पुणे-गेली 15 वर्षे शिवाजीनगर मतदारसंघाचा गतीमान विकास हेच ध्येय ठेऊन मी काम केले. विनायक निम्हण यांनी मतदारसंघातील पायाभूत नागरी सुविधांमध्ये भर पडावी, यासाठी आमदार निधी आणि विशेष निधीचा 100 टक्के वापर केला. गरीबातील गरीब माणसाचे जीवनमान उंचवावे, रस्ते, पाणी, वाहतूक, कचरा निर्मूलन, आरोग्य, शिक्षण याबरोबरच रोजगार, पर्याारण संवर्धन, व्यायमशाळांचा प्रसार, महिलांचे आर्थिक सुबत्तीकरण आदी प्रत्येक बाबतीतच कामे करून विकासकामांना गती दिली. दूरदृष्टी आणि जिद्द या जोडीला नागरीकांचा विश्वास राहिल्याने मी हा विकास साधू शकलो. विकास ही कायमची प्रकि‘या असून विकासाची ही गती राखण्यासाठी या निवडणुकीत आपण मला पुन्हा विजयी करावे, असे आवाहन शिवाजीनगर मतदारसंघातील काँग‘ेस-पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे)चे उमेदवार विनायक निम्हण यांनी आज पदयात्रेच्या समाप्तीप्रसंगी नागरीकांना केले.
विनायक निम्हण रविवारी सकाळी वडारवाडी परिसरात पदयात्रा काढून मतदारांना मत देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत ‘मत कोणाला-काम करणार्याला’ अशा घोषणांनी सारे वातावरण दुमदुमून गेले.. यावेळी नगरसेवक मुकारी अलगुडे, माजी मंत्री सुरेश नवले, युवक काँग‘ेसचे धहराध्यक्ष कैलास पवार, रामदास पवार, औज धोत्रे, दत्तू कुसाळकर, सदानंद जोशी, बी.टी. देवकर, शिवाजी जाधव, विष्णू जाधव, शिवराम पवार, विनोद मंजाळकर, बंटी वडार, राकेश विटकर, अनिल अलगुडे, रिझवान शेख आदी उपस्थित होते. निम्हण म्हणाले, शिवाजीनगर मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या जागरुक मतदारसंघ असून येथील नागरीकांनी गेली 15 वर्षे कामावर विश्वास दाखविला, , यामतदारसंघात गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा अहवाल मी घरोघर
पोहोच केला आहे. अजून खूप कामे पुढील पाच वर्षात मार्गी लावायची असून राज्य व केंद्र सरकारचा वाढीव निधी या विकासकामांसाठी मी आणेल, असे ते म्हणाले. या जोडीलाच पुणे शहराच्या विकासातील मुबलक पाणीपुरवठा, मेट्रो
प्रकल्प, रेल्वेचे हडपसर टर्मिनल, नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढत्या रोजगारासाठी गुंतवणुकीस प्रोत्साहन अशा कामांसाठीदेखील या शहरातील आमदार म्हणून मी पाठपुरावा करीत राहील, असे त्यांनी सांगितले.
पुणे शहर ग्लोबल सिटी बनत असताना पुण्याचे पुणेरीपण हरवू नये, यावर माझा भर असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेला मिळावा, यावर माझा आधीप्रमाणेच भर राहणार आहे. मतदारसंघात केलेल्या विकास कामांबद्दल माहिती देताना ते म्हणाले, की पुण्यातील पहिला उड्डाणपूल विद्यापीठ चौकात झाला, पहिला ग‘ेडसेपरेटरही माझ्याच मतदारसंघात झाला. पुणे महापालिकेचे अनेक विकासप्रकल्प मार्गी लागण्यासाठी व राज्य शासनाच्या योजनांची अमलबजावणी होण्यासाठी मी सातत्याने काम करीत राहिलो. पाण्याचा थेंब न
थेंब वाचावा यासाठी ‘पाणी बचाओ’ आंदोलन तर केलेच, शिवाय नादुरुस्त गळके हजारो नळ स्वखर्चाने दुरुस्त केले.
