Home Blog Page 3623

“दगडी चाळीवरती चित्रपट करणे आव्हानात्मक होते”-दिग्दर्शक – चंद्रकांत कणसे

0

मुंबईतील भायखळ्यातील ‘दगडी चाळीवर’ चित्रपट करणे म्हणजे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान होते. एका जीवंत व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट करणे व त्या चाळीतील व्यक्तीरेखा रुपेरी पडद्यावर उतरवणे हा माझ्या आयुष्यातील म्ह्त्वाचा टप्पा होता. असे सांगतायेत दिग्दर्शक चंद्रकांत कणसे………..

  करिअरची सुरवात कशी केली.

मला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. मी शाळेत असताना शाळेतील बालनाट्यात आवडीने भाग घेत असे माझ्या करिअरची सुरवात शालेय नाटकापासून केली त्या नंतर मी टेलिव्हिजन मधून अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत आलो. अभिनेता म्हणून मी माझ्या करिअरमध्ये खूप चढ – उतार पाहिले. ‘सर आले धावून’, यदा कदाचीत, ‘आता होवून जाऊ द्या’ ही माझी नाटके विशेष लक्षात राहण्यासारखी. त्या बरोबर टी.व्ही. वरती मी सह – दिग्दर्शक म्हणून  गंगुबाई नॉन मेट्रिक ही माझी मालिका तर दिग्दर्शन म्हणून ‘अजून  ही  चांद रात आहे’, १७६० सासूबाई, ‘आभास हा’ या मालिका टेलिव्हिजन वरती  केल्या. माझ्या जीवनात संजय जाधव व राजेश देशपांडे या दोन व्यक्तींचे खूप मोठे स्थान असून ते माझे गुरु आहेत.

‘दगडी चाळ ’ चित्रपट दिग्दर्शनासाठी कसा मिळाला.

अभिनया बरोबरच मी सह – दिग्दर्शक म्हणून माझ्या करिअरला सुरवात केली. मी  संजय जाधव यांच्या सोबत फक्त लढ म्हणा, रिंगा रिंगा, दुनियादारी, प्यार वाली लव्ह स्टोरी असे चित्रपट केले. तसेच अंकुश चौधरी बरोबर ‘झक्कास’ हा चित्रपट केला होता. माझे काम पाहून अंकुश चौधरी याने माझे दिग्दर्शक म्हणून ‘दगडी चाळ’ ला नाव सुचवले आणि मला हा चित्रपट मिळाला.

 

तुमच्या चित्रपटाविषयी सांगा.

‘दगडी चाळ’ हा चित्रपट १९९५ – ९६ च्या गँग वॉरवरती भाष्य करणारा असला तरी या चित्रपटात छानसी लव्हस्टोरी असून एक चांगली कथा आहे. एका चाळीतील सामान्य कुटुंबातील तरुण काही कारणामुळे तो गुन्हेगारी क्षेत्राकडे ओळला जातो. त्यांनतर त्याच्या जीवनात झालेले बद्दल, त्याच्या जीवनात हळूवारपणे आलेले प्रेम त्यातून फुललेली प्रेम कथा  या गोष्टीवर या चित्रपटाचे कथानक बेतले आहे. या चित्रपटात दिग्ग्ज कलाकारांची फौज आपणास पहावयास मिळेल. या चित्रपटात दोन गीते असून एक गणपती तर  दुसरे प्रेम गीत आहे

तुमच्या चित्रपटाच्या कलाकार व तांत्रिक टीम विषयी सांगा.

या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी, संजय खापरे, कमलेश सावंत व पूजा सावंत असे दिग्ग्ज कलाकार यात असून या चित्रपटात छायाचित्रण अनिकेत खंडागळे, कला दिग्दर्शक – मनोहर पाटील, संगीत – अमितराज, गीते – मंदार चोळकर, चित्रपटाचे लेखन – अजय ताम्हणे व प्रविण कमळे यांचे आहे  तर साईपूजा फिल्म एन्ड एन्टरटेन्मेंट प्रस्तुत आणि सुरेश सावंत व अमोल काळे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्टात प्रदर्शित करण्यात येईल. असे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनी सांगितले.

बेहिशेबी मालमत्तेबाबत नगरसेवकाविरुध्द गुन्हा दाखल

0

पुणे : महापालिकेतील राष्ट्रवादीचे सभागृह नेते सुभाष जगताप यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सहकारनगर पोलीस ठाण्यात बेहिशेबी मालमत्तेचा (अपसंपदा) गुन्हा दाखल केला आहे. जगताप यांच्या पत्नी उषा यांनाही आरोपी करण्यात आले असून तब्बल १ कोटी १२ हजार २१३ रुपयांची बेहिशेबी संपत्ती बाळगल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हेमंत वासुदेव भट यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, जगताप यांच्याविरुद्ध एसीबीकडे २०१२मध्ये तक्रार अर्ज प्राप्त झाला होता.

