Home Blog Page 3609

मोदींच्या वक्तव्यांवर तिखट प्रतिक्रिया

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभर कौतुक होत असतानाच दुसरीकडे आज मोदी यांनी भारताचा अपमान केला, अशा आशयाचा #ModiInsultsIndia हा ट्रेंड ट्‌विटरवर सर्वांत वर दिसत आहे.

‘एक वर्षापूर्वी तुम्हाला भारतीय असल्याची लाज वाटत होती. मात्र देशातील सरकार बदलल्यानंतर तुम्हाला भारताचे प्रतिनिधी असल्याचा अभिमान वाटतो आहे,‘ अशा प्रकारचे वक्तव्य मोदी यांनी चीनमध्ये तेथील भारतीय समुदायाला संबोधित करताना शनिवारी केले होते. अशाच आशयाचे वक्तव्य त्यांनी सोमवारी दक्षिण कोरियाच्या दौऱ्यादरम्यान सोलमध्येही केले. “माझ्या पक्षाचे चिन्ह आणि तुमच्या देशाच्या राष्ट्रीय चिन्हात कमळ असल्यामुळे या देशाशी माझा वैयक्तिक संबंध निर्माण झाला आहे,‘ असे वक्तव्य मंगोलियाच्या दौऱ्यादरम्यान केले होते.
मोदींच्या या वक्तव्यांवर अनेक नेटिझन्सनी नाराजी व्यक्त केली होती. परिणामी, मंगळवारी (ता. 19) ट्विटरवर #ModiInsultsIndia  हा ट्रेंड सुरू होता. आज या हॅशटॅगवर तीन लाख 80 हजारांपेक्षा अधिक जणांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून, त्यात वाढ होते आहे.

पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च्या देशाचाच अपमान केला असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. “गुजरात भारतामध्येच आहे हे मोदींनी समजून घेण्याची गरज आहे‘, “तुम्हाला समजल्यापेक्षा भारत हा खूप मोठा देश आहे,‘ अशा तिखट शब्दांत नेटिझन्सनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मोखा ऑटोरायडर्स या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्य असे हिरो ऑटोरायडर्स दुचाकी वाहनाच्या नवीन शो रुमचे उदघाटन

1

मोखा ऑटोरायडर्स या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्य असे हिरो ऑटोरायडर्स दुचाकी वाहनाच्या नवीन शो रुमचे उदघाटन हिरो मोटो कॉर्प लिमिटेडचे पश्चिम विभागाचे प्रमुख एन. बालसुब्रमण्यम यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले .

     पुणे नगर रोड महामार्गावरील खांदवेनगर मधील गट नंबर २३३५ मध्ये झालेल्या शो रुमच्या उदघाटन सोहळ्याप्रसंगी मोखा ऑटोरायडर्स या शो रुमचे संचालक संतसिंग मोखा , त्यांचे पार्टनर रॉबिनजीत सिंग , लवलीनसिंग व मोखा मित्र परिवार व अन्य मान्यवर उपस्थित होते .

  या उदघाटन सोहळ्याप्रसंगी  मोखा ऑटोरायडर्स या शो रुमचे संचालक संतसिंग मोखा यांनी सांगितले कि , वाघोली परिसरचा विकास झपाट्याने होत आहे , त्यामुळे या परिसरात हिरो कंपनीचे वाहन खरेदी करण्यास नागरिकांना सोपे जावे त्यासाठी आम्ही वाहन विक्री बरोबरच सर्व्हीसिंग आणि स्पेअर पार्टस विक्री सुविधा ग्राहकांना देणार आहे . सुमारे आठ हजार स्क़ेअर फुट क्षेत्रफळात या शोरूमची उभारणी करण्यात आली आहे .

अभिनेता फरहान अख्तर याच्या हस्ते हीफॉरशी चा लोगो आनंदला सुपूर्त – युनायटेड नेशन्सतर्फे आनंदच्या मोहिमेसाठी सुभेच्छा.

