पुणे–
नवी सांगवी येथील कृष्णा चौकात नव्यानेच सुरु करण्यात आलेल्या ‘मैट्रीक्स कैफे’ या हॉटेलचे उदघाटनपिंपरी-चिंचवड च्या महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ चे सूत्रसंचालक डॉ. निखिल साबळे आणि अभिनेते निखिल वैरागर उपस्थित होते. ‘मैट्रीक्स कैफे’ चे संचालक अभिजित घाटगे, शिरीष कीर्तने आणि राकेश देसले यांनी महापौर आणि प्रमुख पाहुण्यांचे हार्दिक स्वागत केले. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप तसेच नगरसेविका शैलजा शितोळे यांनीही हॉटेलस्थळी प्रत्यक्ष भेट देवून त्यांना शुभेच्छा दिल्या. याशिवाय अनेक मान्यवर आणि निमंत्रितांनीहि याप्रसंगी उपस्थित राहून ‘मैट्रीक्स कैफे’ ला शुभेच्छा दिल्या ‘बिर्याणी, तंदूर, सिझलर्स आणि चायनीजचे चविष्ट पदार्थ हे ‘मैट्रीक्स कैफे’ चे खास वैशिष्ट राहणार आहे असे ‘मैट्रीक्स कैफे’ चे संचालक अभिजित घाटगे, शिरीष कीर्तने आणि राकेश देसले यांनी सांगितले.
‘मैट्रीक्स कैफे’ चे उदघाटन
आता वाचवू सारे रान ! ९६ ऐवजी १० झाडे तोडून रस्ता रुंदीकरण ?
कांना दाखवला आणि समक्ष रस्त्यावरील वृक्षांची समक्ष पाहणी बुधवार दिनांक २९/७/२०१५ रोजी करण्यात आली
बेरोजगार विद्युत अभियंत्यांसाठी मेळावा
पुणे : महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत देखभाल व दुरुस्तीची कामे थेट लॉटरी पद्धतीने देण्यासाठी तसेच
फिडर व्यवस्थापक म्हणून नेमणुकीबाबत बेरोजगार विद्युत अभियंत्यांसाठी सोमवारी (दि. 3 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता
मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
महावितरणच्या प्रशासकीय इमारत परिसर, केईम हॉस्पीटलसमोर, रास्तापेठ, पुणे येथील रिक्रिएशन हॉलमध्ये
हा मेळावा होईल.
बेरोजगार विद्युत अभियंत्यांना एकूण वार्षिक कामांपैकी किमान 50 टक्के ठराविक नवीन आणि देखभाल व
दुरुस्तीची कामे बेरोजगार विद्युत अभियंत्यांना लॉटरी पद्धतीने देण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी प्रत्येकी 10 लाख
रुपयापर्यंतची वार्षिक 50 लाखांची कामे मिळणार आहे. ही कामे मुदतीत पूर्ण केल्यानंतर दुसर्या वर्षी 15 लाखांपर्यंतची
एकूण वार्षिक पाच कामे अशी एकूण 75 लाखांपर्यंतची कामे देण्यात येणार आहे.
तसेच वाणिज्यिक व वितरणाची अधिक हानी असलेल्या वाहिन्यांवर फिडर व्यवस्थापक म्हणून बेरोजगार
विद्युत अभियंता किंवा सेवानिवृत्त अभियंते यांची नेमणूक करण्यात येणार आहे. फिडर व्यवस्थापक म्हणून संबंधीत
वाहिनीवरील मीटर रिडींग, बील वाटप, नवीन वीजजोडणी, वीजचोरीविरोधात कारवाई व सर्वसाधारण देखभाल अशी
कामे दिली जाणार आहे. सोबतच आयटीआय झालेले 5 जण सहाय्यक म्हणून राहणार आहे.
या मेळाव्यात देखभाल व दुरुस्ती व फिडर व्यवस्थापनाच्या कामांची माहिती, नोंदणी अर्ज, तांत्रिक माहिती आदींबाबत
मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्याचा बेरोजगार विद्युत अभियंत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने
केले आहे.
