Home Blog Page 3823

हरलेले ‘ गांधी ‘…. ?

0

अण्णांनी टेकला माथा ‘धन्य धन्य देश माझा ‘
आता बस्स … जनहितासाठी खूप लढलो पण जनहित काही दिसेना ……
पुणे- कलियुग म्हणतात ते हेच बघा … अण्णा हजारेंसारखे थकले , म्हणाले खूप केले ,खूप वर्षे लढलो ,पण लोकांना काही फायदा मिळत नाही … तेव्हा आता बस्स … एकीकडे दिल्लीत लढलेले केजरीवाल यांच्या पदरी पडलेली मानहानी , अवमान पाहता त्यांनाही असा प्रश्न पडला असेलच कशासाठी -कुणासाठी केला होता एवढा अट्टाहास ? त्यांना बहुमत न देताच जनतेने त्यांनाच दोषी धरले , त्यांनी कॉंग्रेसचा पाठींबा घेवून सरकार हि स्थापन केले होते पण यातून आपण काही जनहित साधू शकणार नाही हे लक्षात येताच त्यांनी सत्ता त्याग केला , हि वास्तवता विसरून त्यांना लोकसभेत भयाण अपमान पचवावा लागला . आणि आता अन्ना हजारे यांनी काळ व्यक्त केलेली उद्विग्नता या गोष्टी कलियुगाने सत्यावर कधीच मात केल्याचे स्पष्ट करीत नाहीत काय ?
काल ‘भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या बरखास्त केलेल्या समित्यांची सध्या तरी पुन्हा स्थापना करण्यात येणार नाही,’ असे स्पष्ट करतानाच ‘एवढी वर्षे आंदोलने करूनही खऱ्या अर्थाने लोकांना फायदा मिळत नसेल तर आता बस्स… झाले एवढे काम पुरे झाले,’ अशी उद्विग्नता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. ‘केवळ पदांसाठी काम करू नका, अशा कार्यकर्त्यांनी माझे नावही वापरू नये,’ असेही त्यांनी संतापून सांगितले . (जणू आभाळच फाटले -ठिगळ तरी कुठे कुठे लावणार ? अशीच उद्विग्नता त्यामागे असावी )
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या शिबिराचा समारोप राळेगणसिद्धी येथे झाला. त्यावेळी हजारे बोलत बोलत होते. या शिबिरात बोलताना अनेक कार्यकर्त्यांनी बरखास्त केलेल्या समित्या पुन्हा स्थापन करून तालुकानिहाय पदाधिकारी नियुक्त करण्याची सूचना मांडली. हजारे यांनी फेटाळली. ते म्हणाले, ‘माझे नाव वापरणाऱ्यांचा आता तिटकारा आला आहे. समित्या बरखास्त केल्या तरी माजी पदाधिकारी म्हणून अनेक जण मिरवत आहेत. माझे वय आता ७५ वर्षे आहे. आतपर्यंत ३७ वेळा विविध कारणांसाठी राज्याचा दौरा केला. संघटन आणि कायद्याचा प्रचारासाठी फिरलो. पण त्याचा फारसा उपयोग होत नाही, असे दिसते. कायदा करण्यासाठी आंदोलन, कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून आंदोलन, त्याचा प्रचार करण्यासाठी आंदोलन, त्याला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात आंदोलन, अशी आंदोलने तरी कशाकशासाठी करायची, असा प्रश्न आज उभा राहतो आहे. त्यामुळे एकवेळ असे वाटते की, आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यात आपण जनतेसाठी जे केले, ते पुरे झाले.’
कार्यकर्त्यांना ते म्हणाले, ‘पुढील तीन महिने कोणतेही पद न घेता काम करा. माहितीचा आधिकार, ग्रामसभेला अधिकार, दप्तर दिरंगाई विरोधी कायदा व दारुबंदी कायदा यांचा प्रसार करा, तीन महिन्यानंतर स्वतःच्या आपल्या कामाचे मूल्यमापन करा, त्यानंतर आपण समित्यांचा निर्णय घेऊ.’ ३४ जिल्ह्यांतील आलेले कायकर्ते या शिबिरात सहभागी झाले होते.
अण्णांनी माहिती अधिकार कायदा आणून क्रांती केलीच ,एकेक भ्रष्टाचाराविरुद्ध यशस्वी लढा दिला ,पण या गोष्टी हि देशाला सुराज्याकडे नेण्यास पूर्णतः सबळ ठरू शकत नाहीत असे दिसल्यावर जनलोकपाल कायद्याची लढाई त्यांनी दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांना बरोबर घेवून आरंभली
अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या जनलोकपाल कायद्याच्या देशव्यापी आंदोलनाने देश ढवळून निघाला होता एक आशेचा किरण दिसू लागला होता , देशात चैतन्य सळसळू लागले होते
बऱ्याच वर्षांनी; पहिल्यांदाच, चांगल्या कामासाठी देशभरात एक पॉझिटिव्ह वातावरण तयार झालेलं दिसलं . देशातली तरुणाई मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरली. जात-धर्म-भाषा-प्रांत-राजकीय पक्ष अशी बंधनं झुगारुन देशाच्या सर्व भागात लोक लाखोंच्या संख्येनं अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सामिल झाल्याचं चित्र दिसलं . पण हे सारे क्षणभंगुर ठरले , एक स्वप्न पडून विरघळून जाव असे झाले , केजरीवालांचा एकाकी लढा हि दमछाक झालेला दिसला जणू कलियुगाने आपला करिष्मा त्यांना दाखविला . ब्रिटिशांनी १५० वर्षे भारतावर राज्य केले तेव्हाही त्यांच्या दिमतीला सैन्यात -सत्तेत भारतीय नागरिक होतेच कि … इथे सत्ता कोणाची हि येवू द्यात त्या सत्तेचा उदोउदो करणारे आज हि आहेत काल हि होते … तरीही केजरीवाल तसेच अन्नांसारखे ‘गांधी ‘ निर्माण होतात हेच या देशाचे वैशिष्ट्य मानावे लागेल
अण्णा -केजरीवाल यांनी उभारलेल्या लढ्याने देशातील बॉलीवूड च्या बड्या हस्तींनाही आकर्षित केले होते त्यापैकी कित्येकांनी या लढ्यात आपला सहभाग नोंदविण्याचा प्रयत्नही केला … पण आता … ? कुठे आहे तो कारवा ? कुठे आहे ती आशा ? कुठे गेले ते दिवस – एक दिवास्वप्न ठरले सारे जे संपूर्ण भारताला पडलेले स्वप्न होते . ते साकार करण्यासाठी आता लढणारा जणू कोणी न उरला अशी स्थिती झाली आहे
—————————————-
फ्ल्याश ब्याक – विचार करायला लावणारी हि छायाचित्रे
—————————————