व्यायाम, खेळाची मला आवड असून माझ्या आमदारनिधीतून 75 हून व्यायामशाळांना तसेच पोलिसांच्याही व्यायामशाळांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला, हॉकीची पंढरी समजल्या जाणार्या खडकीमध्ये अॅस्ट्रोटर्फ मैदान उभारले, तसेच पदके मिळवणार्या खेळाडूंना दीड कोटींची रक्कम राज्य शासनाकडून मिळवून देण्यासाठी मी आग‘ही राहिलो, असे सांगून निम्हण म्हणाले की, पर्यावरण संवर्धन, स्त्रीभ‘ुण हत्या विरोधी जागरण आणि सायकलचा वापर वाढावा यासाठी कन्याकुमारी ते काश्मिर असा सायकल प्रवास तीन टप्प्यात केला. दरवर्षी कि‘केट, कॅरम अशा क‘ीडास्पर्धांचे आयोजन, वस्त्यांतील तरुणांनादेखील खेळासाठी मैदान मिळवून देणे अशी अनेक कामे माझी वर्षानुवर्षे चालूच राहिली, असे ते म्हणाले.
एकच ध्येय, शिवाजीनगरचा सर्वांगीण विकास- विनायक निम्हण
‘जय हो…अभय हो’ नारा देत भव्य वाहन रॅली
पुणे- हातात पंचाजेचित्र व पंजाचेचित्र असलेलेझेंडेघेवून दुचाकी व चारचाकी वाहनांवर स्वार
झालेलेशेकडो कार्यकर्तेव महिला, ‘जय हो..अभय हो’चा नारा, स्पीकरवर वाजणाऱ्या ‘नवीन वादळ
घुमतया..अभय छाजेड नावाचं’ या गीतानेदुमदुमून गेलेलेवातावरण अशा उत्साहपूर्ण वातावरणात
पर्वती विधानसभा मतदारसंघाचेकॉंग्रेस –पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडेगटाचेउमेदवार अॅड. अभय
छाजेड यांनी भव्य वाहन रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघच पिंजून काढला.
रविवारचा सुट्टीचा मुहूर्त साधत अभय छाजेड यांनी भव्य वाहन रॅलीचेआयोजन केलेहोते.
सारसबागेजवळील अण्णाभाऊ साठेपुतळ्यापासून या भव्य वाहन रॅलीला प्रारंभ झाला. तरुणांबरोबरच
महिलांचा या रॅलीतील सहभाग लक्षणीय होता.’बघता काय ..सामील व्हा’, ‘आपका हाथ.. कॉंग्रेस के
साथ’, ‘जय हो..अभय हो’, अशा घोषणा देणाऱ्या महिला कार्यकर्त्या, हातात पंजाचेचित्र, व झेंडे
घेवून तेहवेत फिरविणारेतरुण कार्यकर्तेअसलेली सुमारेदोन किलोमीटर अंतर असलेल्या या भव्य
वाहन रॅलीमुळेविजयी मिरवणुकीचेस्वरुप आलेहोते. स्वत: अभय छाजेड हेनगरसेवक मिलिंद काची
यांच्या दुचाकीवर मागेबसून मतदारांना मतदान करण्याचेआवाहन करत होते. रस्त्यानेअत्यंत
शिस्तबद्ध,वाहतुकीला अडथळा न येवूदेता मतदारांना आवाहन करीत निघालेल्या या भव्य वाहन रॅलीला
मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. घराच्या बाहेर येवून व रस्त्याच्या दुतर्फा थांबून मतदार
छाजेड यांना शुभेच्छा देत होते. या भव्य वाहन रॅलीमध्येउपमहापौर आबा बागुल, माजी उपमहापौर
प्रसन्ना जगताप,नगरसेवक मिलिंद काची, शंकर पवार, युवराज शहा, डॉ. स्नेहल पाडळे, मुकेश धीवार,
सचिन आडेकर, बालाजी तेलकर, रवी ननावरे, प्रकाश आरणे, महेश वाबळे, सुनील शिंदे, यासीन शेख,
तसेच सौ. मृणाल छाजेड यांच्यासह शेकडो कार्यकर्तेव महिला सहभागी झाल्या होत्या.
