Home Blog Page 3574

उद्धव-राज पाठीशी असतानाही ;शिवशाहीरांना मोठा विरोध …

0

पुणे-मनसे चे राज ठाकरे , शिवसेनेचे उद्धव ठाकरे , राष्ट्रवादीचे अजित पवार अशां मोठ मोठ्ठ्या नेत्यांचा पाठींबा असतानाही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ला विरोध करणाऱ्यांची यादी वाढतच चालली  आहे आता त्यात ‘ज्ञानपीठ’ विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची भर पडली आहे डॉ. नागनाथ कोतापल्ले, विद्या बाळ, मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे आदींचा विरोध करणाऱ्यात समावेश आहे..
‘बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचं केलेलं चित्रण इतिहासाला धरून नाही. त्यामुळं त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येऊ नये,’ असं स्पष्ट मत नेमाडे यांनी व्यक्त केलं आहे.
‘बाबासाहेबांच्या निष्ठेविषयी अजिबात शंका घेता येणार नाही. त्यांच्याविषयी आम्हाला नितांत आदर आहे. मात्र, शिवाजी महाराजांबद्दलची आमच्या मनात असलेली प्रतिमा वेगळी आहे. बाबासाहेबांचं शिवरायांविषयीचं लेखन आमच्या आकलनात बसत नाही,’ असं नेमाडे यांनी म्हटलं आहे.नेमाडे यांच्याबरोबच साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास विरोध दर्शवणारे एक निवदेन  डॉ. नागनाथ कोतापल्ले, विद्या बाळ, मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे आदीं मान्यवरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.

‘आपले सरकार’ पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ

0

मुंबई -जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी व सूचना ऑनलाईन पद्धतीने थेट शासनासमोर मांडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आपले सरकार’ पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. जनतेला ऑनलाईन सेवा देण्याच्या दृष्टीने मंत्रालयस्तरावर आपले सरकार हे वेब पोर्टल सुरू करण्यात आले होते. या उपक्रमाचा पहिला टप्पा 26 जानेवारी 2015 रोजी जनतेसाठी सुरू करण्यात आला होता. नागरिकांकडून मंत्रालय स्तरावरील 10000 तक्रारी आजपर्यंत प्राप्त झाल्या असून त्यापैकी 78 टक्के तक्रारींचा निपटारा झाला आहे. पोर्टलवर मिळणाऱ्या प्रतिसादानुसार नागरिकांच्या तक्रारींचे समाधानकारक निपटाऱ्याचे प्रमाण 84.5 टक्के इतके लक्षणीय आहे. आता ही सेवा जिल्हास्तरावर विस्तारण्यात आली आहे. पथदर्शी तत्त्वावर राबविण्यात येणारा हा उपक्रम सुरुवातीला सहा जिल्ह्यांत राबविण्यात येणार असून त्यामध्ये ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. हळूहळू हा उपक्रम ३० जिल्ह्यात सुरु करण्यात येईल.

राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते पुण्यात ध्वजवंदन समारंभ

0
पुणे ( ‘महान्यूज’): भारतीय स्वातंत्र्याच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते विधानभवनाच्या प्रांगणात ध्वजवंदन झाले. विधानभवन परिसरात सकाळी नऊ वाजता झालेल्या या शानदार समारंभास पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते.
राज्यपाल श्री. राव यांचे सकाळी नऊ वाजता विधानभवन येथे आगमन होताच पालकमंत्री श्री. बापट आणि विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यपाल श्री. राव यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार सर्वश्री भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, जयदेव गायकवाड, आमदार माधुरी मिसाळ, आमदार नीलम गोऱ्हे, माहिती आयुक्त रवींद्र जाधव, पोलीस आयुक्त के.के. पाठक, कृषी आयुक्त विकास देशमुख, शिक्षण आयुक्त पुरूषोत्तम भापकर, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे, पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजीव जाधव, नोंदणी महानिरीक्षक एन. रामास्वामी, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, जिल्हा पोलीस अधीक्षक जय जाधव आदी उपस्थित होते.
समारंभानंतर श्री. चोक्कलिंगम, अतिरिक्त आयुक्त श्याम देशपांडे, श्री. रामास्वामी, पीसीएनटीडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते ऐतिहासिक शनिवारवाडा येथे ध्वजवंदन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

 

