Home Blog Page 3548

खानावळीवर अवलंबून असलेल्या पुण्यातील विद्यार्थ्यांना दर रविवारी सायंकाळी १५ रुपयात पोटभर जेवण ! — शिवसंग्राम विद्यार्थी संघटनेचा चा उपक्रम

0

पुणे :

ग्रामीण भागातून आलेल्या आणि खानावळीवर अवलंबून असलेल्या पुण्यातील  विद्यार्थ्यांना रविवारी १५ रुपयात पोटभर जेवण देण्याचा अभिनव उपक्रम  शिवसंग्राम विद्यार्थी आघाडी  तर्फे या रविवार पासून (दि  ११ ऑक्टोबर २०१५ ) पासून सुरु होत आहे .

शिवसंग्राम विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शैलेश सरकटे ,संपर्क प्रमुख तुषार काकडे यांनी हि माहिती दिली . पुण्याच्या नवी पेठ भागातील (शास्त्री रस्ता ) धर्मवीर संभाजी विद्यालय (मनपा शाळा क्रमांक १७ ) येथे हा उपक्रम प्रायोगिक स्वरुपात सुरु होणार आहे

शिवसंग्राम चे अध्यक्ष आमदार  विनायक मेटे यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे .

या वेळेस  ८०० जणांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे . पोळी भाजी ,वरण भात ,गोड पदार्थ यांचा या ‘पोटभर जेवणात ‘ समावेश आहे .

खानावळी रविवार सायंकाळी बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैर सोय होते . आणि महाग जेवणाकडे वळावे लागते .

बरोबर एक महिन्यापूर्वी घटक पक्षांच्या विद्यार्थी हक्क परिषदेत शैलेश सरकटे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा  रास्त दरातील भोजनाचा प्रश्न मांडला होता . राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांनी या प्रश्नांचे आणि गरजेचे रुपांतर उपक्रमात करावे यासाठी शैलेश सरकटे यांना प्रोत्साहन दिले . शैलेश सरकटे ,दीपक बिडकर ,अमित शिंदे यांच्या अनेक बैठ्कातून  नियोजन करत  ११ ऑक्टोबर पासून हा उप्रकम पुण्यात प्रत्यक्षात येत आहे .

आताही खानावळीवर अवलंबून असणाऱ्या शैलेश सरकटे ,अमित शिंदे यांनी  आणि विद्यालयीन काळात असाच अनुभव घेतलेल्या दीपक बिडकर यांनी चर्चेतून या उपक्रमाला आकार दिला . शिवसंग्राम चे अध्यक्ष विनायक मेटे यांनीही विद्यार्थ्यानच्या धडपडीचे कौतुक केले . रासप अध्यक्ष आमदार महादेव जानकर यानाही निमंत्रित करण्यात आले आहे

‘राजकीय संघटना केवळ प्रश्न मांडून थांबत नाहीत ,तर उत्तरेही शोधतात ,हे सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुण्यातील होस्टेल वर पत्रके वाटून माहिती देण्यात आली आहे . यावेळी विद्यार्थ्यांनी प्रकल्पाचा अभ्यास करून,वर्गणी काढून हा प्रायोगिक उपक्रम सुरु केला आहे . पुढील रविवार पासून तो स्थायी स्वरुपात यावा ,साठी समाजातील देणगीदारांनी पुढे यावे   ‘ असे आवाहन  शैलेश सरकटे यांनी केले.

स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्यात प्राधान्यक्रम; मत नोंदणीकरिता महाविद्यालयांकडून उस्फूर्त प्रतिसाद

0

पुणे-

स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्याकरिता विद्याथ्र्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

महाविद्यालयांच्या स्तरावरुन विद्याथ्र्यांना मार्गदर्शन व माहिती देण्याकरिता व त्यांचा मोठ्या प्रमाणावर

दुसèया टप्प्यात सहभाग वाढविण्यासाठी सेनापती बापट रस्त्यावरील पर्सिस्टंट सिस्टिम्स लिमिटेड येथील

देवांग मेहता हॉलमध्ये शहरातील विविध महाविद्यालयांचे संस्थाचालक, प्राचार्य, संचालक, उपप्राचार्य

यांचेकरिता पुणे महानगरपालिकेच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्मार्ट सिटी संदर्भात विविध टप्प्यांबाबत

माहिती दिली. तसेच शहराच्या विकासाकरिता अंतिम टप्प्यातील ६ क्षेत्राशी निगडीत अर्थात वाहतूक व

दळणवळण, पाणीपुरवठा व मलनिसा:रण, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण व शाश्वत उपाय, सावधानता व

सुरक्षितता, उर्जा व वीजपुरवठा या क्षेत्रांना अनुसरुन करावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित

करणेकरिता नागरिकांच्या मतांनुसार प्राधान्यक्रम निश्चित केला जाईल. आलेल्या प्राधान्यक्रमांना त्या त्या

क्षेत्रातील तज्ञ, मार्गदर्शक, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, मनपातील अधिकारी, प्रस्तावाच्या अनुषंगाने विचार

विनिमय करुन सदरचा प्रस्ताव अंतीमत: तयार करुन राज्यशासनामार्फत केंद्रशासनाकडे जाईल. यास्तव

अधिकाधिक नागरिक, विद्यार्थी, विविध घटकांनी आपले मतं नोंदविणे आवश्यक आर्हे.

www.punesmartcity.in या संकेतस्थळावर सविस्तर माहिती मिळेल असे त्यांनी सांगितले.

या संदर्भात उपस्थितांनी विचारणा केलेल्या विविध प्रश्न, शंका याबाबत मा. महापालिका आयुक्त

कुणाल कुमार यांनी सविस्तर शंका निरसन केले. यापूर्वीच्या टप्प्यात प्राप्त होत असलेली माहिती

संगणकामध्ये नोंदीकरिता कमी वेळातील अतिशय अवघड काम होते व गणेश चतुर्थी ते अनंतचतुर्दशी

पर्यंत अहोरात्र काम आझम कॅम्पस, राजीव गांधी ई लर्निंग व एनएसएसच्या विद्याथ्र्यांनी व मनपा

कर्मचाèयांनी मोठ्या प्रमाणात कष्ट घेतल्याचे सांगितले.

