Home Blog Page 3559

कॉम्रेड गोविंद पानसरे खून प्रकरणी सनातन च्या समीर गायकवाड ला अटक …

0
कोल्‍हापूर –  दाभोळकरांचा खुनी सापडला नसला किंवा त्याबाबत काहीही तपास पुढे सरकला नसला तरी आज कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्‍या खून प्रकरणी मात्र सांगलीतून समीर गायकवाड याला  अटक करण्यात आली आहे . न्‍यायालयाने त्‍याला सात दिवसांची पोलीस कोठडी दिली असून , पोलिसांनी दोन कोटी फोन कॉल्स तपासल्यानंतर त्याचे नाव निष्पन्न झाल्याचे सांगितले , तो सनातन संस्‍थेचा पूर्ण वेळ कार्यकर्ता असल्‍याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.या घटनेमुळे दाभोळकर यांचे मारेकरी आणि सूत्रधार यांच्यापर्यंत पोलीस पोहोचू शकतील काय ? असा प्रश्न आता पुढे उभा राहिला आहे .
सांगली शहरातील आकाशवाणी केंद्राजवळ असलेल्‍या त्‍याच्‍या घरातून पोलिसांनी त्‍याला ताब्यात घेतले. त्‍याच्‍या कुटुंबातील सर्व सदस्‍य गोव्‍यातील सनातन संस्‍थेच्‍या आश्रमात राहतात.
समीरच नव्‍हे तर त्‍याचे संपूर्ण कुटुंब आमचे साधक असून, त्‍याच्‍यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असल्‍याचे सनातनने म्‍हटले. शिवाय समीरचे निर्दोषत्‍व सिद्ध करण्‍यासाठी गायकवाड कुटुंबाला कायदेशीर मदत करणार असल्‍याचेही संघटनेकडून सांगण्‍यात आले.
15 फेब्रुवारीला सकाळी आठच्या सुमारास गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापुरातील सागरमळा भागातील रहत्या घराजवळ हल्ला झाला होता. उपचारादरम्‍यान त्‍यांचे निधन झाले. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा नेहमीप्रमाणे शिवाजी विद्यापीठ परिसरातून मॉर्निंग वॉकवरुन परतत असताना, दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पानसरे आणि त्यांच्या पत्नींवर गोळ्या झाडल्या.हल्लेखोरांनी एकूण तीन गोळया झाडल्या होत्‍या. त्यातील एक गोळी पानसरे यांच्या मानेला लागली. एक गोळी त्यांच्या हाताला चाटून गेली. उमा पानसरे यांनाही एक गोळी लागली होती. मात्र, त्‍यांचे प्राण वाचले.

कसबा गणपतीचा आदर्श निर्णय -दुष्काळामुळे पाच वर्षांसाठी हे गाव दत्तक घेतले….

0
पुणे – शहरातील मानाचा पहिला गणपती असलेल्या “कसबा गणपती मंडळा‘ने आपल्या कामातून निर्णायातून -कामातून आदर्श घालून दिला आहे नगर जिल्ह्यातील खंडोबावाडी (ता. पाथर्डी) हे गाव दत्तक घेऊन समाजकार्यातही अग्रस्थानी असल्याचे या मंडळाने सिद्ध केले आहे. उत्सवाच्या खर्चात सुमारे पन्नास टक्के कपात करून हा निधी गावाच्या विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे. मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी सहसचिव भूषण रुपदे उपस्थित होते.
यंदा दुष्काळामुळे खर्चात कपात केली असून, पुरस्कारालाही फाटा देण्यात आला आहे. यामुळे सुमारे नऊ लाख रुपयांची बचत होणार असून हा निधी खंडोबावाडीतील विकासकामांसाठी खर्च करण्यात येणार आहे.

मंडळाचे कार्यकर्ते गावकऱ्यांच्या साथीने रस्ते, पाणीपुरवठा, वैद्यकीय, कृषी, शिक्षण, स्वच्छताविषयक प्रकल्प राबविणार आहेत. पुढील पाच वर्षांसाठी हे गाव दत्तक घेतले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मंडळाने यंदा पर्यावरणपूरक कागदी लगद्यापासून देखावा तयार केल्याचेही त्यांनी सांगितले.

