पुणे : महाराष्ट्रातील व्यापार्यांनी एलबीटी रद्द व्हावा, यासाठी राज्यव्यापी संप पुकारला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने सत्ता आल्यानंतर एलबीटी तत्काळ रद्द केला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्याची पुर्तता करावी अशी मागणी पूना र्मचंट्स चेंबरचे अध्यक्ष वालचंद संचेती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विक्रीकर कायदा जावून त्या जागी नव्याने मूल्यवर्धीत अर्थात व्हॅटचा कायदा १ एप्रिल २००६ रोजी राज्यात सुरू झाला. त्यावेळी जयंत पाटील अर्थमंत्री होते. पाटील यांनी यावेळी असे आश्वासन दिले होते की, व्हॅटचे उत्पन्न वाढल्यानंतर जकात रद्द करू. त्यावेळी व्हॅटचे उत्पन्न १८ हजार कोटी रुपये होते. ते आज ७५ हजार कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अशावेळी दुसरा कर लावणे व्यापार्यांवर अन्यायकारक असल्याचे संचेती यांनी म्हटले आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लुटो बाटो टॅक्स असे केले होते. भारतीतील कोणत्याही राज्यात एलबीटी टॅक्स अस्तित्वात नाही. फक्त महाराष्ट्रात असल्याचेही संचेती यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
चेंबरच्या आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार वितरण समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपा सत्तेवर आला तर राज्यातील एलबीटी या कराचे कोणताही कर न लावता तत्काळ उच्चाटन केले जाईल असे म्हटले होते.
त्यामुळे राज्यातील व्यापार्यांची एकमुखी मागणी आहे की, एलबीटी कर कोणत्याही कराशिवाय ताबडतोब रद्द करण्यात यावा.पूना र्मचंट्स चेंबरचे मुख्यमंत्र्यांना निवेदनजकाती ऐवजी स्थानिक संस्था करास २0१३ मध्ये सुरुवात झाली. त्यामध्ये अनेक अडचणी आल्या. स्थानिक संस्था कर कायद्यामध्ये अनेक जाचक तरतुदी असल्यामुळे तो रद्द करावा, अशी एकमुखाने मागणी केली होती. महाराष्ट्र राज्य विधानसभेची नुकतीच निवडणूक झाली असून, त्यामध्ये जो पक्ष एलबीटी रद्द करेल अशाच पक्षास आम्ही मते देवू अशी उघड भूमिका सर्व व्यापार्यांनी घेतली होती. त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी व्यापार्यांना एलबीटी रद्द करू असे लेखी आश्वासन दिले होते.
पर्याय कसला शोधता ? भूलभुलय्या बंद करा … थेट एलबीटी रद्द करा
पुणे जिल्हाधिकार्यांना एक लाख रुपयांचा दंड
पुणे : वाघोली येथे स्टोन क्रशरने र्मयादेपेक्षा अधिक उत्खनन केल्याच्या प्रकरणात सुनावणीसाठी गैरहजर राहणार्या जिल्हाधिकार्यांना हरित न्यायाधिकरणाने एक लाख रुपये दंडाची रक्कम भरण्याचा आदेश दिला आहे. ही रक्कम राहुरीच्या कृषी विद्यापीठाकडे भरावी आणि त्यांनी तिचा उपयोग संशोधनासाठी करावा असे न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती विकास किनगावकर यांनी आदेशात म्हटले आहे.