तत्पूर्वी रविवारी पहाटेछाजेड यांनी पद्मावती-संभाजीनगर येथील विठ्ठल मंदिरात जाऊन काकड
आरती केली. त्यांच्यासमवेत अनिल सातपुतेव टिळेकरमामा हेउपस्थित होते. त्यानंतर छाजेड यांनी
तळजाई टेकडीवर सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या.जेष्ठ नागरिकांनी
छाजेड यांना आशीर्वाद देत तळजाई टेकडी वाचविण्याची विनंती केली. टेकडीच्या हिरवळीसाठी व
विकासाला आपण प्राधान्य देणारा असल्याचेछाजेड यांनी यावेळी सांगितले. मोरेवस्तीला भेट देवून
त्यांनी तेथील रहिवाशांना मतदान करण्याचेआवाहन केले. त्यांच्यासमवेत महेश वाबळे, प्रकाश आरणे,
द.स. पोळेकर, वैभव सेठिया, अनिल महाडिक आदी कार्यकर्तेउपस्थित होते. त्यानंतर छाजेड यांनी
गोवर्धन सोसायटी व पर्वतीदर्शन सोसायटीला भेट देवून तेथील नागरिकांशी समस्यांबाबत चर्चा
केली वाहतुकीचा प्रश्न, मेट्रो. टोल याबाबत येथील रहिवाशांनी आपली मतेव्यक्त केली.शहराच्या
वाहतुकीच्या प्रश्नामध्येआणि मेट्रोसाठी आपण जातीनेलक्ष घालून पाठपुरावा करूअसेआश्वासन
छाजेड यांनी यावेळी दिले. त्यांच्यासमवेत उपमहापौर आबा बागुल, अरुण सिंघवी, विजयकांत कोठारी,
श्री सुरतवाला, अनिल नहार आदी उपस्थित होते.
दरम्यान, अभय छाजेड हेमहाराष्ट्र अॅथेलेटिक्स संघटनेचेउपाध्यक्ष असल्यानेछाजेड यांच्यासाठी
जेष्ठ क्रीडासंघटक व मार्गदर्शक राम भागवत, सुरेश गुजराथी, धनंजय दामले, डॉ.मधुकर झंवर,
महेश मेढेकर, शाम कोठारी, काका पवार, मधुकर तापकीर यांच्यासह आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटूतृप्ती
मुरगुंडे, आशियाई अॅथलिट प्रतिक निनावे, तसेच राष्ट्रकुल युवा विजेती भाग्यश्री शिर्के, आशियाई
विजेता अनिश जोशी, राष्ट्रीय विजेती योनिया शिंदेव ज्युली बधे, सुरक्षा जाधव आदि खेळाडूंनी तसेच
पुणेशहरातील प्रल्हाद सावंत, मनोज भोरे, प्रकाश तुळपुळे, चंद्रकांत शिरोळेंसह अनेक राष्ट्रीय
क्रीडासंघटकांनीही दहा हजार आवाहन पत्रेघरोघरी वाटून अभय छाजेड यांना आपला पाठींबा व्यक्त
केला आहे.
आबांचे वक्तव्य चुकीचेच पण भावनेच्या भरात ;त्यामुळे विषय वाढवू नये- शरद पवार
मुंबई- राष्ट्रवादीचे नेते आर.आर.पाटील यांचे वक्तव्य अत्यंत निदंणीय आहे. आबांचे वक्तव्य चुकीचेच असून पक्षाच्या धोरणाशी विसंगत आहे भावनेच्या भरात वक्तव्य केल्याची पाटील यांची कबुली दिली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माफीही मागितली, त्यामुळे विषय वाढवू नये, असेही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
तसेच राज्यातील मतदार गोंधळलेला नसून तो अधिक सजग झाला आहे, त्यामुळे मतदार राज्याच्या हिताचा निर्णय घेतील, याची खात्री असल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी वार्तालाप केला.
पवार म्हणाले, यंदा स्वतंत्र लढत असल्याचे ही महत्त्वाची निवडणूक आहे. आतापर्यंत 60 गुणांचे काम केले असून 40 गुण मतदारांच्या हातात असल्याचेही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. आबांनी आपल्याच तासगाव मतदारसंघातील मनसेच्या उमेदवार सुधाकर खाडेने ‘निवडणूक होईपर्यंत तरी बलात्कार करायला नको होता’ असे म्हणत खळबळ माजवून दिली आहे.