15kejriwal6

62429b1e-b277-43c1-99a0-35547a6ca469WallpAutoWallpaper2

129403-dia-mirza-urmila-matondkar-and-shabana-azmi-support-anna-hazare.jpg

aamir_anna

9782269.cms

cap6

iamanna

Diya Mirza

d78650c5-7546-4a0d-8027-8081b491fe25WallpAutoWallpaper2

iamannaf

amitabh_kejriwal

ऑस्ट्रेलियातील भारतीय राजदुतावासाकडून आनंद व टीम चे अभिनंदन.

0

2

3

भारताचा एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याने पूर्ण केलेल्या ऑसी-१० या ऑस्ट्रेलिया खंडामधील १० सर्वोच्च शिखराची चढाई मोहीम नुकतीच पूर्ण केली आहे. या मोहिमेमुळे आनंद ने नेतृत्व केलेली टीम ही १० शिखरे सर करणारी पहिली भारतीय टीम बनली आहे. या शिवाय आनंद ने शिखरावर राष्ट्रगीताची धून वाजवून विक्रमही केला आहे.अनेक बाबतीत विशेष ठरलेल्या या मोहिमेचे कौतुक भारतीय राजदुतावासाकडून केले आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी असलेल्या कैनबेरा येथील भारतीय राजदुतावासाकडून आनंद व त्याच्या टीम चे कौतुक केले असून टीम ला चहा-पाण्यासाठी निमंत्रित केले गेले होते. भारताचे ऑस्ट्रेलियातील उपउच्चायुक्त सुरिंदर दत्ता यांनी भारतीय दुतावासात आनंद व त्याच्या टीम ला बोलावून त्यांचे अभिनंदन केले.

आनंद व टीममधील इतर १० सदस्यांनी ऑसी-१० हे आव्हान स्वीकारून पूर्ण केल्या बद्दल ऑस्ट्रेलियातील प्रमाणित कंपनीचे प्रमाणपत्रही आनंद व टीमला उपउच्चआयुक्त श्री.सुरिंदर दत्ता यांच्या हस्ते दिले गेले. या वेळी गिर्यारोहणातील अनेक प्रश्न विचारून श्री. दत्ता यांनी टीमला पुढील कामगिरीसाठी सुब्बेछां दिल्या. टीमसोबत खूप वेळ गप्पा मारून आपुलकीने विचारपूस केली. युनायटेड नेशन्स च्या “हिफॉरशी” मिशनद्वारे जागतिक पातळीवर स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत हि मोहीम आनंदने केली गेली. “ऑसी-१०” हे १० शिखरांचे आव्हान दिल्ली येथील “मिशन आउटडोअर” कंपनीद्वारे आयोजित केली गेली होती.

“मी करत असलेल्या सात खंडातील सात सर्वोच्च शिखरांच्या जागतिक शांततेसाठीच्या मोहिमेच्या चवथ्या टप्प्यात ऑस्ट्रेलियातील भारतीय दुतावासाने केलेले कौतुक म्हणजे माझ्या आयुष्यातील खूप मोठा क्षण होता. या मोहिमेसाठी युनायटेड नेशन्सच्या नोराह नेको यांनी दिलेली संमती व उपउच्चआयुक्त श्री सुरींदर दत्ता यांनी केलेल्या कौतुकाने या मोहिमेकडे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी मोहीम आहे असे मला वाटत आहे. आता असेच देशाचे नाव उंचावत ठेवण्याची जबाबदारी हजारो पटीने वाढली आहे.”

“सिडनीच्या आकाशातून आनंदने विमानातून १४००० फुट उंचावरून मारली “फ्री-फॉल स्कायडायव्हिंग” उडी.