याप्रकरणी वाघोली येथे राहणारे हरुभाई साबळे यांनी वाघोली येथे बेकायदा उत्खनन केल्यासंदर्भात हरित न्यायाधिकरणामध्ये एक याचिका दाखल केली आहे. वाघोली येथील o्रद्धा या स्टोन क्रशरच्या चालकाने तेथील परिसरात बेकायदा दगडाचे उत्खनन केल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. महसूल विभागाने परवानगी दिलेल्या क्षेत्रापेक्षा अतिरिक्त उत्खनन करून, त्यांनी कायद्याचा भंग केल्याचे म्हटले आहे. हे उत्खनन तातडीने बंद करण्यात यावे, असे साबळे यांनी याचिकेत म्हटले आहे. या याचिकेची न्यायाधिकरणाने दखल घेत यातील माहिती सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांना न्यायाधिकरणाने दिला होता. त्यावर सुनावणीसाठी जिल्हाधिकार्यांच्या वतीने एका तारखेला अँड़ मूलचंदानी हे हजर झाले होते, परंतु आदेश दिल्याप्रमाणे त्यांनी कोणतीही माहिती सादर केली नाही. यानंतर झालेल्या सुनावणीला जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या वतीने कुणीच हजर झाले नाही. यामुळे न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती विकास किनगावकर यांनी जिल्हाधिकार्यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची ही रक्कम राहुरी कृषी विद्यापीठाकडे भरावी आणि ती रक्कम विद्यापीठाने संशोधन करण्यासाठी तिचा विनियोग करावा असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मातेने मुलाच्या जैविक पित्याचे नाव उघड केलेच पाहिजे
मुंबई – मातेने मुलाच्या जैविक पित्याचे नाव उघड करणे बंधनकारक आहे, अशी माहिती पासपोर्ट प्राधिकरणाने मुंबई उच्च न्यायालयाला दिली. चार वर्षीय लिसाने (नाव बदललेले) मातेच्या माध्यमातून दाखल केलेल्या याचिकेवर पासपोर्ट प्राधिकरणाने आपले उत्तर सादर केले. पासपोर्टमध्ये जैविक पित्याच्या नावाऐवजी सावत्र पित्याच्या नावाचा उल्लेख करून घेण्यासाठी लिसाने ही याचिका दाखल केली आहे.
या प्रकरणी न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठासमोर यापूर्वी १ नोव्हेंबर रोजी परराष्ट्र मंत्रालयाने आपली भूमिका मांडली होती. कुमारी मातेने मुलाच्या जैविक पित्याचे नाव उघड करण्याची आवश्यकता नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर पासपोर्ट प्राधिकरणाची भूमिका नेमकी विरोधी आहे. लिसाच्या याचिकेला उत्तर देताना सहाय्यक प्रादेशिक पासपोर्ट अधिकार्यांनी ३ नोव्हेंबर रोजी लिसाला तिच्या जैविक पित्याच्या नावाचा उल्लेख बंधनकारक केला होता. लिसाने पासपोर्टसाठी अर्ज करताना जैविक पित्याऐवजी सावत्र पित्याच्या नावाचा उल्लेख वैध मानण्याची विनंती केली होती.
त्यासंदर्भात पासपोर्ट अधिकार्यांना निर्देश देण्याची मागणी लिसाने आपल्या याचिकेद्वारे केली आहे. तिच्या वतीने अँड़ निखिल कर्नावत आणि विराज मणियार यांनी तर केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि प्रादेशिक पासपोर्ट प्राधिकरणाच्या वतीने अँड़ सोमा सिंग यांनी न्यायालयात बाजू मांडली.
मेट्रोसाठी ४ एफएसआय देण्यास विरोध
पुणे :
‘सेव्ह पुणे इनिशिएटिव्ह संस्थेने’ मेट्रो सुनावणी मध्ये ‘इलेव्हेटेड मेट्रो’ला विरोध केला. नियोजनातील त्रुटी उघड केल्या आणि नव्याने सुधारित प्रस्ताव तयार करण्याची मागणी केली.
‘सेव्ह पुणे इनिशिएटिव्ह संस्थे’चे संस्थापक दीपक बिडकर यांनी नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांना या मुद्यांवरचे लेखी पत्र सादर केले. मेट्रोसाठी 4 एफएसआय देऊन प्रचंड अवाजवी बांधकाम होईल. त्याचा ताण पायाभूत सुविधांवर येईल. त्यालाही संस्थेने विरोध केला.
केवळ स्वातंत्र्य लढ्यात नाही तर देश घडविण्यातही पं नेहरूंचे योगदान
पुणे- पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान केवळ स्वातंत्र्य लढ्यात नाही तर देश घडविण्यातही मोठ्ठे आहे असे प्रतिपादन शहर काँग्रेस चे अध्यक्ष अभय छाजेड यांनी येथे केले .