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून दुष्काळग्रस्तांसाठी एक मूठ धान्य घेण्यात येणार आहे. त्यासाठी भाविकांनाही दर्शनाला येताना एक मूठ गहू, ज्वारी, तांदूळ, साखर आणि तूरडाळ हे धान्य आणावे, असे आवाहन त्यांनी केले. जमा होणाऱ्या धान्याच्या दुप्पट किंवा चौपट धान्य मंडळाकडून दुष्काळग्रस्तांसाठी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे या मागणीकरिता नरपतगीर चौकात आंदोलन

0

पुणे

उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे या मागणीकरिता पुणे बार असोसिएशन व पुण्यातील वकील बांधव , नागरिकांनी सोमवार पेठ मधील नरपतगीर चौकात आंदोलन केले . यावेळी वकील बांधव आणि नागरिकांनी खंडपीठ पुण्यात व्हावे या मागणीचे फलक हातात धरले होते . या आंदोलनात  जेष्ठ विधीज्ञ नंदू फडके , पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश शेडगे , योगेश पवार , सतीश पैलवान , मिहिर तथ्थे , नितीन परतानी , बाळासाहेब बरके , राजेंद्र तांबे , फैय्याज शेख , शाहीद अत्तार , अश्विनी गवारे , अशोक संकपाळ , रमेश धर्मावत ,रोहित माळी , साहेबराव जाधव , बाळासाहेब घोडके , शब्बीर खान , राहुल झेंडे , समीर शेख दत्तात्रय थोपटे , रवि शिंदे , प्रमोद जोशी आदी वकील बांधव सहभागी झाले होते .

   यावेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश शेडगे यांनी सांगितले कि , पुण्यात खंडपीठ व्हावे गेले अनेक वर्षापासूनची मागणी पुण्यातील वकील बांधव करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौरा पूर्ण करून आल्यानंतर कॅबिनेटच्या बैठकीत ठराव करून खंडपीठाची मागणी पूर्ण करू असे आश्वासन दिले होते . परंतु आश्वासन पूर्ण न केल्याने वकील बांधव पुणे शहरात विविध ठिकाणी आंदोलन करीत आहे  .                                     

हैदराबादेत -कांदा ‘आधार कार्ड ‘ वर … अजब तुझे सरकार …

0

हैदराबाद- इंधन काही प्रमाणात स्वस्त भासत असले तरी जीवनावश्यक …नाहीच तर पोटासाठी लागणाऱ्या जेवणाला जो कांदा आवश्यक ठरतो तो कांदा आता चक्क आधार कार्ड दाखविल्याशिवाय येथे मिळत नाही असे वृत्त आहे . राज्यात कांदा खरेदीसाठी तब्बल चार किलोमीटर लांब पर्यंत नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. शिवाय, आधार कार्ड दाखविणाऱयांनाच 20 रुपये किलो दराने कांदा मिळत आहे. अन्य खाजगी बाजारात कांद्याचे दर कमालीचे वाढले आहेत. खासगी बाजारामध्ये 60 ते 80 रुपये एवढा कांद्याचा एक किलोचा दर आहे. यामुळे नागरिक सरकारी योजनेतून कांदा खरेदी करण्याकडे वळत आहे. सरकारी योजनेतील कांदा खरेदी करण्यासाठी तब्बल चार किलोमिटरच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. कांदा खरेदी करणाऱ्यांसाठी सरकारने योजना आखली आहे. एका कुटुंबाला एका आठवड्याला 2 किलो कांदा मिळेल. परंतु, त्यासाठी आधार कार्ड दाखवावे लागत आहे.असे वृत्त आहे .

व्यर्थ आहे काय बलिदान यांचे …. ?

0

IndiaTve1da63_Rajiv-Indiara-Stamp

पुणे- केंद्रीय दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशावरूनच इंदिरा व राजीव गांधी यांची टपाल तिकिटे बंद करण्यात येणार असल्याची माहिती अधिकारातून उघड झाले आहे.याबाबत व्यर्थ आहे काय बलिदान यांचे असा सवाल करीत हेमंत बाजीराव मुळे यांनी हि तिकिटे बंद करू नये अशी कळकळीची मागणी केली आहे 
टपाल विभागाने संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात २००८ मध्ये नऊ महत्त्वाच्या व्यक्तींची छायाचित्रे असलेल्या टपाल तिकिटांची मालिका सुरू केली होती. त्यात इंदिरा व राजीव गांधी यांच्यासह महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, होमी भाभा, जेआरडी टाटा व मदर तेरेसा यांचा समावेश होता. नव्या मालिकेत आता उपाध्याय, नारायण, मुखर्जी व लोहिया यांच्याव्यतिरिक्त लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज, भीमसेन जोशी, विवेकानंद, भगतसिंग, पं. रविशंकर आदींची छायाचित्रे असलेल्या टपाल तिकिटांचा समावेश असेल. गेल्या वर्षी केंद्र सरकारने इंदिरा गांधी राजभाषा पुरस्कार व राजीव गांधी राष्ट्रीय ज्ञान-विज्ञान मौलिक पुस्तक लेखन पुरस्कार या पुरस्कारांचे नामांतर अनुक्रमे राजभाषा कीर्ती पुरस्कार व राजभाषा गौरव पुरस्कार असे केले होते.‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ म्हणून सर्वाना गौरवण्यात आले होते. मात्र, त्यापैकी इंदिरा व राजीव यांच्या तिकिटांची छपाई बंद करण्याचे आदेश टपाल विभागाला देण्यात आल्याचे  ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने दाखल केलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जातून स्पष्ट झाले आहे.अशी बातमी प्रसिध्द झाली आहे .