0

“सिडनीच्या आकाशातून आनंदने विमानातून १४००० फुट उंचावरून मारली “फ्री-फॉल स्कायडायव्हिंग” उडी.

गिर्यारोहणासाठी सध्या ऑस्ट्रेलिया खंडात असलेल्या भारताच्या आनंद बनसोडे याने नुकतेच सिडनी च्या आकाशातून १४००० फुट उंचीवर उडत असलेल्या विमानातून उडी मारून एक आगळा वेगळा विक्रम केला. ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च १० शिखरे सर करून आनंद नुकताच सिडनी मध्ये आला असून लगेच एक आगळे वेगळे साहस त्याने केले आहे. त्याच्या सोबत त्याच्या टीममधील इतर ३ जोडपी शरद व अंजली कुलकर्णी, श्रीकांत व रुपाली चव्हाण, दिनेश व तारकेश्वरी राठोड, साची सोनी, मनीषा वाघमारे यांनीही फ्री-फॉल उडी घेत “हिफॉरशी” मिशन अर्थपूर्ण बनवत आम्ही सर्व काही करू शकतो हे दाखवून दिले.

उडत्या विमानातून उडी मारून करत असलेल्या वेगवेगळ्या कसरतीना स्काय डायव्हिंग असे म्हणतात. ऑस्ट्रेलिया मधील सिडनी मध्ये आनंदने स्काय डायव्हिंग करण्याचा निर्णय घेतला, ऑस्ट्रेलियातील मित्र व गाइड रॉब याच्या मदतीने या साहसाची आखणी केली गेली. विमान १४००० फुट उंचीवर गेल्यावर जवळपास २०० किमी प्रति तास वेगाने खाली येत पक्षाप्रमाणे आकाशात विहार करण्यचा चित्तथरारक अनुभव आनंदने घेतला.

२०११ मध्ये अमेरिकेतील प्रशांत महासागरात स्कूबा डायविंग , याशिवाय अनेक शिखरे सर केली असून आता आनंदच्या कार्यात अजून एका साहसाची भर पडली आहे.

“अमेरिकेतील प्रशांत महासागरात स्कूबा डायविंग केले, बर्फाचे पर्वत चढलो पण आता हे हवेतील साहस मला खूप आनंद देवून गेले.विमानातून उडी मारताना थोडी भीती वाटली पण त्या वेळी आईचे सकारात्मक विचार आठवले. व क्षणाचाही विलंब न करता १४००० फुटावरून ढगात झेप घेतली व २०० किमी या वेगाने जमिनीकडे निघालो. हा अनुभव खूप काही शिकवून गेला. ढगांच्या मध्ये उडताना व पृथ्वीला इतक्या वरून पाहताना खूप विस्मयकारक आहे.”

कर्नाटकातून पुण्यात आलेले ११ लाखाचे भेसळयुक्त पनीर पकडले

0

पुणे – गंजलेल्या पत्र्यांच्या डब्यातून विक्रीसाठी आणलेला११लाख ६७हजार रुपयांचे पनीर आणि मलईचा साठा रविवारी जप्त करून नष्ट करण्यात आला. कर्नाटकातून पुण्यात अन्नपदार्थ विक्रीसाठी आणणारी नवीन साखळी निर्माण होत असल्याची धक्कादायक माहिती अन्न व औषध द्रव्य प्रशासनाच्या (एफडीए) या कारवाईतून पुढे आली आहे.
बुधवार पेठेतील श्रीनाथ चित्रपटगृहाजवळ बेकायदा भेसळयुक्त अन्नपदार्थ घेऊन ट्रक येणार असल्याची माहिती “एफडीए‘ला मिळाली होती. त्या आधारावर सकाळी साडेसहा वाजता येथे सापळा रचण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या क्रमांकाचा ट्रक तेथे येताना मालाची तपासणी सुरू केली. त्यात गंजलेल्या पत्र्यांच्या डब्यांमध्ये पनीर ठेवले होते; तर प्लॅस्टिकच्या कंटेनरमधून मलईची वाहतूक करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत “एफडीए‘च्या पुणे विभागाचे सहआयुक्त शशिकांत केकरे म्हणाले, की या कारवाईत ११ लाख ६७ हजार ६६०रुपयांचा माल जप्त केला आहे. त्यात सहा हजार ४७८किलो पनीर आणि६६४ किलो मलईचा समावेश आहे. हा सर्व साठा नष्ट केला आहे. या अन्नपदार्थांचे नमुने राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येतील. त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल.
“एफडीए‘चे सहायक आयुक्त दिलीप संगत म्हणाले, की कर्नाटकातील हूडची या गावातून पनीर आणि मलई ट्रकने आणली होती. त्याची कोणतीही बिले नाहीत. विक्री होण्यापूर्वीच हा साठा नष्ट करण्यात आला. सहायक आयुक्त संजय नारागुडे यांच्यासह अन्नसुरक्षा अधिकारी योगेश ढाणे, राजेंद्र काकडे आणि बाळासाहेब कोतकर यांनी ही कारवाई केली.