महाराष्ट्राला जगातील सर्वोत्कृष्ट राज्य बनविणार- मुख्यमंत्री

0
मुंबई (‘महान्यूज’) : राज्यातील सर्व घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास घडविण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. येत्या काळात महाराष्ट्र हे जगातील सर्वोत्कृष्ट राज्य बनविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रध्वजारोहण समारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, आमदार विनायक मेटे, आमदार राज पुरोहित, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मल्लिक, राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया, पोलीस महासंचालक संजीव दयाल, मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया, तिन्ही सेना दलाचे प्रमुख यांच्यासह मंत्रालयातील विविध विभागांचे सचिव, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
१४ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा
शेतकरी हा सर्वांचा अन्नदाता आहे. पण मागील काही काळात विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी संकटात आहे. त्याला सावरण्यासाठी राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये सुमारे ६० लाख शेतकऱ्यांसाठी अन्न सुरक्षा योजना सुरु करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. यात मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यांचा तर विदर्भातील ६ जिल्ह्यांचा समावेश आहे. यात शेतकऱ्यांना ३ रुपये किलो दराने तांदूळ तर २ रुपये किलो दराने गहू उपलब्ध करुन दिला जाणार आहे. बळीराजावर संकट आले तरी तो उपाशी राहू नये, यासाठी ही योजना सुरु करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
‘जलयुक्त शिवार’मध्ये मोठा लोकसहभाग
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात गेले काही दिवस निसर्गाची अवकृपा झाली आहे. शेतकरी संकटात आहे. पण राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पहिल्या वर्षीचे पूर्ण तर पुढील चार वर्षाचे अर्धे व्याज राज्य शासनाच्या वतीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतीला शाश्वत सिंचन उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार अभियान सुरु करण्यात आले आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील ही सर्वात मोठी लोकसहभागाची योजना आहे. या योजनेतून पुढील पाच वर्षांत साधारण २० हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे. शेतीला शाश्वत सिंचन उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात दीड लाख शेततळी तर एक लाख विहिरी बांधण्यात येतील, असेही त्यांनी जाहीर केले. याशिवाय राज्यातील उर्वरित शेतकऱ्यांना मार्च २०१६ पर्यंत विजेची जोडणी उपलब्ध करुन दिली जाईल.
महाराष्ट्राला ‘महाउद्योग राज्य’ बनविण्याचा निर्धार
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात उद्योग क्षेत्रात सुमारे ६० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यातील मोठी गुंतवणूक राज्यात प्रत्यक्षात झालीही आहे. यातून साधारण एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधन निर्मितीवर राज्यात भर दिला जाणार आहे. महाराष्ट्राला महाउद्योग राज्य बनविण्याचा निर्धार राज्य शासनाने केला असून यातून जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.
‘आपले सरकार’वर महसुली मुख्यालये
शासनाचा कारभार अधिक पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने खरेदीची नवीन पद्धती स्विकारली आहे. लोकांना वेळेत सेवा मिळावी यासाठी शासनाने सेवा हमी विधेयकही संमत केले आहे. ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवर सुमारे एक लाख तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील साधारण ८५ हजार तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. या वेबपोर्टलवर आता महसूली मुख्यालयांचाही समावेश केला जाणार असून आज त्याचा शुभारंभ होत आहे, असे त्यांनी सांगितले.
१६ हजार आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश
मुख्यमंत्री म्हणाले, वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नरत आहे. राज्यातील साधारण २५ हजार आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमधून शिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेतून आतापर्यंत साधारण १६ हजार आदिवासी विद्यार्थ्यांना भरती करण्यात आले आहे. मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यास केंद्र शासनामार्फत जागा मिळाली आहे. बाबासाहेबांचे लंडनस्थित घर विकत घेण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक अरबी समुद्रात उभारण्यात येणार आहे. हे काम निश्चित वेळेत पूर्ण केले जाईल. हे वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष आहे. शासन हे वर्ष ‘समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरा करेल, असे ते म्हणाले.
मुंबईत ऑक्टोबर २०१६ पर्यंत ६ हजार सीसीटीव्ही
राज्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासन कटिबद्ध आहे. विशेषतः महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पुण्यात सीसीटीव्ही सुरु करण्यात आले असून मुंबईतही ऑक्टोबर २०१६ पर्यंत साधारण ६ हजार सीसीटीव्ही बसविण्यात येतील. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून राज्यात अपराधसिद्धीचा दर वाढत आहे, असे ते म्हणाले.
नागपूर-मुंबई दरम्यान कम्युनिकेशन सुपर एक्स्पेस वे
नागपूर-मुंबई दरम्यान कम्युनिकेशन सुपर एक्स्पेस वे बांधण्यात येणार आहे. या मार्गावर फायबर ऑप्टिक टाकण्यात येणार आहे. ८०० किमीचे हे अंतर साधारण १० तासात पूर्ण करता येईल. यामुळे राज्यातील व्यापार, उद्योग आणि आयात-निर्यातीला चालना मिळेल. शासनाने नागरीकरणाला आव्हान न समजता संधी म्हणून स्विकारले असून केंद्र शासनाच्या सहभागातून राज्यातील १० शहरे ‘स्मार्ट शहरे’ बनविली जाणार आहेत. पायाभूत सुविधा, रोजगारांनी युक्त ही शहरे जागतिक शहरांशी स्पर्धा करणारी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोस्टल रोड, मेट्रो रेल्वे, जलमार्गांची निर्मिती वेगाने होण्यासाठी केंद्र सरकारचे मोठे सहकार्य लाभत आहे. छोट्या वाहनांना टोलमुक्ती देण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
मराठीला राजभाषेचा दर्जा
आपली मायबोली असलेल्या मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी विधीमंडळात कायदा संमत करण्यात आला आहे. तसेच शिक्षणाचे बाजारीकरण रोखण्यासाठी फी नियंत्रण कायदाही संमत करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

 

पुण्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण…विविध कार्यक्रम…

0

1 2

कोथरूड येथील भुसारी कॉलनी व  सवंगडी संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. दत्ता कोहिनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

 

स्वातंत्र्य दिनी आझम कॅम्पस मध्ये ‘ देशाच्या प्रगतीत युवा पिढी चे योगदान ‘ विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम 

unnamed
स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एजुकेशन सोसायटी (आझम कॅम्पस ) मध्ये मुनवर पिरभोय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष पी ए इनामदार होते . विद्यार्थ्यांनी यावेळी ‘ देशाच्या प्रगतीत युवा पिढी चे योगदान ‘ विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले
  पुणे महापालिकेतर्फे संघर्ष सोशल फौंडेशनचे अध्यक्ष चैतन्य पुरंदरे यांचा सत्कार
1
 येथील सामाजिक युवा संघटना संघर्ष सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चैतन्य पुरंदरे यांचा पुणे महापालिकेतर्फे पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी सत्कार करण्यात आला.
 पुरंदरे यांनी संघर्ष सोशल फौंडेशनच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक व नागरी कार्याबद्दल महापालिकेतर्फे सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
 महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी महापालिका आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, सभागृह नेते शंकर केमसे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनी अजित पवार यांच्या उपस्थितीत नेत्र तपासणी शिबीर 