सिम्बॉयसिसमधील २५ विद्यार्थी स्मार्ट सिटी  कामाकरिता अंतिम

टप्प्यापर्यंत सातत्याने कार्यरत रहाणार

स्मार्ट सिटी प्रस्ताव पुणे मनपाच्या वतीने अंतिमत: तयार करेपर्यंत qहजवडी येथील सिम्बॉयसिस

इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट महाविद्यालयातील २५ विद्यार्थी पूर्ण सेवाभावी वृत्तीने स्मार्ट सिटी कामाकरिता

अहोरात्र कार्यरत रहाणार असून या कालावधीमधील त्यांच्या परिक्षा यापूढील काळात घेण्यात येणार

असल्याचे सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या संचलिका डॉ. प्रतिमा शेवरे यांनी सांगितले तसेच

संस्थेच्या वरिष्ठ प्रतिनिधी डॉ. विद्या येरवडेकर यांनी याकरिता तातडीने मान्यता दिल्याचे सांगितले.

याप्रसंगी भारती विद्यापीठछ, ब्लॉसम पब्लिक स्कुल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, नवलमल फिरोदिया लॉ

कॉलेज, श्रीमती काशिबाई नवले कॉलेज, बीव्हीएयू, आरएमइडी,  गरवारे महाविद्यालय, आयएमसीसी,

एमयुएचएस विद्यापीठ, फग्र्युसन कॉलेज, बी एन कॉलेज, बीएमसीसी महाविद्यालय, सिम्बॉयसिस, जयवंत

इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट, राजाश्री शाहू कॉलेज, जयवंत इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, सुर्यदत्ता इन्स्टिट्युट,

जेएसपीएस बीएड कॉलेज व जेआयसीए, आदित्य इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट, भिवराबाई सावंत

महाविद्यालय, आझम कॅम्पस, नानावटी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट, इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग एज्यकेशन,

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आयुर्वेदिक, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय, संचेती कॉलेज ऑफ

फिजिओथेरपी, सीएमएफएस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, महर्षी कर्वे संस्था, साधू वासवानी कॉलेज, डी वाय

पाटील डेंटल स्कूल, कॉटिल्य इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट, शिवछत्रपती कॉलेज, बी व्ही व्ही डेंटल कॉलेज,

राजीव गांधी इन्स्टिट्युट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, एस डी सी एच, qसहगड डेंटल कॉलेज, अ‍ेएफएमसी, एम

ए रंगुनवाला डेंटल कॉलेज, विश्वकर्मा मॅनेजमेंट अशा विविध संस्थातील सुमारे ७० पेक्षा अधिक मान्यवर

उपस्थित होते.

‘ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग’ शिबिरामध्ये 91 महिलांनी घेतला तपासणीचा लाभ

0
 
पुणे :
खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ‘चेंजमेकर्स’ या उपक्रमा अंतर्गत ‘ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप’ लायन्स क्लब ऑफ पुणे, सहकारनगर आणि ‘रोटरी क्लब मिड टाऊन, सेन्ट्रल’ यांच्या एकत्रित सहकार्याने तसेच चेंजमेकर्सच्या वतीने आयोजित या शिबिरामध्ये एकूण 91 महिलांनी तपासणीचा लाभ घेतला.
शिबिराचे संयोजन वीरा विशाल घाटगे, शितल घाटगे आणि चेतना सिंग यांनी केले होते.
 पर्वती दर्शन, सहकारनगर येथे झालेल्या या शिबिरामध्ये ब्रेस्ट कॅन्सरची पूर्व तपासणी व त्याबाबत महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली. माधवबागच्यावतीने ‘हार्ट चेकअप’ करण्यात आले. ज्या महिलांना पुढील तपासणीची गरज असेल त्यांची ही तपासणी मोफत करून देण्याची सोय करून देण्यात आली.

‘दगडाबाईची चाळ’ चित्रपट 23 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार

0

जय भोले फिल्म्स प्रॉडक्शन यांची निर्मिती असलेला 23 ऑक्टोबर 2015 रोजी प्रदर्शित दगडाबाईची चाळ’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी विनोदाची खास मेजवानी ठरणार आहे. जिलेबीवाला या भूमिकेत असलेला हिंदीतील अभिनेता राजपाल यादव या चित्रपटाचे महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे. या चित्रपटाचे निर्माते दत्तात्रय भागुजी हिंगणे आहेत. सुनील वायकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘दगडाबाईची चाळ’ या चित्रपटाची कथा-पटकथा स्वत: वायकर यांनीच लिहिल्याने चित्रपट नक्कीच गमतीदार आणि चांगला आशयाचा झाला आहे.

‘दगडाबाईची चाळ’ हे नाव सामान्य वाटत असले तरी यातील प्रत्येक दिवसाच्या प्रसंगानुसार घडत जाणारा विनोद प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. परळ येथील एका चाळीची मालकीण असलेली दगडाबाई आणि त्या चाळीतील भाडोत्री यांच्यावर बेतलेला हा चित्रपट असून चाळीतले नातेसंबंध दाखविण्याचाही प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

आपल्या दमदार विनोदी अभिनयाद्वारे लोकांच्या घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री विशाखा सुभेदार या चित्रपटात दगडाबाई ही प्रमुख भूमिका साकारत आहेत. त्याचजोडीला आपल्या अतरंगी विनोदी सेन्ससाठी प्रसिद्ध असलेला भूषण कडूकमलाकर सातपुतेमाधवी जुवेकरजॉनी रावतकिशोर चौघुले संतोष चोरडिया यांनीही निरनिराळ्या व्यक्तिरेखा चित्रपटात साकारल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या ‘खडूस’ व्यक्तिरेखेद्वारे अल्पावधीत लोकांच्या मनात स्थान निर्माण करणारे सुनील गोडबोले हेही या चित्रपटात असून ती चित्रपटाची जमेची बाजू ठरेल. प्रत्येक दिवसाच्या विनोदाबरोबरच दगडाबाईच्या आयुष्यात आलेले कठीण प्रसंग, आर्थिक अडचणी आणि त्यावर दगडबाई कशा पद्धतीने मात करते  त्याचबरोबर अचानक दगडाबाईच्या दोन पुतण्या गायब झाल्याने तिच्या अडचणीत अधिकच भर पडते. या अडचणींवर दगडाबाई मात करते की नाही ? यासाठी हा चित्रपट पाहायलाच हवा.