दरम्यान या बातमीचा आधार घेत मुळे यांनी म्हटले आहे कि ,केंद्रात अनेक वर्षांनी भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळून स्थिर सरकार आले आहे . देशाच्या प्रगतीमध्ये व जनतेच्या हितासंबंधी सरकार कडून काम होईल अशी अपेक्षा होती . परंतु या मोदी सरकारने जनतेचा अपेक्षा भंग केला . विधायक विकास कामे करण्या ऐवजी भारतीय इतिहासामध्ये स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या योगदानाची दखल घ्यावी लागेल . मा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राजकारणापेक्षा इंदिरा गांधीनी दाखविलेल्या सन १९७१ मध्ये त्यांनी केलेल्या धाडशी कामाचे कौतुक करून साक्षात इंदिरा गांधी यांना दुर्गाची उपमा दिली . ऑपरेशन ब्लू स्टारच्या आदेशावर सही करताना राष्ट्रहिताचा विचार करून मी माझ्या मृत्यूच्या आदेशावर सही करत आहे . तसेच राजीव गांधी यांना श्रीलंकेत प्राणघातक हल्ला होऊन सुद्धा आपले कार्य सुरूच ठेवले . थोडक्यात देशाच्या हिताकरिता दोघांनीही बलिदान दिले आहे .भारतीय जनता पार्टी ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ असणारे व्यक्तींचा आपल्याला सत्तेच्या माध्यमातून त्यांना हद्दपार करत आहे . त्यामुळे भारतीय जनता पार्टीने सकारात्मक कामे करावीत नकारात्मक कामे करून आपला विश्वास गमावू नये .

हिंदी दिनानिमित पुणे कॅंटोन्मेंट पुस्तक पतपेढीच्यावतीने ” गुरुजनांचा सन्मान सोहळा ” संपन्न

0

पुणे-हिंदी दिनानिमित पुणे कॅंटोन्मेंट पुस्तक पतपेढीच्यावतीने ” गुरुजनांचा सन्मान सोहळा ” नुकताच संपन्न झाला . पुणे कॅम्प भागातील आझम कॅम्पसमधील असेम्ब्ली हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे शाळा समिती अध्यक्ष नगरसेवक दिलीप गिरमकर ,नगरसेवक अतुल गायकवाड प्रकाश वाजा , आरती संघवी , विपीन शहा ,शशीधर पूरम , डॉ दादा टेकवडे आदी मान्यवर , विविध शाळामधील शिक्षक वर्ग उपस्थित होते . या  कार्यक्रमाचे सयोजंक अड. अर्जुन खुर्पे , उषा माळी , कुसुम शेलार , अड. आशिष खुर्पे , योगेश खुर्पे आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी उपस्थित गुरुजनांचा शाल , श्रीफळ , भेटवस्तू व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .

  या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत अड. अर्जुन खुर्पे यांनी केले तर पुस्तक पतपेढीच्या कार्याची माहिती दिलीपकुमार सराफ यांनी दिली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा माळी यांनी केले तर आभार सचिन चव्हाण यांनी मानले . कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले .

आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय ओझोन थर संवर्धन दिन’ होणार साजरा

0
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्यावतीने ‘21 वा आंतरराष्ट्रीय ओझोन थर संवर्धन दिन’ साजरा करण्यात येणार आहे. महाविद्यालयच्या वार्षिक कार्यक्रमातंर्गत साजरा होणारा हा कार्य्रकम बुधवार, दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागात होईल, अशी माहिती डॉ. इम्तियाझ हुसैन जहिद (सहाय्यक प्राध्यापक वनस्पतीशास्त्र विभाग, आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय) यांनी दिली.
चांगले पर्यावरण आणि पर्यावरण सुरक्षा या विषयी माहिती मिळणे आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण होणे यासाठी हा दिन महाविद्यालयात दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे.

पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या शीख अल्पसंख्याक अध्यक्षपदी भोलासिंग अरोरा यांची नियुक्ती

0
पुणे- शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या शीख अल्पसंख्याक अध्यक्षपदी भोलासिंग अरोरा यांची नियुक्ती करण्यात आली . या नियुक्तीचे पत्र पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष इकबाल शेख यांनी दिले . पुणे शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कार्यालयात हा पत्र देण्याचा कार्यक्रम झाला . यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या अध्यक्षा खासदार वंदना चव्हाण , पुणे शहर निरीषक हरिष सणस , महापौर दत्तात्रय धनकवडे , युवती सेल अध्यक्ष मनाली भिलारे , माजी महापौर चंचला कोद्रे आदी मान्यवर उपस्थित होते .
 भोलासिंग अरोरा यांनी शीख समाजात विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असतात . त्यांनी बैशाखी , ३०० साल गुरु दा गद्दी कार्यामध्ये पुणे शहरात मुख्य समन्वयक म्हणून काम केले आहे . ते गणेश पेठ गुरुद्वारा गुरुसिंग सभेवर माजी सचिव म्हणून काम केले आहे . त्य्णाई राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या विविध पदांवर काम केले आहे .

