Home Blog Page 3628

आगामी महापालिका निवडणुकीत पुणे महापालिकेवर भगवा फडकविणार – विनायक निम्हण

0

भाजपचे काही जण घरात बसून लाटेवर निवडून आलेले आहेत , परंतु या लाटेमध्ये सर्वजण वाहून जाणार आहेत त्यामुळे शिवसैनिकच खऱ्या अर्थाने काम करणारा राहणार आहे कारण शिवसैनिकाकडे गेल्यावर नागरिकांना कामे होतील असा आत्मविश्वास आहे , शिवसेना जनाधार असलेला पक्ष आहे . माझे सर्व सहकारी वाघाचे काम करणारे आहेत , त्यासाठी या सर्वाना बरोबर घेऊन शहरात बैठका घेऊन शिवसेना बळकट करणार आहे आगामी महापालिका निवडणुकीत महापालिकेवर भगवा फडकविणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना पुणे शहर प्रमुख विनायक निम्हण यांनी सांगितले .

          पुणे कॅम्प भागातील अग्रवाल कॉलनीमधील पुष्पा हॉलमध्ये शिवसेना पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाची प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली , त्यावेळी विनायक निम्हण यांनी मार्गदर्शन केले . या बैठकीस शिवसेना पुणे शहर संघटक अजय भोसले , शाम देशपांडे , सचिन तावरे , संजय मोरे , महाराष्ट्र वाहतूक सेना पुणे शहर अध्यक्ष महेश जगताप , शिवसेना पुणे शहर संघटिका राधिका हरिचन्द्रे , शिक्षण मंडळ सदस्या निर्मला  केंढे , नगरसेविका सोनम झेंडे ,  रोहिणी कोल्हाळ , सपना ढवळे , शिवसेना पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघ विभागप्रमुख जावेद खान , अतुल गोंदकर , दत्ताजी जाधव , गजानन थरकुडे , विकी पिल्ले , सुधीर ढवळे , सचिन हिरवे , मनीष सोनिग्रा , एकनाथ ढोले , मयुर झेंडे , उत्तम भुजबळ , युवा सेनेचे राहुल केवटे , किरण साळी , कैलास भोज , चंदू खुणेकरी आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते .

    यावेळी शिवसेना पुणे शहर संघटक सचिन तावरे यांनी सांगितले कि , पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघात शिवसेनेची ताकद आहे , विनायक निम्हण यांच्यामुळे शिवसेनेला संजीवनी मिळाली आहे . त्यामुळे सर्वांनी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महापालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविणार असून या भगव्याचे मानकरी पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघातील शिवसैनिकच राहतील असा विश्वास व्यक्त केला .

    या बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास  शिवसेना पुणे शहर प्रमुख विनायक निम्हण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली . या बैठकीचे सूत्रसंचालन अतुल गोंदकर यांनी केले .

‘जय मल्हार’ फेम बानू यांचे तळजाईत हळदी-कुंकू

0

1 2 3

पुणे : शिक्षण अर्धवट सोडून नव्हे तर शिक्षण पुर्ण करुनच अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रवेश करावा असा संदेश ‘जय मल्हार’ फेम बानू ऊर्फ ईशा केसकर यांनी दिला. तसेच सहकारनगर मध्ये राहणारा समिर पुराणिक हा माझ्या वास्तव जीवनातील खंडोबा असून येत्या काही दिवसात आम्ही दोघे विवाहबध्द होणार असल्याचे त्यांनी प्रथमच सांगितले.

खंडाळे चौक, तळजाई वसाहत येथे सुमनताई जगताप चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भव्य हळदी-कुंकू व तीळगुळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रसंगी परिसरातील हजारो महिलांनी उपस्थिती दर्शविली होती. यावेळी सभागृह नेते सुभाष जगताप, नगरसेविका उषाताई जगताप, अॅड.शालिनीताई डबीर व रोहिनी महाजन उपस्थित होत्या.

केसरकर यांनी ‘जय मल्हार’ मालिकेत साकारत असलेल्या बानू या भूमिकेविषयी सर्वांना अनुभव सांगितले. तरुण व विशेष करुन युवतींनी मोठी ध्येय बाळगून ती पुर्ण करण्यासाठी जाणीवपुर्वक कष्ट करायला हवे असे सांगितले. त्यांनी मालिकेमधील बानूच्या भूमिकेतील संवादाप्रमाणेच उपस्थितांशी संवाद साधला. तसेच त्यांनी जय मल्हार मालिकेच्या टायटल गीताचे गायन केले.

जगताप म्हणाले, सध्या मुलींच्या शिक्षणाची टक्केवारी वाढली असून मुलींनी स्वावलंबी होण्यासाठी निर्माण झालेल्या नवनव्या रोजगाराच्या संधींचा शोध घ्यायला हवा. शासन व स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना व उपक्रम आहेत, त्याचा महिलांनी लाभ घ्यावा.

उपस्थित महिलांसोबत बानू ऊर्फ ईशा केसकर यांनी हळदी-कुंकू व तीळगुळ कार्यक्रमात सहभाग घेतला. बानू ऊर्फ ईशा केसकर यांच्या शुभहस्ते महिलांना वानाचे वाटप करण्यात आले.