बॉलीवुड में छा गई कृति
27 जुलाई को कृति ने अपना जन्मदिन सेलिब्रेट किया ।
इस युवा अभिनेत्री ने पिछले साल जो माइलस्टोन सेट किया था वो उसपर चल रही है।
2014 में आई फिल्म हीरोपंती से डेब्यू कर चुकी कृति, विनय से आगे बढ़ रही है.।
कृति को उसकी डेब्यू फिल्म के लिए काफी सराहना मिली।
सुंदरता और दिमाग का परफेक्ट मिश्रण है कृति, वे इंजीनियरिंग की छात्रा रह चुकी हैं।
रेड कारपेट पर कृति का आना साबित करता है कि वो टाउन की नयी फैशनईस्ता है।
पिछला साल इस युवा अभिनेत्री के लिए किसी सपने से कम नहीं था।
कृति ने लगभग सारे प्रमुख अवार्ड्स अपनी डेब्यू परफॉरमेंस के लिए जीते।
कृति ने आईफा, स्टारडस्ट, फिल्मफेयर, बिग स्टार अवार्ड्स और साथ ही दूसरे अलग अवार्ड्स भी जीते।
कृति एक पारिवारिक इंसान है, और अपनी पर्सनल लाइफ और प्रोफेशनल जीवन दोनों को अच्छी तरह से बॅलेन्स करके चलती है।
कृति का सफर किसी परी की कहानी से कम नहीं, जो अभी बॉलीवुड की आँखों में छाई हुई है उनका आने वाला समय और भी काफी प्रॉमिसिंग लग रहा है।
बेकायदेशीर बांधकामामुळे ‘पीएमआरडीए’समोर मोठे आव्हान
बेकायदेशीर बांधकामामुळे ‘पीएमआरडीए’समोर मोठे आव्हान
पुणे: “पीएमआरडीए च्या विकासासाठी अनेक प्रयत्न सुरु असले तरी त्याच्यासमोर काही मोठी आव्हाने आहेत. त्यातीलच एक म्हणजे बेकायदेशीर बांधकाम.” असे मत पीएमआरडीए चे कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी क्रेडाई-पुणे मेट्रोच्या सर्वसाधारण सभेत व्यक्त केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
तरूणाईच्या उपस्थितीत रंगला झी मराठीच्या ‘दिल दोस्ती दुनियादारीचा’ ‘थ्री डी रॉक कॉन्सर्ट’
पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंचाच्या आवारात दुपारपासूनच लागलेल्या महाविद्यालयीन तरूण तरूणींच्या लांबच लांब रांगा.. आपल्या लाडक्या कलाकारांना प्रत्यक्षात बघण्याची भेटण्याची प्रचंड उत्सुकता.. सभागृहात प्रवेश केल्यानंतर उर्जेने भारलेला एकच जल्लोष आणि कलाकार रंगमंचावर येताच अनावर झालेला आनंद हे सगळं चित्र बघायला मिळालं थ्री डी रॉक कॉन्सर्ट या शानदार कार्यक्रमात. निमित्त होतं झी मराठीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही सध्या तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनलेली मालिका. या मालिकेच्या लोकप्रियता सध्या तरूणवर्गात प्रचंड प्रमाणात आहे. तरूणाईच्या भाषेत सांगायचं झालं तर याबद्दल एख तुफान क्रेझ प्रत्येकाच्या मनात आहे. ‘मस्ती नाय तर दोस्ती नाय’ असं म्हणत मैत्रीचा नवा फंडा सांगणारी मंडळी म्हणजे झी मराठीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील दोस्तांची गॅंग. रोज रात्री १०.३० वा. टिव्हीवरून भेटायला येणारे सुजय, कैवल्य, आशुतोष, अॅना, मीनल आणि रेश्मा हे माजघरातील मित्र आज आपल्याला प्रत्यक्षात भेटणार यासाठी तरूणाईने या रॉक कॉन्सर्टला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती. झी मराठीवरील सारेगमपच्या मागच्या पर्वाची विजेती जुईली जोगळेकरच्या ‘अगम्य बॅंड’च्या सोबतीने दिल दोस्ती..मधील कलाकारांनी एकाहून एक गाणी सादर केली आणि तरूणाईला आपल्या तालावर मोठ्या उत्साहात थिरकायला लावलं.
