची निर्मिती, नाट्यगृह, पाणीपुरवठा योजना, मतदारसंघात सुसज्ज असे रुग्णालय, ई – लर्निंग स्कूल, तंत्रशिक्षण, बिझनेस व कर्मशिअल हब, युवकांचे सशक्तीकरण तसेच बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी बचत बाजार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही दिलीप बराटे यांनी सांगितले.
कोंढवे धावडे, उत्तमनगर, न्यू कोपरे, शिवणे येथे दिलीप बराटे यांची पदयात्रा काढण्यात आली. त्यामध्ये हजारो नागरिक, कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोणत्याही परिस्थितील यावेळी खडकवासला विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. माजी आमदार कुमार गोसावी, पुणे महापालिकेचे महापौर दत्ता धनकवडे, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या हर्षदाताई वांजळे, शेखर दांगट पाटील, पंचायत समिती सदस्य नितीन दांगट, कोंढवे धावडेचे उपसरपंच अतुल धावडे, माजी नगरसवेक शैलेश चरवड, सुरेशअण्णा गुजर, अहिरेगावचे माजी उपसरपंच सत्यनारायण आबा वांजळे, मारुती किंडरे, रमेश धावडे, गणेश धावडे, युवराज मोरे, माणिक मोकाशी, त्र्यंबक मोकाशी, विजय गायकवाड, बाळासाहेब दांगट या पदयात्रेत सहभागी झाले होते. दिलीप बराटे यांनी आज घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक, तरुण, महिला यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी नागरिकांनी बराटे यांना विविध समस्यांची जाणीव करून दिली. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्वच पदाधिकारी एक दिलाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप बराटे यांचा प्रचार करीत आहेत.
कसब्यात लाट आहे पण … परिवर्तनाची

———————————————
कसबा विधानसभा मतदार संघात लाट आहे पण ती नरेंद्र मोदी यांची नाही तर परिवर्तनाची लाट आहे , या मतदार संघात कसबा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक मानकर यांच्या प्रचाराने चांगलीच रंगत आणली आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार दीपक मानकर यांनी काल कसबा विधानसभा मतदार संघातून अनेक जुन्या इमारतींबाबत अभ्यास करून जुन्या वाड्यांचा प्रश्न आपण लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. येथे लाट आहे पण ती परिवर्तनाची आहे आपल्या उमेदवारीमुळे येथील प्रश्न आता रेंगाळत पडणार नाही तर वेगाने सुटतील अशी आशा मतदारांच्या कडून व्यक्त होते आहे असे यावेळी मानकर यांनी सांगितले
त्यांच्या प्रचारानिमित्त पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारपेठ येथून सुरू झालेली पदयात्रा केसरीवाडा, नारायण पेठ, मोदी गणपती, मुंजोबाचा बोळ, चित्रशाळा चौक, प्रभात प्रेस, माती गणपती येथील गुप्ते मंगल कार्यालय येथे समारोप करण्यात आला. यावेळी दीपक जगताप, भगवान पालकर, दत्ता सागरे, सुरेश बांदड, कैलास कांबळे, रजनी पाचंगे, घारेताई व अनेक स्थानिक गणपती मंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते. पुणे शहरातील बोहरी समाजाचे धर्मगुरू अब्देअली भाईसाहब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून मानकर यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला. धर्मगुरू अब्देअली भाईसाब यांनी मानकर यांना निवडणुकीत आपला पाठिंबा जाहीर केला. कसबा विधानसभा मतदारसंघात शनिवार, नारायण व सदाशिव पेठेमध्ये मोठय़ा प्रमाणावर जुने वाडे आहेत. गेली अनेक वर्षे विविध कारणांमुळे त्यांचा विकास झालेला नसून, मोडकळीस आलेले हे वाडे धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या वाड्यांचा विकास साधताना भाडेकरू व मालक या दोघांचाही समन्वय साधून विकास करण्याबाबत मानकर यांनी दिशा दिली. आपण लवकरच भाडेकरू व मालक यांच्याशी समन्वय साधणार असून यातून नक्कीच सकारात्मक मार्ग निघेल, अशी मला आशा आहे. वाडा मालकांचे नुकसान होऊ न देता विकसकांना जादा एफएसआय देवून या ठिकाणी मध्यम स्वरूपाचे गृहप्रकल्प उभारणीला माझे प्रोत्साहन राहील. ऐतिहासिक वास्तूंच्या आजूबाजूचा परिसर विकासापासून वंचित राहिला आहे. राज्य व केंद्र शासनाच्या जाचक अटींमुळे हा विकास रखडला असून, पुरातत्व विभागाकडे आपण या अटी शिथिल करण्याची मागणी करणार असल्याचे जाहीर केले. विकास करताना मात्र पुण्याची ओळख असणारी वाडासंस्कृती जतन करून विकास करणार असल्याचे मानकर यांनी सांगितले. अनेक वर्षांपासून येथील नागरिक जीव मुठीत घेवून राहत आहेत. त्यांना आतातरी आपल्या हक्काचे घर मिळावे, याकरीता मी प्रयत्न करणार आहे