चित्रपटाचे संगीत केदार पंडितअजयअद्वैत यांनी केले असून गाण्यांचे बोल नचिकेत जोग यांनी लिहिले आहेत. वैशाली सामंतस्वप्नील बांदोडकरआदर्श शिंदेयोगिता गोडबोलेशलाका चांदवडकर आणि प्रतिभा थोरात या गायक-गायिकांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत.

 

 

‘हटवा हटवा भाजपचा डीपी हटवा’, ‘वाचवा वाचवा पुणे शहराला वाचवा ;’ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोर्चा

0
पुुणे :
शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करताना राज्य सरकारच्या त्रिसदस्य समितीने भविष्याचा विचार करून नियोजन केलेले नाही याचा निषेध म्हणून खासदार वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आज दिनांक 9 ऑक्टोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन ते विभागीय आयुक्त कार्यालय येथे काढण्यात आला.
महसुल उपायुक्त ज्योतिबा पाटील यांना विधान भवनात खासदार वंदना चव्हाण यांनी विकास आराखडयाच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध करणारे पत्र पक्षाच्या वतीने दिले.
मोर्चामध्ये ‘नही चलेगी, नही चलेगी बीजेपी की हुकूमशाही नही चलेगी !’, ‘डी पी आमच्या हक्काचा नाही कुठल्या पक्षाचा’, ‘हटवा हटवा भाजपचा डीपी हटवा’, ‘वाचवा वाचवा पुणे शहराला वाचवा’, ‘विकासाचा संकुचित विचार करण्या बीजेपी सरकारचा धिक्कार असो’ अशा प्रकारच्या घोषणांचे फलक हाती धरून कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी घोषणा दिल्या.
या मोर्चामध्ये खासदार, शहराध्यक्ष अ‍ॅड. वंदना चव्हाण, महापौर दत्तात्रय धनकवडे,  स्थायी समिती अध्यक्ष अश्‍विनी कदम, सभागृह नेते बंडू केमसे, अंकुश काकडे, चेतन तुपे, प्रदेश सरचिटणीस अशोक राठी, बापू पठरे, मोहनसिंग राजपाल, माजी आमदार कलम ढोले-पाटील, अनिल भोसले, माजी महापौर चंचला कोद्रे, माजी उपमहापौर दीपक मानकर, माजी महापौर वैशाली बनकर, अ‍ॅड म.वि.अकोलकर, रूपाली चाकणकर, मनाली भिलारे, पद्मा कांबळे, श्‍वेता होनराव, नंदा लोणकर, आनंद रिठे, इक्बाल शेख, राकेश कामठे, नितीन उर्फ बबलू जाधव, मीनल सरवदे, डॉ. सुनीता मोरे, रजनी पाचंगे, सर्व सेलचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिकेतील सत्ताधारी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या ताब्यात असलेला डीपी राज्य सरकारने ताब्यात घेतला. या आराखड्यात शहरातील उद्याने, क्रीडांगणे, आरोग्य, शाळांची आरक्षणे वगळली आहेत. परिणामी शहराच्या विकासाला हा आराखडा मारक ठरणार असल्याने राज्य सरकारच्या मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या या कृती विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता.

विद्यापीठ रस्त्यावरील १०० झाडे वाचल्याचे स्वागत

0

 

पुणे :
पुणे विद्यापीठ चौकातील रस्ता रुंद करण्यासाठी १०५ वृक्षांपैकी १०० वृक्ष वाचविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याबद्दल ‘सेव्ह पुणे हिल्स इनीशिएटिव्ह’ च्या वतीने स्वागत करण्यात आले आहे .’सेव्ह पुणे हिल्स इनीशिएटिव्ह’च्या वतीने अध्यक्ष दीपक बिडकर आणि सचिव ललित राठी यांनी पत्रकाद्वारे स्वागत केले. हे वृक्ष वाचविण्यासाठी या संस्थेसह खासदार अनिल शिरोळे, नागरिकांनी आक्षेप, हरकती नोंदविल्या होत्या . आंदोलन केले होते .
अजूनही बर्याच वृक्ष तोडी विचार न करता केल्या जात असल्याने प्रत्येक वृक्ष तोडीच्या प्रस्तावावेळी नोटीस काढली जावी आणि नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात असे आवाहन ‘वृक्षम’ या स्वयंसेवी गटाचे मार्गदर्शक विनोद जैन यांनी केले आहे .
rsz_1logo-for-portal

“रेड” चित्रपटाचा टीझर प्रदर्शित!! “रेड” ह्या हॉलीवूड चित्रपटाचे मराठीत डबिंग होणार!!