वेगवेगळ्या कारणाने मुंबई शहरात आलेले आणि इथल्या जगण्याला आपल्या पद्धतीने समजून घेत स्ट्रगलचाही आनंद घेत एकाच फ्लॅटमध्ये राहणा-या या सहा दोस्तांची कथा सध्या सर्वच स्तरांत तुफान लोकप्रिय झाली आहे. आजच्या पिढीचे प्रश्न, त्यांच्या गरजा, त्यांची मानसिक स्थिती, त्यांची स्पेस, त्यांची आव्हाने हे सगळं या मालिकेतून अतिशय रंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्यात येतं. या वेगळेपणामुळेच अल्पावधीतच ही सारी पात्रं केवळ लोकप्रियच झाली नाही तर ती जणू प्रेक्षकांच्या परिवाराचा आणि दोस्तांच्या कटट्याचाही भाग बनली आहेत. कॉलेजच्या कट्यापासून ते फेसबुकच्या वॉलवर आणि व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवर दिल दोस्ती चे हे सहा पात्र म्हणजे सर्वांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय बनले आहेत. यातील प्रत्येक पात्रामध्ये प्रेक्षक स्वतःचा आणि आपल्या मित्रांचा शोध घेतात अशा प्रकारच्या प्रतिक्रियाही विविध माध्यमांतून वाहिनीला आणि कलाकारांना मिळतच असतात. प्रेक्षकांच्या मनात या पात्रांविषयी असलेली उत्सुकता, त्यांना भेटण्याची असलेली ओढ लक्षात घेऊनच त्यांच्यापर्यंत थेट पोहचण्यासाठी या खास रॉक कॉन्सर्टचं आयोजन झी मराठीच्या वतीने करण्यात आलं होतं.
गुरूवारी सायंकाळी येथील गणेश कला क्रीडा रंगमंचावर पार पडलेल्या या रॉक कॉन्सर्टचं धम्माल निवेदन केलं सर्वांच्या लाडक्या आशूने. मालिकेमध्ये कैवल्यचं पात्र हे एका रॉकस्टारचं आहे त्यामुळे त्याच्या परफॉर्मन्सबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता होती. मग कैवल्यनेही यारो दोस्ती बडीही हसीन है हे गाणं गाऊन सर्वांची मने जिंकली. प्रेक्षकांसाठी ख-या अर्थाने सरप्राईज परफॉर्मन्स ठरला तो मीनल आणि सुजयचा. मीनल ने ‘अब के सावन ऐसे बरसे’ हे गाणं गाऊन आपल्या गायनाने सर्वांना चिंब भिजवलं तर ‘डुबा डुबा रहता हूं’ हे हळुवार गीत सादर करून सुजयने सर्वांना प्रेमाच्या एका अनोख्या विश्वात नेलं. याशिवाय अॅना आणि रेश्माने निवेदनात आशूला सोबत तर दिलीच शिवाय काही गाणी सादर करून रसिकांसोबत ठेकाही धरला. कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू ठरला तो सादर झालेलं शेवटचं गाणं. ‘पट्टाखा गुड्डीहो’ आणि ‘पुरा लंडन ठुमकदा’ या गाण्यावर सर्वच कलाकारांनी रंगमंचाच्या खाली उतरून आणि प्रेक्षकांमध्ये मिसळून ठेका धरला आणि संपूर्ण सभागृहाला नाचायला भाग पाडले.
एकंदरीत दोस्ती आणि मस्तीने भारलेला हा कार्यक्रम फ्रेंडशिप डेच्या अगोदरच सर्वच प्रेक्षकांना मैत्रीचा एक वेगळा अनुभव देऊन गेला.