0

          जगप्रसिद्ध गिर्यारोहक डॉ.आनंद बनसोडे याने सुरु केलेल्या वर्ल्ड पीस सेव्हन समिट या जगातील ७ खंडातील ७ सर्वोच्च शिखरे सर करणाच्या मोहिमेतील ५व्या शिखर मोहिमेसाठी नुकतेच  अभिनेता फरहान अख्तर याने आनंदला सुभेच्छा दिल्या असून युनायटेड नेशन्सच्या स्त्री-पुरुष समानतेविषयी असलेल्या हीफॉरशी मोहिमेचा लोगो नुकताच मुंबई येथे फरहान अख्तर याच्या हस्ते आनंदच्या हाती सुपूर्त करण्यात आला. यावेळी युनायटेड नेशन्स चे प्रतिनिधी निशिता, आनंदचे गुरु सुरेंद्र शेळके व “मर्द” चळवळीचे प्रतिनिधि उपस्थित होते. ऑस्ट्रेलिया खंडावरील सर्वोच्च शिखराच्या मोहिमेत आनंदने हीफॉरशी या युनायटेड नेशन्स च्या मोहिमेसाठी भारतात प्रथमच कार्य सुरु केले होते यासाठी यापूर्वीच दिल्ली येथे युनायटेड नेशन्स वूमन च्या मुख्यालयाने आनंदला गौरवले होते. आता पुढील अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट मेकिंग्ली मोहिमेसाठी आनंदला त्यांच्यातर्फे सुभेच्छा व त्याच्या मोहिमेसाठी युनायटेड नेशन्स कडून हीफॉरशी चा झेंडा देण्यासाठी फरहान अख्तर च्या मुम्बई येथील राहत्या घरी विशेष अशी भेट घडवून आणली.
अभिनेता फरहान अख्तर हे  आपल्या “मर्द” या चळवळीद्वारे स्त्रियांवरील होणारे अत्याचार थांबवण्यासाठी तसेच स्त्री-पुरुष समानतेसाठी काम करत आहेत.आनंदने गिर्यारोहणातील केलेल्या मोहिमा सामाजिक कार्याला समर्पित असून यानिमितानेच आनंदला युनायटेड नेशन्स सोबत अधिक्रुतरित्या यापुढे काम करता येणार आहे.  आपल्या गिर्यारोहणातील मोहिमासोबत प्रत्येक मोहीम ही एका सामाजिक विषयासाठी समर्पित करून आनंदने आपले आगळे वेगळेपण दाखवून दिले आहे. यापूर्वी आशियातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट, युरोपातील सर्वोच्च माउंट एल्ब्रूस, आफ्रिकेतील सर्वोच्च माउंट किलीमांजारो व ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च माउंट कोस्कीस्झ्को व इतर १० सर्वोच्च शिखरे सर करून व स्त्री-शिक्षण, स्त्री-पुरुष समानता,पर्यावरण, बेटी बचाव ई अनेक सामाजिक विषय जागतिक स्तरावर नेहून आनंदने अनेक विक्रमही केले आहेत. या त्याच्या कार्याची दखल घेवून जगातील सर्वोच्च संस्था युनायटेड नेशन्सने सतत त्याच्या पाठी कौतुकाची थाप दिली आहे. आनंदची माउंट मेकिंग्ली मोहीम ही बेटी बचाव व युनायटेड नेशन्स च्या हीफॉरशी साठी समर्पित असून सोलापूर मधील उद्योजक श्री. कुमारदादा करजगी यांनी त्याला प्रायोजकत्व दिले आहे.

“लक्ष” मुळे प्रेरणा-आनंद बनसोडे
फरहान अख्तर याना भेटणे सर्वोच्च आनंदाचा क्षण असून त्यांनी निर्मिती केलेला “लक्ष” या चित्रपटामुळेच मला प्रेरणा मिळाली आहे. त्यांना प्रत्यक्ष भेटून हे सांगण्याचे माझे स्वप्नही पूर्ण झाले.याशिवाय युवकांसाठी लक बाय चान्स, भाग मिल्खा भाग, जिंदगी ना मिलेगी दोबारा” असे चित्रपट सतत प्रेरणदायी आहेत. आश्या प्रेरणादायी व्यक्तीसोबत युनायटेड नेशन्स मुळे जुळता आले याचा खूप आनंद वाटतो. आज त्यांना भेटल्यामुळे नक्कीच जास्त प्रेरणा मिळाली असून यापुढेही त्यांच्या “मर्द” तसेच “हीफॉरशी” मोहिमेसाठी काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली. त्यांनी हातात दिलेला लोगो शिखरावर घेवून जाताना नक्कीच आनंद वाटत आहे.