बेळगावमध्ये मराठी नाट्यसंमेलनाचे उद्घाटन

0
बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी, बेळगाव– 95 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनास बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरीत थाटात व प्रचंड उत्साहात सुरुवात झाली. नाट्यदिंडीने या संमेलनाला सुरुवात झाली तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन केले.
 बेळगावकर रसिक मंडळी व महाराष्ट्रातून आलेले रंगकर्मी यांच्या उपस्थितीत स्वागत करून नाट्यसंमेलनाचा पडदा उघडला गेला. उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र दांडी मारली. दरम्यान, मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी नाट्यसंमेलन ठिकाणी निदर्शने करीत घोषणाबाजी करून गोंधळ घातला. बेळगावचा संयुक्त महाराष्ट्रात समावेश झालाच पाहिजे असे सांगत कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. त्यामुळे काही वेळ उद्घाटन समारंभा लांबला. तरीही तब्बल 60 वर्षांनंतर बेळगावात नाट्य संमेलन होत असल्याने नाट्यरसिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण असल्याचे दिसून आले.

ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांचे निधन

0
Bapu
पुणे- ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष आत्माराम भेंडे यांचे शनिवारी निधन झाले. ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे आज बेळगावमध्ये उद्घाटन होत असतानाच भेंडे यांच्या निधनाचे वृत्त आल्याने संमेलनावर दु:खाची छाया पसरली असून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ९३ वर्षीय आत्माराम भेंडे यांनी पुण्यातील रत्ना रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
सहा दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आत्माराम भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटरमधून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा तिन्ही भूमिका सांभाळताना त्यांनी हिंदी व इंग्रजी रंगभूमीवरही कामाचा ठसा उमटवला. झोपी गेलेला जागा झाला, तरूण तुर्क म्हातारे अर्क, पिलूचं लग्न, दिनूच्या सासूबाई राधाबाई, पळा पळा कोण पुढे पळे, तुज आहे तुजपाशी, मन पाखरू पाखरू, प्रीती परी तुजवरी अशी अनेक नाटकं गाजली.
जाहिरात व चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातील भूमिकाही खूप गाजली.

खालिद कासम शेख यांचे अल्पशा आजाराने निधन

0

2

पुणे कॅम्प भागातील जुना मोदीखाना येथे राहणारे खालिद कासम शेख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . ते ५४ वर्षाचे होते . त्यांच्यामागे आई , वडील , पत्नी , दोन मुले , चार भाऊ , तीन बहिणी असा परिवार आहे . त्यांच्यावर साचापीर स्ट्रीटवरील मोहम्मदीन सुन्नी कब्रस्थान मध्य अंत्यसंस्कार करण्यात आले . महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात त्यांनी हेड क्लार्क म्हणून काम केले . दि मुस्लिम वेल्फअर एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि अवामी महाजचे सचिव वाहिद बियाबानी यांचे ते थोरले बंधू होते . त्यांच्या अंत्यसंस्कार समयी पुणे कॅम्प भ्गातैल विविध सामाजिक , राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .

झी मराठीचा ‘लय भारी’ विक्रम वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयरने मोडले सर्व रेकॉर्डस्

0

मराठी मालिका, कार्यक्रम आणि सोहळ्यांद्वारे मराठी प्रेक्षकांना दर्जेदार कलाकृती देणारी वाहिनी म्हणजे झी मराठी. गेल्या दिड दशकाहून अधिक काळाच्या या प्रवासात झी मराठीने आपल्या प्रेक्षकांना सतत काही तरी नवीन देत त्यांच्या आवडी जपल्या आणि नवीन आवडीही निर्माण केल्या. अनेक यशोशिखरे गाठत मैलाचे दगड रचत मराठी मनोरंजनविश्वाला समृद्ध करण्याचं काम झी मराठीने अव्यहातपणे केलंय. झी मराठीच्या याच यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय लय भारी’ चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयरने. मागील आठवड्यात २५ जानेवारीला झी मराठीवरून लय भारी’ प्रसारीत झाला आणि त्याने एक नवा विक्रम रचला. गेल्या सात वर्षांमध्ये हिंदी आणि मराठी वाहिन्यांवरून प्रसारीत झालेल्या चित्रपटांच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय आणि अधिक प्रेक्षकांनी बघितलेला चित्रपट अशी नोंद लय भारी’च्या नावावर झाली आहे. आकडेवारीच्या किंवा टीआरपीच्या भाषेत सांगायचं झाल्यास १८८९८० जीटीव्हीटी (Gross Television Viewers in Thousand)आणि ५७२७ टीव्हीटी (Television Viewers in Thousand) कमावत या चित्रपटाने नवा इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे लय भारीने हिंदी वाहिन्यांवरून प्रसारीत झालेल्या ‘थ्री इडियट्स’, ‘बॉडीगार्ड’, ‘सिंघम’, ‘दबंग’ यांसारख्या चित्रपटांच्या पहिल्या प्रसारणाच्या आकडीवारीचे विक्रमही मोडीत काढले आहेत. महाराष्ट्रात केबल आणि सेट टॉप बॉक्स वापरणा-या ग्राहकांपैकी सुमारे सव्वा कोटी प्रेक्षकांनी लय भारी’चा हा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयर बघितला हे विशेष.