डॉ सायरस पूनावाला यांचा पुण्यभूषण ने सन्मान

0

पुणे

उद्योजकतेला वाव देताना सरकारने आपल्या जबाबदाऱ्या चे सुलभीकरण करावे ,हस्तक्षेप कमी करून धोरण ठरवावे ,त्यामुळे रोजगार वाढेल ,संपत्ती निर्मिती होईल ,योजनांची नीट अंमलबजावणी होईल आणि त्यातून नागरिकांना कर देणे सोपे होईल ,मात्र त्यासाठी प्रामाणिक राजकारणी आणि नोकरशाहीची गरज आहे ‘असे प्रतिपादन इन्फोसिस चे संस्थापक नारायण मूर्ती यांनी आज केले

पुण्यभूषण फौन्डेशन (त्रिदल )च्या वतीने आज २६ वा पुण्यभूषण सन्मान सिरम इंस्तीत्युत चे संस्थापक डॉ सायरस पूनावाला यांना नारायण मूर्ती ,माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला ,त्यावेळी नारायणमूर्ती बोलत होते

इतरांना जे दिसत नाही ते उद्योजकांना दिसते ,त्या कामातून जनतेच्या चेहऱ्यावर समाधान आणणे हे त्यांचे काम असते . सायरस पूनावाला यांनी ते केले आहे ‘ अशा शब्दात नारायण मूर्ती यांनी डॉ सायरस पूनावाला यांचा गौरव केला

सोन्याचा नांगर फिरवणारे शिवाजी महाराजांची पुरस्कार प्रतिकृती ,एक लाख रुपयांची थैली देवून सायरस पूनावाला यांचा बालगंधर्व रंगमंदिर येथे सन्मान करण्यात आला . अध्यक्षस्थानी डॉ रघुनाथ माशेलकर होते .डॉ सतीश देसाई , पिनाकल ग्रुप चे गजेंद्र पवार ,उप महापौर आबा बागुल व्यासपीठावर उपस्थित होते

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाविद्यालयीन काळातील सायरस यांच्यासम्वेतच्या आठवणीना उजाळा दिला . ‘बालकांच्या रोग निवारणासाठी लसनिर्मिती करून समस्येला जागतिक उत्तर देण्याचे मोठे काम पूनावाला यांनी केले . जगात तीन पैकी दोन बालकांना सिरम ची लस उपयुक्त ठरते . नव्या पिढीच्या उभारणीसाठी हे योगदान महत्वाचे आहे.दातृत्व देखील दाखवले अशा कर्तुत्व वान व्यक्तींचा सन्मान करून पुण्यभूषण ने राज्य आणि देशात आदर्श निर्माण केला आहे ‘ अशेही ते म्हणाले

डॉरघुनाथ माशेलकर,सायरस पूनावाला यांनीही मनोगत व्यक्त केले

पुरस्काराची लाखाची रक्कम आणि त्यात पूनावाला यांच्या दहा लाखाची भर टाकून कष्टकरी महिलांच्या कल्याणासाठी हि रक्कम डॉ बाबा आढाव यांच्या हाती सुपूर्द करण्यात आली

महापौर दत्ता धनकवडे यांनी प्रास्ताविक केले . डॉ संदीप बुटाला यांनी आभार मानले

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहू शकले नाहीत मात्र त्यांनी व्ही डी ओ संदेशाद्वारे पूनावाला यांच्या कार्याचा गौरव केला
यावेळी पाच स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात आला . त्यात मधुकर फडणीस ,शांता रानडे ,गजाभाऊ पिंगळे ,देवीचंद राठोड ,एकनाथ कोठावदे यांचा समावेश होता

राहुल सोलापूरकर यांनी सूत्र संचालन केले

विकासासाठी जास्तीत जास्त वेळ देणार- राज्यमंत्री दिलीप कांबळे

0

पुणे – महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघात नागरिकांशी सवांद साधला . शंकरशेठ रोड येथील धोबी घाटपासून त्यांनी नागरिकांशी सवांद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या . येथील नागरी समस्या जाणून घेतल्या . त्यानंतर त्यांनी नवा मोदीखाना , कृष्णकुंज सोसायटी , सोलापूर बाजार येथील नागरिकांशी सवांद साधला . यावेळी त्यांनी नागरिकांशी सवांद साधताना सांगितले कि , आपण मला बहुमताने निवडून दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे , पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या सर्वागीण विकासासाठी जास्तीत जास्त वेळ देणार . आज प्रत्येक कुटुंबीयात जातीचा दखला काढावा लागतो , त्यासाठी आपण सामाजिक न्याय खात्याच्यावतीने शिधापत्रिकेप्रमाणे एकच कुटुंबातील सर्वांचा जातीचा दाखला देणार आहोत त्यामुळे पुन्हा पुन्हा तहसीलदार कचेरीवर जातीचे दाखले काढण्यासाठी हेलपाटे मारावे लागणार नाही . उत्पन्नाचा दाखला देखील कुटुंबियाच्या प्रमुखांच्या नावाने काढणार , आपण मतदार संघाच्या विकासाबरोबरच राज्याचा विकास करणार आहोत . आपण मतदारसंघात महिन्यातील एक रविवार पूर्ण वेळ देणार आहोत , तरुणांना रोजगारासाठी महामंडळामार्फत कर्ज देण्यापेक्षा व्यवसाय उभा करून देणार.