२४ रोजी मोहिमेचा “Flag ऑफ” कार्यक्रम-
येत्या २५ तारखेला आनंद सोलापुरवरून अमेरिकेला जाणार असून २४ रोजी रविवारी संध्याकाळी श्री.कुमारदादा करजगी यांच्या हस्ते भारताचा झेंडा देवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे, असे कुमारदादा करजगी व आनंदच्या स्वप्नपूर्ती फौंउडेशन चे सुरेश नारायणकर यांनी सांगितले.  यानंतर आनंद जवळपास १५ दिवस अमेरिकेतील अनेक ठिकाणी भाषण देणार असून याच वेळी येथील वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत होणार आहे. यानंतर उत्तरेकडे अलास्का येतील बर्फाळ प्रदेशात जावून त्या खंडातील सर्वोच्च शिखर माउंट मेकेग्ली सर करणार आहे.

धमाल-मस्ती ने भरपूर ‘अ पेईंग घोस्ट’ २९ मे ला प्रेक्षकांच्या भेटीस…

पठडीबाहेरचे विषय घेऊन मराठीत सध्या सिनेमे केले जात आहेत. प्रेक्षकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. असा्च एक पठडीबाहेरचा आगळावेगळा आणि धमाल मस्ती असलेला ‘पीजी’ म्हणजेच ‘अ पेईंग घोस्ट’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. लाडे ब्रदर्स फिल्म प्रा.लि ची निर्मिती असलेल्या आणि डॉ. अंबरीश बी. दराक यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची म्हणजेच ‘अ पेईंग घोस्ट’ सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. उमेश कामत आणि स्पृहा जोशी ही गोडजोडी या सिनेमातून पुन्हा एकदा एकत्र बघायला मिळणार आहे. सिनेमाचे निर्माते जयंत लाडे असून रोहन शिंदे-नाईक व बाबासाहेब येलपाले हे सहनिर्माते आहेत. लाडे ब्रदर्स फिल्म्स प्रा.लि. आणि डॉ.अंबरीश बी. दराक प्रस्तुत ‘अ पेईंग घोस्ट’ सिनेमा महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तयार झाला असून येत्या २९ मे ला रिलिज होत आहे. स्वाती चांदोरकर यांनी या सिनेमाला आणि सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘अ पेईंग घोस्ट’ या सिनेमाने प्रेक्षकांची चांगलीच उत्सुकता वाढली आहे. एक वेगळीच कथा या सिनेमात रेखाटण्यात आली असून धमाल मस्ती या सिनेमात बघायला मिळणार आहे. उमेश कामत, स्पृहा जोशी, पुष्कर श्रोत्री, श्रावणी पिल्लई, सनवी नाईक, समृद्धी साळवी, मॄणाल जाधव, सिद्धी कोळेकर, खुशबू कुलकर्णी, अतुल परचुरे, अनिता दाते, समिर चौघुले, उमा सरदेशमुख, उमेश दामले, श्रीरंग देशमुख, कांचन पगारे, भूषण तेलंग, पौर्णिमा अहिरे, गिरीश जोशी, मंगेश दिवाणजी, अजय टिल्लू, सिद्धेश्वर झाडबुके आणि महेश मांजरेकर यांच्या भूमिका या सिनेमात असणार आहेत. इतकी मोठी कलाकारांची फौज आहे म्हटल्यावर सिनेमात नक्कीच काहीतरी धमाल घडणार आहे.

‘अ पेईंग घोस्ट’ सिनेमाची कथा वसंत पुरूषोत्तम काळे यांची असून कथाविस्तार श्रावणी आणि सुश्रूत यांनी केला आहे. तर संवाद संजय मोने यांनी लिहिले आहेत. सिनेमटोग्राफीची जबाबदारी प्रसाद भेंडे यांनी सांभाळली असून सिनेमाला नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे. तर वैभव जोशी यांनी सिनेमातील गाणी लिहिलीये. व सिनेमातील गाण्यांची कोरिओग्राफी दिपाली विचारे आणि सुभाष नकाशे यांनी केली आहे.

सिनेमाबाबत दिग्दर्शक सुश्रूत यांनी सांगितले की, ” ‘अ पेईंग घोस्ट’ हा सिनेमा प्रसिद्ध लेखक वपू काळे यांच्या ‘बदली’ या कथेवर आधारीत आहे. माझी मैत्रिण श्रावणी पिल्लई आणि मी सिनेमाची कथा लिहिली आहे. आम्ही दोघेही या फॅमिली एन्टरटेन्मेंट असलेल्या सिनेमाची निर्मिती करण्यासाठी योग्य निर्मात्यांच्या शोधात होतो. तेव्हा आम्ही या सिनेमाची कथा जयंत लाडे यांना ऎकवली आणि त्यांनी या सिनेमाची निर्मिती करण्यात रस दाखवला. शिवाय पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून काम करीत असताना चांगल्या कलाकारांसोबत काम करायला मिळाले याचा मला आनंद आहे. सर्वांनीच मला खूप सहकार्य केले. मला आवार्जून माझे निर्माते जयंत लाडे यांचा उल्लेख करायचा आहे कारण की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला”.