 

मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या लय भारी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम रचत मराठी चित्रपटांना ख-या अर्थाने मोठं स्वप्न दाखवलं.. बॉलिवुडमधला मराठमोळा स्टार रितेश देशमुखने लय भारीमधून मराठीत पदार्पण केलं आणि मराठीला ख-या अर्थाने ग्लॅमरस स्टार मिळाला. चांगली कथा, दमदार अभिनय, दर्जेदार निर्मितीमुल्य, अचूक दिग्दर्शन, श्रवणीय संगीत यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. अॅक्शनपॅक्ड कथा आणि दमदार संवादामुळे हा चित्रपट लोकप्रिय झालाच शिवाय यातील गाण्यांनी विशेषतः माऊली माऊली” या गीताने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.  बॉक्स ऑफिसवर तब्बल चाळीस कोटींची कमाई करत लय भारीने नवा उच्चांक प्रस्थापित केला. मोठ्या पडद्यावर लय भारीला जे यश आणि प्रेम मिळालं त्याची पुनरावृत्ती छोट्या पडद्यावरही बघायला मिळाली.

 

मागील अनेक वर्षांपासून मराठी वाहिन्यांमध्ये आपलं वर्चस्व निर्विवादपणे गाजवत झी मराठीने आपलं अग्रस्थान कायम राखलं आहे. या वाहिनीवरील मालिकांना आणि विविध सोहळ्यांनाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. प्रेक्षकांसोबत असलेली ही बांधिलकी जपत झी मराठीने मनोरंजनाची अनेक दालनं उघडली. या वाहिनीवरून जे प्रसारीत होईल ते अभिरूचीसंपन्न आणि दर्जेदार असेल याची काळजीही वाहिनीने घेतली. मागच्या काही महिन्यांमध्ये प्रसारीत झालेल्या ‘दुनियादारी’, ‘टाइमपास’, ‘फॅंड्री’ या चित्रपटांच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयरला सुद्धा प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. यात फॅंड्रीच्या प्रसारणाच्या वेळी तर सामाजिक बांधीलकी जपत जाणीव झाली बदल हवा” सारखा उपक्रम राबवत अनेक गरजू संस्थांना मदतीचा हातही दिला. लय भारी’ च्या वर्ल्ड टिव्ही प्रिमीयरसाठीही नियोजनबद्ध मार्केटींग आणि योग्य प्रसिद्धीतंत्राची पुरेपुर जोड देत झी मराठीने यशाचा हा नवा विक्रम रचला.

आधुनिक युगातील ‘श्रावण बाळा’ची -यंदाची काशीयात्रा संपन्न

0

2

पुणे- आधुनिक युगातील श्रावण बाळ अशी ओळख निर्माण करणाऱ्या पुण्याच्या उपमहापौर आबा बागुल यांची यंदाची काशीयात्रा आज पूर्ण झाली त्यांनी पुण्यातून यात्रेला नेलेले शेकडो भाविक आज पुण्यात परतले . आबा बागुल , बागुल परिवार,तसेच त्यांचे सहकारी नंदकुमार बानगुडे , रमेश भंडारी या यात्रंचे आयोजन कित्येक वर्षांपासून सातत्याने करत आहे . त्यांच्या या उपक्रमांपासूनच अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी अशा यात्रा काढण्याची प्रेरणा घेतली , पण सातत्य आणि सर्वप्रथम कल्पना या दोन्हीबाबत आबा बागुल क्रमांक एक वर आहेत. त्याची हि १५वी  काशीयात्रा होती यावेळी त्यांनी १५०० नागरिकांना या यात्रेत नेले होते , सर्वांनी या यात्रे दरम्यान वाराणसीतील राजेन्द्रप्रसाद घाटावर स्वच्छता अभियान राबविले

राजस्थानातील ‘हा’ फलक हटविला- कंत्राटदाराला अटक

0
जयपूर- राजस्थानमधील नव्याने बांधलेल्या उड्डाणपूलाला महात्मा गांधी यांची हत्या करणा-या नथुराम गोडसेंचे नाव दिल्याने वाद निर्माण झाल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत उड्डाणपूलाचा कंत्राटदार नीरजकुमार शर्माला अटक केली आहे आणि गोडसे पूल नावाचा फलक हि काढून टाकला आहे .
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात २२ कोटी रुपये खर्च करुन नवीन उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. हा पुल २०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या कार्यकाळात मंजूर झाला असून आता वसुंधरा राजे यांच्या काळात पूलाचे काम पूर्ण झाले आहे. या पूलावर दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी नथुराम गोडसे पूल असा फलक लावण्यात आला होता. भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी नथुराम गोडसे यांना देशभक्त महटले होते. पूलाच्या कंत्राटदाराने यातून प्रेरणा घेत पुलाला गोडसेंचे नाव दिले होते. पूलाचे उद्घाटनापूर्वीच ठेकेदाराने हा प्रताप केल्याने वसुंधरा राजे यांच्या सरकारची नाचक्की झाली होती. अखेरीस पोलिसांनी पूलाच्या कंत्राटदाराला अटक केली व पूलावरील फलकही हटवला.