पुणे फेस्टिव्हल ची २७ वर्षे … कलमाडींना अभिमान …

0

पुणे- सत्तेत असो किंवा नसो … तब्बल २७ वर्षे दिमाखदार सोहळा साजरा करतो आहे ‘पुणे फेस्टिव्हल ‘ दिवसेंदिवस रंगतदार होतो आहे याचा मला अभिमान आहे या सोहळ्यात अभिनेत्री हेमा मालिनी तब्बल २५ वर्षे सक्रीय सहभागी राहिली याबद्दल हि मला खूप कौतुक आहे असे वक्तव्य करीत २७ व्या पुणे फेस्टीव्हलचा रंगारंग कार्यक्रम आज पुण्याचे माजी खासदार  सुरेश कलमाडी यांनी जाहीर केला . तारे तारकांची मांदियाळी , खचाखच करमणुकीचे कार्यक्रम … कलर्स मराठी च्या मालिका -शोज चा यावेळी होणारा झगमगाट अशी कित्येक वैशिष्टे यंदा या फेस्टिव्हल मध्ये दिसणार आहेत

Shashi KapoorPrem Chopra

 

पुणे फेस्टिव्हल जीवन गौरव पुरस्कार अभिनेते शशी कपूर आणि प्रेम चोप्रा यांना जाहीर करण्यात आला असून पुणे फेस्टिव्हल पुरस्कार जैकी श्रॉफ , अजय अतुल ,आणि दो उमा नटराजन यांना जाहीर करण्यात आला आहे

Ajay AtulJackie Shroff

 

Uma Ganesh Natarajanlogo2015 copy

 

मुख्यमंत्री देवेन्द्र  फडणवीस, पालक मंत्री गिरीश बापट , केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर तसेच दिलीप कांबळे , विजय शिवतारे हे सत्ताधारी मंत्री ; माजी मंत्री हर्षवर्धन पाटील  हे यंदा पुणे फेस्टिव्हल चे प्रमुख पाहुणे आहेत यामध्ये विशेष म्हणजे म्हैसूरचे महाराज यदुवीर कृष्ण्दत्त चामराजा वाडियार हे प्रमख अतिथी मधील वैशिष्ट्य असणार आहे.याशिवाय अभिनेता अनिल कपूर , अभिनेत्री पूनम ढिल्लो, बिंदू  हेही आकर्षण असणार आहे

उद्घाटन सोहळ्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. सतीश देसाई असतील .  नेहमी गणेश वंदना , नवा ब्याले सदर करणाऱ्या हेमामालिनी यावेळी ‘श्रीकृष्ण वंदना ‘ हा नृत्य अविष्कार सादर करणार आहेत

अजय अतुल यांचा ‘मनाचा मुजरा ‘ कलर्स ची कॉमेडी ची बुलेट ट्रेन ;मराठी प्रेम गीतांचा प्रेम तुझा रंग कसा, उगवते तारे इंद्रधनू, शास्त्रीय संगीत मराठी कवी संमेलन, उर्दू मुशायरा, एकपात्री हास्य  कलाकारांचा कार्य्रक्रम, महिला महोत्सव पेंटिंग प्रदर्शन, मिस पुणे फेस्टिवल, लावणी आणि भांगडा महोस्तव, केरळ महोस्तव अश्या विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांसह व्हिंटेज कार प्रदर्शन, गोल्फ क्लब टूर्नामेंट राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धा, मल्लखांब स्पर्धा, कुस्ती स्पर्धा अशा क्रीडा स्पर्धांचा यात समावेश असेल,

संतोष जुवेकर, मृणाल दुसाणीस, संस्कृती बालगुडे, शर्वरी जेमनीस, भार्गवी चिरमुले, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, तेजस्विनी पंडित, सारा श्रवण, आदि असंख्य कलाकारांचा समावेश असलेल्या विविध कार्यक्रमांचा यात समावेश आहे,

Anil Kapoor Bindu Resham Tipnis Sharvari Jamenis

गणेश कला क्रीडा मंच, बालगंधर्व रंग मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्य गृह, भीमसेन कला दालन, पूना गोल्फ क्लब, मामासाहेब कुस्ती संकुल, आदि ठिकाणी हे सर्व कार्यक्रम होतील,

माजी खासदार सुरेश कलमाडी, डॉ. सतीश देसाई, डॉ. पी ए इनामदार , कृष्णकुमार गोयल कृष्णकांत कुदळे, काका धर्मावत,राजेंद्र गदादे, मनोहर नांदे, आदी मान्यवर या पत्रकार परिषदेला उपस्थित होते

 

संपूर्ण अनुवादातूनच काव्याचे खरे मर्म कळते — बिबेक देबरॉय

0

पुणे-

“महाभारतासारख्या विशाल महाकाव्य़ाच्या संक्षिप्त अनुवादामधून त्या काव्य़ात वर्णन केलेली खरीखुरी