त्याची चौकशी एसीबीमार्फत सुरू होती. ही चौकशी ३१ जुलै २०१४ रोजी बंद करण्यात आली. परंतु तक्रारदार रवींद्र बराटे यांनी जगताप यांच्याविरोधात ३० सप्टेंबर २०१४ रोजी पुन्हा तक्रार अर्ज दिला होता.

जगताप यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सादर केलेल्या शपथपत्राची छायांकित प्रत एसीबीकडे सादर करून त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार एसीबीने त्याची पडताळणी केली आणि या अनुषंगाने चौकशी करण्यात आली होती.

नात्यांच्या पलिकडची मैत्रीची गोष्ट दिल दोस्ती दुनियादारी

0

2

झी मराठीवर ९ मार्चपासून सोम. ते शनि. रात्री १०.३० वा.

मैत्री म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाचं नेमकं उत्तर देणं तसं अवघडच. मैत्रीचं नातं हे सर्व बंधनापलिकडचं असतं. त्याला वयाचं, अंतरांचं, जाती-धर्माचं, वर्णाचं, लिंगाचं असं कुठलंच बंधन नसतं. शाळेत, वर्गात, कॉलेजमध्ये, कट्यावर, कार्यालयात, कधी कधी तर प्रवासातही मैत्रीचे धागे जुळतात आणि घट्ट होतात. पण ही मैत्री ख-या अर्थाने तेव्हा अधिक बहरते जेव्हा आपण आपल्या घरापासून दूर असतो . शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घरापासून दूर असणा-यांचं होस्टेल लाइफ’ किंवा पीजी लाइफ’ असं एक वेगळं विश्व तयार झालेलं असतं ज्यात सर्वार्थाने केंद्रस्थानी असते ती मैत्री. अशाच एका मैत्रीची आणि मित्रांची गोष्ट सांगणारा दिल दोस्ती दुनियादारी’ हा युथफुल कार्यक्रम झी मराठीवर दाखल होतोय येत्या मार्चपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता. ‘दुनियादारी’ फेम दिग्दर्शक आणि प्रसिद्ध छायादिग्दर्शक संजय जाधव यांच्या ड्रिमिंग ट्वेंटी फोर सेव्हन या संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे.

दिल दोस्ती दुनियादारीची कथा आहे घरापासून दूर राहणा-या सहा मित्र मैत्रिणींची. कैवल्य, आशुतोष, सुजय, अॅना, मीनल आणि रेश्मा असे हे सहा जण एकत्र आलेय स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत. यातील प्रत्येक जण वेगवेगळ्या उद्देशाने मुंबईत आलेला आहे. यात कुणाचा करिअरचा स्ट्रगल आहे तर कुणाचा काही तरी फॅमिली प्रॉब्लेम आणि हा स्ट्रगलच या सर्वांमधील एक समान धागा आहे. घरापासून आणि कुटुंबापासून दूर आलेल्या या सहा जणांचं एक नवं कुटुंब तयार झालं आहे ज्यात मैत्री, जिव्हाळा, आपुलकी, प्रेम आणि सोबतच धम्माल, मजा मस्तीही आहे. यातील प्रत्येकाने उराशी जोपासलंय एक स्वप्न. विविध स्तरातून आणि पार्श्वभूमीतून आलेला हा प्रत्येकजण आपापली स्वप्नं साकार करण्यासाठी या शहरात आलाय जिथे पावलापावलावर आहेत नवे अडथळे, नवी आव्हाने आणि नवे संघर्ष. या संघर्षांना  एकमेकांच्या साथीने तोंड देत सगळे निघालेयत अंतिम ध्येयाच्या दिशेने. काय आहेत त्यांची स्वप्नं ? आणि काय आहेत त्यांची आव्हाने? याची गोष्ट बघायला मिळणार आहे दिल दोस्ती दुनियादारी’ मध्ये.

मराठी मालिकांच्या विश्वात कायम काही तरी नवीन आणि दर्जेदार कथा देणा-या झी मराठी वाहिनीवरून ही ‘फ्रेश’ विषयावरची मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. विषयासोबतच यात नाविन्य आहे ते यातील कलाकारांचं. यातील सहाही व्यक्तिरेखांसाठी अतिशय फ्रेश चेह-यांची निवड करण्यात आली आहे. अमेय वाघ, सुव्रत जोशी, पुष्कर चिरपुटकर, सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि स्वानंदी टिकेकर अशी नव्या दमाची कलाकार मंडळी या मालिकेत बघायला मिळणार आहे. मराठीमध्ये अनेक दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन आणि छायांकन करणारे संजय जाधव यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. तर ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिकेचे दिग्दर्शन करणारे विनोद लव्हेकर यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे. संजय जाधव आणि आशिष पाथरे यांची कथा आहे तर आशिषच्या सोबतीने मनस्विनी लता रविंद्र यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.