0

नंदिता सिंघा (मिशेल ) यांच्या ‘रेड ‘ चित्रपटाचा टीझर हा महात्मा गांधींचे अहिंसक तत्वज्ञान पाळणाऱ्या क्राईम रिपोर्टर अर्थात गुन्हा अन्वेषण पत्रकारांच्या श्रेष्ठत्वाला समर्पित करत आहोत . ह्या हॉलीवूड सिनेमाचा हा टीझर जगभरातील लाखो लोकांनी बघितला असून त्याला सर्व जगभरातून प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. आता आम्ही तुमच्याशी ‘रेड ‘ या चित्रपटाचे फर्स्ट लुक पोस्टर शेअर करणार आहोत .
गुजरात म्हणजे महात्मा गांधी यांची भूमी . तेथील दहा गुन्हा अन्वेषण पत्रकारांना जे डे खून खटल्यातील खरे गुन्हेगार कोण आणि त्यांचा त्यामागील नेमका हेतू काय होता हे जगापुढे आणायचे आहे. गुजरात मध्ये इतर सुद्धा काही सामाजिक समस्या आहेत . त्या समस्या या पोलिसांकडून किंवा कोणत्याही न्यायव्यवस्थेकडून सोडवल्या गेलेल्या नाहीत . त्या समस्या सोडवल्या जाण्यासाठी हे पत्रकार प्रयत्न करत आहेत ,त्या संदर्भात ते स्वतः कार्यरत आहेत .
गुन्हेगारी पत्रकारिता या विषयावर नंदिता सिंघा ( मिशेल ) यांनी दिग्दर्शिका या नात्याने आतापर्यंतचे  पाच चित्रपट केले आहेत. या विषयावर सर्व पाच चित्रपट करणाऱ्या त्या पहिल्या  भारतीय महिला दिग्दर्शिका आहेत . त्या म्हणतात ,”फर्स्ट लुक पोस्टर च्या माध्यमातून गुन्हेगारी पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या पत्रकारांच्या नेमक्या भावना काय असतात हे मला समाजापुढे आणायचे आहे. गुन्ह्यावर आधारित गोष्टीला जर खरा न्याय द्यायचा असेल तर एखाद्या पत्रकाराला सुद्धा प्रथम गुन्हेगाराच्या आणि नंतर क्राईम रिपोर्टर च्या भूमिकेतून विचार करावा लागतो. कारण अशा गोष्टी म्हणजे मनोभूमिका ,भावना ,गुन्हा करण्यामागचा हेतू ,कबुली जबाब आणि अनेक गोष्टींचे मिश्रण असते . यात जे कथानक असते त्या कथानकाने क्राईम डिरेक्टर अर्थात दिग्दर्शक या भूमिकेतून नेमकी पकड घ्यायला हवी . तेच खरे आव्हानात्मक असते. गुन्हेगारी विश्व चित्रित करताना पटकथा आणि संवाद खूप महत्वाची भूमिका बजावतात . मी कथा आणि पटकथा यावर लक्ष केंद्रित करते . त्यामुळे प्रेक्षक शेवटपर्यंत खिळून राहतील आणि त्यांचे मनोरंजन देखील होईल
“रेड” ह्या हॉलीवूड सिनेमाचे डबिंग हे मराठी, हिंदी तसेच इतर काही प्रादेशिक भाषांमध्ये ही करण्यात येणार आहे. लवकरच जे. डे. ह्याच्या जीवनावरील सिनेमा नंदिता सिंघा (मिशेल ) तयार करणार असून हा सिनेमा खास करून मराठीत तयार होणार आहे.

नव्या बांधकामाच्या ठिकाणी वीजयंत्रणेसाठी जागा आरक्षित ठेवा पालकमंत्री बापट यांचे निर्देश

0

पुणे: नवीन निवासी, व्यापारी संकुलाच्या किंवा उद्यानांसारख्या सार्वनजिक जागेत महावितरणच्या

वीजयंत्रणेसाठी आवश्यक असणारी जागा आरक्षित करावी, असे निर्देश पालकमंत्री गिरीश बापट यांनी

विधानभवन येथे पुणे जिल्हा विद्युत समितीची बैठक झाली. जिल्हा विद्युत समितीचे अध्यक्ष खासदार श्री.

शिवाजीराव आढळराव पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते तर पालकमंत्री गिरीश बापट,

जिल्हाधिकारी श्री. सौरभ राव, आमदार श्री. विजय काळे, आमदार श्री. भीमराव तापकिर, आमदार श्री. जगदीश

मुळीक, आमदार माधुरीताई मिसाळ, आमदार सौ. मेधा कुलकर्णी, आमदार श्री. गौतम चाबुकस्वार, आमदार श्री.

राहुल कुल, महावितरणचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे (पुणे परिमंडल) व श्री. नागनाथ इरवाडकर (बारामती

परिमंडल), महापारेषणचे मुख्य अभियंता श्री. रोहिदास मस्के आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. बापट म्हणाले, की बांधकामे किंवा सार्वजनिक उद्याने तयार झाल्यानंतर वीजयंत्रणेसाठी

जागा दिली जाते. त्यांनतर उभारलेली वीजयंत्रणा सुरक्षित व योग्य जागेत नसल्याने धोका निर्माण होतो. त्यामुळे

नवीन बांधकामाच्या ठिकाणी वीजयंत्रणेसाठी जागा आरक्षीत करावी. तसेच शहरातील अनधिकृत वस्त्यांना

महावितरणने अधिकृत वीजजोड देण्याबाबत धोरण स्पष्ट करावे आणि महापालिकेने वीजजोडणी देण्यास हरकत

घेतली असल्यास समन्वयातून तोडगा काढण्यात यावा असे श्री. बापट यांनी सांगितले.

या बैठकीत मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी सादरीकरणातून महावितरणच्या विविध योजनांची

तपशिलवार माहिती दिली. यात पुणे जिल्ह्यासाठी एकात्मिक उर्जा विकास कार्यक्रम (Integrated

Power Development Scheme) भाग एकमध्ये 233 कोटी 66 लाख व भाग दोनमध्ये

49 कोटी 16 लाख तसेच दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना भाग एकमध्ये 99 कोटी 65 लाख व भाग

दोनमध्ये 156 कोटी 94 लाख रुपये प्रस्तावित आहेत. एकात्मिक उर्जा विकास कार्यक्रम (आयपीडीएस) व

दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेच्या पहिल्या भागातील कामे व निधी मंजूर झाल्याची माहिती मुख्य

अभियंता श्री. मुंडे यांनी दिली. पुणे शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महावितरणकडून तयार करण्यात

आलेल्या सुमारे 200 कोटींच्या प्रस्तावित आराखड्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

या बैठकीत जिल्ह्यातील आमदारांनी केलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीबाबत तसेच वीजग्राहकांच्या तक्रारी

निवारणाबाबत त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा विद्युत समितीचे अध्यक्ष खासदार श्री. शिवाजीराव

आढळराव पाटील यांनी दिले. बैठकीचे सूत्रसंचालन कार्यकारी अभियंता श्री. आनंद रायदूर्ग यांनी केले.

महावितरण व महापारेषणचे जिल्ह्यातील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अधिकारी उपस्थित होते.

