Home Blog Page 3824

भीमराव सातपुते यांचे निधन

0

पुणे मनपाचे सेवानिवृत्त कामगार भीमराव हिरामण सातपुते वय ८२ वर्षे यांचे ८ नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी २ मुले १ मुलगी सूना, नातवंडे व जावई आहे.
८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावरती वैकुंठ येथे अंत्यसंकार करण्यात आले त्यावेळी त्यांचे कुटूंब तसेच सामजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.
satpute

‘मिस्टर अन्ड मिसेस’ आणि ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ या नाटकांना सर्वोत्कृष्ट नाटकांचे पुरस्कार प्रदान

0

4

पुणे- सलाम पुणे च्या वतीने ‘मिस्टर अन्ड मिसेस’ आणि ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ या दोन नाटकांना यावेळी सर्वोत्कृष्ट नाटकांचे पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले तर पुण्यातील प्रसिध्द गायक चन्द्रशेखर महामुनी आणि जळगावचे ज्यु. अमिताभ बच्चन – शशिकांत पेडवाल यांना आणि पुण्यातील एकपात्री कलाकार संतोष चोरडिया यांना ‘सलाम ‘ पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
यावेळी एस एम जोशी सभागृहात चक्क ‘बिग बी ‘ अवतरले आणि सभागृहात एकच एकच कल्ला उडाला , या बिग बी ने मोठ्ठी धमाल रसिकांसमवेत उडविली … नाटक – सिनेमा यासह नृत्य , संगीत एकपात्री अशा सर्व कला क्षेत्रातील जाणकारांना , वैशिष्ट्यपूर्ण कलाकारांना , ज्येष्ठ रंगकर्मींना सन्मानित करून , त्यांच्या आणि नवोदितांच्याही कलाविष्काराचे कार्यक्रम सातत्याने सादर करून ‘सलाम पुणे’ या संस्थेने महारष्ट्रातील कला व संस्कृती जोमाने पुढे नेण्याच्या चळवळीला लक्षणीय गती दिली आहे त्यामुळे या संस्थेलाच आम्ही सलाम करतो अशी भावना येथे काल मराठी रंगभूमी दिन सोहळ्यात या बिग बी ने म्हणजे ज्युनिअर अमिताभ बच्चन अर्थात शशिकांत पेडवाल यांनी व्यक्त केली .
आनंद इंगळे , विद्याधर जोशी चिन्मय मांडलेकर , मधुरा साटम , अभिजित साटम , अजित भुरे , प्रियदर्शन जाधव , तसेच अनिरुद्ध जोशी, अजित भुरे .ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार निर्माता निलेश नवलाखा , अभिनेत्री डिम्पल चोपडे , मयुर लोणकर , दिग्दर्शक शिव कदम . दीपक सवाखंडे , वैभव पगारे , अभिनेत्री पूजा पुरंदरे . अभिषेक लोणकर , उषा शेट्टी , अनिल सोनपाटकी, संगीतकार हर्षित अभिराज,आदी रामचंद्र , निखिल महामुनी , भाग्यश्री पेंध्ये , सोनिया बर्वे ‘प्रेमाचे साईड इफेक्ट ‘ चे निर्माते विलास मेहेर , दिग्दर्शक कौस्तुभ कुलकर्णी ,आदी कलावंत तसेच वरिष्ठ पत्रकार अरुण लोणकर उपस्थित होते .
चंद्रशेखर महामुनी यांनी आपल्या खास अदाकरीत देव आनंद यांच्यावर चित्रित झालेली गाणी सादर करून प्रेक्षकांची वाहव्वा मिळविली तर भाग्यश्री पेंध्ये आणि अनुप कुलथे यांनी तबला आणि व्हायोलीन ची जुगलबंदी सादर केली ज्यु. बिग बी ने तर कार्यक्रमात धमाल उडविली . त्यांनी हॉट सीटवर केलेली प्रश्नोत्तरे आणि अमिताभ यांचे विविध चित्रपटात सादर केले संवाद , गाणी यामुळे रसिकांनी अक्षरशः प्रेक्षागृह डोक्यावर घेतले .रेखा -जया बच्चन पासून ते अभिषेक -ऐश्वर्या पर्यंतच्या बहारदार गप्पा त्यांनी येथे रसिकांशी केल्या . चिन्मय मांडलेकर ,आनंद इंगळे यांनी आपल्या मनोगतातून ‘ सलाम पुणे ‘ने सांस्कृतिक क्षेत्रात सर्वाधिक कार्यक्रम करून मराठी कलावंत आणि कलेला उत्तुंग प्रोत्साहन देणारे व्यासपीठ निर्माण करून दिल्याचे सांगितले सलाम पुणे चे अध्यक्ष शरद लोणकर यांनी या कार्यक्रमाचे विशेष आयोजन आणि संयोजन केले , मकरंद माळवे यांनी सूत्रसंचालन केले .