सहकारनगर मधील बागुल उद्यानामधील भीमसेन जोशी कलादालनात पंडित नेहरू यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे यावेळी उप महापौर आबा बागुल , माजी राज्य मंत्री रमेश बागवे , चंद्रकांत छाजेड , अभिजित कदम मुक्तार शेख महेश वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते
इतिहासाला उजाळा देणे , तो नव्या पिढीपुढे मांडणे हे प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचे कर्तव्य असून त्या दृष्टीने आता कार्यकर्त्यांनी सतर्कतेने काम करावे असे आवाहन हि यावेळी अभय छाजेड यांनी येथे केले पंडित नेहरुंचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग आणि देश उभारणीत सहभाग दर्शविणारी मोलाची छायाचित्रे येथे १६ नोव्हेंबर पर्यंत नागरिकांना पाहता येतील
अभिनेत्री ममता कुलकर्णी ला ड्रग्स तस्करी प्रकरणी केनियात अटक
अभिनेत्री ममता कुलकर्णी ला ड्रग्स तस्करी केनियात अटक
नवी दिल्ली-बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामीला केनिया पोलिसांनी अटक केली आहे. अमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप या दोघांवर असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.
१९९२ ते २००२ च्या दशकात .सबसे बडा खिलाडी , चायना गेट ,आशिक आवारा , करण अर्जुन, क्रांतिवीर, बाजी, आशिक आवारा यासारख्या काही गाजलेल्या चित्रपटात तिनं भूमिका साकारल्या.
बॉलिवूडच्या पडद्यावर ‘बोल्ड’ दृश्यं दिल्यानं ममता कुलकर्णी प्रकाशझोतात आली होती पण नंतर तिला फार चित्रपट मिळाले नाहीत. ड्रग्स माफिया विकी गोस्वामीशी लग्न करून तिनं सगळ्यांनाच धक्का दिला होता. १९९७ मध्ये अमली पदार्थ तस्करीप्रकरणी विकी दोषी ठरला होता आणि त्याला आजन्म कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली होती. परंतु, चांगल्या वर्तनाच्या आधारावर २०१२ मध्ये त्याला सोडण्यात आलं होतं.
गेली काही वर्षं ममता कुलकर्णी केनियात राहत होती. तिथल्या अमली पदार्थविरोधी पथकानं ड्रग्ज तस्करीचं एक मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलं असून त्यात ममता आणि विकीलाही अटक झाल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे
दोनशे थिएटर्समधे झळकणार ‘एलिझाबेथ एकादशी’
बालदिनाची बच्चेकंपनीला मनोरंजनाची खास भेट
दुरचित्रवाणी, यु ट्युब आणि सोशल नेटवर्क साइट्सवरून झळकणारे ट्रेलर, व्हाट्स अॅप फेसबुक सारख्या माध्यमांतून शेअर होणारे पोस्टर्स यामुळे सर्व प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट उद्या बालदिनी सुमारे २०० थिएटर्समधून प्रदर्शित होणार असून दिवसाला साडेचारशेहून अधिक शोज् होणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रासोबतच कर्नाटक आणि गुजरातमधील काही शहरांतही तो झळकणार आहे. परेश मोकाशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती मयसभा आणि एस्सेल व्हिजनने केली आहे.
नावातूनच उत्सकुता निर्माण करणारा ‘एलिझाबेथ एकादशी’ बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ठरला आहे. कोणताही प्रसिद्ध कलाकार किंवा नायक, नायिका या चित्रपटामध्ये नसले तरी यातील लहानगे कलाकार हेच या चित्रपटाचे ‘स्टार’ आहेत. पंढरपुरच्या मातीतील सायली भंडारकवठेकर आणि पुष्कर लोणारकर तर पुण्याचा निरागस छोकरा असलेला श्रीरंग महाजन हे तिघेही सध्या प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय झाले आहेत. ट्रेलरमध्ये दिसणारं ज्ञानेश म्हणजेच श्रीरंगचं प्रवचन, झेंडु म्हणजेच सायलीचं “गरम बांगड्या घ्या गरम बांगड्या” हा डायलॉग आणि गण्या म्हणजेच पुष्करच्या स्पेशल शिव्यामुळे सध्या हा ट्रेलर प्रचंड लोकप्रिय झाला आहे.. याशिवाय या तिघांवर चित्रीत केलेलं “दगड दगड” हे गाणंही सर्वांना आवडत आहे. पंढरपुरची पार्श्वभूमी आणि कार्तिकी एकादशीच्या उत्सवात घडणारी एक धम्माल गोष्ट या चित्रपटात बघायला मिळणार आहे.
‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’नंतर परेश मोकाशी यांनी ही दुसरी कलाकृती प्रेक्षकांसाठी आणली आहे. चित्रपटाची कथा मधुगंधा कुलकर्णी यांची असून अमोल गोळे यांचे छायांकन आहे. यावर्षी ‘टाइमपास’, ‘फॅंड्री’, ‘लय भारी’ आणि ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो’ सारखे ब्लॉकबस्टर हिट चित्रपट देणा-या एस्सेल व्हिजनने खास बालदिनाच्या दिवशी ‘एलिझाबेथ एकादशीची’ भेट प्रेक्षकांसाठी आणली आहे. बच्चेकंपनीसोबतच मोठ्यांनाही आवडेल असाच हा चित्रपट १४ नोव्हेंबरपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
फिरसे भूलभुलय्या -एकीकडे हेल्मेट सक्ती दुसरीकडे दीड रुपयाने महागले पेट्रोल-डिझेल!
पुणे- सरकार कोणतेही येवू द्यात पुणे पोलिस आज्ञाधारक च असावेत असे वाटावे या पद्धतीने पुण्यात हेल्मेट सक्तीचा डाव रचला जात असताना दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या दारात आता दीड रुपयाने आली आहे मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात एक रुपयाने कपात होण्याचे संकेत मिळत असताना केंद्र सरकारने अबकारी करात वाढ केल्याने पेट्रोल-डिझेल प्रतिलिटर दीड रुपयाने महागले आहे. सरकारच्या कठोर निर्णयामुळे सामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा भुर्दंड बसणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारने आज (गुरुवारी) अचानक पेट्रोल- डिझेलवरील अबकारी करात जवळपास दीड रुपयाने प्रतिलिटर वाढ केली. अनब्रांडेड डिझेलवरीलअबकारी कर वाढवून 2.96 रूपये तर ब्रांडेड डिझेलवरीलअबकारी 5.25 रूपये केला आहे. तसेच अनब्रांडेड पेट्रोलवरीलअबकारी कर 2.70 रूपये तर ब्रांडेड पेट्रोलवरील अबकारी कर 3.85 रूपये केला आहे.
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने घसरत असल्याने पेट्रोलसह डिझेलचे दर गेल्या दोन महिन्यांपासून अनेक वेळा कमी झाले होते.
भाजपा पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्याउपाध्यक्षपदी रणवीर अरगडे
भारतीय जनता पार्टी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी रणवीर अरगडे यांची नियुक्ती करण्यात आली , या नियुक्तीचे पत्र भारतीय जनता पार्टी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष संतोष इंदुरकर यांनी नियुक्ती करण्यात आली .
रणवीर अरगडे हे सोलापूर बाजार येथे राहत असून पतित पावन संघटनेपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत , त्यांनी भारतीय जनता पार्टी पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड वार्ड क्रंमांक पाच , सोलापूर बाजार येथील अध्यक्षपदी काम केले पहिले आहे . तसेच जय भवानी मित्र मंडळच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत . त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे त्यांची हि नियुक्ती करण्यात आली आहे . त्यांच्या या नियुक्तीबद्दल राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे अभिनंदन केले आहे .

“महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस’ ची डेंग्यु सर्वेक्षणात पुणे पालिकेला मदत
पुणे:
शहरात डेंग्युला अटकाव घालण्यासाठी पालिका करीत असलेल्या उपाययोजनांतील सर्वेक्षणात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या आणि “बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या “महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’ चे डॉक्टर्स मदत करीत आहेत, अशी माहिती “महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस’चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ.ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.