दिल्ली त जय -पराजय दोन्ही जबाबदारी मोदींचीच ; शत्रु च्या विधानाने चर्चेला उधाण

0

नवी दिल्ली-. दिल्ली विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरणात चांगलेच तापले असून ‘भाजप’पेक्षा ‘आप’ला जास्त जागा मिळण्याची शक्यता अनेक सर्व्हेतून व्यक्त करण्यात आल्याने पक्षाचे धाबे दणाणले आहे.दरम्यान
दिल्लीतील पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव असेल का? या प्रश्नावर शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या स्टाइलमध्ये उत्तर दिले. ते म्हणाले की, जय-पराजय नेहमीच कर्णधाराची होत असते.शत्रुघ्न यांनी यावेळी मोदींबरोबर केजरीवाल यांची हि स्तुती केल्याने सारेच बुचकळ्यात पडले आहेत
‘आमचे नेते नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता प्रचंड आहे. ते देशातील जनतेच्या आशाआकांक्षांचे प्रतिक आहेत. ते डॅशिंग आहेत, दृष्टे नेते आहेत, त्यांचे दबंग व्यक्तिमत्व आहेत, चारही दिशांना त्यांचाच डंका आहे. आता ते प्रचारासाठी उतरले म्हणजे सगळ्यांचे लक्ष निश्चित त्यांच्याचकडे जाणार.इतकेच नाही तर त्यांनी ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांची स्तुती देखील केली. केजरीवाल यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा आहे, टीव्हीवर देखील ते पाहायला मिळतात. त्यांनी निवडणुकीच्या वातावरणात रंगत आणली आहे.
निगेटिव्ह पॉलिटिक्सवरून देखील त्यांनी आपल्याच पक्षाला लक्ष केले. बेकायदा फंड जमवल्याचा आरोप करणे हा नकारात्मक प्रचार असून ते पक्षाला शोभत नाही. आमचा विरोधी हा काही आमचा शत्रू नाही. त्यामुळे त्यांना मी शुभेच्छा देतो, असे म्हणत पक्षाच्या कामकाजालाही लक्ष केले.

शाहरुख खान ने रस्त्यावर केलेले अतिक्रमण तोडण्याचे आदेश

0

मुंबई- माणूस कितीही मोठ्ठा आणि गर्भश्रीमंत झाला तरी रस्ता किंवा फुकटची जागा बळकावणे, अतिक्रमण करणे काही सोडत नाही असेच काहीसे म्हणावे लागेल असा किस्सा प्रख्यात अभिनेता शाहरुख खान बाबत उघडकीस आला आहे , अभिनेता शाहरूख खान याने  मुंबईतील आपल्या अलिशान अशा मन्नत बंगल्याबाहेर सार्वजनिक रस्त्यावर आपली करोडो रुपयांची अलिशान व्हॅनिटी व्हॅन  पार्क करण्यासाठी अनधिकृतपणे बांधण्यात आलेला रॅम्प तोडण्याचे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिले आहेत. दोन दिवसापूर्वी मुंबईतील भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी लोकांच्या तक्रारीनंतर  ते जागे झाले हे विशेष . मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहून खासदार पूनम महाजन  यांनी शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यासमोरील रॅम्प हटविण्याची मागणी केली होती. शाहरुख खान हा मागील अनेक वर्षांपासून या रॅम्पवर आपली व्हॅनिटी व्हॅन पार्क करत आहे. शाहरुख खानच्या व्हॅनिटी व्हॅनला पार्क करता यावे यामुळे एक महत्त्वाचा रस्ता बंद झाल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे होते. त्यामुळे या लोकांना माउंट मॅरी चर्चजवळून जावे लागत होते. वांद्र्यात प्रत्येक महिन्यात भरत असलेल्या यात्रेमुळे हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो. मात्र, हा रस्ता बंद झाल्याने स्थानिक नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास होत होता.

स्थानिक रहिवाशांनी या रॅम्पला हटविण्याची मागणी वेगवेगळ्या माध्यमातून करीत होते. एका स्वयंसेवी (एनजीओ) संस्थेनेही याबाबत आवाज उठवला होता. मात्र, यश मिळाले नव्हते. मात्र, मागील आठवड्यात काही स्थानिक नागरिकांनी या भागातील भाजपच्या खासदार पूनम महाजन यांची भेट घेऊन यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. तसेच हा रस्ता कसा सार्वजनिक आहे व त्याचा वापर शाहरूख बेकायदेशीर कसा करीत आहे याची कागदपत्रे दाखवून न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
पूनम महाजन यांनी याची तत्काळ दखल घेतली व मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना याबाबत चौकशी करून रॅम्प हटविण्याची मागणी केली. महाजन यांनी सांगितले होते की, स्थानिक लोकांनी मला या रस्त्याची कागदपत्रे दाखविली आहेत व हा रस्ता सरकारी असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे या रस्त्याचा वापर सार्वजनिकरित्या सर्व नागरिकांना व रहिवाशांना करता आला पाहिजे. कोणतीही व्यक्ती अथवा संघटना सामान्य लोकांपेक्षा मोठी नाही.
कसा आहे शाहरुख खांचा मनात बंगला याबाबतची काही छायाचित्रे गुगल वर मिळतात । असा राजेशाही थाटाचा , आणि एखाद्या राजमहाला ला हि लाजवेल असा अलिशान बंगला शाहरुख ने अर्थातच मेह्नतीनेच बनविला असावा । मग त्याला आपली व्हॅनिटी व्हॅनपार्क करण्यासाठी रस्त्यावर अतिक्रमण करण्याची अवदसा का आठवावी हे नवलच म्हणावे लागेल । पहा शाहरुख खान च्या मन्नत ची हि छायाचित्रे …
060afd1bdd753021298883d447f23df985fe7f7209be6e7d8b1ff829072134fa867bb0f198ad6c1c29bdc992cf7fc709actor-shahrukh-khan-waves-to-his-fans-from-his-115553455c60266c0711f069256b7a0a515858

पुणे परिमंडलात वीजबिलातून 30 हजार 700 शेतकरी थकबाकीमुक्त कृषी संजीवनी योजनेला मार्चपर्यंत मुदतवाढ

0

पुणे : थकबाकीमुक्तीसाठी असलेल्या महावितरणच्या कृषी संजीवनी योजनेत पुणे परिमंडलातील 30,683

कृषीपंपधारकांनी सहभाग नोंदविला असून मूळ थकबाकी व चालू देयकांपोटी आतापर्यंत 18 कोटी 50 लाख

दरम्यान, कायमस्वरुपी वीजजोडणी खंडित झालेल्या व चालू (Live) जोडणीच्या थकबाकीदार

कृषीपंपधारकांसाठी कृषी संजीवनी योजनेला येत्या 31 मार्च 2015पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

पुणे परिमंडलात कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेले व चालू वीजजोडणीचे 78100 थकबाकीदार

कृषीपंपधारक आहेत. या सर्व थकबाकीदारांकडे एकूण 105 कोटी 51 लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे.