अनियंत्रित विकासाचा भस्मासुर रोखा : ‘राष्ट्रीय समाज पक्ष’ आणि ‘सेव्ह पुणे इनिशिएटीव्ह’ ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

पुणे :

नऱ्हे -आंबेगाव येथे पाच मजली इमारत कोसळल्याने पुण्यातील विकासाच्या भस्मासुराशी निगडीत अनेक प्रश्न समोर आलेले असल्याने नूतन मुख्यमंत्री यांनी हा अनियंत्रित भस्मासुर रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी ‘राष्ट्रीय समाज पक्ष’ आणि ‘सेव्ह पुणे इनिशिएटीव्ह’ संस्थे तर्फे करण्यात आली आहे .

अतिक्रमण काढणारी यंत्रणा जिल्हा प्रशासनाकडे येणे आवश्यक आहे असे हि मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीत म्हणले आहे . राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रवक्ते दीपक बिडकर आणि ‘सेव्ह पुणे इनिशिएटीव्ह’ संस्थेचे सचिव ललित राठी यांनी या मागणीबाबत माहिती दिली .

नव्याने बांधलेली, एक मजला अनधिकृत असलेली आणी कम्प्लिशन सर्टिफिकेट नसलेली पाच मजली इमारत कोसळल्यामुळे पुण्यातील वैध -अवैध बांधकामांचा वेग , त्यांना परवानग्या देणाऱ्यांची जबाबदारी ,इमारतींचे परीक्षण -गुणवत्ता नियंत्रण आणी अनियंत्रित विकासाचा भस्मासुरा संबंधी अनेक प्रश्न समोर आले आहेत

यापूर्वीही तळजाई पठार येथे अनधिकृत इमारत कोसळण्याची घटना घडलेली आहे . टेकड्यांवरील अतिक्रमण वाढत आहे . नव्याने समाविष्ट गावांमध्ये अतिक्रमण वाढत आहे . दुसरीकडे विकास आराखड्याशी संबंधित गोष्टी प्रलंबित आहेत.

जिल्हा प्रशासनाकडे अतिक्रमण काढण्यासाठी स्वतः ची यंत्रणा नाही ती मिळविण्यासाठी ‘सेव्ह पुणे इनिशिएटीव्ह’ ने मागील सरकार कडेही प्रयत्न केले होते . ती गरज पूर्ण करण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला जाणार आहे .

“पतियाळा’च्या महाराजांप्रमाणे पुण्याचे महापौर महागडी कार कचरा निर्मुलनासाठी वापरणार का ? राष्ट्रीय समाज पक्षाचा सवाल

0

पुणे :
स्वातंत्र्यपूर्व काळात 1930 मध्ये पतियाळाचे राजे भूपिंदर सिंह यांनी महागडी “रोल्स रॉईस’ कार कचरा वाहतुकीसाठी ठेवली होती, त्याप्रमाणे घन कचरा वाहतुकीच्यासाठी राखीव निधीतून महागडी कार स्वतःसाठी घेण्याचा निर्धार करणारे पुण्याचे महापौर त्या गाडीचा कचरा निर्मुलनासाठी थोडा तरी उपयोग करतील का? असा सवाल “राष्ट्रीय समाज पक्षा’ने विचारला आहे. पक्षाचे प्रवक्ते दीपक बिडकर यांनी पत्रकाद्वारे हा उपरोधिक प्रश्न विचारला आहे.