आजच्या तरूणाईची गोष्ट त्यांच्याच भाषेत मांडणारी ही मालिका युथफुल असली तरी ती सर्व प्रेक्षकांचा विचार करून बनवली आहे त्यामुळे ती सर्वांनाच आवडेल अशी झालीये. नात्यांच्या पलिकडची मैत्रीची ही गोष्ट दिल दोस्ती दुनियादारी’ दाखल होतेय येत्या मार्चपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. फक्त झी मराठीवर.

नव्या प्रदेशाध्यक्ष नियुक्तीनंतर कॉंग्रेस भवनमध्ये नव्या शहराध्यक्षाचे वेध

0

पुणे – कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार अशोक चव्हाण यांच्या नियुक्तीचे शहरात वृत्त धडकताच कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कॉंग्रेस भवनच्या प्रांगणात सोमवारी जल्लोष केला. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या शहरातील उमेदवारांचा पराभव झाल्यावर अभय छाजेड यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पर्यायी नियुक्ती न झाल्यामुळे त्यांच्याकडेच प्रभारी सूत्रे सोपविण्यात आली होती. प्रदेशाध्यक्षांची आता नियुक्ती झाल्यामुळे शहराध्यक्ष केव्हा निवडले जातात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. तसेच इच्छुकांनी शहराध्यक्षपद मिळावे, यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत.
खासदार चव्हाण यांच्या नियुक्तीचे आम्ही स्वागत करतो. तसेच त्यांची नियुक्ती केल्याबद्दल पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे अभिनंदन करतो, असे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी म्हटले आहे. चव्हाण यांच्या नियुक्तीमुळे पक्ष आणखी भक्कम होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय मजदूर संघातर्फे अध्यक्ष सुनील शिंदे यांनीही प्रदेशाध्यक्ष निवडीचे नियुक्तीचे स्वागत केले आहे. नगरसेवक अविनाश बागवे म्हणाले, ‘चव्हाण हे तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षसंघटना आणखी भक्कम करतील. त्यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. पक्षाला राज्यात पुन्हा वैभवाचे दिवस चव्हाण आणतील.‘‘ या वेळी झालेल्या जल्लोषात प्रदेश कॉंग्रेस समितीचे प्रवक्ते रमेश अय्यर, शहर कॉंग्रेसचे सरचिटणीस विठ्ठल थोरात तसेच नीलेश बोराटे, अंजनी निम्हण, लतेंद्र भिंगारे, सुनील घाडगे, सचिन आडेकर, राजेंद्र भुतडा, सुजीत यादव, सुरेखा खंडागळे, सादिक लुकडे, मीरा शिंदे, प्रगती कांबळे, दयानंद अडागळे, प्रा. वाल्मीक जगताप, बबलू सय्यद, अमीन शेख, रोहित अवचिते आदी सहभागी झाले होते.

मराठी चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइममध्ये लावणे बंधनकारक करणार – तावडे

0

पुणे : ज्या वेळी इतर चित्रपट नसतात, त्या वेळी मराठी चित्रपट लावणे आणि चित्रपटांचा प्राइम टाइम सोडून इतर वेळ मराठी चित्रपटांना देणे, ही पद्धत बंद करून मराठी चित्रपटच मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइममध्ये लावणे बंधनकारक करायचा विचार असल्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

मराठी चित्रपट परिवाराच्या वतीने सोमवारी कलावंत आर्थिक साह्य योजेनेचा कार्यक्रम घेण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर, सतीश रणदिवे, विजय कोंडके, रामदास फुटाणे उपस्थित होते. या वेळी शरद वर्तके, दत्तोबा भडाळे, सुधा माने, शशिकला जाधव, राजाराम जाधव, रमाकांत सांगलीकर आदी कलाकार तसेच निर्मिती व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्यांना धनादेश देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

तावडे म्हणाले, ‘‘स्वत:चे आयुष्य पूर्णत: कलेला समर्पित केलेल्यांचा सन्मान कोणत्याही मंत्र्यांच्या हस्ते करण्यापेक्षा त्यातील जाणकाराने केला, तर केवळ त्या कलेचाच नाही, तर कलाकाराचादेखील सन्मान होतो. कलेला राजकारण्यांपेक्षा राजाश्रय मिळायला पाहिजे.’’