तथापि, कृषी संजीवनी योजनेत 50 टक्के मूळ थकबाकीचे 36 कोटी 84 लाख रुपये तसेच विलंब आकार शुल्काची

1 कोटी 47 लाख व व्याजाची 30 कोटी 35 लाखांची थकबाकी 100 टक्के माफ होणार आहे. त्यामुळे पुणे

परिमंडलातील थकबाकीदारांना 105 कोटी 51 लाखांपैकी तब्बल 68 कोटी 66 लाख रुपयांची थकबाकी या

योजनेत माफ होणार आहे. उर्वरित 36 कोटी 85 लाख रुपयांच्या 50 टक्के मूळ थकबाकीचा व नियमित देयकांचा

भरणा करून येत्या मार्च 2015 पर्यंत कृषीपंपधारकांना थकबाकीमुक्तीची संधी आहे.

पुणे परिमंडलात जानेवारी अखेरपर्यंत 30683 कृषीपंपधारकांनी मूळ थकबाकी व एप्रिल 2014 नंतरच्या

नियमित देयकांचा एकूण 18 कोटी 50 लाख रुपयांचा भरणा करून योजनेच्या माध्यमातून थकबाकीमुक्त झाले

कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्यासाठी थकबाकीदार कृषीपंपधारकांनी 31 मार्च 2014 पर्यंतच्या

मूळ थकबाकीची 50 टक्के रक्कम येत्या 31 मार्च 2015 पर्यंत भरावी तसेच 1 एप्रिल 2014 नंतरच्या सर्व चालू

देयकांचा भरणा करावा आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधीत उपविभाग कार्यालयांशी संपर्क साधावा, असे

आवाहन महावितरणने केले आहे.

पुणे येथील हज हाऊसचे बांधकाम सुरु करण्याबाबतची मागणी

0

11

पुणे –

पुणे येथील हज हाऊसचे बांधकाम सुरु करण्याबाबतची मागणी महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली . हज कमिटी ऑफ इंडियाचे सदस्य हाजी इब्राहीम भाईजान शेख , विधानपरिषद सदस्या हुस्नाबानो खलिफ़े , महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे सदस्य रियाझ काझी , अड. सलीम शेख , गुलामअली काझी , इसहाक चावीवाले , पुना हज कमिटीचे सचिव गुलाम हैदर सुखी , उपसचिव चिरागुद्दीन नुरुद्दीन आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते .

   पुणे येथील कोरेगाव पार्क मधील मौलाना अबुल कलाम आझाद सांस्कृतिक भवन येथे  हज हाऊस बांधण्यासाठी भूमिपूजन समारंभ झाला होता .  हज हाऊस साठीची जागा पुणे महानगरपालिकेने निश्चित केलेली आहे . मुख्य सभेत त्यास एकमताने मंजुरी दिलेली आहे . तसेच या कामासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद देखील करण्यात आली आहे  परंतु , न्यायालयाने मनाई हुकुम घेऊन बांधकाम थांबविले . त्यामुळे गेले अनेक वर्षापासून बांधकाम लांबले आहे . आता हा मनाई हुकुम रद्द झाला . पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाततून मिळालेली २५ लाख रुपयांची रक्कम  हज हाऊसकरिता वर्ग केली आहे . बांधकाम सुरु करण्यात आले होते . परंतु काही लोकांच्या विनाकारण विरोधामुळे या कामास अडथळे निर्माण झाले . ठेकेदारास आणि त्याच्या कामगारांना शिवागीळ व मारहाण करून काम बंद पाडले .

 त्यासाठी आपण वैयक्तिक लक्ष घालून काम त्वरित सुरु करण्याबाबत शासन स्तरावरून आदेश द्यावेत , समाजहित व हज यात्रेकरूना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली .

महापौर तृप्ती माळवींना अखेर आज सकाळी अटक!

0

कोल्हापूर- कोल्हापूरच्या महापालिकेच्या महापौर तृप्ती माळवींना अखेर पाच दिवसानंतर अॅटीकरप्शन विभाग (एसीबी)ने आज सकाळी अटक केली. रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच एसीबीने तत्काळ कारवाई करीत माळवींना अटक केली. आज दुपारी माळवींना कोल्हापूर सेशन कोर्टात हजर केले जाईल. शुक्रवारी सायंकाळी तृप्ती माळवींच्या सहाय्यकाला 16 हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले होते.