विषाखापट्टनम् किनार्यावर आदळले ‘हुदहुद’ -दोघांचा बळी
नवी दिल्ली-आज (रविवार) सकाळी ताशी 195 किलोमीटर वेगाने ‘हुदहुद’ चक्रीवादळ विशाखापट्टणमला धडकले. सोसाट्याच्या वार्यासह मुसळधार पावसामुळे विशाखापट्टनममध्ये अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. पावसाने दोन जणांचा बळी घेतला आहे.लोकांची धावपळ उडाली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘हुदहुद’ हे चक्रीवादळाने आज (रविवार) सकाळी 11 वाजेच्या सुमारास विशाखापट्टनम जवळील कैलासगिरीमध्ये दस्तक दिली. काही तासांतच हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टनमच्या किनार्यापट्टीला धडकण्याची शक्यता आहे. विशाखापट्टनममध्ये सोसाट्याच्या वार्यासह मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.
चक्रीवादळाचा आवाका 40 किलोमीटरपर्यंत पसरला आहे. विशाखापट्टनमच्या किनार्यावर चक्रीवादळ धडकेल तेव्हा त्याचा वेग ताशी 180 किलोमीटर असेल. तसेच समुद्रात 30 मीटर ऊंचीला लाटा उसळू शकतात. यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या आंध्र प्रदेश आणि ओडिशात अनेक शहरात ताशी 140 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वार्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. समुद्रात 15 ते 20 फूट ऊंचीच्या लाटा उसळल्या आहेत. त्यामुळे किनार्यावरील लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेश, ओडिशात एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यातील जवळपास दोन लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री अधिकार्यांसोबत चर्चा केली. आपात्कालिन स्थितीत करण्यात आलेल्या उपाययोजनेचाही मोदींनी आढावा घेतला.
तत्पूर्वी वादळाच्या तडाख्याच्या भीतीने आंध्र प्रदेश आणि ओडिशातील सुमारे पाच लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. आठ लाख लोकांना एसएमएस पाठवून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर भुवनेश्वरहून सुटणार्या 40 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेने 75 रेल्वेगाड्या रद्द वा त्यांचे मार्ग बदलण्याची तयारी केलेली आहे.
हवामान खात्यानुसार, दक्षिण ओडिशा व उत्तर आंध्रच्या किनारपट्टी भागाला वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस होण्याचा धोका आहे. विद्युत पुरवठा ठप्प होऊ शकतो. रेल्वे आणि रस्ते वाहतूकही ठप्प होण्याची भीती आहे. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी वादळ विशाखापट्टणमहून 250, तर ओडिशाच्या गोपालपूरहून 350 किलोमीटरवर होते.
आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी, श्रीकाकुलम, पश्चिम गोदावरी, विशाखापट्टणम, विजियानगरमला तर ओडिशामधील कोरापूट, मलकानगिरी, नबरंगपूर, रायगडा, गजपती, गंजमला वादळाचा धोका निर्माण झाला आहे.
एनडीआरएफचे जवान आंध्र प्रदेश, ओडिशात तैनात आहेत.
आठ लाख लोकांना एसएमएस पाठवून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर भुवनेश्वरहून सुटणार्या 40 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेने 75 रेल्वेगाड्या रद्द वा त्यांचे मार्ग बदलण्याची तयारी केलेली आहे.
तापकीरांना चाळीस हजारांचे मताधिक्य द्या-तावडे
कात्रज : “खडकवासला पोटनिवडणुकीत इतिहास घडविला. आता भीमराव तापकीरांना चाळीस हजारांचे मताधिक्य द्या. त्यांना मानाचे स्थान देतो,‘‘ असे आश्वासन विनोद तावडे यांनी धनकवडी येथील प्रचारसभेत दिले. या वेळी खासदार अनिल शिरोळे, पुरंदर हवेली मतदारसंघाच्या उमेदवार संगीताराजे निंबाळकर, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे, अरुण राजवाडे, वर्षा तापकीर, दिगंबर डवरी उपस्थित होते.
तावडे म्हणाले, “”पंधरा वर्षे विकास तर झाला नाही, मग राज्यावर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज कसे झाले. मतदारांनो, विचार करण्यापेक्षा भूलथापांना बळी न पडता मतदान करा.‘‘ तावडे यांनी या वेळी आर. आर. पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करत, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांचे नाव जे घेतात त्यांच्याच जिभेने समस्त महिलांचा अपमान केला आहे. आबांच्या पोटात जे आहे तेच ओठावर आले आहे. त्यांना सत्तेचा माज आणि मस्ती आली आहे, असा घणाघात केला.