स्व. विठ्ठल हनमघर यांच्या चतुर्थ स्मरणार्थ दिनानिमित रक्तदान शिबिरात ४३८ पिशव्या रक्तसंकलित

0

unnamed1

दत्तवाडीमधील विठ्ठल हनमघर फाऊडेशनच्यावतीने स्व. विठ्ठल हनमघर यांच्या चतुर्थ स्मरणार्थ दिनानिमित ” भव्य रक्तदान शिबिराचे ” आयोजन करण्यात आले होते .या रक्तदान शिबिरात ४३८ पिशव्या रक्तसंकलित करण्यात आले .  दत्तवाडीमधील एस. एस. अग्रवाल शाळेमध्ये झालेल्या शिबिराचे उद्घाटन महापालिका सभागृह नेते शंकर उर्फ बंडू केमसे यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले . यावेळी खासदार वंदना चव्हाण ,आमदार जयदेवराव गायकवाड , राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे विठ्ठल हनमघर फाऊडेशनचे कार्याध्यक्ष नगरसेवक विनायक हनमघर , अध्यक्ष आनंद रिठे , नगरसेवक विकास दांगट , राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर , गणेश घोष , धीरज घाटे , दयानंद इरकल , नगरसेवक दिनेश धाडवे ,दत्तवाडी पोलिस ठाण्याचे  वरिष्ठ पोलिस निरीषक श्रीधर जाधव , पोलिस निरीषक स्मिता जाधव, पोलिस निरीषक दत्ताजीराव मोहिते  आदी मान्यवर उपस्थित होते .

या रक्तदान शिबिरात दिनानाथ मंगेशकर रुग्णालय , ससून सर्वोपचार रुग्णालय , पी. एस. आय . ब्लड बँक या रक्तपेढीनी रक्त संकलित करण्यात आले . या रक्तदान शिबिराचे आयोजन  विठ्ठल हनमघर फाऊडेशनचे कार्याध्यक्ष नगरसेवक विनायक हनमघर व विठ्ठल हनमघर फाऊडेशनचे अध्यक्ष आनंद रिठे यांनी केले .

मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांच्या विशेष प्रयत्नातून राज्याच्या 254 शहरांतील वीज यंत्रणेचे सक्षमीकरण, पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील पालिकांचा समावेश

0

पुणे : केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत राज्याच्या 254 शहरांतील वीज यंत्रणेचे

सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री

चंद्रशेखर बावनकुळें यांच्या विशेष प्रयत्नांमुळें या योजनेची राज्यात अंमलबजावणी होत आहे.

या योजनेत पुणे परिमंडलातील पुणे, पिंपरी चिंचवड, तळेगाव दाभाडे, लोणावळा, आळंदी, जुन्नर या

शहरांसह खडकी, देहू रोड व पुणे कन्टोंनमेंट बोर्डांचा समावेश करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत (Integrated Power

Development Scheme) राज्याला सुमारे अडीच हजार कोटी रुंपयांचा निधी मिळंणार असून

त्याद्वारे वीज वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण, वीजहानी व वाणिज्यिक हानी कमी करणे आणि शहरी

भागासोबतच ग्रामीण भागातील ग्राहकांना 24 x 7 वीजपुरवठा मिळांवा यासाठी वीज यंत्रणेचे सक्षमीकरण

करण्यात येणार आहे.

या योजनेमध्ये मुंबईतील बेस्टसह महावितरणच्या 44 मंडल कार्यालयांचा समावेश करण्यात आलेला असून

2011 च्या जनगणनेनुसार 5 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये या योजनेतील कामे होणार

आहेत.  या योजनेमध्ये 33 किव्होची 128 नवीन उपकेंद्रे उभारण्यात येणार असून 60 उपकेंद्रांची क्षमतावाढ

करण्यात येणार आहे.  त्याचप्रमाणे सुमारे 3 हजार 778 कि.मी. च्या उच्चदाब तर 3 हजार 151 कि.मी.च्या

लघुदाब वाहिन्या उभारण्यात येणार आहेत.  याशिवाय या सर्व भागांत 6,060 नवीन वितरण रोहित्रे उभारण्यात

येणार आहेत.

लोकोपयोगी आरक्षणे उठवू नयेत : खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण – विभागीय आयुक्त, नगर विकास संचालक आणि पालिका आयुक्तांना पत्र

0
पुणे :
जुन्या पुण्याच्या हद्दीतील विकास आराखड्यातील पर्यावरणपूरक, लोकोपयोगी आरक्षणे वगळण्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार, अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी ठाम विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात त्यांनी  विभागीय आयुक्त, नगर विकास संचालक आणि पुणे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांना पत्र लिहिले असून, पालिकेत आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अधिक माहिती दिली.
26 सप्टेंबरचा विकास आराखडाविषयक अहवाल पाहिल्यानंतर याविषयी सविस्तर मत त्यांनी आज मांडले.
या पत्रावर स्थायी समिती अध्यक्ष अश्‍विनी कदम, सभागृह नेते बंडू केमसे, माजी आमदार कमल ढोले-पाटील, अ‍ॅड म.वि.अकोलकर, अशोक राठी, माजी महापौर वैशाली बनकर, नंदा लोणकर, रंजना पवार आदींच्या सह्या झाल्या आहेत.
खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘विकास आराखड्यात मोठे रस्ते, वाहतूक सुधारणा, पायाभूत सुविधा, हिरवाईच्या जागा, नदी, नाले, टेकड्या यांना प्राधान्य दिल्याचे सकृतदर्शनी दिसत असले, तरी भविष्यातील पुण्याचे नेमके चित्र पुढे येण्यासाठी या नियोजनाबरोबरच डी.सी.(डेव्हलपमेंट कन्ट्रोल) रूल्स् बनले पाहिजेत, तरच विकास आराखड्यातील प्रास्तावित बदल आणि त्याचा खरा परिणाम लक्षात येऊ शकेल. त्याशिवाय आराखडा अपूर्ण मानावा लागेल.
कमिटीने धोरण ठरविताना वन स्ट्रोक धोरण ठरविल्याने शहराच्या नियोजनावर, भवितव्यावर परिणाम होऊ शकतो. 21 व्या शतकातील पुण्यासाठी आपण या पत्रात काही सूचना केल्या आहेत, त्या खासदार चव्हाण यांनी सांगितल्या.
1) आरक्षणांच्या संख्येतील कपात- 
 