मिळणाऱ्या मानधनापैकी खूप कमी वाटा कलाकारांपर्यंत पोहोचतो, अशी खंत व्यक्त करून कांबीकर म्हणाल्या, ‘‘आज चित्रपटांना व कलाकारांना चांगले दिवस आले आहेत; परंतु जुने कलाकार हलाखीतच जीवन जगत आहेत. काहींना सांभाळणारे कोणी नाही, तर काहींना वयामुळे आता कष्ट होत नाहीत. अशा व्यवहारी जगात असा सन्मान महत्त्वाचे आहे.’’ मेघराज राजेभोसले यांनी प्रास्ताविक केले

फाळके चित्रनगरीत ‘एमएसडी’

0

पुणे : महाराष्ट्राला रंगभूमीची परंपरा आहे. रंगभूमीची लोकप्रियता वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी शासन बांधील आहे. सध्या गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीचा कायापालट करण्याचे काम सुरू आहे. पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपच्या (पीपीपी) माध्यमातून ती चालवण्यास दिली जाणार आहे. या चित्रनगरीत एनएसडीच्या धर्तीवर महाराष्ट्र स्कूल आॅफ ड्रामा (एमएसडी) संस्था सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी येथे केली.

राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’, तर प्रसिद्ध नाट्यसंगीत गायिका कीर्ती शिलेदार यांना ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमात माजी नाट्य संमेलनाध्यक्ष अरुण काकडे आणि ज्येष्ठ गायक रामदास कामत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. शासनातर्फे वृद्ध कलाकारांना देण्यात येणाऱ्या आॅनलाईन अनुदान उपक्रमाचा या वेळी शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, आमदार विजय काळे, महापौर दत्तात्रय धनकवडे, सांस्कृतिक संचालनालयाचे उपसचिव संजय भोकरे, विजया पणशीकर उपस्थित होत्या.

तावडे म्हणाले, ‘‘या चित्रनगरीमध्ये नूतनीकरणाचा प्रकल्प सुरू आहे. त्यासाठी २२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या ठिकाणी एमएसडी उभारण्याबरोबरच देशविदेशातील अनेक नाटके रसिकांना पहाता येतील.’’ राज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना रंगभूमीचे प्रशिक्षण मिळण्यासाठी सुसज्ज असे हॉस्टेल विकसित केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या हॉस्टेलमध्ये २५० विद्यार्थ्यांची व्यवस्था होईल.’’ सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक अजय आंबेकर यांनी प्रास्ताविक केले. सौरभ गोडबोले आणि नूपुर चितळे यांनी सूत्रसंचालन केले.

अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष- संजय निरुपम यांच्याकडे मुंबई काँग्रेसची धुरा

0

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वात सोमवारी पहिल्यांदाच मोठे फेरबदल करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या जागी अशोक चव्हाण यांची निवड करण्यात आली. मुंबई काँग्रेसची धुरा माजी खासदार संजय निरुपम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील इतर महानगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्याने पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी लक्षणीय खांदेपालट केले आहेत.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने गेल्या काही दिवसांपासून पक्षात नेतृत्वबदलाची चर्चा सुरू होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा दणदणीत पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत तर अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले तर त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्ताधारी असलेल्या काँग्रेसच्या पारड्यात ४२ जागा पडल्या होत्या. त्यामुळे ठाकरेंविरोधात पक्षातील काही नेत्यांनी मोर्चा उघडला होता; परंतु त्याकडे वारंवार हायकमांडने दुर्लक्ष करत नेतृत्व बदल करण्यास टाळले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नारायण राणे, डॉ. नितीन राऊत, बाळासाहेब थोरात तसेच अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष पदासाठी नावे चर्चेत होती. मात्र, ‘पेड न्यूज’ प्रकरणाची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर तसेच बहुचर्चित ‘आदर्श’ घोटाळय़ामुळे मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागल्याने त्यांच्या माथी असलेले ग्रहण काही केल्या सुटे ना झाले होते. तेव्हापासून चव्हाण यांच्याकडे पक्षाने महत्त्वाची कुठलीही जबाबदारी सोपवली नव्हती. गांधी घराण्याशी निष्ठावंत असलेले चव्हाण यांना मुख्य प्रवाहात आणण्यापासून हायकमांडची द्विधा मन:स्थिती राहिली. निवडणुकीच्या काळात देखील त्यांना बाजूला ठेवण्यात आले होते; परंतु गेल्या काही दिवसांत न्यायालयाकडून चव्हाण यांना मिळालेला दिलासा तसेच लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांनी विजश्री खेचून आणत पक्षश्रेष्ठींचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करण्यात यशस्वी झाले. अखेर त्यांचे उत्तम संघटनकौशल्य ध्यानात घेता काँग्रेसने त्यांच्या गळ्यात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची माळ टाकली. चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील भक्कम स्थान पाहता पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी पक्षाने त्यांना संघटनेत परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी उत्तर भारतीय समाजाचा चेहरा असणारे संजय निरुपम यांची वर्णी लागली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांचा विचार करता उत्तर भारतीय समाजाचा चेहरा असलेल्या संजय निरुपम यांच्याकडे पक्षाने मुंबई अध्यक्षपदाचा पदभार सोपवला आहे. महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळवायचे असल्यास उत्तर भारतीय आणि मुस्लीम मतांची निर्णायक भूमिका लक्षात घेता, काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मुंबईतील उत्तर भारतीय समाजात लोकप्रिय असणार्‍या आणि आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध असणारे संजय निरुपम यांनी आपण येणार्‍या काळात सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. काँग्रेस पक्ष मुंबईत पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारेल, अशा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