पुण्यातील औंध, बिबवेवाडी, भवानी पेठ, वारजे, घोले रोड, हडपसर, कृष्णानगर (हडपसर), नगर रोड, धनकवडी, मार्केटयार्ड, कोंढवा, शिवाजीनगर, गुलटेकडी, ढोले-पाटील रोड या भागामध्ये पालिकेची डेंग्यु अटकाव मोहिम सुरू आहे . पालिकेच्या या मोहिमेतील सर्वेक्षण कार्यात “महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’ चे 42 डॉक्टर्स व कर्मचारी सहभागी आहेत. आत्तापर्यंत “डायल 108′ सेवेच्या रूग्णवाहिकेद्वारे डेंग्यू लक्षणाच्या सात गंभीर रूग्णांना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
“26 जानेवारी 2014 रोजी सुरू झालेल्या या अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी 108 या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. 108 डायल वातानुकुलित विनामूल्य सेवा रूग्णवाहिकांमध्ये प्राण वाचविण्यासाठी व्हेंटीलेटरसहित सर्व अत्याधुनिक वैद्यकीय साधने आहेत. या सेवेचे मुख्य संचालन केंद्र व “रिस्पॉन्स सेंटर’ औंध उरो रुग्णालय (पुणे) येथे आहे, असे “बी.व्ही.जी. इंडिया’चे अध्यक्ष एच.आर. गायकवाड यांनी सांगितले.
…आता जनता तुम्हाला माफ करणार नाही!
(लेखक — प्रथमेश नारविलकर)
‘भ्रष्टाचार करने वालो, जनता माफ नही करेगी’ या आशयाचे कँपेन मोदींच्या बीजेपीने लोकसभा निवडणुकीत चालवले. त्याची जोरदार चर्चा झाली, प्रतिसादही मिळाली. परंतु महाराष्ट्रातील आजची एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता ‘आता हीच जनता तुम्हाला येत्या काळात माफ करणार नाही’ असं म्हणावं लागतय.
खरतर महाराष्ट्राच्या जनतेसाठी आजचा दिवस दुर्दैवीच म्हणावा लागेल. कारण ज्या भ्रष्ट राष्ट्रवादीला नाकारून जनतेने बीजेपीला डोक्यावर घेतले त्याच बीजेपीने आज जनतेकडे सत्तेच्या लालसेपोटी दुर्लक्ष केले आहे. राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने आज लाखो प्रश्न सामान्यांना पडले असणार. परंतु त्याचं एकमेव उत्तर आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे आणि त्यांच्या सरकारकडे आहे; ते उत्तर असे की, ‘महाराष्ट्राच्या विकासासाठी जे आम्हाला पाठिंबा देतील, आम्ही त्यांच्या सोबत जाऊ’
अरे मग, निवडणुकीआधी तुम्हीच ओरडून सांगत होतात ना, की आघाडी सरकारनी विशेषत: राष्ट्रवादीने महाराष्ट्राचा कसलाही विकास केला नाही. तुमचे सर्वोच्च नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तर म्हणत होते, ‘राष्ट्रवादी इज नॅच्युरली करप्ट पार्टी’ मग आता काय एक महिन्यात त्यांनी सज्जनतेचं ‘सोवळ’ नेसलं, का अचानक तुम्हाला साक्षात्कार झाला की, तुमच्या सोबत येऊन राष्ट्रवादी महाराष्ट्राचा विकास करू शकते?
देवेंद्रजी,
खरतर जनतेला तुमच्याकडूनच अपेक्षा होत्या, परंतु आज प्रकर्षानं हे स्पष्ट झालं की महाराष्ट्रातलं सरकार तुम्ही चालवणार नाहीत तर त्याची सुत्र दिल्लीतून हलविली जातील आणि नेतृत्त्व करतील महाराष्ट्राचे एकमेव ‘साहेब’…
लक्षात ठेवा कुबड्यांवर उभे राहीलेले हे तुमचे सरकार जास्त काळ टिकणार नाही आणि ज्यावेळी पुन्हा निवडणुका होतील त्यावेळी ‘जनता तुम्हाला माफ करणार नाही…!’