आरक्षणांची संख्या कमी करण्याचा सरसकट निर्णय अहवालात घेताना नागरिकांच्या सूचना विचारात घेतल्या गेल्या नाहीत. नागरिकांच्या हरकती, सूचना घेण्याची सर्व प्रक्रिया बाजूला पडली गेली आहे. पुणे हे वेगवान, सुरक्षित, सुसंस्कृत शहर म्हणून माहित असताना मोकळ्या जागा, उद्याने, रिव्हर फ्रंट डेव्हल्पमेंट, सायन्स पार्क, सार्वजनिक ठिकाणे, हिरवाईच्या जागा, युवांसाठी सांस्कृतिक केंद्र, वृद्धाश्रमे, स्पास्टीक सेंटर अशा गोष्टींचा विचार झाला पाहिजे. मात्र, 1997 च्या विकास आराखड्यात कोणतीही नवी आरक्षणे नकोत, असा निर्णय सरसकट घेतल्याने वरील महत्त्वाच्या गोष्टी बाजूला पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. विकास आराखडा ही संकल्पना धोक्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांना 20 टक्के पेक्षा अधिक आरक्षण 1987 च्या विकास आराखड्यात सुचविता येणार नाहीत असा दावा केला जात नसला, तरी शहराची मोकळ्या जागांची भविष्यात गरज लक्षात घेतली पाहिजे. पर्यावरणाच्या दृष्टिनेही पाहिले पाहिजे. लोकसंख्या प्रचंड वाढत असताना भविष्यात लागणार्‍या मोकळ्या जागांची तरतूद आता करणे ही महत्त्वाची बाब ठरणार आहे.त्यासाठी आरक्षणाबरोबर अ‍ॅमेनिटी स्पेस, टीडीआर, अ‍ॅकोमोडेशन रिझर्व्हवेशन यासारख्या नव्या संकल्पना, धोरणी उपाय शोधून काढल्या पाहिजेत.
यू.एन.एफ.डी.पी.आय.च्या निकषांनुसार 1000 लोकसंख्येचा घटक हे मार्गदर्शक प्रमाण मानून निरोगी जीवन शैलीसाठी आरक्षित जागा ठेवल्या पाहिजेत.
2) ग्रीन बेल्ट झोन, नदी-नाले आराखड्यात दिसत असले तरी ‘रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, नाला गार्डन इत्यादी साठीच्या जागा वगळण्यात आल्या आहेत.पूरपरिस्थितीसाठी, सुशोभिकरणासाठी अशा जागा लागणार आहेत. या जागा अंशत: जरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्याकडून विकसित झाल्या, तर त्याचा शहरवासियांना मोठा उपयोग होईल.
पूर्वीपासून आम्ही नागरिक मोकळ्या अणि हिरवाईच्या जागा सार्वजनिक ठिकाणे व्हावीत यासाठी आपण लढा देत आहोत. मात्र, ग्रीन बेल्ट मधील आरक्षणे वगळण्याने या महत्वपूर्ण मागणीला पुणेकरांच्या हिताला हानी पोचत आहे. पुण्याची जीवनशैली चांगली व्हावी, राहणीमान सुधारावे हाच आराखडा चा उद्देश असला पाहिजे.
3) टेकड्या वाचविण्याचा आग्रह – पुणेकरांना टेकड्यांविषयी, पर्यावरणविषयी विशेष आस्था आहे. कमिटीने 1:5 प्रमाणावरील जागा एचटीएचएस झोन ठरवून येथील प्रास्ताविक आरक्षणे बाजूला ठेवली आहेत. त्यात विकसनाबद्दल अस्पष्टता आहे. हेच निकष समाविष्ट 23 गावात बी.डी.पी. आरक्षणासाठी लावले आहेत. मात्र, ग्लोबल वार्मिंग, क्लायमेंट चेंज हे विषय 1987 मध्ये तितके गंभीर नव्हते हे लक्षात घेतले पाहिजे.
या झोनमध्ये विकसन परवानगी मिळाल्यास तेथे कोणीही फक्त झाडे लावणार नाही, हे स्पष्ट आहे. 4 टक्के बांधकामाला परवानगी दिली तरी बांधकामांची वाढ होण्याचा धोका आहे. जैवविविधता,पर्यावरण, आरोग्य शहराला पाणी देणारे स्रोत, कार्बन शोषून प्रदुषण कमी करणारे घटक, मोकळ्या जागांची कमतरता भरून काढणारा घटक, या सर्वच दृष्टिने टेकड्या जपणे आवश्यक असून तेथे झोपडपट्ट्या होऊ देता कामा नयेत.
4)  अ‍ॅग्रीकल्चर झोन निवासी केलेल्या जागांमधील विकसनाबाबतीत कोणताही चमकदार नवा विचार नाही. शहरामधील नवा आराखडा ठरवण्याची, त्या मागच्या सुनियोजित विकास करण्याची ही सुवर्णसंधी आहे. मात्र, त्यावरही तेथे टाऊन प्लानिंग सिस्टीम (टीपीएस) योजना केली पाहिजे.
शहराचे उत्पन्न वाढविण्यासाठी तेथे उंच इमारतींना परवानगी देऊन, अतिरिक्त चटईक्षेत्र देऊन प्रस्तावित आरक्षण कायम ठेवून अतिरिक्त मोबदला न देता विकास करता येईल.
संगमवाडीचे रूपांतर सेंट्रल कमर्शिअल झोनमध्ये करण्याने ‘मिक्स्ड् लॅण्ड यूज’ कल्पनेचा पायमल्ली होत आहे. तेथे दोन चटईक्षेत्र देण्याने पालिकेला फायदा होणार नाही.
‘स्मार्ट सिटी’ मॉडेलसाठी अधिक चांगल्या आधुनिक नियोजनाची आवश्यकता आहे. त्यात पालिका राज्य केंद्राच्या खासगी क्षेत्राचा सहयोग घेता येईल.
आराखड्यात सार्वजनिक वाहतुकीच्या पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मात्र डी. सी. रुल्स त्याप्रमाणे नसल्याने नेमका काय परिणाम होईल हे पाहणे गरजेचे आहे.
मेट्रो मार्गासाठी 4 एफ. एस. आय. देणे चुकीचे ठरणार आहे. मेट्रो स्टेशनसाठी किती एफ.एस.आय. दिला जाणार हे स्पष्ट नाही. तेथे ‘मिक्सड् लॅण्ड यूज’ ची कल्पना महत्त्वाची ठरू शकते. शिवाजी नगर शासकीय गोदामाच्या जागेवर मेट्रो स्टेशन सुचविले गेले असताना तेथे ही ‘मिक्सड् लॅण्ड यूज’  निकषाने मेट्रो आणि कोर्टाचा विकास करता येईल.
भाजी मंडई, पोलीस स्थानके, पोस्ट ऑफिस अशा अनेक छोट्या आरक्षणांचा विचार बाजू ठेवता कामा नये, नागरी हिताच्या या गोष्टींकडे डोळे झाक होऊ नये. फेरीवाले पुर्नवसन, सुरक्षितता अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. अ‍ॅमेनिटी पेसमुळे हे सर्व होईल, असा आशावाद चुकीचा ठरू शकतो. ऑक्सीजन पार्क (तळजाई), कलाग्राम (हडपसर), सायन्स सेंटर, प्लॅनेटोरियम, ही आरक्षणे वगळणे अत्यंत खेदजनक आहे.
नव्याने सुचवलेली प्राथमिक, माध्यमिक शाळा, रूग्णालये, उद्याने मैदाने यांची आरक्षणे ही देखील कमी आहेत. लोकसंख्या दर कमी होत असल्याचे कारण त्यामागे काही सदस्यांनी दिले, हे तर टीकास्पद आहे.
आपण सर्वांनी दूरदृष्टीने उद्याच्या पुण्याचा आराखडा केला पाहिजे. विकास आराखडा करण्याच्या पालिकेचा हक्क राजकीय कारणाने हिरावून घेतला गेला. नागरिक आणि त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचा विचार बाजूला ठेवण्यात आला. निदान आता डी.सी. रूल्सला प्राधान्य दिले जावे. इतर मुद्यांसाठी आम्ही राज्य सरकारला हस्तक्षेप करण्यासाठी संपर्क साधू.
unnamed