पुण्याचा कचरा निर्मूलनाचा प्रश्न गंभीर आहे. उरळीचे डम्पिंग बंद होण्याच्या मार्गावर असताना नवी जागा डम्पिंगसाठी उपलब्ध होत नाही. अशावेळी कचरा शहरात वर्गीकृत करून त्यावर प्रक्रिया करणे हा सर्वात चांगला उपाय आहे. त्यासाठी कचरा वर्गीकरण, जन जागृती, प्रक्रिया या मार्गाचा आग्रह पालिकेने सर्व प्रभागात धरायला हवा होता. त्याऐवजी निधीची वर्गीकरणाद्वारे पळवा पळवी करून महागड्या कार खरेदी करण्याचा अवलंब महापौर आणि सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस करीत आहे. हे अत्यंत अनुचित आहे.

महागडी कार स्वताच्या पैशातून घेवून पालिकेला भेट देण्याची क्षमता असलेले नेते जनतेच्या पैशाची उधळ पट्टी का करतात? असा प्रश्नही राष्ट्रीय समाज पक्षाने विचारला आहे.

पतियाळाचे राजे भूपिंदर सिंह महाराजांनी ज्याप्रमाणे देशाचा आत्म सन्मान राखण्यासाठी महागडी “रोल्स रॉईस’ कार कचरा वाहतुकीसाठी ठेवली त्याप्रमाणे कचरा वर्गीकरणासाठी पुणेकर नागरिकांच्या कर रुपी निधीचा सन्मान राखण्यासाठी महापौर महागडी कार कचरा वाहतूक, कचरा निर्मुलनासंबंधी जनजागृती यासाठी वापरून आदर्श निर्माण करणार का? असा उपरोधिक सवाल या पत्रकात करण्यात आला आहे.

“महापौरांनी आपला हट्ट सोडून द्यावा किंवा किमान आठवड्यातील एक दिवस हि गाडी कचरा विषयक जनजागृतीसाठी वापरून निधीचा योग्य कारणासाठी उपयोग करून पापक्षालन करावे. कचरा वेचकांना आठवड्यातून एकदा कामाच्या ठिकाणावरून घरी सोडावे’ असा सल्लाही या पत्रकात देण्यात आला आहे.

पारधी समाज विकास संघटनेच्यावतीने नायडू रूग्णालयामधील रुग्णांना फळेवाटप

0

शहरात वाढत जात असलेल्या डेंग्यू रुग्णांच्या आरोग्यासाठी पारधी समाज विकास संघटनेच्यावतीने नायडू रूग्णालयामधील रुग्णांना फळेवाटप करण्यात आली . पारधी समाज विकास संघटनेचे नेते यशवंत नडगम , संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार , उपाध्यक्ष सुरेश चॉकलेट पवार , कार्याधक्ष भाऊसाहेब पवार , जावेद शिंदे , चेतन शिंदे , मीटर पवार , ताई पवार , गणेश थोरात , सतीश दाभाडे , अंजू पवार , सुनील गोरे , प्रमोद दाभाडे , तानाजी वाघमारे , संग्राम थोरात , संजना पवार आदी उपस्थित होते .
-

शेतक-यांच्या प्रश्नांवरून भाजप सरकारला घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज

0

पुणे- शिवसेनेचे नेते आम्हाला भेटले, पण त्यांनी कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही, असा दावा राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.तसंच, राज्यात भाजपला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी अजूनही तयार असल्याचंही पवारांनी स्पष्ट केलंय. दुसरीकडे शेतमालाच्या दरावरून व शेतक-यांच्या प्रश्नांवरून भाजप सरकारला घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज असल्याचे संकेत पवारांनी दिले आहेत. शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबत भूमिका मांडली.
शरद पवार म्हणाले, मागील एक-दोन वर्षाच्या तुलनेत यंदा कापसाचा हमीभाव सरकारने खूपच कमी जाहीर केला आहे. हा दर अपेक्षेपेक्षा खूप कमी आहे. मागील काळात आमचे सरकार होते त्यापेक्षा हा दर सुमारे 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे. याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा. कापसाचे दर यंदा सरासरी हजार ते दीड हजार रूपयांनी उतरले आहेत. 2012 साली कापसाला प्रति क्विंटल 6 हजार तर, 2013 साली 5000 हमी भाव आमच्या सरकारने दिला होता. यंदा मात्र तो 3900 ते 4000 इतका खाली आणला आहे. कापूस फेडरेशनने कापूस खरेदी करणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सरकारने कापूस खरेदी करणे सुरु करावे. याचबरोबर नाफेडला अर्थसहाय्य करावे. साखरेचे दर यंदा खाली आले आहेत. असे असले तरी ऊस उत्पादकांना रास्त दर देऊन न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. नव्या सरकारने बाजार समित्या बरखास्त केल्या आहेत. त्याच्या निवडणुका लवकरात लवकर घेऊन लोकप्रतिनिधींच्या हाती बाजार समित्याचा कारभार सोपवावा असेही पवारांनी सांगितले.
शिवसेना-भाजपमध्ये सरकार स्थापनेवरून सुरू असलेला काथ्याकूट काही केल्या संपत नाहीए. आधी मंत्रिपदाच्या संख्येवरून, मग खात्यांवरून, मग उपमुख्यमंत्रिपदावरून आणि नंतर केंद्रातील मंत्रिपदावरून या जुन्या मित्रांमध्ये सातत्यानं खटके उडत आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा दोघांचाही प्रयत्न सुरू असताना, या दबावतंत्राचा भाग म्हणूनच, काही शिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादी नेत्यांची भेट घेतल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. परंतु, प्रवक्ते संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळून लावलं होतं. त्याला काही तास उलटत नाहीत, तोच शरद पवारांनी त्यांना उताणं पाडायचा प्रयत्न केलाय.
शिवसेनेचे नेते आम्हाला भेटले. त्यांच्याशी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली, पण त्यांनी कुठलाच प्रस्ताव दिला नसल्याचं पवारांनी सांगितलं. त्यांच्या या दाव्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. संजय राऊत खरं बोलताहेत की पवार,हा प्रश्न निर्माण झाला आहे
राज्यातील मतदारांनी यावेळी कुणालाच स्पष्ट बहुमत दिलं नाही. अशावेळी राज्यात स्थिर सरकार यावं, या उद्देशानंच आम्ही भाजपला पाठिंबा जाहीर केला होता आणि अजूनही आम्ही त्यासाठी तयार आहोत, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. भाजप-शिवसेनेशी युती झाल्यास सुंठेवाचून खोकला गेला, असंही ते हसत-हसत म्हणाले. भाजपच्या विचारधारेचा इथे संबंधच नाही, राज्याच्या हिताचा प्रस्ताव आल्यास आम्ही त्याला पाठिंबाच देऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं.वेगळ्या विदर्भाबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ, या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर त्यांनी नापसंती व्यक्त केली. कुठलाही मुख्यमंत्री शपथ घेताना राज्याच्या हिताचे निर्णय घेण्याचं अभिवचन घेतो. असं असताना, ते वेगळी भूमिका घेत असतील, तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं.
निवडणुकीचे निकाल कुणाला संपवत नसतात. मी पहिल्यांदा खासदार झालो तेव्हा भाजपचे फक्त दोन खासदार होते. तीच भाजप आज केंद्रात सत्तेत आहे, याकडे लक्ष त्यांनी वेधले
यंदा कापसाचे हमीभाव हजार ते दीड हजार रूपयांनी राज्य सरकारने कमी केल्यामुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांना भाजप सरकारने न्याय द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात केले. याचबरोबर ऊस उत्पादकांनाही रास्त दर देऊन न्याय देण्याची भूमिका घ्यावी, असे आव्हानही पवार यांनी केले.

जया बोलबच्चनगीरी जपून कर कितीदा अमितजींनी माफी कुणा -कुणा ची मागायची ?