उत्तर प्रदेशात स्वाइन फ्लू रुग्णांवर मोफत उपचार- अखिलेश यादव यांचे आदेश

0

लखनौ- उत्तर प्रदेशात 614 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुख्यमंत्री यादव यांनी आज तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीदरम्यान स्वाइन फ्लूची लागण झालेल्या सर्व रुग्णांवर मोफत उपचार करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सरकारी प्रवक्‍त्यांनी दिली.
दरम्यान, राज्यात रविवारी (ता. 1) 45 स्वाइन फ्लूचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. लखनौमध्ये 37, अलाहाबाद येथे 3, बरेलीमध्ये 2 व रायबरेली, मेरठ व फैजाबादमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. उत्तर प्रदेशात यामुळे या रुग्णांची संख्या 614 एवढी झाली आहे.

गोहत्या बंदी विधेयकावर राष्ट्रपतींची झाली स्वाक्षरी

0

नवी दिल्ली -गो हत्या बंदीचा कायदा राज्यात लवकरच लागू होणार असून आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी करून संमती दिली आहे.
युती सरकारच्या काळात १९९५ साली गोवंश हत्या बंदीचा कायदा मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवण्यात आला होता. पण केंद्राने काही त्रूटी काढून सुधारणांसाठी विधेयक राज्यात पाठवले होते. गेल्या पंधरा वर्षात आघाडी सरकारनं याविषयी कुठलाही निर्णय घेतला नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार याविषयी गंभीर असल्याने विधेयकातील त्रूटी दूर करून ते केंद्राकडे पाठवण्यात आले. आता हा कायदा लवकरच महाराष्ट्रात लागू होईल, अशी प्रतिक्रिया किरट सोमय्या यांनी दिली.
सुमारे १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या कायद्यात आवश्यक ते बदल करून राज्य सरकाराने हे विधेयक केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवले. त्यानंतर केंद्राने मंजूरी देत हे विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवले. गोवंश हत्या बंदी विधेयक महाराष्ट्रात लागू व्हावे, यासाठी खासदार किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी, अनिल शिरोळे, कपिल पाटील, संजय धोत्रे, नाना पटोले यांनी निवेदन सादर केले. त्यानंतर आज राष्ट्रपतींनी या कायद्यावर स्वाक्षरी केली.

मराठी भाषा दिनानिमित मनसेतर्फे मराठी सन्मान सोहळा व ग्रंथालयांना पुस्तक भेट उपक्रम संपन्न

0

1

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड विभागातर्फे २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिनानिमित मराठी भाषेकरिता योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या सन्मान सोहळा व ग्रंथालयांना पुस्तक भेट उपक्रम उत्साहात पार पडला .

  सिद्धार्थ ग्रंथालय येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात मनसेचे पुणे शहराध्यक्ष बाळा  शेडगे , संघटक अशोक मेहंदळे , ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष बापूसाहेब गानला ,  शहर उपाध्यक्ष अजय शिंदे , यांच्याहस्ते मान्यवरांच्या सन्मान चिन्ह शाल व पुष्पगुछ देऊन सन्मान करण्यात आला . यावेळी  पुणे कॅंटोन्मेंट विभागअध्यक्ष प्रशांत मते , आयोजक विकास भांबुरे , विनायक झिंगाडे , चिटणीस लक्ष्मीकांत बुलबुले , अतुल बेहेरे , ग्रंथपाल दिलीप भिकुले , पत्रकार महेश जांभुळकर , धर्मपाल कांबळे , संजय भोसले आदी मान्यवर उपस्थित होते . 