1 2

कृष्ण दृष्टी स्पेशालिटी हॉस्पिटल  आणि एक्सिस क्लिनिक च्या वतीने बारामती येथे आंतर राष्ट्रीय ख्यातीचे नेत्र तज्ञ  डॉ रमेश मूर्ती यांच्या नेत्र तपासणी शिबिरात ३०० जण सहभागी झाले . माजी उप मुख्य मंत्री अजित पवार यांनी उद्घाटन केले .   डॉ अपर्णा काटे,डॉ महेश काटे यांनी संयोजन केले .
 यावेळी अजित पवार यांनी डॉ रमेश मूर्ती यांचा सत्कार केला .
नेशनल पब्लिक स्कूल येथे स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांचे वक्तृत्व सादरीकरण 
दीपक बिडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण 
unnamed
नेशनल पब्लिक स्कूल ,कात्रज येथे स्वातंत्र्य दिनी  ‘सेव्ह पुणे हिल्स इनीशिएटिव्ह ‘ चे  अध्यक्ष दीपक बिडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी विध्यार्थ्यांनी विविध विषयांवर वक्तृत्व सादरीकरण केले . संस्थेचे अध्यक्ष एड . तारिक अन्वर पटेल , तमन्ना इनामदार ,देवेंद्र लोहोकरे ,प्रकाश खेडकर ,भानुदास मांगडे ,प्रकाश इंगळे उपस्थित होते

सुबोध भावेचे आगामी आकर्षण ‘कट्यार काळजात घुसली’ चा पहा प्रोमो …

0

sachin shankar mahadevan mrunmayikatyar

बालगंधर्व , लोकमान्य अशा सिनेमांनंतर सुबोध भावे चा ‘कट्यार काळजात घुसली ‘येतो आहे . खरे तर बराच काळ रखडला असे वाटावे  अशी स्थिती असतानाच या चित्रपटाचा प्रोमो प्रकाशीत झाल्याने रसिकांच्या आशा नक्कीच पल्लवित होतील आणि दिवाळीत हा चित्रपट येईल असे आता जाहीर हि झाले आहे .  गेली पन्नास वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे संगीत नाटक ‘कट्यार काळजात घुसली’ हे मराठी रंगभूमीवरचं सोनेरी पान चित्रपटाव्दारे रुपेरी पडदयावर साकारल जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता सुबोध भावे करत असल्यामुळे या चित्रपटाकडून अपेक्षा उंचावल्या आहेत . शंकर महादेवन, सचिन पिळगांवकर, साक्षी तन्वर, मृण्मयी देशपांडे अशा नामांकीत कलाकारांमुळे चित्रपट वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहचणार  आहे. पहा या चित्रपटाचा टीझर …आणि काही फोटो …

IMG_1046-600x350 IMG_1057 IMG_1060 IMG_1067

5 वर्षात 20 हजार गावं दुष्काळमुक्त करू -मुख्यमंत्री

0

मुंबई: येत्या 5 वर्षात 20 हजार गावं दुष्काळमुक्त करू अशी ग्वाही आज ध्वजारोहणासमयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय परिसरात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी राज्याच्या मुख्य सचिवांसह अनेक मान्यवरही उपस्थित होते.झेंडावंदन झाल्यानंतर राज्यातील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण जनतेला स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या.राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातला शेतकरी सक्षम बनवण्याकडे आपला प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. याचवेळी सरकारी योजनांच्या माध्यमातून येत्या 5 वर्षात 20 हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचा सरकारचा मानस असल्याचं फडणवीस म्हणाले.शेतकऱ्यांना कर्जाच्या डोंगरातून मुक्त करायचं असल्यासं कर्जाच्या आधारावर शेतीची अर्थव्यवस्था नको असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.तसंच थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर राज्य बनले आहे. 8 महिन्यात 70 हजार कोटींची गुंतवणूक येतेय, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

 काय म्हणाले मुख्यमंत्री –

-22 लाख शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा,3 रूपयात तांदूळ, 2 रूपयात गहू. आरोग्य सेवा देण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी योजनेची व्याप्तीवाढ

-स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची आता आपल्या सर्वांची जबाबदारी, तोवर आमचे स्वप्न पूर्ण होणार नाही

 – दरवर्षी 25 हजार आदिवासी विद्यार्थी नामांकित शाळेत शिकणार, 18 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले

– नागपूर-मुंबई सुपरएक्सप्रेस-वे मुळे कम्युनिकेशन्स क्षेत्रात मोठी क्रांती होणार, राज्यांतर्गत रस्त्यांवरही तितकाच भर

– सिद्ध अपराध दर आठ टक्क्यांपर्यंत खाली गेला होता, तो 32 टक्क्यांपर्यंत आणण्यात यश आले. कायदा-सुव्यवस्थेमुळे गुंतवणूक येतेय

– शिक्षणाचा गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न, शिक्षण शुल्क विधेयकाच्या माध्यमातून नफेखोरी करणाऱ्या महाविद्यालयांना चाप बसवणार

– थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर राज्य बनले आहे. 8 महिन्यात 70 हजार कोटींची गुंतवणूक येतेय्

– महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती होते आहे. उद्योगातील सरलता, कायद्यातील बदल, परवानाराज संपविला यातून मोठी गुंतवणूक येते आहे

– नवे खरेदी धोरण तयार केले आहे. तीन लाखाच्या वरच्या सर्व वस्तू ई-टेडरिंगच्या माध्यमातून, पारदर्शिता येणार, भ्रष्टाचार कमी होणार:

– सेवा हमी पारित केल्याबद्दल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे अभिनंदन करतो. आता संपूर्ण सेवा संचालनालय तयार करतो आहे

– गतिमान शासनासोबत पारदर्शितेसाठी सेवा हमी विधेयक पारित, सेवा मिळविणे हा जनतेचा अधिकार, सेवा देणे ही सरकारची जबाबदारी

– 2016 पर्यंत मागेल त्या शेतकऱ्यांला विजेचे कनेक्शन देणार, मागास भागात 40 हजार वीज कनेक्शन दिले

-दीड लाख शेततळी, एक लाख विहिरी तयार करणार, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात सिंचनाच्या अनेक सोयी करणार

– कर्जावर आधारित नाही, तर गुंतवणुकीवर आधारित शेती याला राज्य सरकारचे प्राधान्य, त्यातूनच शेतकरी समृद्ध होणार