‘चित्रफित ३.० मेगापिक्सल’ सिनेमा २० फेब्रुवारीला

0

आजच्या युगात स्त्रिया पुरुषांपेक्षा कांकणभर श्रेष्ठ ठरत असताना काही पातळ्यांवर मात्र आजही त्यांचे शोषण होतच आहे. विशेषत: आजची पिढी जरी करिअरस्टिक असली तरी चंगळवादाच्या कृष्णविवरात अडकत चालली आहे. एकीकडे मन लावून अभ्यास करत स्वत:चे करिअर घडवायचे आणि दुसरीकडे पाश्चात्त्य संस्कृतीच्या आहारी जाऊन स्वत:ला अशा चक्रव्यूहात ढकलून द्यायचे, जिथे केवळ मन:स्ताप आणि पश्चाताप आहे. ‘चित्रफित ३.० मेगापिक्सल’ या सिनेमाचं कथानक या गोष्टींवरच आधारित आहे. ‘चित्रफित ३.० मेगापिक्सल’चा विषय जरी बोल्ड आणि सेंसेशनल असला तरी लेखकाच्या रूपात संवादलेखन करताना दिवाकर घोडके यांनी या सिनेमाची नाळ तरुणाईशी जोडली आहे. त्यामुळेच तरुणाईच्या भाषेतील एक स्टायलिश सिनेमा तयार झाला आहे.

राहुल बोरसे, अब्दुल आर. सी. ‘चित्रफित ३.० मेगापिक्सल’चे निर्माते असून सोमनाथ देवकर आणि जीवन पाटील सहनिर्माते आहेत. अभिनेता आशिष पाथोडे या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत सीमा आझमी, रवी पटवर्धन, गौरी शंकर, शेफाली मायदेव, दानसिंग राजपूत, माईक हेवन, नेरव सोनी, विनिता, महेश राळे, ईशा, सचिन कबीर, विपुल पाटील, मीनल चिरणकर, कोमल आणि सुहास शिरसाठ आदी कलाकारांच्या या सिनेमात भूमिका आहेत.

आशयघन कथानकाला प्रगत तंत्रज्ञानाची जोड देऊन बनवण्यात आलेला ‘चित्रफित ३.० मेगापिक्सल’ हा धडाकेबाज सिनेमा २० फेब्रुवारी २०१५ रोजी प्रदर्शित होणार आहे. भंडारदरा, माळशेज घाट, लोणावळा सह्याद्रीच्या विस्तीर्ण पर्वतरांगा, खिरोडा तसेच मुंबई आसपासच्या नयनरम्य परिसरात या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे निसर्गाच्या विविध रंगांसोबत मानवी स्वभावाच्या बदलत जाणा-या रंगछटाही बारकाईने या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. सचिन कबीर आणि मयूर हरदास या सिनेमाचे कॅमेरामन आहेत. प्रसाद कुलकर्णी आणि युग भुसाळ यांनी लिहिलेल्या गीतांना गायक आदर्श शिंदे, विजय प्रकाश, नंदेश उमप, नागेश आडगावकर यांनी स्वर दिला आहे. तर संगीतकार युग भुसाळ यांनी संगीत दिले आहे. कला-दिग्दर्शन दिनेश लहाते, ध्वनी दीप सिंग आणि शंकर सिंग पार्श्वसंगीत रोहित कुलकर्णी व्हिज्यूअल इफेक्ट्स अब्दुल रेहमान कोटवाला यांनी सिनेमाच्या तांत्रिक बाजू भक्कम केल्या आहेत.

महाराष्ट्राच्याच मोठ्ठ्या मैदानात या … ओवेसी ने अखेर ललकारले पुण्यात आवेशपूर्ण भाषण

0
(ओवेसी यांचे भाषण ए बी पी माझा ने लाईव्ह प्रक्षेपित केले … पहा … )
पुणे- भडकाऊ भाषणबाजीचा आरोप माझ्यावर करणाऱ्यांनो महाराष्ट्राचेच एखादे मोठ्ठे मैदान घ्या , तुम्ही या शंभर जण आम्ही येतो शंभर जण … मग बघू भडकावू काय असतेय ते । असे आवाहन देत मुस्लिम आरक्षणावर मोठे आवेशपूर्ण भाषण एम आय एम चे नेते खासदार असद ओवेसी यांनी पुण्यात केले , शिवसेनेचा इशारा त्यानंतर  निदर्शने या प्रकारांमुळे ओवेसी च्या या भाषणाकडे अनेकांचे  लक्ष लागून होते .कॉंग्रेसमधून शिवसेनेत परतलेल्या माजी आमदार विनायक निम्हण यांनी ओवेसी यांची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत ओवेसी यांनी शिवसेनेला प्रतिआव्हान दिले. ‘नये फकीर को भीक की जल्दी’ असा टोला त्यांनी निम्हणांचे नाव न घेता लगावला. पुढच्या सभेला मी नाही; तर अकबरुद्दीन ओवेसी येतील,असे जाहीर करायला ओवेसी विसरले नाहीत. असदुद्दीन यांचे बंधु अकबरुद्दीन भडक भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत.