    मनसेतर्फे  आयोजित केलेल्या या सन्मान सोहळ्यास हनुमंत गवळी  (लेखक ), दिलीप आष्टेकर ( नाट्य दिग्दर्शक अभिनेते ) , वाल्मिक बारावकर ( मराठी भाषा शिक्षक ), अरु धुमाळ (एकपात्री नाट्य कलाकार ),नागराज नायडू ( पत्रकार ) , गोविंद भोंडे ( ग्रंथपाल ), महेंद्र सत्तूर ( आदर्श वाचक ), सौ. प्रज्ञा भांबुरे (गायिका ), आनंद जावडेकर ( दिग्दर्शक), भारती अंकलेल्लू ( अक्षरजुळणीकार ), संजय गायकवाड ( संगीतवादक ), व महेंद्र कांबळे (छायाचित्रकार ) यांचा सन्मान करण्यात करण्यात आला , तसेच सिद्धार्थ  ग्रंथालय व श्री गीता  ग्रंथालयास डॉ. अशोक कामत लिखित संत नामदेव महाराज ( ३ खंड ), भारताचे संविधान मराठी व इंग्रजी आवृत्ती , भारतीय राज्य घटना संक्षिप्त , हितगुज , विकासाचा वेध , मन सावर रे , कार्यशैली , वेळ बहुमोल आदी पुस्तके भेट देण्यात आली .

  ” मराठी हि आमची मातृभाषा असून तिचा सन्मान राखण हि प्रत्येकाची जबाबदारी आहे , महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार सदैव मराठी भाषा , मराठी माणूस व भूमिपुत्र यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी  कटीबद्ध आहे ” असे मत  मनसेचे पुणे शहराध्यक्ष बाळा  शेडगे यांनी व्यक्त केले .

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास भांबुरे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बबलू सय्यद , आनंद चौधरी , शुभम परदेशी , प्रमोद चव्हाण , लखन खैरे आदींनी परिश्रम घेतले . पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली .

हजरत सय्यद मोहम्मद साहब रहे पाचपीरचा ४३५ चा उरूस उत्साहात साजरा

0

2 3

पुणे लष्कर भागातील सोलापूर रोड येथील बंगला नंबर एकमधील हजरत सय्यद मोहम्मद साहब रहे पाचपीरचा ४३५ चा उरूस उत्साहात साजरा करण्यात आला . या उरुसानिमित विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले . यामध्ये कुराणख्वानी , संदल , महफिल ए समा आदी धार्मिक कार्यक्रम झाले . त्यानंतर मनोहर अजमेरी पुनावाले यांचा कव्वालीचा कार्यक्रम झाला . यावेळी आम लंगरमध्ये भाविकांनी सहभागी होऊन प्रसादाचा लाभ घेतला . त्यानंतर जियारत उरुसाची सांगता झाली .

  या उरुसाचे आयोजन हजरत सय्यद मोहम्मद साहब रहे पाचपीर खादीम जयकुमार राघवाचारी यांनी केले . या उरुसामध्ये हाजी अड. शाबीर खान , नगरसेवक प्रशांत जगताप , बंडूअण्णा आंदेकर , कृष्णराज आंदेकर , पोपट गायकवाड , हाफिज शेख , मुन्नावर कुरेशी , अल्ताफ शेख , शब्बीर शेख , आंतरराष्ट्रीय कलाकार कैलाशकुमार , तुषार त्रिवेदी , योगेश चव्हाण , इस्माईल शेख , शौकत शेख   आदी मान्यवर उपस्थित होते .

   या उरुसाच्या आयोजनासाठी सोमेश खरात , जनार्दन रसाळ , सुभाष अवघडे , मारुती पवळे , महेश मोरे , रवींद्र वाल्मिकी , संजय थोरात , नाझीम खैराज , उत्तम सावंत , अविनाश खरात , गुरुप्रसाद कोच्चर , मुनीर कुरेशी , अशोक चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले .

‘नटसम्राट’ अवतरणार रुपेरी पडद्यावर

0

अभिनेते नाना पाटेकरांच्या गहिवरल्या आवाजात उद्गारलेल्या ‘जगावं की मरावं… हा एकच सवाल’ या संवादाने उपस्थित मान्यवर आणि नाशिककरांना अश्रू अनावर झाले होते. निमित्त होतं ‘नटसम्राट’ चित्रपटाच्या मुहूर्ताचं. तात्यासाहेब शिरवाडकरांच्या अलौकिक प्रतिभेनं विस्तारलेलं मराठीतील एकमेवाद्वितीय नाटक म्हणजेच ‘नटसम्राट’ला कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत चित्रपटरुपी माध्यमांतराने दिलेली ही अनोखी मानवंदनाच ठरली. नाशिकमधील कुसुमाग्रज प्रतिष्ठानात रंगलेल्या ‘नटसम्राट’ चित्रपटाच्या मुहूर्तप्रसंगी अभिनेते नाना पाटेकर, दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेते सुनील बर्वे, अभिनेत्री मेधा मांजरेकर, नेहा पेंडसे, संगीतकार अजित परब, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक आणि सल्लागार हेमंत टकले उपस्थित होते. फिनक्राफ्ट मिडिया अॅण्ड एंटरटेनमेंट प्रा. लि., गजानन चित्र आणि आणि ग्रेट मराठा एंटरटेनमेंट प्रस्तुत विश्वास विनायक जोशी, नाना गजानन पाटेकर निर्मित आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट लवकरच रसिक-प्रेक्षकांकरिता घेऊन येत आहेत.   जबरदस्त संहिता, मर्मभेदी संवाद आणि अभिनयाची जुगलबंदी असलेल्या ‘नटसम्राट’ने मराठी नाट्यसृष्टीत एक अनोखी उंची गाठली आहे. डॉ श्रीराम लागू, दत्ता भट, यशवंत दत्त, सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी अशा अनेक प्रतिभावंतांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर गणपतराव बेलवलकरांची भूमिका जगलीये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘नटसम्राट’ चित्रपटामुळे पुन्हा एकदा नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकरांच्या अभिनयाची जादू अनुभवता येणार आहे. अष्टपैलू कलावंत नाना पाटेकरांच्या अभिनयाद्वारे ७०च्या दशकातील गणपतराव बेलवलकर हे पात्रं पुनरुज्जीवीत होणार आहे. नाना पाटेकरांची प्रथम निर्मिती असलेल्या ‘नटसम्राट’ विषयी बोलताना आपल्या जुन्या ऋणानुबंधांच्या आठवणी सांगितल्या. “१९७० मध्ये ‘नटसम्राट’ नाटक रंगमंचावर आलं तेव्हा मी जेमतेम २० वर्षांचा होतो पण त्याचवेळी हे नाटक एक मापदंड म्हणून मान्यता पावलेलं होतं. त्यावेळी डॉ श्रीराम लागू, दत्ता भट यांनी साकारलेल्या भूमिका काळजात रुतून बसल्या होत्या. नटसम्राट करायला मिळेल असं माझ्यातल्या नटाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. आत्ता आप्पासाहेब बेलवलकर यांची अजरामर भूमिका खुणावत असतानाच महेश मांजरेकरांनी ही संधी मला दिली. माझ्यासाठी ही खूपच आनंदाची गोष्ट आहे.” असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. ‘कुणी घर देतं का घर’ असे थेट विचारत प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारे ‘नटसम्राट’ गणपतराव उर्फ आप्पासाहेब बेलवलकर या पात्राने ७० चा दशक खऱ्या अर्थाने गाजवला. दशकं लोटली पण या नाटकाचे नावीन्य अजूनही ओसरलेले नाही हीच बाब दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी नेमकी हेरली. “मराठी साहित्यविश्व आणि रंगभूमीवर दबदबा निर्माण करणारी ‘नटसम्राट’ ही अजोड कलाकृती असून त्यावर चित्रपट काढणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. कुसुमाग्रजांनी मांडलेली एका नटसम्राटाची कैफियत चित्रपटात मांडणं कठीण आहे. माध्यमांतर करताना मूळ नाटक आणि संहितेला धक्का न लागता ‘नटसम्राट’ चित्रपटात रुपांतरीत करण्याची महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर आहे.” असे मत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी यावेळी व्यक्त केले. तात्यासाहेब शिरवाडकरांच्या या जबरदस्त संहितेची भुरळ कोणाला पडली नसती तरच नवल. ही संधी लेखक किरण यज्ञोपवित यांना लाभली असून त्यांनी ‘नटसम्राट’चे संवाद लिहिले आहेत.आपल्या दर्जेदार अभिनयाने अजरामर केलेल्या ‘नटसम्राट’ नाटकातील भूमिकांना न्याय देण्याकरिता तितक्याच तोडीचे मातब्बर कलाकार या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नाना पाटेकर, महेश मांजरेकर, विक्रम गोखले, रीमा, सुनील बर्वे, नेहा पेंडसे यांसारखे दिग्गज पहिल्यांदाच नटसम्राटच्या निमित्ताने एकत्रित येत आहेत. ‘नटसम्राट’ची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि ग्रेट मराठा एंटरटेनमेंटचे अनिरुद्ध देशपांडे यांची मोलाची मदत लाभली आहे. To Be or Not To Be’, ‘जगावं की मरावं’, ‘कुणी घर देतं का घर…?’ असे काळजाला हात घालणारे संवाद, टाळ्यांचा गजर, साश्रू नयनांनी ‘नटसम्राट’ला रसिकांनी दिलेली मानवंदना लवकरच रुपेरी पडद्यावर अनुभवता येणार आहे. ‘नटसम्राट’च्या चित्रीकरणाला येत्या ४ मार्चपासून मुंबईत सुरुवात होणार आहे.