– 25 हजार गावांत दुष्काळ असताना 7000 कोटींपेक्षा अधिक रक्कम राज्य सरकारने दिली

– जलयुक्त शिवारची योजना त्यासाठीच, 300 कोटी रूपये जनतेने उभे केले, ही योजना राज्य सरकारची नाही तर जनआंदोलन बनली याचा आनंद

– शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे खूप कष्ट झेलावे लागले. शेतीचा शाश्वत विकास करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे

 

काँग्रेस च्या वर्तनाने देशाचे २० लाख कोटींचे नुकसान-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई- काँग्रेस च्या वर्तनाने देशाचे २० लाख कोटींचे नुकसान झाले असून विकासकामे होवू द्यायचीच नाहीत या काँग्रेस च्या नीतीला विरोध करण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभरात १६ तारखेला निषेध आणि निदर्शने करण्यात येतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी जाहीर केले आहे

त्यांनी असे म्हटले आहे कि , संसदेच्या कामात गतिरोध निर्माण करण्याच्या काँग्रेसच्या लोकशाहीवर आघात करणार्‍या प्रकाराची करावी तितकी निंदा कमी आहे. केवळ जीएसटी विधेयक पारित होऊ नये, यासाठी ठरवून हा प्रकार करण्यात आला. संसद अधिवेशन चालूच द्यायचे नाही, हा जणू चंगच त्यांनी बांधला होता. या प्रकारामुळे देशाचे दोन लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले, तर महाराष्ट्राचे 20 हजार कोटींचे. जीएसटी महाराष्ट्रासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. मला आशा आहे की, जीएसटीसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात येईल. केंद्र आणि महाराष्ट्रातील सरकार तरूणांसाठी रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करीत असताना काँग्रेस ज्या पद्धतीने अडथळे आणू पाहत आहे, ते पाहता या देशातील आणि महाराष्ट्रातील तरुण काँग्रेसला कधीही क्षमा करणार नाही. आज काँग्रेस पूर्णपणे नैराश्येत आहे. त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीत. पुरावे नसताना ते आरोप करीत आहेत आणि राज्यातील नेत्यांच्या विषयांवर संसदेत बोलत आहेत. त्यामुळे या प्रकाराचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. याविरोधात येत्या 16 तारखेला राज्यभरात निषेध-निदर्शने करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. याशिवाय, प्रत्येक मतदारसंघात जाऊन काँग्रेस विकासात आणत असलेल्या अडचणींविरोधात जनजागृतीही करण्यात येईल.

देश ठेकेदार, दलालांच्या आणि काळा बाजारुंच्या तावडीतून मुक्त केला – पंतप्रधान

0

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्‍वातंत्रदिनी  आज (शुक्रवार) लाल किल्‍ल्‍यावरून देशाला संबोधित केले. मोदींनी तब्‍बल 86 मिनट 10 सेकंद भाषण देत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे रेकॉर्ड तोडले. नेहरू यांनी 1947 मध्‍ये 72 मिनटापर्यंत भाषण केले होते . विरोधी पक्षांचे नाव न घेता टिका करीत , देश ठेकेदार आणि दलालांच्या आणि काळा बाजारुंच्या तावडीतून मुक्त केल्याचा दावा त्यांनी यावेळी केली गॅस सिलेंडर अनुदानातून १६ हजार कोटी रुपयांची चोरी होत होती ती आपण थांबविली . यापुढे हि तक्रार असेल तर अर्ध्या रात्री हि सिलेंडर देवू असे ते म्हणाले

देश आज (शनिवार) 69 वा स्‍वातंत्र दिन साजरा करत आहे. पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी लाल किल्‍ल्‍यावर दुसऱ्यांना राष्‍ट्रध्‍वज फडकवला. ते म्‍हणाले, ”सेवानिवृत्‍त सैनिकांसाठी आम्‍ही वन रँक पेंशन योजना स्‍वीकारली आहे. ती लागू करण्‍यासाठी चर्चा सुरू आहे”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्‍ल्‍यावरून देशाला संबोधित करताना दिली.
ते पुढे म्‍हणाले, ”वर्ष 2022 पर्यंत आपल्‍याला सक्षम, समृद्ध, स्‍वस्‍थ, स्‍वाभिमानी भारत बनवायाचा आहे. प्रत्‍येकाला घर मिळावे, रोजगार मिळावा, देशातील तळागाळापर्यंत 24 तास वीज पोहोचावी, याचे स्‍वप्‍न केंद्र शासनाने पाहीले आहे. ते पूर्ण होण्‍याच्‍या दृष्‍टीने कृतीशील उपाय योजना केल्‍या जात आहेत. पण, त्‍यासाठी देशातील 125 कोटी नागरिक आणि सहा लाख गावांनीही असेच स्‍वप्‍न पाहावे आणि संकल्‍प करावा” , असे आवाहन त्‍यांनी केले. भारतात जशी विषमता आहे तशीच एकताही आहे. ही एकताच आपल्‍या देशाची बळकटी आहे. या बळकटीला कधीही डाग लागू देऊ नका. जर ही एकता तुटली तर तर आपले स्‍वप्‍नेही तुटतील”.आपल्‍या कार्यकाळात सुरू केलेल्‍या नवीन योजनांची माहिती दिली. पंतप्रधान जीवन विमा, अटल पेंशन विमा यांचीही माहिती दिली. ” आपल्‍या देशात यापूर्वी योजना अंमलात आणल्‍या गेल्‍या नाहीत, असे नाही. पण, त्‍यात 5 ते 6 कोटी लोकांच्‍या पुढे पोहोचल्‍या नाहीत. मात्र, आम्‍ही सुरू केलेल्‍या योजनांना केवळ 100 दिवसच झालेत. पण, त्‍या आज 10 कोटी पेक्षा अधिक लोकापर्यंत पोहोचल्‍या आहेत. या 15 महिन्‍यांत या सरकारवर भ्रष्‍टाचाराचा आरोप झाला नाही. पण, काही लोक कायम निराशवादी विचार करतात, असे म्‍हणत त्‍यांनी अप्रत्‍यक्ष कॉंग्रेसवर टीका केली.
modi5 modi3 modi4 modi6 modi7 modi 1

ठळक मुद्दे –

वन रँक वन पेन्शन मान्य आहे या बाबत चर्चा सुरू आहे, सकारात्मक निर्णय होईल.