कथा, तत्कालीन समाजाचे नीतिनियम आणि चालीरीती, धर्म, तत्त्वज्ञान, ह्या आणि इतर अनेक गोष्टींची माहिती

वाचकास मिळत नाही, कारण अनुवादकास ज्या गोष्टी अडचणीच्या किंवा अवघड वाटतात, त्या गोष्टी वगळून

अनुवाद करणे त्यास शक्य होते. यापूर्वीही महाभारताचे संपूर्ण इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. मात्र त्यातही

काही भाग अनुवादकांनी वगळला आहे. तसेच ते अनुवाद महाभारताच्या चिकित्सापूर्ण संशोधित आवृत्तीवर

आधारलेले नाहीत. भांडारकर संस्थेने प्रकाशित केलेल्या महाभारताच्या आवृत्तीवर आधारित असा, त्यातील

कोणताही भाग न वगळता इंग्रजी अनुवाद मी केला असून त्याच्या आत्तापर्यंत १५ ते २० हजार प्रती खपल्या

आहेत.” असे विचार नीती आयोगाचे सदस्य, ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ आणि भारतीयविद्येचे अभ्यासक श्री बिबेक

देबरॉय यांनी आज येथे मांडले.ऐंशी हजार श्लोकांच्या संपूर्ण महाभारताचा इंग्रजी अनुवाद केल्याबद्दल भांडारकर

प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष सदानंद फडके यांच्या हस्ते  देबरॉय यांचा सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना श्री देबरॉय यांनी ते संस्कृत संबंधी लेखनाकडे कसे वळले हे सांगून त्यांच्या या

लेखनप्रवासाचा थोडक्यात आढावा घेतला तसेच त्यांच्या पुढील लेखनाची दिशा विशद केली. संस्कृत ग्रन्थांच्या

शब्दशः आणि सविस्तर अनुवादाचे महत्त्व त्यांनी यावेळी सांगितले. तसेच महाभारताचा अनुवाद करतानाचे त्यांचे

अनुभव त्यांनी श्रोत्यांपुढे मांडले.

संस्थेचे प्रभारी मानद सचिव प्रा. श्रीकांत बहुलकर यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या विविध

उपक्रमांची माहिती दिली. गोखले इन्स्टिट्यूटचे प्रा. प्रदीप आपटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. भांडारकर

संस्थेने 1920 ते 1966 या काळात महाभारताच्या चिकित्सित आवृत्तीचे 19 खंड प्रकाशित केले आहेत.

संस्थेने श्री देबरॉय यांचा सत्कार करण्यामधील औचित्य श्री फडके यांनी या प्रसंगी विशद केले. संस्थेच्या नियामक

मंडळाचे अध्यक्ष श्री. अभय फिरोदिया हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे विश्वस्त राहुल सोलापूरकर

यांनी आभार मानले. निबंधक डॉ. श्रीनन्द बापट यांनीसूत्रसंचालन केले.

unnamed

मिक्तातर्फे दुष्काळग्रस्त शेतक-यांना १ कोटीची मदत

0

मुंबई –
गेली ५ वर्षे दिमाखाने जोशपूर्ण वातावरणात दुबई, लंडन, सिंगापूर, मकाऊ अशा वेगवेगळ्या शहरांत साजरा झालेला कलर्स मराठी मिक्ता पुरस्कार या वर्षी ऑस्ट्रेलियात होणार असून,याबाबतची घोषणा करताना कलर्स मराठी मिक्तातर्फे दुष्काळग्रस्त शेतक-यांना अभय गाडगीळ यांनी १ कोटीची मदत या वेळी जाहीर केली.  या मिक्ता सोहळ्याचे नेतृत्व स्त्रीशक्तीकडे सुपूर्द करण्यात आले आहे. हा सोहळा मेधा मांजरेकर व दीपा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली साजरा होणार असून, महेश मांजरेकर निरीक्षकाच्या भूमिकेत असतील. ट्रॅव्हल पार्टनरची जवाबदारी वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील सांभाळनार आहेत .

12003296_916827011719131_4031925521333062374_n 12009645_916826981719134_2084740453276212839_n
या पुरस्कार सोहळ्याची अधिकृत घोषणा एका दिमाखदार समारंभात करण्यात आली. २६ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१६ ला हा सोहळा होणार असून, यंदाचा ‘गर्व महाराष्ट्राचा’ हा पुरस्कार डॉ. डी. वाय पाटील यांना देण्यात येणार आहे.
मनोरंजनासोबतच सामाजिक भान जपण्यावरही कलर्स मराठी मिक्ताचा भर आहे. यंदाची दुष्काळग्रस्त परिस्थिती लक्षात घेता मिक्ताने दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी मदतीचा हात पुढे करत समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी दाखवून दिली आहे. त्याचप्रमाणे रोटरी तर्फेही १ कोटीची मदत करण्यात येईल असे रोटरीच्या पदाधिका-यांनी या वेळेस जाहीर केले. अभय गाडगीळ पुढे म्हणाले गेली ५ वर्षे कलर्स मराठी मिक्ताने करमणुकीसोबतच सामाजिक कार्यसुद्धा केले आहे. गेल्या पाच वर्षामध्ये मिक्ताने क्षितीज या संस्थेस २० लाख रुपयाची मदत केलेली आहे. तसेच इतरही मदत सातत्याने करत आहोत. मिक्ताने केलेल्या सामजिक कार्याची माहिती चंद्रकांत कुलकर्णी यांनी याप्रसंगी उपस्थितीतांना दिली.