फटाके…रस्त्यावर;चाळीत नाहीच आणि रात्री १० नंतर नाहीच नाही …

0

पुणे- दिवाळी हा दिव्यांचा सण आहे उत्सव आहे, फटाक्यांच्या आतिषबाजी पूर्वी कायदे समजून घ्या ,  फटाके वाजविताना स्पर्धा करू नका … जास्त अति मौज हि करू नका कारण जर कोणीही तक्रार केली तर तुम्ही कायदेशीर कारवाईच्या कचाट्यात अडकू शकता आणि पोलिसांना तक्रार दाखल करून घ्यावीच लागेल हे हि लक्षात असू द्यात

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांविषयी काय कायदे आहेत हे समजून घ्या असे सांगणारे परिपत्रक पोलीस आयुक्तालयाने माध्यमांकडे प्रसिद्धीसाठी  पाठविले आहे

नेमके यात काय म्हटले आहे ते पाहू यात

१) दिवाळी निमित्त १९ नोव्हेंबर पर्यंत तात्पुरते फटाके विक्री परवाने

२)महाराष्ट्र शस्त्र अधिनियम १५४ (३) अन्वये ४२.३४ ग्राम -५.७१५ से मी लांबीचा व ३. १७५ से मी व्यासाचा दोर्याने गुंडाळलेला अटम्बोंब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फटाक्यांवर बंदी आहे . उत्पादनास- विक्रीस आणि बाळगण्यास आणि वापरण्यासहि  …

३)मुंबई पोलीस अधिनियम १९५१ पोटकलम ३३ यु मधील तरतुदीनुसार …

कोणत्याही रस्त्यात आणि रस्त्यापासून १० मीटर पर्यंत च्या अंतरात … सर्व प्रकारचे फटके वाजविणे-उडविणे यास बंदी – ते आवाजाचे असो व नसो …

याच कायद्यातील कलम २ चे पोटकलम १५ अन्वये कोणतीही आळी. चाळ, महामार्ग, पूल घाट जिथे रहदारी असो वा नसो इथे हि हि बंदी कायम असेल

यांचे उल्लंघन करनाऱ्यावर कलम १३१ (१५)सह (i)नुसार कायदेशीर कारवाई होईल

४) १०० हून अधिक फटाक्यांच्या माळा वर सर्वप्रकारची बंदी

५)१२५ डेसिबल हून अधिक आवाजाच्या फटाक्यांवर बंदी

६)रात्री १० ते सकाळी ६ आवाज करणारे फटाके वाजविण्यास  बंदी …

७)रुग्णालये , शैक्षणिक संस्था , न्यायालये असलेल्या शांतता झोन मध्ये कोणत्याही वेळेत फटके वाजविण्यास बंदी

यांचे उल्लंघन कोणी करीत असेल आणि त्रास होत असेल अशा नागरिकांनी याबाबत तक्रारी कराव्यात … या कायद्यांतर्गत पोलिसांना तक्रार दाखल करवून घ्यावी लागेल

‘ऑनलाईन अ‍ॅनिमेशन ऑलिंपियाड’ स्पर्धेचे आयोजन दिनांक 30 नोव्हेंबर 2015 पर्यंत नावनोंदणीचे आवाहन