यावेळी भारतीय जनता पार्टी पुणे कॅंटोन्मेंटबोर्ड विभागाचे अध्यक्ष संतोष इंदुरकर , प्रविण जाधव , बालम परदेशी , जितेंद्र शिंदे , अतुल गायकवाड , प्रवीण गाडे , शशिधर पूरम , माजी नगरसेवक मनीष साळुंखे , सुनील सोळंकी , सागर शहा , महेंद्र भोज , मयुर सावंत , तन्वीर सय्यद , रणवीर अरगडे , ईश्वर कांकरिया , मोहनीश म्हेत्रे , राजाभाऊ झारखंडे , अजय पाटोळे आदी उपस्थित होते .

सत्तेसाठी लाचारी पत्करणार नाही – उद्धव ठाकरे

0

मुंबई – भगवा आतंकवाद असा शब्द जन्माला घातला आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार पाडले त्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा भाजप घेणार असेल तर शिवसेना विरोधात मतदान करील, अशा रोखठोक शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी आपली भूमिका स्पष्ट केली. सत्तेसाठी आम्ही लाचार नाहीत, एकटे बसण्याची तयारी आहेे, असे सांगतानाच सत्तेत सहभागासाठी अजून दोन दिवस वाट पाहा, असे म्हणत उद्धव यांनी अजून सकारात्मक असल्याचेही दाखवून दिले.
शिवसेनेचे आमदार व खासदारांची शिवसेना भवनात बैठक झाली. या वेळी पक्षाचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. सत्तेत सहभागाबाबत उद्धव म्हणाले, विधानसभा अध्यक्ष कोणत्या पक्षाचा असेल त्यावर आमचा पाठिंबा अवलंबून असेल. अध्यक्षांचे नाव सर्वानुमते जाहीर व्हावे. तसेच देशातील हिंदूंना संपवण्याची भाषा केली जात आहे. देशविघातक शक्ती वाढत असताना हिंदुत्ववादी शक्तींचे विभाजन होऊ नये अशी शिवसेनेची भूमिका आहे. परंतु भगवा आतंकवाद म्हणणाऱ्या शरद पवार यांनी भाजपला पाठिंबा देऊ केला आहे. भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार की नाही हे स्पष्ट करावे. भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर शिवसेना विरोधात बसेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या मुद्द्यावर उद्धव म्हणाले, खुद्द शरद पवार यांनीच नेते भेटले पण कोणताही प्रस्ताव नव्हता, असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांनाच याबाबत विचारा.
अनिल देसाई मंत्रिपदाची शपथ घेणार होते; मग त्यांना विमानतळावरून परत का बोलाविले, असा प्रश्‍न पत्रकारांनी केला असता उद्धव म्हणाले, की मीच अनिल देसाई यांना परत बोलाविले. जर भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार असेल तर आम्हाला सत्तेत रस नाही. आम्हीही मोकळे आहोत. लाचारी पत्करून कदापि सत्तेत जाणार नाही. मला कोणाबरोबर जायचे असेल तर मी उघड भूमिका घेईन. अटलबिहारी वाजपेयी मंत्रिमंडळात शिवसेनेचे मंत्री म्हणून सुरेश प्रभू यांनी शपथ घेतली होती. ते सरकार पुढे तेरा दिवसांनी पडले. वाजपेयींचे सरकार पवार यांनीच पाडले होते, याची आठवण करून देतानाच प्रभू हे आज भाजपचे मंत्री बनले आहेत याचे आश्‍चर्य वाटते.
राज्यातील भाजप सरकारमध्ये सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय 12 नोव्हेंबरला घेण्यात येईल. सोमवारपासून विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. सरकार विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. अधिवेशनात जर सत्ताधारी भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा घेतला तर आम्ही विरोधी बाकावर बसणार आहोत. भाजप कोणता निर्णय घेतो यावरच शिवसेनेची पुढील भूमिका असेल, असेही उद्धव ठाकरे यांनी शेवटी सांगितले.

केवळ सुरेश कलमाडींचा म्हणून ‘ पिफ’ ला अनुदान दिल्याचे स्पष्ट ?

0

पुणे- केवळ सुरेश कलमाडी यांच्यामुळे राज्य सरकारच्या अधिकृततेची मोहोर उमटलेला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) चित्रपटांच्या अनुदानासाठी पात्र नसल्याची माहिती आता समोर आली आहे.पिफ सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधील नामांकन किंवा पारितोषिक मिळवलेल्या चित्रपटांना थेट अनुदानासाठी पात्र ठरवण्याचा नियम राज्य सरकारने यापूर्वी केला आहे. दरम्यान यापूर्वी राज्य सरकारने मराठी चित्रपटांना देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी नियुक्त केलेल्या समिती मध्ये एका पत्रकाराची केलेली नियुक्ती संशयास्पद आणि वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.
मराठी चित्रपटांना अनुदान देण्याबाबतची नवीन नियमावली गतवर्षी राज्य सरकारने जाहीर केली. त्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या मराठी चित्रपटांना अनुदानासाठी थेट पात्र ठरवण्याचा नियम करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार, इंडियन पॅनोरमासह ऑस्कर, बर्लिन, कान्स, बुसान, रॉटरडॅम अशा जगभरातील महत्त्वाच्या अकरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांची यादीच राज्य सरकारने केली आहे. भारतात मुंबईतील मामि, केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असतानाही या महोत्सवांचा समावेश या यादीत करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, २०१०मध्ये ‘पिफ’ला महाराष्ट्राचा अधिकृत महोत्सव म्हणून राज्य सरकारने मान्यता दिली. मात्र, या यादीत पिफचाही समावेशनाही
पिफ हा राज्य सरकारचा अधिकृत महोत्सव आहे असे आज पर्यंत भासविण्यात येत होते सरकारकडून महोत्सवाला निधी उपलब्ध करून देण्यात येतो; तसेच महामंडळही महोत्सवाला निधी देते. त्यामुळे या महोत्सवातील पारितोषिकप्राप्त मराठी चित्रपटाला थेट अनुदान मिळण्यासाठी पात्र ठरविण्यात यावे. याबाबत नवनिर्वाचित सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे याबाबत भूमिका मांडून पाठपुरावा करावा यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय पाटकर यांच्यावर दबाव येत असल्याचे वृत्त आहे . पिफ साठी एकूण होणारा खर्च याबाबत आता चौकशीची मागणी झाल्यास गैर वाटणार नाही असे दिसते अह्हे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या