– प्रथमेश नारविलकर
—-
राज्यपालांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी काँग्रेस चे पाच आमदार निलंबित
मुंबई- ‘बहुमत नसतानाही राज्य विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं रेटून नेणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारविरोधात शिवसेना व काँग्रेसनं एल्गार पुकारला आहे. ‘विश्वासदर्शक ठराव पुन्हा घ्यावा, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. तर, अल्पमतातलं हे सरकार घटनाविरोधी असून या सरकारच्या बरखास्तीच्या मागणीसाठी राज्यपालांकडे जाण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे.असे असताना दुसरीकडे
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना धक्काबुक्की केलाच्या आरोपावरून कॉंग्रेसच्या पाच आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पाचही आमदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. राहुल बोंद्रे (चिखली), अब्दुल सत्तार अब्दुल नबी (सिल्लोड), वीरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), जयकुमार गोरे (माण), अमर काळे (आर्वी) या निलंबनाची कारवाई झालेल्या आमदारांची नावे आहेत.
राज्यपाल सी विद्यासागर राव आपल्या अभिभाषणाला विधिमंडळात प्रवेश करत असताना कॉंग्रेसच्या 12 आमदारांनी त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप सत्तारुढ भाजपने केला होता. व्हिडिओ क्लिपमध्ये कॉग्रेसचे ‘ते’ बारा आमदार दिसत असल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. तसेच कॉंग्रेसच्या आमदारांना निलंबित करण्याची मागणी खडसे यांनी केली होती. दुसरीकडे,आज भाजप आणि कॉंग्रेस आमदारांमध्ये चांगलीच जुंपली होती. अध्यक्षांच्या दालनासमोरच कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आणि भाजपचे आमदार गिरीश महाजन हे दोघे आपापसात भिडले. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. राज्यपालांची गाडी रोखल्याबद्दलचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला. संबंधित प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी विरोधीपक्षनेते एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात केली. मात्र, नंतर सत्तारुढ आमदारांनीही सभागृहात प्रचंड गदारोळ केला आहे. कॉंग्रेसच्या 12 आमदारांच्या निलंबनाची मागणी एकनाथ खडसे यांनी लावून धरली होती.
कॉंग्रेसचे निलंबित आमदार अब्दुल सत्तार हे प्रतिक्रिया देताना म्हणाले, कॉंग्रेसच्या पाच आमदारांवर निलंबनाची कारवाई म्हणजे लोकशाहीचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे वेळ मागितला होता.लोकशाही पद्धतीने मतदान करण्याची मागणी राज्यपालांना केली होती. मात्र, कॉंग्रेसच्या आमदारांना राजपालांनी वेळ दिला नाही. भाजपला सत्तेची गुर्मी आली असून हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
अभिनेते अतुल अभ्यंकर यांचे निधन
झी मराठीवरील’ ‘जय मल्हार’ या लोकप्रिय मालिकेतील हेगडी प्रधान यांची भूमिका साकारणारे अतुल अभ्यंकर (४२) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि आई असा परिवार आहे. ‘जय मल्हार’ मालिकेतील भूमिकेसाठी त्यांना नुकताच झी मराठी अॅवॉर्डस् 2014 चा सर्वोत्कृष्ट सहाय्यक पुरुष व्यक्तिरेखेचा पुरस्कार मिळाला होता.
आज दुपारी ३.३० वा. त्यांच्यावर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले

निसर्ग संवर्धनासाठी पुणे शहरात ” पर्यावरण जनजागृती पदयात्रा ” संपन्न
पुणे धर्म प्रांताच्यावतीने पर्यावरणाच्या रक्षणासाठी , निसर्ग संवर्धनासाठी पुणे शहरात ” भव्य पर्यावरण जनजागृती पदयात्रा ” उत्साहात संपन्न झाली .