“श्री दीपलक्ष्मी इंटरनॅशनल ‘ चे लॉस एंजेलिस मध्ये प्रकाशन
संगमवाडी ते विश्रांतवाडी बीआरटी चाचणी यशस्वी;विश्रांतवाडी स्थानकात नागरिकांकडून स्वागत
संगमवाडी ते विश्रांतवाडी बीआरटी मार्गावरील पीएमपीएल बस वाहतूक चाचणी करण्यात आली.
मा.महापालिका आयुक्त कुणाल कुमार, तसेच वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आव्हाड, पी एम पी एलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मयुरा शिदेकर, प्रवीण आष्टीकर, सुनील बुरसे, श्रीमती संस्कृती मेमन, प्रमुख अभियंता विवेक खरवडकर, युवराज देशमुख, नामदेव बारापात्रे, कर्नल(सेवानिवृत्त) श्री विनोद व अन्य अधिकारी उपस्थित होते.
संगमवाडी ते विश्रांतवाडी बीआरटी मार्गावरील चाचणी प्रसंगी पी एम पी एलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मयुरा शिदेकर, प्रमुख अभियंता विवेक खरवडकर, व अन्य अधिकारी यांच्याशी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रत्येक बसस्थानकाशी संबधित सर्व कामासंदर्भात चर्चा केली.
प्रामुख्याने बसस्थानकावरील स्वयंचलित दरवाजा, स्वयंचलित दरवाजास समांतर बसच्या दरवाजाचे समांतर अंतर, बसस्थानकातील स्क्रीनवरील सूचना, त्यांचे नियमन, वेळापत्रक, सूचना, उदघोषणा याबाबाबत पाहणी करण्यात आली तसेच एका बसस्थानकावर एक स्क्रीन अजून अतिरिक्त लावण्यात यावा अशी सूचना केली, अन्य व्यवस्थेबाबत श्रीमती मयुर शिदेकर यांनी सांगितले की विश्रांतवाडी टर्मिनल येथे सिग्नल बसविण्यात येणार असून मार्गावरील वॉर्डनच्या नियुक्त्या झाल्याचे त्यांनी सांगितले, बसफेऱ्याचे नियोजन वाहकचालकांच्या नियोजन बाबतही त्यांनी माहिती दिली. चाचणी दरम्यान सुमारे १० बससेचे नियमन करण्यात आल्याने त्यांनी सांगितले.
विश्रांतवाडी स्थानकात नागरिकांकडून स्वागत
संगमवाडी ते विश्रांतवाडी बीआरटी बस चाचणी प्रसंगी विश्रांतवाडी स्थानकात बस थांबल्यानंतर येरवडा, विश्रांतवाडी, येथील मोठ्याप्रमाणावर नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. मा.सभासद सिद्धार्थ धेंडे, मा.संजय देवकर, सागर माळकर व अन्य कार्यकर्ते, नागरिकांनी मा.महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना गुलाबपुष्प देऊन या बस सेवेचे स्वागत केले. तसेच लवकरातलवकर बीआरटी बस सेवा नागरी सेवेकरिता चालू करावी असे सांगितले व त्याचबरोबर विश्रांतवाडी टर्मिनल येथे सिग्नल व्यवस्था, पादचारी मार्ग व्यवस्था, प्रतिकनगर चौकातून जाताना पादचाऱ्यांकरिता सुरक्षा व्यवस्था, प्रतिकनगर चौकात उड्डाणपूलाचे नियोजन करणे, प्रतिकनगर चौक वाहतुकीस खुला करणे अशा मागण्यांचे निवेदन सौ.सुनंदा संजय देवकर यांच्यावतीने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना देण्यात आले.
बीआरटी चाचणी दरम्यान मा.महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सर्व संबंधित अधिकारी यांचेशी चर्चा करीत असताना प्रवास मार्गात, बसस्थानकात नागरिक, आरोग्य निरीक्षक, वाहक, चालक, अशा सर्व घटकांशी सविस्तर चर्चा केली.