0

मराठी ला अभिमान वाटेल असा अभिनेता – सुबोध भावे ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या – ९ नोव्हेंबर

फँड्री मराठी सिनेमा ११० देशांमध्ये प्रदर्शित होणार

0

पुणे-
राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा फँड्री सिनेमा डिजिटल माध्यमातून ११० देशांमध्ये प्रदर्शित करत आहोत अशी माहिती येथे निर्माते निलेश नवलाखा यांनी दिली
शिवाय आता आय-ट्यूनस्, गूगल प्ले आणि फेसबुकवर पाहायला मिळणार आहे. निर्माते विवेक कजरिया आणि निलेश नवलखा हे पुन्हा एक नवीन वाटचाल करत आहेत. मराठी सिनेमांना जागतिक स्तरावर घेऊन जात असतानाच त्यांनी सिख्या एंटरटेन्मेंट आणि सिनेकॅरॅवान या उपक्रमाशी सोबत करून फँड्री सिनेमा डिजिटल माध्यमातून ११०देशांमध्ये प्रदर्शित करत आहेत.असे सांगितले
सिनेकॅरॅवानचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकिय संचालक अपूर्व बक्षी याविषयी सांगतात, की सिनेमा वितरणातील त्रास कमी करून योग्य उठाव देणे ही आमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. एकाचवेळी सर्वाधिक विभागांमध्ये आणि माध्यमांमधून सिनेमा वितरीत आणि प्रदर्शित करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.
फँड्री हा अत्यंत शक्तिशाली सिनेमा असून ते जगभरात जायलाच हवा. आम्हाला हा प्रवास निलेश आणि विवेक यांच्यासोबत करण्यात खूप आनंद आहे.
सिनेकॅरॅवानच्या व्यवस्थापकिय संचालक पूजा कोहलीम्हणाल्या , की विवेक आणि निलेश सारख्या निर्मात्यांना वितरणाच्या खिडक्या बंद होताना दिसत आहेत आणि भारतातफोर जीचे आगमन होत असल्याने इंटनटेवरही कार्यक्रमांची मागणी प्रचंड वाढणार आहे. याची त्यांना जाणीव आहे. डिजिटल आणि मोबाईल प्लॅटफॉर्म हे प्रेक्षकांपर्यंत पोहण्यासाठी सर्वाधित कार्यक्षम ठरणार आहे.

भाजपचे दगाबाजीचे राजकारण सुरूच – शिवसेना भवनावर गर्दी

0

मुंबई – आता सध्या म्हणजे रविवारी ९ नोव्हेंबर रोजी शिवसेनाभवनावर शिवसैनिकांनी गर्दी केली असून ‘ भाजप हाय हाय ‘ च्या घोषणा देण्यात येत आहेत .शिवसेनेचे राज्यसभा खासदार अनिल देसाई केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी न होताच मुंबईत परतले आहेत.शिवसेनेने नाव न सुचवलेले सुरेश प्रभु यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यासोबतच सकाळीच त्यांनी भाजपचे सदस्यत्व घेतल्याचेही शपथविधीनंतर जाहीर करण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सेना भवनात आगमन झाले आहे. थोड्याच वेळात शिवसेनेचे आमदार आणि खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यानंतर उद्धव ठाकरे भाजपाबाबत ची शिवसेनेची भूमिका स्पष्ट करणार आहे.
विधानसभा गटनेता निवडीसाठी ही बैठक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शिवसेना भवनाबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाले आहेत. राज्यसभा खासदार अनिल देसाई मंत्रीपदाची शपथ न घेता -शपथविधीवर बहिष्कार टाकून दिल्लीहून रविवारी दुपारी परतल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावरही मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते. त्यामुळे शिवसेनेकडून होणार्‍या या शक्ती प्रदर्शनाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांकडून ‘भाजप हाय हाय’च्या घोषणा दिल्या जात आहे.
शिवसेनेचे राज्यसभा खासदार अनिल देसाई केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी न होताच मुंबईत परतले आहेत. त्यानंतर मुंबईत शिवसेनेच्या बैठकांवर बैठका सुरु झाल्या आहेत. रविवारी मोदींच्या मंत्रिमंडळात चार कॅबिनेट, 14 राज्यमंत्री आणि तीन स्वतंत्र प्रभार असलेल्या मंत्र्यांनी शपथ घेतली. यात शिवसेनेने नाव न सुचवलेले सुरेश प्रभु यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यासोबतच सकाळीच त्यांनी भाजपचे सदस्यत्व घेतल्याचेही शपथविधीनंतर जाहीर करण्यात आले.पंतप्रधान मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी न झाल्याचे खासदार आनंदराव अडसुळ यांनी सांगितले आहे.
शिवसेना नेते अनिल देसाई दिल्ली विमानतळावरुनच मुंबईला परतले आणि थेट मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले. त्यानंतर मुंबईत शिवसेनेच्या बैठकांवर बैठका सुरु झाल्या असल्याचे चित्र आहे. मातोश्री येथील बैठकीनंतर सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे शिवसेना भवनाकडे रवाना झाले.
रविवारी दुपारी शिवसेनेच्या खासदारांची सेना भवनात बैठक होणार होती . या बैठकीत केंद्रात भाजपसोबत राहायचे की नाही, यावर निर्णय घेणार असल्याची चर्चा होती . शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनाही आज सायंकाळ पर्यंत राजीनामा देण्यास सांगितले जाऊ शकते. तसेच महाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याऐवजी सेना विरोधीपक्षात बसण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