साऊथ ची हिरोईन करतो सांगून बलात्कार …

0
बंगळुरु – अभिनेत्री बनण्याची इच्छा असलेल्या तरुणीवर बलात्कार करण्याच्या आरोपात बंगळुरु पोलिसांनी एजंटला अटक केली आहे. एजंटने बलात्काराचा व्हिडिओ तयार करुन तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. या अत्याचारात त्याच्यासोबत आणखी दोन जण होते, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.
आरोपीचे नाव एहसान (वय 30 वर्षे) असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो बंगळुरुचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तरुणीची ओळख मार्चमध्ये मुंबईत झाली. आरोपीने तिला कन्नड चित्रपटांमध्ये अभिनेत्री होणार का असा प्रस्ताव दिला होता. तुझी इच्छा असेल तर बंगळुरुला ये, तिथे तूला चित्रपटांत काम मिळवून देतो असे त्याने सांगितले होते. एवढेच नाही तर त्याने तरुणीसाठी विमानाचे तिकीट आणि हॉटेल देखील बुक केले होते. जेव्हा तरुणी बंगळुरुला पोहोचली तेव्हा त्याने तिला स्क्रिन टेस्टसाठी एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले आणि एक लाख रुपयांचा चेक देखील दिला.
तरुणीच्या तक्रारीनुसार एहसानने तिला हॉटेलमध्ये चेकसोबत एक ड्रिंक देखील दिले. त्यात गुंगीचे औषध मिसळलेले होते. जेव्हा तरुणी बेशुद्ध झाली तेव्हा एहसान आणि त्याच्या दोन साथीदारांनी तिच्यावर बलत्कार केला. तरुणीला तिची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगितले, तेव्हा आरोपींनी बलात्काराच व्हिडिओ तयार केल्याचे सांगितले. पोलिसात तक्रार केली तर तो व्हिडिओ व्हायरल केला जाईल अशी धमकी दिली. त्यामुळे तरुणी हतबल होऊन मुंबईला परतली. तिने एहसानने दिलेला चेक कॅश करण्याचा प्रयत्न केला तर तो बाऊन्स झाला. त्यानंतर तिने बंगळुरुच्या एका एनजीओच्या माध्यमातून पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी एहसानला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार एहसान एक बनावट एजंट आहे. त्याच्या दोन सहकाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

प्रा. रायमाने ‘मिलिंद’चा चालता बोलता इतिहास – अर्जुन डांगळें

0

1

मुंबई : प्रा. ल.बा. रायमाने हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या औरंगाबाद येथील

‘मिलिंद’चा चालता बोलता इतिहास असून मिलिंदने सामाजिक जाणिवा विकसीत करण्याचे फार मोठे काम केले.

‘मिलिंद’मध्ये झालेल्या अनेक उपक्रमांचे पडसाद राज्यभर उमटले. यात प्रा. ल.बा. रायमाने यांचा खूप मोलाचा

वाटा आहे. आजच्या पिढीसाठी यामुळेंच हा गौरवग्रंथ महत्वाचा आहे, असे उद्‌गार ज्येष्ठ साहित्यिक श्री. अर्जुन

डांगळें यांनी मुंबईत काढले.

प्रा. रायमाने यांच्या ‘आधारस्तंभ’ या गौरवग्रं्रथाच्या सुधारित दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन श्री. डांगळें

यांच्याहस्ते मुंबईत झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. लोक वाड.मय गृहाने प्रकाशित केलेल्या या गौरवग्रंथाचे

संपादन प्रा. अविनाश डोळंस आणि राम दोतोंडे यांनी केलेले आहे.

भुपेश गुप्ता भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अविनाश डोळंस होते.

अध्यक्षपदावरूंन बोलताना अविनाश डोळंस म्हणाले की, मिलिंद ही समाज घडवण्याची, संस्कृती रूंजविण्याची

प्रयोगशाळां होती. मिलिंदमधील या ऐतिहासिक घडामोडीत प्रा. रायमानेंनी मोलाची भूमिका बजावलेली आहे.