पतित पावन संघटनेचा मेधा कुलकर्णी यांना पाठिंबा
पुणे : पतित पावन संघटनेने कोथरूड मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मेधा कुलकर्णी यांना शनिवारी पाठिंबा जाहीर केला. पतित पावन संघटनेचे कार्याध्यक्ष सीताराम खाडे व महिला अध्यक्षा अनिता पाटील यांनी कुलकर्णी यांना भेटून पाठिंबा जाहीर केला.
या वेळी पाटील म्हणाल्या, “”कुलकर्णी कार्यक्षम लोकप्रतिनिधी असून, तीनवेळा बहुमताने निवडून आल्यावर नगरसेविका म्हणून अत्यंत चांगले काम करून दाखवले आहे. कोथरूड मतदारसंघाच्या आमदार म्हणून त्या यशस्वी ठरतील.‘‘ खाडे म्हणाले, “”कुलकर्णी यांच्या प्रचारासाठी पतित पावनचे प्रभाग अध्यक्ष संतोष लांडगे, ज्ञानोबा भरेकर, सुधाकर जाधव, संजय येनपुरे, अण्णा बांगर, लहू लोणारे, सतीश लोंढे, सुनील कदम हे कार्यकर्ते सक्रिय सहभाग घेत आहेत.‘‘
वस्ती भाग स्वच्छ ठेवण्याकरिता जन सहभागातून योजना राबवू, असे कुलकर्णी यांनी या वेळी सांगितले. कल्पना पुरंदरे, पुणे शहर उपाध्यक्ष जयंत भावे, प्रशांत हरसुले, मतदारसंघ अध्यक्ष जगन्नाथ कुलकर्णी, सरचिटणीस सोमनाथ गुंड, आशीष पुरंदरे, गणेश पासलकर, मतदारसंघाचे युवा मोर्चा अध्यक्ष रितेश वैद्य, उदय कड व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रुपी बँकेचे पुनरुज्जीवन करा
.पुणे / प्रतिनिधी :
रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक निर्बंधामुळे दीड वर्षापासून अडचणीत आलेल्या रुपी बँकेचे पुनरुज्जीवन करा, अशी मागणी रुपी बँकेच्या खातेदार, ठेवीदारांकडून करण्यात आली.
रिझर्व्ह बँकेकडून घेतल्या जाणार्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्यासाठी पुणेकर नागरिक कृती समिती व रुपी बँक बचाव समितीच्या वतीने खातेदार व ठेवीदारांच्या वतीने अलका टॉकीज चैाकामध्ये साखळी आंदोलन केले. यावेळी संघर्ष समितीचे नरेश राऊत, गणेश देशपांडे, किशोर बावीस्कर, सुधा धुपकर आदींसह ठेवीदार व खातेदार मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षांपासून रिझर्व्ह बँकेवर आर्थिक निर्बंध घातले असून, त्यामुळे हजारो ठेवीदार व खातेदार अडचणीत आले आहेत. बँकेतील संचालकांच्या गैरव्यवहारामुळे रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेवर आर्थिक निर्बंध टाकले आहेत. त्यानंतर तातडीने बँकेचे अन्य बँकेत विलीनीकरणासाठी प्रय▪करण्यात आले, परंतु त्यावर निर्णय झाला नाही. सध्या पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरणासंदर्भात प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यावरही अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही
टँकरमाफियांचा बंदोबस्त करणार-विनोद तावडे
पुणे –
भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यास वडगावशेरी भागातील बीआरटी, अनधिकृत बांधकामे, स्थानिक नेत्यांची दादागिरी व टँकरमाफियांचा कायमचा बंदोबस्त करणार असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सांगितले. वडगावशेरीतील भाजपचे उमेदवार जगदीश मुळीक यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. आघाडी सरकार कुचकामी असून, पंधरा वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराशिवाय या सरकारने काहीच केले नाही. महाराष्ट्र तरुणांच्या हातात देण्याचा मोदींचा मानस आहे.
दरम्यान, एका जाहीर सभेत बलात्कारासंदर्भात वक्तव्य करताना आर. आर. पाटील यांना लाज का वाटली नाही, असा प्रश्न उपस्थित करीत, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सत्तेचा माज चढला असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार मेधा कुलकर्णी यांच्या प्रचारार्थ डहाणूकर येथील सभेत तावडे बोलत होते. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तावडे म्हणाले, सांगली येथील एका उमेदवारावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. याला अनुसरून आर. आर. पाटील यांनी संबंधित उमेदवाराने बलात्कार निवडणुकीनंतर करायला हवा होता, असे वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य हा सत्तेचा माज आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रचंड घोटाळे करून ठेवले असून, भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांची चैाकशी करून त्यांना तुरुंगात टाकू, असा इशारा तावडे यांनी यावेळी दिला.