स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया, मोदींचा नवा नारा. प्रत्येक बँकेने एक दलित, एक आदिवासीला स्टार्टअप कर्ज द्यावं.

संकटं झेलूनही भ्रष्टाचारमुक्त सरकारचं स्वप्न पूर्णकरणारच
काळा पैसा भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सरकारच्या 15 महिन्याच्या काळात एक पैशाचाही भ्रष्टाचार नाही
सव्वाशे कोटी जनता म्हणजे भारत.
40 टक्के जनता बॅंक खात्यांपासून वंचित होती. आम्ही त्यांना बॅंकेशी जोडलं.
देशातील बॅंकांनी 17 कोटी जनतेला बॅंकेशी जोडून घेतलं मी बॅंकांचा अभिनंदन करतो.
विमा योजनेत सहभागी होऊन त्याचा लाभ घ्या.
स्वच्छता अभियानात लहान मुलांसह सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला.
आम्ही गॅसची पाईपलाईन लावत आहोत. जेथे पिण्याचे पाणी घेण्यास कठीण परिस्थिती होती तिथे आम्ही गॅसचे पाईप लावणार आहोत.
देशाला आधी कंत्राटदार चालवत होते.
देशातील गरीबांनी 20 कोटीची रक्कम बॅंकांमध्ये जमा केली.
जगभरात भारताचं गुणगान गायलं जात आहे.
शेतकऱ्यांना खते देण्यासाठी आम्ही काम करत आहोत.
विकासामध्ये दलित, पीडित, शोषितांना स्थान
शेतीच्या आर्थिक पैलूंवर तसेच शेती विकासावर आम्ही भर दिला.
कृषी मंत्रालयाचे जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व शेतकऱ्याच्या कल्याणाला आहे.
शेतकऱ्यांच्या कल्याणाशिवाय कृषी विकास अपूर्ण.
भविष्यात शेतकऱ्यांसाठी विशेष योजना राबविणार.
देशातील 18,500 गावांत अद्यापही वीज पोहचू शकलेली नाही. त्यासाठी सरकार प्रयत्नशील.
जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणाऱ्या समूहानां भारतातील गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन.
मुलाखतीसाठी पत्र आल्यानंतर देशातील तरुण शिफारशीच्या शोधत असतो. कारण गुणवत्तेपेक्षा शिफारशीला महत्व. त्यामुळे मुलाखतीशिवाय केवळ गुणपत्रिकेवरील गुणवत्तेनुसार नोकरी देण्याची गरज. त्यासाठी सरकार प्रयत्नशील.
काही अपवादात्मक पदांना वगळून छोट्या-मोठ्या नोकरीसाठी मुलाखती रद्द करणार.

https://www.youtube.com/watch?v=WigXAeu8A2U

पुन्हा एकदा व्हावी प्रभात…

0

(जुने ते सोने म्हणतात … आणि ते खरे हि आहे अजूनही जुनी गाणी विस्मरणात जात नाहीत जुने संगीत जुने कलाकार , दिग्दर्शक यांनी इतिहास घडविला … गेलेले दिवस परत येत नाहीत म्हणतात पण गेलेला कलावंत … अन्य रूपाने तरी पुन्हा प्रगत व्हावा हि माफक अपेक्षा असते … काय वाटते सिनेसृष्टीतील मान्यवरांना आणि रसिकांना ? याबद्दलची चित्रे रेखाटणार आहेत मराठीतील नामवंत दिग्दर्शक शिव कदम … अनुभवू आणि पाहू यात शिव कदम यांच्या नजरेतून …. mymarathi.net )