जागतिक दयाळू दिन साजरा

0

1a

2
जागतिक दयाळू दिनानिमित व्हिकटोरियस किड्स एज्युकेअर्सच्यावतीने पुणे कॅम्प भागातील महात्मा गांधी रस्त्यावर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सामुहिक नृत्ये सादर करून त्यांनी समाजाला सर्वावर दयाळूपणे , विन्रमतेने प्रेम केले तर त्याचा परिणाम समजावर होतो . सर्व जगात आज जागतिक दयाळू दिनानिमित २९ दिशामध्ये हा दिवस साजरा होतो . त्यामध्ये आज पुण्यात महात्मा गांधी रस्त्यावर या शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांनी सामुहिक नृत्यू सादर करून संदेश दिला . यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी नागरिकांना फुले देऊन प्रेमाचा संदेश दिला . हातावर ” स्वभाव नम्र ठेवा ” हा संदेश लिहण्यात आला होता . यामध्ये व्हिकटोरियस किड्स एज्युकेअर्स , डान्स ओ फिट , डान्स फ्लोर स्टुडीओ आणि रायझेइंग इन्स्टस्ट्यूट परफोर्मिंग आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला . अशी माहिती लाईफ वेस्ट इनसाईड इंडियाच्या प्रतिनिधी इरा घोष यांनी माहिती दिली . यामध्ये २९ देशामधील प्रतिनिधी तसेच , व्हिकटोरिया किड्स एज्युकेअर्सचे चेअरमन डॉ. रॉबिन घोष , शारदा घोष , नगरसेवक शैलेंद्र बिडकर , रुपाली बिडकर , डॉ. किशोर शहाणे , शाळेचे शिक्षक वर्ग , आणि विद्यार्थ्यांचे पालकवर्ग आदी मान्यवर सहभागी झाले होते .यावेळी नागरिकांना फुले देऊन सामाजिक संदेश असलेले कार्ड्स वाटप करण्यात आले .

व्हिकटोरियस किड्स एज्युकेअर्स हि समाजासाठी वेगवेगळे कार्यक्रम समाजामध्ये जनजागृतीसाठी राबवित असतात , त्यातून हा जागतिक दयाळू दिनाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला .

ऑस्ट्रेलिया खंडावर फडकला तिरंगा…वाजली राष्ट्रगीताची धून….

0

a1

खंडातील १० सर्वोच्च शिखरे आनंद बनसोडेच्या नेतृत्वाखाली केली सर… प्रथम भारतीय टीम होण्याचा मान.
“वर्ल्ड पीस सेव्हन समिट” मोहिमेअंतर्गत ऑस्ट्रेलिया मधील “ऑसी १०” हे गिर्यारोहणातील आव्हान पूर्ण.

भारताचा एव्हरेस्टवीर व विश्वविक्रमवीर आनंद बनसोडे याने सुरु केलेल्या “वर्ल्ड पीस सेव्हन समिट” या मोहिमेतील चवथे खंड ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर माउंट कोसिस्को व इतर १० सर्वोच्च शिखरे नुकतेच सर करण्यात आले. २ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर च्या दुपारपर्यंत आनंदच्या नेतुर्त्वाखाली भारतातील ८ जणांनी हा पराक्रम केला. ऑस्ट्रेलियातील १० सर्वोच्च शिखरे “ऑसी-१० आव्हान” हे पूर्ण करणारी पहिली भारतीय टीम असा मान या टीम ला मिळाला असून यासोबत इतर अनेक रेकॉर्ड यांच्या नावे झाले आहेत.या टीम मध्ये आनंदसहित मुंबई व पुणे येथील शरद व अंजली कुलकर्णी, श्रीकांत व रुपाली चव्हाण, दिनेश राठोड व तारकेश्वरी भालेराव ही जोडपी व दिल्ली येथील आकाश जिंदाल, मुंबई मधून संजना दलाल , औरंगाबाद येथील मनीषा वाघमारे, जयपूर येथील साची सोनी या मुलीही या भारतातील प्रथम “ऑसी- १०” या आव्हानात्मक मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.या मोहिमेची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आनंदने “युनायटेड नेशन्स वूमन” च्या “हीफॉरशी” या “स्त्री-पुरुष समानता” या विषयावर असलेल्या मिशनचा प्रसारासाठी एक आगळा-वेगळा उपक्रम हाती घेतला होता. या अंतर्गत टीम मधील इतर सर्वांनी स्त्री-पुरुष समानतेची शपत शिखराच्या सर्वोच्च उंचीवर घेतली.आनंदने ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखरावरही भारताचे राष्ट्रगीत वाजवले असून ४ खंडाच्या सर्वोच्च उंचीवर राष्ट्रगीत वाजवणारा जगातील एकमेव गिर्यारोहक बनण्याचा मान त्याला मिळाला आहे.