0
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘ग्राफिक स्लेट डॉट कॉम’ या संस्थांच्या वतीने भारतातील पहिल्या ‘ऑनलाईन अ‍ॅनिमेशन ऑलिंपियाड’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑलिंपियाडमध्ये भाग घेण्यासाठी 30 नोव्हेंबर 2015 पर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन ‘पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाइन अ‍ॅण्ड आर्ट अ‍ॅण्ड स्कूल ऑफ आर्ट ’(तएऊअ) महाविद्यालयाचे प्राचार्य रिषी आचार्य यांनी दिली.
‘ग्राफिक डिझाईन, वेब डिझाईन्स, अ‍ॅनिमेशन आणि एडिटींग व व्हिज्युअल इफेक्ट्स’ या विषयावर आधारित या ऑलिंपियाडमध्ये ऑनलाईन एमसीक्यु परिक्षा व पोर्टफोलिओ अशा दोन फेर्‍या असतील.  ऑलिंपियाडमधील विजेत्याला ऑलिंपियाडचे प्रायोजक हाय टेक यांच्या वतीने रूपये 25 लाखांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
प्रत्यक्ष व्यवहारात मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि अ‍ॅनिमेशन जगात कलात्मकता वाढविण्यासाठी ही ऑलिंपियाड स्पर्धा एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. ऑलिंपियाड स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला ‘अ‍ॅपल मॅक बुक एअर’, उपविजेत्याला एच पी कंपनीचा लॅपटॉप तर द्वितीय उपविजेत्याला सोनी कंपनीचे प्ले स्टेशन गेम झोन अशी पारितोषिके दिली जातील.
अधिक माहितीसाठी http://animationolympiad.org, या संकेतस्थळावर किंवा  दुरध्वनी क्रमांकावर 888 88 08 108 संपर्क साधावा.
rsz_1logo-for-portal

स्मार्ट सिटी दुसèया टप्प्यातील नागरिकांच्या सहभागाकरिता स्वयंसेवकांना प्रशिक्षण

0

स्मार्ट सिटीच्या दुसèया टप्प्यातील नागरिकांच्या सहभागाकरिता कशा पध्दतीने कामकाज करावयाचे, जास्तीत जास्त नागरी सहभाग वाढविणेकरिता करावयाचे प्रयत्न यास्तव आज प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन अरण्येश्वर येथील पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न राजीव गांधी अ‍ॅकॅडमी ऑफ ई-लर्निंग स्कूलमधील साहित्य सम्राट विजय तेंडूलकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. सदरच्य प्रशिक्षणाकरिता आझम कॅम्पस विद्यार्थी, सावित्रीबाई फुले  पुणे विद्यापीठमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, नागरवस्ती अंतर्गत कार्यरत असलेल्या समुहसंघटिका व अन्य महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            याप्रसंगी उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना उपायुक्त अनिल पवार यांनी सांगितले की, वाहतूक व दळणवळण, पाणीपुरवठा व मलनिसा:रण, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण व शाश्वत उपाय, सावधानता व सुरक्षितता, उर्जा व वीजपुरवठा या विषयांना अनुसरुन नागरिकांना आपले प्राधान्यक्रम/ मतांद्वारे नोंदविता येतील. दुसèया टप्प्यातील आपले मतं केवळ ऑनलाईन पध्दतीने होणार असूर्न www.punesmartcity.in या संकेतस्थळावर नोंद करता येईल. तसेच अधिक माहिती प्राप्त करुन घेता येईल.

            वरीलप्रमणे क्षेत्रांचे उद्दीष्ट काय असले पाहिजे यातील उद्दिष्टातून सर्वाेत्तम उद्दिष्ट नागरिकांकडून ऑनलाईनद्वारे मागविण्यात येत आहे. त्यातून सर्वोत्कृष्ट क्षेत्रनिहाय उद्दीष्ट नक्की करुन त्यानंतर त्या त्या विषयातील तज्ञ अधिकारी, तांत्रिक अधिकारी, विशेषज्ञ, सल्लागार व मनपा अधिकारी यांच्या माध्यमातून यावरील उपाय निश्चित केले जातील व त्यानंतर प्रस्ताव तयार करण्यात येऊन राज्यशासनामार्फत केंद्रशासनाकडे पाठविला जाईल.

            दुसèया टप्प्याकरिता महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, समुह संघटिका, मनपा कर्मचारी यांच्या सहाय्याने व स्मार्ट फोन व टॅबच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जेणेकरुन जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग नोंदविला जाईल.

ज्या नागरिकांकडे स्मार्ट फोन अथवा इंटरनेट सुविधा आहे अशा नागरिकांकरिता मनपा प्रशासनाचे वतीने आवाहन करण्यात येते की, स्मार्ट फोन अथवा इंटरनेटद्वार्रे www.punesmartcity.in या संकेतस्थळावर जाऊन वरीलप्रमाणे उद्दिष्टांबाबत योग्य उद्दीष्ट निवड करुन संकेतस्थळावर नोंद करावी, जेणेकरुन पुणे शहराच्या या नागरिक सहभागाच्या अभिनव उपक्रमाचा प्रकल्प अहवाल तयार होईल. सदरचे संकेतस्थळ १२/१०/२०१५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कार्यान्वित राहील. तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपली मतं १२ ऑक्टोबरपर्यंत नोंदवावी ही विनंती.

            मनपा मुख्य भवनात कामानिमित्त आलेल्या नागरिकांकरिता ऑनलाईन मतं नोंदविण्याकरिता ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून नागरिक या सुविधांचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेत आहेत.

            महापालिका मुख्य भवनामधील मुख्य प्रवेशद्वार (पोर्च) मधील स्वागतकक्षाचे समोरील बाजूस सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली असून कार्यालयीन वेळात नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येईल.

ढोले पाटील अभियांत्रिकीत ” तरंग २०१५ ” संपन्न

0

पुणे : अभियांत्रिकी दिनाचे औचित्य साधत वाघोली येथील ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने ”तरंग २०१५” या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालयाच्या कम्प्युटर शाखेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये टेबल टेनिस,बॉक्स क्रिकेट,कॅरम,चेस,मेहंदी,रांगोळी,फोटोग्राफी,क्वीज ,वादविवाद,बॅडमिंटन,एनएफएस,भाजीपाल्याचा  वापर करून सजावट स्पर्धा आदी स्पर्धांचा समावेश होता.स्पर्धेचे उद्घाटन ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सागर ढोले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विभाग प्रमुख आरती दंडवते,कार्यक्रम समन्वयक प्रा.अमित झोरे उपस्थित होते.

unnamed