बाबासाहेबांच्या शैक्षणिक प्रयत्नांचा हा गौरवग्रंथ दस्तावेज असल्याचे लहू कानडे यांनी नमूद केले.

प्रारंभी ल.बा. रायमाने यांनी मनोगत व्यक्त केले.  हे सर्व केवळं बाबासाहेब आंबेडकरांचे श्रेय असल्याचे आवर्जून

त्यांनी सांगितले. राम दोतोंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेंद्र भवरे यांनी

अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ्या

0

मराठीतील ख्यातनाम अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ्या

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… https://www.facebook.com/salampune

पेट्रोल डीझेल दरवाढीविरोधात निदर्शने…

पुणे –  पेट्रोल डीझेल दरवाढीविरोधात आज पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली

शहर अध्यक्ष अभय छाजेड  आमदार दीप्ती चौधरी , अनंत गाडगीळ ,कमल व्यवहारे , मोहन जोशी, राजा महाजन मुकारी अलगुडे , महेश वाबळे आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते

अण्णा हजारेंच्या स्कॉर्पिओला मिळाले 9 लाख रुपये

पुणे  – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या स्कॉर्पिओ (एसयुव्ही) या आठ वर्षांपूर्वीच्या मोटारीला लिलावामध्ये तब्बल नऊ लाख अकरा हजार रुपये मिळाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात अण्णांच्या मूळ राळेगण सिद्धी गावात आज (रविवार) हा लिलाव झाला.
अण्णांच्या महिंद्रा स्कॉर्पिओची तब्बल नऊ लाख अकरा हजार रुपयांना विक्री झाल्याचे अण्णांचे सहायक दत्ता अवारी यांनी सांगितले आहे. अण्णांच्या अगदी जवळचे सहकारी असलेले अतुल लोखंडे यांनी हे वाहन खरेदी केले. लोखंडे यांच्याशिवाय या लिलावामध्ये 14 जण सहभागी झाले होते. अण्णा इनोव्हा मोटार घेणार असल्याची माहिती लिलावानंतर अवारी यांनी दिली आहे. “अण्णांच्या पाठिला त्रास होत असल्याने ते नवीन वाहन घेणार आहेत‘ असेही अवारी यांनी पुढे सांगितले. लिलाव करण्यात आलेली स्कॉर्पिओ अण्णांना पुरस्काराच्या स्वरुपात मिळालेल्या रकमेवर नियंत्रण ठेवणाऱ्या स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या ट्रस्टच्या मालकीची होती. जनलोकपाल चळवळीच्या वेळी अण्णांनी या स्कॉर्पिओचा वापर केला होता, असेही अवारी पुढे म्हणाले.

पुणेकरांनी घेतला फूड फेस्टिवल चा आनंद

1 2 3
पुणे  : दिल्लीचे चाट,उत्तरेकडील छोले-कुल्चे,राजस्थानी सँडविच,चायनीज अशा एकाहून सरस एक पदार्थांचा आनंद ‘चांदणी चोक टू चायना’ या फूड फेस्टिवलच्या माध्यमातून पुणेकरांनी लुटला. ९ पासून १७ मे पर्यंत हॉटेल ऑरबीट येथे या  फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. खवय्यांचे शहर म्हणून पुणे शहराची जगभरात ओळख आहे. अशा खाद्यप्रेमींसाठी भरवण्यात आलेले फूड फेस्टिवल एक पर्वणीच होती.

 सलग ९ दिवसांपासून सुरू असलेल्या फूड फेस्टिवलमध्ये शेफ लखन सिंग यांनी वैविध्यपूर्ण डिशेसची मेजवानी लोकांना दिली.   सिंग यांनी प्रथमच पुण्यात ‘चांदणी चोक टू चायना ‘ अशा वेगळ्या प्रकारच्या फूड फेस्टिवल आणले होते. यामध्ये ४० वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल होते ज्यामध्ये  पाणी पुरी चे नाविन्यपूर्ण  फ्लेवर्स , जलेबी-रबडी तसेच पारंपारिक खाद्य पदार्थांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होता. त्याचशिवाय डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल डाएट चाटची व्यवस्था करण्यात आली होती.
 
सर्व पदार्थांची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यातील असल्यामुळे लोकांचा यास भरघोस प्रतिसाद मिळाला. यासर्व खाद्य पदार्थांमध्ये छोले-कुल्चे यांना सर्वाधिक मागणी दिसून आली.    