शिवदर्शन कदम
शिवदर्शन कदम

मराठी भाषा अभिजात भाषा आहे. ज्या प्रमाणे महाराष्ट्राचा किंवा मराठीचा इतिहास दैदिप्यमान आहे तसाच मराठी सिनेमाचा इतिहास सुध्धा सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला आहे. भारतात चित्रपटांची सुरुवातच मुळात मराठी मातीत झाली हे सर्वश्रुत आहे. त्या नंतर भारतीय चित्रपटांचा प्रत्येक टप्पा मराठी हातांनीच सजवलेला आहे. पण हे चित्र जेवढे सुंदर आणि आश्वासक वाटते तेवढीच आजच्या मराठी सिनेमाची स्थिती निराश करणारी दिसते. महाराष्ट्र शासन आणि काही ज्ञात अज्ञात एकांड्या शिलेदारांनी मरणासन्न झालेल्या मराठी सिनेमाला जिवंत ठेवण्याचे काम खूप कष्टाने केले. अनेक लोक अक्षरशः रस्त्यावर आल्याचे मी पाहिले आहे. त्यांच्या प्रयत्नांवर आणि हाल अपेष्टांवर एक स्वतंत्र लेखमाला होऊ शकते. तर या प्रयात्न्नांमुळे मराठी सिनेमा जेमतेम जिवंत राहू शकला. त्या नंतर “श्वास” चित्रपटा पासून मराठी सिनेमा पुन्हा उजळू लागला. आज व्यावसायिक मराठी सिनेमा डौलाने आपला संसार पुन्हा थाटू लागलाय. ३५ ते ४० कोटींपर्यंतकाही मराठी सिनेमांची कमाई झाल्याचे आपण ऐकत असतो. per day वर काम करणारे नट आता एका सिनेमाचे १० ते २० लाख रुपये आकारू लागलेत. लेखक आणि दिग्दर्शकांनी बॅंकां मध्ये काम करून सिनेमा करण्याचे दिवस आता राहिले नाहीत. हे चित्र आश्वासक आहे. पण जगाच्या सिनेमात मराठीचे स्थान काय? भारतीय सिनेमात मराठीचे स्थान काय? एवढेच काय मराठी साहित्याच्या तुलनेत मराठी सिनेमाने किती लौकिक मिळवलाय? मराठी सिनेमा हि चळवळ राहिली आहे का? मराठी सिनेमाचे भविष्यातील सिनेमा मध्ये काय योगदान असणार आहे? या प्रश्नांची उत्तरं आम्हाला आता पासून शोधावी लागणार आहेत. ती सापडली नाही तर ती उत्तरं तयार करावी लागणार आहेत. सरकारी अनुदानाने मराठी सिनेमा तरलाही असेल, पण आता नवीन प्राण मिळाल्या नंतर जगाच्या क्षितिजावर आपले नाव कोरण्या साठी मराठी चित्रपटातील नवीन पिठीच्या पंखांना बळ देण्याचे, त्यांना नवी दृष्टी देण्याचे काम आता करावे लागणार आहे. नाहीतर मराठीला अनेक गोवारीकर, भांडारकर आणि कामत हिंदी सिनेमाच्या असेच स्वाधीन करत राहावे लागतील. “बाहुबली” मराठीत निर्माण नाही झाला तर त्याचे हिंदी डबिंग पाहूनच मराठी रसिकाला समाधान मानावे लागणार आहे. भाषा भाषांमधल्या सीमा रेषा पुसट होत असताना मराठी सिनेमाला सुध्धा भाषा धोरणात, सांस्कृतिक धोरणात मोलाचे योगदान देण्याची संधी निर्माण केली गेली पाहिजे. पूर्वी शासनाचं सांस्कृतिक खातं म्हणजे मंत्री महोदयांना इतर चार पाच खात्यांबरोबर मिळालेलं बोनस (किंवा डोकेदुखी) खातं समजलं जायचं. पण आता नवीन सरकार मध्ये हे खातं  विनोद तावडें कडे असल्यामुळे सर्वांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. मराठी भाषेसाठी त्यांनी दिलेल्या लढाया नंतर आता मराठी सिनेमासाठी केवळ अनुदान नाही तर त्या बरोबर  तावडेंनी एक धोरण द्यावं अशी अपेक्षा आहे.

प्रभात फिल्म कंपनीने ज्या प्रमाणे मराठी सिनेमाची एक चळवळ सुरु केली होती, जगाच्या पाठीवर मराठी सिनेमाचे स्थान निर्माण केले होते, त्या प्रमाणे मराठी भाषा जशी अभिजात आहे, तसा मराठी सिनेमा सुद्धा अभिजात व्हावा म्हणून , “पुन्हा एकदा प्रभात होण्याची” गरज आहे.

या लेख मालेत अनेक मान्यवर दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ यांच्या बरोबर आपली चर्चा होणार आहे. मला काहीतरी फार माहित आहे आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे असा कुठला हि अभिनिवेश इथे असणार नाही. आपण सर्वांनी मिळून, आपल्या मोलाच्या सूचनांचा स्वीकार करत २०२० मध्ये मराठी सिनेमा कसा असावा? या प्रश्नाचे अभिजात उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात.

सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!

मराठी सिनेमा विषयी आपल्या सूचना/प्रश्न directorshivkadam@gmail.com वर पाठवाव्यात.

गटारी अमावास्ये ऐवजी दीप अमावस्या साजरी करून व्यसनमुक्तीचा संदेश ! श्रावण महिन्याचे सामुहिक स्वागत

0
2
पुणे :
आषाढी अमावस्येनि मित्त (गटारी अमावस्या) विविध सामिष सेलिब्रेशन ,मद्यसेवनाचा पूर येत असताना, व्यसन मुक्तीचा संदेश देण्यासाठी, दीप अमावस्येची सायंकाळ ही दीप पूजनाची, प्रकाशाच्या पूजेची आणि श्रावणाचे स्वागत करण्याची आहे, हे अधोरेखीत करण्यासाठी ‘प्रबोधन माध्यम’ या संस्थेच्या वतीने शुक्रवारी (,दिनांक 14 ऑगस्ट रोजी ) सायंकाळी 7 वाजता टिळक रस्त्यावरील  नवी पेठ विठ्ठल मंदिर येथे दीप अमावस्या साजरी करण्यात आली
१४५ वर्षापूर्वीच्या या पुरातन विठ्ठल -रखुमाई मंदिरात महिला ,युवतींनी  तसेच भाविकांनी मोठी गर्दी केली होती
सणांचा कालोचित अर्थ सांगणाऱ्या या कार्यक्रमाचे हे पाचवे वर्ष होते . महिला व युवतींना एकत्र करून सामूहिक  दीपपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला , सामुहिक आरती करण्यात आली अशी माहिती संस्थेच्या संचालक गौरी बिडकर यांनी दिली. हा कार्यक्रम नवी पेठ विठ्ठल मंदीर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला
आषाढ संपत आहे, श्रावण येत आहे, आषाढ समाप्ती अमावस्येने होते,  या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणते, खरे तर याच दिवशी दीप अमावस्या असते. ‘दिव्याची अमावस्या’ही दीप पूजनाची मानली जाते. घरातील सर्व दिवे छान घासून पुसून लख्ख करून त्याची पूजा करावी. प्रकाशाची कहाणी ऐकून संस्कृतीचा जागर करणार्‍या श्रावणाचे स्वागत करण्याचा दिवस आहे, असा संदेश या दीपपूजनाने मिळतो’, असे धार्मिक ग्रंथांमधेही नमूद केले आहे’ असे यावेळी सांगण्यात आले
‘नको व्यसनाचा अंधार, हवा ज्ञानाचा प्रकाश’ ,‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ या घोषणांचे फलक लावण्यात आले होते . विविध आकार, रंगांचे, पारंपरिक दिवे, पणत्या-निरांजने, समया यांचे पूजन केले गेले . या निमित्ताने विविध दिवे पाहायला मिळाले . आपल्या मूळ संस्कृतीनुसार सण साजरे करून त्यातील सामाजिक संदेश पुढे आणण्याचा हा प्रयत्न आहे, असे गौरी बिडकर यांनी सांगितले.
सदाशिव भावे ,अपर्णा भावे या दाम्पत्याच्या हस्ते विठ्ठल -रखुमाई ची आरती करण्यात आली . मंदिराचे विश्वस्त संजय गाडे ,नितीन नवले ,श्रीकांत पवार तसेच ललित राठी ,नेहा मुथियान ,बाळासाहेब कुलकर्णी (पुजारी ) ,दीपक बिडकर ,सौ गायत्री कोकिळ उपस्थित होते