मिसाइल मॅन’भारतरत्न’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे निधन;सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा
शिलाँग
आपल्या प्रेरक जीवनातून देशातील तरुणाईच्या स्वप्नांना उमेदीचे ‘अग्निपंख’ देणारे भारताचे मिसाइल मॅन, प्रख्यात अणुशास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती ‘भारतरत्न’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शिलाँग येथील ‘आयआयएम’मध्ये व्याख्यान देत असताना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास डॉ. कलाम यांना अस्वस्थ वाटून ते व्यासपीठावरच कोसळले. त्यांना तातडीने नॉनग्रिम हिल्स येथील बेथनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. पद कोणतेही असो, नेहमी शिक्षकाच्याच भूमिकेत असणाऱ्या डॉ. कलाम यांना मृत्यू आला तो ज्ञानदान करतानाच! ८४व्या वर्षीही कार्यरत असलेल्या डॉ. कलाम यांच्या आकस्मिक निधनाने देशभरात हळहळ व्यक्त होत असून, देशाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक, राजकीय, सामाजिक तसेच सांस्कृतिक जीवनाची कधीही न भरून निघणारी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. ‘आजवरचे सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रपती’ असा बहुमान मिळालेल्या डॉ. कलाम यांना राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह समाजाच्या सर्व स्तरांतील मान्यवरांनी आदरांजली वाहिली असून, केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
संभाजी ब्रिगेडचा “शिव-शाहू सन्मान पुरस्कार‘ वितरण सोहळा संपन्न
पुणे-
मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्यातर्फे सामाजिक न्याय दिनानिमित्त “शिव-शाहू सन्मान पुरस्कार‘ वितरण सोहळा आयोजित केला होता. या वेळी महापौर दत्तात्रेय धनकवडे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, अप्पा रेणुसे, विशाल तांबे, बाळासाहेब बोडके व संयोजक विकास पासलकर उपस्थित होते.राज्याच्या जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख व शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांना “राजर्षी शाहू महाराज पुरस्कार‘ देण्यात आला.
कोल्हापूरसह विविध ठिकाणी राबविलेल्या सरकारी योजना आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचा उल्लेख देशमुख यांनी केला. ते म्हणाले, “”प्राथमिक शिक्षण व जलसंवर्धनावर जास्त भर दिला. राज्य सरकारने पाच हजार गावे जलयुक्त शिवार योजनेमध्ये आणली आहेत; परंतु आजही अनेक गावांमध्ये जलसंवर्धन आणि चांगले शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोचले पाहिजे. सध्याच्या काळात आपण आपले काम चांगले करणे, हीच खरी देशभक्ती आहे.‘‘
धनकवडे म्हणाले, “डेक्कन येथील संभाजी पुतळ्याची उंची वाढविणे, संभाजी उद्यानामध्ये चौथऱ्यावर संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबरोबरच बाहेरगावाहून पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याची संभाजी ब्रिगेडने केलेली मागणी पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करू.‘‘
दत्ता कोहिनकर, कर्नल (निवृत्त) सुरेश पाटील, महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी संदीप ढोले यांना विशेष सन्मान; तर नितीन सातव, अभयसिंह धाडवे, अरविंद कणसे, मेघराज राजेभोसले, बाळासाहेब पासलकर, प्रवीण माने, सचिन निकम, रामदास माने यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विराज तावरे यांनी सूत्रसंचालन केले.
वारक-यांनी पर्यावरणाचा जागर जनसामान्यांपर्यंत पोहोचवावा
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग यांच्यावतीने आयोजित केलेल्या ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ या पर्यावरण विषयक जनजागृतीपर उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांच्या मातोश्री सरिताताई, पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. कार्यक्रमास महसूल मंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री विजय देशमुख, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, आमदार भारत भालके, आमदार रामहरी रुपनवर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, पर्यावरणाचा जागर करणारे वारकरी पाहून समाधान वाटले. वारकऱ्यांनी हा संदेश जनसामान्यापर्यंत पोहोविण्याचे काम केले आहे. वाऱ्यांमधील या सकारात्मक शक्तीद्वारे राज्यातील गावे स्वच्छ व प्रदूषण विरहित होण्यास मदत होईल. कीर्तन, भारुड, पोवाडा या लोक शिक्षणातून अशी चळवळ उभी राहिल्यास गावाचे परितर्वन होण्यास विलंब लागणार नाही. स्वच्छता व प्रदूषणाचा हा शाश्वत विचार वारकरी गावोगावी पोहचवित असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करुन त्यांचे अभिनंदनही केले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरु माऊलींच्या कवितांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच नागेश घुगे, विष्णूपंत गायकवाड, मोहन घाटे, धिरज यादव आणि ज्ञानेश्वर साबळे या पाच वारकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भगवतगीतेचे वितरण करण्यात आले.