जैसा देस वैसा भेस, फिर क्या डरना ….

काहे  कि शरम है …  छोडो तुम युही आहे भरना … जैसा देस वैसा भेस, फिर क्या डरना …हे गाणे आठवत असेल अनेकांना … गाण्यातील या उक्ती प्रमाणे भारताचे पंतप्रधान ज्या देशात जातील तिथला वेश करायला विसरत नाहीत हे आता वैशिष्ट्य म्हणून गणले जाणार आहे त्यांनी काही वेगवेगळ्या ठिकाणी तिथल्या वेषाला प्राधान्य दिल्याचे फोटो आम्ही येथे देत आहोत
दरम्यान तीन दिवसांच्या चीन दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मंगोलियाच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान,मोदींनी रविवारी मंगोलियाच्या प्रसिद्ध नादम महोत्सवात सहभाग घेतला. या दरम्यान नरेंद्र मोदी विशेष मंगोलियन पारंपरिक वेशभुषेत आढळले. सुमो रेसलिंग मॅच पाहिल्यानंतर मोदींनी तिरंदाजीतही हात आजमावले. त्याआदी त्यांनी मंगोलियाच्या म्युझिक इन्स्टुमेन्ट वाजवले होते. नादम महोत्सवाचा समावेश युनेस्कोच्या पारंपरिक मेळाव्यांमध्ये सहभागी करण्यात आला आहे. मंगोलिया युनिव्हर्सिटीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी अटल बिहारी वाजपेयी आयटी ट्रेनिंग सेंटरची पायाभरणीही केली.

दरम्यान दोन्ही देशांमध्ये 14 करारांवर सह्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतर मोदींनी मंगोलियाच्या संसदेत भाषण केले. यावेळी मोदींनी दोन्ही देशांतील संबंध महत्त्वाचे असल्याचे म्हटले. भाषण संपण्यापूर्वी मोदींनी संसदेच्या सभागृहातील कमळाकडे बोट दाखवत हेच आपल्या पक्षाचे चिन्हं असल्याचे सांगितले.

त्याआधी दोन्ही देशांदरम्यान झालेल्या काही करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. मंगोलियात रेल्वे वाहतूक, सायबर सेक्युरिटी सेंटर बनवण्याच्या मदतीची घोषणाही केली. त्याशिवाय सीमा आणि सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात मदत देण्याचेही आश्वासन दिले. त्यानुसार दोन्ही देश संयुक्त युद्धअभ्यासही करतील. पीएम मोदी म्हणाले की, या करारामुळे दोन्ही देशांदरम्यान सहकार्य वाढेल

modi_naadam2 modi_naadam3 narendra-modis-headgear-arunachal-pradesh-hes-wearing-a-traditional-dumluk-which-the-headgear-of-the-adi-tribe 25modi10 imrs.php

आता विक्रम गोखले देखील सनी लिअाेन च्या विरोधात …

मुंबई -सनी लिओन ला भारतातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न हिंदू जनजागृती समितीने एकीकडे सुरु केला आहे तर दुसरीकडे तिला वाळीत टाकण्यासाठीही हालचाली सुरु झाल्या आहेत . याच पार्श्वभूमीवर
सनी लिओनसारख्या पॉर्नस्टारना भारतीय चित्रपटात संधी देणेच चुकीचे असल्याचे परखड मत प्रख्यात अभिनेते विक्रम गोखले यांनी औरंगाबादेत व्यक्त केले.
तिच्याबद्दल महिला म्हणून मला आदर आहे. मात्र, ती अभिनय करणारी कलाकार नाही. तिला चित्रपटात घेऊन अधिकाधिक अंगप्रदर्शन करायला लावत चित्रपट बनवणारे आणि त्याचा व्यवसाय करत गल्ला जमवणारे खरे गुन्हेगार आहेत, असे गोखले म्हणाले
. ‘सिद्धांत’या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गोखले शनिवारी औरंगाबादेत आले होते. त्यावेळी त्यांना सनी लिओनसारखे पॉर्न स्टार हिंदी चित्रपटात काम करतात, याबद्दल तुम्हाला काय वाटते. अंगप्रदर्शन करण्याप्रकरणी सनीविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे योग्य आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की, सनी चित्रपटात काम करून तिचा व्यवसाय प्रामाणिकपणे करत आहे. ती काही उद्दिष्टे ठरवून भारतात आली. मात्र, तिची उद्दिष्टे आणि भारतीय किंवा चित्रपटांची पार्श्वभूमी भिन्न आहे. परंतु, हे मान्य नसलेल्या मंडळींनी तिला स्वत:च्या फायद्यासाठी वापरले आहे.
पण तिला हिंदी चित्रपटांमध्ये घेऊन कलाकृतीला विकृत करणे चुकीचे आहे. जी मंडळी तिच्यासारख्या महिलांचा वापर करत गल्ला जमवत आहेत. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. अशा दिग्दर्शक, निर्मात्यांनी हिंदी चित्रपटाऐवजी पॉर्नफिल्म बनवाव्यात. मुळात प्रेक्षकांना भावेल किंवा त्यांच्या पसंतीस उतरेल ते बनवून जे काही केले जाते तो व्यवसाय आहे अन‌् आपल्याला वाटेल ते प्रेक्षकांना दाखवणे हा पेशा आहे. चित्रपटातून सामाजिक, वैचारिक मूल्य समाजापर्यंत पोहोचली पाहिजेत. नैतिक मूल्ये जपत मनोरंजन करणे हेच चित्रपटांचे उद्दिष्ट असावे, असे गोखले म्हणाले.
“सनीचे चित्रपट गल्ला जमा करतील. तिच्यासारख्या महिलांचा वापर करून भडक, अंगप्रदर्शनावरच आधारित चित्रपट निर्मितीच केली पाहिजे, असा समज होऊन त्याची पुनरावृत्ती होत राहील. हे धोक्याचे आहे.”