पहा कुठे किती पाउस पडला

0
आज सकाळी सहा पर्यंतचा पाऊस
पाऊस पडलेली भीमा खोऱ्यातील धरणे
खडकवासला- 32
पानशेत- 36
वरसगाव- 35
टेमघर- 32
पिंपळगाव जोगे- 25
माणिकडोह- 20
येडगाव- 53
वडज- 27
डिंभे- 26
विसापूर- 6
कळमोडी- 24
चासकमान- 30
भामाआसखेड- 14
वडीवळे- 12
आंध्र- 32
पवना- 40
कासारसाई- 35
मुळशी- 38
गुंजवणी- 40
निरादेवघर- 14
भाटघर- 30
वीर- 16
नाझरे- 20
पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणचा पाऊस
पुणे- 44
पाषाण- 53
राजगुरूनगर- 46
लोणीकाळभोर- 20
उरूळीकांचन- 18
यवत- 18
केडगाव- 14
पाटस- 15
दौंड- 9
रावणगांव- 5
भिगवण- 7
बोरीवेल- 5
पळसदेव- 3
इंदापूर-1
पाऊस पडलेली कृष्णा खोऱ्यातील धरणे
धोम – 30
कण्हेर- 24
दूधगंगा- 21
राधानगरी- 21
तुळशी- 20
उरमोडी – 18

सर्वंकष प्रगती (इन्क्ल्युसिव्ह ग्रोथ) चा विचार आहे कुठे? – खासदार, अ‍ॅड. वंदना चव्हाण

0

‘मनमोहनसिंह यांच्या काळातील सर्वंकष प्रगती (इनक्ल्युसिव्ह ग्रोथ) चा विचार आणि योजना या अंदाजपत्रकात हरवल्या आहेत. उद्योग जगताला डोळ्यासमोर ठेवून अंदाजपत्रक तयार झाले आहे. ‘स्मार्ट सिटीज्’ चे ढोले वाजवले गेले होते पण उल्लेखही नाही आणि तरतुदही नाही. महिलांसाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी अजून तरतूद अपेक्षित होती. तसेच शेतीप्रधान लोकसंख्येसाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत हे ठळकपणे जाणवते.’, अशी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी दिली.

श्री बालाजी कॅम्प ग्रुपच्यावतीने कल्याणोत्सव उत्साहात संपन्न

0

5

श्री बालाजी कॅम्प ग्रुपच्यावतीने विवध धार्मिक कार्यक्रमानी कल्याणोत्सव ( शुभविवाह )  विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला . यामध्ये गणेशपूजन , पुण्याहवचन , कलश स्थापन , मूर्ती हवन , पूर्णा अहुती , प्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाले . श्री. भगवान बालाजी लक्ष्मीमाता व पदमावती यांचा लग्नसोहळ्यानिमित बांगडी व मेहंदीचा कार्यक्रम झाला . यावेळी महिलांची उपस्थिती होती .   दुसऱ्यादिवशी  सुप्रभात सेवा , मूर्ती हवन , महापुर्णा अहुती ,महाअभिषेक , मुलविग्रह कलाशाभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम झाले . जगदपिता श्री. वेंकटेश्वरा व जगदमाता    लक्ष्मीमाता व पदमावती यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली .हि मिरवणूक सोलापूर बाजार , कन्याशाळा , सोलापूर बाजार पोलिस चौकी , जैन मंदिर ,   पुणे कॅंटोन्मेंट कर्मचारी वसाहत, श्री. बालाजी मंदिर या मार्गे काढण्यात आली . या मिरवणुकीत बालाजी भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

   सांयकाळी श्री. भगवान बालाजी भक्ती गीतांचा कार्यक्रम झाला .  हि भक्ती गीते प्रविणकुमार कन्नन गुरुजी यांनी गायली . संध्याकाळी श्री. भगवान बालाजी आरती झाली त्यानंतर सर्व बालाजी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .

   यावेळी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक विवेक यादव , दिलीप गिरमकर , अतुल गायकवाड नगरसेविका रुपाली बिडकर , बंडूअण्णा आंदेकर व बालाजी भक्त सहभागी झाले होते . मोठ्यासंख्येने बालाजी भक्त सहभागी झाले होते .