अमित राज ठाकरे यांची रॅली
हडपसर -महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणारी राजसाहेबांची विकासाची ब्ल्यू प्रिंट हडपसर मतदारसंघात प्रमोदनाना भानगिरे ताकदीनिशी राबवतील, असे प्रतिपादन अमित राज ठाकरे यांनी मांजरी येथे बोलताना केले.
मनसे उमेदवार प्रमोदनाना भानगिरे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली हडपसर मतदारसंघात काढण्यात आली, यावेळी ते कनोजिया नगरसेवक बाबू वागसकर, नीलम कुलकर्णी, रिटाताई गुप्ता, युवराज मोहरे, शिवाजी भाडळे, साईनाथ बाबर, मंदाताई शेडगे, विशाल ठोरे, विनोद धुमाळ, किशोर घायरकर, माधव मोघे, काका राऊत, अनिल म्हेत्रे, राजू ओरसे, मंदाताई जाधव, प्रतीक्षा पाटील, पूनम शेंडकर, तेजस्विनी ढमढेरे, अजय न्हावले, सनी लांडगे, अजय ससाणे, सागर बार्देस्कर, भूपाल वाबळे, संतोष शिंदे, शिवा शेवाळे, अमर घुले, सागर चव्हाण, विशाल तांबे आदी उपस्थित होते.
हडपसरवर भगवा फडकणारच : जयसिंग भानगिरे

हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आ. महादेव बाबर यांच्यासारख्या निर्भीड लढाऊ नेतृत्वाची गरज असल्याने आम्ही सर्वजण उघडपणे विकासासाठी त्यांच्या पाठीशी असल्याचे परखड विचार जयभवानी चौकात बोलताना व्यक्त केले. शिवसेनेचा भगवा फडकणारच असेही भानगिरे म्हणाले. युवा नेते जयसिंग भानगिरे यांनी आमदार महादेव बाबर यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला त्यावेळी ते बोलत होते.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात कोपरासभा, पदयात्रा, गाठी-भेटी, संस्था यांच्या वैयक्तिक भेटीवर सर्व उमेदवारांनी भर दिला आहे. राज्य राष्ट्रीय पातळीवरील नेतेमंडळींची जाहीर सभा त्यामुळे मतदारसंघात रिक्षा, घोषणा, कार्याचा आढावा या बाबींवर प्रत्येकांनी जोर दिला आहे. शेवटच्या दोन-तीन दिवसांसाठी अपक्षांच्या रिक्षाफेरीने मैदानात उतरले आहेत.
हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आमदार महादेव बाबर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सकाळी महंमदवाडी परिसरात जयभवानी चौकातून आमदार बाबर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाग घेतला.
काम करेल त्यालाच मत ; महिला, खेळाडू, ज्येष्ठ नागरीकांचा निर्धार

काँग्रेस-पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे)चे शिवाजीनगर मतदारसंघातील उमेदवार विनायक निम्हण यांच्या प्रचारासाठी खडकी येथे महिला मेळाव्याचे, काँग्रेस भवन येथे वकील मेळाव्याचे आणि क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षक, खेळाडूंच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी विनायक निम्हण यांच्याच पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
वकील मेळाव्यात बोलताना पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड़ विकास ढगे-पाटील यांनी सांगितले की, शिवाजीनगर न्यायालयात दिवाणी व फौजदारी न्यायालय, भारती भवन येथे कौटुंबिक न्यायालय, मार्केट यार्ड येथे सहकार न्यायालय, वाकडेवाडी येथे कामगार न्यायालय असून, ही सर्व न्यायालये एकत्र आणण्यासाठी विनायक निम्हण यांचा राज्यशासनाकडे पाठपुरावा सुरू असून, त्याला नक्कीच यश येईल. यावेळी अँड़ विजयराव सावंत मुस्लिम अँड़ असोसिएशनचे अध्यक्ष अँड़ शाहीद अख्तार, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अँड़ मिलिंद पवार, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सनी निम्हण, अँड़ विजयराव सावंत, संजय बालगुडे, अँड़ एकनाथ जावीर, अँड़ चंद्रशेखर घाटे, अँड़ फय्याज शेख आदींसह ५00 हून अधिक वकील मेळाव्याला उपस्थित होते.