@ काय म्हणाले या सभेत ओवेसी …
*भाजप-शिवसेनेसोबत मैत्री कधी ही  नाही
*मुस्लिम तरूण तुरुंगात सडताहेत तर संजय दत्त सिक्स पॅक बनवितो आहे,

 *अमित शहा यांचा खटला 7 महिन्यात निकाली निघतो तर मुस्लिम तरूण 10-10 वर्षे तुरूंगात सडताहेत
*बॉम्बस्फोटाचे खटले रोजच्या रोज चालवा, दोषी असेल तर जरूर सजा द्या पण निर्दोष असेल तर त्याला सोडून द्या, तुरुंगात सडवू नका
*11 टक्के मुस्लिम समाज असूनही केवळ 2.2 टक्के मुस्लिम तरूण पदवीधर होत आहेत
*आम्हाला मासे नको पण मासे पकडण्याचे प्रशिक्षण तरी द्या
*महाराष्ट्रातील 70 लाख मुस्लिम गरीब आहेत
*महाराष्ट्र सरकारमध्ये एकही आयएएस अधिकारी मुस्लिम का नाही
*मुस्लिम मुले डॉक्टर, इंजिनिअर, आयपीएस का होत नाहीत
*देशातील विविध कमिशनने मुस्लिम समाज शिक्षणात मागास व दारिद्री रेषेत असल्याचे सांगितल्यानंतर त्याकडे का दुर्लक्ष केले जाते
*सच्चर, रंगनाथन समितीच्या शिफारशीचे काय झाले, कोर्टानेही मुस्लिम मागास असल्याचे मान्य केले आहे
*मराठ्यांना पण आरक्षण द्या पण मुस्लिमांना नाही म्हणू नका सरकारला टोला
 *सबका साथ, सबका विकास मग मुस्लिमाना आरक्षण का नाकारता
*आम्ही हिंदुस्थानी आहोत, आमच्या राष्ट्रभक्तीबाबत शंका नको
*पाकिस्तानी हाफिज सईदविरोधात सर्वप्रथम आम्ही भूमिका मांडली
*पुण्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये किती मुस्लिम तरूणांना प्रवेश मिळतो
*मागील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने मुस्लिमांसाठी काहीही केले नाही
———————–
पंतप्रधानांना टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे लंडनचे कपडे घालण्याची आमची ऐपत नाही. देशभरातील मुस्लिमांची स्थिती वाईट आहे. आमची मुलंही डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस, आयपीएस व्हायला हवीत. त्यासाठीच त्यांना आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे विदेशी कपडे परिधान करणाऱ्या मोदींना, आमच्या मुलांच्या अंगावर कपडे पाहायचे आहेत की नाही? असा घणाघाती सवाल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला.तसंच सबका साथ, सबका विकासमध्ये आमचाही समावेश करा. राजकीय दृष्टी आम्ही तुमच्या सोबत कधीच नसू. मात्र तुम्ही सर्वांचा विकास करायलाच हवा, असं ओवेसींनी नमूद केलं. 
मुस्लिम समाजाची स्थिती वाईट आहे. महाराष्ट्रात 11 टक्के मुस्लिमांची संख्या आहे. मात्र त्यापैकी 70 टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली आहे. त्यामुळे आम्हाला आरक्षण मिळायलाच हवं, असं एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते.शिवसैनिकांची निदर्शने, पोलिसांची नोटीस आणि तापलेलं वातावरण,  या पार्श्वभूमीवर पुण्यात असदुद्दीन ओवेसी यांचं भाषण झालं.  मूल निवासी मंच आणि अॅक्शन फॉर महाराष्ट्र या संघटनेने मुस्लिम परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ओवेसींनी मुस्लिम आरक्षणाच्या बाजूने मत मांडलं.
बॉम्बस्फोट आणि दहशतवादी कारवायांशी संबंधित खटले रोजच्या रोज चालवले तर लवकर निकाल लागतील आणि किती पुरावे खरे आणि किती खोटे हे स्पष्ट होईल, असे ओवेसी म्हणाले. जेलमध्ये सेलिब्रेटी आणि मुस्लीम तरुण यांच्यात भेदभाव करू नये. खोट्या आरोपांखाली जेलमध्ये अडकवण्यात आलेल्या मुस्लीम तरुणांची लवकर सुटका करावी आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घ्यावे, असे आवाहन ओवेसी यांनी केले.
संजय दत्त याला जेलमध्ये विशेष वागणूक मिळते, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गंभीर आरोपाच्या खटल्यातून झटपट क्लीन चीट मिळते पण मुस्लीम तरुण जेलमध्ये अनेक दिवस सडत राहतात. हा प्रकार बंद व्हायला हवा, असे ओवेसी यांनी सांगितले. आम्हाला मुस्लीम असल्याचा अभिमान असला तरी याचा अर्थ आम्ही देशभक्त नाही असा होत नाही, असे ओवेसी म्हणाले. त्यांनी दहशतवादी आणि त्यांच्या हिंसेला विरोध करताना कट्टर हिंदूत्ववादी राजकीय संघटनांनाशी मैत्री अशक्य असल्याचे सांगितले.
 