11754837_916826908385808_6795478058441395341_o

कलर्स मराठीचे प्रॉजेक्ट हेड अनुज पोद्दार म्हणाले, “गेल्या वर्षीपासून सुरु झालेला कलर्स मराठी व मिक्ताचा ऋणानुबंध हा केवळ एका सोहळ्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण मराठी मनोरंजन क्षेत्राच्या प्रगतीसाठी उचललेले हे मोठे पाउल आहे. मराठी मनोरंजन क्षेत्राला अधिक प्रगल्भ करून ख-या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी कलर्स मराठी मिक्ता कायम प्रयत्नशील असेल.”
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सहाव्या कलर्स मराठी मिक्ता २०१६च्या घोषणेप्रसंगी उपस्थित होते. ते म्हणाले, “महेशला चित्रपट चांगला कळतो त्यामुळे मीच त्याला सांगितले की या सोहळ्यातून थोडा वेळ काढून चित्रपट निर्मितीवर लक्ष दे, त्याप्रमाणे त्याने ५ वर्षाने मी पुन्हा चित्रपट निर्मितीवर लक्ष देईन असे मला आश्वासन दिले होते. त्यामुळेच यंदाच्या वर्षापासून महेश या सोहळ्याकडे जास्त लक्ष देणार नाही.  याचा अर्थ असा नव्हे की त्याला ‘जीवनगौरव’ दिला… त्याचे या सोहळ्याकडे लक्ष हे असेलच.”
कलर्स मराठी मिक्ता पूर्वरंग सोहळा आणि नाट्य महोत्सव २४ ते २७ डिसेंबर २०१५ दरम्यान होणार असल्याचे  सुशांत शेलार यांनी सांगितले. नेटके आयोजन, कलाकारांचं आदरातिथ्य, मनोरंजनाचे अनोखे नाविन्यपूर्ण कार्यक्रम या त्रिसूत्रीमुळे ‘कलर्स मराठी मिक्ता’ पुरस्कार सोहळ्यात यंदा नवीन काय असणार याची उत्कंठा सा-यांनाच आहे.

‘क्रीमस्टोन’ या नव्या आईस्क्रीम संकल्पनेचे पुण्यात आगमन बाणेरमध्ये पहिल्या आकर्षक आणि भव्य दालनाचे उद्घाटन

0

unnamed1 unnamed2 unnamed3 unnamed4 unnamed5

पुणे,  : ‘क्रीमस्टोन’ या वैशिष्ट्यपूर्ण आईस्क्रीम दालनाचे आज बाणेरमध्ये उद्घाटन झाले. हैद्राबादच्या ‘श्री श्रीनिवास डेअरी प्रॉडक्टस् प्रा. ली.’ कंपनीची ही संकल्पना पुण्यात ‘सुयश मार्ट प्रा. ली.’तर्फे पुण्यात फ्रँचायजी तत्वावर सुरु करण्यात आली असून, आज या पहिल्या दालनाचे उद्घाटन पुण्याचे पोलीस आयुक्त श्री. के. के. पाठक यांच्या झाले. ‘श्री श्रीनिवास डेअरी प्रॉडक्टस् प्रा. ली.’चे संचालक वीरेन शहा, ‘सुयश मार्ट प्रा. ली.’चे संचालक देवांग काबरा यावेळी उपस्थित होते.

‘क्रीमस्टोन’ची दक्षिण भारतामध्ये हैद्राबाद, चेन्नई, बंगळूरू, विझाग आणि विजयवाडा याठिकाणी दालने आहेत. पुण्यामध्ये प्रथमच सुरु करण्यात आलेले दालन, देशातील १९ वे दालन आहे. उत्कृष्ट चव आणि वैविध्य असणाऱ्या पुण्यातील या दालनामध्ये, आईस्क्रीमचा आस्वाद घेण्यासाठी खास आल्हाददायक व्यवस्था करण्यात आली आहे.