या भव्य पर्यावरण पदयात्रेची सुरुवात सकाळी ९ वाजता , क्वार्टर गेट चौकातील ऑर्नेला हायस्कूलपासून सुरुवात झाली . लक्ष्मी रोड , सिटी चर्च , साचापीर स्ट्रीट , इस्ट स्ट्रीट , इंदिरा गांधी चौक , व्होल्गा चौक , मोहम्मद रफी चौक , महात्मा गांधी रोड , कोहिनूर चौक , भोपळे चौक , बाबाजान चौक , कॉन्व्हेन्ट स्ट्रीट या मार्गे काढण्यात येउन सेंट व्हीन्सेट शाळेच्या मैदानावर या पदयात्रेचा समारोप करण्यात आला . या पदयात्रेचे उद्घाटन जेष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्या हस्ते वृक्षास पाणी घालून करण्यात आले . यावेळी पुणे धर्म प्रांताचे बिशप राईट रेव्हरंड थॉमस डाबरे, शिलॉंग येथील आर्क बिशप डॉमनिक झाला , पुण्याचे चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचे बिशप राईट रेव्हरंड अंडरयु राठोड ,फादर माल्कम सिक्वेरा , मुस्लिम समाजाचे अभ्यासक अनिस चिस्ती , मुस्लिम वेल्फेअर एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद बियाबानी , नितीन डिसोझा , जेम्स पॉल, केविन मेनवेल , ख्रिस्ती साहित्यिक अशोक आंग्रे , फादर गोडविन सलढाना , फादर जेम्स लुईस , फादर आयरिस फर्नाडिस , डॉ. कॉलीन लुझाडो ,फादर अंडरयु फर्नाडीस,फादर डायगो आल्मेडा आदी मान्यवर आणि २८ शाळा सुमारे आणि२ महाविद्यालयामधील दोन हजार विद्यार्थी तसेच सर्वधर्मीय लोक सहभागी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . या पदयात्रेत निसर्गाचा ऱ्हास थांबवा , हवा पाणी दुषित करू नका , जिथे आहे स्वछता , तिथे वसे देवता असे निसर्गाचे जनजागृतीपर संदेशाचे फलक घेऊन विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते .
समारोपाच्या वेळेस सेंट व्हिन्सेट शाळेच्या मैदानावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे पर्यावरण जनजागृतीपर नृत्ये विद्यार्थ्यांनी सादर केली . यावेळी पुणे धर्म प्रांताचे बिशप राईट रेव्हरंड थॉमस डाबरे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचा संदेश पृथ्वीला वाचविण्याचा संदेश दिला , सर्व विद्यार्थी मनापासून पदयात्रेत सहभागी होऊन पदयात्रा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल आभार मानले .
यावेळी सर्व उपस्थितांचे स्वागत फादर गोडविन सलढाना यांनी केले तर सूत्रसंचालन सिनी डेव्हिड यांनी केले तर आभार फादर माल्कम सिक्वेरा यांनी मानले . या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली .
कचरा व्यवस्थापन नियमावलीत नमूद केलेल्याच बकेट विकत घ्या . खासदार वंदना चव्हाण यांची पालिका आयुक्तांकडे मागणी.
पुणे शहरात कचरा व्यवस्थापन उत्तम पद्धतीने व्हावे व नागरिकांनी ओला व सुका कचरा विभाजन करून ठेवावा, जेणे करून महानगरपालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या वाहनामध्ये हि ओला सुका कचरा वेगळा वेगळा देता येईल या उद्देशाने पुणे महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागामध्ये सोसायटी, बंगले व नागरिकांना पांढर्या व हिरव्या रंगाच्या बकेट कचरा साठवण्यासाठी दिल्या जातात. परंतु अनेक ठिकाणी या बकेट चा वापर कचरा सोडून इतर कारणांसाठी केला जातो.
शासनाच्या महानगरपालिका कचरा व्यवस्थापन नियमावली मध्ये या संदर्भात स्पष्ट सब्दात मार्गदर्शन करण्यात आल आहे. त्यामध्ये या बकेट कशा असाव्यात याचे ‘डिझाईन’ देखील देण्यात आले आहे. परंतु पालिकेच्या वतीने पुन्हा जुन्याच बकेट खरेदी करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. लाखो रुपये खर्च करून घेतल्या जाणार्या या बकेट नियमावली मध्ये नमूद केल्या प्रमाणेच असाव्यात.
तसेच रस्त्यावर ठेवण्यात येणारे कंटेनर हे बंद दरवाज्याचे असावेत असेही या नियमावली मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचे हि पालन पालिका प्रशासना कडून होताना दिसत नाही. या दोन्ही गोष्टी शासनाच्या महानगरपालिका कचरा व्यवस्थापन नियमावली प्रमाणेच झाल्या पाहिजेत अशी मागणी खासदार वंदना चव्हाण यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्येकडे केली आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकी मध्ये नगरसेवक चेतन तुपे यांनीहि सदर बकेट नियमावली प्रमाणेच असाव्यात या साठी आग्रह केला.