तत्पूर्वी ईश्वर महाराज यांनी कीर्तन, चंदाबाई तिवाडी यांनी भारुड आणि शाहीर देवानंद माळी यांनी प्रदूषणावर पोवाडा सादर केला. त्यानंतर मुख्यमंत्री व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर माऊली……… तुकाराम अशा जय घोषात पर्यावरणाचा जागर करण्यात आला.
राज्य शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागातर्फे आयोजित स्वच्छता दिंडीच्या समारोप कार्यक्रमात श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सार्वजनिक बांधकाम (सार्व.उप) व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, जि.प. अध्यक्षा जयमाला गायकवाड, आ. भारत भालके, आ. रामहरी रुपनवर, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, माधव भंडारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
निर्मल भारत अभियानाला पंतप्रधानांनी गती देण्याचे ठरविले आहे त्यांच्या या स्वप्नपूर्तीला राज्यातील जनतेने बळ द्यावे, स्वत: कचरा करणार नाही व कचरा करु देणार नाही हा संकल्प राज्यातील प्रत्येकाने करावा असे आवाहन करुन मुख्यमंत्री म्हणाले की, संत परंपरेने व्यक्तीला पर्यावरणासोबत जगायला शिकविले आहे. त्याचबरोबर संतांनी समाज-लोकप्रबोधनाचे काम केले आहे. उच्च न्यायालयाने वारक-यांना वाळवंटात कीर्तन व भजनासाठी परवानगी दिली आहे. नदीपात्र स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांनी मिळून पार पाडावी. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पंढरपूर शहराच्या विकासासाठी तसेच नदीचे स्वरुप बदलण्यासाठी राज्य शासनातर्फे भरीव निधी दिला जाईल, असे प्रतिपादन करुन संपूर्ण महाराष्ट्र निर्मल होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
महसूल मंत्री एकनाथ खडसे म्हणाले की, स्वच्छतेबाबत संतांनी कृतीशील प्रबोधन केले आहे. वारक-यांनी वाळवंट स्वच्छतेला प्राधान्य द्यावे असे आवाहन करुन महाराष्ट्र हे सर्व बाबतीत आदर्श राज्य व्हावे अशी प्रार्थना यावेळी पांडुरंग चरणी करतो असे ते म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शौचालये बांधकाम तांत्रिक मार्गदर्शिकेसह इतर पुस्तिकांचे प्रकाशन तसेच पालखीत स्वच्छता विषयक प्रबोधन करणा-या दिंडी प्रमुख, कलापथक प्रमुख त्याचबरोबर दिंडी संयोजन करणा-या जिल्ह्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
राज्यावरचे अवर्षणाचे संकट दूर करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे पांडुरंगाला साकडे
पंढरपूर येथे आज आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापुजेनंतर आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती अमृता फडणवीस, महसूल मंत्री एकनाथ खडसे, त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती खडसे, मानाचे वारकरी राघोजी नारायणराव धांडे व त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती धांडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, श्रीमती क्षत्रिय, मंदिर समितीचे सभापती तथा जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकरी सुखी झाला तर राज्य सुखी होईल. आज या शासकीय महापुजेचा मान मिळाला हा माझ्या जीवनातील भाग्याचा दिवस आहे. यामधून मिळालेली शक्ती, ऊर्जा याचा वापर राज्यातील सामान्य माणसाच्या कल्याणासाठी करु. तसेच पंढरपूरच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याचा प्रयत्न केला जाईल.