आनंदचे गुरु सुरेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदने या भारतातील प्रथम मोहिमेची आखणी केली होती. या अंतर्गत अनेक बाबतीत आगळ्या वेगळ्या ठरलेल्या या मोहिमेत ३ जोडप्यांचा समावेश या टीम मध्ये केला गेला होता.

आनंद बनसोडे यांच्याकडून झालेले विविध रेकॉर्ड-

1. ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च दहा शिखरे “ऑसी-१०” हे आव्हान पूर्ण करणारा गिर्यारोहक व प्रथम भारतीय टीमचे नेतृत्व.

2. आनंद व जयपूरच्या साची सोनी हिने भारताचा सर्वात मोठा तिरंगा ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च उंचीवर नेहून एखाद्या शिखरावर सर्वात मोठा तिरंगा फडकवला.मान.

3. माउंट एव्हरेस्ट (१९ मे २०१२), माउंट एल्ब्रूस (१७ जुलै २०१४) व माउंट किलीमांजारो (१५ ऑगस्ट २०१४) व माउंट कोसिस्को (२ नोव्हेंबर २०१४) हे चार खंडातील चार सर्वोच्च शिखरे सर.

4. एव्हरेस्ट, माउंट एल्ब्रूस, माउंट किलीमांजारो व माउंट कोसिस्को वर भारताचे राष्ट्गीत गिटारवर वाजवून जागतिक रेकॉर्ड.

5. भारताच्या संविधानाची प्रस्तावना ऑस्ट्रेलिया खंडाच्या सर्वोच्च शिखरावर प्रथमच आनंद मार्फत गेली.

6. युनायटेड नेशन्स च्या हिफॉरशी या मिशनच्या प्रसारासाठी आनंदने केली मोहिमेची आखणी.

यांनी केले “ऑसी-१०”आव्हान पूर्ण-

आनंद बनसोडे (टीम लीडर), साची सोनी, अंजली व शरद कुलकर्णी, श्रीकांत व रुपाली चव्हाण, मनीषा वाघमारे, आकाश जिंदाल.

महाराष्ट पोलीस दलातील जवान-

सुरेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस दलातील दिनेश राठोड व तारकेश्वरी वाघमारे यांनी ऑस्ट्रेलिया खंडातील ५ सर्वोच्च शिखरे सर केली असून असे करणारे ते महाराष्ट्रातील प्रथम पोलीस ठरले आहेत.

याशिवाय मुंबई येथील संजना दलाल हिने ३ सर्वोच्च शिखरे सर केली आहेत.

पुढील मोहीम –

आनंद आता पुढे दक्षिण अमेरिका व अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणार आहे.

पुढील १० शिखरे सर केली –

१. माउंट कोसिस्को

२. माउंट टाउनसेंड

३. माउंट त्वानाम

४. माउंट राम्सहेड

५. माउंट इथररिज

६. माउंट राम्सहेड नॉर्थ

७. माउंट आलिस रोव्सोन पीक

८. माउंट अब्बोट पीक

९. माउंट साउथ वेस्ट ऑफ अब्बोट पीक

१०.माउंट कॅरुथर पीक

भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिरात काकड आरतीची सांगता

0

m2

m4

पुणे — भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिरात काकड आरतीची उत्साहात सांगता झाली . सकाळ पासूनच मंदिरात सर्वांचे स्वागत कपाळावर चंदन लाऊन स्वागत करण्यात येत होते. यावेळी महापूजा करण्यात येउन काकड आरती करण्यात आली . यावेळी ह. भ. प. संदीप महाराज पळसे यांचे कीर्तन झाले , विणेकरी दीपक चव्हाण , ज्ञानोबा घोड , नंदकुमार जगताप , तेजेन्द्र कोंढरे , संदेश दिवेकर , अशोक साळुंखे , प्रमोद बेंगरूट , अप्पा मानकर , गोळे मामा , राजू इंदलकर ,, लक्ष्मण घोड , दत्ता घोड , झारे मामा , चिंचवडे मामा , रंजना भोसले , चंद्रकला भोसले , कुंदा बेंगरूट , छाया भोसले , ताराबाई क्षीरसागर , सिंधूताई पवार , उज्वला कोरे , शशिकला राउत , ताराबाई बेंगरूट आदी उपस्थित होते .

सर्वांनी शेवटी महाप्रसादाचा लाभ घेतला .