जयललितांच्या अतिप्रेमाखातीर आत्महत्या केलेल्या 244 लोकांच्या कुटुंबियांना एआयएडीएमकेने दिले 7. 34 कोटी रुपये ….

0
चेन्नई- तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना बेहिशोबी संपत्ती गोळा केल्यावरून झालेल्या शिक्षेत तुरुंगवारी झाल्यानंतर आत्महत्या करणा-या 244 लोकांच्या कुटुंबियांना एआयएडीएमकेने 7. 34 कोटी रुपयेपेक्षा जास्त मदत दिली आहे. गेल्या वर्षी स्थानिक कोर्टाने जयललिता यांना दोषी ठरविल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात झाली होती. त्यामुळे तामिळनाडूत शेकडो लोकांनी हा धक्का सहन न झाल्याने आत्महत्या केली होत्या. दरम्यान, जयललिता यांची 11 मे रोजी कर्नाटक हायकोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे  .
एआयएडीएमकेच्या वतीने शनिवारी जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, आतापर्यंत आत्महत्या केलेल्या 244 लोकांच्या कुंटुंबियांना 7.32 कोटी रूपये दिले गेले आहेत. दोन ते चार लाख रुपये कुटुंबियांना वैद्यकीय उपचारासाटी दिले आहेत. गेल्या वर्षी आत्महत्येच्या घटना वाढल्यानंतर खुद्द जयललिता यांनाच आवाहन करावे लागले होते.
एआयएडीएमके प्रमुख जयललिता यांनी 22 मे रोजी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. याचबरोबर पुन्हा एकदा जयललिता यांना मुख्यमंत्री बनविण्याची तयारी सुरु झाली आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या सर्वसंमतीने पक्षाच्या विधीमंडळ नेता म्हणून निवडल्या जातील. त्यानंतर त्या सरकार बनविण्याचा दावा करतील. त्या 22 ते 24 मे दरम्यान मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. गेल्या वर्षी 27 सप्टेंबर रोजी बेहिशोबी संपत्तीच्या प्रकरणावरून त्यांना स्थानिक कोर्टानो दोषी धरताच त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. त्यांनी आपले खास समर्थक पनीर सेल्वम यांना मुख्यमंत्री बनवले होते.

‘संदूक’ उघडणार ५ जून रोजी – सुमीत राघवनचं मराठी चित्रपटांत पदार्पण…

मुंबई – गेली अनेक वर्षं हिंदी चित्रपट आणि मालिकांच्या विश्वात रमलेल्या सुमीत

राघवनचं मराठीतलं पदार्पण म्हणून सिनेरसिकांचं लक्ष लागून राहिलेल्या ‘संदूक’ या

चित्रपटाच्या धम्माल संगीताचं अनावरण मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात झालं.