यावेळी राघोजी नारायणराव धांडे व श्रीमती धांडे यांना मुख्यमंत्र्यांच्या समवेत शासकीय महापुजेचा मान मिळाला. श्री.धांडे हे पिंपरी खुर्द ता. कळमनुरी जि.हिंगोली येथील रहिवासी असून गेली 16 वर्षे पायी वारी करीत आहेत. तसेच त्यांनी परदेश दौराही केलेला आहे.
पंजाब -गुरुदासपूर चकमक अखेर संपली…मोठी हानी आणि मानहानी ही..
पाकिस्तान बॉर्डरपासून अवघ्या 15 किमी अंतरावर असलेल्या पंजाबच्या गुरदासपूरमध्ये आज (सोमवारी) सकाळी दहशतवादी हल्ला झाला. पंजाबमध्ये 20 वर्षांनंतर अशा प्रकारचा दहशवादी हल्ला झालेला आहे.
घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर नाकेबंदी का केली नाही – बादल केंद्रावर बरसले
दरम्यान चकमक सुरु असताना ….
समाजवादी पक्षाचे नेते नरेश अग्रवाल म्हणाले, पंतप्रधान मोदी पाकिस्तानसोबत चर्चा करण्यास उत्सूक आहेत आणि दुसरीकडे त्यांच्याकडून दहशतवादी पाठवले जात आहेत. पंजाबात झालेला हल्ला हे भारतीय गुप्तचर संस्थेचे अपयश आहे. हल्ल्याचा संसदेत सर्वपक्षीयांनी निषेध केला. त्यानंतर झालेल्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर काही वेळातच बंद पडले.
अनावधानानं झालेल्या चुकीबद्दल माफी मागतो.’ — सलमान खान
मुंबई -‘टायगर मेमनच्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या भावाला देऊ नका. याकूबला सोडा, टायगरला पकडा’ अशी एकामागोमाग एक ट्विट्सची मालिका लावून देणाऱ्या अभिनेता सलमान खान यानं अखेर आपल्या ट्विट्सबद्दल माफी मागितली आहे. अनावधानानं झालेल्या चुकीबद्दल माफी मागतो.’ असे सांगत यावर पडदा टाकला आहे ‘याकूब मेमनच्या गुन्ह्यांचं समर्थन करण्याचा माझा अजिबात उद्देश नव्हता. तरीही माझ्या ट्विटमुळं गैरसमज निर्माण झाले असल्यामुळं मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि ट्विटस मागे घेतो,’ असं सलमाननं म्हटलं आहे.
याकूब मेमनविषयी सलमान खाननं काल रात्री केलेल्या ट्विट्समुळं देशभरात गदारोळ माजला . सलमानचे वडील सलीम खान यांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सलमानला झापलं. तसंच ट्विट्स मागं घेण्यास सांगितलं. त्यानंतर सलमाननं विनाअट माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकला. तसेच सर्व धर्मांबद्दल माझ्या मनात आदर व श्रद्धा आहे आणि यापुढंही राहील,’ असं त्यानं म्हटलं आहे.
ट्विटरवरील आपल्या माफीनाम्यात सलमान म्हणतो, ‘टायगर मेमनला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली पाहिजे असं मी म्हटलं होतं. त्यावर मी ठाम आहे. त्याच्या गुन्ह्यासाठी याकूबला फाशी होऊ नये असं माझं मत होतं. याकूब निर्दोष आहे असं मला म्हणायचं नव्हतं. देशातील न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मुंबईतील बॉम्बस्फोटांत अनेकांना जीव गमवावे लागले. निष्पापांची हत्या ही मानवतेची हत्या आहे, असं मी पुन्हा-पुन्हा म्हटलं आहे. तरीही माझ्या ट्विटमुळं गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यामुळं मी माझी वक्तव्यं मागे घेतो. अनावधानानं माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल विनाशर्त माफी मागतो.’



