0

अहो, अमिताभ ने मागितली शाहरुख ची माफी… बिच्चारी रेखा हि हळहळली ?
मुंबई- तशी जया बच्चन वाईट आहे असे कोणी म्हणत नाही , पण त्यांच्या फटकळ बोलण्याचे पडसाद मोठ्ठे उमटत आहेत आणि त्याचे आता गॉसीप हि होवू लागले आहे ‘हॅपी न्यू इअर’ या चित्रपटावर जळजळीत टीका करून जयाबाईंनी किंग खान शाहरुखला दुखावलं होतं. त्याबद्दल अमिताभ यांनी शाहरुखला मेसेज करून दिलगिरी व्यक्त केली आहे.जया बच्चन यांच्या ‘बोलबच्चनगिरी’मुळे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर हि दुसऱ्यांदा माफी मागण्याची वेळ आली आहे
शाहरुख-गौरी खानच्या ‘रेड चिलीज’चा ‘हॅपी न्यू इअर’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचतोय. केवळ अभिषेक असल्यानंच मी हा सिनेमा पाहिला, नाहीतर असल्या चित्रपटांच्या वाटेला मी जात नाही. आज चित्रपटनिर्मिती ही कला राहिली नसून, धंदा झालाय आणि म्हणूनच आपण सिनेमात काम करणं बंद केलंय, असा सतापही जया बच्चन यांनी व्यक्त केला होता. तरुणाईला हा ‘टीपी’ आवडलाय आणि त्यातला अभिषेक बच्चन तर ‘फुल टू हिट’ झालाय. पण, खवचट बोलण्यासाठी, खाष्टपणासाठी (कु)प्रसिद्ध असलेल्या जया बच्चन यांनी या सिनेमाचे जाहीर वाभाडे काढले आणि सगळेच चक्रावले. मी आजवर पाहिलेल्या चित्रपटांमधील हा सगळ्यात वाईट आणि अर्थहीन सिनेमा आहे, अशी बोचरी टिप्पणी त्यांनी केली होती.
जयाबाईंच्या या रोखठोक प्रतिक्रियेवर इंडस्ट्रीत तीव्र पडसाद उमटलेत. वास्तविक, कितीही वाईट सिनेमा असला तरी इंडस्ट्रीतला कुणीही कलाकार जाहीरपणे त्याची ‘लायकी’ काढत नाही. पण जयाबाईंनी तर आपल्या मुलानं काम केलेल्या चित्रपटावरच टीका केली. शाहरुख, गौरी, दिग्दर्शिका फराह खानच्या धंदेवाईक वृत्तीवर ताशेरे ओढले. ही टिप्पणी चुकीची आहे असंही नाही. पण अभिषेकच्या करिअरवर त्याचा परिणाम होऊ शकतो, हे दूरदर्शी आणि अनुभवी अमिताभ बच्चन यांच्या लक्षात आलं. ते टाळण्यासाठीच, बॉलिवूडच्या ‘शहेनशहा’नं आपल्या पत्नीच्या चुकीबद्दल ‘बादशहा’ची माफी मागितली आहे. शाहरुख किंवा त्याच्या चित्रपटाचा अपमान जयाला करायचा नव्हता, असा खुलासाही बिग बीनी केला आहे.

नवी पेठ विठ्ठल मंदिरात सामुदायिक तुलसी विवाह

0

dp
पुणे :

१३५ वर्षे परंपरा असलेल्या नवी पेठ विठ्ठल मंदिरात आज सामुदायिक तुलसी विवाह उत्साहाने संपन्न झाला . झाडे वाचवून पर्यावरण जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला . प्रमुख पाहुणे म्हणून ‘सेव्ह पुणे हिल्स इनीशिएटिव्ह’ चे संस्थापक आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रवक्ते दीपक बिडकर उपस्थित होते .

नवी पेठ विठ्ठल मंदिर ट्रष्ट चे अध्यक्ष श्रीकांत पवार ,सरचिटणीस सुभाष तोंडे ,नितीन नवले ,योगेश वराडे ,सुहास कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ….

0

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त काल ओकारेंश्र्वर मंदिर येथे त्रिपुरासुमाराचा वध सोहळा पार पडला.

यावेळी हा सोहळा पार पडल्यावर फटाक्यांची आकर्षक आतषबाजीही पुणेकरांनी अनुभवली. यावेळी तांडवनृत्य व दीपोस्तवाचेही आयोजन केले होते. त्याचीच काही क्षणचित्रे…….

am1

am2

am3

am4

am5

am6

am7

am8

श्री. गुरु गोरखनाथजी महाराज जयंती (प्रकट दिन ) संपन्न

0

m

श्री. गुरु गोरखनाथजी महाराज जयंती (प्रकट दिन ) निमित गुरु गोरखनाथ गोगाजी ट्रस्ट आणि लष्कर बेडा पंचायत , करण मकवानी मित्र मंडळ आणि अशोक संघेलीया भगत निशाण आखाडा आणि जय मातादी मित्र मंडळ या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले .

पुणे कॅम्प भागातील पुलगेट पोलिस चौकी समोरील गोगा समाधीस्थळ आवारात हे सर्व धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले . यामध्ये गुरु गोरखनाथजी सहस्त्रावली चे होमहवन झाले , तसेच , आळंदी येथील श्री. श्री . श्रीमंत योगी दिग्विजयनाथ महाराज यांच्या हस्ते श्री. गुरु गोरखनाथजी यांची महा आरती करण्यात आली . यावेळी पंडित शौनक जितेंद्र अभिषेकी यांनी गुरु गोरखनाथजी यांचे भजन – गायन केले .यावेळी उपस्थित भक्तांनी महाप्रसादचा लाभ घेतला .

यावेळी गुरु गोरखनाथ गोगाजी ट्रस्टचे अध्यक्ष सुदेश सारवान , सचिव हरीश करोते , माजी नगरसेवक करण मकवानी , विनोद मथुरावाला , कविराज संघेलीया , मंगेश चंद्रमौर्य , सतीश लालबिगे , पुजारी हेमंत पुजारी , आंतर राष्ट्रीय कलाकार कैलाश कुमार , महेश जेधे , लक्ष्मण सुसगोहेर , किशोर संघेलीया , सुरेश मकवानी , विक्रम गोहेर , विनोद म्हेत्रे , अर्जुन सोलंकी , नवीन मकवानी , सुनील चौहान , प्रेमालाबाई सोलंकी , विशाल चव्हाण , राजेश सहेरिया आदी मान्यवर आणि भक्तगण उपस्थित होते .

या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत गुरु गोरखनाथ गोगाजी ट्रस्टचे सचिव हरीश करोते यांनी केले तर सूत्रसंचालन आंतर राष्ट्रीय कलाकार कैलाश कुमार यांनी केले तर आभार रवि सारवान यांनी मानले . यावेळी भक्ती गीतांचे सहगायन मेघन श्रीखंडे , हार्मोनियम उदय कुलकर्णी , तबला हनुमान फडतरे , टाळ अतुल गरुड , पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले . या भक्ती गीतांची कार्यक्रमाची सुरुवात शिव स्तुती महादेव देवो महेश्वरा , गोरखनाथ भजन , एक निरंजन घ्यावो , संत गुरुदास , कबीर , मीराबाई भजन , चोखा मेळा आदींची भजने झाली .

“ सामुदायिक तुळशी विवाह “ थाटामाटात संपन्न

0

m1

पुणे लष्कर भागात नवा मोदीखाना भागात सर्व धर्मीय नागरिकांच्या सहभागाने सामुदायिक तुळशी विवाह थाटामाटात संपन्न झाला . पारंपारिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला . यावेळी तुळशीचा विवाहासाठी खाण्या मारुती मंदिराचे प्रविण महाराज यांनी मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराना तोरण लावून विद्यत रोषणाईची सजावट करण्यात आली होती. त्यांनतर पुरोहिताकरवी गणपती आणि मातृका पूजा करण्यात आली . यानंतर लक्ष्मी नारायणाची मूर्ती आणि तुळशीपत्रासोबत सोने आणि चांदीची तुळस आसनावर ठेवण्यात आली होती . त्यांनतर गोरज मुहूर्तावर देवाचे (वराचे ) पूजन करण्यात आले . मंत्रोच्चारासहित कन्येस ( तुळशीस ) दान करण्यात आले . यानंतर हवन आणि अग्नीभोवती सप्तपदी पूर्ण करण्यात आली . नंतर वस्त्रे आणि आभूषणे घालण्यात आली . शेवटी मंगलाष्टकांनी विवाह लावण्यात आला . यावेळी ” शुभमंगल सावधान ” चे सूर घुमले . यावेळी झेंडूंच्या माळांनी सजावट करण्यात आली होती . यावेळी मंगलाष्टका प्रविण महाराज यांनी गायली .

या सामुदायिक तुळशी विवाहामध्ये रुक्मिणी यादव , शोभा यादव , शारदा यादव , रंजना यादव , सोनाली भिंगवाड , कमल प्यारम , रतन गाडेकर , सुरेखा गाडेकर , मनकरना पुरम , नीता बंकेवार , लक्ष्मी यादव , कांचन कांबळे , छाया तांबे , अपर्णा कदम या प्रमुख महिलांनी मार्गदर्शनाखाली सामुदायिक तुळशी विवाह थाटामाटात संपन्न झाला . या विवाह सोहळ्यासाठी शशीधर पूरम , मोहनीश यादव , दिलीप प्यारम , राहुल यादव , सागर रैन्नक , विनोद यादव , दुर्गेश यादव , राजू लिंगवत यांनी विशेष परिश्रम घेतले . सर्वांनी शेवटी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला .

भाजपमध्ये बहुजन विरुद्ध उच्चवर्णीय असा सामना ?

0

मुंबई – भाजपची सत्ता आल्यानंतर भविष्यात भाजपमध्ये बहुजन विरुद्ध उच्चवर्णीय असा सामना रंगणार असल्याची चुणूक दिसू लागली आहे , पुण्यातून विक्रमी साडेतीन लाखाच्या मताधिक्याने लोकसभेत निवडून गेलेल्या अनिल शिरोळे तसेच पर्वतीतून विधानसभेला विजय मिळवणाऱ्या माधुरी मिसाळ यांच्याकडे पक्षाचे दुर्लक्ष होत आल्याचा आरोप मराठा आणि बहुजन समाजातून होवू लागला आहे त्यातला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी बहुजन समाजाचा नेता हवा होता, या महसूलमंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याने या चर्चेला अधिक वाव मिळतो आहे विशेष म्हणजे शपथविधीनंतर अवघ्या दोन दिवसात खडसेंचे हे वक्तव्य प्रसारित झाले आहे . एकंदरीत ‘मोदी -शहा बोले महारष्ट्र भाजप डोले’ अशा स्थितीत भाजपचे ज्येष्ठ -वरिष्ठ नेते कार्यकर्ते भाजपची सत्ता येवूनही दुर्लक्षित होत असल्याने नाराजीचा सूर दिसत आहे
भाजपच्या १२२ आमदारांपैकी ४८ ओबीसी, १९ मराठा, १९ अनुसूचित जाती, ६ अनुसूचित जमाती, २७ खुल्या गटाचे आमदार असताना नैसर्गिक न्यायाने बहुजन समाजाचीच व्यक्ती मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसायला हवी होती, असा सूर पक्षाच्या वर्तुळात उमटतो आहे. यामुळे सत्तेवर विराजमान होऊन तीन एक दिवस झाले नसताना भाजपमध्ये दोन तट पडल्याचे दिसत आहे आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत फडणवीसांबरोबर एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार व पंकजा मुंडे होत्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने उरलेल्या चारपैकी सर्वात नाराज दिसत आहेत ते खडसे. शपथविधी सोहळ्यातही खडसेंची देहबोली निराश असल्याच्या भावना दाखवत होती. पंढरपूरला सोमवारी कार्तिकी एकादशी निमित्त पांडुरंगाची पूजा खडसेंच्या हस्ते झाली. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसेंनी मुख्यमंत्रिपदावर बहुजनांचा सूर आळवून आपला हक्क होता, असे बोलून दाखवले.
खडसे हे भाजपचे सर्वात ज्येष्ठ नेते असून त्याचा सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष म्हणून काम करतानाचा अनुभव दांडगा आहे. विधिमंडळात खडसेंच्या मागच्या बाकावर बसून फडणवीसांनी कामकाजाचे धडे गिरवले. विशेष म्हणजे फडणवीसांना विधिमंडळातील सर्वोत्तम आमदाराचा पुरस्कार मिळाला होता.
दरम्यान विश्वनाथ प्रताप सिंह हे पंतप्रधान असताना मंडल आयोगाचा प्रश्न सुटला होता, असे विचार ओबीसी चळवळीतील नेते नितीन चौधरी यांनी मांडले.

वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर ठाम; एलबीटी ला पर्याय शोधू -मुख्यमंत्री