पुणे विद्यापीठ, कमला नेहरू उद्यान, हनुमान टेकडी आदी ठिकाणी विनायक निम्हण सपत्नीक सायकलवरून व्यायामासाठी येताना आम्ही पाहतो. आम्हा ज्येष्ठ नागरिकांची आस्थेने विचारपूस करून विकासाचे मला कोणतेही काम सांगा, मी ते करणारच असे विश्वासाने सांगणारे विनायक निम्हण हे कार्यक्षम असल्याचे ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य विवेक कदम यांनी सांगितले. यावेळी काका धर्मावत, शिवा मंत्री, भाऊसाहेब रानवडे, हिरामण बालवडकर आदी उपस्थित होते. पुणे विद्यापीठ, कमला नेहरू, हनुमान टेकडी आदी ठिकाणी नियमितपणे फिरायला येणार्यांच्या गाठीभेटी घेतल्या.
पाॅवर ट्रान्सफाॅर्मर नादुरुस्त झाल्याने वीजपुरवठा खंडित
नांदेड फाटा, नऱ्हे भागात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा
पुणे : महावितरणच्या पर्वती विभागातील खडकवासला २२/११ केव्ही उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र (पाॅवर ट्रान्सफाॅर्मर) आज (दि. ११)दुपारी सव्वाचार वाजता नादुरुस्त झाले. त्यामुळे नांदेड फाटा, वडगाव, धायरी व नऱ्हे या गावातील वीजपुरवठा विस्कळीत झाला. तथापि, रात्री ८ वाजेपर्यंत नांदेड फाटा भागातील काही परिसर वगळता उर्वरित सर्व भागात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, खडकवासला उपकेंद्रातील राेहित्र दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे.
माळीणचा विकास आराखडा तयार करणार : कुलगुरू
दरड कोसळून उद्ध्वस्त झालेल्या माळीण गावाचे पुनर्वसन करण्यासोबतच माळीण गाव मॉडर्न बनविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गावाचा विकास आराखडा तयार करणार आहे. त्यासाठी आर्थिक सहकार्य केले जाईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी शनिवारी दिली. तसेच या गावातील १३ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च विद्यापीठ करणार असल्याचे डॉ. गाडे यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या भूगोल, समाजशास्त्र आणि विज्ञान शाखेचे विभागप्रमुख व तज्ज्ञ प्राध्यापकांच्या सहभागाने गावाचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. त्यात भौगोलिक क्षेत्राचा अभ्यास करून कृषी क्षेत्रात विकास कसा करता येऊ शकतो, त्यावरही भर दिला जाणार आहे. गावाचे आराखड्यानुसार विकास करण्यासाठी सर्व आर्थिक मदत करण्यात येणार आहे. माळीण पूर्णत: मॉडर्न गाव बनविण्यासाठी विद्यापीठाचा प्रय▪राहणार असल्याचे गाडे यांनी सांगितले.