 शिवसेनेकडून जोरदार निदर्शने—–

दरम्यान शिवसैनिकांनी कोंढव्यातील ज्योती हॉटेल चौकात जोरदार निदर्शने करून ‘एमआयएम’चे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेविरूद्ध आक्षेप नोंदवला. शिवसैनिकांचा विरोध लक्षात घेऊन पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त केल्यामुळे कोंढव्याला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान, शहरातील विविध भागांतून सुमारे तीनशे शिवसैनिकांना उचलण्यात आले, तर ज्योती चौकात निदर्शने केलेल्या सुमारे दीडशे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
शिवसेनेकडून ओवेसी यांच्या सभेला होणारा विरोध पाहता पोलिसांनी शहरात सगळीकडेच बंदोबस्त तैनात केला होता. माजी आमदार महादेव बाबर, सेनेचे उपशहरप्रमुख श्याम देशपांडे, अजय भोसले, युवासेनेचे अध्यक्ष किरण साळी, माजी नगरसेवक प्रशांत बधे, नगरसेवक अशोक हरणावळ, सचिन तावरे, रमेश कोंडे, कुलदीप कोंडे, राहुल कलाटे आणि बाबा धुमाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी साडेचार ते सायंकाळी सहाच्या दरम्यान ज्योती हॉटेल चौकात टप्प्याटप्याने जोरदार निदर्शने केली. कार्यकर्त्यांच्या विरोधाची धार वाढल्यामुळे त्यांना आवरणे पोलिसांना मुश्किल झाले होते. त्याचवेळी ओवेसी यांच्या सभेला जाणारे कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांच्यात शाब्दिक चकमकी झडल्या. परिणामी पोलिसांची धावपळ क्षणागणिक वाढत होती.
अप्पर पोलिस आयुक्त प्रकाश मुत्याळ, उपायुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे आणि श्रीकांत पाठक यांनी शिवसैनिकांना आवर घालून ताब्यात घेतले. ज्योती हॉटेल चौकात हा गोंधळ सुरू असतानाच तेथून काही अंतरावरच ओवेसी यांची सभा सुरू झाली होती. पोलिस शिसैनिकांनी ताब्यात घेतल्यानंतर अवघ्या १५-२० मिनिटांनंतर ओवेसी यांची सभा संपली. सभा संपल्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त अधिक आवळून कुठेही अनुचित घटना घडणार नाही, याची काळजी घेतली. पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केल्यानंतर वातावरण तापण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला दोन-तीन पोलिस व्हॅन भरून गेल्यानंतर शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकी झडू लागल्या. पोलिस काही महिला शिवसैनिकांना व्हॅनमध्ये बसवत असतानाच गर्दीमधून पोलिसांच्या दिशेने चप्पल भिरकावली गेली. पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळत, या घटनेकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबले.

शिवसेनेचा विरोध ‘एमआयएम’च्या पुण्यातील ‘लाँच’साठी पथ्यावर

  शहरातील पक्षवाढीसाठी सध्या काहीच कार्यक्रम हाती नसल्याने शिवसेनेने ओवेसींच्या सभेला विरोध करत संघर्षात उडी घेतल्याचे बोलले जात आहे. ओवेसींना विरोध केल्याने हिंदुत्वाचा अजेंडा घेवून शिवसेनेने भाजपलाही ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आहे. सेनेने केलेल्या विरोध एकप्रकारे ‘एमआयएम’च्या पुण्यातील ‘लाँच’साठी पथ्यावर पडल्याची चर्चा आहे.एमआयएमचे राज्यात दोन आमदार निवडून आल्यानंतर खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राज्यात आपले संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी ते सभाही घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी पुण्यात मुस्लिमांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर ओवेसी यांची सभा ठरली होती. परंतु, ओवेसीच्या सभेवर नुकतेच शिवसेनत घरवापसी झालेले माजी आमदार विनायक निम्हण यांनी आक्षेप घेतला. ओवेसींच्या सभेला परवानगी नाकारायची की नाही, हा पोलिसांच्या अखत्यारितील विषय होता. परंतु ओवेसी हे भावना भडकविणारी भाषणे करतात असा मुद्दा उपस्थित करत सेनेने त्यांच्या सभेला विरोध केला. यातून आपले हिंदुत्ववादी राजकारण सेनेने आपसूक साधले.पुणे शहरातील आठही आमदार भाजपाचे आहेत. त्यामुळे येथे आपले राजकारण रेटायचे असेल तर हिंदुत्त्वाच्या मुद्यावर आक्रमक होण्यासाठी सेनेकडे दुसरा पर्याय नसावा. याच कारणावरुन त्यांनी एमआयएमसोबत संघर्ष केला. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सेनेची बांधणी सुरु झाली असे म्हणता येईल. निम्हण यांनी शहरप्रमुख पद स्वीकारल्यानंतर पहिल्या आठवड्यात ओवेसीच्या सभेला आक्षेप घेत शिवसेना कार्यकर्त्यांमधील आक्रमकपणा जागा करुन नेतृत्वाचेही चुणूक दाखवून वरिष्ठांचे लक्ष वेधले आहे. शिवसेनेच्या शहरातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने बुधवारी कोंढव्यात निदर्शने केली. या शिवाय शहरात ठिकठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केल्याने संपूर्ण शहरात आज शिवसेना आणि ओवेसी यांच्या नावाची चर्चा होती़ शिवसेनेचा पिंडच आंदोलनाचा आणि एखाद्या प्रश्नावर रस्त्यावर उतरण्याचा आहे़ मुळचे शिवसैनिक असलेल्या निम्हण यांनी कार्यकर्त्यांची ही नस नेमकी ओळखून तिला या निदर्शनाद्वारे मोकळी वाट करुन दिली़ शिवसेनेने आठ वर्षांपूर्वी वीज मंडळाच्या कार्यालयावर केलेल्या आंदोलनानंतर ही मोठी निदर्शने असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.शिवसेनेने केलेला हा विरोध एमआयएमच्याही पथ्यावरच पडला आहे. या विरोधामुळेच ओवेसीच्या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले़ या विरोधानंतरही ओवेसी यांनी भाषण केलेच. त्यांनाही आपले संघटन वाढविण्यासाठी ही आयतीच संधी मिळाली. एका अर्थाने ओवेसींच्या सभेवरुन या उभय पक्षांकडून झालेले राजकारण या दोघांच्याही हिताचेच ठरले आहे.