स्वातंत्र्यदिनानिमित्त हॉटेल आर्चिड मध्ये स्पेशल लंच आणि डिनर

0

1 2 3

पुणे- बालेवाडी जवळील ऑर्किड हॉटेल मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त फरीडोम फ्लेवर चे आयोजन करण्यात आले आहे असे सोनाली जाधव यांनी कळविले आहे , त्या म्हणाल्या ,’ पुण्यातील ऑर्किड हॉटेलच्या बुलावार्द मध्ये स्वातंत्र्य  दिनाच्या निमित्ता ने ग्राहकांसाठी विशेष  आकर्षक डिशेस चे आयो जन केले आहे . स्वातंत्र्यदिनाचा  चा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आकर्षक लाइव कारओके संगीत  , स्पेचिअल मोकटेल्स, शेफ स्पेचिअल लाइव चोउन्तेर्स आणि आकर्षक डेझर्ट इत्यादी उपलब्ध  करून देण्यात येणार आहे  कुटुंबियांना तसेच मित्रमंडळी ना ट्रीट देण्यासाठी आगळे वेगळे खास चवीचे जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे  आणि त्याचबरोबर एक सर्वोत्कृष्ट्र मेजवानीचा  अनुभवया दिवशी यावा आणि तो स्मरणात राहावा अशी यामागील कल्पना आहे  .” स्वतंत्र ता दिन स्पेशल लचं केवळ ६९९ रुपयामध्ये १५ ऑगस्ट रोजी १२.०० ते ४.०० पर्यंत जागा राखून ठेवण्यासाठी  ७७३८३६०३८१/ ८८७६३११२८/ ०२०-६७९१४०४० येथे  संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे दिनांक : १५ ऑगस्ट १२.०० ते ४.०० किंमत : स्वतंत्रता दिन लचं ( रु ६९९ अधिक कर ) स्थळ: ऑर्किड हॉटेल , छत्रपती शिवाजी क्रीडा नागरी जवळ , पुणे बंगलोर हायवे बालेवाडी , पुणे महाराष्ट्र – ४११००४ ​

या सोबत त्यांनीप्रसिद्धीसाठी काही फोटो हि पाठविले आहेत …

शेतकऱ्याच्या हृदयाला मिळाली नवसंजीवनी ; रुबी हॉल क्लिनिकमध्ये रुग्णावर सवलतीच्या दरांत चौथी यशस्वी

0

पुणे. – चाळीस वर्षांचे शेतकरी बाळू कारके हे जीवन-मृत्यूचा लढा देत असताना शहरातील एका

प्रतिष्ठित रुग्णालयात भरती झाले होते. त्यांची हृदयाची डावी झडप जी दोन वेळा पूर्वी बदलली गेली

आणि पुन्हा खराब झाली, यालाच प्रोस्थेटिक व्हाल्व डिटिरिओरेशन म्हटले जाते. त्यामुळे

त्यांना शस्त्रक्रिया त्वरित करण्याचा सल्ला देण्यात आला होता. वयाच्या सतराव्या वर्षापासून विविध

प्रकारच्या व्हाल्व बदलण्याच्या शस्त्रक्रिया झालेल्या आणि अत्यवस्थ असलेल्या कारके यांना अत्यंत

धोका असल्याचे मानण्यात आले होते, त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास मनाई केली होती.

कारके आणि त्यांच्या कुटुंबियांना आशेचा किरण दाखवला तो रुबी हॉल क्लिनिकमधील हृदयरोग

शल्यविशारद डॉ. समीर भाटे यांनी. ते सांगतात, “डॉ. मिलिंद गडकरी यांनी कारके यांना माझ्याकडे

पाठविले होते. त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणले तेव्हा ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या बाबतीत

हृदयाची झडप इतकी निकामी झाली होती, की  फुफ्फुसांमध्ये पाणी साचल्यामुळे त्यांना श्वास घेणेही

अशक्य झाले होते. ही हृदयावरील पुनःशस्त्रक्रिया होती त्यामुळे ती अधिकच धोकादायक ठरणारी

होती, कारण आधीच्या शस्त्रक्रियांमुळे हृदय छातीच्या हाडांशी चिकटले गेले होते.

डॉ. सुधीर भाटे आणि डॉ. स्वप्नील फुलादी यांच्या मदतीने तब्बल सात तासांच्या शस्त्रक्रियेनंतर

डॉ. समीर भाटे यांनी खराब झालेली झडप बदलून त्याजागी थर्ड जनरेशन टिश्यू व्हाल्व बसविली.

टिश्यू व्हाल्व किंवा बायो-प्रोस्थेटिक व्हाल्वस् हे गाय किंवा डुकरांपासून बनविण्यात येतात आणि ते

मजबूत व लवचिक असतात. 70 वर्षेपेक्षा अधिक वयाच्या रुग्णांमध्ये त्यांचे प्रत्यारोपण अयशस्वी

होण्याचे प्रमाण दहा वर्षांमध्ये केवळ 10 टक्कांपेक्षा कमी तर चाळीसपेक्षा कमी वयाच्या रुग्णांमध्ये 20-

30 टक्क्यांपेक्षा कमी असते. या झडपांचा कार्यकाळ दहा ते वीस वर्षे एवढा असतो आणि यांत्रिक

झडपांपेक्षा त्यांना अधिक पसंती देण्यात येते. याचे कारण म्हणजे यांत्रिक झ़डपा बसविल्यानंतर रुग्णांना

आयुष्यभर ‘वॅरफॅरिन’ सारखी रक्त पातळ करणारी औषधे घ्यावी लागतात. त्यामुळे त्यांना सामान्य

जीवन जगणे अवघड बनते. शिवाय, वॅरफॅरिनच्या वापरामुळे अनेक समस्या उद्भवतात खासकरून

अशिक्षित आणि ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये. औषधाच्या कमी किंवा अधिक वापरामुळे अनेक गुंतागुंती

उद्भवू शकतात.