माळीण दुर्घटनाग्रस्त मुलांचा शैक्षणिक खर्च विद्यापीठाकडून करण्यात येत आहे. त्या मुलांचे पीएच.डीपर्यंत सर्व शिक्षणाची जबाबदारी विद्यापीठाने उचलली आहे. त्याचबरोबरच विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. त्या दोन मुलांचे विद्यापीठाच्या विद्यार्थी विमा योजनेंतर्गत प्रत्येकी ५0 हजार रुपये संबंधित नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आल्याचे डॉ. गाडे यांनी सांगितले
‘करवा चौथ’ उपवास करणार नाहीत ‘बिग बी ‘
‘करवा चौथ’ उपवास करणार नाहीत ‘बिग बी ‘
गेली पाच दशके सिनेरसिकांच्या हृदयसिंहासनावर राज्य करणारे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७२ वा वाढदिवस असून
वाढदिवस आणि ‘करवा चौथ’ असा योग यंदा जुळून आला आहे. ‘करवा चौथ’ हे व्रत उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात ठेवले जाते. खरं तर महिला यादिवशी उपवास करतात. मात्र, बच्चन हेही हा उपवास नित्यनेमाने करत आलेले आहेत. यंदा मात्र बच्चन यांनी उपवास टाळला. याबाबत काही पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ‘डॉक्टरांनी मनाई केल्यामुळे मला उपवास ठेवता आलेला नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपवास करणे शक्य नसले तरी ‘करवा चौथ’ मात्र पारंपारिक ढंगात आणि मोठ्या उत्साहात आमच्याकडे साजरा होत आहे. घरात महिला वर्गाची लगबग सुरू आहे. आम्हीही त्यांच्या आनंदात सामील झालो आहोत. आजचा दिवस ‘फॅमिली’साठीच राखून ठेवलाय.’ अभी तो मै जवान हूं…
अमिताभ यांनी आज केशरी रंगाचा झब्बा घातला होता. या पेहरावात ते अधिकच ‘जिंदादिल’ वाटत होते. ते हेरून एका पत्रकाराने तुमच्या तंदुरूस्तीचं गुपित काय?, असा असा प्रश्न विचारला. तेव्हा स्मितहास्य करत ‘चाहत्यांचं प्रेम आणि स्नेह हेच माझं टॉनिक आहे’, असं उत्तर बिग बी यांनी दिलं. माझी अजूनही काम करण्याची इच्छा आहे. तुमच्या प्रेमामुळे मला नक्कीच तेवढं बळ मिळेल, असेही ते पुढे म्हणाले. चिमुकली आराध्या माझ्यासाठी सर्वात खास अशी भेट आहे, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
मध्यमवर्गीयांसाठी स्वस्तात घरे योजना राबविणार – अभय छाजेड

पुणे -पर्वती मतदार संघात मध्यमवर्गीय मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून‘म्हाडा’च्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नकरूअ से पर्वती मतदारसंघाचे कॉंग्रेसचे उमेदवार अॅड. अभय छाजेड यांनी सांगितले
अभय छाजेड यांनी आज सकाळपासून वैयक्तिक व पद्यात्रेद्वारे मतदारांशी संपर्कसाधला. सकाळी महादेवनगर भागातील झोपडपट्टीमध्ये जावून त्यांनी तेथील नागिरकांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागातील रहिवाशांवर अन्याय न होता येथील ‘बीडीपी’ मधील बांधकामाचा प्रश्न आपण मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले त्यांच्यासमवेत माजी महापौर प्रसन्न जगताप, आबा जगताप, अवधूत मते व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यानंतरमाजी नगरसेवक शंकर पवार यांच्या कार्यालयापासून छाजेड यांच्या पदयात्रेला प्रारंभ झाला सिंहगड रस्ता बिग बझार ते सई नगर,सरिता नागरी फ़ेज२, सरिता विहार , नवश्या मारुतीचौक, समता नगर, गणपती नगर, गणेश मळा चौक, सिरता नागरी फ़ेज१, दत्तवाडी रस्ता,रक्षालेखा सोसायटी, दत्तवाडी, म्हसोबा चौक, लडकतवाडी रस्ता, भंडारी हॉटेल,सिंहगडरस्ता, स्टेट बँक कॉलनी असा मार्गक्रमण करीत पानमळा येथे पदयात्रा समाप्त झाली.
दत्तवाडी मधील पूरग्रस्तांच्या घराच्या मालकीचा प्रश्न मार्गी लागला असला तरी वाढीव बांधकामाचा प्रश्न अजून शिल्लक आहे तो मार्गी लावण्यासाठी आपण कटीबद्ध असूअसे छाजेड यांनी सांगितले . तसेच या भागात मध्यमवर्गीय मतदारांची संख्या मोठ्याप्रमाणात असून त्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाच्यामार्फत जमीन व बांधकाम व्यावसाियकांना वाढीव एफएसआय मिळवून देण्यासाठी आपण
प्रयत्न करूअसे छाजेड यांनी सांगितले . पदयात्रेमध्ये त्यांच्यासमवेत महाराष्ट्रप्रदेश कॉंग्रेस किमटीच्या सिचव प्रा. मनीषा पाटील, शंकर पवार , शिव मंत्री , सिचनआडेकर, तुकाराम पवार, सुधीर काळे,वैशाली अरुण धिमधिमे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या होत्या. पुणे शहर भीमशक्तीचे उपाध्यक्षवि जय ओहाळ व पुणे शहर सरचटणीस प्रज्ञावंत गायकवाड यांनी अभय छाजेड यांना पाठींबा देवून ते आजच्या पदयात्रेत सहभागी झाले होते.