पुण्यामध्ये अनेक आइस्क्रीम दालने ही ‘ओव्हर-द-काउंटर’ (ओटीसी) केंद्रे आहेत. मात्र ‘क्रीमस्टोन’चे बाणेर येथील दालन २५०० चौरस फूट इतक्या प्रशस्त जागेमध्ये उभारण्यात आले असून, आईसक्रीम खाण्याचा एक वेगळा आनंद याठिकाणी मिळू शकेल. याचबरोबर उत्तम आणि प्रशिक्षित कर्मचारी ग्राहकांना आईसक्रीमची माहिती आणि विनम्र सेवा देण्यासाठी सुसज्ज आहेत. ग्राहकांना या दालनामध्ये गप्पा आणि विरंगुळ्याबरोबर आईसक्रीमचा खास आनंद घेता येऊ शकेल.  ‘ब्राऊनीज’, ‘कुकीज’, ‘चॉकोलेट, ‘पेस्ट्रीज’, ‘सिरप, बिस्किटे’ आणि ताजी फळे यांचा सुयोग्य संगम करून परिपूर्ण मिश्रणातून, ‘क्रीमस्टोन’मध्ये विविध प्रकारचे आइस्क्रीम फ्लेवर्स तयार करण्यात येते. यांतील अनेक साहित्याची निर्मिती ‘क्रीमस्टोन’द्वारेच केली जाते किंवा आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ब्रँड कडून आयात केले जाते. त्यामुळे येथील आईस्क्रीम हे केवळ आईस्क्रीमचा एक वेगळा प्रकार न राहता, पूर्णपणे नवीन संकल्पना म्हणून पुढे येते. हैद्राबादचा ‘श्री श्रीनिवास डेअरी प्रॉडक्टस् प्रा. ली.’ हा भारतातील एक प्रीमियम ब्रँड आहे. त्यांचा ‘स्कूप’ हा ब्रँड दक्षिण भारतातील खवैय्यांमध्ये अनेक वर्षांपासून अतिशय प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या आणि अनोख्या कल्पनांमुळे या ब्रँडचे बाजारामध्ये वर्चस्व आहे.  ‘बोन्साय’ आणि ‘सायकॉलॉजी’ हे मुलांमध्ये आवडते असणारे अग्रगण्य ब्रँड ही ‘सुयश मार्ट प्रा. ली.’ची उत्पादने असून,  त्यांची कार्यक्षमता आणि स्थानिक बाजारपेठेतील पकड याची ‘क्रीमस्टोन’ला नक्केच मदत होईल. पुण्यातील ‘क्रीमस्टोन’चे दालन बाणेर रस्त्यावर, ‘हॉटेल ग्रीन पार्क’च्या समोर उभारण्यात आले असून, हे दालन सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत आठवड्यातील सातही दिवस ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.

‘लालबागच्या राजा’कडून 25 लाखांची मदत; क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेचे मुख्यमंत्री निधीसाठी पाच लाख

0

मुंबई : आपल्या कौशल्यपूर्ण खेळीने भारतीय क्रिकेट संघासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने सोमवारी आपल्या राज्यासाठीही एक अनोखे योगदान दिले. मातृभूमीप्रती सहृदयता आणि जाणि‍वेचे दर्शन घडविताना अजिंक्यने राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी पाच लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली. याशिवाय लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळानेही दुष्काळग्रस्तांसाठी 25 लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.

11224055_559779980841605_5555991476203059665_n 12002805_559778970841706_2776333864869956544_n

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरत आहेत. त्यामुळे या योजनेसाठी सामाजिक उत्तरदायित्त्वाच्या भावनेने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये योगदान देण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. या आवाहनाला सोमवारी अनोखा प्रतिसाद मिळाला. भारतीय क्रिकेट संघाची धुरा सांभाळणारा महाराष्ट्राचा सुपुत्र अजिंक्य रहाणे याने सोमवारी मुख्यमंत्र्यांकडे स्वयंस्फूर्तीने पाच लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द केला. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या भेटीत अजिंक्यने दुष्काळग्रस्तांबाबत आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या. श्रीलंका दौऱ्यानिमित्ताने महाराष्ट्राबाहेर असलो तरी राज्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती वाचून अस्वस्थ होत होतो. सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेने राज्यातील बांधवांना मदत केली पाहिजे, या जाणि‍वेने मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी अजिंक्यने सांगितले.
या मदतीबाबत आभार मानताना मुख्यमंत्री म्हणाले, अजिंक्यची मदत अतिशय मोलाची असून समाजाला विधायकतेची प्रेरणा देणारी आहे. विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी सरकारच्या सामाजिक उपक्रमात अशा पद्धतीने सहयोग दिल्यास समाजासमोर सकारात्मकतेचा आदर्श उभा राहू शकेल. तसेच ही कृती आपद्ग्रस्तांना मोठा दिलासा देण्यासह भावनिक आधार निर्माण करणारी आहे. याच पद्धतीने समाजातील इतर प्रमुख व समर्थ घटकांनी मदतीचा हात पुढे केल्यास राज्यासमोरील संकटाचे निवारण अधिक वेगाने होऊ शकेल, असेही ते म्हणाले.

झाले … राष्ट्रवादीचे जेलभरो आंदोलन … आता ?