चित्रपटाशी संबंधित सर्व प्रमुख कलावंत, तंत्रज्ञ आणि प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत

अतिशय अनौपचारिक पद्धतीने आणि खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या संगीत

अनावरण सोहळ्यामुळे चित्रपटात नेमकी काय धमाल पाहायला मिळणार आहे, याची

चुणूकच उपस्थितांना बघायला मिळाली.

‘ओरँजेन एंटरटेनमेंट’चे विश्वजीत गायकवाड आणि मंदार केणी यांची निर्मिती

असलेल्या ‘संदूक’मधून सुमीत मराठी चित्रपटांत प्रथमच नायकाच्या भूमिकेत झळकणार

असून ‘बाळकडू’च्या यशानंतर पुन्हा एकदा अतुल काळेचं कुशल दिग्दर्शन या चित्रपटातून

अनुभवता येणार आहे. १९४०च्या दशकातील गोष्ट मांडणारा ‘संदूक’ हा ऐतिहासिक–विनोदी

चित्रपट आहे. मराठीत गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या ज्यॉनरचे चित्रपट बनत असून

त्याला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचा प्रतिसादही मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर संदूकच्या

निमित्ताने प्रथमच ऐतिहासिक–विनोदी या आगळ्यावेगळ्या ज्यॉनरचा चित्रपट बघायला

मिळणार आहे. सुमीत राघवन आणि भार्गवी चिरमुले या प्रमुख जोडीबरोबर शरद पोंक्षे,

अरुण नलावडे, राहुल मेहेंदळे यांसारख्या कसलेल्या अभिनेत्यांची जुगलबंदी अनुभवता

येणार आहे.‘मातीच्या चुली’, ‘दे धक्का’, ‘शहाणपण देगा देवा’, ‘तिचा बाप त्याच बाप’, ‘असा मी

अशी ती’ आणि ‘बाळकडू’ यांसारख्या यशस्वी चित्रपटानंतर ‘संदूक’मधून प्रथमच गतकाळ

उभा करणारा दिग्दर्शक अतुल काळे म्हणतो, “‘संदूक’ हे माझं ब-याच वर्षांपासूनचं स्वप्न

आहे. शक्य असतं तर माझा पहिला चित्रपट म्हणून ‘संदूक’च बनवणं मला आवडलं असतं.

माझं हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी १२ वर्षं लागली आहेत. त्यामुळे मी अर्थातच आनंदी

आहे आणि आघाडीचे कलाकार आणि तंत्रज्ञांची साथ या स्वप्नाला लाभणं हा माझ्यासाठी

दुग्धशर्करा योग आहे. सुमीतशी माझी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मैत्री असून

‘संदूक’साठी अन्य कोणत्याच नावाचा विचार करणं मला अशक्य होतं.”

यासंदर्भात सुमीत म्हणतो, “‘संदूक’ माझ्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकतर हा माझा

पहिला मराठी चित्रपट आहे. दुसरं म्हणजे माझा बालपणापासूनचा मित्र अतुल काळे याच्या

दिग्दर्शनात मला काम करायला मिळणार आहे. हा खूप भव्य, महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे.

इतक्या वर्षांची प्रतीक्षा फळाला आली, असं मी म्हणेन.”

विश्वजीत गायकवाड म्हणाले, “३ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘येड्यांची

जत्रा’ या आमच्या पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर आमची

‘ओरँजेन एंटरटेनमेंट’ ही कंपनी चांगल्या संहितेच्या शोधात होती. ‘संदूक’ ज्या प्रकारे

आकाराला आला आहे, ते पाहाता प्रेक्षकांना हाही चित्रपट आवडेल, याची आम्हाला खात्री

आहे. ‘संदूक’मध्ये सकस आशय आहे, विनोदाचा शिडकावा आहे, अॅक्शन आहे, पण याचं

सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही गोष्ट १९४०च्या दशकातील आहे. ‘संदूक’ची सर्वांनाच भुरळ

पडेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

‘संदूक’ची पटकथा अतुल काळे, आशिष रायकर आणि सुबोध खानोलकर यांनी

लिहिली असून हृषिकेश जोशी याचे संवाद आहेत. छायालेखनाची जबाबदारी अजित रेड्डी

यांनी पार पाडली असून कला दिग्दर्शन महेश कुडाळकर यांचे आहे. गुरू ठाकूरच्या गाण्यांना

अजित-समीर या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलं असून वेशभूषा महेश शेर्ला यांची, तर

अॅक्शन संकल्पना प्रद्युम्नकुमार यांची असणार आहे. येत्या ५ जून रोजी हा चित्रपट

प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.