0

नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत वेगळ्या विदर्भाच्या आपल्या वचनावर भाजप ठाम असून एलबीटी बाबत योग्य पर्याय शोधला जात असल्याचे म्हटले आहे. विदर्भाबाबत केंद्र सरकार आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर नागपुरात मिनी मंत्रालय थाटण्याचा विचार सुरू असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
विदर्भ राज्याच्या मागणीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, भाजप आपल्या वचनावर कायम आहे. केंद्र सरकार आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व यासंबंधात योग्य निर्णय घेणार आहे.
मंत्रालयाचे कामकाज पूर्णपणे संगणकीकृत करण्याचा सध्या सरकारचा विचार सुरू आहे. सरकारी कामकाजासाठी ई प्लॅटफॉर्म तयार झाल्यानंतरच मिनी मंत्रालयाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवता येणार आहे. त्यासाठी आयटी विभागाची बैठक बोलावली जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
विदर्भातील मुद्दे सोडवण्यासाठी विधानसभेचे नागपुरातील हिवाळी अधिवेशन अधिक काळ चालवणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे अजेंड्यावर येणा-या विषयांबाबत चर्चा पूर्ण होईपर्यंत अधिवेशन सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एलबीटीबाबतच्या पर्यायाचा सरकार विचार करत आहे. गुंतवणूकदार आणि व्यावसायिक यांच्याशी चर्चा करून याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. असेही ते म्हणाले

भाजप- शिवसेना धुसफूस सुरूच

0

मुंबई -तडजोडी सफल होईनात ,एकमेकांवर विश्वास बसेना अशा अवस्थेत सध्या भाजपा-शिवसेनेतील सत्ता स्थाप्नाबाबाटची स्थिती असून विश्वासदर्शक ठरावाआधी मंत्रिमंडळात स्थान देण्याची शिवसेनेची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुडकावल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून मुख्यमंत्र्यांच्या या ताठरपणाला शिवसेना सरकारविरोधात मतदान करून प्रत्युत्तर देण्याची शक्यता नाकारता येणारी नसल्याचे बोलले जाते
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्या विनंतीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले होते. त्यामुळे भाजपचा जीव भांड्यात पडला, असे वाटत होते. मात्र, शिवसेनेने भाजप सरकारला पाठिंबा देण्याबाबत अद्यापही पत्ते उघड केलेले नाहीत. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह सत्तेत एक तृतियांश वाटा हवा असून त्याबाबत जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत भाजपला झुलवत ठेवण्याचे शिवसेनेने ठरवल्याचे दिसत आहे. भाजपकडून अरुण जेटली यांची शिवसेनेशी बोलणी सुरू असल्याचे कळते. मात्र, भाजपसोबत फरफटत जायचे नाही, असाच बाणा शिवसेनेने अंगिकारला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेची घाई नाही, असे सांगून भाजप नेत्यांना योग्य तो संदेश दिला आहे.
यापार्श्वभूमीवर आता चेंडू भाजपच्या कोर्टात असल्याचे दिसत असून सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेला साकडे घालण्याच्या मनस्थितीत सध्या तरी भाजप नाही आहे. ६ वा ९ नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. यावेळी शिवसेनेचे मंत्री शपथ घेतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत सिद्ध झाल्याशिवाय मंत्रिमंडळ विस्तार नाही, असे आता ठणकावल्याचे कळत आहे. याबाबत अधिकृतरीत्या कोणीही काहीही बोण्यास तयार नसल्याचे हि दिसते आहे

” बॉलीवूड नाईट ” संपन्न

0

4

5

दिवाळीनिमित द रॉयल कॅनोट बोट क्लब आणि राजपाल इन्व्हेस्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ” भव्य बॉलीवूड नाईट ” उत्साहात संपन्न झाली . या बॉलीवूड नाईटमध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले . यामध्ये मराठी लावणी , लोकनृत्ये , हिंदी मराठी गीते झाली . या सांस्कृतिक कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घेतला . यामध्ये द रॉयल कॅनोट बोट क्लबचे चेअरमन गोपाल डावरा ,राजपाल इन्व्हेस्टमेंटचे चेअरमन अमितसिंग राजपाल , अजितसिंग राजपाल , संतसिंग मोखा , डॉ. प्रभाकर पालवे , लकी जगवानी , धनश्री कोतवाल , मुश्ताक जानी , बाळा हेगडे , किशोर पंजाबी , प्रकाश केदारी , प्रविण नाईक , रमेश ढोलेपाटील , रणजीत हुडा , रगबीर राजपाल , अड. अमर केन्त , द्वारका मित्तल , अड. गुलशन जोहर , सुनिता थदानी आदी मान्यवर सहभागी झाले होते .

यावेळी सर्वांचे स्वागत द रॉयल कॅनोट बोट क्लबचे चेअरमन गोपाल डावरा यांनी राजपाल इन्व्हेस्टमेंटचे चेअरमन अमितसिंग राजपाल , अजितसिंग राजपाल यांनी केले .