0

 

12004693_1023226911042639_7025497181312065976_n

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने आज राज्यभरात विविध ठिकाणी जेलभरो आंदोलन करण्यात आले आज मोठ्या उत्साहाने जोरदारपणे हे आंदोलन झाले पण आता पुढे … ? असा प्रश्न उरतोच आहे .
आज जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात जालना-वडीगोद्रि महामार्गावर जेलभरो‬ आंदोलनाचे नेतृत्व पुण्यातील खा. सुप्रिया सुळे यांनी केले . दुष्काळी परिस्थितीकडे डोळेझाक करणाऱ्या सरकारला जाग आणण्यासाठी मराठवाड्यात हे आंदोलन केले  .

12009838_1023226794375984_3639576041770685935_n

12009763_1023226741042656_2815328939032155783_n
नांदेड शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कलामंदिर येथे माजी मंत्री अनिल देशमुख  यांच्या नेतृत्वाखाळी रास्ता रोको आंदोलन व जेलभरो आंदोलन करण्यात आले.

12003232_599385290199305_6937300743322050623_n

यावेळी शहराध्यक्ष डॉ. सुनिल कदम, जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर, कार्याध्यक्ष दत्ता पवार आणि सभापती सविता कंठेवाड यांनी सहभाग घेतला होता. नांदेडमधील लोहा-कंधार मतदारसंघातील दहा हजाराहून अधिक शेतकरी आंदोलकांना तसेच  आ. शंकरअण्णा धोंडगे यांना  अटक करण्यात आली. तसेच लोहामधीलच सोनखेड गावी जि.प. उपाध्यक्ष आणि कृषी सभापती दिलीप धोंडगे यांच्या नेतृत्वाखालीही  रास्ता रोको, जेलभरो आंदोलन करण्यात आले.

jaydatta
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ उपनेते जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौक, बीड येथे जेलभरो आंदोलन झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, सय्यद सलीम, उषा दराडे आणि सुभाष राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच प्रदेश सरचिटणीस आणि आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाळी रा.म. २११ येथे उमापूर फाट्याजवळ हजारो शेतकऱ्यांनी बैलगाड्यांसह आंदोलन केले. जि.प. सभापती विजयसिंह पंडित यांनाही भेंड टाकळी फाटा येथे हजारो कार्यकर्त्यांसहीत स्वतःला अटक करून घेतली. आष्टी तालुक्यातील खडकत चौकामध्ये माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्या दोन तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तसेच शिरूर कासार तालुक्यात मेहबुब शेख यांनी आंदोल केले

hingoli
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष मुनिर पटेल आणि तालुकाध्यक्ष संजय दराडे यांच्यासह हजारो कार्यकर्ते आज महामार्गावर ‪‎जेलभरो‬ आंदोलन करत होते. तब्बल पाच तास तीनही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. मधल्या काळात थोडा पाऊस झाला तरी कार्यकर्ते अटक झाल्याशिवाय मार्गावरून हटले नाहीत. दरम्यान शशिकांत शिंदेंसह सर्व कार्यकर्त्यांना अटक करून सोडून देण्यात आले.

parbhani
परभणी जिल्ह्यातील विसावा फाटा येथे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि सरचिटणीस उमेश पाटील यांनी बैलगाडीवर स्वार होऊन जेलभरो आंदोलनाचे नेतृत्व केले. धनंजय मुंडे यांनी स्वतः रस्त्यावर बसून दिशाहीन सरकारविरोधी घोषणाबाजी केली. यामुळे जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह आणि सरकारविरोधी प्रचंड अंसतोष एकाच वेळी पाहायला मिळत होता. यावेळी प्रताप देशमुख, स्वराजसिंह परिहार आणि प्रचंड संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

दिलीप वळसे
विधानसभेचे माजी अध्यक्षदिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाड गावातील जालना-औरंगाबाद मार्गावर आंदोलन करण्यात आले
पाच हजार माणसे, शेकडो बैलगाड्या आणि जनावरे घेऊन आंदोलन सुरू झाले . सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झालेल्या आंदोलनाला उत्तरोत्तर प्रतिसाद वाढत गेला . मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, पांडुरंग तागंडे, पुंडलिक आंभोरे, अभिजीत देशमुख, माजी आमदार किशोर पाटील आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते .

डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूटच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त उर्दू साहित्यावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

0
पुणे :
 ‘डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूटच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त इन्स्टिट्यूट आणि ए.आर.एस.इनामदार लायब्ररीच्या वतीने पुण्यात आझम कॅम्पस येथे एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
उर्दू साहित्यावरील ही कार्यशाळा शनिवारी पार पडली. प्रा. इश्तियाक झिली, शमीम तारिक, डॉ. सलीम शेहजाद, आबेदा इनामदार यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. मुमताझ सय्यद, उझ्मा तस्निम, शाहिदा सय्यद यांनी संयोजन केले. उर्दू वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल अंजुमन-इ-खैरूल इस्लाम’ संस्थेला गौरविण्यात आले.