अशा प्रकारची शस्त्रक्रिया अत्यंत खर्चिक असते आणि तिचा किमान खर्च सात लाख रुपये

होतो. शेतकरी असल्यामुळे बाळू कारके आणि त्यांच्या कुटुंबियांची ही अत्यंत महत्त्वाची शस्त्रक्रिया

करण्याची आर्थिक ताकद नव्हती. याही बाबतीत रुबी हॉलने कारके कुटुंबियांना दिलासा देत या शास्त्र

क्रियेमध्ये सवलत दिली ज्यामुळे केवळ चार लाख रुपयांमध्ये ही शस्त्रक्रिया करता आली. तसेच

डॉक्टरांनी त्यांच्याकडून कुठलेही व्यावसायिक शुल्क घेतले नाहीत.

ही शस्त्रक्रिया होऊन पाच महिने झाले असून आता बाळू कारके अधिक स्वस्थ आणि आनंदी

वाटतात. ते म्हणतात, “डॉ. समीर भाटे आणि रुबी हॉल क्लिनिकमधील त्यांच्या सहकाऱ्यांचा मी ऋणी

आहे, त्यांनी आमच्या कुटुंबाची अडचण ओळखून अगदी नेमक्या वेळी उपचार पुरविले. मला मिळालेले

उपचार आणि काळजी कोणत्याही बाबतीत कमी नव्हते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझा

व्हेंटिलेटर काढण्यात आला आणि लवकरच मला सोडण्यात आले. आता मी बरा होत आहे आणि

हॉस्पिटलने मला हे आयुष्य दिले आहे, हे कायम माझ्या आठवणीत राहील.”

याबाबत बोलताना रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बोमी भोट म्हणाले, “दर्जेदार

आरोग्यसेवा ही समाजाच्या सर्व थरांतील लोकांपर्यंत पोचविणे, हे रुबी हॉल क्लिनिकचे लक्ष्य

आहे. दरवर्षी हॉस्पिटल गरजू रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरांमध्ये वैद्यकीय उपचार

पुरविते. गेल्या वर्षी आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील कुटुंबांच्या चेहऱ्यावर स्मित उमटविण्यासाठी

हॉस्पिटलने एकूण 20 कोटी रुपये खर्च केले. रुग्णांवरील उपचार आणि शुश्रुषा यांमध्ये कोणतीही कसर

ठेवायची नाही, असा हृदयतज्ज्ञांच्या टीमचा प्रयत्न असतो. सर्वांना सुरक्षित आरोग्यसेवा पोचविण्याच्या

आमच्या उत्साहात यामुळे भरच पडते.”

15 AUG ला होणार पुन्हा सिंहगर्जना

0

लोकमान्यएक युगपुरूष

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच”अशी सिंहगर्जना करून ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेला हादरवून सोडणारे नेते, भारतीय असंतोषाचे जनक, अभ्यासू पत्रकार, कायदेतज्ज्ञ, थोर समाजसुधारक अशा एक ना अनेक बिरूदावली ज्यांना सन्मानाने आणि आदराने बहाल करण्यात आल्या ते थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक. कोकणात जन्मलेले बाळ गंगाधर टिळक वयाच्या दहाव्या वर्षी पुण्यात आले. या शहराला आपली कर्मभूमी करत त्यांनी आपल्या प्रखर वाणीने आणि कार्याने भारतीयांच्या मनात देशभक्तीची भावना चेतवली आणि ब्रिटीशांविरूद्धच्या लढ्याला प्रखर बनवत त्यांना ‘सळो की पळो’ करून सोडलं. ख-या अर्थाने जनसामान्यांचा जहाल नेता असलेल्या लोकमान्यांच्या आयुष्यावर आधारित लोकमान्य – एक युगपुरूष”हा चित्रपट येत्या  15 Augला  ZEE MARATHI वर प्रसारीत होत आहे. नीना राऊत फिल्मस्’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची प्रस्तुती एस्सेल व्हिजनची आहे तर दिग्दर्शन ओम् राऊत यांचे आहे.

कात्रज मध्ये सापडली साडेचार वर्षांची बालिका

0

पहा- आणि पोलीस तपासाला मदत करा

पुणे : कात्रज पोलिस चौकीजवळ बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अवघ्या साडे चार वर्षांची एक चिमुरडी सापडली आहे. विशेष म्हणजे तिची आई किंवा एक महिला तिला सोडून गेल्याची माहिती आहे.बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही मुलगी सापडली. तिचं नाव वंदना दत्ता माने तर आईचं नाव स्वाती असल्याचं ती सांगते. तिच्या कंबरेच्या बेल्टवर क्राईस चर्च स्कूल, मुंबई असं लिहिलं आहे.कात्रज डेपोजवळ संबंधित महिलेने अन्य एका महिलेकडे या मुलीला सोडवले. ‘मी लगेच आले’ असं सांगून ती गेली, परंतु परत आली नाही. त्यामुळे ज्या महिलेकडे मुलीला  सोपवलं होतं तिने पोलिसांना याबाबत माहिती दिली.कात्रज पोलिस वंदनाच्या घरच्या व्यक्तींचा  शोध घेत आहेत. मुलीबद्दल माहिती मिळाल्यास कात्रज पोलिस चौकीच्या 020 2431 7770 या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आलं आहे.